Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

अहमदनगर कट्टा!

ट
टर्मीनेटर
Tue, 04/12/2022 - 17:19
🗣 176 प्रतिसाद
नमस्कार मिपाकरांनो, दिनांक १५ आणि १६ एप्रिल २०२२ रोजी अहमदनगर येथे मुक्काम होणार आहे. दिवस भटकंतीत पार पडेल पण अहमदनगर परिसरात कोणी मिपाकर रहात असतील तर एक सायंकट्टा करता येऊ शकेल ह्यासाठी हा धागा प्रपंच. लागून चार दिवस सुट्टी आली असल्याने अनेकांचे काही कार्यक्रम अगोदरच ठरले असतील ह्याची कल्पना आहे, तरी कुणाला अशा अचानक होऊ शकणाऱ्या कट्ट्याला उपस्थित राहणे शक्य होणार असेल तर जरूर कळवा, वेळ आणि ठिकाण सर्वांच्या सोयीनुसार ठरवता येईल. धन्यवाद.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 36565 views

🗣 चर्चा (176)
च
चौथा कोनाडा गुरुवार, 04/14/2022 - 13:42 नवीन
दॅट्स् दि केमिस्ट्री !
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 04/14/2022 - 18:19 नवीन
तसेच आहे .... वैचारिक मतभेद, वैयक्तिक मनभेदात रुपांतरीत होत नाहीत... एका बशीत चहा पिणारे, नंतर देखील इथे, वैचारिक मतभेद व्यक्त करत असतातच....
  • Log in or register to post comments
च
चिक्कु गुरुवार, 04/14/2022 - 15:26 नवीन
अहमदनगर चे नामांतर केल्यास अंबिकानगर चांगले वाटेल की शहाजी नगर? मला शहाजीनगर ठेवलेलं आवडेल.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Fri, 04/15/2022 - 05:49 नवीन
थोडीशी अक्षरांची फेर्जुळवणी करून 'द अहम नगर' करता येईल. फोटोसकट कट्ट्याच्या वृत्तांताची प्रतिक्षा आहे. शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 04/15/2022 - 14:35 नवीन
अहमदनगरचे "आनंदनगर" अशी ही मागणी काही लोकांनी केल्याचे आठवते.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Fri, 04/15/2022 - 14:36 नवीन
संभाजीनगर !
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 04/15/2022 - 14:37 नवीन
औरंगाबादचे संभाजीनगर !
  • Log in or register to post comments
ग
गोरगावलेकर गुरुवार, 04/14/2022 - 19:05 नवीन
कट्ट्याचा सविस्तर वृत्तांत वाचायला आवडेल
  • Log in or register to post comments
न
नचिकेत जवखेडकर Fri, 04/15/2022 - 07:07 नवीन
मस्त. कट्ट्याला शुभेच्छा
  • Log in or register to post comments
आ
आलो आलो Fri, 04/15/2022 - 13:20 नवीन
कुठं हायसा पाव्हणं ?
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Sat, 04/16/2022 - 07:48 नवीन
@ आलो आलो काल रातच्याला नगरात पोचल्यांव, आता टाकळी ढोकेश्वर लेणी आणि लवणस्तंभ बघायला चाललोय... सांजच्याला भेटूयात....
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Sat, 04/16/2022 - 20:16 नवीन
मस्त झाला कट्टा! आलो आलो (विशाल), भक्ती आणि त्यांची मुलगी गिरीजा, मी आणि माझी बायको असे पाच जण उपस्थित होतो. कट्ट्याचा वृत्तांत भक्ती किंवा आलो आलो ह्यांनी लिहावा, बाकीचे त्यात भर टाकतीलच! Image removed. डावीकडून मी, विशाल, अदिती, गिरीजा आणि भक्ती. Image removed. Image removed. नगरचे ग्रामदैवत.
  • Log in or register to post comments
र
राघवेंद्र Sat, 04/16/2022 - 20:21 नवीन
सहीच कट्टा झाला. वृतांताच्या प्रतीक्षेत.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sun, 04/17/2022 - 04:42 नवीन
+१ विशाल गणपतीची आरती ऐकणे एक सुंदर अनुभव असतो,ज्याचा लाभ काल पुन्हा मिळाला.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Mon, 04/18/2022 - 07:18 नवीन
विशाल गणपतीची आरती ऐकणे एक सुंदर अनुभव असतो
+१००० त्याबाबतीत तुम्ही नगरकर खूपच भाग्यवान आहात. आम्ही हा सुंदर अनुभव पहिल्यांदाच घेतला. आपल्याकडे वेळ कमी होता नाहीतर नगारा आणि अन्य मंगलवाद्यांच्या साथीने सुमारे तासभर होणारी ही आरती पूर्ण ऐकायला नक्कीच आवडले असते!
  • Log in or register to post comments
आ
आलो आलो Sat, 04/16/2022 - 20:47 नवीन
|| कै. तात्या म्हाराज कि जै || मिपा संस्थापक तात्यासायाब ह्यांनी मिपा संस्कृतीमध्ये कट्ट्याची सुरुवात करून दिली त्या संस्कृतीला अनुसरून आज आपले सर्वांचे लाडके (प्रसिद्द्य लेखक) टर्मिनेटर भौ ह्यांच्या फुडाकाराने आमच्या अहमदनगरात मिपा कट्टा साजरा झाला. या कट्ट्याला याची देही उपस्थिती लावता आली यातच आम्ही धान्य जाहलो. मागच्या आठवड्यात टर्मिनेटर सायबांनी अहमदनगर कट्ट्याचा धागा काढला आणि आपुन नी लगेच कट्ट्याला जायचा निर्धार केला व तसा तो त्यांना लगेच कळवला. मिपा वरील आमच्या नगरच्या (एकमेव ऍक्टिव्ह) असलेल्या भक्ती तैनीं सुद्धा लगेच उत्साह दाखविला त्याबद्दल अखिल नगर मिपा संघटनेच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो. या ऐतिहासिक कट्ट्याला टर्मिनेटर भौ त्यांच्या सुविद्य पत्नी सह तसेच भक्ती तै आपल्या छकुली (गिरीजा सह ) व अस्मादिक (एकलेच) असा भव्य जनसागर लोटला होता. फूडच्या कट्ट्यासाठी आजपासूनच तैय्यारी सुरू ..... अर्रर्ये - बोल बजरंग बली कि जय | असो .... टर्मिनेटर भाऊ यांनी आपल्या घाईच्या शेड्युलमध्ये कट्ट्यासाठी आवर्जून वेळ राखला व ठरल्याप्रमाणे कट्टा साजरा केला व भक्ती ताईंनी सुद्धा त्यांच्या कामातून वेळ काढून कट्ट्यासाठी उपस्थिती लावली हे पाहून अस्सल मिपाकर असल्याचा आज खरेच आनंद झाला. सर्व मिपाकर बंधू भगिनींचे आभार सर्व लेखकांचे आभार आमच्यासारख्या बाकीच्या सर्व वाचकांचे आभार हम सबको यह मौका देनेके लिये मिपा के सभी संपादकोंका आभार . या कट्ट्याचा साद्यन्त - सचित्र असा वृत्तांत प्रसिद्ध लेखक टर्मिनेटर भाऊ अथवा प्रसिद्ध लेखिका भक्ती ताई आपल्या ओघवत्या लेखणीतून आपल्यासमोर लवकरच देतीलच तोपर्यंत आजच्या कार्यक्रमाची पोच म्हणून हे माझे दोन शब्द आहेत. कळावे लोभ असावा
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sun, 04/17/2022 - 04:39 नवीन
छान लिहिलंय. श्री व सौ टर्मीनेटर यांनी आत्मियतेने कट्टयाला उपस्थिती दाखवली,छान वाटलं.आलो आलो यांना बराच वेळ वाट पाहावी वाटली, क्षमस्व.माझी व्यर्थ लुडबुड (मुलगी) बरोबर असल्यामुळे जरा फास्टच झाला कट्टा! नगरात काय पाहायला आहे? यावर अनेक पर्याय मिळाले. सगळे लिहीत राहा! :)
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sun, 04/17/2022 - 08:46 नवीन
भारी पोचवृतांत, "आलो आलो" ! नावाला जागून कट्ट्याला आलात (म्हंजे उपस्थित राहिलात), लै भारी झकास !!!

☝

ही जबराट लेखनशैली बघून आपण नेहमी का लिहित नाही हा प्रश्न पडला !
  • Log in or register to post comments
आ
आलो आलो Sun, 04/17/2022 - 09:34 नवीन
चौ को भौ आमच्या नगरात नेहमीच पाऊस कमी.... कला सांस्कृतिकदेखील.... त्यामुळे मिपा वरील साहित्य वर्षा हीच आमची वाचनाची तृष्णा भागविण्याचे हक्काचे व्यासपीठ ....आणि चक्क वळिवाप्रमाणे टर्मिनेटर भौनीं कट्ट्याचे नियोजन केले म्हटल्यावर आमची हजेरी क्रमप्राप्तच. एके दिवशी मराठी याहू M1 येथील एका मित्राने (कळव्याचा खोटा सिक्का ID होता का तो ?) मिपा बद्दल ओळख करून दिली. त्यानंतरची बरीच वर्षे (अंदाजे १० ?) मिपा वाचक म्हणून रेग्युलर वावरत आहे. कै. तात्या सोबत बऱ्याचदा फोनवर आणि फेबु वर संवादहि झालाय पण बाकी कोणाशीही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संपर्क झालाच नाही ...किंबहुना माझ्याकडून तसा काही प्रयत्न केला गेला नाही (खंत ?) चला आता कालपासून श्रीगणेशा झालाच आहे तर यापुढे नक्कीच. माझ्या अबकड चे कौतुक करून प्रेरणा दिल्याबद्दल चौको आपले आभार व्यक्त करतो.
  • Log in or register to post comments
स
सर टोबी Sun, 04/17/2022 - 10:56 नवीन
वर वर पाहता असे वाटू शकते. या शहराला स्वतःची प्रसिद्धी करणं जमलं नाही. पण हे शहर कलाकारांच्या बाबतीत अगदीच दुष्काळी होते आणि आहे असं ज्यांना वाटते त्यांच्या साठी हा प्रतिसाद. अमर भूपाळी मधील प्रसिद्ध गायक आणि नट पंडितराव नगरकर हे नगरचे. पटवर्धन चौकाजवळ असणाऱ्या लंके वाड्यात त्यांचे वास्तव्य होते. बालकवी ठोंबरे यांचेही वास्तव्य नगरला होते. प्रसिद्ध नाटककार मधुकर तोरडमल नगरला प्राध्यापक होते. सी. रामचंद्र नगर जवळील चितळीचे. कृष्णाची हातखंडा भूमिका करणारे शाहू मोडक नगरचे. प्रसिद्ध मूर्तिकार साखळकर आणि अंबादास मुदगंटी तसेच मोल्डेड प्लास्टिक पासून अप्रतिम शिल्प बनवणारे प्रमोद कांबळे, फलज्योतिषमध्ये दबदबा असणारे दत्तू रेखी. या खेरीज रेव्ह. टिळक यांची नगर ही कर्मभूमी. रामदास फुटाणे आणि जागतिक स्तरावर ग्रामीण आरोग्य सेवेचं आधारभूत कार्य केलेले डॉ. रमाकांत आरोळे हे नगरमधील जामखेड तालुक्यातील आहेत. सहकाराची मुहूर्तमेढ रोवणारे विठ्ठलराव विखे नगरचे. प्रशासकीय सेवेत लोकाभिमुख प्रशासनाची सुरुवात करणारे अनिलकुमार लखिना यांनी नगरचे जिल्हाधिकारी असताना त्यांची ओळख असणारे प्रारूप तयार केले. नगरचे सहकार सभागृह हे कला व्यासपीठासाठी लागणाऱ्या गुंतवणुकीच्या दृष्टीने एक आदर्श प्रारूप होते. नगरला सकाळ सारखे आपल्याच शहराची टिमकी वाजवनारे वर्तमानपत्र मिळाले असते तर या शहराचा खूप बोलबाला झाला असता.
  • Log in or register to post comments
आ
आलो आलो Sun, 04/17/2022 - 11:55 नवीन
धन्यवाद सर टोबी आपण खूपच मौलिक माहिती दिलीत काहींबद्दल माहिती आहेच तर काही नवीन ज्ञान प्राप्त झाले . उण्यापुऱ्या चाळीस वयातील पहिली शालेय १५ वर्षानंतर कॉलेज व त्यानंतर व्यावसायिक तथा नोकरीनिमित्ताने या ना त्या कारणास्तव पुणे मुंबई औरंगाबाद असे विविध ठिकाणी अशी भटकंती केल्यावर आता मागील काही वर्षांपासून नगरलाच स्थायिक होण्याचा निर्णय घेतलाय तरीही जन्मभूमी बद्दल अजूनही म्हणावी तेव्हडी माहिती नाही हे कबूल परंतु माझ्या प्रतिक्रियेमध्ये मी अगदीच दुष्काळ नव्हे तर मुं पु च्या तुलनेने थोडा कमी वर्षाव असा उल्लेख आहे तो देखील कट्ट्याच्या अनुषंगाने नगरबद्दल आणि नगरी असल्याबद्दलचा खचितच अभिमान आहेच आपण दिलेल्या अभ्यासपूर्ण माहितीमुळे तो अजून वाढलाय हेवेसांनलगे पुनश्च धन्यवाद !
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Mon, 04/18/2022 - 07:33 नवीन
छान माहिती दिलीत सर टोबी 👍 माणिक चौकात जिथे आम्ही गाडी पार्क केली होती त्याच्या बरोब्बर समोरची मालमत्ता सुप्रसिद्ध सिने अभिनेते 'कै. सदाशिव अमरापूरकर' ह्यांची असल्याचे आणि प्रसिद्ध नाटककार मधुकर तोरडमल नगरला प्राध्यापक होते हे आलो आलो ह्यांनी परवा सांगितले होते, त्याव्यतिरिक्त आपण दिलेल्या मौलिक माहितीसाठी आभारी आहे 🙏
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 04/18/2022 - 07:40 नवीन
या प्रभावी बादशहाने शेवटची संध्याकाळ इथे घालवली.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Mon, 04/18/2022 - 08:27 नवीन
इथे की खुलताबाद इथे? नक्की नाही, पण मला खुलताबाद येथे घालवल्याचे वाचल्यासारखे अंधुकसे आठवतंय.
  • Log in or register to post comments
आ
आलो आलो Mon, 04/18/2022 - 08:45 नवीन
पण उचलुन तिकडे नेऊन पुरला
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Mon, 04/18/2022 - 09:54 नवीन
असं आहे होय! मला वाटलं होतं तिथेच गचकला होता 😀
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 04/18/2022 - 08:59 नवीन
बरोबर कंजूस जी !

✔

"तब्बल ४९ वर्षे हिंदुस्तानवर राज्य करणा-या औरंगजेबाचे अखेरचे तेरा महिने अहमदनगर जवळील भिंगारमध्ये व्यतित झाले. नगर हे तेव्हा जणू देशाची राजधानीच बनले होते. अनेक महत्त्वाच्या घडामोडींचा साक्षीदार होण्याची संधी तेव्हा या शहराला मिळाली. याच मातीत वयाच्या 89 व्या वर्षी औरंगजेबाने अखेरचा श्वास घेतला. आयुष्यातील अखेरची २६ वर्षे औरंगजेबाने दख्खनच्या मोहिमेवर खर्च केली. १६८१ मध्ये सुरू झालेली ही मोहीम १७०७ मध्ये संपली ती औरंगजेबाच्या मृत्यूनंतरच. या काळात घडणाऱ्या घडामोडींचं महत्त्वाचं केंद्र होतं अहमदनगर. औरंगजेबाचं १६८३ मध्ये नगरला आगमन झालं, तेव्हा मोगल सैन्याची पाच लाखांची छावणी भिंगारपासून चार मैल अंतरापर्यंत पसरली होती. नंतर औरंगजेबाने विजापूर, गोवळकोंडा घेतला, पण मराठ्यांचं स्वराज्य नेस्तनाबूत करणं त्याला शक्य झालं नाही. संताजी, धनाजीसारख्या शूरवीरांनी मोगलांची रसद तोडून, गनिमी काव्याने हल्ले करून त्यांना जेरीस आणलं. शेवटी कंटाळलेला औरंगजेब परतीच्या प्रवासला निघाला. जानेवारी १७०६ मध्ये तो नगरला आला, तेव्हा आपली अखेर जवळ आल्याचं त्याला जाणवलं. "ये मेरा आखरी मुकाम है...' असे उद््गार त्याच्या मुखातून निघाले. नगरच्या मातीतच फेब्रुवारी १७०७ मध्ये त्याने अखेरचा श्वास घेतला. औरंगजेबाचे पार्थिव त्याच्या इच्छेप्रमाणे दफनासाठी खुलताबादला नेण्यापूर्वी जिथे त्याला स्नान घालण्यात आले तो चौथरा, बादशहाचा दरबार जिथे भरत असे ती बारादरी, तेथील संग्रहालयात असलेल्या कुराणाच्या दुर्मिळ प्रती, रयतेला दर्शन देण्यासाठी बादशहा जिथे बसे ती मेघडंबरी, मशीद व कारंजी, मशिदीच्या तळघरात असलेली बादशहाची विश्रांतीची जागा अशा अनेक गोष्टी पाहताना इतिहासात डोकावल्याचा आभास होत होता. आलमगीरची तटबंदी, बुरूज, प्रवेशद्वार, तसेच मलग्या अजून सुस्थितीत आहेत. औरंगझेबाने मृत्यूपुर्वी इच्छा व्यक्त केली होती की "आपला दफन विधी खुलदाबाद मधील शेख झैन-उद्-दिन (औरंगझेबचा अध्यात्मिक गुरू) यांच्या दर्गा जवळ करावा, त्यानुसार आझम शाह आणि मुलगी झीनत-ऊन-निस्सा ह्यांनी त्याचा दफन विधी खुलदाबाद (औरंगाबादपासून २०-२२किमी लांब) येथे केला.
संदर्भः आंजा
  • Log in or register to post comments
आ
आलो आलो Mon, 04/18/2022 - 09:31 नवीन
हाकेच्या अंतरावर असूनही परधर्मीय प्रार्थनास्थळ आणी औरंगजेब चे शेवटचे मुक्कामाचे ठिकाण एवढीच माहिती आजपर्यंत दिली किंवा मिळाली ( कदाचित अनुल्लेखाने मारणे हा हेतू असावा ) असो पूर्वी तिकडे फक्त मुस्लिम वस्तीच होती परंतु आता भरपूर नव्या टाउनशिप आणि रो स्कीमा झाल्यामुळे हिंदू बहुसंख्य आहेत तरी त्या मशिदीच्या आसपास मात्र मुस्लिम एरियाच आहे आधी त्या संपूर्ण एरीयाला आलमगीर म्हणूनच संबोधले जायचे परंतु आता दत्तनगर विजयनगर मधुबन सोसायटी माधवबाग सोसायटी असे विविध नामकरण होऊन हिंदुबहुल वस्ती वाढली आहे. शिवाय मिलिटरी ट्रेनिंग एरियासुद्धा तेथून जवळच आहे तेथे रणगाड्यांचा सराव होत असतो भिंगारला देशातील सर्वात मोठे टॅंक ट्रेनिंग रेजिमेंट आहे. औरंगजेबाच्या मुक्कामाच्या काळातच मिनीनाथ महाराजांच्या समाधीला मिरावली दर्ग्यात रूपांतरित केले अशी एक कथा ऐकिवात आहे खखोदेजा .....
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Mon, 04/18/2022 - 09:59 नवीन
चांगली माहिती चौ. को. 🙏 मायला हल्ली शाळेत शिकलेला इतिहास विसरत चाललो आहे 😀
  • Log in or register to post comments
म
मनो Mon, 04/18/2022 - 20:24 नवीन
पुण्याची प्रगती होण्याचे मूळ कारण म्हणजे शिक्षणाच्या उत्तम सोयी. आमच्या काळात नगरमध्ये विळद घाटात एकमेव इंजिनिअरिंग कॉलेज होते, आणि पुण्यात १२/१४ पर्याय होते. तीच बाब इतर कॉलेजची, सप, फर्ग्युसनच्या तुलनेचे नगरमध्ये काय आहे? शिक्षणातूनच पुढे कंपन्या वाढल्या, आणि त्यातून अर्थकारण. नगर तसेच मोठे खेडे राहिलेले आहे.
  • Log in or register to post comments
स
सर टोबी Mon, 04/18/2022 - 10:48 नवीन
बजाज उद्योग समूहात सामिल असलेला फिरोदिया उद्योग समूह मूळचा नगरचा. याच उद्योग समूहाने पुढे दुचाकी क्षेत्रातील क्रांती ठरलेली लुना मोपेड बाजारात आणली जिला नंतर टीव्हीस आणि हिरो उद्योग समूहाकडून स्पर्धा निर्माण झाली. गुटखा किंग धारिवाल उद्योग समूह पण नगरचा. पूर्वी त्यांची ऑइल मिल स्टेशन रोडवर होती. धूतपापेश्वर यांची पनवेल नंतरची फॅक्टरी नगरला होती. त्याच बरोबर वैद्य नानल यांचा आफाली हा आयुर्वेदिक औषधांचा कारखानापण नगरला होता. व्हिडीओकॉनचे धूत नगरचे. त्याच बरोबर पूर्वी दादरला वाद्यांचा कारखाना होता. त्यांची दुसरी शाखा फक्त नगरला होती. व्हीआरडीई हे नवीन वाहनांची चाचणी घेणारे केंद्र चेन्नई नंतर फक्त नगर येथे आहे. लखनौला असलेला बडा इमामचे एक पिठ नगरला आहे त्याला स्थानिक भाषेत बारा इमाम म्हटले जाते. तसेच बुर्हाण नगर येथील मंदिर हे तुळजापूरचे पिठ समजले जाते. नगरचा रामप्रसाद चिवडा हा पुण्यातील लक्ष्मीनारायण चिवड्याइतकाच जुना आणि दर्जाने काकणभर जास्तच चांगला असा चिवडा आहे.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Mon, 04/18/2022 - 11:49 नवीन
ही माहिती देखील आवडली.
पूर्वी दादरला वाद्यांचा कारखाना होता. त्यांची दुसरी शाखा
'हरिभाऊ विश्वनाथ आणि कंपनी' विषयी म्हणताय का तुम्ही? एकंदरीत नगरला एवढी औद्योगिक, सांस्कृतिक परंपरा लाभली असूनही हे शहर/ हा प्रदेश खरोखर दुर्लक्षित राहिला आहे हे खरेच! अर्थात त्याचे कारणही तुम्ही आधीच्या प्रतिसादात दिले आहेच. 'गाय छाप' वाले मालपाणी हे आत्याच्या मिस्टरांचे अतिशय जवळचे मित्र होते त्यामुळे नगर जिल्ह्यातील हे एकमेव प्रस्थ मला माहित होते. पण इथे तुम्ही अनेक प्रस्थांची मंदियाळीच सादर केली आहे!
  • Log in or register to post comments
B
Bhakti Mon, 04/18/2022 - 14:16 नवीन
+१ सध्याचे आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी Masters in Mass Communication न्यू आर्ट या महाविद्यालयातून पूर्ण केले आणि त्या दरम्यान इथेच प्रोजेक्ट म्हणून केलेला 'पिस्तुल्या' या सिनेमाला राष्ट्रीय पारितोषिक मिळाले आहे.नागराज यांना नगरबद्दल कायम आस्था आहे.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Mon, 04/18/2022 - 07:23 नवीन
ही जबराट लेखनशैली बघून आपण नेहमी का लिहित नाही हा प्रश्न पडला !
सहमत! नगर कट्ट्याचा वृत्तांत तुम्ही तुमच्या हटके लेखनशैलीत लिहावा अशी आग्रहाची विनंती 🙏
  • Log in or register to post comments
ग
गोरगावलेकर Sun, 04/17/2022 - 04:50 नवीन
भरपूर फोटो आणि वृत्तांतही टाका लवकर
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 04/17/2022 - 04:55 नवीन
छान कट्टा वृत्तांतही वाचतो आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 04/17/2022 - 05:07 नवीन
म्हणतोय..... छानच
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Sun, 04/17/2022 - 07:22 नवीन
एकत्र येणे दुर्मीळच, छान उपक्रम.
  • Log in or register to post comments
ॲ
ॲबसेंट माइंडेड… Sun, 04/17/2022 - 08:23 नवीन
छान. सविस्तर वृत्तांत लवकर येऊदेत.
  • Log in or register to post comments
ब
बिपीन सुरेश सांगळे Sun, 04/17/2022 - 09:33 नवीन
टर्मिनेटर विशाल अदिती गिरीजा भक्ती मस्त मस्त !
  • Log in or register to post comments
ब
बिपीन सुरेश सांगळे Sun, 04/17/2022 - 09:33 नवीन
टर्मिनेटर विशाल अदिती गिरीजा भक्ती मस्त मस्त !
  • Log in or register to post comments
आ
आलो आलो Sun, 04/17/2022 - 09:36 नवीन
बिपिनराव काढा कि फूडचा कट्टा पुण्यात .... भेटू कि सगळे
  • Log in or register to post comments
न
निनाद Sun, 04/17/2022 - 12:47 नवीन
चांगला कट्टा झाला!
  • Log in or register to post comments
ब
बिपीन सुरेश सांगळे Sun, 04/17/2022 - 16:00 नवीन
बिपिनराव काढा कि फूडचा कट्टा पुण्यात .... भेटू कि सगळे आलो आलो नक्कीच प्रयत्न करिन मंडळी कळवा
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Mon, 04/18/2022 - 09:44 नवीन
आमी बी पुण्यात, येऊ की वाड्यावर म्हणजे शनिवार वाड्यावर.बक्कळ जागा हाय.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Mon, 04/18/2022 - 10:01 नवीन
+१ आमी बी यायचा प्रयत्न करू!
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 04/18/2022 - 07:42 नवीन
पुण्याला होतात. पण पिंचीला?
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Mon, 04/18/2022 - 08:18 नवीन
कॉलिंग चांदणे संदीप...
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Tue, 04/19/2022 - 05:20 नवीन
अहो मी इथे कधीचा कॉलींग करतोय, पण कुणी मनावर घेईल तर शपथ! सं - दी - प
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 04/18/2022 - 08:57 नवीन
आठवड्यातून एक दोन तरी असतात, फक्त जाहीर होत नाहीत इतकेच. इकडील स्थानिक मिपाकर वरचेवर भेटत असतात.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 9 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 9 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 9 hours ago
  • सुंदर !!
    1 day 9 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 9 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा