Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

परदेशवारी-३

भटकंती

परदेशवारी-३

क

कर्नलतपस्वी

Olakhaicae laekhaka सदस्य
229 लेखन
2907 प्रतिक्रिया
2020 पासून
📅
सदस्य झाले
05 March 2020
🕐
अखेरची भेट
11 Mar 2026

या सदस्याने अद्याप परिचय लिहिलेला नाही.

या सदस्याचे लेखन पाहण्यासाठी येथे Views block ठेवा.

कर्नलतपस्वी
गुरुवार, 03/17/2022 - 11:55

पहिला दिवस अविस्मरणीय असतो मग तो कॉलेज मधला,नोकरीतला किवा आणखीन कुठलाही.तशीच माझी या नवीन शहरातली पहिली भ्रमंती.जमकर रॅगिंग झाली.आता वातावरणाची सवय झाली (Acclimatize).भ्रमणध्वनी पण मिळाला व घरातून NOC त्यामुळे भटकंतीचा उत्साह द्विगुणित झाला. मार्च महिना सुरू झाला होता.आता थोडा रूळावलो होतो.काहीतरी चुकल्या चुकल्या सारखे वाटत होते.मराठी दिनदर्शिकेत डोकावून पहात आसताना लक्षात आले फाल्गुन मास सुरू झालाय.आपल्या देशात वसंताचा धुमाकूळ चालू होता.डोळ्या समोर भारतातल्या घराच्या बाल्कनीत फुललेली फुलझाडे दिसत होती.इथे मात्र दोन तीनच रंग,नीळा,पाढंरा आणी कुठे कुठे गडद हिरवा कारण नुकताच हेमंताने शिशीराला खो दिला होता.मला त्या रंगोत्सवाची तीव्र आठवण आली.

"बहरली रातराणी
पारिजात ही बहरला
शुभ्र पांढर्‍या मोगऱ्याचा
गंध आसमंती पसरला

उधळले रंग सारे
जणू रागदारी मांडली
पंचमीची मुठ माझ्या
दारी की हो सांडली"

बुंदेलखंड,अवध,ब्रज,बनारस आणी राजस्थान मधल्या वास्तव्यात होळी(होरी), रंगाच्या सणाचे विवीध रूप बघितले,अनुभवले.बनारस मधील "आस्सी", घाटावरचे कवी संमेलन,श्मशान होली.

"खेले मसाने में होली दिगम्बर
खेले मसाने में होली,
भूत पिशाच बटोरी दिगम्बर,
खेले मसाने में होली"

बनारसी बाबू आसे म्हणतात,

"दुनिया भर में होली को मनाते हैं पर बनारस में होली को पहनते है, ओढ़ते हैं, बिछाते हैं। उसे जीते हैं।"

जसे कबीरदासजी गुरूप्राप्ती करता बनारसच्या घाटावर पहाटे पहटे गुरूच्या मार्गावर आडवे पडले होते. आगदी तसाच फाग सुद्धा,

"फागुन भी आनंद के रामानन्द की तलाश में कबीर बनकर बनारस के घाट की सीढ़ियों पर लेट जाता है।"

ब्रजची लठमार होली,ब्रज भाषेचे विख्यात कवि पद्माकर लिहीतात-

"फागु के भीर अभीरन तें गहि, गोविंदै लै गई भीतर गोरी।
भाय करी मन की पदमाकर, ऊपर नाय अबीर की झोरी॥
छीन पितंबर कंमर तें, सु बिदा दई मोड़ि कपोलन रोरी।
नैन नचाई, कह्यौ मुसक्याइ, लला ! फिर खेलन आइयो होरी॥
"

"कृष्ण और गोपियों के बीच होली खेली जा रही है। पद्माकर कहते हैं कि राधा हुरियारों (हुडदंगाई) की भीड़ से कृष्ण का हाथ खींचकर राधा भीतर ले जाती हैं और अपने मन की करती हैं। वे कृष्ण पर अंबीर की झोली पलट देतीं हैं। कृष्ण को वे यूं ही नहीं छोड़ देतीं। जाते हुए उनके गाल गुलाल से मीड़ कर, नटखट दृष्टि से निहार कर हंसते हुए वे कहती हैं कि लला फिर से आना होली खेलने।"

लखनौचे हास्यकवी संमेलन काका हाथरसी,शैल चतुर्वेदी,हुल्लड मुरादाबादी सारख्या सिद्ध हास्य कवींचा हुडदंग आणी सैन्यातील होळी याची खुप आठवण येत होती. लहानपणची होळी, बॅचलर्स होळी,गृहस्थाश्रमातली पहिलीच होळी प्रतेक वेळ्ची मजाच वेगळी, ठंडाई,भांग पकोडे,ठंडा मौसम विथ चिल्ड बियर,छोले भुटूरे जलेबी आ हा हा. आशा सर्व आठवणी मनात हुडदंग घालू लागल्या.खुब जमकर होली खेली थी और आज भी खेलता हूंI मिशिगन मधे होळीचा आनंद मिळणार नव्हता म्हणून चुकल्या चुकल्या सारखे वाटणारच ना. असो विषयांतर नको.

कुठल्याही नवीन ठिकाणी गेल्यावर इतिहास आणि भूगोलाचा आढावा घेण्याची जुनी सवय. त्यामुळे थोड्याच दिवसात नवीन जागा आपलीशी वाटते (स्वानुभव). जवळपास एकट्याने रोज फिरायला जाणे नित्याची बाब झाली.डेट्राईट खुपच जुने शहर व त्याचा इतिहास, खाणाखुणा या बद्दल आपण पुढच्या भागात बोलूच.

पाच दिवस भरपूर काम करायचे दोन दिवस"जीवाची मुंबई".सप्ताहा अंती कुटुंबा,मीत्रां बरोबर सहभोजन (पार्टी टाईम),कधी दुर कुठेतरी तर कधी आपल्याच परसदारी (Backyard). थंडीच्या पार्श्वभूमीवर फायर प्लेस/टुमदार तंबू,बारबिक्यू,संगीत आणी जाम आसे आयोजन मग शाम रंगीन होण्यास कितीसा वेळ लागणार. ओपन फायर प्लेस, बारबिक्यू मशीन इ. बहूतेक जणांच्या परसदारी बघायला मिळेल. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आसाच काहीसा आसावा आसे मला भासले.

"आता कशाला उद्याची बात ?
बघ उडुनि चालली रात

भरभरूनि पिऊ, रसरंग नऊ
चल बुडुनि जाऊ रंगात

हा ज्वानीचा बहार - लुटू या
भरवसा न ज्वानीचा
दो दिन ही साथ
हासत करि घात

गीत - अनंत काणेकर"

बरेच वेळा भटकताना एखाद्याच्या बंगल्यासमोर लांबलचक स्टेशन वॅगन उभी दिसायची.त्यावर RV लिहीले असायचे. प्रथमदर्शनी वाटले बहुतेक Rescue Van असावी, (Professional Hazards दुसरे काय).चौकशीनंतर कळाले की दुरच्या सहली करता मनोरंजन गाडी (Recreational Vehicle)आहे. या भाडे तत्त्वावर मिळतात, सर्व साधनांनी सुसज्ज,थोडक्यात आपण त्याला चार चाकी घर म्हणू शकतो.कुठल्याही निसर्गरम्य परिसरात किवा तलावा काठी गाडी उभी करून मुक्त विहाराचा आनंद घेऊ शकतो. गाडी मधे घरा प्रमाणेच सर्व सुखसोई असतात आगदी दुसरे घरच म्हणाना.पिकनिक करता फोर्ड एफ सिरीजचा पिक अप ट्रक किंवा तत्सम गाड्या खुप सोईस्कर असतात.बरेच लोक ट्रेलर पण घेतात म्हणजे लांब सहलीला जाताना सर्व कॅम्पिंग चे सामान भरून घेऊन जाता येते.

आता आम्हांस येवून पंधरवडा झाला होता. शनिवारी दुपारी जवळच वीस मैलावरच्या ऐतिहासिक वाॅल्ड लेक ला (Walled Lake) जायचे ठरले. पंधरा माईल रोडवर स्थित एक ऐतीहासीक तळे. मला सपड्लेल्या माहीती प्रमाणे "वाल्टेर हेवीट " हा येथील पहिला रहिवासी. तो १८२५ साली येथे राहाण्यास आला. त्यानेच या तळ्याला वाॅल्ड लेक आसे नाव दिलेहोते. कदाचीत य तलावाभोवती आसलेल्या दगडी भिन्ती मुळ्ये आसे नाव दिले आसावे.

बाहेर खूपच थंडी होती. इनर,आउटर सर्व घालून तयार झालो.काही खायला प्यायला घ्यायचे का? इती श्रीमती.नको आपण "वाणी",मधून समोसे, दालवडे आणी काॅफी उचलूया, इती मुलगी."वाणी",पुण्यातील ग्राहक पेठे सारखीच.नाव घ्या आणी पाहिजे ती गोष्ट उपलब्ध होती. पुजेचे सामान,विड्याची पाने,केळीचे खुंट,काटेरी वांगी,मिष्टी दोई (बंगाली व्यजंन),चौरंग,तांब्याचे ताम्हण पळी तांब्या भाडे,इतर भारतीय चवीच्या खाण्याच्या गोष्टी आगदी शेव रेवडी सुद्धा. खसखस,आळीव,नाचणी आणी कुळीथ सारख्या कधीतरी लागणाऱ्या वस्तू सुद्धा मिळाल्या. मल्याळम भाषेत दोन ललना बोलत होत्या.दुकानदार मल्याळी भाषीय, बंगाली,मराठी,गुजराथी,पंजाबी सर्व भाषा कानावर पडत होत्या. इथल्या प्रत्येक भारतीयाचे आवडते ठिकाण.एक समोसा एक डाॅलर म्हणजे ७५ रू. आसो किमतीवर लक्ष न देता इच्छित खाद्यपदार्थ घेऊन पुढील प्रवास सुरू झाला. एक गोष्ट कळाली की भारतातून दिवाळी फराळाची पार्सले का पाठवतात.

बर्फ् पडायचे थाम्बले होते पण आधुन मधुन पाऊस जरूर पडत होता, दुपारचे तीन वाजले होते. तापहीन मार्तन्ड आकशात तळपत होते. लवकरच तळ्याच्याकाठी पोहोचलो, वाहन थाम्बा (पार्कीग) छानच होता. समोरच मोठ्ठी हिमनदी दिसत होती. प्राणी पक्षी नदारद होते. तुरळक माणसे त्या हिमनदीवर खेळत होती. किती जाड बर्फाच्छादित चादर होती याचा आदांज लावणे कठीण होते. निरभ्र आकाशात सुर्यदेव रेगांळत होते. तलावाच्या लांबी, रुंदी खोली बद्दल वायफळ चर्चा करण्यापेक्षा प्रत्यक्ष फोटो बघा.काहीच दिवसानंतर जेंव्हा थोडे तापमान वाढले तसे पुन्हा एकदा या जागेस भेट दिली. त्यावेळेस केलेले छायाचित्रण सुद्धा खाली दिले आहे. आपल्याला आवडेल आशी आशा........

पुढील भागात लवकरच परत भेटूयात.......

mipa हिमनदी mipa हिमनदी

mipaहिमनदी
mipa हिमनदी मे महिन्यात

mipa हिमनदी मे महिन्यात

mipa ईतीहास

mipa सायकलचा पम्प

mipa मुलाना खेळ्ण्यास

mipa सायकल पथ

mipa

mipa एक सन्ध्याकाळ

  • Log in or register to post comments
  • 6694 views
💬 प्रतिसाद

Recent comments

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा