Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

‘पंचाक्षरी’चे व्यसन !

ह
हेमंतकुमार
Fri, 01/21/2022 - 15:38
🗣 114 प्रतिसाद
सध्या ऑनलाईन इंग्लिश शब्दखेळांचे विश्वात Wordle हा पंचाक्षरी खेळ जबरदस्त लोकप्रिय झालाय. याचा उल्लेख मी शब्दखेळांच्या ‘चौकटीतील रत्ने’ या जुन्या धाग्यावर केला होता. त्याला एक प्रतिसाद आला. मग असा विचार केला की, जास्तीत जास्त शब्दप्रेमींना तो माहित होण्यासाठी नवा धागा काढलेला बरा. तुमच्यातील काहीजण हा खेळ खेळून त्याचा आनंद घेत असतील हे नक्की. परंतु माहित नसलेल्यांसाठी हा परिचय धागा. हा खेळ तीन स्वरूपात उपलब्ध आहे : 1. दैनंदिन एक शब्द : याचे आतापर्यंत 216 भाग झालेत. 2. वरील सर्व जुन्या भागांचा संग्रहित खेळ 3. अमर्यादित खेळ नवागतांसाठी आपण प्रथम दैनंदिन खेळ पाहू. 1. खेळ निर्मात्याने एक ५ अक्षरी शब्द योजलेला असतो. तो आपल्याला ओळखायचा आहे. त्यासाठी या शब्दाचा अर्थ/ भावार्थ/ समानार्थ इत्यादी काहीही दिलेले नाही. मग ओळखायचा तरी कसा ? खेळाच्या पटलावर पाच अक्षरी सहा ओळी दिलेल्या आहेत. त्यातील पहिल्या ओळीत तुम्ही कुठलाही आवडीचा पंचाक्षरी शब्द लिहायचा उदाहरणार्थ CHAIR. मग खेळातील enter दाबायचे. ते दाबल्यावर प्रत्येक अक्षराची चौकट एका रंगाने भरेल. हे रंग तीन प्रकारचे आहेत. त्यांचा अर्थ असा : १. हिरवा : ते अक्षर अपेक्षित शब्दात त्याच स्थानी आहे; म्हणजे बरोबर. २. पिवळट : ते अक्षर शब्दात आहे पण तुमचे स्थान चुकले आहे. ३. राखाडी : ते अक्षर त्या शब्दात अजिबात नाही. आता पहिल्या ओळीतील हे रंगीत दृश्य हेच तुमचे पुढचे शोधसूत्र ठरते. त्यानुसार तुम्ही सुधारित शब्द पुढच्या ओळीसाठी तयार करायचा. हा करताना एक लक्षात ठेवायचे : • हिरव्या अक्षराचे स्थान कायम ठेवायचे • वर ज्या अक्षरांची चौकट राखाडी झालेली आहे ती अक्षरे वापरायची नाहीत. • जी अक्षरे पिवळी झाली होती त्यांचे स्थान बदलायचं. आता याप्रकारे नवीन जुळवलेला शब्द दुसऱ्या रांगेत भरा. पुन्हा enter दाबा. पुन्हा चौकटी ३ रंगांनी भरतील. असे करत करत जास्तीत जास्त सहा प्रयत्नात बरोबर उत्तर आले पाहिजे. ज्या क्षणी तुमचे उत्तर बरोबर येते तेव्हा सर्व चौकटी हिरव्या रंगाने भरतात व खेळ संपतो. ... एव्हाना तुमच्या लक्षात येईल की हा खेळ आपल्यातील कोणीही खेळू शकतो- अगदी दहावी पास विद्यार्थी देखील ! त्यासाठी शब्दार्थ, समानार्थ अशा भाषाज्ञानाची गरज नाही. तुम्हाला लढवायचा आहे तो तुमचा तर्क. या प्रकारे दैनंदिन खेळ तीन-चार दिवस खेळलात की त्याची गोडी लागते. लवकरच त्याचे व्यसन जडते ! मग 24 तासांसाठी फक्त एक शब्द पुरत नाही. 😀 मग काय करायचे ? घाबरू नका त्यासाठी पुढची पायरी तयार आहे : 2. संग्रहित खेळ : इथे हवा त्या प्रकारे खेळ निवडण्याचे विविध पर्याय आहेत. त्यातील choose बटणावर टिचकी मारल्यावर तुमच्यापुढे १ पासून कालपर्यंत झालेल्या दिवसांचे अंक आहेत. कुठल्याही शब्दाचे उत्तर अर्थातच कुठेही दिलेले नाही. तुम्ही कुठलाही अंक निवडा किंवा Random हे बटन निवडूनही खेळ सुरू करू शकता. या प्रकारे तुम्ही एकाहून अधिक शब्द लागोपाठ तुमच्या आवडीनुसार खेळू शकता. हे खेळता-खेळता तुमचे इथले सर्व शब्द संपले आणि तुम्ही जर अट्टल व्यसनी झालेला असाल तर मग पुढची पायरी तयार आहे : 😄 3. अमर्यादित खेळ : तुमच्या सवडीने कधीही इथे या आणि हवे तेवढे खेळत बसा ! पण याची शिफारस मी करत नाही. इथे त्यांनी शब्दखेळांचे काही मूलभूत नियम पाळलेले नाहीत. नवोदितांनो, या तर, सुरू करा या खेळाच्या दैनंदिन प्रकारापासून. तुमचे अनुभव जरूर लिहा. मात्र एखादा दिवस(24 तास) संपल्याशिवाय ओळखलेला शब्द इथे लिहू नका. कारण तोच शब्द त्या संस्थळावर सर्वांसाठी समान असणार आहे. या पंचाक्षरीचे व्यसन लागण्याची खात्री आहे ! तेव्हा स्वतःच्या जबाबदारीवर त्यात पडा !! पण घाबरायचे कारण नाही. शब्दांचे तळीराम झाल्याने नुकसान काहीच नाही !!! तर्कबुद्धी मात्र तल्लख होईल !!!! 😉 ……………………………………………………………………………………………………………………………..

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 39041 views

🗣 चर्चा (114)
र
रश्मिन Fri, 01/21/2022 - 17:09 नवीन
धन्यवाद कुमार जी ! ह्या झक्कास खेळाबद्दल लिहिले ते बरे झाले ! गेले चार दिवस खेळतोय आणि पुढच्या दिवसाच्या शब्दाची वाट आतुरतेने पाहत असतो :) आणि संग्रहित खेळाची लिंक दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे ! वीकांताची सोय झाली Image removed.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 01/21/2022 - 17:13 नवीन
उद्या परवा मिळून किती शब्द संपवताय ते सांगा ! :) शुभेच्छा
  • Log in or register to post comments
ग
गुल्लू दादा Sat, 01/22/2022 - 16:43 नवीन
छान ओळख. बघावे लागणार खेळून.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 01/23/2022 - 00:31 नवीन
छान ओळख.पण खेळून बघणार नाही. ही शब्दकोडी आवडत नाहीत. ----------- शब्दकोडी म्हटल्यावर लगेच लक्षात आले की तुम्ही सध्या 'प' अक्षराने नाव सुरू होणारे लेख लिहीत आहात.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 01/23/2022 - 01:10 नवीन
ज्यांना आवडतात त्यांनी जरूर खेळा. *'प' अक्षराने नाव सुरू होणारे लेख योगायोग ! :)
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Mon, 01/24/2022 - 07:23 नवीन
मी तीनही प्रकार खेळून पाहिले. CRIMP हा शब्द तीन वेळा मला आला. संग्रहित ऑप्शनमुळे भारी टाईमपास मिळाला. सं - दी - प
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 01/24/2022 - 07:33 नवीन
हा एक भन्नाट आहे.... बघा Image removed.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Mon, 01/24/2022 - 14:29 नवीन
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Mon, 01/24/2022 - 14:39 नवीन
Wordle 161 5/6 पाचव्या प्रयत्नात जमलं. पण टिल्डे!! सं - दी - प
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 01/24/2022 - 15:11 नवीन
संदीप, छान पण कुठलेही उत्तर फोडू नका म्हणजे अन्य लोकांना ते आव्हान कायम राहील ! त्यापेक्षा तुमच्या संपूर्ण रंगीत चौकटीचा स्क्रीनशॉट इथे चढवायचा असतो. म्हणजे तुम्हाला आल्याचा तो पुरावा होतो आणि इतरांनाही उत्तर समजत नाही 😀
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 01/24/2022 - 07:53 नवीन
CRIMP मलाही सोडवता आला, जाम भारी वाटले, ह्या कोड्याचे स्वरुप पाहिल्यावर एक आयडिया डोक्यात आली, पहिल्या ५ X ५ च्या चौकटीत भरण्याकरता ५ असे शब्द शोधायचे की ज्यांच्यात इंग्रजी वर्णमालेतली जास्तीजास्त अक्षरे येतील. (२६ पैकी २५ येणे अशक्य आहे याची जाणिव पहिल्या दोनतीन प्रयत्नातच झाली) असा ५ शब्दांचा संच जर ठरवता आला तर कोड्यातला शब्द शोधण्याकरता जास्तिजास्त क्लु मिळतील. सध्या अश्या ५ शब्दांचा संच बनवायचा उद्योग करतो आहे. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 01/24/2022 - 08:00 नवीन
छान कल्पना सध्याची एक ठराविक युक्ती अशी आहे: पहिल्या दोन ओळींमध्ये असे शब्द घालायचे की त्यात इंग्लिशचे पाचही स्वर (a e i o u) येऊन जातात. त्यातून नंतर y ची गरज आहे का ते समजते
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 01/24/2022 - 09:52 नवीन
शब्द चौकटीच्या वर एक Letters असे लिहिलेला टॅब आहे, त्या टॅब चे बटन पुढे मागे केले की कोड्यातील अक्षर संख्या बदलता येते. कमीतकमी ४ आणि जास्तीजास्त ११ अक्षरांच्या शब्दांचे कोडे आपल्याला सोडवता येते. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 01/24/2022 - 10:16 नवीन
छान माहिती. पण ही सोय फक्त संग्रहित खेळाला दिसते आहे; दैनंदि ला नाही. बरोबर ना ?
  • Log in or register to post comments
म
मित्रहो Mon, 01/24/2022 - 11:06 नवीन
कालचा शब्द जमला आजचाही आला.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Mon, 01/24/2022 - 11:37 नवीन
हा शब्दखेळ खेळण्यात येणार आहे! मागे काही वर्षांपूर्वी मला संगणकावर Hangman ह्या शब्दखेळाचे व्यसन लागले होते 😀
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Tue, 01/25/2022 - 15:44 नवीन
अंदाजे १०-१२ वर्षांपूर्वी गुगलचं होमपेज iGoogle नावाने कस्टमाइज करता यायचं. तेव्हा त्यामध्ये मी हॅन्गमॅन ठेवला होता. प्रत्येकवेळी क्रोम ओपन केलं की समोर हॅन्गमॅन दिसायचा आणि ५-१० वेळा खेळल्यावर बाकी कामे सुरू. बाकी एक ट्रिक दोन्हीकडे उपयोगी आहे. E T A I N O S H R ही याच क्रमाने सर्वाधिक वापरली जाणारी अक्षरे आधी वापरायची.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 01/25/2022 - 16:26 नवीन
E T A I N O S H R ही याच क्रमाने सर्वाधिक वापरली जाणारी अक्षरे आधी
>>>> छान. बरेच लोक पहिला शब्द ADIEU आणि दुसरा शब्द ROYAL हा वापरतात. त्यामुळे सर्व स्वर मंडळी त्यात उरकून जातात. पण अधूनमधून आपल्या मनाप्रमाणे वेगवेगळे शब्द घालावेत म्हणजे मजा येते हा अनुभव.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 02/03/2022 - 14:44 नवीन
इथे या खेळाचे सुरेख विश्लेषण आहे. त्यानुसार इथे E T A I N O S H R हा क्रम नको. त्या ऐवजी ERAOTI LSCNUD हा क्रम चांगला .
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 01/24/2022 - 11:45 नवीन
याड लागणार हे म्या आधीच सांगितलं होतं ! हां, ज्यांना जमत आहेत त्यांनी एकदा तरी त्या रंगीत चौकटीचा पुरावा द्यायाचा असतो बरं का ! :) जमू लागले की संग्रहित खेळातले 19, 78, 108 & 161 हे आव्हान म्हणून सोडवायला घ्याच....
  • Log in or register to post comments
ग
गवि Mon, 01/24/2022 - 11:45 नवीन
दोन्ही दिवस पाचव्या प्रयत्नात जमले. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
म
मित्रहो Mon, 01/24/2022 - 13:21 नवीन
असा जमला WEARY BRICK CRISP CRIMP आजचे गणित उद्या. तीन प्रयत्नात जमले
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Mon, 01/24/2022 - 13:26 नवीन
याड लागलं की हो, कुमार१! कालचा प्रयत्न - PRICE CRIPS CRIMP कामातून आत्ताच मोकळा झालोय, आता ओरडले wordle कडे धाव!
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 01/24/2022 - 13:42 नवीन
वरील सर्व मंडळी, छान खेळताय हो ! व्यसनी कंपूत सहभागी झाल्याचा आनंद आहेच. खेळत असताना अधूनमधून J, K, X या 'मागासवर्गीय' अक्षरांकडे पण लक्ष राहू द्या !
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Mon, 01/24/2022 - 15:20 नवीन
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Mon, 01/24/2022 - 15:32 नवीन
संग्रहीत मधलं (Random) चौथ्या प्रयत्नात जमलं! Image removed.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 01/24/2022 - 15:35 नवीन
अभिनंदन ! आता हा खेळ तुमच्यासाठी औषधासारखीच जादू करणार आणि तुम्ही लवकरच पूर्ण तंदुरुस्त होणार ....
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 01/25/2022 - 13:37 नवीन
दैनंदिन शब्द कोणी सोडवला का? एकदम परिचयाचा आहे ज्यांना सुरुवात करायची असेल त्यांच्यासाठी तर उत्तम
  • Log in or register to post comments
प
पुंबा Tue, 01/25/2022 - 14:19 नवीन
लगेच सुटला.
  • Log in or register to post comments
म
मित्रहो Tue, 01/25/2022 - 14:20 नवीन
परिचयाचा शब्द आहे
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 01/25/2022 - 15:29 नवीन
एकदम ग्वाड वाटलं सोडवून आजचा शब्द.
  • Log in or register to post comments
र
राघवेंद्र Wed, 01/26/2022 - 04:33 नवीन
:)
  • Log in or register to post comments
प
पुंबा Tue, 01/25/2022 - 14:18 नवीन
या खेळाचे खरोखरच व्यसन लागते. मी खेळायला सुरूवात केल्यापासून बहुतेक शब्द तिसर्‍या किंवा चौथ्या प्रयत्नात सुटले. संग्रहित खेळांच्या संचातील रँडम कुठला तरी खेळ निवडून सोडवत बसतो आजकाल. ही तर्कक्रीडा मेंदू फ्रेश ठेवायला फार उपयोगी ठरेल. बादवे, एक सुचना: एखादा शब्द अडला आणी काही केल्या सुचत नसला तर थोड्या वेळ इतर कशात तरी डोके घालावे, परत शब्दाकडे आले की क्षणार्धात कोडे सुटते. outdo या शब्दाने २० मिनिटे खाल्ली. एक मेल चेक करून परत आलो तर जादू व्हावे तसे उत्तर चमकून गेले. ही तर मेंदूची फेवरिट ट्रिक.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 01/25/2022 - 14:39 नवीन
*
परिचयाचा शब्द आहे
>>> अ-ग -दी-च ! *
एखादा शब्द अडला आणी काही केल्या सुचत नसला तर थोड्या वेळ इतर कशात तरी डोके घालावे,
>> +१११ माझा पूर्वी लिहिलेला अनुभव सांगतो : एखादा शब्द जाम सापडत नसला की तेव्हा आपण त्याचा नाद सोडतो. पण, त्या दिवसभर तो सापडेपर्यंत ते शोधसूत्र आपल्या डोक्यात असते. मग अगदी एकदम एखाद्या क्षणी डोक्यात वीज चमकावी तसे आपल्याला ते उत्तर मिळते. अशा प्रकारे कोडे सुटण्याची ठिकाणे बऱ्याचदा स्वच्छतागृह, रस्ता किंवा व्यायामशाळा असतात, हा स्वानुभव आहे. आपण जेव्हा या ठिकाणी असतो तेव्हा आपला मेंदू एक प्रकारे विश्रांतीच्या अवस्थेत असतो आणि त्यामुळे असे घडत असावे असा माझा अंदाज आहे. तेच जर आपण कोड्याचा कागद / मोबाईल जवळ घेऊन खूप वेळ उत्तर शोधत बसलेलो असू, तर मेंदूच्या थकव्यामुळे उत्तर काही येत नाही. कधीकधी तर ही शोधप्रक्रिया स्वप्नात देखील चालू राहते आणि त्यात ‘युरेका’ चा क्षणही येतो. पण जागे झाल्यावर मात्र त्याबद्दल काहीही आठवत नाही !
  • Log in or register to post comments
क
कॉमी Wed, 01/26/2022 - 04:53 नवीन
Wordle चे व्यसन लागणे सहज शक्य आहे, पण दैवकृपेने दरदिवशी एकच वर्डल खेळता येत असल्याने केवळ आजच्या वर्डल बद्दल विचार करणे इतकाच वेळ काय तो वाया जातो. पण असे कोडे डोक्यात भुणभुणणे हे कोडे सोडवण्याइतकेच मजेशीर असते.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 01/26/2022 - 05:05 नवीन
पण दैवकृपेने दरदिवशी एकच वर्डल खेळता येत असल्याने
>>> नाही ! संग्रहित खेळाचा दुवा दिलाय ना लेखात . इच्छा असल्यास कितीही खेळू शकता एके दिवशी :) रोज एक ही चांगली सवय आहे; व्यसनापासून लांब.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Wed, 01/26/2022 - 06:17 नवीन
Wordle 221 5/6 पाचव्या प्रयत्नात जमला. सं - दी - प
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 01/26/2022 - 07:03 नवीन
मला पण चौथ्या प्रयत्नात जमला शब्द नेहमीच्या वापरातला नसला तरी त्याचे मराठी रुपांतर जी ए कुलकर्णी यांच्या कथांमध्ये बऱ्यापैकी वाचले होते.!
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 01/27/2022 - 04:28 नवीन
ज्यांचा या खेळाचा पुरेसा सराव झाला असेल आणि त्यात गोडी लागली असेल त्यांच्यासाठी या खेळाची नवी आवृत्ती आलेली आहे. त्या संबंधी माहिती भाग २ मध्ये स्वागत !
  • Log in or register to post comments
र
रुपी Fri, 01/28/2022 - 20:43 नवीन
अरे वा! कुठलीही कोडी सोडवायला नेहमीच आवडते, त्यामुळे अजून एका नवीन खेळाची ओळख झाली ते छान! धन्यवाद! आम्ही कॉलेजमध्ये "Cows & bulls" हा खेळ खेळायचो. हा साधारण तसाच आहे. फरक हा, की 'Cows & bulls' मध्ये पाह ऐवजी चार अक्षरे असतात आणि १० संधी असतात.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 01/29/2022 - 03:16 नवीन
Cows & bulls"बद्दल काही माहीत नव्हते धन्यवाद ! या खेळात स्वागत आहे तुमचे अनुभव जरूर लिहा
  • Log in or register to post comments
र
रुपी Sat, 01/29/2022 - 07:18 नवीन
काम सोडून हेच करत बसले :D भरपूर सोडवले. आतापर्यंत सगळे बरोबर आले आहेत. वर तुम्ही आव्हान म्हणून सुचवले आहेत ते पुढच्या आठवड्यात सोडवायला घेईन
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 01/29/2022 - 07:29 नवीन
नंतर हा खेळ सोपा वाटू लागला की मग भाग २ ला जरूर भेट द्या तिथे वेगळी गंमत आहे !
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 01/30/2022 - 06:46 नवीन
आजचा शब्द देताना निर्मात्यांनी काही मूलभूत नियम पाळलेले नाहीत. खेळात भूतकाळ, तृतीय वचनी वर्तमानकाळ, अनेक वचने असायला नकोत.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 01/31/2022 - 08:20 नवीन
या प्रकारच्या खेळांमध्ये आपण यथावकाश मुरतो. मग अशी स्थिती येते जेव्हा दैनंदिन Wordle चुटकीसरशी सुटते; absurdle पळवून पळवून दमवते आणि नकोसे वाटते. तेव्हा पुढचे आकर्षण म्हणून Dordle हा खेळ बघा. सोडवलेला नमुना Image removed.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 02/01/2022 - 08:01 नवीन
दैनंदिन खेळ त्याच्या निर्मात्याने न्यूयॉर्क टाईम्सला विकला आहे सध्यातरी तो सर्वांसाठी मोफत उपलब्ध राहील. https://www.cbc.ca/amp/1.6334285
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस गुरुवार, 02/10/2022 - 22:42 नवीन
www.shabdak.com सुरेख प्रयत्न आहे मरठी मध्ये. या मध्ये सुचना साठी उत्तम मराठी वापरले आहे.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 02/11/2022 - 03:15 नवीन
सदर संस्थळ सुरक्षित नाही असे माझा संगणक सांगतो. म्हणून मी तिकडे गेलो नाही.
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 02/11/2022 - 03:41 नवीन
सोडवले. तीन अक्षरे आणि काना मात्र जोडाक्षर काहीही घेतले नसल्याने मर्यादित स्कोप वाटला. तसेही जोडाक्षरे, काना, मात्रा, वेलांटी (पुन्हा वेलांटी / उकाराचे ह्रस्व दीर्घ) हे सर्व वापरले तर या खेळाचा फोर्म्याट जपणे अवघड आहे. मुळात रोमन प्रकारच्या स्पेलिंगसाठी ही रचना जास्त योग्य आहे. भारतीय भाषांसाठी वेगळी पद्धत शोधावी लागेल.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 02/11/2022 - 04:09 नवीन
सहमत. मराठीमध्ये इंग्लिशची जशीच्यातशी नक्कल करण्याऐवजी मी एक पर्यायी खेळ सुचवतो. तो असा: खालील अक्षरांपासून जमतील तितके किमान ३ अक्षरी शब्द करा: का श थ र वे प द शी र निर्मात्याने सांगून ठेवायचे की कमीतकमी इतके शब्द झाले पाहिजेत. हा खेळ कोणतीही संगणकीय प्रणाली न लागता सहज खेळता येतो.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 9 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 9 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 9 hours ago
  • सुंदर !!
    1 day 9 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 9 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा