Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

रिना : एक किस्सा

स
साहना
Fri, 02/04/2022 - 13:27
🗣 71 प्रतिसाद
सत्य आहे पण नावे आणि काही स्थळे बदलली आहेत. रिना वय २७ आमच्या ओळखीच्या व्यक्तीच्या ड्रायव्हरची मुलगी. परंपरागत व्यवसाय मासेमारी पण हिच्या वडिलांनी तो सोडून गाडी चालवणे आणि सुतारकाम सुरु केले. साधे कौलारू घर, मातीच्या भिंती. पर्वरीच्या बाहेर ग्रामीण भागांत नारळांची छोटीशी बाग आणि त्याच्या मागे हे घर. आई एका सहकारी बँकेत प्युन सदृश्य नोकरीवर. तसे कुटुंब गरीब असले तरी अतिशय सभ्य आणि कुणाच्या अध्यात ना मध्यात. रीना १२ पास. काय काम करते तर एका हॉटेलांत रिस्पेशनिस्ट म्हणून आहे असे वडिलांनी सांगितले. ज्या परिसरांत होती तिथे मला पार्टी साठी जागा हवी होती. त्यावेळी हि साधारण २३ वर्षांची असेल. अचाट लोकेशन, मस्त लोक आणि अत्यंत जबरदस्त तयारी हिने फक्त फोन करून केली. मला खूपच आश्चर्य. मी थोडी मैत्री वाढवली. इंस्टावर हि होती. साधे सोज्वळ फोटो. गणेश चतुर्थी, नारळांची बाग, आजचे मासे इत्यादी. मनगटावर एक टॅटू. पण काही हजार फॉलोवर्स. बहुतेक मंडळी रोडछाप रोमिओ, कॉलेज कुमार इत्यादी. प्रत्येक पोस्ट ला ५०-६० लाईक्स. फक्त एक दिवस एका फॅन्सी रेस्टोरंटचा फोटो. हे रेस्टोरंट ताज मधील रेस्टोरंट होते हे मी डेकोर वरून तात्काळ ओळखले. आता लोक खोटे फोटो आपले म्हणून टाकतात पण हिच्या फोटोंत तिचा टॅटू वाला हात स्पष्ट दिसत होता. काही वेळांतच फोटो डिलीट झाला. मग मी हिचे इतर मित्र पहिले त्यातील काहींना तात्काळ ओळखले. ह्यांचे नाईट क्लब्स गोव्यांत होते. मग जास्त शोधून हिचा दुसरा इन्स्टा सापडला. मी थेट कॉल केला. आधी तिने उडवाउडावीची उत्तरे दिली पण मी जजमेंटल नाही म्हटल्यावर सर्व कथा समोर आली. हिचा दुसरा इन्स्ता अकाऊंट सुद्धा तिने मला दिला. थोडक्यांत हि कथा समोर आली. एखादी सध्या गरीब मध्यमवर्गीय घरांतील मुलीला इन्स्ता वर हेरले जाते. दिसायला सुंदर असली थोडी आत्मविश्वास दाखवणारी असली तर मग तिला फोन येतो "मी श्रिया, अमुक PR मार्केटिंग तर्फे. आपण आपल्या भागांतील लोकल इन्स्ता सेलेब्रिटी आहात आपण स्पॉन्सर वाले फोटो टाकाल काय ?" मुलगी खुश होते आणि हो म्हणते. काही फोटो टाकायला ५०००, १०,००० अशी रक्कम घरबसल्या मिळते. मग हीच श्रिया तिला अमुक रेस्टोरंट मध्ये ट्रेनिंग साठी बोलावते. तिथे अतिशय सुंदर मुले मुली असतात. मस्त पैकी फुकट छान जेवण आणि मेकअप इत्यादी शिकवलं जातो. काही दिवसांत हि मंडळी मित्र होतात. मग नाईट क्लब मध्ये तोकड्या कपड्यांत ह्यांना आमंत्रण मिळते आणि तिथे फक्त राहायचे पैसे मिळतात. तिथे नेटवर्किंग होऊन आणखीन कामे मिळतात. ह्यांत VIP लोकांच्या लग्नात होस्टेस ते ट्रेड शो मध्ये होस्टिंग अख्या विविध प्रकारच्या कामाची संधी मिळते. मला ऐकताना मजा आली. शेवटी हे प्रकरण वेश्याव्यवसायाकडे येऊन थांबले असेल असे वाटले पण नाही. तिने ओळख करून दिलेल्या नाईट क्लब मालकाने मला आणखीन माहिती दिली. वेश्या प्रकरणात रिस्क जास्त आणि पैसे कमी आहेत असे त्याने सांगितले. ह्या धंद्यात सर्वांत जास्त फायदा प्रोटेक्ट करणाऱ्या माणसाला होतो, काम करणाऱ्या मुलीला नाही. बहुतांशी लोकल आमदार वगैरे मंडळी ह्या असल्या धंद्यात असतात आणि त्यांच्या नादाला शहाण्या माणसाने लागू नाही असे त्याचे मत होते. तरी सुद्धा काही मुली काही श्रीमंत लोकांना आवडू शकतात. पण तिथे काय होते ह्यांत ह्याला रस नव्हता. (casual sex भरपूर प्रमाणात चालते पण त्याची माहिती ह्या फोरम वर नको). ड्रग्स सुद्धा भरपूर प्रमाणात चालते. रिना ने गोव्यांत मला भरपूर गांजा उपलब्ध करून दिला होता तसेच हशिश वाले हुक्का बारची ओळख करून दिली होती (इथे ठराविक लोकांनाच प्रवेश मिळतो) , तिने स्वतः esctasy वगैरे ट्राय केले होते पण कोकेन आणि हिरोईन टाळले होते. तिच्या काही मैत्रिणींची हालत पाहून तिने हा निर्णय घेतला होता. बऱ्याच गोष्टी मी रिना कडून नंतर ऐकल्या. काही कार शो साठी ती दुबईला जाऊन आली होती. तिथे एका व्यक्तीने तिला OnlyFans वर काम करण्याची ऑफर दिली होती पण तिने घेतली नाही. काही काळ एका एजंट च्या मदतीने तिने लाईव स्ट्रीम्स करून पैसे कमावण्याचा विचार केला होता पण त्यातील लोक अत्यंत बे भरवशाचे होते आणि पैसे मिळत नव्हते म्हणून तिने सोडून दिले. (ह्यांत काही व्यक्ती मुलीला फक्त व्हिडीओ कॉल करून बोलायला पैसे देतात. ह्यांत मग विविध मागण्या आणि त्यासाठी जास्त पैसे ऑफर केले जातात. नक्की प्लॅटफॉर्म काय आहे ठाऊक नाही. ) एका मुंबईच्या व्यक्तीने तिला धोका दिला. तिला वेब्सिरीज शूट करू असे सांगितले. पहिला एपिसोड पायलट आहे आणि सर्वानी फ्री मध्ये काम करायचे. मग हा पायलट विविध लोकांना दाखवून पैसे उभारायचे असे सांगितले. शूटिंग लोणावळा मध्ये होते. कुठल्याच सिन मध्ये १००% नग्नता नसेल असे सांगितले होते आणि जास्तीत जास्त बॅकलेस सिन असेल असे सांगितले होते. पण प्रत्यक्षांत शूटिंग थोडे जास्तच घाणेरडे करण्याच्या डिरेक्टर चा प्रयत्न होता. तिने विरोध केला तर तिला शिव्या देण्यात आल्या आणि जबरदस्ती करण्यात आली. पण तिने त्यांना जुमानले नाही. मेकअप विषयावर तिला सध्या बरीच गती असल्याने तिला विविध VIP लग्नात मेकअप आर्टिस्ट म्हणून मागणी होती त्यानिमित्ताने गोव्यांत तसेच अनेक काँट्रॅक्स मिळाली. रिना ला टॅटू चे भयंकर प्रेम आहे. मला वाटले फक्त हातावरच असेल पण आज पर्यंत तिने एकूण ३० टॅटू काढले आहेत, नितम्ब पासून पोटापर्यंत अनेक ठिकाणी. प्रत्येक टॅटू काही ना काही कारणास्तव. कोविड झाला तर त्याची आठवण म्हणून एक टॅटू इत्यादी. तिच्या पालकांनी बराच विरोध केला होता म्हणे. काही टॅटू त्यांना ठाऊक सुद्धा नाहीत. सध्या ती TIKTOK आणि इंस्टाग्राम वर स्टार आहे. तिच्या छुप्या ID ला हजारो फॉलोवर्स असून विविध ठिकाणाची जाहिरात करण्यासाठी तिला हजारो रुपये मिळतात. ह्या सर्व कामाचे दुष्परिमाण तिच्या मते म्हणजे दोन जिवने जगणे. लोक आपल्याला एस्कॉर्ट/वेश्या समजतील हि भीती आणि काही लोकांनी जबरदस्ती करण्याचा केलेला प्रयत्न. इथे मी काहीही व्हॅल्यू जजमेंट करत नाही. किस्सा मनोरंजक वाटलं म्हणून लिहिला.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 27013 views

🗣 चर्चा (71)
ग
गवि Mon, 02/07/2022 - 10:04 नवीन
काळ हे सर्व दु:खांवर औशध आहे.
  • Log in or register to post comments
स
सुखी Tue, 02/08/2022 - 11:24 नवीन
:D
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Tue, 02/08/2022 - 16:42 नवीन
काळ हे सर्व दु:खांवर औशध आहे.
आणि पॉर्नसुद्धा :)
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Mon, 02/07/2022 - 10:46 नवीन
# जप हो प्रचु.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Mon, 02/07/2022 - 09:57 नवीन
ह्याचा अर्थ मार्केटिंग करणाऱ्या प्रोफेशनल कंपन्या,विविध तज्ञ ह्यांचे स्पॉन्सर आहेत. स्त्री ल नैतिक बंधनातून मुक्त करणे ही पहिली स्टेप आहे.. मग स्त्री सहज उपलब्ध होईल आणि पुरुषांना विविध कायदेशीर बंधनात अडकवून ठेवायचे म्हणजे ते मजबूर होतील. मग खात्री चा पैसा च पैसा.. स्त्री मुक्ती वाल्यांची धोरण ही स्त्री हिताच्या विपरीत असतात . हे सहज थोडा विचार केला तरी लक्षात येईल
  • Log in or register to post comments
र
रावसाहेब चिंगभूतकर Mon, 02/07/2022 - 13:33 नवीन
तुम्ही नक्की काय लिहिताय ते तुम्हाला तरी कळतं का?
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Mon, 02/07/2022 - 17:11 नवीन
रावसाहेब, स्त्रीमुक्तीवाल्यांची धोरणं स्त्रीहिताच्या विरोधात असतात हे मलातरी मान्य आहे. स्त्रीमुक्तीवाल्यांपासनं सावधान. त्यांच्या नादी लागून बायकांनी आपलं शील उधळून टाकू नये. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
स
सुरसंगम Mon, 02/07/2022 - 17:25 नवीन
तेच म्हणत होतो हा कोचरे नको ते संदर्भहीन लिहतोय. अरे बाबा सर्वात जास्त तुमच्या मुस्लिम धर्मातच गोची आहे असे नाही वाटत काय 1)बायको व्यतिरिक्त दुसऱ्या स्त्री शी संबंध करणे गैर आहे अनैतिक आहे. :- मग तुम्ही लोक एकापेक्षा चार बायका का करता आणि वर सहानतै नी लिहल्याप्रमाअणे अनेक रज्यकर्त्यांनी जनानखाने का ठेवले. २) आपण पूर्ण शरीर उघडे ठेवू शकतो पण ज्याला गुप्तांग म्हणतात (ह्याला काही शास्त्रीय कारण नाही नैतिक कारण ) म्हणजे स्त्री पुरुष जनन इंद्रिय ही उघडी ठेवणे हे अनैतिक समजले जाते त्या मुळे ती बघायला मिळणे सहज शक्य नसते. बाकी ती पण बाकी अवयव सारखीच शरीराचे अवयव आहेत.:- जर बाकी सगळे अवयव सारखेच तरइस्लामी राष्ट्रात नख दृश्ष्टीस पडले तरी कंठस्नान घालतात तेव्हा तुमचे तत्व ज्ञान तिकडे पाजळवलेत तर बरे. आता प्रतिसहनातै यांसी , तुम्ही लिहलंय म्हणजे खरंचअसणार म्हणुन माझे शब्द मागे घेतो. कारण कोणत्याही विषयाचा तुमचा अभ्यास हा कौतुकास्पद आहे. तुमचे लिखाणातुन जाणावते. तुम्ही प्रतिवाद करताना समोरच्याचा कधी पाण उतारा करत नाही. फक्त एक आहे जरा उदा. देताना संदर्भ देत चला. गिरिश कर्नाड यांच कुठला पिक्चर आहे काय नाव आहे? १८४० साली सर एडविन अरनॉल्ड नावाच्या इंग्रजाने ह्या पुस्तकाचे भाषांतर सुरु केले पण काही प्रकरणे त्याने घाबरून भाषांतरित केली नाही कारण त्याच्या मते पाश्चात्य लोकांना ते पचले नसते. >>>> आता हे कोणत्या पुस्तकाचे कारण चाणाक्याच्या उल्लेखानंतर तुम्ही पॅरा बदललात म्हणुन कळत नाहीये. शिवलीलाअमृत तील ११व अध्याय आहे त्यांत "पत्रीव्रता वेश्या" आहे.>>>> हे ओनलाईन वाचायला मिळेल काय? शिवाय ताई आपण वेगवगळ्या विषयावर सकस लेखन करावे कारण विविध पैलुंवरिल आपले वाचन अफाट आहे असे दिसते.
  • Log in or register to post comments
स
साहना Mon, 02/07/2022 - 19:25 नवीन
> गिरिश कर्नाड यांच कुठला पिक्चर आहे काय नाव आहे? उत्सव रेखा आणि शेखर सुमन लीड रोल मध्ये आहेत. > आता हे कोणत्या पुस्तकाचे ? गीत गोविंद पुस्तक : Sexuality, Obscenity and Community: Women, Muslims, and the Hindu Public in शिवलीलाअमृत तील ११व अध्याय आहे त्यांत "पत्रीव्रता वेश्या" आहे.>>>> हे ओनलाईन वाचायला मिळेल काय? https://web.bookstruck.in/book/chapter/50166 जिच्या नृत्याचे कौशल्य देखोन ॥ सकळ नृप डोलविती मान ॥ तिचा भोगकाम इच्छून ॥ भूप सभाग्य येती घरा ॥४५॥ वेश्या असोन पतिव्रता ॥ नेमिला जो पुरुष तत्त्वता ॥ त्याचा दिवस न सरता ॥ इंद्रासही वश्य नव्हे ॥४६॥ धन्यवाद. निव्वळ कमेंट वरील प्रतिक्रिया असल्याने मी जास्त संदर्भ वगैरे देण्याच्या नादात मुद्दाम पडले नाही. लोकांना ह्यावर जास्त वाचायला आवडेल असे आहे तर कदाचित भविष्यांत जास्त खोलांत जाऊन लिहीन.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Tue, 02/08/2022 - 09:01 नवीन
करणाऱ्या सुर संगम सारख्या आयडी ना किंमत देण्याची गरज नाही असे मला वाटत. नंतर त्या आयडी नी गैर भाषा वापरली तरी त्याची दखल घेवून स्वतःची किंमत मी कमी करून घेणार नाहीं
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 02/07/2022 - 18:27 नवीन
हे ओनलाईन वाचायला मिळेल काय? ही कुक्कुट-मर्कटाची रुद्राक्ष महात्म्याची कथा आहे. [ मी अनेकवेळा वाचली असल्याने मला ठावूक होती. ] श्रीशिवलीलामृत - अध्याय अकरावा [ पूर्वीचे खापरे आता transliteral आहे.]

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- “Simplicity is the ultimate sophistication.” :- Leonardo da Vinci.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Tue, 02/08/2022 - 05:05 नवीन
सर्व प्रतीसादकांचे(एक सोडून)..... आणी लेखकाचे मनःपुर्वक अभिनंदन. वर वर पहाता लेख साधा सोपा वाटणारा पण त्या पाठीमागे मानवी मुल्य, उत्थान आणी पतन यावर सकारात्मक उहापोह वाचला. पंचेचाळीस वर्षापूर्वी खजुराहो मंदिरे बघीतली तेव्हा विस एकवीस चा असेन, नंतर पुन्हा दहा वर्षानंतर पून्हा बघण्याचा योग आला.सभोगं से समाधी असे इव्होल्युशन आणी लैंगिकता समाजाभिमुख आहे असे वाटले. अती तेथे माती हेच शेवटी खरे वाटते.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 02/08/2022 - 09:32 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 02/09/2022 - 16:21 नवीन
साहना,
साधारण १८३० ते १९४० ह्या दरम्यान विविध इंग्रज अभ्यासकांनी भारतीय कला, धर्म, संस्कार आणि प्रथांवर प्रचंड टीका केली.
यावरनं ब्रिटीशकालीन नृत्यविरोधी कायद्यांची आठवण झाली. संदर्भ ( इंग्रजी दुवा ) : https://chandrakantha.com/articles/tawaif/5_anti_nautch_movement.html बकी, तुमचा पूर्ण प्रतिसाद एखाद्या लेखात रुपांतरीत व्हायला हवा. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
स
स्वराजित Fri, 02/11/2022 - 09:31 नवीन
नेहमी प्रमाणे माहीतीपुर्ण लेख
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 02/11/2022 - 12:46 नवीन
रोचक धागा आणि माहितीपुर्ण प्रतिसाद !
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Fri, 02/11/2022 - 15:55 नवीन
मला वाटतंय रिना वा त्यासारख्या मुलींच्या बाबत केवळ पैसा हेच या कामासाठीचं आकर्षण नसावं तर हे काम करण्यातलं थ्रिल, आनंद हे देखील असेल. मला रिना वगैरे मुलींवर टीका करायची नाहीये... काम आहे ज्याचं त्याचं असो. एक तुलना : कोणताही विशेष धोका न पत्करता, सन्मानाने व सहज घरबसल्या काम करुन मधूरा बाचल ही गृहिणी (मधूराज रेसिपी) यु ट्यूब चॅनेलमधून मासिक ७-८ लाख रुपये उत्पन्न मिळवते असे या वेबसाईटवर म्हंटले आहे.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Fri, 02/11/2022 - 16:23 नवीन
कोणत्याही व्यक्ती वागणूक ही इथपर्यंत च तिचा हक्क म्हणून स्वीकारला गेला पाहिजे जो पर्यंत त्या व्यक्तीच्या वागणुकीचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दुष्परिणाम समाज वर होत नाही. प्रत्येक वेळेस ज्याला जसे आवडेल तसे राहावे तो हक्क असावा हा युक्तिवाद करता येणार नाही.
  • Log in or register to post comments
T
Trump Mon, 02/21/2022 - 20:21 नवीन
रिनाचे हळु हळु काक्ष होते ते आणि भविष्यात काय होते सांगा. उत्सुकता आहे.
  • Log in or register to post comments
T
Trump Wed, 03/16/2022 - 16:59 नवीन
संभोगशिक्षण आणि उपचार(therapy) बराच मोठा उद्योग आहे. भारतामध्ये लैगिंक सुखासाठी साधने, फर्निचर यांची नक्कीच कमतरता आहे. जर कामसुत्रावर आधारीत एकादे विद्यापीठ चालु झाले तर भविष्यामधे या क्षेत्रात रोजगार उपलब्ध होउ शकतो. स्त्रीयांसाठी लैगिंक सुखासाठी साधने https://www.amazon.com/s?k=sex+toys+for+women&dc&crid=2SIK5EQDPJPLH&sprefix=sex+toys%2Caps%2C200&ref=a9_sc_1 पुरुषांसाठी लैगिंक सुखासाठी साधने https://www.amazon.com/s?k=toys+for+mens+pleasure+sex
2026 पर्यंत ग्लोबल सेक्शुअल वेलनेस मार्केटचा आकार $125.1 बिलियन पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे, जो अंदाज कालावधीत 12.4% CAGR वाढीने वाढेल. https://www.businesswire.com/news/home/20210112005901/en/Global-Sexual-Wellness-Market-Analysis-and-Forecast-2020-2026-Market-Size-is-Expected-to-Reach-125.1-Billion-by-2026-Rising-at-a-12.4-CAGR---ResearchAndMarkets.com
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 06/28/2022 - 16:35 नवीन
साहना,
.... त्यांच्या सोबत मानवी महिला पोहत असतील तर त्यांच्याशी सुद्धा ते शरीर संबंध निर्माण करू पाहतात.
अशा डॉल्फिन माशांचा पुढील जन्म पाकिस्तानात होत असणार. तिथे त्यांच्यावर बळजोरी केली जाते. संबंधित ( इंग्रजी ) लेख : https://en.dailypakistan.com.pk/12-Jun-2017/is-it-a-sindhi-tradition-to-rape-indus-blind-dolphins-shocking-claim-spreads-on-pakistani-interwebs आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 10 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 10 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 10 hours ago
  • सुंदर !!
    1 day 10 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 10 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा