Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

करोना : स्वलालधन्य जाहलो मी

ग
गामा पैलवान
गुरुवार, 05/05/2022 - 16:52
🗣 238 प्रतिसाद

महत्वाची सूचना: धागा लेखकाच्या मताशी आणि इतर प्रतिसादांशी मिपा व्यवस्थापन सहमत असेलच असे नाही. कोविड किंवा अन्य लस न घेणे हे हानिकारक ठरू शकते. या बाबतीत आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने निर्णय घ्यावेत. - मिपा व्यवस्थापन

लोकहो, करोनाची लस घेण्यासाठी कोणावरही सक्ती करता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हंटलं आहे. कुठेतरी देर आहे, पण अंधेर नाही. गेले दोन-अडीच वर्षं मी जे बोंबलंत होतो त्यातलं बरचसं महत्त्वाचं अखेरीस न्यायालयाने मान्य केलं तर. संबंधित बातमी : https://www.lokmat.com/national/corona-vaccination-supreme-court-says-no-individual-can-be-forced-to-get-vaccinated-a732/ सदर बातमीतील ठळक खंड येणेप्रमाणे : १.
रोग टाळण्यासाठी निर्बंध लादू शकतात, परंतु लसीकरण करण्यास आणि कोणत्याही प्रकारचे विशेष औषध घेण्यास भाग पाडू शकत नाही.
हेच तर अस्मादिक म्हणंत होते की लशीची सक्ती हा नागरी स्वातंत्र्याचा संकोच आहे ( संदर्भ : https://www.misalpav.com/comment/1065888#comment-1065888 ). २.
आपल्या निर्णयात न्यायालयाने केंद्र सरकारला देशातील नागरिक आणि डॉक्टरांशी बोलल्यानंतर एक अहवाल प्रकाशित करण्यास सांगितले आहे, ज्यामध्ये लसीचे परिणाम आणि प्रतिकूल परिणामांचे संशोधन सर्वेक्षण असावे. :
ऐच्चाघोव, मग मी काय वेगळं बोंबलंत होतो ? आणि हे सांगायला सर्वोच्च न्यायालय कशाला पाहिजे ? इतकी साधी बाब सरकारला आपणहून समजायला हवी ना ? पण सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ? ( संदर्भ : https://www.misalpav.com/node/48514 धागा उडाला आहे ). ३.
सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात राज्य सरकारांना लस धोरणाबाबत सूचना करताना म्हटले आहे की, लसीच्या आवश्यकतेमुळे व्यक्तींवर लादलेले निर्बंध प्रमाणबद्ध आणि योग्य आहेत असे म्हणता येणार नाही.
हेच मी यापूर्वी म्हंटलं होतं की सरकारने संचारबंदी व टाळेबंदी घातल्या आहेत त्या नक्की कोणत्या तरतुदीखाली आहेत? यांना काही घटनात्मक आधार आहे का? ( संदर्भ : https://www.misalpav.com/comment/1066276#comment-1066276 ) असो. तर या यशाबद्दल मीच माझी पाठ थोपटून घेत आहे. कारण की शाबासकी द्यायला दुसरं कोणी येणार नाहीये. म्हणून मीच माझी लाल करून घेतो. अशा रीतीने मी स्वलालधन्य जाहलो आहे. आता एकेकाची एकेक भाष्ये पाहूया. १.
करोनाचे थोतांड प्रमाणाबाहेर फुगवल्याने जगभरातल्या आरोग्यसेवांवर अपरिमित ताण आला आहे. : https://www.misalpav.com/comment/1070817#comment-1070817
नीती आयोगाचे सदस्य व्ही.के.पॉल यांनी करोनाच्या बळींची संख्या फुगवून सांगणे अयोग्य असल्याचे विधान केले आहे. दुवा : https://tittlepress.com/covid19/1719836/ श्री. पॉल यांनी याबाबतीत लान्सेट या नामवंत प्रकाशनास दोष दिला आहे. च्यायला, हेच तर मी पण बोंबलतोय. मुडद्यावर करोनाचा छाप मारायला काय अक्कल लागते? शेवटी कोणीतरी ऐकलं तर. २.
टाळेबंदी हा उपाय नाही. विशेषत: धडधाकट माणसांना घरात डांबल्याने कसलाही फायदा नाही. : https://www.misalpav.com/comment/1065945#comment-1065945
हेच तर न्यायालयाने सांगितलं आहे. मी जे दोन वर्षांपूर्वी घसा फोडून ओरडाआरडा करीत होतो, तो आता न्यायालयाने ऐकला. यावरनं मी द्रष्टा महापुरुष आहे हे सिद्ध होतं. ३.
करोना हा रोगप्रवण लोकांसाठी घातक आहे. म्हणून रुग्णालयातल्या खाटा रोगप्रवण लोकांसाठी मोकळ्या हव्यात. मात्र परिस्थिती नेमकी उलट होती. रुग्णालयांत खोट्या रुग्णांची सरसकट खोगीरभरती होत होती. तिचे दुष्परिणाम इथे आहेत : https://www.misalpav.com/comment/1074745#comment-1074745
रुग्णालयांचा अनुचित वापर टाळण्यासाठी शासनाने एक समिती गठित करावी असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्देश वर उद्धृत केलेलाच आहे. असंख्य निरर्थक बळी घेतल्यावर कुणालातरी ही अक्कल सुचली आहे. त्याबद्दल कुणाचंतरी अभिनंदन. ४.
माझ्यासारख्या बुद्धीभेदी लोकांमुळे करोनाच्या थोतांडास वाचा फुटली. : https://www.misalpav.com/comment/1098413#comment-1098413
आता पुढील लक्ष्य करोनाच्या लशीचं थोतांड उघड करण्याचं आहे. असो. हा एका अर्थी सर्वसामान्य जनतेचा विजय आहे. अर्थात, त्यामुळे हुरळून न जाता आपण ईश्वरचरणी कृतज्ञता व्यक्त करूया. जितके आपण ईश्वराच्या जवळ असू तितकं आपलं संरक्षण सुकर होणार आहे. म्हणूनंच आपण अधिक जोमाने नामजप करूया. धन्यवाद ! आपला नम्र, -गामा पैलवान

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 78128 views

🗣 चर्चा (238)
T
Trump Tue, 08/02/2022 - 05:04 नवीन
त्यांनी म्हणे (पुन्हा म्हणे च बरंका) एक ईलेक्ट्रोनिक डीवाईस शोधले आहे जे वैदीक प्रींसिपल नुसार घरात पॉसिटीव एनर्जी रेडीएट करते. (हायला मराठीत कसे लिवायचे हे सारे).
त्यांनी म्हणे एक विजाणू उपकरण शोधले आहे जे वैदीक तत्वानुसार घरात सकारात्मक उर्जा विकीरीत करते.
  • Log in or register to post comments
न
नगरी Wed, 05/11/2022 - 01:12 नवीन
प्रतिसाद वाचून मस्त करमणूक झाली. अरे तो काही मायक्रोन्स चा किडा त्याला मास्क वापरून कसे थोपवणार? असो सूर्याच्या रेडीएशनला नाही का आम्ही हॅट किंवा टोपी घालून थोपवतो.
  • Log in or register to post comments
न
नगरी Wed, 05/11/2022 - 01:46 नवीन
पृथ्वी चौकोनी नाही,त्रिकोणी आहे. सांगतो कसे ते, सूर्य असा फिरला की उन्हाळा , थोडा अजून फिरला की पावसाळा आणि थोडा अजून फिरला की हिवाळा. त्रिकोणीच आहे.
  • Log in or register to post comments
स
सुक्या Wed, 05/11/2022 - 21:17 नवीन
पृथ्वी चौकोनी नाही,त्रिकोणी आहे.
पृथ्वी चौकोनीच आहे. तुमची माहीती चुकीची आहे. फेडरल गव्हर्नमेंट आम्हाला कोपर्‍यावर जाउ देत नाही. तिथे जौ द्या आम्हाला .. लगेच आम्ही दुध का दुध पाणी का पाणी करतो का नाही ते बघा .. :-)
  • Log in or register to post comments
S
sunil kachure गुरुवार, 05/12/2022 - 10:44 नवीन
जगात खूप साऱ्या गोष्टी मानवास खूप हानिकारक आहेत. १) रासायनिक कारखाने,शहरांचे सांडपाणी पिण्याच्या पाण्याचे सोत्र प्रदूषित करत आहेत २)विविध हायब्रीड बियाणे,जेनेटिक बदल केलेले अन्न धान्य मानव जात संपवू शकतात..३) वायू प्रदूषण खूप तीव्र आहे पृथ्वी चे हवामान बदलून मानव जात पृथ्वी वरूनच नश्ट होईल त्या बाबत मीडिया सरकार हुशार लोक जास्त बोलत नाहीत .covid चा विषय असेल तर जगातील सर्व सरकार,हुशार लोक,मीडिया ह्यांना भलती चिंता लागलेली असते. Covid माणसाचे वरील तीन गोष्टी पेक्षा जास्त नुकसान करणार नाही .होवू ध्या covid काही त्याला थांबवायची गरज नाही. उगाच हायपर होण्याची काही गरज नाही. मी तर म्हणतो होवू सर्वांना covid. उगाच स्व स्वार्थ साधण्यासाठी इश्यू करू नका. लोकं मारायला तयार आहेत.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 05/12/2022 - 22:53 नवीन
कॉमी, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. माझी मतं सांगतो. १.
यात लसी नंतर उमटणार्या प्रतिक्रियेबद्द्ल वरकरणीतरी काही उल्लेख दिसला नाही.
नाहीच दिसणार. कारण की तो लेख रुग्णालयप्रविष्ट व मृतांची सांख्यिकीय चिकित्सा करणारा आहे. त्यामागील वैद्यकीय कारणं शोधणारा नाही. २.
८% लोकसंख्या पूलमधून ५८% मृत्यु होतायत हा आकडा बरेच काही बोलून जातो.
ही टक्केवारी सर्वसाधारण जनतेची नसून फक्त रुग्णालयात प्रविष्ट झालेल्यांची आहे. म्हणून हिच्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहायला पाहिजे. जर ९२ % लसीकरण पूर्ण झालं असेल तर ४२ % इतक्या मोठ्या प्रमाणावर करोनाचे रुग्ण भरती व्हायला नकोतंच मुळातून. लशीत काहीतरी गडबड आहे. ३.
जसे जसे दुसरा डोस, तिसरा/चौथा डोस- पुढे पुढे जाता तसे एकूण मृत्युमधला वाटा कमी होत जातो आणि मृत्युदर देखील कमी होतो.
नेमक्या याच बळजबरीस माझा आक्षेप आहे. एकदा का लशीचा पहिला ढोस घेतला की पुढचे घ्यावेच लागतात. ४.
म्हणजे सगळ्यांचे लसीकरण झाल्यावर एक माणूस मेला तर १००% मृत्यु लसीकरण झालेल्यांचेच आहेत म्हणत तुम्ही "लस घेउन आम्हाला काय फायदा झाला ?" असा तर्कदुष्ट सवाल करणार.
असा सवाल करायलाच पाहिजे. तो मरणारा माणूस नेमका मीच असलो म्हणजे? समजा जर मी लस घेतली तर माझ्या संरक्षणाची कसलीही हमी नाही. वर माझ्या प्रतिकारयंत्रणेची मोडतोड सहन करायची. आणि हे दुष्टचक्र सतत चालूच राहणार. एका ढोसात काम थोडंच भागणार आहे. ५.
जसे जसे दुसरा डोस, तिसरा/चौथा डोस- पुढे पुढे जाता तसे एकूण मृत्युमधला वाटा कमी होत जातो आणि मृत्युदर देखील कमी होतो.
हे या विदातून कुठेही स्पष्ट होत नाही. उलट लस घेऊन मेलेल्यांचं प्रमाण ४२ % इतकं अतिप्रचंड आहे. ६.
लस घेणार्यातले १% सोडा, ०.०००००१% सुद्धा लसीमुळे रिअ‍ॅक्शन येऊन मेले नाहियेत.
हे विधान तुम्ही कोणत्या विदाच्या वा पुराव्याच्या आधारे केलं ते कळेल काय? ७.
कोण कुठला हा एक्ष्पोसे पेपर- काय ती शेंडा व बुडखा नसलेली बातमी. मुलाचे नाव नाही, वैद्यकिय तज्ञांचे मत नाही, लस आणि मृत्यु मध्ये संबंध काय तर १३ दिवसांचे अंतर इतकेच. VAERS हा आजिबात विश्वसनीय स्त्रोत नाहिये. त्यात कोणीही काहिहि लिहू शकतं.
VERS हे लसहानी ( vaccine injury ) च्या नोंदी ठेवण्यासाठी अमेरिकी सरकारने खोललेलं संकेतस्थळ आहे. तुम्ही कोणत्या आधारे त्यास अविश्वसनीय स्रोत ठरवंत आहात ? मेलेल्या मुलाचा VERS क्रमांक २१५२५६० ( = 2152560 ) आहे व तो या धारिकेत सापडतो : https://vaers.hhs.gov/eSubDownload/index.jsp?fn=2022VAERSVAX.csv मृताचा नावगाव वगैरे तपशील उघड करायचा नसतो असा सरकारी कायदा आहे. मृत्यू १३ दिवसांनी झाला म्हणून काय झालं? लस टोचल्यावर लगेच मरायला हा काय हिंदी सिनेमा आहे का? ८.
बर, तुम्हाला भारतातली परिस्थीती हवी होता ना- ही बघा. Unvaccinated account for 92% Covid deaths in 2022: ICMR
हा जुना ०४ मार्च २०२२ चा दुवा आहे. त्यानंतर व्ही.के.पॉल यांनी करोनाच्या बळींची संख्या फुगवून सांगणे अयोग्य असल्याचे विधान केले आहे. तत्संबंधी दुवा : https://tittlepress.com/covid19/1719836/ असो. लस हाच विषाणू आहे. लशीबद्दल प्रश्न विचारायला हवेतंच हवेत. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Fri, 05/13/2022 - 03:30 नवीन
जर ९२ % लसीकरण पूर्ण झालं असेल तर ४२ % इतक्या मोठ्या प्रमाणावर करोनाचे रुग्ण भरती व्हायला नकोतंच मुळातून. लशीत काहीतरी गडबड आहे.
लस संपूर्ण संरक्षण देत नसली तरी जिवंत राहाण्याचे आणि गंभीर रित्या आजारी न पडण्याचे प्रमाण लस घेतलेल्यांमध्ये जास्त आहे.
हे विधान तुम्ही कोणत्या विदाच्या वा पुराव्याच्या आधारे केलं ते कळेल काय?
VAERS relies on healthcare providers, vaccine manufacturers and vaccine recipients to submit reports of adverse events following vaccination. Those events are not called “symptoms” or “side effects” because events reported to VAERS are not all verifiably linked to the vaccines, as the CDC says on its website. जून 2021 पर्यंत तरी केवळ 3 कन्फर्म लसीमुळे झालेले मृत्यू होते. VAERS वरचे सगळे मृत्यू खरे मानले तरी 0.00१८ % होतात. https://covid-101.org/science/how-many-people-have-died-from-the-vaccine-in-the-u-s/
हा जुना ०४ मार्च २०२२ चा दुवा आहे. त्यानंतर व्ही.के.पॉल यांनी करोनाच्या बळींची संख्या फुगवून सांगणे अयोग्य असल्याचे विधान केले आहे. तत्संबंधी दुवा : https://tittlepress.com/covid19/1719836/
गैरसमज आहे.हेडलाईनच्या पुढे वाचा- हे जे पॉल आहेत ते भारत सरकारच्या ४-५ लाख मृत्यूंना फुगवलेले म्हणत नाहीयेत (ज्यावर वरील ९२% आकडा आधारित होता) तर ते लॅन्सट मध्ये एक्सेस मोर्तलिटी वर जो चाळीस लाख आकडा प्रकाशित झाला (पुढे जो WHO ने वाढवून ५४ लाख केला आणि ज्याबद्दल तुम्ही टिप्पणी करत नाही आहात) त्याबद्दल बोलतायत. ४८९००० मेले ह्याबद्दल नीती आयोगाचे पॉल ह्यांना आक्षेप नाहीये. मी ९२% आकडा दिलाय तो त्याच गव्हर्नमेन्ट अकड्यांवरच आहे.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Fri, 05/13/2022 - 04:12 नवीन
गामाजी, तुमच्या मुद्द्यांना शक्य तितके काउंटर केले आहे. यापुढेही काही रोचक आणि चुकीचा दावा दिसल्यास करीन. पण तुमचे मुद्दे ग्रीक दंतकथांमधल्या हायड्रा राक्षसासारखे आहेत. एक डोकं कापलं कि तात्काळ दुसरं डोकं उगवतं. कापलेले डोके सुद्धा हळूच पुन्हा वर येते. उदाहरणार्थ- विषाणू आयसोलेट केलेला आहे, पूर्ण जिनोम सिक्वेन्सीन्ग उपलब्ध आहे असा पुरावा दिल्यावर विषाणू आयसोलेट केलेला आहे ह्यावर तुम्ही अजिबात मत प्रदर्शित करत नाही, त्या लेखातल्या तिसऱ्याच गोष्टींवर टिप्पणी करता. आणि पुढच्या प्रतिसादात पुन्हा- विषाणू विलग केलेला नाही असा दावा करता. काही लेखांचे चुकीचे इंटरप्रिटेशन करून टाकले होते. ऑक्सफर्डचा असो किंवा आत्ताचा ताजा निधी आयोगाचे पॉल काय म्हणले तो असो. मी शक्यतो तुमच्या एकन एक मुद्द्यांना ऍड्रेस करण्याचा प्रयत्न करतोय, पण मला तसे तुमच्याकडून होताना दिसत नाही. म्हणजे कोव्हिड पॉजीटीव्ह झालेल्या लोकांच्या गटात, लसीकरण झालेल्या गटात मृत्युदर आणि हॉस्पिटलात भरती होण्याचा दर कमी, आणि तोच दर लसीकरण न झालेल्यांच्यात काही पटीने जास्त आहे आहे याकडे साफ दुर्लक्ष करत तुम्ही फक्त एकूण मृत्यूमध्ये लसीकरण झालेले ४२% आहेत यावर आडून बसला. त्यावर मी शक्य तितके स्पष्टीकरण दिले आहे, पण तुम्ही त्यावरच अडून आहात. बरं, जगात इतके जास्त लोक मेले आहेत- १.५ करोड. करोना थोतांड असेल तर इतके लोक मेले कसे काय ? आणि जे मेले ते बरोबर कोव्हिड ज्या वेळेस उच्चस्तरावर होता त्यावेळेतच कसे मेले ? त्या एक्सेस मॉर्टलिटी वर सुद्धा काहीच टिप्पणी नाही. बरं आता चर्चेत ANECDOTES आणायचे नसतात म्हणून मी थांबलेलो. पण सांगतोच. लस येण्याच्या आधी- पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत माझे ३ विविध वयाचे नातेवाईक/मित्र गेले. त्यांना रातोरात श्वास घ्यायला त्रास झाला आणि गेले. त्याहून संख्येने कित्येक जास्त ओळखीचे गंभीरपणे आजारी होते, त्यांना ऑक्सिजनवर ठेवावे लागलेले. लस आल्यानंतर पुढे जी ओमीक्रोनची तिसरी लाट आली त्यात जवळपास दिसेल तो माणूस पॉझिटिव्ह अशी परिस्थिती होती. नुसता पाझिटिव्ह नाही तर माईल्ड आजारी सुद्धा- खोकला, ताप. पण (बहुदा) लसीकरणामुळे कोणालाही हॉस्पिटलमध्ये पायसुद्धा ठेवावा लागला नाही. सध्यापुरता तरी विराम. - आ. न., कॉमी.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 05/13/2022 - 07:08 नवीन
@कॉमि आकाशातील ग्रहांची शांती करता येते दुराग्रहाची नाही. गा पै यांचे मत टोकाच्या दुराग्रहाचे असल्यामुळे त्यांच्याशी वितंडवाद घालण्याचे मी केंव्हाच सोडून दिले आहे. माझ्या mbbs वर्गाचा व्हॉट्स अँप ग्रुप आहे (सदस्य १२५) यातील लोक जगभर विखुरलेले आहेत इंग्लंड अमेरिका मध्यपूर्व युरोप इ तसेच माझ्या कॉलेजचा ( AFMC) चा मुंबैतील डॉक्टरांचा पण ग्रुप आहे.( २२०) तसेच आय एम ए चा मुलुंड (२५६)आणि मुंबई (१७०)असे दोन ग्रुप आहेत. या सर्व ग्रुपवरील अतिदक्षता विभागात काम केलेल्या सर्वच डॉक्टरांचे स्वतःचे अनुभव असे आहेत कि जेवढे मृत्यू किंवा गंभीर आजार झाले त्यात ९५ % + लोक लस न घेतलेले होते. मृत्यू होणार्यात अमेरिकेत सर्वात जास्त लोक लठ्ठ आणि मधुमेहाने किंवा हृदयविकाराने पीडित होते. बाकी आकडेवारीने एक सोडून कोणतीही गोष्ट सिद्ध करता येते. ती एक गोष्ट म्हणजे सत्य
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Fri, 05/13/2022 - 09:21 नवीन
काजव्याणे सूर्याची बरोबरी करणे हा मूर्खपणाच पण गिर्र अंधारात काजव्यांचा प्रकाश पण सूर्य प्रकाश पेक्षा खूप जास्त किमतीचा असतो लस लस लस. ह्या वर चर्चा चालू आकडे वारी फेकली जात आहे. पण साथीच्या रोगांचे जीवन चक्र हे पण लक्षात घेणे गरजेचे आहे. जसे सुरवंट पासून फुल पाखरू बनते ते एक चक्र आहे. साथीचे रोग. लागण,उच्च पातळी,कमजोर होणे .आणि शेवटी नष्ट होणें Covid जर साथी चा रोग असेल तर तो काही वरील नियमाला अपवाद असू च शकत नाहीं. पहिली लाट लागण. दुसरी लाट उच्च पातळीवर. तिसरी लाट सौम्य. आणि नंतर नष्ट. Covid बाबत हेच घडले आहे .प्रथम फक्त लागण झाली होती .नंतर दुसऱ्या लाटे मध्ये मृत्यू वाढले.आणि तिसऱ्या लाटेत omiycron.विषाणू सौम्य झाला. लस नसती घेतली तरी हेच घडले असते. हे नैसर्गिक आहे.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Fri, 05/13/2022 - 09:34 नवीन
लस घेतलेल्या लोकांपेक्षा लस न घेतलेली लोक जास्त गंभीर होती. जी लस न घेतलेली लोक जास्त गंभीर होती त्यांना पहिली covid ची लागण झाली होती की नव्हती. ह्याची माहिती अती म्हणजे खूप महत्वाची आहे. कोविड लाटेत कधी मृत्यू वाढले. ह्याचे उत्तर पण खूप महत्वाचे आहे... निसर्ग नियमानुसार साथीचा covid साथ उच्च पातळीवर होती तेव्हाच ना? ह्याचे उत्तर जरुर दिले जावे. .लस उपलब्ध नसती तर आज काय स्थिती असती ह्या वर मत व्यक्त करावे. माझ्या मतानुसार काही फरक पडला नसता.फुकट abjo रुपये फुकट गेले आहेत . सर्व शक्यता गृहीत धरून आकडे वारी द्यावी. ती उपलब्ध असणारं च नाहीं पूर्ण खात्री आहे.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Fri, 05/13/2022 - 09:49 नवीन
ज्यांचा bmi जास्त होता आणि ज्यांना जनुकीय बिघाड झाल्यावर जो रोग होती तो मधुमेह हा रोग झाला होता त्या लोकांचा मृत्यू अमेरिकेत covid मुळे जास्त झाले आहे असे dr खरे दावा करत आहेत. रोगप्रतिकार यंत्रणा त्या यंत्रणेची कुवत,क्षमता आणि bmi म्हणजे लठ्ठ पना ह्याचा काही ही कुठून पण लांबून तरी संबंध आहे का? हे स्पष्ट करावे.
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Fri, 05/13/2022 - 12:47 नवीन
संदर्भ : लोकसत्तामधील बातमी (दुसरा दुवा) लोकसत्ता दि ७ मार्चच्या अंकातली बातमी - राज्यातील सुमारे एक कोटी ६४ लाख लोकांनी कोव्हिड लशीची एक मात्रा घेतली पण दुसरी मात्रा घेतलेली नाही. समजा यातील निम्याहूनही अधिक (साधारण एक कोटी म्हणू) लोकांचे दुसरी मात्रा न घेण्याचे कारण बेफिकिरी, दिरंगाई , वैयक्तिक अडचणी यापैकी काही असेल असे मानले तरी उरलेल्या किमान साठ लाख लोकांनी दुसरी मात्रा का बरं घेतली नसेल ? तेही शासकीय केंद्रात मोफत उपलब्ध असताना ? साधारणपणे कोव्हिड लस पुर्णतः सुरक्षित असाच प्रचार प्रसारमाध्यमांतून केला गेला आहे. आणि कोव्हिड लस न घेणे म्हणजे अडाणीपणा, हेकटपणा किंवा कुठल्यातरी अंधविश्वासातून उपजलेला विरोध असेच समजले जात आहे. पण एक मात्रा घेवून झाल्यानंतर दुसरी मात्रा न घेणारे लोक तसं केवळ कुठल्यातरी चुकीच्या व अवैज्ञानिक विचारप्रवाहात अडकून करत असतील असे मानणे योग्य होईल का ?राज्यातील हे साठ लाखांहून अधिक लोक स्वतःला किंवा निकटच्या लोकांना अनुभवास आलेल्या लशीच्या दुष्परिणामामुळे तर दुसरी मात्रा घेण्याचे टाळत असतील असे तर नाही ना ? कोव्हिड लस (वा लसीकरणाची पद्धत) संपुर्णतः सुरक्षितच आहे , म्हणजे लशीचे काही दुष्परिणाम असणाची शक्यताही पुर्णपणे नाकारणे हे विज्ञानाच्या तत्वांना कितपत धरुन आहे ? एकुणातच एखाद्या गोष्टीत त्रुटी असण्याची शक्यताही नाकारणे म्हणजे सुधारणेची कवाडे स्वतःहून बंद करणे. मी एका आरोग्यविषयक व्हॉट्स अ‍ॅप समूहाचा सदस्य आहे. या समूहाच्या अ‍ॅडमिन असलेल्या एक आयुर्वेदतज्ज्ञ फक्त त्या समूहात पोस्ट करतात. एका पोस्टमध्ये त्यांनी स्पष्ट शब्दांत नमूद केले होते की "कोविड होऊन गेल्यानंतर, किंवा कोविडसाठी लसीकरण केलेल्या रुग्णांमध्येही आम्लपित्ताचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे" . दुर्दैवाने बहुतांशी डॉक्टर मात्र अशा प्रकारे लशीच्या विपरित परिणामाबद्दल उघडपणे बोलताना दिसत नाहीत. माझी भूमिका लसीकरणाच्या विरोधी नाही पण लशीच्या परिणामांचा अधिक विस्ताराने व खोलवर अभ्यास व्हावा असा माझा आग्रह आहे. खरेतर देशात कोट्यावधी लोकांनी लस घेतलेली असताना लशीच्या बर्‍या वाईट परिणामांचा मोठा विदा अगदी सहज गोळा होवू शकला असता. या विदाचा उपयोग करुन लस वा लस घेण्याची पद्धत (दोन मात्रांमधील अंतर , मात्रा घेण्यापुर्वी व नंतर घ्यावयाची विशेष काळजी , पूरक औषधे, आवश्यकतेप्रमाणे जीवनसत्वांच्या गोळ्या ई.) या सगळ्यात अधिक सुधारणा करता आली असती. पण लस उत्पादक कंपन्या वा सरकारही याबाबत उत्साही आहेत असे दिसत नाही. पण अजूनही वेळ गेलेली नाही. प्रसारमाध्यमांतून जाहिराती करुन संपर्काची विविध माध्यमे उपलब्ध करुन देत याबाबतचा विदा गोळा केला जावू शकतो. डॉक्टर्स व पॅथॉलॉजी लॅब्स यांनाही प्रोत्साहित करुन अधिकाधिक विदा गोळा केला जावा आणि या विदाच्या आधारे येणार्‍या काळात लसीकरण अधिकाधिक सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न व्हावेत.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 05/13/2022 - 12:56 नवीन
शेवटच्या उता-यातील विचारांशी तंतोतंत सहमती. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 05/14/2022 - 16:34 नवीन
"कोविड होऊन गेल्यानंतर, किंवा कोविडसाठी लसीकरण केलेल्या रुग्णांमध्येही आम्लपित्ताचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे" हे आम्लपित्त कोव्हीड आजारामुळे झालं कि लसीमुळे झालं कि घरात बसून राहिल्यामुळे झालं? आम्लपित्त होण्याचे प्रमाण कोव्हिडची लस उपलब्ध होण्याच्या अगोदरच प्रचंड प्रमाणात वाढलेलं होतं. याची अनेक कारणे आहेत. १) घरातल्या घरात बसून राहणे २) प्रचंड भीती आणि काळजी मग हि रोगाची असो किंवा आपल्या नोकरी धंद्याची असो किंवा आपल्या वयस्कर मातापिता किंवा नातेवाईकांची ३) टीव्ही/ संगणक/ भ्रमणध्वनी सोडला तर बाकी कोणताही करमणुकीचा मार्ग उपलब्ध नसल्यामुळे आणि पूर्ण वेळ घरात असल्यामुळे बहुसंख्य लोकांनी आपले लक्ष सुग्रास खाण्यावर आणि बनवण्यावर केंद्रित केला होतं यामुळे एकादशी आणि दुप्पट खाशी असा प्रकार सर्रास दिसून आला. ४) हातावर पोट असणारे सोडुन बाकी सर्वांचे वजन वाढले. आमच्या स्वयंपाकाला येणाऱ्या बाई सुद्धा बाकी सर्वानी तात्पुरते कामावरून काढले असल्यामुळे भरपूर वजन वाढवून फुगल्या होत्या. कारण वेगवेगळ्या घरी जाण्यासाठी त्यांना रोज ४-५ किमी चालावे लागत होते. आता परत कामे चालू झाल्यावर त्यांचे वजन कमी होऊन पूर्ववत झाले आहे. ४) अतिरिक्त खाण्यामुळे यकृतात अतिरिक्त चरबी दिसून येणे हा प्रकार गेली दोन वर्षे मी स्वतः सोनोग्राफी करताना पाहत आलो आहे. तेंव्हा केवळ अनुमान धपक्यावर अवलंबून राहण्यापेक्षा वस्तुस्थिती जाणून घेणे आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sat, 05/14/2022 - 22:33 नवीन
सुबोध खरे, हाच न्याय करोनासही लागू पडतो ना? आम्लपित्त लशीने होत नसून इतर कारणं आहेत. तर याच धर्तीवर असाही प्रश्न विचारता येतो की जीव गेला तो करोनामुळे की सहव्याधींमुळे? निरोगी तरुणांना हार्ट अॅटॅक येतात ते mRNA लसीने प्रथिननिर्मितीत हस्तक्षेप केल्याने की आपोआप? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 05/15/2022 - 17:52 नवीन
तार्किक वाटत आहे माझ्या आईला, वय वर्षे 78, करोनाची लागण झाली होती . ऑक्सीजनची पातळी 55% च्या आसपास होती, पण ती वाचली ... तिला, मधुमेह, किडनी ट्रबल आणि हृदयरोग न्हवता माझ्या ओळखीतील अजून चार लोकांना, करोनाची लागण झाली होती आणि त्यांना देखील, इतर कुठल्याही प्रकारची शारिरीक व्याधी न्हवती. ते वाचले. माझ्या एका मित्राला करोनाची लागण झाली आणि नंतर देवाज्ञा झाली. त्याला मधुमेह होता... अजून डाटा मिळाला तर, इतर शारिरीक व्याधी असतील तर, करोनाची लागण, अशा रुग्णांच्या जीवावर देखील येऊ शकते का? हे नक्कीच बघता येईल .... एक वैयक्तिक अनुभव सांगतो . माझ्या कुटुंबातील सदस्य, रोज मोरावळा खातात. आणि आम्हाला कुणालाच करोनाची लागण झाली नाही. आवळ्यातील आम्ल, करोना प्रतिबंधक असू शकेल का? ह्याचे उत्तर मिळाले तर फारच उत्तम ...
  • Log in or register to post comments
र
रामचंद्र Sat, 07/27/2024 - 21:44 नवीन
<माझ्या कुटुंबातील सदस्य, रोज मोरावळा खातात. आणि आम्हाला कुणालाच करोनाची लागण झाली नाही. आवळ्यातील आम्ल, करोना प्रतिबंधक असू शकेल का? ह्याचे उत्तर मिळाले तर फारच उत्तम ...> यावर तज्ज्ञ, जाणकार काय म्हणतात?
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Sun, 05/15/2022 - 17:08 नवीन
तेंव्हा केवळ अनुमान धपक्यावर अवलंबून राहण्यापेक्षा वस्तुस्थिती जाणून घेणे आवश्यक आहे.
आधी म्हंटल्याप्रमाणे सदर विधान हे एका व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप मधले आहे. हे ग्रुप एक आयुर्वेदतज्ज्ञ डॉक्टर चालवतात व फक्त त्या स्वतःच त्या ग्रुपमध्ये पोस्ट करतात. सर्व पोस्ट त्यांच्या स्वतःच्या असतात (प्रत्येक पोस्टच्या खाली त्यांचे नाव , आयुर्वेदतज्ज्ञ ही उपाधी व शहराचे नाव लिहिलेले असते). त्यामुळे सर्व पोस्ट्स जबाबदारीने लिहिलेल्या असतात, ढकलपत्र नव्हे. त्यामुळे त्यास अनुमान धपक्याने असे मी तरी म्हणू शकणार नाही .. बाकी तुमची मर्जी.
गेली दोन वर्षे मी स्वतः सोनोग्राफी करताना पाहत आलो आहे.
जसे तुम्ही तुमच्या (पर्यायाने तुमच्या रुग्णांच्या ) अनुभवावर आधारित लिहिले आहे तसेच त्या डॉक्टरांनी त्यांच्याकडे येणार्‍या रुग्णांच्या अनुभवावरुन लिहिले असेल , नाही का ? असो.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 05/13/2022 - 12:49 नवीन
निकाल वाचला त्या दिवशी तुमची आठवण झालीच होती. लशीच्या थोतांडाच्या धाग्याचा मी तर फॅनच होतो. त्यामुळे आपल्या मताशी सहमती आहेच. सालं देशात आणि जगात माणसाला मरणाची इतकी भितीच घातली गेलेली होती की, लशी टोचून नै घेतल्या तर आपली इहलोकाचा कार्यकाळ भरला इतकी ती दहशत होती. मिडिया, वृत्तपत्रे यांचा तर त्यात वाटा होताच. रुग्णांनी भरलेले दवाखाने, मृतांचे आकडे, व्हायरल होणा-या चित्रफिती, त्यात मित्रो, आज रात्री आठवाजेपासून यंव बंद आणि त्यंव बंद, हे उघडं ते बंद. सालं जगण्यासाठी लशीशिवाय पर्यायच नाही, असे ते वातावरण करुन टाकलं होतं. कितीतरी रुग्ण नुसते भितीने गेले असावेत इतकी ती दहशत. एकदाच्या लशीचा शोध लागला आणि आपण सर्वांनी हुश्श केलं. आता काय नै, एकदा लशीचा डोस घेतला की झालो अमर, असे वातावरण होते. लस टोचून घेण्यासाठीचे ते जुगाड, ती गर्दी, विकत-मोफत हे सर्व एक नवंच नाटक होतं. बाकी, लशीमागचे राजकारण काय होते, वैद्यकशास्त्र काय म्हणते, त्यापाठीमागचा व्यापार काय होता. मताचे राजकारण किती होते हे सगळं सोडलं तरी, लशीसाठी केलेली सक्ती आपल्याला आवडली नव्हती. दॅट्स ऑल. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 05/13/2022 - 21:11 नवीन
कॉमी, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. माझी मतं सांगतो. १.
एक डोकं कापलं कि तात्काळ दुसरं डोकं उगवतं.
तसं उगवायला पाहिजेच. एकतर करोना हा सर्दीपडशासारखा आजार आहे, फारतर फ्ल्यू सारखा म्हणता येईल. त्याच्यासाठी लस कशाला पाहिजे? सर्दी-फ्ल्यू वर कोणी जनुकोपचार ( MRNA ) लस काढतं का? डास मारायला रणगाडा कशाला ? आणि ते PCR चाचणी नसून अभिवर्धनतंत्र ( = amplification technique ) आहे. त्याचा लागणीशी अणुमात्र संबंध नाही. लागण ( clinical infection ) आधी होते आणि नंतर त्याची चाचणी करायची असते. पण करोनाचा उलटा कारभार आहे. आधी PCR 'चाचणी' करायची आणि नंतर त्यावरनं लागण झाली आहे असं ठोकून द्यायचं. थोतांड ते थोतांडच. म्हणून इतकी असंख्य डोकी उगवताहेत. २.
कापलेले डोके सुद्धा हळूच पुन्हा वर येते.
त्याचं काये की लबाडी तोकड्या चादरीसारखी असते. डोक्यावरनं ओढून घेतली की पाय उघडे पडतात. करोनाची लबाडी तशीच आहे. ३.
उदाहरणार्थ- विषाणू आयसोलेट केलेला आहे, पूर्ण जिनोम सिक्वेन्सीन्ग उपलब्ध आहे असा पुरावा दिल्यावर विषाणू आयसोलेट केलेला आहे ह्यावर तुम्ही अजिबात मत प्रदर्शित करत नाही, त्या लेखातल्या तिसऱ्याच गोष्टींवर टिप्पणी करता. आणि पुढच्या प्रतिसादात पुन्हा- विषाणू विलग केलेला नाही असा दावा करता.
रोग्याच्या नमुन्यापासनं करोनाचा विषाणू विलग केलेला नाही. तुम्ही दिलेल्या लेखात उल्लेखलेला नमुना इतरत्र वाढवलेला आहे. इथे इंग्लंडात सांख्यिकीय विभागाकडे करोना विषाणू अलग केल्याचा पुरावा नाही ( इंग्रजी दुवा ) : https://www.ons.gov.uk/aboutus/transparencyandgovernance/freedomofinformationfoi/proofthatcovid19hasbeenisolatedinalaboratory मात्र असा पुरावा इतरत्र असू शकतो, म्हणून ब्रिटीश मेडिकल जर्नल मध्ये शोध घेतला. तिथे करोनाच्या अस्तित्वाबद्दल काही प्रश्न उपस्थित केले आहेत ( इंग्रजी दुवा ) : https://www.bmj.com/content/370/bmj.m3379/rr-2 त्यानुसार १२ ऑक्टोबर २०२० पर्यंत करोनाचा अस्सल नमुना अस्तित्वात नव्हता. नंतरचं माहित नाही. पण ज्याअर्थी विषाणू मिळाल्याचा गवगवा झाला नाही, त्याअर्थी ही परिस्थिती तशीच असावी असं वाटतंय. ४.
काही लेखांचे चुकीचे इंटरप्रिटेशन करून टाकले होते. ऑक्सफर्डचा असो किंवा आत्ताचा ताजा निधी आयोगाचे पॉल काय म्हणले तो असो.
चूक झाली हे खरंय. कारण की माझा अन्वयार्थ ( = इंटरप्रीटेशन ) माझा जीव वाचवण्यापुरतंच होतं. त्यामुळे थोडी गफलत झाली. मी यांतला तत्ज्ञ नाही. जे जाणकार आहेत ते तोंडात मिठाची गुळणी धरून बसलेत. मग माझ्यासारख्या स्खलनशील माणसाला प्रयत्न करावे लागतात. ५.
तुम्ही फक्त एकूण मृत्यूमध्ये लसीकरण झालेले ४२% आहेत यावर आडून बसला.
कारण की, मला मरायचं नाहीये. लस घेऊनही मी जर ४२ % मध्येच अडकणार असेन, तर लस घ्यायचीच कशाला? ६.
बरं, जगात इतके जास्त लोक मेले आहेत- १.५ करोड. करोना थोतांड असेल तर इतके लोक मेले कसे काय ?
मृतांवर करोनाचे खोटे छाप मारल्याने. यावर कायझाद कापडिया यांच्या मृत्यूचं उदाहरण अगोदर https://henryclubs.com/kaizad-kapadia-fitness-expert-and-founder-of-k11-school-is-49-died-of-covid-in/ दिलं होतं. निरर्थक व खोटे छाप मारून आकडा फुगवण्यात आला आहे. ७.
त्या एक्सेस मॉर्टलिटी वर सुद्धा काहीच टिप्पणी नाही.
इथे इंग्लंडात फ्ल्यूचे मृत्यू करोनाखाली लपवण्यात आले आहेत. मृतावर करोनाचा छाप मारण्यासंबंधी या लेखात प्रश्न उपस्थित केले आहेत ( इंग्रजी दुवा ) : https://www.bmj.com/content/375/bmj.n2514 या लेखातलं वाक्य : Deaths from covid-19 were most pronounced in people over 75 with chronic kidney disease or dementia and in black people with obesity, diabetes, or chronic kidney disease. करोनामृत्यूचा निरोगी असलेल्या धडधाकट माणसाशी कसलाही संबंध नाही. ८.
त्यांना रातोरात श्वास घ्यायला त्रास झाला आणि गेले. त्याहून संख्येने कित्येक जास्त ओळखीचे गंभीरपणे आजारी होते, त्यांना ऑक्सिजनवर ठेवावे लागलेले.
तुमचे आप्तेष्ट अकाली गेले याबद्दल खेद आहे. पण एक सांगायला हवं की, श्वासोत्तेजक व प्राणवायू हा करोनावरील उपचार नव्हे. आयव्हरमेक्टिन हा उपाय असू शकतो. तो डॉक्टरांच्या चर्चेत का येत नाही? इथे थोडी माहिती आहे : https://www.covid19treatmentguidelines.nih.gov/therapies/antiviral-therapy/ivermectin/ ९.
लस आल्यानंतर पुढे जी ओमीक्रोनची तिसरी लाट आली त्यात जवळपास दिसेल तो माणूस पॉझिटिव्ह अशी परिस्थिती होती. नुसता पाझिटिव्ह नाही तर माईल्ड आजारी सुद्धा- खोकला, ताप. पण (बहुदा) लसीकरणामुळे कोणालाही हॉस्पिटलमध्ये पायसुद्धा ठेवावा लागला नाही.
तिसरी लाट आलीच नाही हे डॉक्टर रवी गोडसे यांचं मत आहे : https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/coronavirus-third-wave-dr-ravi-godse-opinion-on-3rd-wave-of-corona/articleshow/89009661.cms असो. जमेल तशी टिपणी केली आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 05/13/2022 - 22:36 नवीन
सुबोध खरे, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. हे वाक्य मला उद्देशून आहे असा मला वाटतं :
आकाशातील ग्रहांची शांती करता येते दुराग्रहाची नाही.
माझं म्हणणं आहे की; फुटबॉल खेळाडू मैदानावर मरताहेत, आणि मी दुराग्रही? इंग्लंडातल्या आरोग्यसेवेने लहान मुलांना लशीपायी हृत्शूल ( = हार्ट अॅटॅक ) येऊ नये म्हणून पत्रक काढलंय, आणि मी दुराग्रही? राफेल नदाल लशीमुळे छातीत गडबड वाटते म्हणून सांगतो, आणि मी दुराग्रही? याचा अर्थ असा की तुम्ही ज्यास दुराग्रह म्हणता, त्या दुराग्रहामुळे माझा जीव वाचला आहे. एक विनंती आहे. डॉक्टर एलिझाबेथ हम्फ्री यांनी लशीच्या इतिहासाबद्दल जे पुस्तक लिहिलंय ते वाचून त्याबद्दल अभिप्राय द्यावा. ते पुस्तक इथे पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे : https://drive.google.com/file/d/1ZAR7v0i5t62JOUqmPlWR2v90ntpJfXRD/ तुम्ही आकडेवारीच्या पलीकडल्या सत्याचा उल्लेख केला आहे. मग करून टाका त्या पुस्तकाचं खरंखोटं. सत्याला आकड्यांची भीती कशाला? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 05/15/2022 - 15:45 नवीन
"जितके आपण ईश्वराच्या जवळ असू तितकं आपलं संरक्षण सुकर होणार आहे. म्हणूनंच आपण अधिक जोमाने नामजप करूया." हे अजिबात पटलेले नाही .... नामजपात इतके सामर्थ्य आहे तर, मुस्लिम आणि ख्रिश्र्चन धर्माचे, हिंदुस्थानावर आक्रमण झालेच नसते.... धर्म राखल्या जातो, तो फक्त तलवारीच्याच बळावर ... मेक्सिको, इराण ही उदाहरणे पुरेशी आहेत .... परवाच एक जण अशीच गोष्ट करत होता की बाबा लोकांच्या अंगात दैवी शक्ती असते... इतकी जर शक्ती बाबा लोकांच्या अंगात असेल तर, विडीच्या एका झुरक्यात, सगळ्या ब्रिटीश लोकांना का नाही मारून टाकले? हा वाद, गामा पैलवान, यांच्या बरोबरच आहे .... सुज्ञ माणसे चोंबडेपणा करायला येत नाहीत ...
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 06/17/2022 - 20:10 नवीन
लोकहो, मंकीपॉक्स रोगासाठी अमेरिकेने ५००००० ( अक्षरी पाच लाख ) लशींची मागणी नोंदवली आहे. संबंधित ( इंग्रजी ) बातमी : https://www.politico.com/news/2022/06/10/us-monkeypox-vaccine-00038776 याचा अर्थ करोनाचं थोतांड गुंडाळी करून थंड्या बस्त्यात बांधायची तयारी सुरू झाली आहे. त्याबद्दल मी स्वत:ची परत एकदा लाल करवून घेतो आहे. अशी संधी सारखीसारखी मिळंत नसते. बाकी, मंकीपॉक्सला मराठीत प्रतिशब्द काय योजावा? माकडपुळी अगदीच पुचाट वाटतो. माकडफोड कसा वाटतो? किंवा मग माकडमोड हा माकडास मोड आल्यागत वाटतो. कुठला समर्पक आहे? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
स
सुक्या Sat, 06/18/2022 - 00:16 नवीन
The order also brings the number of U.S.-owned doses from 1.4 million to 1.9 million, एवढे बोलुन मी खाली बसतो
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sat, 06/18/2022 - 04:01 नवीन
अच्छा म्हणजे दुसरा रोग आला आहे आणि त्यासाठी लसी घेतल्या म्हणजे आधीचा रोग संपला असे गामाजींचे अफाट लॉजिक आहे. आपल्या भारतदेशात काल १२०००+ केसेस वाढल्या.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sat, 06/18/2022 - 08:58 नवीन
दुसरा रोग आला आहे आणि त्यासाठी लसी घेतल्या म्हणजे आधीचा रोग संपला असे गामाजींचे अफाट लॉजिक आहे.
काही काळ गर्दी खेचणारा एकादा पिच्चर फारसा चालेनासा झाला, की थेटरवाले नवीन पिच्चर आणतात, तरीसुद्धा काही काही थेट्रात तो जुना पिच्चर थोडे दिवस चालूच रहातो, तसे असावे.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sat, 06/18/2022 - 09:03 नवीन
एकदम बराबर ! -गा.पै.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sat, 06/18/2022 - 12:18 नवीन
ल मेटाफॉरने उंदराची शेपटी कुत्र्याला लावता येते. त्यापलीकडे त्याला काही अर्थ नाही. काल १२००० केसेस वाढल्यात हि वस्तुस्थिती आहे.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sat, 06/18/2022 - 18:27 नवीन
त्या १२००० लोकांमध्ये क्लिनिकल इन्फेक्शन आहे का? ते नसतांनाच उगीच ठोकून दिलेलं दिसतंय की ते रुग्ण आहेत. -गा.पै.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sat, 06/18/2022 - 08:53 नवीन
अमक्याच्या तोंडावर देवीचे 'वण' आहेत, असे म्हटले जायचे. मंकीपॉक्क्स = 'वानरवण'
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sat, 06/18/2022 - 10:45 नवीन
लोकहो, पंढरीच्या वारीवरील अधिकाऱ्यांना वर्धकमात्रेची सक्ती करण्यात आलेली आहे. संबंधित बातमी : https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/solapur/news/dose-for-employees-officers-appointed-for-ashadhi-wari-order-of-additional-129947501.html लससक्तीचा आदेश न्यायालयाच्या उपरोक्त टिपणीच्या विरोधात आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sun, 07/17/2022 - 18:19 नवीन
लोकहो, इंग्लंडच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने लस व मृत्यूविषयी विदा प्रकाशित केला आहे. सर्वात अद्यतन धारिका येथे आहे : https://assets.publishing.service.gov.uk/government/uploads/system/uploads/attachment_data/file/1066759/Vaccine-surveillance-report-week-13.pdf हिच्यातनं उचललेला मृत्यूंचा विदा खाली मांडला आहे. हा विदा रुग्णालयातल्या मृत्यूंचा आहे. हे मृत्यु करोना विषाणूशी संबंधित ( करोनामुळे झालेले नव्हे ) आहेत. साल महिना - किमान एक लस घेतलेले / लस न घेतलेले Year Month - Ever vaccinated / Unvaccinated २०२१ जानेवारी - ३४९३ / २४३६४ २०२१ फेब्रुवारी - ४८९२ / ७६६० २०२१ मार्च - १७७३ / १३११ २०२१ एप्रिल - ५२४ / २३८ २०२१ मे - २१३ / ७७ २०२१ जून - २२४ / ९७ २०२१ जुलै - ८३५ / ३३७ २०२१ ऑगस्ट - १६५७ / ५९० २०२१ सप्टेंबर - २१६४ / ४९६ २०२१ ऑक्टोबर - २३६९ / ४३० २०२१ नोव्हेंबर - २३७५ / ५५६ २०२१ डिसेंबर - १९९० / ६८२ २०२२ जानेवारी - ३९१४ / ६९३ २०२२ फेब्रुवारी - २४४७ / २६४ २०२२ मार्च - २६५८ / २०२ २०२२ एप्रिल - ३३६५ / २०६ २०२२ मे - १२८२ / ८२ करोनाशी संबंधित मृत्यूंमध्ये लस न घेतलेल्यांचं प्रमाण झपाट्याने उणावतंय हे संयुक्त साम्राज्याच्या शासनाने ( UK government ) अधिकृतरीत्या मान्य केलं आहे. घ्या लस टोचून आणि व्हा परलोकी मार्गस्थ. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ग
गवि Mon, 07/18/2022 - 04:08 नवीन
:-) पोलिओ लशीबाबतही हेच होणार आहे. हॉस्पिटल मृत्युंपैकी ९९ टक्क्याहून अधिक लोक पोलिओ लस घेतलेले असणार आहेत. बीसीजीचे पण तसेच. जोक्स अपार्ट. आपण दिलेल्या डोक्युमेंटमधील बाकीची सर्व टेबले, निरीक्षणे काय म्हणतात? हॉस्पिटल मृत्युंतील लस घेतलेले विरुद्ध न घेतलेले हा जो भाग इथे उद्धृत केला आहे त्याच्या बाबतीत दिलेला संदर्भ आपण वाचला असेल अशी आशा, पण नसेल अशी खात्री. In the context of very high vaccine coverage in the population, even with a highly effective vaccine, it is expected that a large proportion of cases, hospitalisations and deaths would occur in vaccinated individuals, simply because a larger proportion of the population are vaccinated than unvaccinated and no vaccine is 100% effective. This is especially true because vaccination has been prioritised in individuals who are more susceptible or more at risk of severe disease. Individuals in risk groups may also be more at risk of hospitalisation or death due to non-COVID-19 causes, and thus may be hospitalised or die with COVID-19 rather than because of COVID-19.
  • Log in or register to post comments
ग
गवि Mon, 07/18/2022 - 04:20 नवीन
ता.क. कोविड लस ही कमी परिणामकारक असू शकते आणि कदाचित तिचे गंभीर दुष्परिणाम (सुरुवातीला न समजलेले) असू शकतात या शक्यतेला माझा पूर्ण पाठिंबा आहे. किंबहुना रक्तात गुठळी किंवा तत्सम काही परिणाम होतच नसतील असे छातीठोकपणे सांगणे सध्या कठीण आहे हेही मान्य. पण या बाबतीत दोन महत्वाचे मुद्दे: अ. गुठ्ळी किंवा तत्सम दुष्परिणाम हे जर लसीने होत असतील तर लस न घेताही मूळ इन्फेक्षन झाल्यास ते अधिक तीव्रतेने होऊ शकतात. हे परिणाम विषाणूच्या पेशीशी संबंधित असतात. ते टाळायचे तर बंद खोलीतच बसावे लागेल. ब. दिलेला विदा लशीची घातकता दाखवत नसून अधिकाधिक लोकांपर्यंत ती पोचली आहे इतकेच दाखवत आहे. मूळ मुद्दा (लस घातक) ही तात्विक शक्यता आणखी बराच काळ अस्तित्वात राहील. पण सध्या दिलेला विदा त्याला पूरक नाही. उलट ती शक्यता (टक्के) कमी कमी होताना दिसतात.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Mon, 07/18/2022 - 15:54 नवीन
गवि, तुमचे वरचे दोन्ही प्रतिसाद वाचले. अधिक लसटोचणीमुळे अधिक मृत्यू झालेले असू शकतात. पण हे सारे करोनापायी रुग्णालयात दाखल झालेले होते. याचाच अर्थ लस टोचूनही करोना अंगात सापडतोच. म्हणजेच ती तितकीशी परिणाकारक नाही. मग घ्यायचीच कशाला? आता तुमची दोन विधानं बघूया. १.
अ. लस न घेताही मूळ इन्फेक्षन झाल्यास ते अधिक तीव्रतेने होऊ शकतात.
करोनामुळे रक्ताच्या गुठळ्या होत नाहीत. लशीमुळे होतात. मग लस घ्यायचीच कशाला? २.
ब. दिलेला विदा लशीची घातकता दाखवत नसून अधिकाधिक लोकांपर्यंत ती पोचली आहे इतकेच दाखवत आहे
म्हणजेच लस घेऊनही काहीच लाभदायक फरक पडंत नाही. असाही अर्थ निघतो. मग लस घ्यायचीच कशाला? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 07/18/2022 - 16:19 नवीन
>>> मग लस घ्यायचीच कशाला ? ठीकय...! इतकं मान्य. बाकी, ते गुठळ्या बिठूळ्या सध्या अमान्य. :/ -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Tue, 07/30/2024 - 04:35 नवीन
बर्‍याच काळानंतर आज हा धागा पुन्हा उघडला. आम्हा उभयतांना कोविडबाधा झाली होती, आणि त्यातून कोणतेही औषध न घेता सुखरूपपणे आपोआप बरे झालो. मात्र त्यानंतर काही काळाने लस घेतली होती. माझे सगळे रिपोर्ट अगदी चांगले असूनही रक्तात गुठळ्या झाल्याचे सुमारे वीस दिवसांपूर्वी सीटी स्कॅनमधून कळले. या गुठळ्या कित्येक महिने पायाचा पोटर्‍यात होत्या, त्यामुळे बरेच महिने पाय दुखत होता. अलिकडे पाय दुखणे बंद होऊन त्या गुठळ्या रक्तातून फुफ्फुसापर्यंत पोहोचल्यावर कळा येऊ लागल्या, वगैरे डॉक्टरांनी सांगितले. (छातीत भयंकर कळा येऊ लागल्यामुळे इस्पितळात दाखल होऊन सीटीस्कॅन आणि अन्य चाचण्या कराव्या लागल्या) ताबडतोब चोवीस तासांसाठी रक्तातून औषध चढवले गेले, छातीत दुखणे बंद झाले आणि जन्मात पहिल्यांदाच मला आता औषध घ्यावे लागते आहे. या औषधाचा अनुषंगिक परिणाम म्हणून की काय माझी शारीरिक शक्ती पुष्कळच कमी झालेली आहे. माझा कोविडबद्दलचा ऑगस्ट २०२० चा लेख इथे वाचता येईल.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Tue, 07/30/2024 - 04:40 नवीन
आम्ही अमेरिकेत असताना कोविडबाधा झाली होती. त्यावेळे सव्वा वर्ष तिथे राहिलो होतो, लसही तिथेच घ्यावी लागली, कारण त्याकाळी लस घेतल्याचे प्रमाणपत्र असल्याशिवाय कोणताही विमानप्रवास वा महत्वाच्या कार्यालयांमधे, संग्रहालयांमधे वगैरे जाता येत नव्हते.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Tue, 07/30/2024 - 05:07 नवीन
कोविडबाधा झाली होती, आणि त्यातून कोणतेही औषध न घेता सुखरूपपणे आपोआप बरे झालो. वेळेवर वैद्यकीय सल्ला व औषध उपचार करणे काही गैर नाही. कदाचित अतिरेकी पणा असेच मी म्हणेन. मी ठिक आहे, मला काही होत नाही आशी समजुत करून घेऊन बरीच माणसे आला दिवस पुढे ढकलतात. कौविड नंतर किंवा त्यानंतर ही कधीतरी रक्त तपासणी केली असती तर लवकर कळाले असते.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Tue, 07/30/2024 - 21:24 नवीन
आम्हाला बाधा झाल्यावर लगेच मुलाने त्याच्या ऑफिसातील डॉक्टरचा तसेच सुनेने तिच्या अमेरिकेतल्याच डॉक्टर भावाचा सल्ला घेतला होता. दोघांनी सांगितले की कोविडवर काहीही औषध नसल्याने इस्पितळात नेण्याचा काहीही उपयोग नाही, उलट घरातच जास्त सुरक्षित रहाल. त्याप्रमाणे घरातच वेगवेगळ्या खोल्यांमधे राहिलो. घरगुती काढा वगैरे घेत होतो. बरे झाल्यावर लगेच तपासणी केली, ती निगेटिव आली. माझ्या १४ ऑगस्ट २०२० च्या लेखातला थोडा मजकूर इथे उधृत करतो:
--तोवर आम्ही कोविड टेस्ट करून घेतली नव्हती. अशक्तपणामुळे आम्हाला तिकडे जाताही आले नसते. याबद्दल मुलाने त्याच्या कंपनीतील डॉक्टरचा सल्ला घेतल्यावर तो म्हणाला की कोविड पॉझिटिव निघाले तरी त्यावर कोणताही उपाय नसल्याने तसा काही उपयोग नाही. घरीच योग्य ती खबरदारी घेत आराम केल्याने हळूहळू ठीक होतील. -- त्याच सुमारास इंदौरच्या माझ्या एका मित्रानेपण त्याच्या ओळखीच्या एका डॉक्टरांना विचारून त्यांनी प्रिस्क्रिबलेल्या औषधांची यादी मला कळवली. त्यात भूक लागावी म्हणून अमुक गोळ्या, खोकल्यासाठी तमुक, स्ट्रेस कमी करण्यासाठी, ताप येऊ नये यासाठी अमुकतमुक अशी ती यादी होती. माझ्यामते तहान - भूक लागणे, झोप येणे वगैरे सगळे नैसर्गिक रीत्याच व्हायला हवे, त्यासाठी गोळ्या घेणे वगैरे मला अजिबात पटत नाही, आणि असे काही होणे, ही पण निसर्गाचीच एक योजना आहे, रोगप्रतिकारक यंत्रणेने आता पूर्ण शरीराचा ताबा घेऊन आघाडी सांभाळल्यामुळे अन्नावरची वासना उडणे वगैरे सर्व झालेले आहे, याची मला खात्री वाटत होती. स्ट्रेस वगैरे तर काही नव्हतेच. मग ती यादी बाजूला ठेवली. मागे चिकनगुनियाच्या वेळीपण कोणतेच औषध घेतले नव्हते. मुदत संपल्यावर आपोआप बरा झालो होतो. आपण यातून नक्कीच बाहेर पडणार याची मला खात्री वाटत होती. जीवेषणा अजिबात क्षीण झालेली नव्हती. दहा-बारा दिवस असेच गेल्यावर जरासे बरे वाटू लागले. थोडेसे खाणे आणि घरातच चालणे फिरणे सुरू झाले.
याउलट लस घेतल्याच्या परिणामी अलिकडे त्रास झाला असावा, असेही डॉ.चे मत आहे. इस्पितळात दर सहा तासांनी रक्त तपासणी केली जात होती, त्यात सगळे काही इतके चांगले असणे हे आश्चर्यजनक/अपवादात्मक असल्याचे नर्सने मला सांगितले, तसेच आजवर मी कधीही इस्पितळात गेलेलो नाही आणि औषधही घेतलेले नाही, याचे त्यांना खूप आश्चर्य वाटत होते. पहले रचा प्रारब्ध, फिर रचा शरीर... असे तुम्हीच सांगितले होते कर्नल साहेब. त्यानुसार सगळे काही घडते आहे. -- दुसरे म्हणजे कोविड टेस्ट एकाच दिवशी सकाळी पॉझिटिव आणि त्याच संध्याकाळी निगेटिव असे आमच्या घरातच घडलेले आहे. आता कशावर विश्वास ठेवायचा ?
  • Log in or register to post comments
स
सुक्या Mon, 07/18/2022 - 16:39 नवीन
याचाच अर्थ लस टोचूनही करोना अंगात सापडतोच. जरा लस काय असते .. ती कशी काम करते .. हे वाचा. करोनाचीच नाही .. इतर कुठलीही .. तुमची आवडती ... नंतर वरचे वाक्य पुन्हा वाचा ...
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Mon, 07/18/2022 - 17:20 नवीन
सुक्या, काटेरी प्रथिनांचा हवाला कोणी द्यायचा? mRNA वापरून लस तयार केली. भले ठीक. त्यामुळे काटेरी प्रथिनं निर्माण झाली. ही प्रथिनं प्रतिपिंडांचं काम करतात. त्यांनी करोना विषाणूचा जीव घेतला. इथवर ठीक. पण हीच काटेरी प्रथिनं शरीरात इतरत्र घातक धुमाकूळ घालणार नाहीत याची हमी कोणी घ्यायची? तत्संबंधी लेख : https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/34100279/ ( केवळ प्रस्तावना पहावी ) याव्यतिरिक्त तुम्हीही जमलंच तर जरा Antibody Dependent Enhancement यावर वाचन करा म्हणून सुचवेन. लशीच्या दुष्परिणामांवर चर्चा करता येईल. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Mon, 07/18/2022 - 17:18 नवीन
करोनामुळे रक्ताच्या गुठळ्या होत नाहीत. काही कोरोना रुग्णांना heparin का देतात मग?
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Mon, 07/18/2022 - 17:39 नवीन
करोनमुळे गुठळ्या होत नसून अतिरिक्त प्रतिपिंडांमुळे होतात. संदर्भ : https://www.imperial.ac.uk/news/227414/blood-clots-severe-covid-cases-related/ -गा.पै.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Mon, 07/18/2022 - 17:48 नवीन
प्रतीपिंड कशाची?
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Mon, 07/18/2022 - 21:09 नवीन
आग्या१९९०, आपल्या शरीराने करोनावर हल्ला करण्यासाठी एक योजना आखलेली असते. ती कार्यान्वित करणारे मानकरी म्हणजे प्रतिपिंडे होत. त्यांना antibodies म्हणतात. आ.न., -गा.पै. <स्वगत> हेचि फळ काय मम तपाला .... <⁄स्वगत>
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Mon, 07/18/2022 - 21:18 नवीन
म्हणजे करोना शरीरावर हल्ला करतो हे तुम्हाला मान्य आहे. त्याविरुद्ध प्रतिपिंड शरीरात तयार होतात हेही तुम्हाला मान्य आहे. त्यामुळे रक्तात गुठळ्या होतात हेही तुम्हाला मान्य आहे. मग कोरोनात रक्तात गुठळ्या होत नाही हा दावा का करता तुम्ही?
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 07/19/2022 - 15:53 नवीन
आग्या१९९०, १.
म्हणजे करोना शरीरावर हल्ला करतो हे तुम्हाला मान्य आहे.
हो. २.
त्याविरुद्ध प्रतिपिंड शरीरात तयार होतात हेही तुम्हाला मान्य आहे.
हो. ३.
त्यामुळे रक्तात गुठळ्या होतात हेही तुम्हाला मान्य आहे.
करोनाच्या विषाणूमुळे गुठळ्या होत नाहीत. शरीराची प्रतिकारयंत्रणा करोनावर प्रतिहल्ला करते. त्यासाठी योग्य प्रमाणात प्रतिपिंडे बनवते. पण लस टोचली तर भाराभार प्रतिपिंडे तयार होतात. आणि ही अतिरिक्त प्रतिपिंडे त्यांच्यावरील काटेरी प्रथिनांमुळे रक्तस्राव घडवून आणतात. त्यामुळे रक्त साकळून गुठळ्या होतात. ४.
मग कोरोनात रक्तात गुठळ्या होत नाही हा दावा का करता तुम्ही?
निव्वळ करोना विषाणूमुळे गुठळ्या होत नसून अतिरिक्त प्रतिपिंडांमुळे होतात. आधीच्या संदेशात हेच म्हंटलं आहे. अतिरिक्त हा शब्द महत्त्वाचा ! आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Tue, 07/19/2022 - 16:42 नवीन
करोनाच्या विषाणूमुळे गुठळ्या होत नाहीत. शरीराची प्रतिकारयंत्रणा करोनावर प्रतिहल्ला करते. त्यासाठी योग्य प्रमाणात प्रतिपिंडे बनवते. पण लस टोचली तर भाराभार प्रतिपिंडे तयार होतात. ज्यांनी करोनाची एकही लस घेतली नाही , मास्कही वापरला नाही अशा जवळच्या दोन नातेवाईकांना कोरोनाने मृत्यू झाला. दोघांनीही कोरोनाचे निदान झाल्यावर आयुर्वेदिक काढे,वाफारे आणि कोमट पाण्याच्या गुळण्या हे घरगुती उपचार घेतले. दोघांनाही श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्यावर रुग्णालयात दाखल केले, दोघांच्याही रक्तात गुठळ्या झाल्याने एकाचा काही तासात मृत्यू झाला दुसऱ्याचा उपचाराला दाद देत नसल्याने पंधरा दिवसात मृत्यू झाला. तुम्ही म्हणता ते अतिरिक्त प्रतिपींड कुठून तयार झाले?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 9 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 9 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 9 hours ago
  • सुंदर !!
    1 day 9 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 9 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा