Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

रिना : एक किस्सा

स
साहना
Fri, 02/04/2022 - 13:27
🗣 71 प्रतिसाद
सत्य आहे पण नावे आणि काही स्थळे बदलली आहेत. रिना वय २७ आमच्या ओळखीच्या व्यक्तीच्या ड्रायव्हरची मुलगी. परंपरागत व्यवसाय मासेमारी पण हिच्या वडिलांनी तो सोडून गाडी चालवणे आणि सुतारकाम सुरु केले. साधे कौलारू घर, मातीच्या भिंती. पर्वरीच्या बाहेर ग्रामीण भागांत नारळांची छोटीशी बाग आणि त्याच्या मागे हे घर. आई एका सहकारी बँकेत प्युन सदृश्य नोकरीवर. तसे कुटुंब गरीब असले तरी अतिशय सभ्य आणि कुणाच्या अध्यात ना मध्यात. रीना १२ पास. काय काम करते तर एका हॉटेलांत रिस्पेशनिस्ट म्हणून आहे असे वडिलांनी सांगितले. ज्या परिसरांत होती तिथे मला पार्टी साठी जागा हवी होती. त्यावेळी हि साधारण २३ वर्षांची असेल. अचाट लोकेशन, मस्त लोक आणि अत्यंत जबरदस्त तयारी हिने फक्त फोन करून केली. मला खूपच आश्चर्य. मी थोडी मैत्री वाढवली. इंस्टावर हि होती. साधे सोज्वळ फोटो. गणेश चतुर्थी, नारळांची बाग, आजचे मासे इत्यादी. मनगटावर एक टॅटू. पण काही हजार फॉलोवर्स. बहुतेक मंडळी रोडछाप रोमिओ, कॉलेज कुमार इत्यादी. प्रत्येक पोस्ट ला ५०-६० लाईक्स. फक्त एक दिवस एका फॅन्सी रेस्टोरंटचा फोटो. हे रेस्टोरंट ताज मधील रेस्टोरंट होते हे मी डेकोर वरून तात्काळ ओळखले. आता लोक खोटे फोटो आपले म्हणून टाकतात पण हिच्या फोटोंत तिचा टॅटू वाला हात स्पष्ट दिसत होता. काही वेळांतच फोटो डिलीट झाला. मग मी हिचे इतर मित्र पहिले त्यातील काहींना तात्काळ ओळखले. ह्यांचे नाईट क्लब्स गोव्यांत होते. मग जास्त शोधून हिचा दुसरा इन्स्टा सापडला. मी थेट कॉल केला. आधी तिने उडवाउडावीची उत्तरे दिली पण मी जजमेंटल नाही म्हटल्यावर सर्व कथा समोर आली. हिचा दुसरा इन्स्ता अकाऊंट सुद्धा तिने मला दिला. थोडक्यांत हि कथा समोर आली. एखादी सध्या गरीब मध्यमवर्गीय घरांतील मुलीला इन्स्ता वर हेरले जाते. दिसायला सुंदर असली थोडी आत्मविश्वास दाखवणारी असली तर मग तिला फोन येतो "मी श्रिया, अमुक PR मार्केटिंग तर्फे. आपण आपल्या भागांतील लोकल इन्स्ता सेलेब्रिटी आहात आपण स्पॉन्सर वाले फोटो टाकाल काय ?" मुलगी खुश होते आणि हो म्हणते. काही फोटो टाकायला ५०००, १०,००० अशी रक्कम घरबसल्या मिळते. मग हीच श्रिया तिला अमुक रेस्टोरंट मध्ये ट्रेनिंग साठी बोलावते. तिथे अतिशय सुंदर मुले मुली असतात. मस्त पैकी फुकट छान जेवण आणि मेकअप इत्यादी शिकवलं जातो. काही दिवसांत हि मंडळी मित्र होतात. मग नाईट क्लब मध्ये तोकड्या कपड्यांत ह्यांना आमंत्रण मिळते आणि तिथे फक्त राहायचे पैसे मिळतात. तिथे नेटवर्किंग होऊन आणखीन कामे मिळतात. ह्यांत VIP लोकांच्या लग्नात होस्टेस ते ट्रेड शो मध्ये होस्टिंग अख्या विविध प्रकारच्या कामाची संधी मिळते. मला ऐकताना मजा आली. शेवटी हे प्रकरण वेश्याव्यवसायाकडे येऊन थांबले असेल असे वाटले पण नाही. तिने ओळख करून दिलेल्या नाईट क्लब मालकाने मला आणखीन माहिती दिली. वेश्या प्रकरणात रिस्क जास्त आणि पैसे कमी आहेत असे त्याने सांगितले. ह्या धंद्यात सर्वांत जास्त फायदा प्रोटेक्ट करणाऱ्या माणसाला होतो, काम करणाऱ्या मुलीला नाही. बहुतांशी लोकल आमदार वगैरे मंडळी ह्या असल्या धंद्यात असतात आणि त्यांच्या नादाला शहाण्या माणसाने लागू नाही असे त्याचे मत होते. तरी सुद्धा काही मुली काही श्रीमंत लोकांना आवडू शकतात. पण तिथे काय होते ह्यांत ह्याला रस नव्हता. (casual sex भरपूर प्रमाणात चालते पण त्याची माहिती ह्या फोरम वर नको). ड्रग्स सुद्धा भरपूर प्रमाणात चालते. रिना ने गोव्यांत मला भरपूर गांजा उपलब्ध करून दिला होता तसेच हशिश वाले हुक्का बारची ओळख करून दिली होती (इथे ठराविक लोकांनाच प्रवेश मिळतो) , तिने स्वतः esctasy वगैरे ट्राय केले होते पण कोकेन आणि हिरोईन टाळले होते. तिच्या काही मैत्रिणींची हालत पाहून तिने हा निर्णय घेतला होता. बऱ्याच गोष्टी मी रिना कडून नंतर ऐकल्या. काही कार शो साठी ती दुबईला जाऊन आली होती. तिथे एका व्यक्तीने तिला OnlyFans वर काम करण्याची ऑफर दिली होती पण तिने घेतली नाही. काही काळ एका एजंट च्या मदतीने तिने लाईव स्ट्रीम्स करून पैसे कमावण्याचा विचार केला होता पण त्यातील लोक अत्यंत बे भरवशाचे होते आणि पैसे मिळत नव्हते म्हणून तिने सोडून दिले. (ह्यांत काही व्यक्ती मुलीला फक्त व्हिडीओ कॉल करून बोलायला पैसे देतात. ह्यांत मग विविध मागण्या आणि त्यासाठी जास्त पैसे ऑफर केले जातात. नक्की प्लॅटफॉर्म काय आहे ठाऊक नाही. ) एका मुंबईच्या व्यक्तीने तिला धोका दिला. तिला वेब्सिरीज शूट करू असे सांगितले. पहिला एपिसोड पायलट आहे आणि सर्वानी फ्री मध्ये काम करायचे. मग हा पायलट विविध लोकांना दाखवून पैसे उभारायचे असे सांगितले. शूटिंग लोणावळा मध्ये होते. कुठल्याच सिन मध्ये १००% नग्नता नसेल असे सांगितले होते आणि जास्तीत जास्त बॅकलेस सिन असेल असे सांगितले होते. पण प्रत्यक्षांत शूटिंग थोडे जास्तच घाणेरडे करण्याच्या डिरेक्टर चा प्रयत्न होता. तिने विरोध केला तर तिला शिव्या देण्यात आल्या आणि जबरदस्ती करण्यात आली. पण तिने त्यांना जुमानले नाही. मेकअप विषयावर तिला सध्या बरीच गती असल्याने तिला विविध VIP लग्नात मेकअप आर्टिस्ट म्हणून मागणी होती त्यानिमित्ताने गोव्यांत तसेच अनेक काँट्रॅक्स मिळाली. रिना ला टॅटू चे भयंकर प्रेम आहे. मला वाटले फक्त हातावरच असेल पण आज पर्यंत तिने एकूण ३० टॅटू काढले आहेत, नितम्ब पासून पोटापर्यंत अनेक ठिकाणी. प्रत्येक टॅटू काही ना काही कारणास्तव. कोविड झाला तर त्याची आठवण म्हणून एक टॅटू इत्यादी. तिच्या पालकांनी बराच विरोध केला होता म्हणे. काही टॅटू त्यांना ठाऊक सुद्धा नाहीत. सध्या ती TIKTOK आणि इंस्टाग्राम वर स्टार आहे. तिच्या छुप्या ID ला हजारो फॉलोवर्स असून विविध ठिकाणाची जाहिरात करण्यासाठी तिला हजारो रुपये मिळतात. ह्या सर्व कामाचे दुष्परिमाण तिच्या मते म्हणजे दोन जिवने जगणे. लोक आपल्याला एस्कॉर्ट/वेश्या समजतील हि भीती आणि काही लोकांनी जबरदस्ती करण्याचा केलेला प्रयत्न. इथे मी काहीही व्हॅल्यू जजमेंट करत नाही. किस्सा मनोरंजक वाटलं म्हणून लिहिला.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 27013 views

🗣 चर्चा (71)
र
रावसाहेब चिंगभूतकर Fri, 02/04/2022 - 14:50 नवीन
ह्या सर्व कामाचे दुष्परिमाण तिच्या मते म्हणजे दोन जिवने जगणे.
ही सगळ्यात भयंकर गोष्ट असते. माझ्या अंदाजाने ही मुलगी डिप्रेशन / स्प्लिट पर्सनॅलिटी इत्यादी गोष्टींचा शिकार होण्याची शक्यता आहे. मनावरचा ताण मन काही काळ सहन करू शकते, पण मनालाही मर्यादा असते.
  • Log in or register to post comments
ॲ
ॲबसेंट माइंडेड… Fri, 02/04/2022 - 15:00 नवीन
निर्लज्जम सदा सुखी. तुम्हाला वाटतय तसं काही होणार नाही. ती मुलगी ॲालरेडी वेश्याव्यवसायात मुरली असणार हे तिचा बायोडेटा सांगतोय.
  • Log in or register to post comments
र
रावसाहेब चिंगभूतकर Sun, 02/06/2022 - 08:22 नवीन
तसं असतंच असं नाही. माणूस हा प्राणी थोडा कॉम्प्लिकेटेड आहे. किती रेषा आखायच्या आणि कुठे आखायच्या याची प्रत्येकाची कल्पना वेगवेगळी असते. असो, लेखिकेने ते तसं नाही आधीच लिहिलंय आणि माझ्या मते तसं असतं तर लेख वेगळ्या विषयावर झाला असता.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Fri, 02/04/2022 - 17:36 नवीन
आपल्याला माहीत नसतात .लोक काय काय करून पैसे कमावतील सांगता येत नाही ते चांगल की वाईट हे आपण ठरवू शकत नाही. पण विरोधाभास वाटतो. एकी कडे स्त्री सन्मान ना साठी लढा द्यायचा आणि दुसरीकडे विकावू वस्तू म्हणून बाजार मांडायचा. ही परस्पर विरोधी विचारधारा आहे. पुरुष पण शरीर विक्रीस ठेवतात असे ऐकून आहे. कष्ट विकणे,स्किल विकणे,बुद्धी विकणे ,हे समजू शकतो पण शरीर विकणे हे समजणे अवघड जाते.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Sat, 02/05/2022 - 05:10 नवीन
कष्ट, स्किल, बुद्धी इत्यादी शरीर माध्यम उपलब्ध असेल तरच उत्पन्न होते. त्यामुळे शरीर विकले म्हणून अवघड वाटून घेऊ नका. काही काही लोकं तर न दिसत असलेला आत्मा देखील विकतात.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sat, 02/05/2022 - 06:01 नवीन
पाश्चिमात्य सेक्स वर्कर्सचा नजरीया पाहण्यासाठी हा व्हिडीओ उद्बोधक आहे-
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 02/11/2022 - 12:37 नवीन
भारी आहे हा व्हिडिओ !
  • Log in or register to post comments
श
शानबा५१२ Fri, 02/04/2022 - 19:07 नवीन
'मोबईल + ड्र्ग्स + माणुस' ही वेगळी व्यक्ती असते व 'माणुस' ही वेगळी व्यक्ती असते.
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Sat, 02/05/2022 - 04:29 नवीन
ऐकावे ते नवलच. इंस्टा पैसे देते हे तरी खरे होते का कोणती लोकल एजनसी होती. कारण ट्विटर असे पैसे खरच देते हे माहीती आहे. मुलगी लाथ मारील तेथे पाणी काढील या प्रकारातली दिसतेय. बाय हुक ओर क्रुक ती पुढे पुढेच जाईल.
  • Log in or register to post comments
स
साहना Sun, 02/06/2022 - 08:17 नवीन
पैसे इन्स्ता देत नाही. पैसे लोकल मंडळी देतात ज्या अश्या मुलींना हेरतात.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 02/05/2022 - 10:49 नवीन
१००१ लिहितात पण मला ६००चं मिळालं होतं. (रिचार्ड बर्टन) तसला प्रकार वाटतो आहे.
  • Log in or register to post comments
न
निनाद Sun, 02/06/2022 - 06:57 नवीन
जबरी आहे हा किस्सा!
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Sun, 02/06/2022 - 07:58 नवीन
खतरनाक किस्स्सा !
  • Log in or register to post comments
T
Trump Sun, 02/06/2022 - 08:00 नवीन
उत्तम लेख. आई - बापाचे वाईट वाटते आहे. जेव्हा त्यांना हे सगळे समजेल तेव्हा त्यांना प्रचंड धक्का बसेल.
  • Log in or register to post comments
स
साहना Sun, 02/06/2022 - 08:18 नवीन
सध्या तरी आईवडिलांना काही तरी माहिती असेल असे वाटते पण झाकली मूठ सव्वा लाखाची आणि पैसे येत आहेत म्हणून त्यांनी कानाडोळा केला आहे असे वाटते.
  • Log in or register to post comments
T
Trump Sun, 02/06/2022 - 08:21 नवीन
असेच असेल.
सध्या तरी आईवडिलांना काही तरी माहिती असेल असे वाटते पण झाकली मूठ सव्वा लाखाची आणि पैसे येत आहेत म्हणून त्यांनी कानाडोळा केला आहे असे वाटते.
मग आई-वडीलांनी लग्नाचे बघायला सुरु केले का? त्यावेळी हे पुर्णपणे उघड होण्याची शक्यता आहे. अश्या मुली शक्यतो लग्नाला लवकर तयार होत नाहीत, आणि प्रेमविवाह करतात.
  • Log in or register to post comments
स
साहना Sun, 02/06/2022 - 09:50 नवीन
बरेच बॉयफ्रेंड आहेत. त्यामुळे लग्नाचं बघायची पाळी आईवडिलांवर येईल असे वाटत नाही. त्याशिवाय हा प्रकार काही जास्त काळ चालणार नाही ह्याची जाणीव तिलाही आहे कारण शेवटी मागणी तरुण मुलींना जास्त असते.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Sun, 02/06/2022 - 08:39 नवीन
एमोशन लेस सेक्शुअल ॲक्टिविटी अनोळखी व्यक्ती बरोबर करणे हे खूप मानसिक त्रास देणारे काम आहे प्रवसात ,गर्दीत तृतीय पंथीय लोकांनी किंवा होमिसेक्शुअल लोकांना आपल्याला नको तिथे स्पर्श केला की भयंकर चीड येते रोज तोच व्यवसाय करायचा असेल तर स्त्री ला पण अनोळखी पुरुषाशी सेक्शुअल activity करणे हे खूप चीड आणणारे काम तिच्या साठी असू शकते. भयंकर मानसिक ताण नक्कीच सहन करावा लागत असेल. तीच बाब पुरुषांचा पण तोच व्यवसाय असेल तर दिवसातून दोनतीन स्त्रियांशी सेक्शुअल activity करणे मना विरुद्ध फक्त प्रोफेशन आहे म्हणून खूप मनस्ताप देणारे असू शकते
  • Log in or register to post comments
T
Trump Sun, 02/06/2022 - 09:07 नवीन
जास्त विचार केले की असे त्रास होतात. जर विचारच नाही केला आणि आहे त्यांची मजा घेतली तर त्रास कसा होईल. तुम्ही दिलेल्या उदाहरणांमध्ये अपरिहार्यता आहे, पण त्या मुलीच्या बाबतीत लागु नाही.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Sun, 02/06/2022 - 08:58 नवीन
मानवी मनाचा थांग लागणं मुश्किल ही नही ना मुमकिन है। कुठलीही अवैध गोष्ट पहिल्यांदा मनाला कचौटते पण एकदा का निर्ढावले की रस्ता सुसह्य कदाचीत वाटूनौ घेतला जातो. घटा घटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे.
  • Log in or register to post comments
स
सुरसंगम Sun, 02/06/2022 - 10:18 नवीन
पाश्चिमात्यकरण पाश्चिमात्यकरण असं जे म्हणतात ते हेच. साहनातै तुम्हीच या विषयाला तोंड उघडलंत म्हणुन बरं. तुम्ही जे ह्यांत काही व्यक्ती मुलीला फक्त व्हिडीओ कॉल करून बोलायला पैसे देतात. ह्यांत मग विविध मागण्या आणि त्यासाठी जास्त पैसे ऑफर केले जातात. नक्की प्लॅटफॉर्म काय आहे ठाऊक नाही. ) हे तुम्हाला अमेरिकेत राहुन सुध्दा माहित नाही याचं थोडं आश्चर्य वाटतं. सध्या पैसे कमावण्याचे हेच या लोकांचे साधन आहे. दिवसरात्र ते ऑन्लाईन असतात. मला याचं आश्चर्य वाटतं की यात भारतातील स्त्री मुलगी एकटी (सोलो) तर आहेच परत मुलामुलींचा समुह (ग्रुप) आणि सगळ्यात अचाट म्हणजे लग्न झालेले नवरा आणि बायको दोघे यात भाग घेतात. हि संख्या दिवसेंदिवस वाढतंच चालली आहे. इथे बघणारा जसं सांगेल तसे हे लोक करतात. यात काहीतरी सगळ्यांना लाईव्ह सेक्स च्या साईटवर ते सगळे काय करतात ते पहता येते. आणि फक्त टोकन देणार्या व्यक्ती त्यांच्याशी बोलु शकतात किंवा खाजगीत( प्रायव्हेट विंडोत ) बोलता येत त्यासाठी पैसे कसे खर्च करतात आणि ते त्या मुलींना जोडप्यांना कसे मिळतात हे अजिबात समजत नाही. काहीतरी ऑन्लाईन पेमेंट असेल. दुसरी एक गोष्ट समजत नाही हजारो कि.मी. दुर असलेला कोणी टोकन ने पैसे देतो तेव्हा ती मुलगी चेकाळुन ओरडते खर्या सेक्सचा अनुभव घेतल्या सारखी कारण की तिने आपल्या गुप्तांगात एक थरथरणारा फुगा (व्हयब्रेटर) ठेवलेला असतो जो टोकन मिळाल्यावर ३ , ५ सेकंदकरिता थरथरतो. आता हे कसं होतं कुणी इस्कटुन सांगेल काय? हे सर्व अचाट अशा तर्हेने आपल्याच बायकोबरोबर सर्वांच्या देखत रोज हनिमुन साजरा करुन यांना काहिच कसे वाटत नाही हेच पटत नाही. यांच्या नातेवाई़कांनी ( ते सुध्दा हे कधी ना कधी पहणारच )ओळ्खलं तर हा विचार यांना येत नसेल काय? हे ते तुम्ही म्हंटलेले व्यासपीठ (प्लॅटफॉर्म).
  • Log in or register to post comments
स
साहना Mon, 02/07/2022 - 11:48 नवीन
> पाश्चिमात्यकरण पाश्चिमात्यकरण मला नाही इथे पाश्चिमात्य कारणाचा संबंध वाटत. आर्थिक दृष्टया पुढारलेल्या लोकांत तंत्रज्ञान आधी पोचते आणि त्यामुळे ती मंडळी ते तंत्रज्ञान आधी वापरू लागतात. गरीब देशांत ते नंतर येते त्यामुळे त्याचा वापर कदाचित नंतर होतो. वरकरणी त्यामुळे हे कुणाचे अनुकरण आहे असे वाटते पण ते सत्य नाही. लैंगिकता आणि भारतीय ह्यांचे नाते फारच जुने आहे. पाश्चात्य देशांत लैगिक खेळणी ठाऊक सुद्धा नव्हती तेंव्हा त्यावर विस्तृत अभ्यासपूर्ण लेखन भारतीयांनी आणि अरब लोकांनी केले होते. भारतीयांनी विविध प्रकारची लैगिंगता, सुखाचे प्रयोग इत्यादी केले होते आणि भारतीय कला आणि साहित्यातून त्याचे दर्शन आम्हाला घडत होते. एक प्रगत आणि आत्मविश्वासू समाजाचे ते द्योतक होते. फक्त कामसूत्र नाही तर इतर विविध पुस्तकांत, लैगिक सुख ह्याला खूपच महत्व दिले होते आणि वारांगना, गणिका, इत्यादी विविध प्रकारच्या सेवा उपलब्ध होत्या. अश्या सेवांचा लाभ घेणे हे समृद्धीचे आणि पुरुषत्वाचे द्योतक होते. अश्या नगरवधूंना कमी लेखले जात नसे आणि त्यांना समाजांत प्रतिष्ठा होती. मृस्च्छकटिक मध्ये वसंतसेना आणि चारुदत्त शेवटी एकत्र राहतात. चारुदत्ताची पत्नी सुद्धा त्यांचा सोबत राहते. गिरीश कर्नाड ह्यांनी ह्या विषयावर चित्रपट बनवला तेंव्हा त्यांनी हा शेवट बदलला. त्यांना काही लोकांनी विचारले तेंव्हा एका वारांगनेला सुखांत देणे त्यांना म्हणे नैतिक दृष्ट्या बरोबर वाटले नाही. म्हणजे ह्या तथाकथित पुरोगाम्यांच्या हृदयांत वसंतसेनेविषयी आदरभाव नव्हता तो भवभूतीने त्या काली दाखविला होता. शिवलीलामृत हे एक चांगले उदाहरण आहे. ह्यांतील ११व अध्याय आहे त्यांत "पत्रीव्रता वेश्या" आहे. हा अध्याय सर्वांत अधिक वाचला जाणारा अध्याय आहे आणि अनेक स्त्रिया ह्याचे पारायण दररोज करतात. वेश्या, गणिका, वारांगना, नगरवधू असे साधारण ७ प्रकार अश्या स्त्रियांचे होते आणि प्रत्येकाला समाजात वेगळ्या प्रकारचा मान सन्मान होता. हे प्रकार समाजमान्यतेने साधारण इस्लाम येई पर्यंत चालले. तो पर्यंत हे पाश्चात्यांचे अंधानुकरण नव्हते. आणि असे म्हणू शकते कि ह्या क्षेत्रांत भारत आघाडीवर होता. चाणक्याच्या अर्थशास्त्र पुस्तकांतून २३०० वर्षे मागे भारतांत गणिका संबंधी काय कायदे होते आणि तिथे काय चालत असे ह्यांची भरपूर माहिती मिळते. बरे ते सोडून द्या. धार्मिक आणि अध्यात्मिक साहित्याचे उदाहरण घ्या. १८४० साली सर एडविन अरनॉल्ड नावाच्या इंग्रजाने ह्या पुस्तकाचे भाषांतर सुरु केले पण काही प्रकरणे त्याने घाबरून भाषांतरित केली नाही कारण त्याच्या मते पाश्चात्य लोकांना ते पचले नसते. त्याच्या मते भारतीय लोक अत्यंत घाणेरडे आणि असुंस्कृत असल्याने अश्या प्रकारच्या गोष्टी त्यांच्या काव्यांत अंतर्भूत होतात. पण भारतीयांचा दृष्टिकोनातून गीत गोविंद काव्याचा सर्वोत्तम नमुना आहे. साधारण १८३० ते १९४० ह्या दरम्यान विविध इंग्रज अभ्यासकांनी भारतीय कला, धर्म, संस्कार आणि प्रथांवर प्रचंड टीका केली. त्यांच्या मते लैगिंगकते वर भारतीयांनी दिलेला भर हा त्यांच्या विकृत पणाचा पुरावा होता. एका इंग्रज अभ्यासिकेने तर भारतीय स्त्रियांना लाज आणि शरम नाही आणि म्हणून कुणासोबतही शय्यासोबत करायला त्यांना लाज वाटत नाही असे लिहून ठेवले होते आणि ह्याचे खापर तिने "विकृत" अश्या भगवान कृष्णावर फोडले होते. एके ठिकाणी तिने असेही लिहिले होते भारतांत स्त्रिया कोवळ्या वयांत लग्न करतातं आणि त्यांच्या पुत्रांनाच तिच्या विषयी आसक्ती निर्माण होते आणि त्याचेच परिणाम म्हणून भारतीय कलेंत लैगिंगकते विषयी शरम वाटत नाही. इस्लामिक आक्रमणे सुरु झाली तेंव्हा ह्या गोष्टी बदलल्या. स्त्री म्हणजे उपभोग्य जनावर इतकाच काय तो इस्लामिक दृष्टिकोन असल्याने त्यांना हि जटिल सिस्टम काही समजली नाही त्यामुळे ह्या संस्था बंद होऊन त्याच्या जागी फक्त साधे कुंटणखाने निर्माण झाले. इस्लामिक शासकांनी स्वतःची भूक प्रचंड असल्याने बहुतेक स्त्रिया त्यांच्या जनानखान्यात रखेल म्हणून बंदिस्त झाल्या. १८५७ च्या युद्धांत ह्या वेश्यांची महत्वाची भूमिका होती आणि त्याचे निमित्त करून इंग्रजांनी आपली नैतिकता भारतीयांवर लादली. लैगिंगता विषयी गंड बाळगणे हे एक ख्रिस्ती आणि त्या दृष्टिकोनातून एक पाशात्य संस्कार आहे. ह्याला विविध कारणे आहेत पण इथे वेळे अभावी लिहीत नाही. चर्च आणि ख्रिस्ती धर्माच्या बंधनातून सुटण्याची युरोप मध्ये जी धडपड झाली त्यांतून लैगिक मुक्ती हे पाश्चात्य समाजाचे के ध्येय होते. त्या काली भारतांत आधीपासूनच लैगिक विविधता होती आणि भारतीयांना असल्या मुक्तीची काहीही गरज नव्हती. मागील १०० वर्षांत भारतीय लोक खऱ्या अर्थाने ख्रिस्ती नैतिकता आत्मसात करते झाले आणि पाश्चात्य समाज त्यांतून मुक्त झाला. आज काही हिंदुत्वादी संघटना अजंता एलोरा हे एक ब्रिटिशांचे षडयंत्र आहे किंवा, रास लीला म्हणजे काही तरी उद्दात उच्चकोटीची तांत्रिक क्रिया आहे किंवा कालिदासाचे कुमारसंभव हे इस्लामिक लोकांनी बदलले असल्या मूर्खपणाच्या गोष्टी बोलतात तेंव्हा ह्यांचे किती ख्रिस्तीकरण झाले आहे हे समजते ! माझ्या मते लैगिंगकता आणि तिथे पैश्यांची अदलाबदल होत असेल तरी सुद्धा ते आपोपाप अनैतिक होत नाही. ज्याप्रमाणे कुणाला शाकाहारी अन्न आवडते आणि काहींना मास मच्छी त्याच प्रमाणे लैगिंगता सुद्धा तशीच वैविध्याने नटलेली आहे. शाकाहारी माणसाला मांसाहाराची किळस येणे शक्य आहे आणि फक्त चहा पिणार्याला दारू आवडणार नाही. पण त्यामुळे एकाचे ते नैतिक आणि दुसऱ्याचे ते अनैतिक असे ठरत नाही. फक्त लैगिक सुखासाठी जगणे किंवा क्षणिक सुखासाठी खूपच अपव्यय करणे आणि दारू पिऊन यकृत खराब करून घेण्यासारखे आहे. ते चुकीचे वर्तन ठरते पण अनैतिक ठरत नाही. लैगिक संबंधांना अत्यंत खाजगी मानून त्याबद्दल ठरविक तत्वे ठेवून जगणारे लोक संकुचित विचारांचे किंवा बुरसटलेले आहेत असेही नाही. पाश्चात्य संस्कृतीत जेंव्हा लोकांना ख्रिस्ती प्रभावावर हल्ला करायचा होता तेंव्हा सर्वच ख्रिस्ती विचारांवर त्यांनी अश्या प्रकारचा हल्ला करून टोकाची भूमिका घेतली. त्यातून अनेक स्त्री मुक्ती लोकांनी अगदीच नग्न होऊन फिरणे, मुद्दाम हुन गर्भपात करवून घेणे आणि कसे आपण एका अर्भकाला मारले ह्याचे उद्दातीकरण करणे इत्यादी गोष्टी केल्या. कालच एक व्हिडीओ वायरल झाला ज्यां ६ अमेरिकन मुली आपण भविष्यांत कधी गरोदर राहिलो तर मुद्दाम आपल्या गर्भांना मुद्दामहून ठार मारू अशी शपथ घेताना दिसल्या. हि टोकाची भूमिका आहे. सुदैवाने भारतीय स्त्रियांनी ह्याला अजून तरी देशांत स्थान दिले नाही. ह्या उलट बाबा रामदेव किंवा अग्निवीर सारखी मंडळी लैगिंगते विषयी ख्रिस्ती सदृश्य भूमिका घेतात तेंव्हा मात्र ते जुन्या पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण आहे असे मला तरी वाटते. ओबी वन कानोबी ने म्हटल्या प्रमाणे "Only a sith deals in absolutes" टीप: हिंदू लोक गाय खात नाहीत हे समजते पण डुक्कर का खात नाहीत ? बुद्धांचा मृत्यू डुक्कर खाताना झाला. अर्जुन किरात युद्ध हे वराहाला कोणी मारले ह्यावरून झाले मग हिंदू अन्नातून वराह गायब कसा ? आसाम आणि पूर्वेकडे मात्र हिंदू वराह खातात. ह्याचे कारण म्हणजे इस्लामिक नैतिकता हिंदू लोकांनी आत्मसात केली. आज तो हिंदू धर्माचा भाग आहे. डुककर खाणे हे गे खाण्याप्रमाणेच धार्मिक पाप मानले जाते.
  • Log in or register to post comments
T
Trump Mon, 02/07/2022 - 11:55 नवीन
तोच प्रश्न मलाही पडतो. कामसुत्र आणि खजुराहो सारखे शिल्पे तयार करणारा समाज, हा लैंगिकतेमधे इतका कसा बदलु शकतो.
आज काही हिंदुत्वादी संघटना अजंता एलोरा हे एक ब्रिटिशांचे षडयंत्र आहे किंवा, रास लीला म्हणजे काही तरी उद्दात उच्चकोटीची तांत्रिक क्रिया आहे किंवा कालिदासाचे कुमारसंभव हे इस्लामिक लोकांनी बदलले असल्या मूर्खपणाच्या गोष्टी बोलतात तेंव्हा ह्यांचे किती ख्रिस्तीकरण झाले आहे हे समजते !
पश्निम भारतात डुक्कर खातात.
टीप: हिंदू लोक गाय खात नाहीत हे समजते पण डुक्कर का खात नाहीत ? बुद्धांचा मृत्यू डुक्कर खाताना झाला. अर्जुन किरात युद्ध हे वराहाला कोणी मारले ह्यावरून झाले मग हिंदू अन्नातून वराह गायब कसा ? आसाम आणि पूर्वेकडे मात्र हिंदू वराह खातात. ह्याचे कारण म्हणजे इस्लामिक नैतिकता हिंदू लोकांनी आत्मसात केली. आज तो हिंदू धर्माचा भाग आहे. डुककर खाणे हे गे खाण्याप्रमाणेच धार्मिक पाप मानले जाते.
  • Log in or register to post comments
र
रावसाहेब चिंगभूतकर Mon, 02/07/2022 - 13:34 नवीन
तुमचा हा पाराग्राफ ढापुन व्हाट्सअप्प वर टाकायला तुमची काही हरकत नाही ना?
  • Log in or register to post comments
स
साहना Mon, 02/07/2022 - 19:17 नवीन
बिनधास्त . फक्त शुद्धलेखनाच्या काही चुका आहेत त्या शोधीत केल्या तर बरे होईल असे वाटते.
  • Log in or register to post comments
न
निनाद Mon, 02/07/2022 - 23:47 नवीन
सुरेख प्रतिसाद आहे हा. अगदी दोन वेळा वाचावा असा. ख्रिस्ती नैतिकता आणि व्हिक्टोरियन विचारसरणी लादली गेल्याने इतकाच बदल सुचवतो. मागील १०० वर्षांत भारतीय लोक खऱ्या अर्थाने ख्रिस्ती नैतिकता आत्मसात करते झाले अगदी खरे आहे. पुर्वी लग्न पत्रिका सुद्धा 'शरिर संबंध करण्याचे योजले आहे'असे सरळ साधे लिहिलेल्या असायच्या. आणि पाश्चात्य समाज त्यांतून मुक्त झाला. असहमत आहे! काही भाग झालाही असेल पण आजही कॅथोलिक आणि इतर ऑर्थोडॉक्स समाज यातून अजिबात मुक्त झालेला नाही. इतका सुंदर प्रतिसाद आहे की याचा एक स्वतंत्र लेख व्हायला हवा असे वाटले.
  • Log in or register to post comments
T
Trump Tue, 02/08/2022 - 07:06 नवीन
जुन्या आठवणी जाग्या झाल्या. मागील १०० वर्षांत भारतीय लोक खऱ्या अर्थाने ख्रिस्ती नैतिकता आत्मसात करते झाले अगदी खरे आहे. पुर्वी लग्न पत्रिका सुद्धा 'शरिर संबंध करण्याचे योजले आहे'असे सरळ साधे लिहिलेल्या असायच्या. एक विरोधाभास: फ्रान्स कॅथोलिक आहे. मी माझ्या मित्रांना नेहमी विचारतो. तुम्ही कोणत्या बाजुने कॅथोलिक आहात! मला तर तो प्रात्याक्षिक विनोद वाटतो. आणि पाश्चात्य समाज त्यांतून मुक्त झाला. असहमत आहे! काही भाग झालाही असेल पण आजही कॅथोलिक आणि इतर ऑर्थोडॉक्स समाज यातून अजिबात मुक्त झालेला नाही.
  • Log in or register to post comments
T
Trump Tue, 02/08/2022 - 07:13 नवीन
फिलीपाईन्स हा पण कॅथोलिक आहे. पण तिथे लिंगबदल, मिश्रलिंगत्व, हे सहजपणे स्वीकारले जाते. शब्द सुचवा: ladyboy, transgender
आणि पाश्चात्य समाज त्यांतून मुक्त झाला. असहमत आहे! काही भाग झालाही असेल पण आजही कॅथोलिक आणि इतर ऑर्थोडॉक्स समाज यातून अजिबात मुक्त झालेला नाही.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Tue, 02/08/2022 - 06:56 नवीन
हा प्रतिसाद निव्वळ अप्रतिम आहे ! इतर प्रतिसादांच्या प्रवाहात हा विस्मरणात जाऊ नये म्हणुन ह्यावर स्वतंत्र धागा - हिंदुंचे पाश्चात्यीकरण असा काहीसा स्वतंत्र लेख काढावा अशी नम्र विनंती करीत आहे . इंद्रियोपभोग , आहार , विहार , आचार , विचार ह्या बाबतीत हिंदु धर्म, ( सनातन वैदिक धर्म) एकुणच खुप मुक्त आणि ओपन माईंडेड होता , वाळवंटी धर्माच्या लोकांनी आपल्यावर त्यांच्या अचाट अनाकल्नीय कल्पना लादल्या अन आता आपलीच माणसे त्या मुर्खागमनी संकल्पनांना कवटाळुन बसले आहेत ! काय बोलणार ! आपण काही बोलायला गेलो कि आपल्याला धर्मभ्रष्ट काफीर इन्फिडेल्स अन हीथन ठरवुन रिकामे होतात !
  • Log in or register to post comments
T
Trump Tue, 02/08/2022 - 07:01 नवीन
अगदी अगदी. त्यामुळे भारतातील हिंदुना धर्मशिक्षण हवेच.
इंद्रियोपभोग , आहार , विहार , आचार , विचार ह्या बाबतीत हिंदु धर्म, ( सनातन वैदिक धर्म) एकुणच खुप मुक्त आणि ओपन माईंडेड होता , वाळवंटी धर्माच्या लोकांनी आपल्यावर त्यांच्या अचाट अनाकल्नीय कल्पना लादल्या अन आता आपलीच माणसे त्या मुर्खागमनी संकल्पनांना कवटाळुन बसले आहेत ! काय बोलणार ! आपण काही बोलायला गेलो कि आपल्याला धर्मभ्रष्ट काफीर इन्फिडेल्स अन हीथन ठरवुन रिकामे होतात !
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Sun, 02/06/2022 - 10:56 नवीन
1)बायको व्यतिरिक्त दुसऱ्या स्त्री शी संबंध करणे गैर आहे अनैतिक आहे. २) आपण पूर्ण शरीर उघडे ठेवू शकतो पण ज्याला गुप्तांग म्हणतात (ह्याला काही शास्त्रीय कारण नाही नैतिक कारण ) म्हणजे स्त्री पुरुष जनन इंद्रिय ही उघडी ठेवणे हे अनैतिक समजले जाते त्या मुळे ती बघायला मिळणे सहज शक्य नसते. बाकी ती पण बाकी अवयव सारखीच शरीराचे अवयव आहेत. ३) जो माल विकायचा आहे तो नैसर्गिक रित्या फुकट मिळालेल्या असतो त्या मध्ये तुम्हाला काहीच स्किल वापरायचे नसते. ४) माला ल गिऱ्हाईक मिळवण्यासाठी त्याचे महत्व पटवणे गरजेचे नसते. त्याचे महत्व नैसर्गिक भावनेने सर्वांना पटलेले असते. सहज काही न करता,कोणतीच investment न करता खात्री नी पैसे देणार तो उद्योग आहे म्हणून इझी मनी,आणि बिनाकष्ट मिळणारा पैसा . आणि अनैतिक तेची चादर ओढली असल्या मुळे पुरवठा खूप असून पण सहज न मिळणारी बाब. त्या स्पर्धा नाही. ह्या सर्व कारणामुळे हा उद्योग सध्या तरी तेजीत आहे. जेव्हा अनैतिक ची व्याख्या बदलेल जेव्हा जनन इंद्रियांना गुप्तांग असे समजले जाणार नाही. तेव्हा हा उद्योग बुडणार च आहे.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sun, 02/06/2022 - 15:14 नवीन
सुरसंगम,
आता हे कसं होतं कुणी इस्कटुन सांगेल काय?
तुम्ही म्हणालात तो स्पंदिक ( = व्हायब्रेटर ) बायकांचं खेळणं आहे. पुरुषांसाठी रियल टच नावाच्या खेळण्याचं संकेतस्थळ मी २०१० च्या आसपास बघितलं होतं. ते आता बंद पडून परत मर्यादित प्रमाणावर सुरु झालं आहे. त्याची कार्यपद्धती अशी होती प्रथम खेळणं युएसबी मार्गाने संगणकास जोडायचं. मग पुरुषाचा विशिष्ट अवयव सज्ज झाला की त्या खेळण्याच्या एका विशिष्ट पोकळीत ठेवायचा. मग खेळण्याचं झाकण लावायचं. नंतर त्याच संगणकावरनं संकेतस्थळावर जायचं आणि विशिष्ट चलचित्र फुल्लस्क्रीन करून पहायचं. त्या चलचित्राच्या तालावर खेळणं विशिष्ट संवेदना प्रदान करतं. हे संकेतस्थळ आता असं आहे : https://www.realtouch.com/ इथे थोडी माहिती आहे ( इंग्रजी दुवा ) : https://www.reddit.com/r/oculus/comments/3fxudt/possibly_nsfw_end_of_the_line_for_adult_toymaker/ रियल टच च्या प्रक्रमामागे वन टच हा संगणकीय संहितानिर्मिक आहे : http://onetouchscripter.com/ हे तंत्र आय.पी.व्ही.-४ च्या वेळचं आहे. हल्ली आय.पी.व्ही.-६ व आय.ओ.टी. च्या जमान्यात दूरस्थ उत्तेजना अधिकंच सहजशक्य आहे. आ.न., -गा.पै. वि.सू. : याचा समनामी भारतीय संकेतस्थळाशी काहीही संबंध नाही ( वा नसावा ) : http://www.realtouch.in/
  • Log in or register to post comments
स
साहना Sun, 02/06/2022 - 23:21 नवीन
"दूरस्थ उत्तेजना" सारखे शब्द प्रयोग करून मराठी भाषेच्या शब्दभांडारांत मोलाची भर घातल्याबद्दल धन्यवाद. ह्या विविध टेक बद्दल मला माहिती आहे. मागील अनेक वर्षांपासून मी LA मधील AVN शो मध्ये भाग घेत आहे आणि त्यांतील एका मोठ्या कंपनीसाठी मी काम सुद्धा केले आहे (ऍड टेक विभागांत). ह्यांत २-३ प्रोडक्ट्स सोडले तर कुठलाच विशेष लोकप्रिय झाला नाही. पुरुषांचा प्रोडक्ट तर नाहीच नाही (गे मंडळी सोडली तर). लॉवेसेन्स कि लावलेंस असा जो प्रोडकट आहे तो सध्या मार्केट लीडर आहे. त्याशिवाय अनेक प्रोडक्ट्स हे खाजगी वापरासाठी आहेत त्यात सॅमसंग, हिताची इत्यादी कंपन्यांनी गुप्त रूपाने गुंतवणूक करून ठेवली आहे. मी आधी लिहिले होते ज्यांत प्लॅटफॉर्म विषयी माहिती नव्हते असे लिहिले होते, ह्याचा अर्थ रिना ला कुठल्या प्लॅटफॉर्म ने ऑफर दिली होती ते मला ठाऊक नव्हते असा त्याचा अर्थ होता. हे क्षेत्र आणि त्याचे अर्थकारण ह्याचा मला भरपूर अनुभव व्यावसायिक दृष्टिकोनातून (ऍड टेक) आहे. रिना च्या मते तिला हे लाईव्ह प्रकरण आवडले नाही कारण त्यांत जास्त पैसा नव्हता. (ह्याचे ग्राहक बहुतेक करून मिडल एज विवाहित पुरुष असतात) . सध्या OnlyFans ची चालती आहे. हजारो भारतीय मुली ह्यांत गुंतलेल्या आहेत. माझ्या माहिती प्रमाणे अश्विथा हि मुलगी (जी मलेशिया आणि तिथून आता UAE मध्ये स्थायिक झाली आहे) हिस सर्वाधिक पैसे कमावणार्या मुलींपैकी एक आहे. पण ह्या व्यासपीठावर लाईव्ह काही होत नाही. हा सब्स्क्रिप्शन मॉडेल आहे. शेवटी काय लैगिक चाळे आणि लैगिक दृष्ट्या विचलित (deviant) लोकांची कमतरता आज नाही आणि पूर्वीही नव्हती. मनुष्याच्या जीवनाचा हा अविभाज्य भाग आहे आणि जितक्या व्यक्ती तितक्या लैगिक प्रवृत्ती. आधुनिक तंत्रज्ञानाने ह्यांत अनेक बदल घडवून आणले आहेत म्हणून थोडे विचित्र वाटते आणखीन काही नाही. नाहीतर एक महान आत्मा ह्या देशांत होऊन गेले त्यांनी आपल्या चाळ्या विषयी भरपूर लिहून ठेवले आहे. त्यांचे नाव इथे लिहिल्यास संपादक मंडळी पोस्टच उडवून लावतात म्हणून लिहीत नाही. आपले मराठी तथाकथित इतिहासकार रजवाडे ह्यांनी एक भला मोठा कोश लिहिला होता जो फक्त लैगिकता ह्या विषयावर होता. राजवाडे साहेब इंटरनेट च्या काळांत नव्हते नाहीतर त्यांनी साक्षांत आपली wikipedia सारखी वेबसाईट उघडली असती. काकोडकर नावाचे आमचे गोव्यांतील एक लेखक नातलग होते, ते विशेष करून एरोटिका लिहायचे. महिला वर्गांत त्यांचे लेखन विशेष प्रिय होते. त्यांचा दिवाळी अंक यायचा खूप वर्षे मागे मी लहान असताना तो मी वाचला होता त्यांत इतिहासकार राजवाडे ह्यांनी निर्माण केलेल्या लैगिकतेचा विश्वकोश अश्या एका पुस्तकावर विस्तृत लेख आला होता. मी नंतर ते पुस्तक शोधयायचा प्रयत्न केला पण कुठेच मिळाले नाही.
  • Log in or register to post comments
ब
बाबुराव Mon, 02/07/2022 - 09:30 नवीन
प्रतिसाद रोचक माहितीपूर्ण.
  • Log in or register to post comments
T
Trump Mon, 02/07/2022 - 09:38 नवीन
OnlyFans चा मुकाअ पुवाश्रमीची मुंबईकरीण आहे. https://www.news18.com/news/buzz/onlyfans-indian-ceo-amrapali-gan-parag-agrawal-twitter-reactions-url-4584143.html
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 02/07/2022 - 14:43 नवीन
शेवटी काय लैगिक चाळे आणि लैगिक दृष्ट्या विचलित (deviant) लोकांची कमतरता आज नाही आणि पूर्वीही नव्हती. मनुष्याच्या जीवनाचा हा अविभाज्य भाग आहे आणि जितक्या व्यक्ती तितक्या लैगिक प्रवृत्ती. पृथ्वीतलावरील मनुष्य हा एकमेव प्राणी आहे ज्याची लैगिक प्रवृत्ती याच ग्रहावरील इतर कुठल्याही प्राण्यापे़क्षा वेगळी आहे, लैगिक कृतीतुन आनंद मिळवण्यासाठी सातत्याने तो यात विविधता कशी येईल आणि आणता येईल यावर त्याचा सुपिक मेंदु वापरतो. पॉर्न कॅटेगरी सातत्याने का वाढते किंवा वाढत आली या मागे हेच मुख्य कारण आहे. हस्त मैथुन करणारा या ग्रहावर असणारा एकमेव प्राणी हा मनुष्यच [ इतर प्राणी ही कृती करतात असे अजुन तरी माझ्या वाचनात आलेले नाही.] त्याची लैगिक हाव ही कधी कोणते स्वरुप धारण करेल हे सांगणे फार कठीण. गापै यांनी ज्या गोष्टींचा उलेख केला आहे त्याच श्रेणीत इंटरनेट कनेक्टेड chastity belt वापरात असतात. [ मागच्या वर्षी जालावर उंडारताना बिट कॉइनवर वाचन करत असताना मला या विषयी कळले होते, कारण खंडणी बिटकॉइन मध्येच मागितली गेली होती.] एका हॅकर ने एका पुरुषाचा chastity belt हॅक करुन त्याचे जनन इंद्रिय लॉक करुन टाकले [ अमिताभ बच्चनचा लॉक किया जाय ? हा डायलॉग आठवतो ना ? :))) ] आणि हे लॉक करुन आवळत चाललेले जनन इंद्रिय जर तुला वाचवायचे असेल तर बिटकॉईन मध्ये खंडणी दे, अशी मागणी तो डिव्हाइस हॅक करणार्‍या हॅकरने केली होती. तर या उदा. वरुन तुमच्या हे लक्षात येईल की मनुष्याच्या लैगिक उत्तेजना मिळवण्यात इंटरनेट कनेक्टेड डिव्हाईस तर आलेच आहेत पण त्याच बरोबर याच कनेक्टेड नेटवर्क ने लैगिक अत्याचार आणि गुन्हा देखील केला जातो. या घटनेच्या संदर्भात असलेल्या बातम्या :- [ मी त्या वेळी नक्की कोणता लेख वाचला होता त्याचा दुवा आता आठवत नाही, परंतु अशी चित्रविचित्र बातमी लक्षात राहिल्याने आता शोध घेऊन ज्या बातम्या मिळाल्या त्या घेतल्या आहेत. ] ‘Your Cock Is Mine Now:’ Hacker Locks Internet-Connected Chastity Cage, Demands Ransom Pay This Hacker Bitcoin or Your Penis Stays in the Cage We Spoke to a Guy Who Got His Dick Locked in a Cage by a Hacker जाता जाता :- ५ जी आणि आयओटी आल्यावर असल्या प्रकारच्या लैगिक इनोव्हेशन आणि क्राईम मध्ये कोणत्या घटना घडणार आहे ते पाहणे रोचक ठरेल ? :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- “Simplicity is the ultimate sophistication.” :- Leonardo da Vinci.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Mon, 02/07/2022 - 14:45 नवीन
इतर प्राणी 'हस्त'मैथुन करतात की नाही माहीत नाही. मात्र कुत्रे हंपिंग सर्रास करताना दिसतात.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 02/07/2022 - 16:16 नवीन
मात्र कुत्रे हंपिंग सर्रास करताना दिसतात. ही कृती देखील त्यांच्या प्रजनन काळातच करताना दिसत असावेत. निर्सगात इतर प्राण्यांचा विशिष्ठ असा प्रजनन काळ असतो, मनुष्य प्राण्याचे मात्र असे काही नाही.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- “Simplicity is the ultimate sophistication.” :- Leonardo da Vinci.
  • Log in or register to post comments
स
साहना Tue, 02/08/2022 - 06:29 नवीन
फेसबुक म्हणजे मेटा च्या मेटॉवर्स मध्ये काही दिवस आधी 'सामूहिक दुष्कर्म' घडले (हो तेच) ! त्यानंतर असे प्रकार रोखण्यासाठी मेटा ने वैयक्तिक सीमारेखा असे फिचर प्रकाशित केले. https://arstechnica.com/gaming/2022/02/meta-establishes-four-foot-personal-boundary-to-deter-vr-groping/
  • Log in or register to post comments
स
साहना Tue, 02/08/2022 - 06:44 नवीन
> हस्त मैथुन करणारा या ग्रहावर असणारा एकमेव प्राणी हा मनुष्यच शरीरसंबंधातून सुख प्राप्त करणाऱ्या प्राण्यात माणूस आणि काही माकडा शिवाय डुक्कर आणि डॉल्फिन ह्यांचा समावेश होतो. डॉल्फिन हे एक नंबरचे नालायक मासे आहेत ह्याचा अनुभव मी स्वतः घेतला आहे. डॉल्फिन आपल्या माश्यांचा आणि लहानग्या वर सुद्धा जबरदस्तीने दुष्कर्म करतात पण त्यांच्या सोबत मानवी महिला पोहत असतील तर त्यांच्याशी सुद्धा ते शरीर संबंध निर्माण करू पाहतात. वासनिक सुखाच्या बाबतीत सर्वाना मागे टाकणारी प्रजाती आहे ती म्हणजे बोनोबो माकड. ह्यातील मादा ह्या वासनेत इतक्या अंध असतात कि त्या आपल्या कळपातील कुणालाही सोडत नाही. त्या समलिंगी संबंध ठेवतातच पण त्या शिवाय कळपातील प्रत्येक नर आणि लहान मुलांसोबत सुद्धा वासना शमवतात. नर सुद्धा समलिंगी संबंध ठेवतात आणि गरज पडेल तर खेळण्यांचा सुद्धा उपयोग करतात. त्याशिवाय संभोग करताना मादा आणि नर बहुतांशी समोरा समोर असतात आणि असे असणारे मानव सोडल्यास हि कदाचित एकमेव प्रजाती आहे (hominum). त्या शिवाय चुंबन घेणारे हि मानव सोडल्यास एकमेव प्रजाती आहे. ह्या विषयावर जर तुम्हाला अधिक मनोरंजक आणि वैज्ञानिक माहिती हवी असेल तर मॅट रिडले ह्या ब्रिटिश लेखकाचे रेड queen हे पुस्तक वाचावे. ह्या पुस्तकातून एक गोष्ट समजली ती म्हणजे स्त्रियांच्या डोळ्यांत जास्त कोन्स असतात त्यामुळे पुरुषापेक्षा त्यांना जास्त रंग आणि त्यांच्या छटा दिसतात. आता निसर्गांत स्त्रियांना का बरे हि सुपरपावर मिळाली ? तर संशोधकांचा अंदाज आहे कि ह्या स्किल मुले स्त्रिया पुरुषांच्या चेहेर्यातील अत्यंत छोटे बदल सहज पकडू शकतात. विशेषता खोटे बोलताना पुरुषांच्या चेहेर्यातील रक्तप्रवाह बदलतो आणि स्त्रिया हे subconciously हे बदल पकडू शकतात. पुस्तक खरोखरच मनोरंजक आहे आणि विज्ञान आधारित आहे.
  • Log in or register to post comments
T
Trump Tue, 02/08/2022 - 07:00 नवीन
खुप नवीन माहीती. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 02/08/2022 - 17:24 नवीन
पुस्तक खरोखरच मनोरंजक आहे आणि विज्ञान आधारित आहे. ओक्के, उत्तम माहिती दिली आहेत तुम्ही. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मोहब्बत सरेआम नही बस एहसास होना चाहिए, हम उन्हे चाहते हैं ये पता सिर्फ उन्हें होना चाहिए।
  • Log in or register to post comments
T
Trump Fri, 02/11/2022 - 14:49 नवीन
डॉल्फिन माहीती.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Mon, 02/07/2022 - 16:46 नवीन
साहना, प्रशंसेबद्दल धन्यवाद. तुमच्याकडील माहिती भारी रोचक आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Mon, 02/07/2022 - 08:08 नवीन
हे वाक्य अगदी चपखल आहे.त्या एका वाक्यात सर्व अर्थ आहेत. ज्यांना खऱ्या आयुष्यात स्त्री सुख मिळत नाही किंवा.जे पुरुष स्त्री ल पूर्ण शारीरिक दुःख देण्यास सक्षम नसतात. ह्या कॅटेगरी मधील पुरुष सेक्स विकृत असतात. आणि अशा लोकांची संख्या कमी नाही. ही सुवर्ण संधी कॅश करण्यासाठी अनेक मोठे उद्योग पुढे आहेत . पण समोर येत नाहीत. स्त्री ल सेक्स मध्ये पूर्ण सुख न देवू शकणारे स्त्री सहवास टाळतात. आणि ऑनलाईन सेक्स चे गिऱ्हाईक बनतात
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Mon, 02/07/2022 - 08:44 नवीन
लैंगिक दृष्ट्या विचलित जी मूर्ख पुरुषांची जमात आहे त्यांना स्त्रिया मूर्ख बनवत च असतात . पण हुशार पुरुष पण स्त्री चे ,आणि स्त्री ची ओळख घेवून... ह्या जमातीला मूर्ख बनवत असतात . . अशा लैंगिक दृष्ट्या विचलित स्त्रिया पण आहेत .. त्यांची फसवणूक करण्याचे मार्केटिंग पण अस्तित्वात आहे . फक्त पुरुष लैंगिक विचलीत नसतात तर स्त्रिया पण असतात. फक्त प्रमाण कमी आहे त्याला समाज बंधन निम्मित आहेत. नाही तर इथे पण खांद्याला खांदा लावण्याची क्षमता आहे.
  • Log in or register to post comments
ग
गवि Mon, 02/07/2022 - 09:53 नवीन
__/\__ आम्हास पॉर्न वगैरेचा नीट परिचय आहे असे वाटत असे. परंतु धागा आणि प्रतिसाद यातून होणारे लेटेस्ट विश्वरुपदर्शन पाहता.. .. पट्टीच्या नॉन व्हेज लोकांत धाडसी असल्याप्रमाणे "आम्ही अंडाकरी खातो बुवा.." इतपत स्वत:ची लेव्हल वाटू लागली आहे. (आमच्या वेळी असलं नव्ह्तं. इ .इ . ) बाय द वे.. रोचक माहिती. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 02/07/2022 - 09:57 नवीन
आम्हास पॉर्न वगैरेचा नीट परिचय आहे असे वाटत असे
काय सांगताय, तुमचा नेमस्त, साधासरळ मिपावावर बघता तुम्ही यातले असाल असे वाटले नव्हते.
  • Log in or register to post comments
ग
गवि Mon, 02/07/2022 - 09:59 नवीन
प्रतिमा खळळकन भंगली का मनातली. जग हे असेच आहे प्रचु. सांभाळ.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 02/07/2022 - 10:02 नवीन
प्रतिमा खळळकन भंगली का मनातली.
अगदी. काचेला तडा गेल्यागत वाटलं.
जग हे असेच आहे प्रचु.
जग तसेच आहे पण तुम्हीही तसेच असाल असं वाटलं नव्हतं हो:(
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 9 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 9 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 9 hours ago
  • सुंदर !!
    1 day 9 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 9 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा