Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

युक्रेन - रशिया - युद्धाची मीमांसा !

स
साहना
गुरुवार, 03/03/2022 - 10:32
🗣 154 प्रतिसाद
strong do what they can, weak suffer what they must. युद्ध म्हटले कि प्रचारतंत्र हे आलेच. युक्रेनियन-रशियन युद्धांत युक्रेनियन सैन्याने किमान प्रचार तंत्रांत रशियाला संपूर्ण हरवले आहे. मिम्स, बंदूक घेतलेली म्हातारी आजीबाई, बिटकॉइन डोनेशन, UN, EU मधील जबरदस्त भाषणे. अत्यंत वक्तृत्वशाली तेजस्वी राष्ट्राध्यक्ष, ट्विटर, फेसबुक इत्यादींवर असंख्य चित्रे, विनोद, मोडलेले रशियन रणगाडे, घोस्ट ऑफ कीव सारखी मिथके, आईला फोन करून रडणारे रशियन युद्धकैदी, रशियन सैन्याने गोळी घालून मारलेले कुत्रे, निर्वासितांबरोबर जाणारे कुत्रे इत्यादी इत्यादी. अवांतर : तुम्हाला बाकीचा लेख वाचायचा नसेल तरी चालेल पण खालील शब्द कुणाचे आहेत ते प्रतिक्रिया देऊन सांगा. नंतर गुगल करा. ठाऊक असेल तर स्पॉईलर नको. We need to use the United Nations Security Council and believe that preserving law and order in today’s complex and turbulent world is one of the few ways to keep international relations from sliding into chaos. The law is still the law, and we must follow it whether we like it or not. अवांतर संपले. पण प्रत्यक्षांत रशियाने आक्रमणाची घोषणा करताच रशियाच हे युद्ध जिंकणार ह्यावर सर्वानीच (मी सुद्धा) पैसे लावले होते. पण युक्रेनियन प्रचारतंत्र इतके प्रभावी सिद्ध झाले कि कदाचित युक्रेनियन जिंकत आहेत अशी खोटी अशा युरोप इत्यादी देशांत निर्माण झाली. पण जसा जसा वेळ जाईल तसा तसा ह्या लोकांचा अपेक्षा भंग होत जाईल. रशियन आक्रमण हे अपेक्षेपेक्षा कमी कार्यक्षम होते आणि रशियन सैन्य बऱ्यापैकी ढिसाळ आहे हे निर्विवाद सत्य असले तरी शेवटी युद्ध म्हटले कि अश्या चुका दोन्ही बाजूकडून होतातच. उदाहरण म्हणजे रशियाने सीमेवर सैन्य जमवले होते हे सर्वानाच ठाऊक होते, युक्रेन ला तर ठाऊक असायलाच पाहिजे त्यामुळे निव्वळ इन्शुरन्स म्हणून तरी युक्रेन ने युद्धाची तयारी करून ठेवायला पाहिजे होती. ती त्यांनी केली नाही ह्यांतून युक्रेनी नेतृत्वाचा ढिसाळपणा दिसून येतो पण प्रचारतंत्रांत त्यावर कोणी बोट दाखवत नाही. युक्रेन ने जबरदस्तीने आपल्या पुरुषांना सैन्यात भरती केले आहे. त्यामुळे अनेक युक्रेनी बायका आणि मुले विना बाप पोलंड, मालदोवा मध्ये निर्वासित म्हणून जात आहेत. ज्यांना अजिबात सैनिकी प्रशिक्षण नाही अश्या व्यक्ती अर्ध प्रशिक्षित सुद्धा असलेल्या रशियन सैन्यापुढे जास्त टिकाव धरू शकणार नाहीत. त्यामुळे असंख्य लोक ह्यांत मरणार आहेत. नैतिक दृष्ट्या हि हत्या शेवटी युक्रेनी नेतृत्वावरच आहे. पण प्रचारतंत्रांत फक्त रशियन सैन्यांत जबरदस्तीने घुसवल्या गेलेल्या सैनिकांचाच विषय काढला जातो. कारगिल युद्धात फक्त बळींची संख्या पहिली तरी भारतीय सैन्य अक्षरशः कापले गेले असे कुणी म्हणू शकतो. किंवा काही इंटेलिजन्स चुकीमुळे कोट्यवधी पैसे आणि शेकडो सैनिकांचा बळी गेला असे म्हणू शकतो. पण शेवटी निव्वळ चिकाटीच्या जोरावर भारतीय सैन्य जिंकले. एका अमेरिकन वार्ताहराने परवेज मुशर्रफ ह्यांना खाजगीत विचारले कि नक्की काय म्हणून तुम्ही कारगिल युद्ध केले. मुशर्रफ ह्यांनी उत्तर दिले कि कारगिल युध्दांत सर्व गोष्टी पाकिस्तानला हव्या होत्या तश्याच होत होत्या. पाकिस्तान साठी हा मास्टर स्ट्रोक होता. पण फक्त एक अंदाज चुकला. पाकिस्तान चा अंदाज होता कि शेकडो भारतीय सैनिकांची मृत शरीरे तिरंग्यात लपेटून परत देशभर जातील तेंव्हा हे युद्ध बंद करावे म्हणून भारतीय समाजच बोंब मारेल आणि त्याचा फायदा घेऊन आम्ही वाटाघाटीत भारताला हरवू. पण कितीही सैनिक मरत राहिले तरी भारतीय समाज एकजूट राहिला, भारतीय राजकारणी मंडळींवर त्याचा विपरीत परिणाम पडला नाही आणि भारत शेवटी निर्विवाद पणे युद्ध जिंकला. थोडक्यांत काय तर कागदावरील बळीची संख्या पाहून युद्धाचा शेवट ठरत नाही. प्रचार तंत्र हे क्रिकेट कमेंटरी प्रमाणे वाटले तरी फॉग ऑफ वॉर म्हणजे युद्धाचे धुके इतके गडद असते कि अतिशय चांगले विद्वान आणि प्रामाणिक माणूस सुद्धा आपली दिशाभूल करवून घेऊ शकतो. त्यामुळे युद्धाचा निकाल शेवटी पूर्णतः वेगळा असू शकतो. सध्याच्या रशियन-युक्रेनियन युद्धांत रशिया बऱ्यापैकी प्रगती करत आहे. ती अपेक्षेपेक्षा कमी असली तरी त्याचा रशियाला फरक पडत नाही. प्रत्येक युक्रेनी सैनिकांनी १० रशियन सैनिकांना मारले तरी युद्धाचा निकाल बदलत नाही. पण सॅन झू ह्या चिनी युद्धविशारदाने लिहिल्या प्रमाणे मोठ्या शत्रूला कोंडीत पकडणे सुद्धा धोक्याचे असू शकते. समजा युक्रेन मध्ये खरोखरच पुतीन हे कोंडीत सापडले आहेत, समजा खरोखरच त्यांच्या सैन्याला जबरदस्त मर खावा लागला असून त्यांना आता कुठली तरी वेगळी स्ट्रॅटेजी निर्माण करावी लागत आहे तर ह्यांत खुश होण्यापेक्षा युरोप आणि युक्रेन ला धोकाच जास्त आहे कारण अश्या स्थितीत पुतीन कुठलाही पराकोटीचा निर्णय घेऊ शकतात. रशियाचा प्रथम हेतू २४ तासांत किंवा वर कब्जा आणि झेलेन्स्की ह्यांचे पलायन, ७२ तासांत आपला राष्ट्राध्यक्ष क्यिव मध्ये स्थापन आणि त्यानंतर देशांतून माघार असा होता असे अनेक अमेरिकन तज्ज्ञांनी लिहिले. युक्रेनी पराक्रमाने हा शक्य नाही झाला. तर आता हेतू युक्रेनी शहरे पूर्णतः जमीनदोस्त करणे हा आहे असे सांगितले जाते. नक्की काय हेतू आहे हे आम्हाला ठाऊक नसले तरी आता असंख्य प्रमाणात लोक मारले जातील हे मात्र १००% सत्य आहे. युद्धाची कारणे कुणाची बाजू बरोबर कुणाची चुकीची ह्यावर बराच उहापोह केला जातो. त्यांत अनेक लोकांचा रशिया द्वेष, अमेरिका द्वेष, पूर्व विरुद्ध पश्चिम, लोकशाही विरुद्ध अलोकशाही, भारतीय मित्र विरुद्ध भारतीय विरोधक अश्या विविध भूमिकांची सरमिसळ झाल्याने वस्तुनिष्ठता राहणे कठीण जाते. नैतिकता आणि युद्धतंत्र ह्यांचा संबंध आपल्यासारखे सामान्य लोक लावत बसले किंवा प्रचार तंत्रांत त्यांचा प्रभावी वापर केला गेला तरी शेवटी त्यांचा संबंध नाही. यज्ञात बळी बोकडाचा जातो सिंहाचा नाही. त्याच न्यायाने युद्धतंत्रांत बलाढ्य असतो तो जिंकतो. सत्यमेव जयते सारख्या तत्त्वांत तथ्य आहे. लॉन्ग टर्म म्हणजे दूरगामी दृष्टीने चांगली तत्वे विजयी आणि वाढत जातात. पण त्याच वेळी शॉर्ट टर्म मध्ये ज्याच्या हाती लाठी त्याची म्हशी ! जगाचा पालनकर्ता विष्णू सामान्य स्थितींत सर्पावर झोपून असतो. सर्पाला फक्त जवळचे दिसते. पण काही निर्णय घ्यायचे असल्यास किंवा युद्धावर जायचे असल्यास विष्णू गरुडावर बसतात कारण गरुडाला दूरचे दिसते. २०२२ मधील युक्रेन-रशिया युद्ध हे काही अर्थाने खूपच वेगळे आहे. पाहिली गोष्ट म्हणजे क्रिमिया किंवा जॉर्जिया इथे चकमकी झाल्या असल्या तरी त्यांची व्याप्ती कमी होती. सीरिया इराक मध्ये युद्धे झाली तरी आधीच हे देश गरीब आणि कुणाला यांचे विशेष पडून गेले नसल्याने कुणालाच त्यांचे काय होते त्यांत रस नव्हता. पण युक्रेन युद्ध हे सोशल मीडिया द्वारे सर्वत्र दाखवले जात आहे. विविध युरोपिअन लोकांनी व्यक्त केलेल्या प्रतिकीर्या होत्या कि युक्रेन चे निर्वासीत म्हणजे इराक अफगाणिस्तान सारखे मागासलेले देश नसून आपल्यासारखे गोरे आणि आणि सुसंस्कृत आहेत. त्यामुळे हे युद्ध युरोप मधील सर्वच लोकांना आणि सामान्य लोकांना अत्यंत जिव्हारी लागले आहे. खारकीव वर पडणारी क्षेपणास्त्रे लंडन किंवा परिसवरच पडत आहेत असे युरोपिअन लोकांना वाटत आहे. हे ऐकायला थोडे असंवेदनशील वाटले तरी प्रत्यक्षांत अत्यंत स्वाभाविक आहे. पाकिस्तान मध्ये हिंदूंवर अत्याचार दिसले कि हे आपल्याच लोकांवर होत आहेत आणि ह्यांना भारतांत आश्रय द्यावा म्हणून भारतीय लोक आपल्या नेत्यांवर दबाव टाकतात. पण त्याच वेळी रोहिंग्यांवर हल्ला झाला किंवा अफगाणिस्तान मधील मुस्लिम लोकांवर अमेरिकेने बॉम्ब टाकले म्हणून भारतीयांना त्याचे विशेष सोयरे सुतक नसते. त्यामुळे युक्रेन-रशियन युद्धांतील हा एक महत्वाचा घटक होता जो ह्या युद्धाला खूपच वेगळा ठरवतो. कदाचित ह्याची अपेक्षा रशिया, अमेरिका किंवा युरोप ह्यांना कुणालाच अजिबात नव्हती. पण ह्याचे परिणाम आता सर्वानाच भोगायला लागणार आहेत. लोकशाहीत राजकारणी मंडळींना एकाच गोष्टीत रस असतो. तो म्हणजे पुढील निवडणूक कशी जिंकायची. राष्ट्रहित, समाजहित ह्यावर कितीही बोंब मारली तरी पहिले ध्येय म्हणजे निवडणूक जिंकणे. लोकशाहीत एखादा राजकारणी मोठ्या पदावर पोचून निवृत्त झाला कि मस्त सरकारी निवासांत राहायला जातो, पुस्तके लिहितो, अवॉर्ड वगैरे घेतो. त्याचे विरोधक सुद्धा त्याला आदर देतात. एकूण अतिशय हेवा वाटावा असे जीवन असते. हुकूमशाह ला ती luxury नाही. त्याला सतत घाबरून दिवस कंठावे लागतात. आणि निवृत्ती म्हणजे अज्ञातवात किंवा मृत्यू. त्याशिवाय लोकशाहींत एकदा निवडणूक जिंकली कि किमान काही वर्षे बिनधास्त नेता पदावर राहू शकतो. हुकूमशाहीत प्रत्येक दिवस अनिश्चितीतता घेऊन येतो. लोकशाही आणि हुकूमशाही राष्ट्रांची तुलना करताना हि asymmetry (विषमता) असते हि अनेक सामान्य लोक लक्षांत घेत नाहीत. समजा एक जमिनीचा तुकडा घ्यायचा आहे आणि त्यासाठी युद्ध करायचे आहे. अनेकदा हुकूमशाहाला ते करणे सोपे जाते कारण त्याला निवडणुकांची फिकर नसते पण आपण नेते आहोत हे सतत दाखवून द्यायचे असते. त्याच वेळी लोकशाहीला युद्धांत भाग घेण्यात विशेष रस असत नाही आणि युद्धांत हरण्याची शक्यता असेल तर अजिबात नाही. पण कधी कधी हे फासे उलटे पडतात. युद्ध आणि इलेक्शन ह्यांचा संबंध निर्माण होतो. आणि अश्या वेळी लोकशाहीतील नेते कुठल्याही हुकूमशहापेक्षा जास्त प्रभावीपणे युद्धांत भाग घेऊ शकतात. इतकेच नव्हे तर त्यांना लोकांचे समर्थन सुद्धा जास्त मिळते. कारगिल युद्ध हे ह्याचे उत्तम उदाहरण आहे. युक्रेन वर रशियाने अचानक हल्ला केला असता आणि युक्रेन ताब्यांत घेतले असते तर आता जितका तळतळाट नाटो राष्ट्रांनी केला असता कदाचित त्याच्या ५% सुद्धा त्यांनी केला नसता. मरू दे म्हणून युरोप आणि अमेरिका आपल्या कामाला लागले असते. पण युक्रेनी प्रचार तंत्र इतके प्रभावी ठरले कि युरोप/अमेरिका मधील जनता त्यांत न भूतो न भविष्यती अशी ओढली गेली. सामान्य मतदाराची हि भावनिक गुंतवणूक पाहून युरोपिअन आणि अमेरिकन नेत्यांना जास्त कठोर भूमिका घ्यायला भाग पडावे लागले. पुतीन ह्यांचे गणित इथेच चुकले असावे. अमेरिकन - युरोप निर्बंध जे रशियावर लादले गेले आहेत ते फारच म्हणजे फारच कठोर आहेत. अमेरिकन सरकारला सुद्धा ह्याची जाणीव आहे आणि विविध ठिकाणी हे बोलून सुद्धा दाखवले जाते. रशियन अमेरिकन अभ्यासक ह्यांनी रशियन भाषेंत ह्या निर्बंधाचे परिणाम काय होतील हे इथे दिले आहे. [२]. “All the war-propaganda, all the screaming and lies and hatred, comes invariably from people who are not fighting.” - ओरवेल अमेरिका/नाटोची भूमिका : नाटो म्हणजे हिजड्यांची फौज आहे, ह्यांना भांडता येत नाही ह्यांनी फक्त दूरच्या मागासलेल्या देशांना धमकवावे इत्यादी विविध शेलकी विशेषणे NATO मागील काही वर्षांपासून ऐकवावी लागत होती. अफगाणिस्तान मधील पराभवानंतर किंवा इराक मधील गोंधळानंतर हे जास्तच प्रभावी पणे सर्वाना जाणवत होते. सामान्य युरोपिअन तसेच अमेरिकन लोकांना युद्धांत रस नव्हता. ओबामा, ट्रम्प किंवा बायडन ह्यांनी आपल्या प्रचारांत नवीन युद्धापेक्षा सध्याची युद्धे बंद करू अश्याच घोषणा दिल्या होत्या. ब्रेक्सिट सारख्या घटनांनी तर युरोप मध्ये एकी नाही वगैरे गोष्टी आपण ऐकत होतो. युद्धाची बोलणी जाऊन ग्रेटा किंवा मलाला सारख्या गोष्टी युरोप मध्ये जास्त लोकप्रिय झाल्या होत्या. जगापुढील सर्वांत मोठा धोका, रशिया, चीन, इस्लाम नसून वातावरण बदल आहे आहेत ह्यावर लोकांचा विश्वस बसत चालला होता. युरोप चे भविष्य काय आहे असा प्रश्न पीटर थील ह्यांना विचारला असता त्यांनी उत्तर दिले की "एक तर युरोप इस्लामिक होईल नाहीतर इ-स्कुटर घेऊन सोय लाटे पित सरकारकडून फुकटचे रेशन घ्यायला रांग लावणाऱ्या लोकांचा खंड बनेल" (स्वैर). पण शेवटी नाटो अमेरिका हे क्लिष्ट आणि लोकशाही समाज आहेत त्यामुळे ह्यांचा संबंधात काहीही म्हटले तरी शेवटी त्याला अपवाद सुद्धा दिसून येतोच. पण शेवटी ह्यांच्या हातांत निर्विवादपणे सर्वांत मोठी लाठी आहे. त्यामुळे अनेक म्हशी सुद्धा ह्यांच्याच ताब्यांत आहेत. नाटो ने रशिया लगतच्या देशांशी चांगले संबंध ठेवू नयेत हि रशियाची भूमिका होती. युक्रेन, बेलारूस, जॉर्जिया, इत्यादी देशांना काही अर्थाने बफर देश म्हणून ठेवावे हि रशियाची भूमिका होती आणि त्यासाठी आपण युद्ध सुद्धा करू अशी धमकी वारंवार रशिया देत होता. गॉर्जिया आणि युक्रेन (२०१४) दोन्ही देशांवर मुद्दाम आक्रमण करून त्यांचा काही प्रदेश रशियाने म्हणूनच 'वादग्रस्त' केला होता. नाटो चे मेम्बर व्हायचे असेल तर सीमा स्पष्ट पाहिजे हा नियम आहे. रशियाने सीमावाद काढल्याने दोन्ही देशांना नाटो मध्ये जाणे शक्य नव्हते. थोडक्यांत रशियाची भूमिका मी आपल्या शेजार्याला वाट्टेल तसा वागवणार आणि त्याकडे इतरांनी काणा डोळा केला पाहिजे हि भूमिका. हि भूमिका नाटो मधील अनेक राष्ट्रांना स्वीकार करणे जड जात होते. नाटो चा विस्तारवाद, नाटोला सर्व जगावर नियंत्रण पाहिजे इत्यादी गोष्टी सध्या बोलल्या जातात. पण इथे रॅशनल पद्धतीने विचार केला पाहिजे. NATO हि बहुतांशी लोकशाही देशांची संघटना आहे. नाटो मध्ये जायचे कि नाही हे तो देश ठरवतो आणि इतर देश त्याला मान्यता देतात. नाटोच्या एका राष्ट्रावर हल्ला म्हणजे सर्वांवर हल्ला हे नाटोचे ब्रीद आहे (आर्टिकल ५). पण शेवटी नाटो हि एक सामरिक संघटना आहे. राजकीय नाही. राजकीय, आर्थिक संबंधांना सामरिक क्षमता सुद्धा पाहिजे. पण ह्या तिन्ही गोष्टी बहुतांशी वेगळ्या आहेत. राजकीय नेतृत्व हे लोकशाही मध्ये काही काही वर्षांनी बदलते. आर्थिक परिस्थितीत तासा तासाला बदलते तर सामरिक धोरण हे दशका दशकांत बदलत नाही. पण ह्या तिन्ही गोष्टींचा कधी कधी ओव्हरलॅप होतोच. आता युक्रेन सारख्या देशाला नाटो चे सदस्य करून घ्यावे म्हणजे पेट्रोल जवळ मशाल नेण्यासारखे होय असे विविध अमेरिकन युद्धविश्लेषकांनी मागील कित्येक वर्षे सांगितले आहे. जवळ जवळ सर्व स्ट्रॅटेजी पेपर्स मध्ये रशियाने काहीही केले तरी युक्रेन सारख्या देशाला NATO मध्ये घेण्यात NATO चे नुकसानच आहे असे बहुतेक रिसर्च सांगत होता. John Mearsheimer सारखे realist अनेक वर्षे हेच लिहीत आले आहेत. त्यांचा खालील निबंध आज खूप लोकप्रिय झाला आहे. पण मागील अनेक वर्षांपासून त्यांनी आणि इतर अनेकांनी हेच लिहिले आहे.[१] हिंदू अमेरिकन डेमोक्रॅट तुलसी गबर्ड ह्यांनी सुद्धा तेच हल्ली म्हटले. युक्रेन सारखा अपरिपक्व, गरीब आणि इतर प्रकारच्या हिंसेने त्रस्त झालेला देश NATO मध्ये आला आणि रशियाने दुर्लक्ष केले तर पुढे काय होऊ शकते ? एक म्हणजे युक्रेन मधील एखाद्या गटाने, किंवा रशियन धार्जिण्या गटाने युक्रेन मधून काही छोटी रॉकेट्स राशीवर फेकली तर पुढे काय ? रशियाला प्रत्यत्तर द्यावे लागेल आणि NATO ला मग मोठे युद्ध छेडावे लागेल. रशियाने उत्तर नाही दिले तर ह्या गटांचा उत्साह आणखीन वाढेल आणि प्रस्थापित रशियन नेते कमजोर दिसतील. नाटो ने प्रत्युत्तर नाही दिले तर नाटो ची विश्वासार्हता धोक्यांत येते. समजा रशियाविरोधांत नाटो ला काही आक्रमण करावे लागले तर ? युक्रेन सारख्या देशांचा मोठा फरक पडत नाही. ह्या देशांना सहज कब्जांत घेऊन नाटो सैन्य पुढे जाऊ शकते. उलट युक्रेन सारखे बफर देश अस्थिर ठेवले तर नाटो ला प्रचंड फायदा आहे. ह्या देशांत अस्थिरता माजवून, हत्यारे देऊन रशियाविरोधांत सतत आग ओतत तेहवली जाऊ शकते.त्यामुळे युक्रेन ला नाटो मध्ये येऊ देण्यांत पाश्चात्य राष्ट्रांचा तसा विशेष फायदा नव्हताच. विविध माध्यमांतून नाटो चा विस्तारवाद युक्रेन युद्धासाठी कारणीभूत आहे असे लिहिले जाते पण नक्की हा विस्तार कश्यासाठी आहे आणि कोण ह्या विस्तारवादाचा पुरस्कार करतो हे किमान मला तर समजले नाही. अमेरिकन परराष्ट्र धोरण नक्की कोण ठरवतो ? का अमेरिका अमुकच पावले उचलते ह्यावर खूप विचारमंथन होते. गोव्यांतील ३० हजार खप असलेल्या नवप्रभातून संपादक महोदयांनी "बुश ह्यांना आमचा खणखणीत इशारा" असे अग्रलेख लिहले आहेत. कुणी म्हणतो देशांचे भांडण लावून शस्त्रास्त्रे विकणे, कुणी म्हणतो तेल, (रशियाच्या संदर्भांत नॉर्दस्ट्रीम २ इत्यादी) पण खोल विचारांती हे बहुतेक तर्क अत्यंत उथळ वाटतात आणि ते आहेत सुद्धा. धोरणे नक्की कशी निर्माण होतात ह्या विषयाचा अभ्यास करण्याचे जे शास्त्र आहे त्याला "पब्लिक choice theory" असे संबोधित केले जाते. अर्थशास्त्राचा हा एक जास्त चर्चेत नसलेला पण खूप उपयुक्त असा भाग आहे. हननानीया ह्याचे "Public Choice Theory and the Illusion of Grand Strategy" [३] असे एक चांगले पुस्तक आहे. ह्या पुस्तकांतून अमेरिकन परराष्ट्र धोरणाचे उदाहरण घेऊन नक्की निर्णय कसे घेतले जातात ह्याचा खूप चांगला उहापोह केला आहे. पुस्तकाचा मूळ मुद्दा जो मला माझ्या intuition शी मिळता जुळता वाटला तो असा. लोकशाहीत अनेक मत प्रवाह असतात आणि त्या मतांचे अनेक पुरस्कर्ते असतात. त्यामुळे देशाचा नेता कुणीही असला तरी शेवटी त्याला अनेक मतप्रवाह तसेच इतर प्रभावांना लक्षांत घेऊन निर्णय घ्यावे लागतात. एकदा निर्णय घेतला कि बाहेरचे लोक हा निर्णय कुठल्या तर्काने घेतला ह्याच्या अटकळी बांधतात आणि प्रत्यक्षांत खरे कारण आणि वाटणारे कारण ह्यांचा संबंध असेलच असे नाही. कधी कधी निर्याणाचे जे परिणाम अपेक्षित असतात ते अजिबात होत नाहीत उलट भलतेच होते. आणि बाहेरून पाहणाऱ्याला निर्णय घेणारे नेते किती मूर्ख होते असे वाटते. ह्याचे कारण म्हणजे निर्णय प्रक्रियेत सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा आपला असा एक खाजगी फायदा असतो. वर वर "समाजहित, राष्ट्रहित" अश्या बाता मारताना ह्या व्यक्ती आपले खाजगी हित सुद्धा पुढे करत असतात. हे खाजगी हित नेहमी समाजहिताच्या विरोधांत असते. सुदैवाने अनेक खाजगी हित रक्षक एकमेकांविरुद्ध खेळी खेळत असल्याने त्यांचा प्रभाव बहुतांशी कमी होत जातो. तात्पर्य म्हणजे शेवटी जे निर्णय घेतले जातात ते असंख्य घटकांच्या प्रभावाने निर्माण झाले असतात. कधी कधी निव्वळ योगायोग किंवा अपघात म्हणून एखादा निर्णय घेतला जातो. पण बाहेरील जग त्यावर प्रचंड चिंतन करत त्या निर्णयाला जस्टीफाय करणारे ४D बुद्धिबळ खेळात बसतात. नाटो किंवा अमेरिकेने अमुक धोरण काय अवलंबायला हवे होते ह्यावर अनेक लोक निव्वळ युद्धनीती म्हणून, भूराजकीय खेळी म्हणून वगैरे पाहतात पण प्रत्यक्षांत हे निर्णय आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, स्थानीय राजकारण, विविध मित्र राष्ट्रे, कंपन्या इत्यादींचा प्रभाव म्हणून घेतले जातात. हे समजा अचूक ठरले तर त्याचे क्रेडिट नेत्यांना मिळते पण चुकले तर तर विविध कारणांनी टीकेची झोड उठते. स्टीफन कोटकिन, अमेरिका आणि रशिया ह्यांचे वाकडे का आहे आणि कसे आहे हे ह्या २ मिनिटांच्या व्हिडिओत सांगतात. आता त्यांचेच मत बरोबर आहे असे नाही, पण आधुनिक माध्यमांच्या दुनियेत त्यांचे मत सुद्धा कदाचित एक मोठा घटक असू शकतो. [५] युक्रेन : युक्रेन हा एक सार्वभौम देश आहे. आणि त्या नात्याने आपले परराष्ट्र धोरण ठरविण्याचा पूर्ण अधिकार ह्या राष्ट्राला आहे हि एक नैतिक भूमिका झाली. युक्रेन हा नाटो आणि रशिया ह्यांच्या मध्ये आहे. आधी रशियाच्या कठपुतळी राष्ट्राध्यक्षांच्या खाली आणि हल्ली लोकशाही पद्धतीवर युक्रेन बऱ्यापैकी स्थिर झाला होता. कुठल्याही सध्या लोकशाही देशाप्रमाणे आर्थिक प्रगती हि माफक अपेक्षा ह्या जनतेची होती. युरोप आणि रशिया ह्याच्यात पर्याय दिल्यास, युरोप सोबत जास्त चांगले संबंध ठेवून युक्रेन ला प्रगती करणे सहजय शक्य होते. रशिया सोबत संबंध ठेवणे म्हणजे लोकशाही काढून त्या जागी पुतीन चा हस्तक नेमणे हा पर्याय होता. ह्या दोन पर्यायांत युक्रेन कुठला पर्याय निवडेल हे सांगायला ज्योतिष्याची गरज अजिबात नव्हती. त्यामुळे EU मध्ये घुसण्यास युक्रेन अत्यंत उत्सुक होता. EU मध्ये युक्रेन गेल्यास त्याची आर्थिक प्रगती नक्की होती. युक्रेनियन पासपोर्ट जास्त महत्वाचा झाला असता आणि क्रिमिया किंवा लगतच्या रशियन प्रदेशांतून युक्रेन मध्ये स्थलांतर वाढले असते. युरोपियन कंपन्यांना सुद्धा गुंतवणूक करता आली असती. हे सर्व काही युक्रेनी जनतेसाठी अत्यंत चांगली गोष्ट होती. पण त्याच वेळी युक्रेनी यश हे रशियन अपयशाला जास्तच अधोरेखित करते झाले असते. युक्रेन जर बेलारूस पेक्षा जास्त श्रीमंत झाला असता तर मग बेलारूस सुद्धा रशियन प्रभावातून बाहेर पडला असता. हे सर्व writing on the wall रशिया साठी होते. आणि त्याच मुळे कुठल्याही थराला जावून ते आपण रोखू अशी रशियन भूमिका होती. रशियन भूमिका अनैतिक असली (कारण युक्रेन सार्वभौम आहे वगैरे) तरी रशियन सैन्यबळ हे युक्रेन पेक्षा कित्येक पटीने मोठे असल्याने रशियाला अशी टोकाची भूमिका घेणे शक्य होते. म्हणूनच मी माझे वरचे पहिले इंग्रजी वाक्य लिहिले आहे. आता तुम्ही स्वतःला रशिया नाटो च्या वाटाघाटीच्या टेबल खुर्ची वर बसवून पहा. नाटो च्या दृष्टिकोनातून युक्रेन नाटो मध्ये यावा का नाही हा नाटो आणि युक्रेनी सार्वभौमतचा प्रश्न आहे. युक्रेनला रशियन विरोधांत आक्रमण करण्यासाठी किंवा रशियेवर क्षेपणास्त्रे डागण्यासाठी युक्रेन नाटोला हवा आहे असे अजिबात नाही. हि गोष्ट रशियाला ठाऊक आहे हे नाटो ला ठाऊक आहे. त्यामुळे रशियाला नक्की समस्या काय आहे हे नाटोला समजत नाही. रशियाला काही धोका वाटतो पण तो बहुतांश अनाठायी आहे आणि त्यामुळे पुतीन सुद्धा ह्या धोक्याचा विरोधांत पराकोटीची पाऊले उचलतील असे नाटो ला वाटत नाही. त्याच वेळी रशियन दृष्टिकोनातून पहा. युक्रेन आणि नाटो ला आपला नक्की विरोध का आहे ह्यावर रशिया सार्वजनिक रित्या एकच भूमिका घेऊ शकते ती म्हणजे नाटो आणि रशियाची सीमा एकत्र झाल्यास नाटो ती आपल्या विरोधांत वापरेल हि. हि भूमिका कुठल्याही दृष्टिकोनातून बालिश वाटते. युक्रेन EU मध्ये गेल्यास युक्रेनी समाजाची जास्त आणि जास्त वेगाने प्रगती होईल हे भय रशियाला वाटत असले तरी ते उघड पणे बोलू शकत नाहीत. त्यामुळे ह्या विषयावरून कितीही धमक्या पुतीन ह्यांनी दिल्या तरी नाटो त्यांना गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे ह्या वाटाघाटीच्या टेबलावरून रशिया हा आडमुठे धोरण अवलंबतो असेच दिसून येईल. आणि नाटो ने शरणागती पत्करलीच तर त्याचा अर्थ युक्रेन कडे पोटेन्शिअल असून सुद्धा त्यांना गरिबीत आणि रशियाच्या मांडलिकत्वात झोकून देणे असा त्याचा अर्थ ठरेल. रशियाची खरी भूमिका युक्रेन ने नाटोत जाऊ नये, युक्रेन ने युरोप मध्ये जाऊ नये, युरोप सोबत जास्त व्यापार करू नये, युक्रेन गरीब आणि बहुतांशी रशियावर अवलंबून राहावा अशी होती (इन that ऑर्डर ऑफ प्रायोरिटी) आणि ह्यातील काही मागण्या नाटो, EU, अमेरिका ह्यांनी मान्य केल्या तरी सर्वच मागण्या पूर्ण करणे नाटो इत्यादींच्या हातांत सुद्धा नव्हते. त्यामुळे रशिया - युक्रेन युद्ध हे बहुतांशी "inevitable" म्हणजे अटळ होते असेच तरी मला आता वाटते. रशिया : रशियाच्या हातातून हे युद्ध कधीच बाहेर गेले आहे. पाश्चात्य निर्बंध गरजेपेक्षा आणि अपेक्षे पेक्षा जास्तच कठोर असल्याने प्रत्येक दिवसाला रशियन अर्थव्यवस्था कोसळत चालली आहे. ह्यातील काही गोष्टींची अपेक्षा रशियाला होती पण आता जे निर्बंध आहेत त्यांची अपेक्षा नव्हती असे रशियन परराष्ट्र मंत्र्यांनी सुद्धा म्हटले आहे. हे निर्बंध काढायचे म्हटले तरी आता प्रचंड नुकसान दोन्ही बाजूंचे झाले आहे. रशियन रणगाडे कदाचित क्यिव मध्ये घुसतील. कदाचित झेलेन्स्की ह्यांना ठार मारून त्यांच्या जागी आणखीन कुणाला बसवतील. पण त्यामुळे पुतीन ह्यांचे "स्ट्रॅटेजिक ऑब्जक्टिव्ह" काही पूर्ण होणार नाहीत. उलट आधुनिक माध्यमांनी युरोपियन जनता जास्तच रशिया विरोधी बनेल, नाटो चे बजेट वाढेल, युद्धाची खुमखुमी असलेल्या नेत्यांना जास्त मते मिळतील आणि एकूण रशियन सुरक्षा आणखीन कमजोर होईल. कमजोर रशिया इतरांना मंडलिक बनविण्याच्या नादांत कदाचित चीन चा मांडलिक बनून राहू शकतो. भारतासारखे देश आता संरक्षण तंत्रज्ञानाच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करतील. खरे तर पुतीन ह्यांनी युक्रेन वर आक्रमण केले तेंव्हाच मोदी ह्यांनी खालील व्यक्तव्य दिले. "India should have own customised and unique weapons system, the surprise element will come on when we have own equipment. If ten countries have same type of military equipment then we have no uniqueness of the forces, said Prime Minister Narendra Modi while addressing a webinar on Friday." - फेब्रुवारी २५. [१] - https://www.mearsheimer.com/wp-content/uploads/2019/06/Why-the-Ukraine-Crisis-Is.pdf [२] - https://twitter.com/mironov_fm/status/1499092871265361927 [३] - https://www.routledge.com/Public-Choice-Theory-and-the-Illusion-of-Grand-Strategy-How-Generals-Weapons/Hanania/p/book/9781032121796 [४] - https://www.youtube.com/watch?v=_mDgH3dTR4w [५] - https://www.youtube.com/watch?v=K4xIfHzO0GI ukraine

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 51578 views

🗣 चर्चा (154)
T
Trump Sat, 03/12/2022 - 21:07 नवीन
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 03/13/2022 - 08:36 नवीन
सहमत आहे... प्रपोगंडा,..... (https://www.flipkart.com/propaganda/p/itm010070949a091) हे पुस्तक ह्याच विषयावर आधारित आहे ... असेच एक जुने पुस्तक आहे... https://en.m.wikipedia.org/wiki/Propaganda_(book)
  • Log in or register to post comments
T
Trump Wed, 03/16/2022 - 12:35 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
ॲ
ॲबसेंट माइंडेड… गुरुवार, 03/17/2022 - 07:49 नवीन
मिपावर हा लेख आहे. प्रोपगंडा (Propaganda) https://www.misalpav.com/node/49400
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Wed, 03/16/2022 - 15:42 नवीन
Republic भारत चे नाव घेतले आणि सर्व पाप धुवून निघाली. अर्णव आणि republic सारखा बकवास न्यूज चॅनेल नाही असे म्हणणार नाही. कारण बाकी गोदी भक्त आज तक पासून खूप आहेत. भारतीय मीडिया कोणतेच गंभीर विषय निरपेक्ष पने मांडण्याच्या लायकीची नाही . बावळट,अडाणी,गुलाम ही सर्व विशेषण त्यांना लावता येतील
  • Log in or register to post comments
T
Trump Sun, 03/13/2022 - 21:21 नवीन
रशिया आणि युक्रेन ऑलिगार्क २०१८
  • Log in or register to post comments
T
Trump Tue, 03/15/2022 - 07:19 नवीन
रशियाने अमैत्रीपुर्ण देशातील परदेशी संशोधन अधिकार( पेटंट) कोणत्याही मानधनाशिवाय वापरायला परवानगी दिली आहे. याच्यामुळे पुर्ण बौद्धिक मालमत्ता रशियाला फुकट वापरता येणार आहे.
47 “मित्र नसलेल्या देशांच्या” यादीमध्ये अल्बेनिया, अँडोरा, अँगुइला, ऑस्ट्रेलिया, ब्रिटिश व्हर्जिन आयलंड, कॅनडा, युरोपियन युनियन सदस्य राज्ये, जिब्राल्टर, ग्रेट ब्रिटन, आइसलँड, जपान, लिकटेंस्टीन, मायक्रोनेशिया, मोनॅको, मॉन्टेनेग्रो, न्यूझीलंड, उत्तर मॅसेडोनिया यांचा समावेश आहे. , नॉर्वे, सॅन मारिनो, सिंगापूर, दक्षिण कोरिया, स्वित्झर्लंड, तैवान, युक्रेन आणि युनायटेड स्टेट्स. https://www.jdsupra.com/legalnews/russia-decrees-patent-owners-from-the-u-7128961/
  • Log in or register to post comments
T
Trump Wed, 03/16/2022 - 15:07 नवीन
भारताला स्वस्त तेल रशियाकडुन मिळेल असे दिसते. बातम्यामध्ये रशियाने साधारणतः २५ टक्के सवलत (संदर्भ सापडत नाही.) दिल्याचे दिसते आहे. वाढलेले दर आणि पुन्हा कमी झालेले तर दर १०० डॉलर प्रती बॅरलच्या (https://oilprice.com/) आसपास दिसत आहेत.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Wed, 03/16/2022 - 15:47 नवीन
भारताने राशियातून स्वस्त तेल घेतले तर ते निर्बंधांचे उल्लंघन मानले जाणार नाही- व्हाइट हाऊस https://indianexpress.com/article/world/india-russia-discounted-oil-offer-united-states-7821819/lite/
  • Log in or register to post comments
T
Trump Wed, 03/16/2022 - 16:15 नवीन
मी बघितली ती बातमी, अमेरीकेचा भरवसा नाही. भारताला आणि रशियाला फायदा होते आहे असे दिसले तर ते उद्या दलबदलुपणा करतील.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 03/16/2022 - 19:34 नवीन
तसं होणार नाही. अमेरिका भारताला दुखवेल असं काहीही करणार नाही.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 03/16/2022 - 19:37 नवीन
अमेरिका भारताला दुखवेल असं काहीही करणार नाही असे वाटते. :)
  • Log in or register to post comments
T
Trump Wed, 03/16/2022 - 19:37 नवीन
सांगु शकत नाही. अमेरिका भारताला दुखवेल असं काहीही करणार नाही. जगावर प्रभुत्व ठेवण्यासाठी आणि बाजारपेठ म्हणुन अमेरीकेला भारताची गरज आहे. ती गरज संपताच किंवा भारताचे ओझे डोईजड होताच, भारताविरोधात अमेरीकेच्या कारवाव्या सुरु होतील.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Fri, 03/18/2022 - 13:52 नवीन
तुमचे म्हणणे पूर्वीच्या भारतासाठी योग्य आहे. पण आता मात्र भारताची गरज अमेरिकेला आहेच व ती पुढे वाढतच जाणार आहे. इतकेच नव्हे तर जोपर्यंत चीन प्रबळ आहे तोपर्यंत तरी युरोप, अमेरिका व रशिया यांना भारताला महत्व द्यावेच लागेल. चीनने जर भारतावर मात केली तर चीनचा पुढचा घास हा रशियाचा असणार आहे हे रशियाला माहीत आहे. त्यामुळे भारत कमजोर होईल असे रशिया कधीही करणार नाही तसेच चीनलाही दुखावत बसणार नाही. असो.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 03/22/2022 - 15:06 नवीन
भारतावर रशियन तेल घेण्यावर बंधने घातली तर त्याच न्यायाने युरोपीय देशांवर त्यांचा नैसर्गिक वायू आणि तेल यांच्या आयातीवर बंधने घालावी लागतील. यामुळे अमेरिकेला भारताच्या रशियन तेल खरेदीवर बंधने घालता येत नाहीयेत. अमेरिका हा सर्वात दांभिक आणि चोर देश आहे तेंव्हा तो भारतासाठी काही करेल यावर मुळीच विश्वास ठेवू नये.
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Tue, 03/22/2022 - 16:35 नवीन
त्याच न्यायाने युरोपीय देशांवर त्यांचा नैसर्गिक वायू आणि तेल यांच्या आयातीवर बंधने घालावी लागतील.....
अगदी बरोबर. रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या २ मार्चच्या बातमीनुसार, स्विफ्ट्मधून स्बेबँक व गॅझ्प्रॉमबँक ह्या रशियन बॅम्कांना वगळण्यात आलेले नाही, कारण त्यांच्यातर्फेच ई. यू. मधील देश, रशियांतील तेल व वायू खरेदी केल्याचे पैसे देऊ शकतात.
Sberbank (SBER.MM), Russia's largest lender, and Gazprombank were not included because they are the main channels for payments for Russian oil and gas, which EU countries are still buying despite the conflict in Ukraine.
  • Log in or register to post comments
T
Trump Fri, 03/25/2022 - 06:21 नवीन
थोडी चुक झाली आहे. पुर्ण अर्थ बदलतोय.
स्विफ्ट्मधून स्बेबँक व गॅझ्प्रॉमबँक ह्या रशियन बॅम्कांना वगळण्यात आलेले नाही आहे,
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Fri, 03/25/2022 - 07:38 नवीन
मला तरी काही चूकीचे वाटलेले नाही. प्रदीप यांनी दिलेल्या लिंक मधील या बँकांचा उल्लेख जिथे आलाय ते खाली देत आहे. १. The European Union said on Wednesday it was excluding seven Russian banks from the SWIFT messaging system, but stopped short of including those handling energy payments, in the latest sanctions imposed on Russia over its invasion of Ukraine. गुगलबाबा: युरोपियन युनियनने बुधवारी सांगितले की ते स्विफ्ट मेसेजिंग सिस्टीममधून सात रशियन बँकांना वगळत आहे, परंतु युक्रेनवरील आक्रमणामुळे रशियावर लादलेल्या नवीनतम निर्बंधांमध्ये ऊर्जा देयके हाताळणाऱ्यांचा समावेश करणे थांबवले आहे. २. Sberbank (SBER.MM), Russia's largest lender, and Gazprombank were not included because they are the main channels for payments for Russian oil and gas, which EU countries are still buying despite the conflict in Ukraine. गुगलबाबा: Sberbank (SBER.MM), रशियाचा सर्वात मोठा कर्जदाता आणि Gazprombank यांचा समावेश करण्यात आला नाही कारण ते रशियन तेल आणि वायूच्या पेमेंटसाठी मुख्य चॅनेल आहेत, जे युक्रेनमधील संघर्ष असूनही EU देश अजूनही खरेदी करत आहेत. ३.Polish Prime Minister Mateusz Morawiecki said the decision to exclude Sberbank and Gazprombank from sanctions due to "transactions related to energy supplies to the EU" was unacceptable. गुगलबाबा: पोलिश पंतप्रधान मातेउझ मोराविकी यांनी सांगितले की "EU ला ऊर्जा पुरवठ्याशी संबंधित व्यवहारांमुळे" Sberbank आणि Gazprombank ला निर्बंधांमधून वगळण्याचा निर्णय अस्वीकार्य आहे.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Fri, 03/25/2022 - 07:43 नवीन
मला तरी काही चूकीचे वाटलेले नाही.
🤦‍♂️ मला पण ते जरा चूकीचे वाटले होते. असं टाईप करायचे होते. 🤣
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Fri, 03/25/2022 - 07:47 नवीन
स्विफ्ट्मधून स्बेबँक व गॅझ्प्रॉमबँक ह्या रशियन बॅम्कांना वगळण्यात आलेले नाही,
हे माझ्याकडून थोडे मोघम लिहीले गेले. मला म्हणायचे होते की स्विफ्ट्मधून अनेक रशियन बँंकांना काढण्यात आले, मात्र त्या बँकांत स्बेबँक व गॅझ्प्रॉमबँक ह्यांचा समावेश नाही. अर्थात, ह्या दोन्ही बॅंका अजूनही स्विफ्ट्मधे आहेत.
  • Log in or register to post comments
T
Trump Wed, 03/16/2022 - 21:04 नवीन
भारतासाठीच्या काही शक्यता, नक्कीच नवीन माहीती आहे. रशियाने युध्द जिंकणे/हारणे, चीन आणि रशियन अर्थव्यवस्था याचा आपल्यावर नक्कीच परिणाम होणार आहे.
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 03/17/2022 - 05:53 नवीन
व्हॉल्डोमिर झेलेन्स्की यांनी स्पष्टपणे, युक्रेन नाटोचा भाग होणार नाही असे सांगितले. या आधी, फेब्रुवारी मध्ये, म्हणजेच रशियाच्या घुसखोरी आधी सुद्धा, जर्मनीचे चान्सलर शोल्झ यांनी युक्रेनचे नाटोमध्ये येणे कोणत्याही अजेंड्यामध्ये नाहीये असे सांगितले (हा अजेंडा म्हणजे नेहमीचा अजेंडा नव्हे, इथे अजेंडा म्हणजे भविष्यात करावयाच्या गोष्टी.). तिथेच, झेलेन्स्की म्हणले होते, नाटोचे सभासदत्व हे खूप लांबचे स्वप्न आहे. आणि ते काही युक्रेनच्या हातात नाही. इतके असताना पुतीन यांनी नाटो चा विस्तार हेच कारण देऊन घुसखोरी केली.
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 03/17/2022 - 05:55 नवीन
आणि, जर कारण नाटो चा विस्तार हे असेल, आणि आज झेलेन्स्की स्पष्टपणे म्हणत असतील, कि युक्रेन नाटोचा सदस्य होणार नाही, तेव्हा पुतीन ह्यांनी रशियाचे सैन्य माघारी घेणे का नाही सुरु केले ??
  • Log in or register to post comments
T
Trump गुरुवार, 03/17/2022 - 09:34 नवीन
आजच्या बातमीनुसार युक्रेनने तटस्थेचा प्रस्तावाला विरोध केला. खुप परस्पराविरोधी बातम्या आहेत. खर्‍या - खोट्या यांची शहानिशा करणे मुश्कील आहे. बहुतेक बातम्या प्रचार- आणि दबावतंत्राचा भाग वाटतात.
  • Log in or register to post comments
T
Trump गुरुवार, 03/17/2022 - 10:14 नवीन
ते एकच युध्दासाठी कारण नाही. माझ्या विश्लेषणानुसार.
  • नाटोमध्ये न जाताही / घेताही बर्‍याच गोष्टी करता येतात, उदा. पाकिस्तान, दक्षिण कोरीया, जापान इत्यादी. रशियाच्या सीमेवरील नाटो आणि अमेरीकन सैन्याचा वाढता प्रभावः उदा २०२१ चा युध्दसराव, वाढता लष्करी साहीत्य पुरवठा, प्रशिक्षण इत्यादी.
  • नाटो पुर्व युरोपमध्ये वाढणार नाही ह्या हमीला हरताळ फासण्याचा जो प्रकार होतोय त्याला कायमस्वरुपी पायबंद घालणे.
  • नाझीवाद आणि वंशवादः युक्रेनमध्ये नाझीवाद बर्‍यापैकी आहे. मी येथे दुवे दिले आहेत https://www.misalpav.com/comment/1134881#comment-1134881 आणि https://www.misalpav.com/comment/1134808#comment-1134808. पाशात्य माध्यमधुन युक्रेनमधील नाझीवादाची माहीती द्यायची बंद केली आहेत. जुनी माहीती अजुन आंतरजालावर उपलब्ध आहे.
  • क्रिमिया आणि डोन्बासः ह्या प्रदेशांना रशियाचा भाग किंवा रशियाच्या प्रभावाकडील भाग म्हणुन युक्रेनकडुन कायदेशीर मान्यता मिळवणे. एकदा हे झाले की त्यावर आधारीत निर्बंधाना काहीच अर्थ राहत नाही.
  • निशस्त्रीकरण: युक्रेनचे निशस्त्रीकरण करुन भविष्यातील धोके कमी करणे.
-- इतर फायदे
  • शस्त्रास्त्रांचे विपणणः युक्रेन युध्द म्हणणे शस्त्रास्त्रांच्या जाहीरातीसाठी उत्तम संधी आहे. रशियाचा या बाजारात वाटा कमी होत चालला आहे. त्यामुळे नवीन खरेदीदार मिळवण्यासाठी नक्कीच हे युध्द उपयोगी आहे. नाटो आणि अमेरीकन सुध्दा युध्दाकडे तीच संधी म्हणुन बघत आहेत.
  • युरोपियन प्रणित जगव्यवस्थेला धक्का: सोव्हीयत संघाच्या विसर्जनानंतर यूरोपियन(अमेरीका- आणि नाटो प्रणित) गट अनिर्बंध झाला आहे, त्याला पायबंध घालणे.
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 03/17/2022 - 11:41 नवीन
नाझींवाद हे कारण पटण्यासारखे नाही. नाझी असले तरी फ्रिन्ज घटक आहेत. ऍझोव बटालियन हि संपूर्ण नाझी आहे ही अंधश्रद्धा आहे. ऍझोव मधले काही नाझी असतील, पण इतर युक्रेनियन सैन्य नाझी नाही. युक्रेनच्या दोनी सर्वोच्च नेते ज्यू आहेत. युक्रेनच्या प्रमुख राबायने ज्यूंना युक्रेनमध्ये त्रास होत नाही असा निर्वाळा दिला आहे. माझया माहितीप्रमाणे तरी नाझी लोंकांनी करावे असे काही युक्रेनमध्ये घडले नाहीये. तसेच, युक्रेनमध्ये कायदेशीर किंवा सिस्टमिक पातळीवर नाझींवाद अस्तित्वात नाही. रशिया स्वतः होमोसेक्शुअल लोकांना शिक्षा करण्यासाठी, त्यांची मारधाड करण्यासाठी कुप्रसिद्ध आहे. खुद्द रशियाची त्याबाबत कायदेशीर भूमिका नाझींशी जुळणारी आहे.
  • Log in or register to post comments
T
Trump गुरुवार, 03/17/2022 - 12:28 नवीन
नाझींवाद हे कारण पटण्यासारखे नाही. नाझी असले तरी फ्रिन्ज घटक आहेत. ऍझोव बटालियन हि संपूर्ण नाझी आहे ही अंधश्रद्धा आहे. ऍझोव मधले काही नाझी असतील, पण इतर युक्रेनियन सैन्य नाझी नाही.
चुक. सध्यातरी नाझीवाद ही युरोपियन जगात खुप मोठी गोष्ट आहेत. तुम्ही एकाद्याला आई-बहिनीवरुन शिवी देऊ शकता, पण नाझी म्हणुन बोलु शकत नाही. नाझीवादचे समर्थन करणे किंवा कोणालाही पुराव्याशिवाय नाझी बोलणे हा गुन्हा आहे. त्यामुळे युरोपियन माध्यमे जेव्हा कोणालाही नाझी म्हणतात तेव्हा त्यांनी खुप खात्री केलेली असते असे समजा. संदर्भः https://www.dw.com/en/is-it-illegal-to-call-someone-a-nazi/a-42313527 https://en.wikipedia.org/wiki/Legality_of_Holocaust_denial https://www.coe.int/en/web/european-commission-against-racism-and-intolerance/legislation-to-combat-racism-and-racial-discrimination
युक्रेनच्या दोनी सर्वोच्च नेते ज्यू आहेत. युक्रेनच्या प्रमुख राबायने ज्यूंना युक्रेनमध्ये त्रास होत नाही असा निर्वाळा दिला आहे. माझया माहितीप्रमाणे तरी नाझी लोंकांनी करावे असे काही युक्रेनमध्ये घडले नाहीये.
नाझी लोक फक्त ज्युविरोधी होते असे जे चित्र आहे ते चुकीचे आहे. त्यांना स्लाव्ह वंशीय (बहुतांशी रशियन आणि पुर्व युरोपियन) यांच्याबद्दलही खुप द्वेष होता. माझ्या माहीतीप्रमाणे सध्या नाझीलोकांना ज्यु लोकाविषयी फारश्या समस्या (किंवा द्वेष) नाही आहे, बहुतेक द्वेष अगोरे आणि अयुरोपियन लोकाविषयी आहे. श्री पुतीन यांना युक्रेनमध्ये वाढणार्‍या रशियन लोकांविरुध्दच्या द्वेष (ज्युद्वेष नव्हे) महत्वाचा असेल. दुसर्‍या महायुध्दात युक्रेनियन आणि नाझी जर्मनी याच्यात (कमीत कमी सुरवातीला) चांगले संबध होते. संदर्भः https://military-history.fandom.com/wiki/Ukrainian_collaborationism_with_the_Axis_powers https://www.thepress.purdue.edu/titles/unlikely-allies-nazi-german-and-ukrainian-nationalist-collaboration-general-government-during https://www.timesofisrael.com/hundreds-of-ukrainian-nationalists-march-in-in-honor-of-nazi-collaborator/ -- अजुन थोडा वेगळा इतिहास. ज्यु (आणि काळे, अरब, भारतीय इ.) पण नाझी जर्मनीच्या बाजुने लढले. संदर्भः https://www.tabletmag.com/sections/arts-letters/articles/ellen-feldman-nazi-germany https://www.publishersweekly.com/978-0-7006-1178-2 https://rowman.com/ISBN/9780761871491/Strangers-in-a-Stranger-Land-How-One-Country%27s-Jews-Fought-an-Unwinnable-War-alongside-Nazi-Troops%E2%80%A6-and-Survived https://www.irishtimes.com/news/historian-claims-hitler-personally-approved-officers-of-jewish-descent-to-fight-for-nazis-1.58495
तसेच, युक्रेनमध्ये कायदेशीर किंवा सिस्टमिक पातळीवर नाझींवाद अस्तित्वात नाही.
मी दिलेल्या दुव्यामध्ये ह्याचा प्रतिवाद आहे. सरकारी मंत्री कसे अझॉव आणि युक्रेनियन सैन्याचे कसे संबध आहेत ह्यावर प्रकाश टाकता आहेत. संदर्भः https://www.nbcnews.com/think/opinion/ukraine-has-nazi-problem-vladimir-putin-s-denazification-claim-war-ncna1290946 ------------------------
रशिया स्वतः होमोसेक्शुअल लोकांना शिक्षा करण्यासाठी, त्यांची मारधाड करण्यासाठी कुप्रसिद्ध आहे. खुद्द रशियाची त्याबाबत कायदेशीर भूमिका नाझींशी जुळणारी आहे.
खरे तर याचा येथे काहीच संबध नाही, पण माझ्या स्वत: अनुभवानुसार LGBTQ ला काही अडचण नाही. त्यांची स्वता:चे क्लब आहेत. फक्त उघड उघडपणे प्रचारकरायला बंदी आहे. बाकी येथे तुम्ही Ad Hominem सुरु केले आहे. :)
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 03/17/2022 - 14:13 नवीन
युक्रेनमध्ये नाझी आहेत हे कबुलच आहे की, कधी नाकबूल केले ? ते फ्रिन्ज आहेत हेही खरेच. तुम्ही दिलेला दुवा काय म्हणतो बघा,
1.labeling enemies Nazis is a common political ploy in Russia, especially from a leader who favors disinformation campaigns and wants to stir up feelings of national vengeance against a WWII foe to justify conquest. 2.There is also no evidence of recent mass killings or ethnic purges taking place in Ukraine. 3.Putin’s destructive actions — among them the devastation of Jewish communities — make clear that he’s lying when he says his goal is to ensure anyone’s welfare.
शेवटचे (३) मी ठळक केलेले वाक्य तुम्ही मत म्हणून दुर्लक्ष करू शकता. मात्र मुद्दा दोन दुर्लक्षित करू नका. दुसऱ्याच्या देशात घुसायसाठी नाझी शिक्केवाले कपडे घातलेले काही लोक आहेत इतके असून चालत नाही. मुळात नाझींना ज्यूनबरोबर काही प्रॉब्लेम नाही ही अतर्क्य गोष्ट सोडली, तरी स्लाव्हिक वंशाच्या लोकांना मारण्याचे राजसत्तेचा वरदहस्त असलेले प्रयत्न युक्रेनमध्ये मुक्ते झाल्याचे माझया तरी वाचनात नाही. नव्हे, तसे करायचे कुठे बोलणे सुद्धा नाही. आणि, नुकत्याच झालेल्या कॅनडा ट्रकर्सच्या आंदोलनात सुद्धा काही लोक नाझी झेंडा फडकवत होते. नाझी युक्रेनमध्येच आहेत असे नाहीत. अमेरिकेत सुद्धा काही आहेत. भारतात सुद्धा काही नाझी सिम्पथी वाले लोक असणारच. तर मुद्दा हा- नाझी सर्वव्यापी आहेत. नाझींच्या दुष्कृत्यांना सरकारी वरदहस्त आहे का हे पाहणे महत्वाचे. माझ्या माहितीप्रमाणे युक्रेनमध्ये नाझी दुष्कृत्य असे सध्याच्या काळात काही झालेच नाहीये. त्यामुळे अचानक रशिया नाझींविरुद्ध मोहीम उघडेल हे अतार्किक आहे. बरं, नाझी असणे हा काही मानवी हक्कांना तुडवण्याचा एकमेव प्रकार नाही. पत्रकार, राजकीय विरोधकांना टपकावणे इत्यादी.
पण माझ्या स्वत: अनुभवानुसार LGBTQ ला काही अडचण नाही.
https://en.m.wikipedia.org/wiki/Anti-gay_purges_in_Chechnya धरपकड, टॉर्चर- ३ जण मेले.
फक्त उघड उघडपणे प्रचारकरायला बंदी आहे.
येस- हा झाला कायद्याने दिला जाणारा त्रास. फ्रिन्ज नाही, उघड आणि मेनस्ट्रीम.
सध्यातरी नाझीवाद ही युरोपियन जगात खुप मोठी गोष्ट आहेत. तुम्ही एकाद्याला आई-बहिनीवरुन शिवी देऊ शकता, पण नाझी म्हणुन बोलु शकत नाही. नाझीवादचे समर्थन करणे किंवा कोणालाही पुराव्याशिवाय नाझी बोलणे हा गुन्हा आहे. त्यामुळे युरोपियन माध्यमे जेव्हा कोणालाही नाझी म्हणतात तेव्हा त्यांनी खुप खात्री केलेली असते असे समजा.
नाझींबद्दल सर्वात संवेदनशील असणाऱ्या देशाची एम्बसी काय म्हणते- “What Russia is doing in Ukraine is slaughtering innocent children, women and men for its own gain. “It's definitely not ‘fighting Nazism.’ Shame on anyone who's falling for this. (Sadly, we're kinda experts on Nazism),”
बाकी येथे तुम्ही Ad Hominem सुरु केले आहे. :)
रशिया LGBT लोकांशी कशी वागते हा माझा मुद्दा माझ्या आर्ग्युमेंटचा केंद्रबिंदू नाहीये. तो आहे की युक्रेनमधील नाझी फ्रिन्ज आहेत. हा मुद्दा एक पुरवणी माहिती आहे. जर, युक्रेनमध्ये लोकांना नाझींपासून खरेच धोका असता तर रशिया ने स्वतःच्या लोकांबरोबर कसेही वागले असते तरी तो मुद्दा झाला नसता, रशियाने केले ते योग्यच वाटले असते. मात्र, तसे नाही. युक्रेनमध्ये फ्रिन्ज नाझींकडून नुकतीच कोणतीही जेनोसाईड किंवा हत्याकांड टाईप कृती झाली नाहीये.
  • Log in or register to post comments
T
Trump गुरुवार, 03/17/2022 - 14:46 नवीन
युक्रेनमध्ये नाझी आहेत हे कबुलच आहे की, कधी नाकबूल केले ? ते फ्रिन्ज आहेत हेही खरेच.
अमान्य. मी आधी दिलेले दुवे पुरेसे आहेत सिध्द करायला. जेव्हा कोणतेही सरकार अझॉव्ह सारख्या संघटनेला सैन्यात येउ देते हा प्रकार खुप मोठा आहे.
मुळात नाझींना ज्यूनबरोबर काही प्रॉब्लेम नाही ही अतर्क्य गोष्ट सोडली, तरी स्लाव्हिक वंशाच्या लोकांना मारण्याचे राजसत्तेचा वरदहस्त असलेले प्रयत्न युक्रेनमध्ये मुक्ते झाल्याचे माझया तरी वाचनात नाही. नव्हे, तसे करायचे कुठे बोलणे सुद्धा नाही.
तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी गोरा/युरोपियन वंशवाद, अतिकट्टर राष्ट्र्वाद, तात्कालिन स्थानिक राजकारण, आंतरराष्टीय राजकारण, तात्कालिन शत्रु/मित्र आणि दुरगामी शत्रु/ मित्र, तात्कालिन/दुरगामी उद्दीठे ह्यावर अझॉव सारख्या कोणाला कधी आणि किती दिवस बरोबर घ्यायचे आणि कोणाबरोबर लढ्यायचे ते ठरवतात. अगदी नाझी जर्मनीने सोव्हीयत रशियाबरोबर विना आक्रमणाचा करार केला होताच की. जर तुमचा अजुन थोडा अभ्यास असेल तर श्री हिटलर यांची फ्रेंच, ब्रिटीश आणि अमेरीकन लोकांना शेवटच्या दिवसातील युध्दबंदीसाठीची आर्जवे त्यांच्या भाषणातुन आणि सरकारी संभाषणातुन दिसतील. अजुन थोडी गंमतः ककक आता आफ्रिकन आणि ज्यु लोकांबरोबर समझोता करते आणि त्यांना बोलावते. संदर्भः https://www.tabletmag.com/sections/news/articles/ku-klux-klan-chapter-now-accepting-jews https://www.jpost.com/diaspora/antisemitism/when-a-jew-became-an-honorary-member-of-the-ku-klux-klan-567312
आणि, नुकत्याच झालेल्या कॅनडा ट्रकर्सच्या आंदोलनात सुद्धा काही लोक नाझी झेंडा फडकवत होते. नाझी युक्रेनमध्येच आहेत असे नाहीत. अमेरिकेत सुद्धा काही आहेत. भारतात सुद्धा काही नाझी सिम्पथी वाले लोक असणारच. तर मुद्दा हा- नाझी सर्वव्यापी आहेत. नाझींच्या दुष्कृत्यांना सरकारी वरदहस्त आहे का हे पाहणे महत्वाचे.
झेंडे फडकवणे, आणि शस्त्रास्त्रे हाती घेणे ह्यात बराच फरक आहे. झेंडे फडकवणे, घोषणा देणे हे बरेचदा लक्ष देण्यासाठी वापरले जाते.
माझ्या माहितीप्रमाणे युक्रेनमध्ये नाझी दुष्कृत्य असे सध्याच्या काळात काही झालेच नाहीये. त्यामुळे अचानक रशिया नाझींविरुद्ध मोहीम उघडेल हे अतार्किक आहे.
हो, त्यासाठीच युध्द्दाची बाकीची कारणे ही दिली आहेत मी माझ्या प्रतिसादामध्ये. https://www.misalpav.com/comment/1136384#comment-1136384
बरं, नाझी असणे हा काही मानवी हक्कांना तुडवण्याचा एकमेव प्रकार नाही. पत्रकार, राजकीय विरोधकांना टपकावणे इत्यादी.
नक्की तुमचा मुद्दा काय आहे? रशिया - युक्रेन युध्द कि मानवी हक्क?
येस- हा झाला कायद्याने दिला जाणारा त्रास. फ्रिन्ज नाही, उघड आणि मेनस्ट्रीम.
माझ्या माहीतीने कायदेशीर त्रास कोणताही नाही. जर एकाद दुसर्‍या घनचक्कर घटना हव्या असतील त्या नक्कीच मिळु शकतील. बाकी चेचन्या हा बहुतांशी मुस्लीमबहुल प्रांत आहेत आणि मुख्य रशियन प्रवाहापेक्षा वेगळा आहे.. तिथे रशियन सरकारने सत्तेमध्ये राहण्यासाठी काही समझोते केले आहेत.
नाझींबद्दल सर्वात संवेदनशील असणाऱ्या देशाची एम्बसी काय म्हणते- “What Russia is doing in Ukraine is slaughtering innocent children, women and men for its own gain. “It's definitely not ‘fighting Nazism.’ Shame on anyone who's falling for this. (Sadly, we're kinda experts on Nazism),”
मी ह्यावर (२५ फेब २०२२ नंतरच्या साहित्यावर) प्रतिक्रिया काही देणार नाही. युरोपियन माध्यमांनी युक्रेनच्या बाजुने सगळा प्रचार उघडला आहे. त्याआधीचे काही साहित्य असेल तर लिहा.
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 03/17/2022 - 15:02 नवीन
बरं.
  • Log in or register to post comments
T
Trump Fri, 06/17/2022 - 08:10 नवीन
श्री कॉमी, हे घ्या. Ukrainian Boxer Holds Nazi Flag While Accepting Medal
  • Log in or register to post comments
प
प्रदीप गुरुवार, 03/17/2022 - 07:59 नवीन
ह्यांना वेड लागायच्या मार्गावर आहे, अशी भाकिते येथे वाचली होती. तर, आता तसे ते लागले किंवा कसे, ह्याविषयी पुढची 'माहिती/अंदाज' यावेत. लई दिवस झाले ते विनोदी भाकित वाचून.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Fri, 03/18/2022 - 08:22 नवीन

I love the Russian people. That is why I have to tell you the truth. Please watch and share. pic.twitter.com/6gyVRhgpFV

— Arnold (@Schwarzenegger) March 17, 2022
  • Log in or register to post comments
T
Trump Fri, 03/18/2022 - 22:56 नवीन
जागतिक परदेशी गंगाजळी साठी सध्या अमेरीकन डॉलर मोठ्या प्रमाणात वापरला जातो. तो अमेरीकन प्रभुत्वाला आणि अर्थव्यवस्थेला मुळ आधार देतो. ज्या पध्दतीने अमेरीकन आणि खंडीय युरोपियन देशांनी त्यांच्या चलनामधील परदेशी गंगाजळी वापरायला बंदी केली आहे, त्यामुळे इतर देशांमध्ये एक प्रकारची अस्वस्थता आहे. ह्या युध्द्दामुळे काही बदल अपेक्षित आहेत. १. भारत - रशिया व्यापार आता रुपये - रुबल मध्ये होणार. २. सौदी अरेबिया चीनबरोबर २५ टक्के तेलव्यापार आता चायनीज रेनमिन्बी (Renminbi) मध्ये होणार. ३. श्री निक्सन आणि श्री किसींनजर यांनी पेट्रोडॉलर तयार करुन इतर देशांना जे बटीक बनवले आहे ते काही प्रमाणात कमी होणार. संदर्भः https://www.moneycontrol.com/news/business/explained-why-the-rupee-ruble-mechanism-needs-to-be-handled-with-care-8220871.html/amp https://www.fortuneindia.com/amp/story/macro%2Frussia-ukraine-war-triggers-war-against-dollar%2F107471 https://www.aljazeera.com/economy/2022/3/15/yuan-jumps-after-report-saudis-consider-its-use-in-oil-deals पेट्रोडॉलर इतिहासः https://www.financialsense.com/contributors/jerry-robinson/the-rise-of-the-petrodollar-system-dollars-for-oil
  • Log in or register to post comments
T
Trump Fri, 03/25/2022 - 06:26 नवीन
पेट्रोरुबल: रशियाकडुन तेल किंवा वायु जर विकत घ्यायचा असेल तर रशियाला रुबलमध्येच पैसे द्यावे लागतील. ह्यचा परीणाम रशियावर टाकलेल्या बंधनांवर होणार. ते रुबल मिळवण्यासाठी पाशात्य देशांना रशियाबरोबर व्यापार करावाच लागेल. असे जर झाले तर भारतासाठी चांगले असेल. संदर्भः https://qz.com/2146333/russia-wants-the-west-to-pay-for-oil-and-gas-in-rubles/ https://www.dw.com/en/putin-unfriendly-states-to-pay-for-russian-gas-in-rubles/a-61234904
  • Log in or register to post comments
T
Trump Sun, 06/19/2022 - 21:49 नवीन
पाशात्य माध्यमांचा जरी युध्दज्वर जरी कमी होत असला आणि आधीचा युक्रेन जिंकत असल्याचे भासवणे सोडुन आता सत्य परिस्थिती सांगणे सुरु केले आहे. तरी इंग्रजी व युरोपियन भाषांमध्ये अजुनही प्रचार चालु आहे. हे दोन साधने उत्तम माहिती देत आहेत. https://www.youtube.com/c/AlexanderMercourisReal ------------ https://www.youtube.com/c/TheNewAtlas/videos
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Sun, 07/03/2022 - 19:42 नवीन
युद्ध चालू आहे की संपलं?
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Tue, 08/23/2022 - 19:08 नवीन
युद्ध चालू आहे की संपलं?
मलाही हाच प्रश्न पडला आहे. बहुतेक संपल असावं. सुर्यफुलाच्या तेलाचे भाव जवळजवळ युद्धाआधीच्या पातळीवर आले आहेत. किंवा टैमप्लीज चालू असेल.
  • Log in or register to post comments
T
Trump Mon, 08/22/2022 - 09:19 नवीन
रशियन विचारवंत श्री अलेक्झांडर दुगिन यांची मुलगी श्री दर्या दुगिना यांची हत्या एका कार बॉम्बस्फोटात केली गेली. ह्या युध्दात प्रथमच मी नागरी (बिनलष्करी) लोकांच्या कुटुंबियावर हल्ला होण्याची अशी बातमी ऐकतो आहे. सगळीकडे येणार्‍या बातम्यानुसार ह्यात युक्रेन आणि कदाचित अमेरिकेचा हात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ह्या चित्रफितीखालील प्रतिक्रियासुध्दा वाचणीय आहेत.
  • Log in or register to post comments
T
Trump Wed, 09/21/2022 - 19:52 नवीन
श्री पुतीन यांनी राखीव (निवृत्त) सैन्य बोलावले आहे. सरकारी आकड्याप्रमाणे पुढील ३ महिन्यात साधारत: तीन लाख नवीन सैनिक युध्दात सामील होतील. तसेच त्यांनी युक्रेनच्या डोंबास आणि डोनेस्क प्रांतामध्ये सार्वमत घेऊन त्यांना रशियामध्ये सामील करण्याचा निर्णय घेतला आहे. ह्यामुळे युध्दपरिक्षेत्र वाढणार आहे. -- अजुन एकः परदेशी लोक आता फक्त एक वर्ष रशियन सैन्यात सेवा देऊन रशियन नागरीक होण्याची संधी आहे. पुर्वी हीच अट पाच वर्षे सेवेची होती.
  • Log in or register to post comments
स
सनईचौघडा गुरुवार, 09/22/2022 - 05:40 नवीन
सध्या २ महिने झाले साहाना ताई गायब झाल्यात. त्या आल्या की युद्धाची नवीन खात्रीशीर बातमी त्या देतील.
  • Log in or register to post comments
T
Trump Sun, 10/02/2022 - 10:44 नवीन
३०.०९.२०२२ रोजी श्री पुतीन यांनी चार युक्रेनियन प्रांत लुशांक, डोनेस्क, झापोरिझझिआ आणि खेरसॉन ( Luhansk, Donetsk, Zaporizhzhia and Kherson) रशियामध्ये सामिल केले. जर्मनीला रशियन नैसर्गिक वायुचा पुरवठा करणारी उत्तर नळी - २ (घातपाताने?) निकामी करण्यात आली आहे. https://en.wikipedia.org/wiki/2022_Nord_Stream_gas_leaks
  • Log in or register to post comments
T
Trump Sun, 10/02/2022 - 11:34 नवीन
अमेरीका आणि अल्बेनिया यांनी रशियाच्या युक्रेनियन प्रांतजोडणीला विरोध करण्यासाठी संयुक्त राष्ट्रात ठराव आणला, त्याला रशियाने नकाराधिकार वापरला. भारत, चीन, ब्राझिल आणि गेबॉन यांनी तटस्थता दाखवली. चीनची तटस्थता समजण्यासारखी आहे. पण भारताने दाखवलेली तटस्थता बुचकळ्यात पाडणारी आहे. जे रशियाने युक्रेनमध्ये केले ते पाकिस्तान गिल्गिट बाल्टिस्थान आणि व्याप्त काश्मिरमध्ये, चीन आक्साई चीनमध्ये, चीन तैवानमध्ये करु शकतो. त्यामुळे तटस्थ राहुन भारताचा कोणता फायदा होणार आहे? कृपया तज्ञांनी ह्यावर प्रकाश टाकावा. https://news.un.org/en/story/2022/09/1129102
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Mon, 10/03/2022 - 09:38 नवीन
अमेरिकेने मीडियाचा वापर करून एक प्यादा युक्रेनच्या गादीवर बसविला. युक्रेन युद्ध अमेरिकेची शस्त्र परीक्षण प्रयोगशाळा आहे. युद्धात युरोप आणि रशियाचे आर्थिक नुकसान होणार. अमेरिकेचा सर्व दृष्टीने फायदा होणार. डॉलर मजबूत होईल. शस्त्र विक्री वाढेल. अमेरिकन अर्थव्यवस्थेला फायदा होईल. महाग तेलाचा फटका भारत सहित सर्व आयातक देशांना बसेल. युक्रेन ने ही पूर्वी अंतराष्ट्रिय मंचावर भारताचे समर्थन केलेले नाही. दुसरीकडे भारताला तेलाची गरज आहे. रशिया स्वस्त तेल देऊ शकते. भारत तटस्थ राहून आपली शक्ती दाखवू शकतो. यामुळे चीन बॉर्डर वर शांतता ही राहील. या शिवाय मध्यस्थीसाठी भारताचा वापर होऊ शकतो.
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Mon, 10/03/2022 - 09:38 नवीन
अमेरिकेने मीडियाचा वापर करून एक प्यादा युक्रेनच्या गादीवर बसविला. युक्रेन युद्ध अमेरिकेची शस्त्र परीक्षण प्रयोगशाळा आहे. युद्धात युरोप आणि रशियाचे आर्थिक नुकसान होणार. अमेरिकेचा सर्व दृष्टीने फायदा होणार. डॉलर मजबूत होईल. शस्त्र विक्री वाढेल. अमेरिकन अर्थव्यवस्थेला फायदा होईल. महाग तेलाचा फटका भारत सहित सर्व आयातक देशांना बसेल. युक्रेन ने ही पूर्वी अंतराष्ट्रिय मंचावर भारताचे समर्थन केलेले नाही. दुसरीकडे भारताला तेलाची गरज आहे. रशिया स्वस्त तेल देऊ शकते. भारत तटस्थ राहून आपली शक्ती दाखवू शकतो. यामुळे चीन बॉर्डर वर शांतता ही राहील. या शिवाय मध्यस्थीसाठी भारताचा वापर होऊ शकतो.
  • Log in or register to post comments
T
Trump Mon, 10/03/2022 - 20:42 नवीन
रशिया आणि युक्रेन युध्दाचा रोज बदलणारा नकाशा (नोंदः हे संकेतस्थळ युक्रेनधार्जीने आहे.) https://liveuamap.com/

And Russian Telegram channels already claiming, that Ukrainian army attempted to assault Kreminna from Terny village, north to Torske pic.twitter.com/cwMWMqqPqH

— Liveuamap (@Liveuamap) October 2, 2022
  • Log in or register to post comments
T
Trump Sun, 11/27/2022 - 19:30 नवीन
ह्या नोव्हेंबरमध्ये खरे युध्द सुरु झाले आहे. रशियाने वीजप्रणाली जवळपास नष्ट केली. गोर्‍यांनी (युरोपियन आणि त्यांच्या वंशवेली) यांनी मानवी हक्काची रडारडी सुरु केली आहे. त्यांच्या नाटोने १९९९ मध्ये तेच केले होते. त्यामुळे त्यांचा दांभिकपणा उघड होतो आहे. NATO Warplanes Jolt Yugoslav Power Grid https://www.washingtonpost.com/wp-srv/inatl/longterm/balkans/stories/belgrade052599.htm - गोर्‍यांना मानवी हक्क आणि लोकशाही यांची काहीही पडलेली नाही. त्यांचा मुळ हेतु त्यांचे जगावरील प्रभुत्व कायम ठेवणे हे आहे. It’s Costing Peanuts for the US to Defeat Russia https://cepa.org/article/its-costing-peanuts-for-the-us-to-defeat-russia/ -- रशिया ह्या युध्दात जिंकणे अगोर्‍यासाठी महत्वाचे आहे.
  • Log in or register to post comments
T
Trump Wed, 12/14/2022 - 16:43 नवीन
अतीशय उत्तम मुलाखत : श्री डग्लस मॅकग्रेगोर. - पाश्यात्य माध्यमांचा प्रचार, रशियाची योजना इ. बद्दल चांगली माहिती आहे.
  • Log in or register to post comments
T
Trump Sat, 06/24/2023 - 14:55 नवीन
वॅगणार समुहाचे प्रमुख श्री इव्हेजेनी प्रोगजीन (evgueni prigojine) यांनी रशियामध्ये बंड केल्याचे बातम्यामध्ये आले आहे. आरटी समुहावर ह्यावर अधिकृत बातमी आली आहे. श्री पुतीन यांनी रात्री राष्ट्राला संबोधित करुन एकीचे आवाहन केले. वॅगणार समुहाचे सैनिकांनी ऱोस्टोव - वो - दोन (Rostov-on-Don) ह्या शहरावर कब्जा केला आहे. वॅगणार समुहात साधारणतः ३० हजार सैनिक आहेत. त्यातील बरेच सैनिक शिक्षामाफी दिलेले/द्यायचे आश्वासन कैदी दिलेले आहेत. त्यातील किती सैनिक श्री इव्हेजेनी प्रोगजीन यांना निष्ठावंत राहतील त्याबद्दल शंका आहे.
  • Log in or register to post comments
T
Trump Sat, 06/24/2023 - 18:49 नवीन
रशियामध्ये खुपच दणकादणकी चालु आहे. श्री पुतीन त्यांच्या भाषणात खुपच चिडलेले दिसले. हे केलेले बंड श्री पुतीन कसे व किती दिवसात संपवतात त्यावर श्री पुतिन यांचे भवितव्य, करिश्मा, आणि पुढील वाटचाल अवलंबुन आहे. श्री इव्हेजेनी प्रोगजीन यांना कोणत्याही प्रकारची मदत किंवा समर्थन मिळताना दिसत नाही. मला तरी श्री इव्हेजेनी प्रोगजीन यांचे भवितव्य संपल्यात जमा दिसते आहे. पाश्यात्य जगात आंनदाच्या उकळ्या जोरात फुटत आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 9 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 9 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 9 hours ago
  • सुंदर !!
    1 day 9 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 9 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा