Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

अहमदनगर कट्टा!

ट
टर्मीनेटर
Tue, 04/12/2022 - 17:19
🗣 176 प्रतिसाद
नमस्कार मिपाकरांनो, दिनांक १५ आणि १६ एप्रिल २०२२ रोजी अहमदनगर येथे मुक्काम होणार आहे. दिवस भटकंतीत पार पडेल पण अहमदनगर परिसरात कोणी मिपाकर रहात असतील तर एक सायंकट्टा करता येऊ शकेल ह्यासाठी हा धागा प्रपंच. लागून चार दिवस सुट्टी आली असल्याने अनेकांचे काही कार्यक्रम अगोदरच ठरले असतील ह्याची कल्पना आहे, तरी कुणाला अशा अचानक होऊ शकणाऱ्या कट्ट्याला उपस्थित राहणे शक्य होणार असेल तर जरूर कळवा, वेळ आणि ठिकाण सर्वांच्या सोयीनुसार ठरवता येईल. धन्यवाद.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 36565 views

🗣 चर्चा (176)
क
कंजूस Tue, 04/19/2022 - 03:12 नवीन
आणि मग मिपाकर. कट्ट्याची जागा अशी असावी की तिथे काही पाहण्यासारखे असावे. जसे अगोदरचे घारापुरी,नेरळ वनविहार,माथेरान ( मिनी झाला). म्हणून एक कर्नाळा युसुफ मेहरल्ली सेंटर'चा सुचवला टर्मिनेटरना.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 04/18/2022 - 09:15 नवीन
पिंचिंवाडीतील मिपा कट्टा पिंचिं नवनगर प्राधिकरणात गणेश तलाव, वीर सावरकर उद्यान येथे ७ वर्षांपुर्वी झाला होता, त्याला सपत्निक उपस्थित राहण्याचा सुंदर योग आला होता ! प्राधिकरण कट्टा २९ मे २०१५ धाग्यात डॉ. सुहास म्हात्रे उर्फ (इस्पिक एक्का अर्थात एक्काकाका ) यांनी काढलेले सुंदर फोटो चुकवू नका !
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Mon, 04/18/2022 - 10:18 नवीन
भारीच झाला होता हो 'प्राधिकरण कट्टा'. फोटोही मस्तच 👍
  • Log in or register to post comments
अ
असा मी असामी Wed, 04/20/2022 - 11:30 नवीन
अनुमोदन पिंचीला कट्ट्या साठी
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Wed, 04/20/2022 - 11:48 नवीन
माझे सुद्धा अनुमोदन.
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 04/21/2022 - 06:42 नवीन
हिरवळ फक्त बागेतच उरली नाही. पाहु तिथे असते.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 04/18/2022 - 08:56 नवीन
कट्टा वृत्तांत येऊ द्यात लवकर. फारच धमाल केली असे दिसतेय.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Mon, 04/18/2022 - 10:22 नवीन
भक्ती सध्या व्यस्त आहेत त्यामुळे 'आलो आलो' ह्यांनी (त्यांच्या व्यस्त दैनंदिन वेळापत्रकातून थोडा वेळ काढून) कट्टा वृत्तांत लिहिण्याचे मनावर घ्यावे अशी आग्रहाची विनंती मी पुन्हा एकदा करत आहे!
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 04/18/2022 - 17:36 नवीन
+1
  • Log in or register to post comments
आ
आलो आलो Mon, 04/18/2022 - 18:00 नवीन
आपल्या कट्टा भेटीत मी सांगितल्याप्रमाणे कट्ट्याच्या दुसऱ्याच दिवशी मी व्यावसायिक व खाजगी कामानिमित्ताने फिरतीवर असल्याने पुढील आठवडाभर बाहेरच असणार आहे त्यामुळे थोडा उशीर होतोय ....
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Wed, 04/20/2022 - 07:04 नवीन
कामानिमित्ताने फिरतीवर असल्याने पुढील आठवडाभर बाहेरच असणार आहे त्यामुळे थोडा उशीर होतोय ....
हरकत नाही! धंदा पहले भाया....
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 04/18/2022 - 18:21 नवीन
वा... कट्टा छान झालेला दिसतोय... वरती गणपती बाप्पाचा फोटो पाहुन क्षणभर उगाच इंदुर च्या बडा गणपतीची आठवण आली !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- ALMA ZARZA - TUTU - CAMILO ,PEDRO CAPO -2019 ( Cover)
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Wed, 04/20/2022 - 07:06 नवीन
बऱ्याच वर्षांपूर्वी इंदूरला गेलोय पण 'बडा गणपती' पहिल्याचे आठवत नाही!
  • Log in or register to post comments
आ
आलो आलो Mon, 04/18/2022 - 18:59 नवीन
पायाच्या ठेवणीत जाणावणारा फरक सोडला तर आठवण येण्याईतपत साम्य आहे नक्किच
  • Log in or register to post comments
म
मनो Mon, 04/18/2022 - 20:13 नवीन
माळीवाडा गणपतीचे जुने लाकडी मंदिर आमच्या आवडीचे होते. ते तोडून नवीन बांधले आहे. मुंबई-पुण्याच्या तुलनेत नगरचे आयुष्य पूर्वीतरी बरेच संथ होते, त्यामुळं भरपूर वेळ हाताशी आणि करण्यासारखे फार थोडं असायचं. गाव इतकं लहान की सायकलवर कुठेही सहज जाता येत असे. एका दिशेला चांदबीबी महाल ते दुसऱ्या दिशेला डोंगरगणपर्यंत सायकलवर निवांत जात येत असे. मित्र घरून कुठे गेला ते माहीत नसले तरी तो कोणत्या दिशेला गेला त्यावरून आम्ही मग काढत त्याचा शोध लावत असू. आता नुसत्या दुचाकी गाड्या इतक्या झाल्या आहेत की पार्किंगला जागा पुरत नाही. त्या काळात अशोकभाऊ फिरोदिया सोसायटीचे अध्यक्ष होते आणि शहराच्या आर्थिक नाड्या आणि बाजार इत्यादी मारवाडी समाजाच्या हातात होते. आजची परिस्थिती माहीत नाही.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Tue, 04/19/2022 - 05:58 नवीन
आजची परिस्थिती माहीत नाही
अजूनही मारवाडी समाजामार्फत व्यापार वाढतोय.फिरोदिया कुटुंबातील नरेंद्र फिरोदिया येथे सांस्कृतिक कार्यक्रम​ आयोजित करण्यात आघाडीवर आहेत.सावेडी(नगरच कोथरूड) हे उपनगर जोमात प्रगतीशील झाले आहे.उद्योग क्षेत्रात अजूनही पिछेहाट होत आहे.एका बाजूला औरंगाबाद आणि एका बाजूला पुणे अशी मोठी शहरे असूनही फायदा करून घेता आला नाही.फ्लाय ओव्हरमुळे जरा चांगला लूक आलाय.सध्या यास वृद्ध शहर म्हणतात,६०-७० दशकातील पिढीने मोठमोठाली मालमत्ता येथे घेतली परंतु त्यांची तरुण मुले इतरत्र पोटापाण्यासाठी स्थायिक झाली.एकंदरीत अजूनही संथ वाहते सीना नदी ;)
  • Log in or register to post comments
आ
आलो आलो Tue, 04/19/2022 - 06:46 नवीन
भक्ती ताई मागील ५-७ वर्षांपासून सकारात्मक बदल होतोय अगदी जाणवण्याइतपत माझ्याच माहितीतील १०-१२ जण (माझ्यासह) गड्या आपुला गाव बरा असे म्हणत परत नगरला येऊन इथेच स्थायिक होत आहेत म्हणजे तिकडील बाजू कमकुवत झाली किंवा नाईलाज आहे म्हणून नाही तर चॉईस करून ठरवून प्लॅन करून बिझनेस स्वयंरोजगार व औद्योगिक क्षेत्रात देखील आपले पाय स्थिरावत आहे याला आश्वासक बदल किंवा बदलाची सुरुवात म्हणू शकतो (का ?)
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Wed, 04/20/2022 - 07:11 नवीन
माळीवाडा गणपतीचे जुने लाकडी मंदिर आमच्या आवडीचे होते. ते तोडून नवीन बांधले आहे.
म्हणजे हेच आताचे 'विशाल गणपती' मंदिर आहे का? तसे असेल तर नव्याने बांधलेले हे मंदिर छानच आहे, अर्थात जुने लाकडी मंदिर पाहिले नसल्याने तुलना करता येत नाहीये! तुमच्याही आठवणी आणि शहर आवडले 👍
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Mon, 04/18/2022 - 22:06 नवीन
अहमदनगरचा कट्टा जोरदार झालेला दिसतोय. सर्व उपस्थितांचे अभिनंदन. या धाग्यावर अहमदनगरबाबत उत्तम माहिती वाचायला मिळाली. अहमदनगर शहराबाबत श्री आनंद शितोळे यांचा वाचनीय लेख - काना मात्रा वेलांटी नसलेलं सरळ माणसाचं सरळ शहर.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Tue, 04/19/2022 - 03:07 नवीन
टर्मिनेटर यांची भटकंती आणि कट्टा उत्तम झाला आहे. इतर प्रतिसादातून नगरविषयी भरपूर माहिती मिळत आहे.
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Tue, 04/19/2022 - 18:41 नवीन
https://chaprak.com/2017/06/sadanand-bhange-series-nagar/
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Wed, 04/20/2022 - 11:11 नवीन
छान संदर्भ. धन्यवाद ! लेख वाचून गावच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या ! स्थानिकांनी कोर्टात जाऊन वेशी वाचवल्या हे खरंच कौतुकास्पद. माझ्या गावतली महत्वाची वेस तातडीने निर्णय घेऊन १९८२ मध्ये पाडली गेली होती. स्थानिकांना काहीच करता आले नव्हते. एक महत्वाचा वारसा अस्तंगत झाल्याबद्द्ल नागरिक हळहळले !
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Wed, 04/20/2022 - 07:13 नवीन
लेख आवडला! लिंक साठी आभार 🙏
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Tue, 04/19/2022 - 05:23 नवीन
छान भटकंटी, कट्टा आणि वृत्तांत! मी नगरला या कट्ट्याला सरप्राईज व्हिजीट द्यायचा विचार करत होतो पण सध्या फारच बिझी आहे त्यामुळे नाही जमले. असो, या नगर कट्ट्याच्या धाग्याच्या निमीत्ताने नगर बद्दल बरीच माहीती कळाली. कधीतरी निवांत एकदोन दिवस भटकंती नक्की होईल नगरला. सं - दी - प
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Wed, 04/20/2022 - 07:20 नवीन
मी नगरला या कट्ट्याला सरप्राईज व्हिजीट द्यायचा विचार करत होतो
तो विचार प्रत्यक्षात आणला असतात तर मजा आली असती, द्वारकासिंगच्या लस्सीला मुकलात 😀 मिपाकर 'नगरी' ह्यांचाही व्यनी कट्टा सुरु होण्याच्या थोडा आधी आला होता पण दुर्दैवाने तो उशिरा वाचला गेला त्यामुळे त्यांना कट्ट्याची वेळ आणि ठिकाण कळवता नाही आले ह्यची खंत वाटते आहे.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Wed, 04/20/2022 - 12:18 नवीन
ओह!
  • Log in or register to post comments
B
Bhakti Wed, 04/20/2022 - 12:19 नवीन
ओह!
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Tue, 04/19/2022 - 07:49 नवीन
कट्टा उत्तमच झालेला दिसतो, लवकर वृत्तांत लिहा आणि रणगाडा संग्रहालय विषयक चित्र वृत्तांत पण लवकरच लिहा तळटीप - गोवा भटकंती पूर्ण करा की राव लवकर लवकर
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Wed, 04/20/2022 - 07:25 नवीन
रणगाडा संग्रहालय विषयक चित्र वृत्तांत पण लवकरच लिहा
येस सर!
तळटीप - गोवा भटकंती पूर्ण करा की राव लवकर लवकर
पाचवा भाग अर्धा लिहून झालाय पण पूर्ण करण्यास मुहूर्त लागत नाहीये अजून 😔
  • Log in or register to post comments
च
चिक्कु Tue, 04/19/2022 - 10:12 नवीन
आमच्या शहराविषयी बरिच महत्त्वपूर्ण माहिती मिळाली त्याबद्दल अहमदनगर मिपाकरांचे आभार. शहराच्या औद्योगिक प्रगतीस हातभार लागेल असे औरंगाबाद ते अहमदनगर आणी नगर ते कल्याण असे विलंबित रेल्वे मार्ग मंजुर होऊन प्रत्यक्षात यायला हवेत. सुरत ते चेन्नई ग्रीनफिल्ड हायवे साठी गडकरी यांचे आभार त्याचबरोबर कल्याण ते नांदेड असाच हायवे मंजुर करण्यात यावा अशा गडकरी यांच्या कडे अपेक्षा आहेत.दौंढ ते मनमाड दरम्यान रेल्वे चे इलेक्ट्रिफिकेशन झाले त्याचबरोबर दुहेरीकरण चालु आहे. गडकरी यांनी वाघोली ते शिरूर असा जो मेगाप्रोजेक्ट घोषणा केली आहे त्याला भविष्यात अहमदनगर पर्यंत वाढविण्यात यावे. शहराच्या तीन बाजूंनी लष्कराचा वेढा असुन नवीन प्रकल्प आले तर परवानगी साठी विलंब होत असावा. अहमदनगर मधिल बरीच कुशल, अकुशल कामगार जनता पुणे येथील चाकण, रांजणगाव गणपती येथील औद्योगिक वसाहतीत आपली रोजीरोटी ,भाकरीचा चंद्र मिळवत आहेत. अहमदनगर चे मध्यवर्ती लोकेशन या जमेची बाजू असलेल्या गोष्टीचा हवा तितका उपयोग स्थानिक नेत्रुत्वाला करता आला नाही असे वाटते. मुळात आजुबाजुच्या लोकसभा खासदार यांनी मिळुन परिसरात केंद्राकडून मोठे मोठे प्रकल्प या भागात आणण्यासाठी प्रयत्नशील असायला पाहिजे. पक्षिय राजकारण बाजूला ठेवून शिरूर,नगर दक्षिण,शिर्डी,बीड, औरंगाबाद,कल्याण , नाशिक, सोलापूर या मतदारसंघांतील खासदारांनी सतत संघटीत प्रयत्न करणे सामान्य नागरिकांना अपेक्षित .
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Wed, 04/20/2022 - 07:27 नवीन
+१
  • Log in or register to post comments
ह
हणमंतअण्णा शंक… गुरुवार, 04/21/2022 - 10:38 नवीन
शहराच्या तीन बाजूंनी लष्कराचा वेढा असुन नवीन प्रकल्प आले तर परवानगी साठी विलंब होत असावा.
हे किती भाग्याचे आहे याची तुम्हाला कल्पना नाही. पुण्यात, बेंगलोर मध्ये जी काही हिरवळ आज टिकून आहे, ती केवळ आणि केवळ लष्कर, मोठ्या संस्थांच्या जमिनी आणि त्यांच्यावरचे वृक्षारोपण यांच्यामुळेच. पुण्याचा, बेंगलोरचा नकाशा उघडा. त्यातला लष्कराचा, कॅम्पांचा एरिया पाहा. तो वगळून शहर कसे असेल याची कल्पना करा. वनराई ही श्रीमंत वस्त्यांमध्ये, लष्करी एरियांमध्येच टिकून आहे. बाकी शहर हे भेसूर आणि विद्रूपच आहे. मला भारतीय सैन्यदलं हवीहवीशी वाटतात कारण त्यांच्या जागांमुळेच मोठ्या शहरांमधे थोडीफार झाडं शिल्लक आहेत.
  • Log in or register to post comments
च
चिक्कु गुरुवार, 04/21/2022 - 17:13 नवीन
लष्कर शहरात असणं भाग्यांच नाही असा आमच्या प्रतिसादाचा अर्थ इथे अभिप्रेत नाही आणि तसा जर अर्थ वरील प्रतिसादातून अधोरेखित होत असेल तर आम्ही आमची प्रतिक्रिया उडवण्याची संपादक मंडळींना विनंती करतो. आम्हाला फक्त इतकेच म्हणायचे आहे की लष्कराच्या भूखंडातुन एखादा प्रकल्प प्रस्तावित असेल तर त्याला किचकट प्रक्रिया मुळे परवानगी मिळवताना दिरंगाई होत असेल. याच समस्येला उपाय म्हणून प्रधानमंत्री गतीशक्ती योजना राबविण्यात येत आहे असे ऐकिवात आहे. अहमदनगर शहरात तीन बाजूंनी लष्कर आहे याचा आम्हाला प्रचंड अभिमान असतो इतकेच नव्हे तर अहमदनगर मधे भारतातील सर्वात जास्त गुप्त दारूगोळा चा साठा आहे असे ऐकिवात आहे. खरं काय?खोटं काय? माहित नाही .
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 04/21/2022 - 17:40 नवीन
लष्कराच्या भूखंडातुन एखादा प्रकल्प प्रस्तावित असेल तर त्याला किचकट प्रक्रिया मुळे परवानगी मिळवताना दिरंगाई होत असेल.......
या मुद्द्याशी सहमत चिक्कु.
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Tue, 04/19/2022 - 10:25 नवीन
छान भटकंटी, कट्टा आणि वृत्तांत!>>> +१
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Tue, 04/19/2022 - 16:31 नवीन
नगर शहराबाहेरच्या सारोळा येथील टेकडीवरील देवळाला भेट दिली असता काढलेले दोन फोटोज (जानेवारी २०१८). Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Wed, 04/20/2022 - 08:09 नवीन
छान आहेत फोटोज! पहिल्या फोटोत बऱ्यापैकी झाडे-झुडपे दिसत आहेत. खाली नगर जवळच्या मांजरसुंभा परिसरातील (डोंगरगण) गोरक्षगडावरून परवा काढलेला फोटो देत आहे. त्यात बराचसा परिसर रखरखीत दिसत आहे. तापमान ४१°C होते पण घाम मात्र येत नव्हता! Image removed. ह्या गडावरील शिव-गोरक्ष मंदिर देखील छान आहे. Image removed.
  • Log in or register to post comments
च
चिक्कु Wed, 04/20/2022 - 14:01 नवीन
डोंगरगण ला आमच्या जेष्ठ भगिनीचे २००१ साली लग्न करण्यात आले होते. आमच्या गावापासून अंदाजे ७० किलोमीटरवर लग्न ठेवले होते. वर आणि वधू एकाच गावातील असल्यामुळे गावातील सर्व वर्हाडी मंडळींना डोंगरगण येथिल सिताची न्हानी इत्यादी इत्यादी देवस्थानच्या परिसरात दर्शन घडले होते.२००१ साली मी इयत्ता पहिली मधे असताना हे पाहिलेले आहे. एवढ्या जवळ असुनही अजुन पुन्हा आवर्जून जाण्याचा योग आलेला नाही याची खंत वाटत राहते.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Fri, 04/22/2022 - 06:49 नवीन
एवढ्या जवळ असुनही अजुन पुन्हा आवर्जून जाण्याचा योग आलेला नाही याची खंत वाटत राहते.
एखाद्या दिवशी अचानक तिथे भेट देऊन या.
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Wed, 04/20/2022 - 15:01 नवीन
डोंगरगण गोरक्षगडावरून काढलेला शिव-गोरक्ष मंदिराच फोटो आवडला. पहिला फोटो पुन्हा पावसाळ्यात काढल्यास हिरवा गालिचा आंथरलेला आहे असं दृश्य टिपता येईल.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 04/21/2022 - 09:12 नवीन
नगरचे नवे दत्त मंदिर भारी आहे, त्याचा फोटो नाही दिसला. मी रात्रीच्या वेळी गेलेलो. लै भारी दिसते. आणि मोठेही आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर गुरुवार, 04/21/2022 - 13:20 नवीन
नगरचे नवे दत्त मंदिर भारी आहे, त्याचा फोटो नाही दिसला.
Image removed. ह्याच मंदिराबद्दल म्हणताय का? क्षीरसागर महाराजांचे (सावेडी) दत्त मंदिर म्हणुन प्रसिद्ध आहे. आम्ही गेलो होतो तिथे. पण गेटवरच बेल्ट काढून ठेवा, फोन स्विच ऑफ करा अशा सूचना तिथल्या सिक्युरिटी गार्डनी दिल्यावर मी बाहेरच थांबणे पसंत केले, असले नखरे असतील अशा ठिकाणी मी जात नाही, आखिर अपने भी कुछ उसूल हैं भाय 😀 घरची सगळी मंडळी आत जाऊन आली आणि मंदिर खूप छान असल्याचे त्यांनी सांगितले. (ह्याच मंदिरात घरच्यांनी खूप वेळ घालवल्याने कट्ट्याची आधी ठरलेली ६:३० ची वेळ बदलून ती ७:०० ची करावी लागली!)
  • Log in or register to post comments
स
सुक्या गुरुवार, 04/21/2022 - 23:22 नवीन
राहुरी ला शिकत असताना बर्‍याच वेळा ह्या मंदीरात गेलो आहे. तेव्हा हे अगदीच छोटे मंदिर होते (१९९३ - १९९७) . तेव्हाही तिथे बेल्ट काढून ठेवावा लागत असे. विद्यार्थीदशेत असल्याने तेव्हा फार काही वाटायचे नाही परंतु आताशा ह्या असल्या फाजिल नियमांचा राग येतो. देवाच्या दर्शनाला जातोय तर चामड्याच्या वस्तु बाहेर ठेवा / फोन बंद ठेवा असल्या बाश्कळ नियमांमुळे काय साध्य होते कुणा ठाउक. बर्‍याच ठिकाणी मंदीरात आत फोन न्यायला बंदी/ बॅकपॅक न्यायला बंदी. मंदीराचे फोटो काढु नका, देवाचे फोटो काढु नका. असले नियम असतात. त्याने काय साध्य होते काय माहीत. नेला कुणी फोन मधे काढले दोन चार फोटो तर काय बिघडणार आहे?
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Fri, 04/22/2022 - 06:52 नवीन
परंतु आताशा ह्या असल्या फाजिल नियमांचा राग येतो.
अगदी... अगदी.... 👍 फोटो काढण्यास मनाई बाबतही सहमत!
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Fri, 04/22/2022 - 08:05 नवीन
देवाच्या दर्शनाला जातोय तर चामड्याच्या वस्तु बाहेर ठेवा / फोन बंद ठेवा असल्या बाश्कळ नियमांमुळे काय साध्य होते कुणा ठाउक.
चामडे हे मृत प्राण्याचा भाग आहे. अनेकदा ते शिकार करुन देखील कमावलेले असू शकते. देवाच्या दरबारी अशी हिंसेपासून मिळविलेली वस्तू घेऊन जाण्यास बंदी असते. त्यामुळेच चपला / बूट देखील बाहेर काढावे लागतात.
आत फोन न्यायला बंदी/ बॅकपॅक न्यायला बंदी. मंदीराचे फोटो काढु नका, देवाचे फोटो काढु नका. असले नियम असतात. त्याने काय साध्य होते काय माहीत.
बरीच कारणे आहेत. गर्दीच्या वेळी फोटो काढणार्‍यांमुळे इतरांना व्यत्यय येतो. काही जण तर स्वतःचे फोटो व्यवस्थित यावेत म्हणून इतरांना बाजूला सरकायला सांगतात. भांडणे होतात. मोबाईल फोनवर बोलल्याने इतरांना त्या आवाजाचा त्रास होतो. शांतताभंग, साधनेत व्यत्यय, इत्यादी. काही ठिकाणी मंदिराची छायाचित्रे, सचित्र माहितीपुस्तके इत्यादी साहित्य विक्रीकरिता उपलब्ध असते. पर्यटकांनी स्वतःच फोटो काढले तर हे साहित्य विकले जात नाही. मी स्वतः नास्तिक असल्याने असल्या नियमांचे समर्थन करीत नाही फक्त त्या नियमांमागील कारणे इथे विषद केली आहेत. मला चप्पल / बूट काढून मंदिरात जाणे यात फारसे तथ्य वाटत नाही. कारण बुट (जर नाडीचे असतील) काढताना हात अस्वच्छ होतातच. तसेच बूट काढल्यानंतर त्यापुढच्या परिसरात धूळ, माती इतर अस्वच्छता असेल तर पाय देखील खराब होतात. त्यामुळे कोणासोबत मला जर मंदिरात जायची वेळ आलीच तर जिथवर चपला बूटांसहित जाता येते तिथवर मी जातो. मग पादत्राणे काढून इतर सोबती पुढे जातात मी त्यांची वाट पाहत तिथेच थांबतो. अर्थात नारायणी धाम (तुंगार्ली, लोणावळ्याजवळ) सारखे मंदीर असल्यास आत देखील जातो. इथे चप्पल / बुट काढल्यावर पुढे जाण्याचा परिसर अतिशय स्वच्छ असल्याने पायास घाण लागत नाही. तसेच बूट काढताना हात अस्वच्छ होत असल्याने तिथेच हात धुवायची उत्तम सोय देखील आहे. गेल्याच महिन्यात पत्नीच्या आग्रहाखातर बत्तीस वर्षांनी आमच्या मूळ गावी (देडगाव बालाजी - तालुका नेवासा - जिल्हा अहमदनगर) अजिबात गर्दी नसताना गेलो होतो तर अगदी मंदिराच्या प्रवेशद्वारापाशीच बूट काढले आणि सोबत मंदिर व्यवस्थापकाने पाणी ठेवले असल्याने हात धुवून मगच मंदिर प्रवेश केला. बेल्ट उतरवा, फोटो काढू नका असले काहीही बंधन नव्हते. तसेही शुद्ध चामड्याचा कमरपट्टा मी वापरत नाहीच. फोन देखील चालूच ठेवला होता. इन फॅक्ट मंदिरास देणगी देखील फोन पे चा वापर करुनच दिली.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Fri, 04/22/2022 - 10:08 नवीन
तसेही शुद्ध चामड्याचा कमरपट्टा मी वापरत नाहीच.
हल्लीच्या सिंथेटीक लेदर / रेगझीनच्या काळात किती जण शुद्ध चामड्याचे पट्टे वापरत असतील हा संशोधनाचा विषय ठरेल, त्यामुळेच असल्या नियमांचा राग येतो. शुद्ध चमड्याचा पट्टा असल्यास तो काढून ठेवण्यास भाविकांनाही हरकत नसावी.
  • Log in or register to post comments
स
सुरिया Fri, 04/22/2022 - 11:35 नवीन
मृगजीन चालायचे म्हणे पूर्वी. :) बऱ्याच श्रीमंत घरात, आश्रम मठात मंदिरात असायची मृगाजिने. आता फॉरेस्ट वाले जप्त करतात, तुरुंगात घालतात.
  • Log in or register to post comments
स
सर टोबी Fri, 04/22/2022 - 10:30 नवीन
शेगावला आनंद सागर परिसरात मेडीटेशन साठी छानसं ठिकाण आहे. स्मार्ट फोनचा सुळसुळाट नव्हता त्या दिवसात तेथे गेलो होतो. परिसरात खूप ठिकाणी मेडीटेशन हॉल मध्ये कसे वागावे याच्या सूचना होत्या. तरीही फोनचा सततचा व्यत्यय, लहान मुलांना घेऊन हॉल मध्ये जाणे, चुळबुळ करणे असे प्रकार चालले होते. चामड्याच्या वस्तूंची मला आवड आहे पण एकदा चेन्नईला गेलो असताना एकाने काफ लेदरची बॅग दाखवली. त्यामुळे चामडी वस्तू वापरण्याचा सोस एकदम बंद झाला. विगन लाईफ स्टाईल खूप महाग आहे पण जेव्हा परवडेल तेव्हा अंगीकार करेन. तुळजापूर देवस्थान स्वच्छतेबाबत काही नावाजलेले नाही पण तेथे पाय धुण्यासाठी वाहते पाणी असते, जी छान कल्पना आहे.
  • Log in or register to post comments
स
सर टोबी Fri, 04/22/2022 - 10:32 नवीन
शेगावला आनंद सागर परिसरात मेडीटेशन साठी छानसं ठिकाण आहे. स्मार्ट फोनचा सुळसुळाट नव्हता त्या दिवसात तेथे गेलो होतो. परिसरात खूप ठिकाणी मेडीटेशन हॉल मध्ये कसे वागावे याच्या सूचना होत्या. तरीही फोनचा सततचा व्यत्यय, लहान मुलांना घेऊन हॉल मध्ये जाणे, चुळबुळ करणे असे प्रकार चालले होते. चामड्याच्या वस्तूंची मला आवड आहे पण एकदा चेन्नईला गेलो असताना एकाने काफ लेदरची बॅग दाखवली. त्यामुळे चामडी वस्तू वापरण्याचा सोस एकदम बंद झाला. विगन लाईफ स्टाईल खूप महाग आहे पण जेव्हा परवडेल तेव्हा अंगीकार करेन. तुळजापूर देवस्थान स्वच्छतेबाबत काही नावाजलेले नाही पण तेथे पाय धुण्यासाठी वाहते पाणी असते, जी छान कल्पना आहे.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 04/24/2022 - 18:42 नवीन
सर्व जण पाळतात. परदेशी लोक प्रसादाचे जेवणही जेवतात. गट्टे का साग विशेष.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 9 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 9 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 9 hours ago
  • सुंदर !!
    1 day 9 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 9 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा