Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

युक्रेन - रशिया - युद्धाची मीमांसा !

स
साहना
गुरुवार, 03/03/2022 - 10:32
🗣 154 प्रतिसाद
strong do what they can, weak suffer what they must. युद्ध म्हटले कि प्रचारतंत्र हे आलेच. युक्रेनियन-रशियन युद्धांत युक्रेनियन सैन्याने किमान प्रचार तंत्रांत रशियाला संपूर्ण हरवले आहे. मिम्स, बंदूक घेतलेली म्हातारी आजीबाई, बिटकॉइन डोनेशन, UN, EU मधील जबरदस्त भाषणे. अत्यंत वक्तृत्वशाली तेजस्वी राष्ट्राध्यक्ष, ट्विटर, फेसबुक इत्यादींवर असंख्य चित्रे, विनोद, मोडलेले रशियन रणगाडे, घोस्ट ऑफ कीव सारखी मिथके, आईला फोन करून रडणारे रशियन युद्धकैदी, रशियन सैन्याने गोळी घालून मारलेले कुत्रे, निर्वासितांबरोबर जाणारे कुत्रे इत्यादी इत्यादी. अवांतर : तुम्हाला बाकीचा लेख वाचायचा नसेल तरी चालेल पण खालील शब्द कुणाचे आहेत ते प्रतिक्रिया देऊन सांगा. नंतर गुगल करा. ठाऊक असेल तर स्पॉईलर नको. We need to use the United Nations Security Council and believe that preserving law and order in today’s complex and turbulent world is one of the few ways to keep international relations from sliding into chaos. The law is still the law, and we must follow it whether we like it or not. अवांतर संपले. पण प्रत्यक्षांत रशियाने आक्रमणाची घोषणा करताच रशियाच हे युद्ध जिंकणार ह्यावर सर्वानीच (मी सुद्धा) पैसे लावले होते. पण युक्रेनियन प्रचारतंत्र इतके प्रभावी सिद्ध झाले कि कदाचित युक्रेनियन जिंकत आहेत अशी खोटी अशा युरोप इत्यादी देशांत निर्माण झाली. पण जसा जसा वेळ जाईल तसा तसा ह्या लोकांचा अपेक्षा भंग होत जाईल. रशियन आक्रमण हे अपेक्षेपेक्षा कमी कार्यक्षम होते आणि रशियन सैन्य बऱ्यापैकी ढिसाळ आहे हे निर्विवाद सत्य असले तरी शेवटी युद्ध म्हटले कि अश्या चुका दोन्ही बाजूकडून होतातच. उदाहरण म्हणजे रशियाने सीमेवर सैन्य जमवले होते हे सर्वानाच ठाऊक होते, युक्रेन ला तर ठाऊक असायलाच पाहिजे त्यामुळे निव्वळ इन्शुरन्स म्हणून तरी युक्रेन ने युद्धाची तयारी करून ठेवायला पाहिजे होती. ती त्यांनी केली नाही ह्यांतून युक्रेनी नेतृत्वाचा ढिसाळपणा दिसून येतो पण प्रचारतंत्रांत त्यावर कोणी बोट दाखवत नाही. युक्रेन ने जबरदस्तीने आपल्या पुरुषांना सैन्यात भरती केले आहे. त्यामुळे अनेक युक्रेनी बायका आणि मुले विना बाप पोलंड, मालदोवा मध्ये निर्वासित म्हणून जात आहेत. ज्यांना अजिबात सैनिकी प्रशिक्षण नाही अश्या व्यक्ती अर्ध प्रशिक्षित सुद्धा असलेल्या रशियन सैन्यापुढे जास्त टिकाव धरू शकणार नाहीत. त्यामुळे असंख्य लोक ह्यांत मरणार आहेत. नैतिक दृष्ट्या हि हत्या शेवटी युक्रेनी नेतृत्वावरच आहे. पण प्रचारतंत्रांत फक्त रशियन सैन्यांत जबरदस्तीने घुसवल्या गेलेल्या सैनिकांचाच विषय काढला जातो. कारगिल युद्धात फक्त बळींची संख्या पहिली तरी भारतीय सैन्य अक्षरशः कापले गेले असे कुणी म्हणू शकतो. किंवा काही इंटेलिजन्स चुकीमुळे कोट्यवधी पैसे आणि शेकडो सैनिकांचा बळी गेला असे म्हणू शकतो. पण शेवटी निव्वळ चिकाटीच्या जोरावर भारतीय सैन्य जिंकले. एका अमेरिकन वार्ताहराने परवेज मुशर्रफ ह्यांना खाजगीत विचारले कि नक्की काय म्हणून तुम्ही कारगिल युद्ध केले. मुशर्रफ ह्यांनी उत्तर दिले कि कारगिल युध्दांत सर्व गोष्टी पाकिस्तानला हव्या होत्या तश्याच होत होत्या. पाकिस्तान साठी हा मास्टर स्ट्रोक होता. पण फक्त एक अंदाज चुकला. पाकिस्तान चा अंदाज होता कि शेकडो भारतीय सैनिकांची मृत शरीरे तिरंग्यात लपेटून परत देशभर जातील तेंव्हा हे युद्ध बंद करावे म्हणून भारतीय समाजच बोंब मारेल आणि त्याचा फायदा घेऊन आम्ही वाटाघाटीत भारताला हरवू. पण कितीही सैनिक मरत राहिले तरी भारतीय समाज एकजूट राहिला, भारतीय राजकारणी मंडळींवर त्याचा विपरीत परिणाम पडला नाही आणि भारत शेवटी निर्विवाद पणे युद्ध जिंकला. थोडक्यांत काय तर कागदावरील बळीची संख्या पाहून युद्धाचा शेवट ठरत नाही. प्रचार तंत्र हे क्रिकेट कमेंटरी प्रमाणे वाटले तरी फॉग ऑफ वॉर म्हणजे युद्धाचे धुके इतके गडद असते कि अतिशय चांगले विद्वान आणि प्रामाणिक माणूस सुद्धा आपली दिशाभूल करवून घेऊ शकतो. त्यामुळे युद्धाचा निकाल शेवटी पूर्णतः वेगळा असू शकतो. सध्याच्या रशियन-युक्रेनियन युद्धांत रशिया बऱ्यापैकी प्रगती करत आहे. ती अपेक्षेपेक्षा कमी असली तरी त्याचा रशियाला फरक पडत नाही. प्रत्येक युक्रेनी सैनिकांनी १० रशियन सैनिकांना मारले तरी युद्धाचा निकाल बदलत नाही. पण सॅन झू ह्या चिनी युद्धविशारदाने लिहिल्या प्रमाणे मोठ्या शत्रूला कोंडीत पकडणे सुद्धा धोक्याचे असू शकते. समजा युक्रेन मध्ये खरोखरच पुतीन हे कोंडीत सापडले आहेत, समजा खरोखरच त्यांच्या सैन्याला जबरदस्त मर खावा लागला असून त्यांना आता कुठली तरी वेगळी स्ट्रॅटेजी निर्माण करावी लागत आहे तर ह्यांत खुश होण्यापेक्षा युरोप आणि युक्रेन ला धोकाच जास्त आहे कारण अश्या स्थितीत पुतीन कुठलाही पराकोटीचा निर्णय घेऊ शकतात. रशियाचा प्रथम हेतू २४ तासांत किंवा वर कब्जा आणि झेलेन्स्की ह्यांचे पलायन, ७२ तासांत आपला राष्ट्राध्यक्ष क्यिव मध्ये स्थापन आणि त्यानंतर देशांतून माघार असा होता असे अनेक अमेरिकन तज्ज्ञांनी लिहिले. युक्रेनी पराक्रमाने हा शक्य नाही झाला. तर आता हेतू युक्रेनी शहरे पूर्णतः जमीनदोस्त करणे हा आहे असे सांगितले जाते. नक्की काय हेतू आहे हे आम्हाला ठाऊक नसले तरी आता असंख्य प्रमाणात लोक मारले जातील हे मात्र १००% सत्य आहे. युद्धाची कारणे कुणाची बाजू बरोबर कुणाची चुकीची ह्यावर बराच उहापोह केला जातो. त्यांत अनेक लोकांचा रशिया द्वेष, अमेरिका द्वेष, पूर्व विरुद्ध पश्चिम, लोकशाही विरुद्ध अलोकशाही, भारतीय मित्र विरुद्ध भारतीय विरोधक अश्या विविध भूमिकांची सरमिसळ झाल्याने वस्तुनिष्ठता राहणे कठीण जाते. नैतिकता आणि युद्धतंत्र ह्यांचा संबंध आपल्यासारखे सामान्य लोक लावत बसले किंवा प्रचार तंत्रांत त्यांचा प्रभावी वापर केला गेला तरी शेवटी त्यांचा संबंध नाही. यज्ञात बळी बोकडाचा जातो सिंहाचा नाही. त्याच न्यायाने युद्धतंत्रांत बलाढ्य असतो तो जिंकतो. सत्यमेव जयते सारख्या तत्त्वांत तथ्य आहे. लॉन्ग टर्म म्हणजे दूरगामी दृष्टीने चांगली तत्वे विजयी आणि वाढत जातात. पण त्याच वेळी शॉर्ट टर्म मध्ये ज्याच्या हाती लाठी त्याची म्हशी ! जगाचा पालनकर्ता विष्णू सामान्य स्थितींत सर्पावर झोपून असतो. सर्पाला फक्त जवळचे दिसते. पण काही निर्णय घ्यायचे असल्यास किंवा युद्धावर जायचे असल्यास विष्णू गरुडावर बसतात कारण गरुडाला दूरचे दिसते. २०२२ मधील युक्रेन-रशिया युद्ध हे काही अर्थाने खूपच वेगळे आहे. पाहिली गोष्ट म्हणजे क्रिमिया किंवा जॉर्जिया इथे चकमकी झाल्या असल्या तरी त्यांची व्याप्ती कमी होती. सीरिया इराक मध्ये युद्धे झाली तरी आधीच हे देश गरीब आणि कुणाला यांचे विशेष पडून गेले नसल्याने कुणालाच त्यांचे काय होते त्यांत रस नव्हता. पण युक्रेन युद्ध हे सोशल मीडिया द्वारे सर्वत्र दाखवले जात आहे. विविध युरोपिअन लोकांनी व्यक्त केलेल्या प्रतिकीर्या होत्या कि युक्रेन चे निर्वासीत म्हणजे इराक अफगाणिस्तान सारखे मागासलेले देश नसून आपल्यासारखे गोरे आणि आणि सुसंस्कृत आहेत. त्यामुळे हे युद्ध युरोप मधील सर्वच लोकांना आणि सामान्य लोकांना अत्यंत जिव्हारी लागले आहे. खारकीव वर पडणारी क्षेपणास्त्रे लंडन किंवा परिसवरच पडत आहेत असे युरोपिअन लोकांना वाटत आहे. हे ऐकायला थोडे असंवेदनशील वाटले तरी प्रत्यक्षांत अत्यंत स्वाभाविक आहे. पाकिस्तान मध्ये हिंदूंवर अत्याचार दिसले कि हे आपल्याच लोकांवर होत आहेत आणि ह्यांना भारतांत आश्रय द्यावा म्हणून भारतीय लोक आपल्या नेत्यांवर दबाव टाकतात. पण त्याच वेळी रोहिंग्यांवर हल्ला झाला किंवा अफगाणिस्तान मधील मुस्लिम लोकांवर अमेरिकेने बॉम्ब टाकले म्हणून भारतीयांना त्याचे विशेष सोयरे सुतक नसते. त्यामुळे युक्रेन-रशियन युद्धांतील हा एक महत्वाचा घटक होता जो ह्या युद्धाला खूपच वेगळा ठरवतो. कदाचित ह्याची अपेक्षा रशिया, अमेरिका किंवा युरोप ह्यांना कुणालाच अजिबात नव्हती. पण ह्याचे परिणाम आता सर्वानाच भोगायला लागणार आहेत. लोकशाहीत राजकारणी मंडळींना एकाच गोष्टीत रस असतो. तो म्हणजे पुढील निवडणूक कशी जिंकायची. राष्ट्रहित, समाजहित ह्यावर कितीही बोंब मारली तरी पहिले ध्येय म्हणजे निवडणूक जिंकणे. लोकशाहीत एखादा राजकारणी मोठ्या पदावर पोचून निवृत्त झाला कि मस्त सरकारी निवासांत राहायला जातो, पुस्तके लिहितो, अवॉर्ड वगैरे घेतो. त्याचे विरोधक सुद्धा त्याला आदर देतात. एकूण अतिशय हेवा वाटावा असे जीवन असते. हुकूमशाह ला ती luxury नाही. त्याला सतत घाबरून दिवस कंठावे लागतात. आणि निवृत्ती म्हणजे अज्ञातवात किंवा मृत्यू. त्याशिवाय लोकशाहींत एकदा निवडणूक जिंकली कि किमान काही वर्षे बिनधास्त नेता पदावर राहू शकतो. हुकूमशाहीत प्रत्येक दिवस अनिश्चितीतता घेऊन येतो. लोकशाही आणि हुकूमशाही राष्ट्रांची तुलना करताना हि asymmetry (विषमता) असते हि अनेक सामान्य लोक लक्षांत घेत नाहीत. समजा एक जमिनीचा तुकडा घ्यायचा आहे आणि त्यासाठी युद्ध करायचे आहे. अनेकदा हुकूमशाहाला ते करणे सोपे जाते कारण त्याला निवडणुकांची फिकर नसते पण आपण नेते आहोत हे सतत दाखवून द्यायचे असते. त्याच वेळी लोकशाहीला युद्धांत भाग घेण्यात विशेष रस असत नाही आणि युद्धांत हरण्याची शक्यता असेल तर अजिबात नाही. पण कधी कधी हे फासे उलटे पडतात. युद्ध आणि इलेक्शन ह्यांचा संबंध निर्माण होतो. आणि अश्या वेळी लोकशाहीतील नेते कुठल्याही हुकूमशहापेक्षा जास्त प्रभावीपणे युद्धांत भाग घेऊ शकतात. इतकेच नव्हे तर त्यांना लोकांचे समर्थन सुद्धा जास्त मिळते. कारगिल युद्ध हे ह्याचे उत्तम उदाहरण आहे. युक्रेन वर रशियाने अचानक हल्ला केला असता आणि युक्रेन ताब्यांत घेतले असते तर आता जितका तळतळाट नाटो राष्ट्रांनी केला असता कदाचित त्याच्या ५% सुद्धा त्यांनी केला नसता. मरू दे म्हणून युरोप आणि अमेरिका आपल्या कामाला लागले असते. पण युक्रेनी प्रचार तंत्र इतके प्रभावी ठरले कि युरोप/अमेरिका मधील जनता त्यांत न भूतो न भविष्यती अशी ओढली गेली. सामान्य मतदाराची हि भावनिक गुंतवणूक पाहून युरोपिअन आणि अमेरिकन नेत्यांना जास्त कठोर भूमिका घ्यायला भाग पडावे लागले. पुतीन ह्यांचे गणित इथेच चुकले असावे. अमेरिकन - युरोप निर्बंध जे रशियावर लादले गेले आहेत ते फारच म्हणजे फारच कठोर आहेत. अमेरिकन सरकारला सुद्धा ह्याची जाणीव आहे आणि विविध ठिकाणी हे बोलून सुद्धा दाखवले जाते. रशियन अमेरिकन अभ्यासक ह्यांनी रशियन भाषेंत ह्या निर्बंधाचे परिणाम काय होतील हे इथे दिले आहे. [२]. “All the war-propaganda, all the screaming and lies and hatred, comes invariably from people who are not fighting.” - ओरवेल अमेरिका/नाटोची भूमिका : नाटो म्हणजे हिजड्यांची फौज आहे, ह्यांना भांडता येत नाही ह्यांनी फक्त दूरच्या मागासलेल्या देशांना धमकवावे इत्यादी विविध शेलकी विशेषणे NATO मागील काही वर्षांपासून ऐकवावी लागत होती. अफगाणिस्तान मधील पराभवानंतर किंवा इराक मधील गोंधळानंतर हे जास्तच प्रभावी पणे सर्वाना जाणवत होते. सामान्य युरोपिअन तसेच अमेरिकन लोकांना युद्धांत रस नव्हता. ओबामा, ट्रम्प किंवा बायडन ह्यांनी आपल्या प्रचारांत नवीन युद्धापेक्षा सध्याची युद्धे बंद करू अश्याच घोषणा दिल्या होत्या. ब्रेक्सिट सारख्या घटनांनी तर युरोप मध्ये एकी नाही वगैरे गोष्टी आपण ऐकत होतो. युद्धाची बोलणी जाऊन ग्रेटा किंवा मलाला सारख्या गोष्टी युरोप मध्ये जास्त लोकप्रिय झाल्या होत्या. जगापुढील सर्वांत मोठा धोका, रशिया, चीन, इस्लाम नसून वातावरण बदल आहे आहेत ह्यावर लोकांचा विश्वस बसत चालला होता. युरोप चे भविष्य काय आहे असा प्रश्न पीटर थील ह्यांना विचारला असता त्यांनी उत्तर दिले की "एक तर युरोप इस्लामिक होईल नाहीतर इ-स्कुटर घेऊन सोय लाटे पित सरकारकडून फुकटचे रेशन घ्यायला रांग लावणाऱ्या लोकांचा खंड बनेल" (स्वैर). पण शेवटी नाटो अमेरिका हे क्लिष्ट आणि लोकशाही समाज आहेत त्यामुळे ह्यांचा संबंधात काहीही म्हटले तरी शेवटी त्याला अपवाद सुद्धा दिसून येतोच. पण शेवटी ह्यांच्या हातांत निर्विवादपणे सर्वांत मोठी लाठी आहे. त्यामुळे अनेक म्हशी सुद्धा ह्यांच्याच ताब्यांत आहेत. नाटो ने रशिया लगतच्या देशांशी चांगले संबंध ठेवू नयेत हि रशियाची भूमिका होती. युक्रेन, बेलारूस, जॉर्जिया, इत्यादी देशांना काही अर्थाने बफर देश म्हणून ठेवावे हि रशियाची भूमिका होती आणि त्यासाठी आपण युद्ध सुद्धा करू अशी धमकी वारंवार रशिया देत होता. गॉर्जिया आणि युक्रेन (२०१४) दोन्ही देशांवर मुद्दाम आक्रमण करून त्यांचा काही प्रदेश रशियाने म्हणूनच 'वादग्रस्त' केला होता. नाटो चे मेम्बर व्हायचे असेल तर सीमा स्पष्ट पाहिजे हा नियम आहे. रशियाने सीमावाद काढल्याने दोन्ही देशांना नाटो मध्ये जाणे शक्य नव्हते. थोडक्यांत रशियाची भूमिका मी आपल्या शेजार्याला वाट्टेल तसा वागवणार आणि त्याकडे इतरांनी काणा डोळा केला पाहिजे हि भूमिका. हि भूमिका नाटो मधील अनेक राष्ट्रांना स्वीकार करणे जड जात होते. नाटो चा विस्तारवाद, नाटोला सर्व जगावर नियंत्रण पाहिजे इत्यादी गोष्टी सध्या बोलल्या जातात. पण इथे रॅशनल पद्धतीने विचार केला पाहिजे. NATO हि बहुतांशी लोकशाही देशांची संघटना आहे. नाटो मध्ये जायचे कि नाही हे तो देश ठरवतो आणि इतर देश त्याला मान्यता देतात. नाटोच्या एका राष्ट्रावर हल्ला म्हणजे सर्वांवर हल्ला हे नाटोचे ब्रीद आहे (आर्टिकल ५). पण शेवटी नाटो हि एक सामरिक संघटना आहे. राजकीय नाही. राजकीय, आर्थिक संबंधांना सामरिक क्षमता सुद्धा पाहिजे. पण ह्या तिन्ही गोष्टी बहुतांशी वेगळ्या आहेत. राजकीय नेतृत्व हे लोकशाही मध्ये काही काही वर्षांनी बदलते. आर्थिक परिस्थितीत तासा तासाला बदलते तर सामरिक धोरण हे दशका दशकांत बदलत नाही. पण ह्या तिन्ही गोष्टींचा कधी कधी ओव्हरलॅप होतोच. आता युक्रेन सारख्या देशाला नाटो चे सदस्य करून घ्यावे म्हणजे पेट्रोल जवळ मशाल नेण्यासारखे होय असे विविध अमेरिकन युद्धविश्लेषकांनी मागील कित्येक वर्षे सांगितले आहे. जवळ जवळ सर्व स्ट्रॅटेजी पेपर्स मध्ये रशियाने काहीही केले तरी युक्रेन सारख्या देशाला NATO मध्ये घेण्यात NATO चे नुकसानच आहे असे बहुतेक रिसर्च सांगत होता. John Mearsheimer सारखे realist अनेक वर्षे हेच लिहीत आले आहेत. त्यांचा खालील निबंध आज खूप लोकप्रिय झाला आहे. पण मागील अनेक वर्षांपासून त्यांनी आणि इतर अनेकांनी हेच लिहिले आहे.[१] हिंदू अमेरिकन डेमोक्रॅट तुलसी गबर्ड ह्यांनी सुद्धा तेच हल्ली म्हटले. युक्रेन सारखा अपरिपक्व, गरीब आणि इतर प्रकारच्या हिंसेने त्रस्त झालेला देश NATO मध्ये आला आणि रशियाने दुर्लक्ष केले तर पुढे काय होऊ शकते ? एक म्हणजे युक्रेन मधील एखाद्या गटाने, किंवा रशियन धार्जिण्या गटाने युक्रेन मधून काही छोटी रॉकेट्स राशीवर फेकली तर पुढे काय ? रशियाला प्रत्यत्तर द्यावे लागेल आणि NATO ला मग मोठे युद्ध छेडावे लागेल. रशियाने उत्तर नाही दिले तर ह्या गटांचा उत्साह आणखीन वाढेल आणि प्रस्थापित रशियन नेते कमजोर दिसतील. नाटो ने प्रत्युत्तर नाही दिले तर नाटो ची विश्वासार्हता धोक्यांत येते. समजा रशियाविरोधांत नाटो ला काही आक्रमण करावे लागले तर ? युक्रेन सारख्या देशांचा मोठा फरक पडत नाही. ह्या देशांना सहज कब्जांत घेऊन नाटो सैन्य पुढे जाऊ शकते. उलट युक्रेन सारखे बफर देश अस्थिर ठेवले तर नाटो ला प्रचंड फायदा आहे. ह्या देशांत अस्थिरता माजवून, हत्यारे देऊन रशियाविरोधांत सतत आग ओतत तेहवली जाऊ शकते.त्यामुळे युक्रेन ला नाटो मध्ये येऊ देण्यांत पाश्चात्य राष्ट्रांचा तसा विशेष फायदा नव्हताच. विविध माध्यमांतून नाटो चा विस्तारवाद युक्रेन युद्धासाठी कारणीभूत आहे असे लिहिले जाते पण नक्की हा विस्तार कश्यासाठी आहे आणि कोण ह्या विस्तारवादाचा पुरस्कार करतो हे किमान मला तर समजले नाही. अमेरिकन परराष्ट्र धोरण नक्की कोण ठरवतो ? का अमेरिका अमुकच पावले उचलते ह्यावर खूप विचारमंथन होते. गोव्यांतील ३० हजार खप असलेल्या नवप्रभातून संपादक महोदयांनी "बुश ह्यांना आमचा खणखणीत इशारा" असे अग्रलेख लिहले आहेत. कुणी म्हणतो देशांचे भांडण लावून शस्त्रास्त्रे विकणे, कुणी म्हणतो तेल, (रशियाच्या संदर्भांत नॉर्दस्ट्रीम २ इत्यादी) पण खोल विचारांती हे बहुतेक तर्क अत्यंत उथळ वाटतात आणि ते आहेत सुद्धा. धोरणे नक्की कशी निर्माण होतात ह्या विषयाचा अभ्यास करण्याचे जे शास्त्र आहे त्याला "पब्लिक choice theory" असे संबोधित केले जाते. अर्थशास्त्राचा हा एक जास्त चर्चेत नसलेला पण खूप उपयुक्त असा भाग आहे. हननानीया ह्याचे "Public Choice Theory and the Illusion of Grand Strategy" [३] असे एक चांगले पुस्तक आहे. ह्या पुस्तकांतून अमेरिकन परराष्ट्र धोरणाचे उदाहरण घेऊन नक्की निर्णय कसे घेतले जातात ह्याचा खूप चांगला उहापोह केला आहे. पुस्तकाचा मूळ मुद्दा जो मला माझ्या intuition शी मिळता जुळता वाटला तो असा. लोकशाहीत अनेक मत प्रवाह असतात आणि त्या मतांचे अनेक पुरस्कर्ते असतात. त्यामुळे देशाचा नेता कुणीही असला तरी शेवटी त्याला अनेक मतप्रवाह तसेच इतर प्रभावांना लक्षांत घेऊन निर्णय घ्यावे लागतात. एकदा निर्णय घेतला कि बाहेरचे लोक हा निर्णय कुठल्या तर्काने घेतला ह्याच्या अटकळी बांधतात आणि प्रत्यक्षांत खरे कारण आणि वाटणारे कारण ह्यांचा संबंध असेलच असे नाही. कधी कधी निर्याणाचे जे परिणाम अपेक्षित असतात ते अजिबात होत नाहीत उलट भलतेच होते. आणि बाहेरून पाहणाऱ्याला निर्णय घेणारे नेते किती मूर्ख होते असे वाटते. ह्याचे कारण म्हणजे निर्णय प्रक्रियेत सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा आपला असा एक खाजगी फायदा असतो. वर वर "समाजहित, राष्ट्रहित" अश्या बाता मारताना ह्या व्यक्ती आपले खाजगी हित सुद्धा पुढे करत असतात. हे खाजगी हित नेहमी समाजहिताच्या विरोधांत असते. सुदैवाने अनेक खाजगी हित रक्षक एकमेकांविरुद्ध खेळी खेळत असल्याने त्यांचा प्रभाव बहुतांशी कमी होत जातो. तात्पर्य म्हणजे शेवटी जे निर्णय घेतले जातात ते असंख्य घटकांच्या प्रभावाने निर्माण झाले असतात. कधी कधी निव्वळ योगायोग किंवा अपघात म्हणून एखादा निर्णय घेतला जातो. पण बाहेरील जग त्यावर प्रचंड चिंतन करत त्या निर्णयाला जस्टीफाय करणारे ४D बुद्धिबळ खेळात बसतात. नाटो किंवा अमेरिकेने अमुक धोरण काय अवलंबायला हवे होते ह्यावर अनेक लोक निव्वळ युद्धनीती म्हणून, भूराजकीय खेळी म्हणून वगैरे पाहतात पण प्रत्यक्षांत हे निर्णय आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, स्थानीय राजकारण, विविध मित्र राष्ट्रे, कंपन्या इत्यादींचा प्रभाव म्हणून घेतले जातात. हे समजा अचूक ठरले तर त्याचे क्रेडिट नेत्यांना मिळते पण चुकले तर तर विविध कारणांनी टीकेची झोड उठते. स्टीफन कोटकिन, अमेरिका आणि रशिया ह्यांचे वाकडे का आहे आणि कसे आहे हे ह्या २ मिनिटांच्या व्हिडिओत सांगतात. आता त्यांचेच मत बरोबर आहे असे नाही, पण आधुनिक माध्यमांच्या दुनियेत त्यांचे मत सुद्धा कदाचित एक मोठा घटक असू शकतो. [५] युक्रेन : युक्रेन हा एक सार्वभौम देश आहे. आणि त्या नात्याने आपले परराष्ट्र धोरण ठरविण्याचा पूर्ण अधिकार ह्या राष्ट्राला आहे हि एक नैतिक भूमिका झाली. युक्रेन हा नाटो आणि रशिया ह्यांच्या मध्ये आहे. आधी रशियाच्या कठपुतळी राष्ट्राध्यक्षांच्या खाली आणि हल्ली लोकशाही पद्धतीवर युक्रेन बऱ्यापैकी स्थिर झाला होता. कुठल्याही सध्या लोकशाही देशाप्रमाणे आर्थिक प्रगती हि माफक अपेक्षा ह्या जनतेची होती. युरोप आणि रशिया ह्याच्यात पर्याय दिल्यास, युरोप सोबत जास्त चांगले संबंध ठेवून युक्रेन ला प्रगती करणे सहजय शक्य होते. रशिया सोबत संबंध ठेवणे म्हणजे लोकशाही काढून त्या जागी पुतीन चा हस्तक नेमणे हा पर्याय होता. ह्या दोन पर्यायांत युक्रेन कुठला पर्याय निवडेल हे सांगायला ज्योतिष्याची गरज अजिबात नव्हती. त्यामुळे EU मध्ये घुसण्यास युक्रेन अत्यंत उत्सुक होता. EU मध्ये युक्रेन गेल्यास त्याची आर्थिक प्रगती नक्की होती. युक्रेनियन पासपोर्ट जास्त महत्वाचा झाला असता आणि क्रिमिया किंवा लगतच्या रशियन प्रदेशांतून युक्रेन मध्ये स्थलांतर वाढले असते. युरोपियन कंपन्यांना सुद्धा गुंतवणूक करता आली असती. हे सर्व काही युक्रेनी जनतेसाठी अत्यंत चांगली गोष्ट होती. पण त्याच वेळी युक्रेनी यश हे रशियन अपयशाला जास्तच अधोरेखित करते झाले असते. युक्रेन जर बेलारूस पेक्षा जास्त श्रीमंत झाला असता तर मग बेलारूस सुद्धा रशियन प्रभावातून बाहेर पडला असता. हे सर्व writing on the wall रशिया साठी होते. आणि त्याच मुळे कुठल्याही थराला जावून ते आपण रोखू अशी रशियन भूमिका होती. रशियन भूमिका अनैतिक असली (कारण युक्रेन सार्वभौम आहे वगैरे) तरी रशियन सैन्यबळ हे युक्रेन पेक्षा कित्येक पटीने मोठे असल्याने रशियाला अशी टोकाची भूमिका घेणे शक्य होते. म्हणूनच मी माझे वरचे पहिले इंग्रजी वाक्य लिहिले आहे. आता तुम्ही स्वतःला रशिया नाटो च्या वाटाघाटीच्या टेबल खुर्ची वर बसवून पहा. नाटो च्या दृष्टिकोनातून युक्रेन नाटो मध्ये यावा का नाही हा नाटो आणि युक्रेनी सार्वभौमतचा प्रश्न आहे. युक्रेनला रशियन विरोधांत आक्रमण करण्यासाठी किंवा रशियेवर क्षेपणास्त्रे डागण्यासाठी युक्रेन नाटोला हवा आहे असे अजिबात नाही. हि गोष्ट रशियाला ठाऊक आहे हे नाटो ला ठाऊक आहे. त्यामुळे रशियाला नक्की समस्या काय आहे हे नाटोला समजत नाही. रशियाला काही धोका वाटतो पण तो बहुतांश अनाठायी आहे आणि त्यामुळे पुतीन सुद्धा ह्या धोक्याचा विरोधांत पराकोटीची पाऊले उचलतील असे नाटो ला वाटत नाही. त्याच वेळी रशियन दृष्टिकोनातून पहा. युक्रेन आणि नाटो ला आपला नक्की विरोध का आहे ह्यावर रशिया सार्वजनिक रित्या एकच भूमिका घेऊ शकते ती म्हणजे नाटो आणि रशियाची सीमा एकत्र झाल्यास नाटो ती आपल्या विरोधांत वापरेल हि. हि भूमिका कुठल्याही दृष्टिकोनातून बालिश वाटते. युक्रेन EU मध्ये गेल्यास युक्रेनी समाजाची जास्त आणि जास्त वेगाने प्रगती होईल हे भय रशियाला वाटत असले तरी ते उघड पणे बोलू शकत नाहीत. त्यामुळे ह्या विषयावरून कितीही धमक्या पुतीन ह्यांनी दिल्या तरी नाटो त्यांना गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे ह्या वाटाघाटीच्या टेबलावरून रशिया हा आडमुठे धोरण अवलंबतो असेच दिसून येईल. आणि नाटो ने शरणागती पत्करलीच तर त्याचा अर्थ युक्रेन कडे पोटेन्शिअल असून सुद्धा त्यांना गरिबीत आणि रशियाच्या मांडलिकत्वात झोकून देणे असा त्याचा अर्थ ठरेल. रशियाची खरी भूमिका युक्रेन ने नाटोत जाऊ नये, युक्रेन ने युरोप मध्ये जाऊ नये, युरोप सोबत जास्त व्यापार करू नये, युक्रेन गरीब आणि बहुतांशी रशियावर अवलंबून राहावा अशी होती (इन that ऑर्डर ऑफ प्रायोरिटी) आणि ह्यातील काही मागण्या नाटो, EU, अमेरिका ह्यांनी मान्य केल्या तरी सर्वच मागण्या पूर्ण करणे नाटो इत्यादींच्या हातांत सुद्धा नव्हते. त्यामुळे रशिया - युक्रेन युद्ध हे बहुतांशी "inevitable" म्हणजे अटळ होते असेच तरी मला आता वाटते. रशिया : रशियाच्या हातातून हे युद्ध कधीच बाहेर गेले आहे. पाश्चात्य निर्बंध गरजेपेक्षा आणि अपेक्षे पेक्षा जास्तच कठोर असल्याने प्रत्येक दिवसाला रशियन अर्थव्यवस्था कोसळत चालली आहे. ह्यातील काही गोष्टींची अपेक्षा रशियाला होती पण आता जे निर्बंध आहेत त्यांची अपेक्षा नव्हती असे रशियन परराष्ट्र मंत्र्यांनी सुद्धा म्हटले आहे. हे निर्बंध काढायचे म्हटले तरी आता प्रचंड नुकसान दोन्ही बाजूंचे झाले आहे. रशियन रणगाडे कदाचित क्यिव मध्ये घुसतील. कदाचित झेलेन्स्की ह्यांना ठार मारून त्यांच्या जागी आणखीन कुणाला बसवतील. पण त्यामुळे पुतीन ह्यांचे "स्ट्रॅटेजिक ऑब्जक्टिव्ह" काही पूर्ण होणार नाहीत. उलट आधुनिक माध्यमांनी युरोपियन जनता जास्तच रशिया विरोधी बनेल, नाटो चे बजेट वाढेल, युद्धाची खुमखुमी असलेल्या नेत्यांना जास्त मते मिळतील आणि एकूण रशियन सुरक्षा आणखीन कमजोर होईल. कमजोर रशिया इतरांना मंडलिक बनविण्याच्या नादांत कदाचित चीन चा मांडलिक बनून राहू शकतो. भारतासारखे देश आता संरक्षण तंत्रज्ञानाच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करतील. खरे तर पुतीन ह्यांनी युक्रेन वर आक्रमण केले तेंव्हाच मोदी ह्यांनी खालील व्यक्तव्य दिले. "India should have own customised and unique weapons system, the surprise element will come on when we have own equipment. If ten countries have same type of military equipment then we have no uniqueness of the forces, said Prime Minister Narendra Modi while addressing a webinar on Friday." - फेब्रुवारी २५. [१] - https://www.mearsheimer.com/wp-content/uploads/2019/06/Why-the-Ukraine-Crisis-Is.pdf [२] - https://twitter.com/mironov_fm/status/1499092871265361927 [३] - https://www.routledge.com/Public-Choice-Theory-and-the-Illusion-of-Grand-Strategy-How-Generals-Weapons/Hanania/p/book/9781032121796 [४] - https://www.youtube.com/watch?v=_mDgH3dTR4w [५] - https://www.youtube.com/watch?v=K4xIfHzO0GI ukraine

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 51578 views

🗣 चर्चा (154)
र
रानरेडा Sat, 03/05/2022 - 17:10 नवीन
नाही पण सहाना मॅडम इतका आपला सखोल अभ्यास आणि अनुभव नसावा असे मला वाटते :)
  • Log in or register to post comments
T
Trump Sat, 03/05/2022 - 19:51 नवीन
खरे तर ह्या वादविवादात पडायचे नव्हते. - तुम्ही दोन व्यक्तींच्या ज्ञानाची, अनुभवाची तुलना कशी करता? जाणुन घ्यायला आवडेल. काही तरी नवीन शिकता येईल.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Sat, 03/05/2022 - 19:14 नवीन
1)कोणी अतिक्रमण केले तर प्रतिकार केला जातो ते लादलेले युद्ध झाले. आक्रमण करणाऱ्या देशाचा हेतू स्पष्ट असतो. एक तर सीमा रेषा बदलणे हा हेतू असतोच . प्रतिकार करणाऱ्या देशाचा काहीच पूर्व नियोजित हेतू नसतो .फक्त आक्रमण थांबवणे हाच हेतू असतो. रशिया नी युक्रेन वर आक्रमण केले आहे त्यांचा हेतू युक्रेन जिंकणे आणि तो रशियात सामील करणे हा हेतू असेल तर युद्ध अजून चालेल. आणि तेव्हा रशिया नी युद्ध जिंकणे म्हणजे युक्रेन लं रशिया चा भाग बनवणे असा अर्थ असेल.. पण रशिया च हेतू च युक्रेन जिंकायचे नसेल. तर. युक्रेन ला आर्थिक बाबतीत कमजोर करणे,सैन्य दल युक्रेन चे कमजोर करणे आणि जगाला एक संदेश देणे आम्ही आमच्या विरुद्ध जाणाऱ्या लोकांचे असे हाल करू. रशिया च हा हेतू साध्य झाला आहे १)युक्रेन मधून लाखो लोकांनी पलायन केले आहे. २) युद्धात युक्रेन चे इतके नुकसान झाले आहे जी ते भरून येण्यासाठी काही वर्ष लागतील आणि खूप सारे पैसे त्या साठी युक्रेन लं खर्च करावे लागतील. बाकी रशिया cha हेतू बाकी युक्रेन चे मित्र देश पूर्ण करतील .. कर्ज देवून आणि त्या बदल्यात युक्रेन ल आर्थिक बाबतीत पांगळा करून. ३) उद्या जरी रशिया नी स्वतः च युद्ध विराम घोषित करून सैन्य मागं घेतले तरी त्याचा हेतू पूर्ण झाला आहे. युक्रेन नी युद्ध जिंकणे ह्याचा अर्थ काय. रशियन सैन्य युक्रेन सोडून जाणे. बस इतकाच अर्थ आहे युक्रेन नी युद्ध जिंकण्याचा.
  • Log in or register to post comments
र
रावसाहेब चिंगभूतकर Sun, 03/06/2022 - 04:20 नवीन
- जसजसे युद्ध पुढे जात आहे तसतसा युक्रेन बद्दल ची सहानुभूती कमी होत आहे आणि रशियाच्या बद्दल पाठिंबा भारतात वाढत आहे. - पुतीन यांनी माघार घ्यायची वेळ केव्हाच निघून गेली आहे. युक्रेन हे युद्ध जवळ जवळ हरल्यात जमा आहे. आणखी काही आठवड्यानी रशीयनांचा युक्रेन वर ताबा आहे. - या सर्व प्रकाराला नाटो आणि मुख्य म्हणजे अमेरिका जबाबदार आहे अशी भावना आहे. जर श्रीलंका ने आपल्या भूमीवर चीन ला सामरिक तळ उभारायला परवानगी दिली तर भारत सुद्धा श्रीलंकेवर हल्ला करेल, नव्हे त्याने करायलाच हवा. हे उदाहरण लक्षात घेतले तर रशियाची कृती फार वेगळी वाटत नाही. - झेलन्स्की दररोज (संजय राऊत यांच्या प्रमाणे) काही न काही विधाने करत आहेत. नाटो आणि रशिया यांच्यात लढाई लावून देणे आणि त्याद्वारे स्वतःला वाचवणे ही त्यांची मनीषा अजून तरी पूर्ण झालेली नाही आणि त्यामुळे ते नाटो ला दूषणे देत आहेत. He is expendable and we may see him vanishing from political scenario once the war is over. - रशियाचे तेल युरोप ला हवे आहेच. - भारत आणि चीन रशिया बरोबर बिझनेस ऐज युजवल चालू ठेवतील. - WW III काही होत नाही. - युक्रेन EU मध्ये सामील करण्याला मुख्य राष्ट्रांचा विरोध असल्याने तिथेही तो सामील होणार नाही. नाटो मध्ये जाण्याचा प्रश्नच नाही.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sun, 03/06/2022 - 06:35 नवीन
एस्टोनिया, लाटिव्हिया आणि लिथुआनिया- हे देश- १. रशियाच्या बॉर्डरवर आहेत. २. पूर्व सोव्हिएत युनियन चे भाग आहेत. (मुद्दा- या बाबत हे तीन देश युक्रेनशी समानच आहेत.) ३. या तिन्ही देशांनी 2004 साली नाटो सदस्यत्व घेतले. ४. रशियाने क्रायमिया गिळंकृत करेपर्यंत नाटो ने या देशांच्या सीमांवर कोणतेही सैन्य ठेवले नव्हते. प्रपोझिशन- नाटो कोणत्याही प्रोव्होकेशन शिवाय रशियावर हल्ला करेल ही शक्यता धूसर आहे. रशियाचे त्यांच्या शेजारी देशांशी, आणि खासकरून, पूर्व सोव्हिएत युनियन देशांशी नाते बऱ्याचदा तणावपूर्ण असते, त्या मुळे युक्रेनला आणि इतर शेजारी देशांना नाटोचा आधार घ्यावे वाटणे साहजिक आहे. रशियाने आपली अखंड रशियाची इच्छा काही ठिकाणी दाखवली आहे. युक्रेन हा रशियन बॉर्डर वरचा, किंवा पूर्व सोविएत युनियन असलेला पहिला देश नाही. त्यामुळे रशियाची "सिक्युरिटी कन्सर्ण" तकलादू आहे.
  • Log in or register to post comments
T
Trump Sun, 03/06/2022 - 10:46 नवीन
पटकन हे सापडले. दोन्ही वेळेला रशियाला ते आवडले नव्हते. पण आर्थिक कारणामुळे रशियाने उत्तर दिले नव्हते.
सुदैवाने, चर्चेत भाग घेतलेल्या विविध देशांकडून भरपूर कागदपत्रे उपलब्ध आहेत, ज्यात संभाषणातील मेमो, वाटाघाटी प्रतिलेख आणि अहवाल यांचा समावेश आहे. त्या कागदपत्रांनुसार, यू.एस., यूके आणि जर्मनीने क्रेमलिनला सूचित केले की पोलंड, हंगेरी आणि झेक प्रजासत्ताक सारख्या देशांचे नाटो सदस्यत्व प्रश्नाच्या बाहेर आहे. मार्च 1991 मध्ये, ब्रिटीश पंतप्रधान जॉन मेजर यांनी मॉस्को भेटीदरम्यान "असे काहीही होणार नाही" असे वचन दिले होते. शेवटी पाऊल उचलले गेल्यावर येल्तसिन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी 1997 मध्ये नाटोच्या पूर्वेकडील विस्तारासाठी मान्यता दिली, परंतु पश्चिमेने त्यांना सक्ती केल्यामुळेच ते तसे करत असल्याची तक्रार केली. Luckily, there are plenty of documents available from the various countries that took part in the talks, including memos from conversations, negotiation transcripts and reports. According to those documents, the U.S., the UK and Germany signaled to the Kremlin that a NATO membership of countries like Poland, Hungary and the Czech Republic was out of the question. In March 1991, British Prime Minister John Major promised during a visit to Moscow that "nothing of the sort will happen." Yeltsin expressed significant displeasure when the step was ultimately taken. He gave his approval for NATO’s eastward expansion in 1997, but complained that he was only doing so because the West had forced him to. https://www.spiegel.de/international/world/nato-s-eastward-expansion-is-vladimir-putin-right-a-bf318d2c-7aeb-4b59-8d5f-1d8c94e1964d
-----------
रशियासाठी, किमान, अर्थ स्पष्ट आहे: युती अजूनही त्याला भागीदाराऐवजी संभाव्य शत्रू मानते. रशियाने NATO च्या विस्तारासाठी स्वतःचा राजीनामा दिला आहे, तरीही, नाटो सैन्याने बाल्टिकमध्ये तैनात केल्याच्या वास्तविकतेने -- अल्प सूचनेवर -- त्याचे राजकारणी आणि कमांडर गंभीरपणे अस्वस्थ आणि संतप्त झाले आहेत, ज्यामुळे युतीवर काही तीव्र टीका झाली आहे. 1999 मध्ये सर्बियाविरुद्ध युद्ध. रशियाच्या संसदेच्या कनिष्ठ सभागृहाने बुधवारी नाटोचा सर्वसाधारणपणे विस्तार आणि विशेषत: F-16 च्या तैनातीचा निषेध करणारा ठराव संमत केला. रशियाच्या नवीन लष्करी सिद्धांतातील इशाऱ्यांचे प्रतिध्वनी गेल्या शरद ऋतूत मांडण्यात आले होते, ठरावाने राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर व्ही. पुतिन यांना रशियाच्या नाटोसोबतच्या आंतरराष्ट्रीय करारांवर आणि त्याच्या स्वत:च्या संरक्षण धोरणांवर पुनर्विचार करण्याचे आवाहन केले होते, ज्यात त्याच्या आण्विक पवित्रा देखील होता. To Russia, at least, the meaning is clear: the alliance still views it as a potential enemy rather than a partner. While Russia has resigned itself to NATO's expansion, albeit grudgingly, the reality of NATO forces being deployed in the Baltics -- on short notice -- has deeply unsettled and angered its politicians and commanders, prompting some of the sharpest criticism of the alliance since its war against Serbia in 1999. Russia's lower house of Parliament overwhelmingly adopted a resolution on Wednesday denouncing NATO's expansion generally and the deployment of the F-16's specifically. Echoing warnings in Russia's new military doctrine set forth last fall, the resolution called on President Vladimir V. Putin to reconsider Russia's international agreements with NATO and its own defense strategies, including its nuclear posture. https://www.nytimes.com/2004/04/03/world/as-nato-finally-arrives-on-its-border-russia-grumbles.html
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Sun, 03/06/2022 - 14:08 नवीन
तुम्ही म्हणताय त्यात तथ्य आहे, पण अमेरिका आणि रशिया या दोघांवर पण विश्वास ठेवण्यासारखी स्थिती नाही. युद्धाची अंतर्गत कारणे काहीतरी वेगळीच वाटत आहेत. रशियाने ज्या ताकदीने हल्ला करायला हवा त्या ताकदीने हल्ला केलेला नाही, हल्ल्याचा नकाशा बघितला तर रशियाने जेमतेम 10टक्के युक्रेन व्यापला आहे आत्ता, म्हणजे युक्रेनवर सर्वंकष सत्ता हा उद्देश असूच शकत नाही, जर युक्रेन काबीज करायचा असता तर अन्य देश सावध व्हायच्या आत रशियाला अर्ध्याहून अधिक युक्रेन घेणे आवश्यक होते. आता युद्ध अजून चिवट होत जाईल.. आणि युद्ध लांबले तर रशियाकडून एखादी चूक व्हायची शक्यता पण वाढत जाईल. पुतीन ला नक्कीच हे नको असणार. नेमके काय उद्देश ठरवले आहे याचा अंदाज अजून तरी मला येत नाहीये..
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Sun, 03/06/2022 - 19:55 नवीन
कारगिल युद्धात फक्त बळींची संख्या पहिली तरी भारतीय सैन्य अक्षरशः कापले गेले असे कुणी म्हणू शकतो.
अधिकृत आकडेवारी प्रमाणे ५२७ भारतीय सैनिक शहीद झालेत तर ४५३ पाकिस्तानी सैनिक मारले गेलेत. म्हणजे फरक फार मोठा आहे असे म्हणता येणार नाही.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 03/07/2022 - 03:55 नवीन
जो पाकिस्तान, आतंकवाद्यांना आश्रय देतो, तो अशा वेळी, स्वतःचे आकडे कमीच सांगणार...
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 03/07/2022 - 05:32 नवीन
मुळात कारगिल युद्धात पाकिस्तानी लष्कराने तेथे आपले सैनिक नसुन काश्मिरी स्वातंत्र्य सैनिकच आहेत असे म्हटले होते. त्यामुळे त्यांच्या नॉर्दन लाईट इन्फन्ट्री या रेजिमेंटचे खरे सैनिक मृत्युमुखी पडले तरी त्यांना लष्करी इतमामाने अंतिम संस्कार नशिबी आले नाहीत आणि यामुळे पाकिस्तानी लष्करात कनिष्ठ स्तरावर फार मोठा असंतोष पसरला होता. याउलट हुतात्मा झालेल्या प्रत्येक भारतीय सैनिकास मिळणारा मान सन्मान आणि लष्करी मानाने झालेले त्यांचे अंत्यसंस्कार हे पाकीस्तानी लष्कर आणि सामान्य जनता भारतीय टी व्ही चॅनेल वर पाहत होती आणि यामुळे पाकिस्तानी लष्करात कनिष्ठ स्तरावर फार मोठा असंतोष पसरला होता.
  • Log in or register to post comments
र
रावसाहेब चिंगभूतकर Mon, 03/07/2022 - 04:44 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Mon, 03/07/2022 - 06:21 नवीन
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Mon, 03/07/2022 - 06:23 नवीन
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Mon, 03/07/2022 - 06:23 नवीन
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Mon, 03/07/2022 - 06:24 नवीन
#vkleaks अमेरिकन अनुदानित युक्रेनियन बायो वेपन लॅब रशियन सीमेजवळ शोधून काढल्या. मी दोन दिवसा पुर्वी यावर लेख लिहिला होता त्याची लिंक खाली दिली आहे. रशियाने असे दस्तऐवज प्रकाशित केले आहेत जे दर्शविते की युक्रेन रशियन सीमेजवळ जैविक शस्त्रांवर काम करत आहे. जसे की अँथ्रॅक्स आणि प्लेग आणि पेंटॅगॉनने त्यांचा नाश करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या वेबसाइट लिंक आम्ही तपासल्या असता त्या लिंक यूएस डिलीट केल्या गेल्या आहेत . रशियन फेडरेशनचे म्हणणे आहे की ते संयुक्त राष्ट्रसंघाच्या जैविक शस्त्रांच्या प्रतिबंधाच्या कलम 1 चे उल्लंघन करत आहे. प्रयोगशाळांना यूएस द्वारे निधी दिला जातो. रशियाने जारी केलेले दस्तऐवज खालीलप्रमाणे आहेत क्रपया त्या रशियन भाषेत असल्या मुळे गूगल ट्रांसलेट करून वाचा . यूएस डिपार्टमेंट ने बायो वेपन संबंधित ज्या लिंक डिलिट केल्याचे आढ़ळले त्या लिंक खाली देत आहे . 26 feb रोजी अधिकृत दूतावास ने 15 बायो वेपन प्रयोगशाळेच्या लिंक इंटरनेट वरुन केल्याचे आढ़ळल्या . त्या पैकी खाली काही लिंक आहेत ज्या 26 फेब . नंतर बंद दाखवत आहेत https://web.archive.org/web/20170130193016/https://photos.state.gov/libraries/ukraine/895/pdf/dtro-kharkiv-eng.pdf https://web.archive.org/web/20210511164310/https://photos.state.gov/libraries/ukraine/895/pdf/dtro-luhansk-eng.pdf https://web.archive.org/web/20170221125752/https://photos.state.gov/libraries/ukraine/895/pdf/dtro-dnipropetrovsk-eng.pdf https://web.archive.org/web/20170221125752/https://photos.state.gov/libraries/ukraine/895/pdf/dtro-dnipropetrovsk-eng.pdf https://web.archive.org/web/20210506053014/https://photos.state.gov/libraries/ukraine/895/pdf/dtro-vinnitsa-eng.pdf https://web.archive.org/web/20170207122550/https://photos.state.gov/libraries/ukraine/895/pdf/dtro-kherson-fact-sheet-eng.pdf https://web.archive.org/web/20170223011502/https://photos.state.gov/libraries/ukraine/8 https://web.archive.org/web/20170207122550/https://photos.state.gov/libraries/ukraine/895/pdf/dtro-kherson-fact-sheet-eng.pdf आमचे सोअर्स खरे निघाले याचा अम्हाला समाधान आहे https://m.facebook.com/story.php?story_fbid=4241606635942991&id=100002810886486
  • Log in or register to post comments
क
कॉमी Mon, 03/07/2022 - 06:37 नवीन
हे जर खरं असत तर पुतीनने हे कारण जगाला ओरडून ओरडून सांगितलं असत. https://www.google.com/amp/s/amp.usatoday.com/amp/6937923001 अर्थात हा यूएस पेपर असल्याने त्यावर बाय डिफौल्ट विश्वास ठेवायचा नाही असेच बऱ्याच लोकांचे मत असेल. त्यावर काही बोलू शकत नाही. रशियन मीडिया जास्तीत जास्त स्टेट कंट्रोल्ड आहे. यूएस मध्ये तसे नाही, तरी मन बनवलं तर रशियाचे सोर्स, RT आणि स्पुतनिक सुद्धा विश्वासार्ह वाटतात. असो.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Mon, 03/07/2022 - 10:40 नवीन
त्याच लिंकमध्ये हे पण लिहिले आहे - The Ukrainian and U.S. governments partnered in August 2005 to "prevent the proliferation of dangerous pathogens and related expertise and to minimize potential biological threats," according to the treaty. म्हणजे बायो लॅब्स आहेत हे चूक नाहीये, तर त्या कायदेशीर रित्या अमेरिकेच्या मालकीच्या नाहीयेत. तर त्याऐवजी त्या सरकारच्या मालकीच्या आहेत, आणि कोणत्या तरी करारा नुसार तेथे संशोधन चालते. अमेरिकन प्रोपौगंडाच्या लिंक बद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Mon, 03/07/2022 - 11:16 नवीन
याचावरून जैविक हत्यारे बनवून रशियाला टार्गेट केले जाईल हे अनुमान कश्यावरून निघू शकते ?किमानपक्षी तिथे कोणत्या धोकादायक गोष्टींवर हत्यार म्हणून रिसर्च चाललाय याचा तरी उल्लेख हवा ? इथे तर सरळसरळपणे बयो वेपन्सच्या अगदी उलट उद्दिष्ट दिसतेय, prevention. सदर उद्दिष्टाप्रमाणे काम न होता त्या विरोधात काम होतेय हे कशावरून ? हे कारण असेल तर रशियन सरकार अधिकृतरित्या तसे का बोलत नाहीये ? हे तर जगाला ओरडून ओरडून सांगायला हवे होते. उगाचच युक्रेनमध्ये नाझी आहेत, सुरक्षा करणे वैगेरे कमकुवत आहेत अशी अतार्किक पडणारी कारणे का देत आहेत रशियन्स ? २०२० पासून हि अफवा आहे, युक्रेन आणि यूएस मिनिस्टरींनी नकार दिलेली आहे. इतकेच नव्हे तर माझ्या माहितीप्रमाणे सोशल मीडियाच्या बाहेर कोणत्या रशियन अधिकारी/मीडियाने सुद्धा मांडलेली नाहीये. समाजमाध्यमांवर कोणीही काहीही लिहू शकतो, काय आधारावर विश्वास ठेवायचा ?
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Mon, 03/07/2022 - 11:46 नवीन
कशावरुन विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पाकिस्तान सुद्धा अणुबॉम्ब बनवत नव्हतेच.. पण त्यानी चक्क अमेरिका आणि अन्य पाश्चिमात्य देशातून तंत्रज्ञान चोरले, आणि या सगळया पोलिसांनी त्याकडे डोळेझाक केली हा इतिहास आहे. त्यामुळे, जर अशी लॅबच अस्तित्वात नसती तर मग रशियावर विश्वास ठेवणे कठीण होते. पण लॅब अस्तित्वात आहे, म्हटल्यावर दोन्ही बाजू संशयास्पद आहेत. अमेरिका देखील डोळे झाकून विश्वास ठेवण्या इतकी साधी भोळी नाही. तुम्हाला ती एकाच बाजू बघायची असेल तर नाईलाज आहे, मी दोन्ही बाजू विश्वासापात्र नाहीत असे म्हणतोय.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Mon, 03/07/2022 - 13:24 नवीन
मी दोन्ही बाजूंपैकी कोणती जास्त किंवा कमी विश्वासपात्र याबद्दल आत्ता तरी बोलणार नाही* आत्ता तरी, सोर्स संदर्भात- सोशल मिडियावरची अनाधिकृत हँडल कडून आलेली पोस्ट हा विश्वासपात्र स्रोत नाहीये. त्यात रशिया आणि अमेरिका याचा संबंध नाही जोडला तरी चालेल. पुढे, हे खरे असेल तर रशिया अधिकृत पणे याबद्दल का बोलत नाही ? ***- पुढे, लिटरली सरकारी हस्तक्षेप आणि मालकी असणे हे शंकेचे मोठे कारण असावे का एखाद्या देशात मीडिया ऑर्गनायझेशन असणे हे जास्त मोठे कारण असावे ? माझ्या मते पहिले- लिटरली स्टेट फंडेड मीडिया ही जास्त शंकास्पद आहे. रशियाची बहुतांश मीडिया तशीच आहे.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Mon, 03/14/2022 - 02:11 नवीन
पुढे, लिटरली सरकारी हस्तक्षेप आणि मालकी असणे हे शंकेचे मोठे कारण असावे का एखाद्या देशात मीडिया ऑर्गनायझेशन असणे हे जास्त मोठे कारण असावे ? I think otherwise. सामना जे छापतो ते शिवसेनेची अधिकृत भूमिका म्हणून स्वीकारता/नाकारता येते. मटा/सकाळ वरती असा विश्वास ठेवता येतो का?
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 03/17/2022 - 07:27 नवीन
सेनेची भूमिका म्हणून सामना ग्राह्य धरा ना कोण नाही म्हणतंय. सेनेने भाजपवर केलेले आरोप सामनात आले तर खरे मानणार का ? (पुराव्यांशिवाय) आणि दुसरी बाजू- भाजपशासित राज्यात चालवल्या जाणाऱ्या स्वतंत्र वृत्तपत्राने काँग्रेसवर आरोप केले तर ते भाजपशासित राज्यातल्या पेपरचे आहेत म्हणून उडवून लावणार का ?
  • Log in or register to post comments
T
Trump गुरुवार, 03/17/2022 - 09:27 नवीन
नक्की कशावर चर्चा चालु आहे?
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 03/17/2022 - 11:58 नवीन
:))
  • Log in or register to post comments
T
Trump Sun, 03/13/2022 - 14:00 नवीन
Robert Pope is in charge of securing or eliminating Soviet-era bioweapons, so he knows a lot about the subject. But it turns out not all of these Soviet weapons are being destroyed or even secured in Ukraine. Pope acknowledged that in an interview.

Robert Pope is in charge of securing or eliminating Soviet-era bioweapons, so he knows a lot about the subject. But it turns out not all of these Soviet weapons are being destroyed or even secured in Ukraine. Pope acknowledged that in an interview. pic.twitter.com/clO4gsrkgJ

— Tucker Carlson (@TuckerCarlson) March 11, 2022
  • Log in or register to post comments
T
Trump गुरुवार, 03/17/2022 - 16:59 नवीन
श्री टकर कार्लसन यांचे स्वगत ऐकण्यासारखे आहे. अमेरीका / खंडीय युरोपियन लोकांना भविष्यात युक्रेनला मदत करण्याचे, युध्द्दज्वर वाढवण्याचे काय तोटे याचे विश्लेषण आहे.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Mon, 03/07/2022 - 07:56 नवीन
बाकी लष्करी कारवाया .भारतीय सैनिक मृत्यू मुखी पडण्याचे प्रमाण जास्त च आहे आहे योग्य नियोजन,संयम, ह्याचा अभाव आहेच अफगाणिस्तान आणि इराक मध्ये अमेरिके नी लष्करी कारवाई केली . अमेरिकेचे खूप कमी सैनिक मारले गेले मनुष्य बळाची हानी जास्त होत असेल . नेतृत्व कुठे तरी कमी पडत आहेत
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Mon, 03/07/2022 - 08:31 नवीन
राजेशभाऊ बाकी सर्व विषयांप्रमाणे ह्या विषयातही तुम्हला भरपूर ज्ञान आहे आस दिसतंय. एखादा लेख लिहून काढा हिथे. आपण तो मोदी आणि आर्मी चीफ नरवणे यांना पाठवून देऊ. तुमच्याजवळ ज्ञान आहे तर आस दाबून नका ठेऊ. वाटलंस तर हिथे प्रकाशित करून सिक्रेट फोडण्यापेक्षा तुम्ही तो थेट नरवणे साहेबाना पाठवूण द्या.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी गुरुवार, 03/17/2022 - 08:07 नवीन
भावी राश्ट्रिय सुरक्शा सलाहकर ( की कलह कार)
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी गुरुवार, 03/17/2022 - 08:08 नवीन
भावी राश्ट्रिय सुरक्शा सलाहकर ( की कलह कार)
  • Log in or register to post comments
स
सुरिया गुरुवार, 03/17/2022 - 08:52 नवीन
जाऊ द्याना कर्नल साहेब, कशाला लिंकू पिंकू चे प्रतिसादावर तुमची पण प्रतिसाद दुकानदारी चालवता. एक जण निवडू निवडू लिंका ओततात. दुसरे मिपा क्रांतिवीर असल्याच्या थाटात पिंकाची स्वगते फेकतात. का टाईम घालवायचा त्यांच्यावर? कविता करा, प्रवासवर्णने लिहा, जमल्यास तुमच्या सेना आयुष्यावर लिहा. मज्जा करा.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 03/07/2022 - 08:32 नवीन
मनुष्य बळाची हानी जास्त होत असेल . नेतृत्व कुठे तरी कमी पडत आहेत उगाच हातात कळफलक आहे म्हणून काहीही बडवू नका. नेतृत्व कमी पडत आहे याचा आपल्याकडे काही पुरावा आहे का? मी राजकीय म्हणतो आहे लष्करी तर नाहीच नाही There were 2,401 United States military deaths in the War in Afghanistan. 1,921 of these deaths were the result of hostile action. 20,752 American service members were also wounded in action during the war.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Mon, 03/07/2022 - 08:17 नवीन
युद्धात नेतृत्व खूप महत्वाचे असते राजकीय नेतृत्व अतिशय चतुर,खूप हुशार ,दूर दृष्टी असणारे असावेच लागते कारण राजकीय नेतृत्व सर्वोच्च असते. दुसरे तिन्ही दलां चे प्रमुख त्यांच्या मध्ये योग्य को opration असेल च पाहिजे. आणि तिसरे युद्ध निती ठरवणारे अधिकारी हे अतिशय उच्च बुद्धी मत्ता असणारे आणि संयमी,लोक असलीच पाहिजेत. स्व सैनिकांची जीवित हानी कमी होवून युद्ध जिंकता आले पाहिजे त्या साठी छ्त्रपती चा आदर्श डोळ्या समोर ठेचा. त्यांनी अनेक युद्ध केली पण स्वतःच्या सैनिक ची जीवित हानी कमीत कमी होईल ह्याचा प्लॅन करून. बॉर्डर चित्रपटात . जे दाखवले आहे आणि ते सत्य पण आहे पाकिस्तान चे प्रचंड लष्कर कसलेच हवाई संरक्षण न घेता मूर्खा सारखे भारताच्या सीमेत प्रवेश करते झाले . इतके प्रचंड लष्कर हवाई संरक्षण नसताना उघड्या मैदानात मूर्ख अधिकारी च उतरवतात. काय झाले भारतीय वायू दलाने त्यांची धुळधाण udhavali . ते काहीच करू शकले नाहीत.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 03/11/2022 - 05:47 नवीन
त्या साठी छ्त्रपती चा आदर्श डोळ्या समोर

ठेचा.

हायला आदर्श कसा काय बुवा ठेचायचा? मी उगाच सुनील राव आलं किंवा मिरची सारखा आदर्श पाटा वरवंट्यावर घेऊन ठेचत आहेत असे दृश्य डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करून पाहिला पण काही जमत नाही
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Mon, 03/07/2022 - 09:44 नवीन
तो खरा आहे असा मी दावा करणार नाही कारण तो ऐकीव आहे. माझ्या एका ओळखीच्या व्यक्ती नी तो सांगितला होता. तो नाविक दलात होता. पाकिस्तान ,भारत बांगलादेश युद्धात घडलेल. आणि तो स्वतः त्या युद्धात सहभागी होता पण तो इथे सार्वजनिक प्लॅटफॉर्म वर शेअर करणे चुकीचे आहे.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Mon, 03/07/2022 - 13:59 नवीन
लेख फसला अथवा नाही या पेक्षा लेखावर झालेल्या सांगोपांग विचार मथंना मुके खुप गोष्टींची उकल झाली. लेख व प्रतीसाद आवडले.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Mon, 03/07/2022 - 17:51 नवीन
Sahana ह्यांनी काही महिन्या पूर्वी असा दावा केला होता. जेव्हा शेतकरी आंदोलन चालू होते तेव्हा. की तंत्र ज्ञान इतके प्रगत झाले आहे की . काही वर्षांनी ऊर्जा फुकट मिळेल ऊर्जा निर्माण करण्यास काहीच खर्च येणार नाही पण खरी स्थिती तर ही आहे . आज पण वायू,डिझेल,पेट्रोल वर च जग अवलंबून आहे. त्या साठी युद्ध होत आहेत. त्या साठी मीडिया मधील माहिती वर विश्वास कमी ठेवा आणि सत्य स्थिती वर स्व अनुभव घेवुन मत व्यक्त करावं.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 03/10/2022 - 17:48 नवीन
U.S. Under Secretary of State for Political Affairs Victoria Nuland यांचे वक्तव्य रोचक आहे ! काय म्हणतात त्या ? तर... युक्रेन मंदी बायोलॉजिकल रिसर्च फॅसेलिटीज हायेत, पन आम्हासनी काळजी हाय की त्याचा कंट्रोल रशियन सैन्य घेईल. हे काय कमी हाय का ? तर आता पुतीन बाबा रशियावाले म्हणत हायेत की जॉर्जिया मदी बी अश्याच लॅब्स बिब्स हायेत. कर्नल डग्लस उवाच :- जाता जाता :- रशियन डिफॉल्ट, गोल्बल एनर्जी शॉक, जागतिक अन्न-धान्य तुटवडा [ चीन साठा करतोय असं हिथच कुटतरी म्या लिवलं व्हता बघा. ] आणि गर्तेत जाणारा मूर्ख युरोप हे कोणत्या क्रमाने समोर येते ते पहाणे रोचक ठरणार आहे. ता.क :- जालिय भटकंतीतुन माझ्या वाचनात असे आले आहे की उध्या म्हणजे ११ मार्चला रशिया एक्सट्रर्नल इंटरनेट पासुन स्वतःला डिस्कनेक्ट करुन घेणार असुन .ru या कंन्ट्री कोड खाली त्यांच्या सर्व कंपन्या / साईट्स आणण्यास सांगितले गेले असुन ही मुदत बहुतेक आज पर्यंत आहे. ज्यांना या बातमीत रस असेल त्यांनी हे वाचायला हरकत नाही :- Russia’s denying that it’s about to cut itself off from the global internet, but it’s acting a lot like it विशेष :- We are witnessing the birth of Bretton Woods III :- Zoltan Pozsar

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- 'Life is like ice cream, enjoy it before it melts'
  • Log in or register to post comments
र
रावसाहेब चिंगभूतकर Fri, 03/11/2022 - 13:53 नवीन
रशिया स्वतः ला कट ऑफ करत नाहीये. तो रशियाच्या बाहेरून आत आणि आतून बाहेर जाणारा इंटरनेट ट्राफिक मॉनिटर आणि कंट्रोल करणार आहे असं वाटतंय. रशियन सर्व्हिसेस वर वेस्टर्न हॅकर्स कडून परिणाम होणार नाही हे ते पाहतायत. तसा प्रयत्न झाला तर तो मोडून काढणे त्यांना सोपे होणार आहे. थोडक्यात सांगायचे तर ते आपले सगळे डिजिटल नेटवर्क अभेद्य किल्ल्यात नेऊन ठेवत आहेत. It is a wise move. मला फक्त एक शंका आहे. शुक्रवार का? त्यानंतर असं काय रशिया करणार आहे?
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Fri, 03/11/2022 - 14:46 नवीन
आपल्या प्रश्नाचे उत्तर खुद्द पुतीन ह्यांना माहित नसेल. पण तुम्ही योग्य ठिकाणी हा प्रश्न विचारला आहे. कारण सर्वज्ञ कचुरे येथे आहेत. ते व केवळ तेच ह्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतात.
  • Log in or register to post comments
र
रावसाहेब चिंगभूतकर Sun, 03/13/2022 - 04:48 नवीन
कॉलिंग इन मिस्टर कचुरे.. कॉलिंग इन मिस्टर कचुरे.. प्लिज रिस्पॉन्ड.. यू आर अर्जंटली रिकवायर्ड हिअर..
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Sun, 03/13/2022 - 06:58 नवीन
ह्याचे उत्तर रशिया च्या गुप्त योजना आणि युद्ध निती ज्या यंत्रणा ठरवतात त्यांनाच ह्याचे उत्तर माहीत असेल. बाकी जी यंत्रणा त्याची अंमलबाजवणी करणार आहे त्यांना पण त्याचे उत्तर माहीत असण्याचे कारण नाही . त्या मुळे बाकी कोणाला त्याचे उत्तर माहीत असणे शक्यच नाही. किंवा फक्त बातमी फक्त पसरवली असेल त्या पेक्षा वेगळीच निती त्यांनी आखली असेल. आणि महत्वाचे. इथे मला फक्त माझे विचार व्यक्त करायला आवडतात.. कोणत्याच आयडी शी वैयक्तिक दोष आरोप करण्यात मला बिलकुल इंटरेस्ट नाही.
  • Log in or register to post comments
T
Trump Fri, 03/11/2022 - 14:50 नवीन
शुक्रवार का?
बहुतेक काही गडबड झाली तर दुरुस्त करण्यास वेळ असावा. शनिवारी आणि रविवारी व्यावसायिक व्यवहार बंद असतात.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 03/18/2022 - 18:46 नवीन
रशियन डिफॉल्ट, गोल्बल एनर्जी शॉक, जागतिक अन्न-धान्य तुटवडा [ चीन साठा करतोय असं हिथच कुटतरी म्या लिवलं व्हता बघा. ] आणि गर्तेत जाणारा मूर्ख युरोप हे कोणत्या क्रमाने समोर येते ते पहाणे रोचक ठरणार आहे. Russia seems to have averted its historic bond default — for now पुतिन बाबा रशियावाले यांनी हा मोठ्ठा धोका सध्या तरी टाळलेला दिसतोय... पाहुया पुढे काय होते. तुलसी ऑन बायो लॅब्स :- जाता जाता :- Why it matters if Saudi Arabia sells oil in Chinese yuan instead of US dollars

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- "No nation has friends only interests." - Charles de Gaulle
  • Log in or register to post comments
म
मूकवाचक Fri, 03/11/2022 - 14:16 नवीन
जगाच्या पाठीवरून धर्म नाहीसे केले तर युद्ध/ संघर्ष बंद होऊन चौफेर प्रगती होईल या अंधश्रद्धेला छेद देणारे बरेच संघर्ष होत आलेले आहेत. रशिया - युक्रेन संघर्ष त्यादृष्टीने एक मैलाचा दगड ठरू शकेल.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 03/11/2022 - 14:27 नवीन
यांच्या मधील युद्ध, हे असेच एक आठवलेले उदाहरण... चीन आणि तिबेट, असेच एक दुसरे उदाहरण उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया, अद्याप देखील शीतयुद्ध करत आहेत... जपानचे, कोरियावर झालेले आक्रमण, हे अजून एक उदाहरण इसिस हे अजून एक उदाहरण ... त्यामुळे, तुमच्या मताशी सहमत आहे.... साधारणतः चालतेबोलते सजीव, साम्राज्य वाढवतच असतात किंवा रक्षण देखील करत असतात....कुत्री देखील, आपापली गल्ली सांभाळून असतात...
  • Log in or register to post comments
T
Trump Fri, 03/11/2022 - 14:54 नवीन
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sat, 03/12/2022 - 07:05 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
T
Trump Sat, 03/12/2022 - 19:59 नवीन
एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आहे. ह्या युध्दामध्ये माध्यमांची भुमिका प्रामुख्याने आहे.
  • अमेरीकन माध्यमे आणि युके माध्यमे: युक्रेनच्या बाजुने युध्दज्वर भरपुर आहे, लष्करी मदत, रशियावर बंधने यांची रेलचेल आहे. पण श्री झेलेन्स्की व श्री पुतीन यांनी समझोत्यासाठी केलेली आवाहने मात्र वगळण्यात आली आहेत. चि. तुलसी यांची Tulsi Gabbard: They want this to continue ( https://www.youtube.com/watch?v=FtGnDNeAQVk ) मुलाखत बघण्यासारखी आहे. युध्दनिर्वासित मात्र घेण्याबद्दल कोणतीही चर्चा नाही. तुम्ही लढा आम्ही शस्त्रे पुरवतो अश्या पध्दतीने आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे.
  • युरोपियन माध्यमे: तोडांच्या वाफा, रशियावर असलेल्या अवलंबत्वाची जाणिव, शक्य तेवढी निर्वासितांना मदत. सुरवातीला असलेला जनतेचा युक्रेनबद्दलचा दृष्टीकोन बदलला आहे, वाढत्या विद्युतपुरवठ्याच्या किंमती, रशियाने सरकारीकरण केल्यानंतर होणारे नुकसान याची जाणिव हळुहळु होत आहे, त्यामुळे जमिनीवर पाय येत आहेत. सुरवातीला असलेला वंशभेदी अंदाज आता जाहीररित्या दाखवत नाहीत. https://www.dw.com/en/
  • भारतीय माध्यमे: रिपब्लिक आणि वियॉन यांचे सादरीकरण बघण्यासारखे आहे. बहुतांशी तटस्थता आहे. श्री अर्नब गोस्वामी यांच्या चर्चेत परदेशी पाहुणे बोलावले असतात. श्री गोस्वामी त्यांना अवघड प्रश्न विचारतात. श्री शेखर गुप्ता यांचे विश्लेषण खोलवर आहे. काही माध्यमांना मात्र युध्दाचे दु:ख कमी आणि नवीन टिआरपी विषय मिळाल्याचा आंनद जास्त दिसतो आहे.
  • रशियन माध्यमे: बर्‍यापैकी शांतपणे मुद्दे मांडत आहेत. काही ठिकाणी श्री पुतीन आणि रशिया यांच्या धोरणावर चर्चा / टिका होत आहे. सध्याच्या निर्बंधामुळे त्यांच्या बातम्या मिळवणे अवघड झाले आहे.
---- ह्या फरकामुळे युध्द्दावर चर्चा करताना, समोरचा मनुष्य कोणते माध्यम बघतो ह्यावर त्याचे मत अवलंबुन आहे. जसे जसे दिवस जातील, तसे इतर विषय ह्या युध्दाची जागा घेतील. श्री झेलेन्स्किला युरोपियन बाजुला सारतील, युक्रेनियन जनतेला ह्या विनाकारण ओढावुन घेतलेल्या संकटाला स्वत:च तोंड द्यावे लागेल. रशिया एकदा ह्या संकटातुन निघाला की कायमस्वरुपी युरोपियन मक्तेदारीला धक्का लागणार आहे. चीन नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी जवळुन बघत असेल आणि तयारी चालु असेल.
  • Log in or register to post comments
T
Trump Sat, 03/12/2022 - 20:17 नवीन
रशियन राष्ट्रियकरण https://www.businesstimes.com.sg/government-economy/russian-prosecutors-up-oversight-of-foreign-firms-leaving-country https://www.reuters.com/business/autos-transportation/mercedes-benz-says-russian-nationalisation-could-threaten-22-bln-assets-2022-03-11/ https://www.washingtonpost.com/business/2022/03/10/russia-nationalize-foreign-business-ukraine/ https://edition.cnn.com/2022/03/10/business/russia-nationalization-western-companies/index.html https://www.traveldailymedia.com/russia-considers-nationalisation-of-aircraft-to-save-aeroflot/ https://www.reuters.com/business/autos-transportation/auto-truck-makers-suspend-some-business-russia-following-invasion-2022-02-28/
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 9 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 9 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 9 hours ago
  • सुंदर !!
    1 day 9 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 9 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा