Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

‘पंचाक्षरी’चे व्यसन !

ह
हेमंतकुमार
Fri, 01/21/2022 - 15:38
🗣 114 प्रतिसाद
सध्या ऑनलाईन इंग्लिश शब्दखेळांचे विश्वात Wordle हा पंचाक्षरी खेळ जबरदस्त लोकप्रिय झालाय. याचा उल्लेख मी शब्दखेळांच्या ‘चौकटीतील रत्ने’ या जुन्या धाग्यावर केला होता. त्याला एक प्रतिसाद आला. मग असा विचार केला की, जास्तीत जास्त शब्दप्रेमींना तो माहित होण्यासाठी नवा धागा काढलेला बरा. तुमच्यातील काहीजण हा खेळ खेळून त्याचा आनंद घेत असतील हे नक्की. परंतु माहित नसलेल्यांसाठी हा परिचय धागा. हा खेळ तीन स्वरूपात उपलब्ध आहे : 1. दैनंदिन एक शब्द : याचे आतापर्यंत 216 भाग झालेत. 2. वरील सर्व जुन्या भागांचा संग्रहित खेळ 3. अमर्यादित खेळ नवागतांसाठी आपण प्रथम दैनंदिन खेळ पाहू. 1. खेळ निर्मात्याने एक ५ अक्षरी शब्द योजलेला असतो. तो आपल्याला ओळखायचा आहे. त्यासाठी या शब्दाचा अर्थ/ भावार्थ/ समानार्थ इत्यादी काहीही दिलेले नाही. मग ओळखायचा तरी कसा ? खेळाच्या पटलावर पाच अक्षरी सहा ओळी दिलेल्या आहेत. त्यातील पहिल्या ओळीत तुम्ही कुठलाही आवडीचा पंचाक्षरी शब्द लिहायचा उदाहरणार्थ CHAIR. मग खेळातील enter दाबायचे. ते दाबल्यावर प्रत्येक अक्षराची चौकट एका रंगाने भरेल. हे रंग तीन प्रकारचे आहेत. त्यांचा अर्थ असा : १. हिरवा : ते अक्षर अपेक्षित शब्दात त्याच स्थानी आहे; म्हणजे बरोबर. २. पिवळट : ते अक्षर शब्दात आहे पण तुमचे स्थान चुकले आहे. ३. राखाडी : ते अक्षर त्या शब्दात अजिबात नाही. आता पहिल्या ओळीतील हे रंगीत दृश्य हेच तुमचे पुढचे शोधसूत्र ठरते. त्यानुसार तुम्ही सुधारित शब्द पुढच्या ओळीसाठी तयार करायचा. हा करताना एक लक्षात ठेवायचे : • हिरव्या अक्षराचे स्थान कायम ठेवायचे • वर ज्या अक्षरांची चौकट राखाडी झालेली आहे ती अक्षरे वापरायची नाहीत. • जी अक्षरे पिवळी झाली होती त्यांचे स्थान बदलायचं. आता याप्रकारे नवीन जुळवलेला शब्द दुसऱ्या रांगेत भरा. पुन्हा enter दाबा. पुन्हा चौकटी ३ रंगांनी भरतील. असे करत करत जास्तीत जास्त सहा प्रयत्नात बरोबर उत्तर आले पाहिजे. ज्या क्षणी तुमचे उत्तर बरोबर येते तेव्हा सर्व चौकटी हिरव्या रंगाने भरतात व खेळ संपतो. ... एव्हाना तुमच्या लक्षात येईल की हा खेळ आपल्यातील कोणीही खेळू शकतो- अगदी दहावी पास विद्यार्थी देखील ! त्यासाठी शब्दार्थ, समानार्थ अशा भाषाज्ञानाची गरज नाही. तुम्हाला लढवायचा आहे तो तुमचा तर्क. या प्रकारे दैनंदिन खेळ तीन-चार दिवस खेळलात की त्याची गोडी लागते. लवकरच त्याचे व्यसन जडते ! मग 24 तासांसाठी फक्त एक शब्द पुरत नाही. 😀 मग काय करायचे ? घाबरू नका त्यासाठी पुढची पायरी तयार आहे : 2. संग्रहित खेळ : इथे हवा त्या प्रकारे खेळ निवडण्याचे विविध पर्याय आहेत. त्यातील choose बटणावर टिचकी मारल्यावर तुमच्यापुढे १ पासून कालपर्यंत झालेल्या दिवसांचे अंक आहेत. कुठल्याही शब्दाचे उत्तर अर्थातच कुठेही दिलेले नाही. तुम्ही कुठलाही अंक निवडा किंवा Random हे बटन निवडूनही खेळ सुरू करू शकता. या प्रकारे तुम्ही एकाहून अधिक शब्द लागोपाठ तुमच्या आवडीनुसार खेळू शकता. हे खेळता-खेळता तुमचे इथले सर्व शब्द संपले आणि तुम्ही जर अट्टल व्यसनी झालेला असाल तर मग पुढची पायरी तयार आहे : 😄 3. अमर्यादित खेळ : तुमच्या सवडीने कधीही इथे या आणि हवे तेवढे खेळत बसा ! पण याची शिफारस मी करत नाही. इथे त्यांनी शब्दखेळांचे काही मूलभूत नियम पाळलेले नाहीत. नवोदितांनो, या तर, सुरू करा या खेळाच्या दैनंदिन प्रकारापासून. तुमचे अनुभव जरूर लिहा. मात्र एखादा दिवस(24 तास) संपल्याशिवाय ओळखलेला शब्द इथे लिहू नका. कारण तोच शब्द त्या संस्थळावर सर्वांसाठी समान असणार आहे. या पंचाक्षरीचे व्यसन लागण्याची खात्री आहे ! तेव्हा स्वतःच्या जबाबदारीवर त्यात पडा !! पण घाबरायचे कारण नाही. शब्दांचे तळीराम झाल्याने नुकसान काहीच नाही !!! तर्कबुद्धी मात्र तल्लख होईल !!!! 😉 ……………………………………………………………………………………………………………………………..

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 39041 views

🗣 चर्चा (114)
ह
हेमंतकुमार Tue, 02/15/2022 - 07:05 नवीन
भूगोल प्रेमींसाठी या खेळाचे नवे प्रारूप : Worldle https://www.hawkdive.com/worldle-a-unique-map-wordle-for-geography-lovers/ इथे फक्त देशाचे नाव लिहायचे आहे. नेहमीप्रमाणे सहा प्रयत्न. प्रत्येक प्रयत्नात आपले उत्तर चुकीचे असेल तर ते आपल्याला अपेक्षित उत्तराचा देश आपण सांगितलेल्या देशापेक्षा किती किलोमीटर लांब आहे आणि कुठल्या दिशेला आहे ते दाखवते.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 02/17/2022 - 06:58 नवीन
आज भूगोलाचे Worldle (#27) सोडवले आणि चक्क दुसऱ्या प्रयत्नातच बरोबर आले. पहिला देश मी मनाने लिहिला होता. त्यावर 13970 किलोमीटर लांब आणि मार्गदर्शनाची दिशा दाखवण्यात आली. त्यावर मी नकाशा न बघता अंदाजे टाकला आणि मटका मस्त बसला ! 2/6
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 03/05/2022 - 15:49 नवीन
worldleहा खेळ सोडवण्यासाठी मी दुकानातून एक मोठ्या आकाराचा छापील जगाचा नकाशा घेऊन आलो आहे. त्यात बघून सोडवायला सोपे जाते. परवा त्यांनी Diego Garcia यासारखे भूभाग सुद्धा ओळखायला सांगितले होते. ते संगणकावरील मर्यादित जागेत शोधणे खूप अवघड जाते. पसरून ठेवायचा मोठा छापील नकाशा आणल्याने पुन्हा एकदा शाळेत गेल्याचा आनंद मिळत आहे.
  • Log in or register to post comments
ग
गवि Sun, 03/06/2022 - 10:25 नवीन
पण पण पण.. ये तो चीटिंग है ना? ;-)
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 03/06/2022 - 10:32 नवीन
नाही हो ! हा खेळ वर्डलसारखा अक्षरांच्या आदलाबदलीचा नाही तो नकाशात बघूनच सोडवत जायचे आहे
  • Log in or register to post comments
ग
गवि Sun, 03/06/2022 - 10:37 नवीन
रोज सोडवतोय (म्हणजे दोन वेळा ६ प्रयत्न संपून गेले हे कबूल). पण नकाशात शेप शोधून देश ओळखणे हे म्हणजे ओपन बुक टेस्टसारखे.. तो शेप बघून अंदाज लावणे हाच खरा मजेचा भाग असे वैयक्तिक मत. आणि अर्थात वरील प्रतिसादही गंमतीनेच दिला होता. :-)
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 03/06/2022 - 11:08 नवीन
कबूल :)
  • Log in or register to post comments
अ
अमेरिकन त्रिशंकू Fri, 03/11/2022 - 17:18 नवीन
खरी मजा नकाशात न बघता सोडवण्यात आहे. याची अर्काइव्ह्ज इथे आहेत. https://web.archive.org/web/*/https://worldle.teuteuf.fr अजून तरी सर्व उत्तरं आली आहेत फेब १ पासून आजपर्यंत.
  • Log in or register to post comments
स
सुशान्त Mon, 03/07/2022 - 08:55 नवीन
ह्या खेळाचा मराठी अवतार शब्दक ह्या नावाने इथे उपलब्ध झालेला दिसतो. खेळाची स्रोतसामग्रीही ह्या ठिकाणी उपलब्ध आहे.
  • Log in or register to post comments
र
राघवेंद्र Fri, 03/11/2022 - 16:21 नवीन
  • Log in or register to post comments
र
राघवेंद्र Fri, 03/11/2022 - 16:22 नवीन
  • Log in or register to post comments
र
राघवेंद्र Fri, 03/11/2022 - 16:26 नवीन
माफ करा खूप प्रतिसाद झाले. error येत होती.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 03/11/2022 - 16:41 नवीन
दुर्मिळ योग त्याप्रीत्यर्थ ही सप्तपदी झाली....:)
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 03/11/2022 - 16:43 नवीन
टोकेरी कंस वापरत असल्यास टाळावे. Html tag समजले जाऊन अदृश्य होते टेक्स्ट. बाकी वर्डल दुसर्या प्रयत्नात आले होते एकदा. पण पहिल्या प्रयत्नात म्हणजे अतिदुर्मिळ. अभिनंदन..
  • Log in or register to post comments
B
Bhakti Fri, 03/11/2022 - 17:12 नवीन
265 4/6 पहिल्यांदाच खेळले.सोप होतं.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 03/12/2022 - 02:38 नवीन
सोडवून बघायला हरकत नाही. या प्रकारात मी पहिला शब्द खालील तीन पैकी घेतो: Police, notice, futile. अनुभव चांगला आहे .... Lewdle मध्ये मला एकदाच पहिल्या प्रयत्नात जमले होते !
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 03/13/2022 - 04:49 नवीन
या आठवड्यात भूगोलाच्या खेळात दोनदा कधीही न ऐकलेल्या दोन बेटांचा समावेश होता. सर्वसाधारण नकाशात त्यांची नावे सुद्धा लिहिलेली नसतात. कालचेही त्यातलेच होते. ....
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 03/17/2022 - 11:49 नवीन
#worldle #55 3/6 (100%) आजचे शोधायला एक महासागर धुंडाळावा लागला.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 03/19/2022 - 07:16 नवीन
#Worldle #57 2/6 आजच्या देशाला पृथ्वीच्या उत्क्रांतीमध्ये विशेष महत्त्व आहे.
  • Log in or register to post comments
अ
अमेरिकन त्रिशंकू Sat, 03/19/2022 - 16:50 नवीन
अजून एक हिंट या नावाचे ३-४ अॅनिमेटेड (इंग्रजी) चित्रपट पण आहेत
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 03/21/2022 - 05:22 नवीन
आजचा हा कुठलातरी कोपऱ्यातला देश "ऐकला" नाही बुवा कधी ! #Worldle #59 4/6
  • Log in or register to post comments
ग
गवि Mon, 03/21/2022 - 06:23 नवीन
:-)) क्लू देण्याची तुमची सवय काही जात नाही बुवा. ;-)
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 03/21/2022 - 06:33 नवीन
काय करणार! चांगले भारत, अमेरिका ,कॅनडा ,ब्राझील असे देश दिले तर काही गरज नाही हो :)) काही तरी हुडकून काढतात हे लोक
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Mon, 03/21/2022 - 11:59 नवीन
५१ खेळलो. ९८% जमले. आज लागोपाठ २५व्यांदा जमले. एकदा दुसरा प्रयत्न (मी पहिले दोन शब्द POWER आणि NASTY वापरतो. एकदा हवा असलेला शब्दच NASTY होता..!) १० वेळा तिसरा प्रयत्न १३वेळा चौथा १६ वेळा पाचवा प्रयत्न ९ वेळा सहावा प्रयत्न
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 03/21/2022 - 12:48 नवीन
वा ! छान आढावा. आता या सहा अक्षरीच्या मैदानात.... :)
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर गुरुवार, 05/05/2022 - 14:40 नवीन
आज इतका अनपेक्षित शब्द होता. Image removed.
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 05/05/2022 - 14:48 नवीन
अरे स्पॉइलर्स नका टाकत जाऊ भाऊ. आजचे कोडे वाया गेले. :-(
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर गुरुवार, 05/05/2022 - 20:56 नवीन
मला वाटलं आता पाच अक्षरी कोणी खेळत नसेल. शिवाय संध्याकाळचे सहा वाजून गेले होते. पॉइंट नोटेड. पुढच्या वेळी योग्य तिथे मास्किंग केले जाईल..
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 05/05/2022 - 14:55 नवीन
म्हटले तर विशेषनाम म्हटले तर क्रियापद !
  • Log in or register to post comments
र
राघवेंद्र गुरुवार, 05/05/2022 - 23:25 नवीन
माझेही असेच झाले
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 03/24/2022 - 07:04 नवीन
आजचा देश अगदी ठळक असून प्रथमच पहिल्या फटक्यात जमला ! #Worldle #62 1/6
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 03/25/2022 - 05:49 नवीन
६ अक्षरीचे संस्थळ व नाव बदलले आहे . योग्य अक्षरासाठी आता निळा रंग येतो ..... भूगोल : #Worldle #63 1/6 (100%). सोपा !
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 05/05/2022 - 14:56 नवीन
सहा अक्षरीच्या संस्थळावर चार पाच व सहा अक्षरी अशा तीन खेळांचा एकत्रित अंतर्भाव केलेला आहे.
  • Log in or register to post comments
म
मित्रहो गुरुवार, 05/05/2022 - 19:39 नवीन
आज पंचाक्षरीचे शतक पूर्ण झाले. ९९ प्रतिशत यश आतापर्यतं एकदा Lollypop समजून lolly च्या मागे धावलो आणि Lowly वाटले.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 05/06/2022 - 03:44 नवीन
या खेळाचा आनंद लुटणाऱ्या सर्वांना शुभेच्छा ! अनुभवांची देवाण-घेवाण होतच राहील...
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Fri, 05/06/2022 - 07:15 नवीन
सांख्यिकीय दृष्टीकोन ! आमच्या सांख्यीकीय फील्ड मध्ये काम करणार्‍या एका मित्राने वर्डल सोडवण्याची ऑप्टिमल स्ट्रॅटेजी शोधुन काढली आहे ती म्हणजे -

ब्लॅक यंग डेप्थ आणि फर्म्स

हे चार शब्द पहिल्यांदा वापरायचे. ह्या चार शब्दात २० वेगवेगळे लेटर्स आहेत आणि सर्वच्या सर्व वॉवेल्स कव्हर केली जात आहेत , आणि समजा ह्यातही सर्व ५ भिन्न लेटर्स न मिळाल्यास उर्वरीत लेटर्स ही क्यु , डब्ल्यु , झेड, जे, एक्स , आणि व्ही ह्यामधीलच असणार हे निश्चित होते . सो बहुतांश केसेस मध्ये तुम्हाला पाचव्या ट्राय फायनल सोल्युशन मिळुन जाते ! हा सक्सेस रेट वापरुन आमचा स्कोर १००% आहे ! स्टॅटिस्टिक्स रॉक्स !!
  • Log in or register to post comments
र
राघवेंद्र Mon, 05/09/2022 - 22:17 नवीन
ही पद्धत रॉक्स
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 05/13/2022 - 10:04 नवीन
#Worldle #112 4/6 (100%) आजचा न ऐकलेला देश शोधल्यानंतर मला हिंदी चित्रसृष्टीतील एका बहुचर्चित अभिनेत्रीची आठवण झाली !
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 05/20/2022 - 12:51 नवीन
Worldle #118 3/6 (100%) कालचा देश बऱ्याच नामांतरांतून गेलेला आहे त्याचे सर्वात नवे नाव सर्व नकाशांमध्ये नसते
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 06/19/2022 - 06:48 नवीन
कालच्या आणि आजच्या देशांचा आकार अगदी शिस्तबद्ध आणि वैशिष्ट्यपूर्ण असल्यामुळे पहिल्या प्रयत्नात ओळखता आले #Worldle #149 1/6
  • Log in or register to post comments
क
केंट Mon, 06/20/2022 - 09:41 नवीन
  • Log in or register to post comments
क
केंट Mon, 06/20/2022 - 09:41 नवीन
  • Log in or register to post comments
क
केंट Mon, 06/20/2022 - 09:51 नवीन
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 06/23/2022 - 07:09 नवीन
#Worldle #153 4/6 (100%) आजचा जो देश आहे, त्यांची कथाकथन ही समृद्ध परंपरा आहे.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 07/03/2022 - 05:58 नवीन
जगातील तीन देशांचे एक समान भौगोलिक वैशिष्ट्य आहे. या प्रत्येक देशाभोवती संपूर्णपणे दुसऱ्या देशाने वेढा घातलेला असतो. आजचा देश या तिघांपैकी एक आहे
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 07/09/2022 - 09:00 नवीन
आजच्या देशाबद्दल काय बोलावे ? त्याचे नाव काढताच भारतीयाला ...... जाऊद्यात झालं... :) तो धागा पण झाला आहे....
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 07/30/2022 - 18:24 नवीन
Quordle ४ शब्द ९ प्रयानांत हवेत.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 07/30/2022 - 18:25 नवीन
९ प्रयत्नांत
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sun, 07/31/2022 - 03:48 नवीन
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sun, 07/31/2022 - 03:48 नवीन
Daily Quordle 188 9️⃣4️⃣ 6️⃣8️⃣
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 10 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 10 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 10 hours ago
  • सुंदर !!
    1 day 10 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 10 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा