Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

मी काय म्हणतो ?

उ
उन्मेष दिक्षीत
गुरुवार, 01/13/2022 - 21:34
💬 71 प्रतिसाद
तर मी असे म्हणतो, कि वाय नोबडी इज ईंटरेस्टेड टु नो ट्रुथ ऑर लिव लाइफ द वे इट इ़ज, द लाइट वे ? लोकांना अस्वस्थता अजिबातच नाही का ? लाईफ फुल्ली एंजॉय करावेसे वाटत नाही का ? सारख्या धक्का देणार्या गोष्टी टाळाव्याश्या वाटत नाहीत का ? मजा म्हणजे काय, निश्चिंत असावे असे वाटत नाही का ? एकमेकाला काल्पनिक बंधनात बांधणेच आपण खरे मानतो आहोत का ? चालू घडामोडी सोडून आपल्या आयुष्यात बदल घडू शकतात हे मान्यच नाही का ? चक्क यु जीं नी सुद्धा (एकदा) म्हटलं आहे, कि यु हॅव मेड हेल आउट ऑफ धिस ब्युटिफुल हेवन ! , युजी कोण विचारू नये, आमचे दैवत आहे ! तर हे आपणच अनक्नोंवींगली करतो आहे आणि आपणच सुधारु शकतो हे मान्यच नाही का ? की काल्पनिक स्वर्गच आपल्याला मान्य आहे ? आणि जे ऑलरेडी आहे त्याचा कंप्लीट विसर पडला आहे ? मिपा, मनोगत ,मी मराठी यांचा एक्जॅ़ट ऑनलाईन उपयोग करुन घेणे म्हणजे काय (कुणाला माहीत नसले तरीही ) हे मी आणि संक्षींनी (त्यांनी सांगण्यासाठी, मी समजून घेण्यासाठी) अक्षरशः प्रुव केलेले आहे ! कि पचनसंस्थेतील वायूनिर्मीती याच आणि असल्या काहीही संबंध नसलेल्या ( कारण बॉडी हि कुणाची पर्सनल नाही, ईट इज नोबडीज बॉडी, फंक्शनिंग तर राहू द्याच आणि तो ज्याचा त्याचा पर्सनल विषय आहे ) विषयांमधे लोक अडकून पडण्यात धन्यता मानणे पसंत करतात ? ह्रितिक जिंदगी ना मिलेगी दोबारा मधे म्हणतो तसं, आय मीन छी ! आधी सोत्री गवी संक्षी यकु चित्रगुप्त फारेण्ड आदीजोशी आणि बाकिचे सगळे भारी भारी लिहायचे पण आता अस्लया तद्दन धाग्यांमुळे मिपावर बराच कचरा जमा झाला आहे ! आणि असे कोण काही बोलू लागले की तू कोण आम्हाला सांगणारा वगैरे असे का म्हणतात ? मधे चंद्रयान-२ वर लिहीले तर हा कोण सांगणारा असे लिहिले गेले ! ते कुठे हरवले हे त्या इस्रो सांयटीस्ट ला सुद्धा समजले नाही (शोमनशिप झाली ते वेगळे ), पण ते कशाला उडवून ९७८ कोटी पाण्यात घालवले , रस्ते झाले असते चांगले असे म्हणणार्याची अक्कल काढण्याचा प्रयत्न झाला ! आयुष्य (चक्क) फ्री मिळाले (मिपासारखे) , म्हणून ग्रांटेड घेणे आणि असल्या (चालू घडामोडी, पचनसंस्थेतील वायूनिर्मीती ) अशा अगाध गोष्टींवर चर्चा करणे आय मीन छी ! मला विचारु नका तू काय ऑलंपिक गोल्ड मेडल मिळवलंस ? हमने जो झंडे गाडने थे गाड चुके है ,नोबडी कॅन टेक इट अवे फ्रॉम मी, अँड आय लव्ह लाईफ आय डोंट टेक इट फॉर ग्रांटेड ! पूर्वीचं मिपा राहीलं नाही राव ! मिपाहितार्थ जनहीतजारी ! - ट्रू (कचरा न करणारा) मिपाकर ! केला असे वाटल्यास तत्काळ ब्लॉक करावे ! नो इश्युज

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 20790 views

💬 प्रतिसाद (71)
आ
आनन्दा Fri, 01/14/2022 - 04:29 नवीन
पूर्वीचं मिपा राहीलं नाही राव ! डायरेक्ट पुलंची आठवण करून दिलीत!!
  • Log in or register to post comments
उ
उन्मेष दिक्षीत Fri, 01/14/2022 - 08:50 नवीन
मी पुर्वीचं पुणे राहीलं नाही सारखंच म्हटलं होतं :)
  • Log in or register to post comments
B
Bhakti Fri, 01/14/2022 - 04:35 नवीन
तिळगुळ घ्या गोड गोड बोला 😃 बरोबर कचरा साफ व्हायलाच पाहिजे.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 01/15/2022 - 11:05 नवीन
कचरा साफ़ केला तरी डुप्लीकेट्स आयडीने सुळसुळाट वाढतोच. किंवा एक आयडी ब्लॉक केला तरी दुसरा आयडी येतोच येतो. आणि त्यांना वाटतं आपल्याला कोणी ओळखत नाही...! =)) तिळगुळ घ्या गोड गोड बोला...! :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
उ
उन्मेष दिक्षीत Sat, 01/15/2022 - 11:57 नवीन
तुम्ही संक्षींचे दोस्त ना ? तुम्ही माझा आय डी हा त्यांचाच दुसरा आयडी समजून (त्यांना उद्देशून) असं म्हणताय ? >>एक आयडी ब्लॉक केला तरी दुसरा आयडी येतोच येतो. क्या बात !
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 01/15/2022 - 13:36 नवीन
>>>> तुम्ही संक्षींचे दोस्त ना ? सगळंच लेखन पटत नसलं तरी मिपावर हटके लेखन करणा-यांचे आपण कोणाही आयडीचे दोस्तच. >>> तुम्ही माझा आय डी हा त्यांचाच दुसरा आयडी समजून... नाही नाही नाही. माझा बाण स्पष्टपणे चुंगसु फुंगसु सदृश आयडीबद्दल होता. ( आता ते कोण ? वगैरे विचारु नका) बाकी, येत राहा आणि लिहिते राहा. आयडी काय लिहितो हे महत्वाचे. बाकी सर्व अंधश्रद्धा...! :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
उ
उन्मेष दिक्षीत Sat, 01/15/2022 - 14:31 नवीन
उगीच गैरसमज होतात हो !
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 01/14/2022 - 05:10 नवीन
घडामोडीच अशा घडतात, त्याला तुम्ही-आम्ही काय करणार? ज्ञानालये बंद आणि मदिरालये चालू, अशा राजवटीत, कस्तुरीच्या सुगंधाची अपेक्षा करू नये...
  • Log in or register to post comments
उ
उन्मेष दिक्षीत Fri, 01/14/2022 - 08:53 नवीन
डिस्क्शन करुन त्याचा काय उपयोग एवढंच म्हणणं होतं , उगीच फक्त नवे प्रतिसाद यानीच भरलेले असतात ! आणि बाकीचे लेख खाली जात असतात.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 01/14/2022 - 09:00 नवीन
अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करायचे लिहिणे हा माणसांचा स्थायीभाव आहे, दुर्लक्ष करणे, आपल्या हातात. ह्या जगांत असंख्य पुस्तके आहेत, पण म्हणून, आपण प्रत्येक पुस्तक वाचत नाही. शिवाय, तुम्हाला आवडेल त्या विषयावर, तुम्ही इथे लिहू शकता, मिपावर लोकशाही आहे.
  • Log in or register to post comments
उ
उन्मेष दिक्षीत Fri, 01/14/2022 - 09:09 नवीन
दुर्लक्ष म्हणून कसे चालेल ? किती करायचे ? एकदा तरी बोलायला नको का ? तुम्ही होणारा कचरा दुर्लक्ष करत असाल, मी एकदातरी बोलतोच, लोकशाही आहे ! नवे प्रतीसाद यानीच भरलेले असतात , पुढे जाऊन वाचायला पण नको वाटतं बाकीचं ! >> ह्या जगांत असंख्य पुस्तके आहेत, पण म्हणून, आपण प्रत्येक पुस्तक वाचत नाही. पुस्तकं आपापली पर्सनल आहेत , हे पब्लिक आहे आणि फ्री आहे, बिहेव एवढंच म्हणायचय, (तुम्हाला नव्हे)
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 01/14/2022 - 09:17 नवीन
प्रश्र्नच नाही.... विषयानुरूप प्रतिसाद येत असल्याने, विषय आवडत नसेल तर, वाचायचे कष्ट मी तरी घेत नाही.. उद्या जर एखादा धागा, मालिकेवरती आला तरी मी, त्या धाग्यावर गुंतणार नाही. तुमचे मन हळुवार असल्याने, सुरूवातीला त्रास होईल, पण नंतर जमेल.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Fri, 01/14/2022 - 07:43 नवीन
मी काय म्हणतो ? तुम्हाला जे वाटते तेच सर्वान्ना वाटावे असा तुमचा अट्टहास का ? ह्या असल्याच अहमन्यतेमुळे , मी कोणीतरी वेगळा अतिशहाणा आहे , ह्या विचारसरणीमुळे संक्षींचा आयडी उडवण्यात आला . तुम्हाला जे आवडते तेच सर्वांना का आवडावे किंव्वा इतरांना जे आवडते ते तुम्हाला का आवडावे , उगाचच निरर्थक हट्ट का ? कुमार सरांचे वैद्यकीय ज्ञानावरील अनुभवाधारित लेख आम्हाला अन अनेक मिपाकरांना मनापासुन आवडातात. तुम्हाला आवडले पाहिजेत अशी काही सक्ती नाही . दुनिया मल्टी डायमेन्शनल आहे हो, रादर पिंण्डे पिण्डे मतिर्भिन्ना , हे जेव्हा तुमचा लक्षात येईल तेव्हा तो तुमच्यासाठी सुदिन असेल ! शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 01/14/2022 - 08:55 नवीन
प्रचंड सहमत आहे ... दुनिया रंगरंगिली बाबा
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Fri, 01/14/2022 - 08:56 नवीन
तुम्हाला जे वाटते तेच सर्वान्ना वाटावे असा तुमचा अट्टहास का ?
सहमत. एखादा विषय आवडत नसेल तर त्याच्या संबंधित धागे उघडूनच न बघणे सगळ्यात उत्तम. शीर्षकावरून धागा नक्की कशावर आहे हे कळले नाही म्हणून धागा उघडून बघितला तरी मग त्यावर कोण काय प्रतिसाद देत आहे याचा ट्रॅक ठेवायची काहीच गरज नाही.
कुमार सरांचे वैद्यकीय ज्ञानावरील अनुभवाधारित लेख आम्हाला अन अनेक मिपाकरांना मनापासुन आवडातात. तुम्हाला आवडले पाहिजेत अशी काही सक्ती नाही .
सहमत.
  • Log in or register to post comments
उ
उन्मेष दिक्षीत Fri, 01/14/2022 - 13:49 नवीन
कुमार, सेम वाक्य तुम्हाला लागू पडते. तुम्हाला सहमत का असहमत कुणी विचारलेलं नाही आहे ! तुम्ही तर कचराफेक मंडळाचे अध्यक्षच आहात ! चालु ठेवा घडामोडी नाहीतर बंद व्हायच्या !
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Fri, 01/14/2022 - 15:22 नवीन
का हो संक्षी एकेकाळी तुमच्या उर्मटपणामुळे मिपाकरांना राग यायचा पण आता कोणाला राग वगैरे येत नाही. आता तर तुम्हाला कोणी फारसे गांभीर्याने घेत नाही आणि खरं तर लोक तुमच्या प्रतिसादांना हसतात, तुमच्या प्रतिसादांमुळे सगळ्यांचे अमर्याद मनोरंजन होते हे तुमच्या लक्षात येत नाही का? नाही आले तर बरेच आहे म्हणा. आमचे असे फुकटात मनोरंजन दुसरे कोण करून देणार आहे? चालू द्या.
  • Log in or register to post comments
उ
उन्मेष दिक्षीत Fri, 01/14/2022 - 16:28 नवीन
समजत असाल तर जोक इज ऑन यू ! बघा घडामोडी बंद तर नाही पडल्या, काय होतंय बघा युपी निवड्णूका वगैरे ! तुम्ही निवड्णूक आयोगात असालच तिथल्या.
  • Log in or register to post comments
उ
उन्मेष दिक्षीत Fri, 01/14/2022 - 09:02 नवीन
नाही हो, इफ यु आर हॅपी, यु वाँट अदर्स टु बी हॅपी , सिंपल ! तुम्हाला जे वाटते तेच सर्वान्ना वाटावे असा तुमचा अट्टहास का >> हॅपीनेस सगळ्यांना सारखाच वाटतो ! दुनिया मल्टी डायमेन्शनल आहे हो, रादर पिंण्डे पिण्डे मतिर्भिन्ना >> मते भिन्न असतील, बट दॅट विच वर्क्स ऑलवेज इज वन ! प्लस पूर्वीच्या मिपा ची फार आठवण येत आहे :) >> कुमार सरांचे वैद्यकीय ज्ञानावरील अनुभवाधारित लेख आम्हाला अन अनेक मिपाकरांना मनापासुन आवडातात. तुम्हाला आवडले पाहिजेत अशी काही सक्ती नाही . मी फक्त एका लेखा बद्दल म्हटले होते !
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Fri, 01/14/2022 - 12:28 नवीन
>> कुमार सरांचे वैद्यकीय ज्ञानावरील अनुभवाधारित लेख आम्हाला अन अनेक मिपाकरांना मनापासुन आवडातात. तुम्हाला आवडले पाहिजेत अशी काही सक्ती नाही . मी फक्त एका लेखा बद्दल म्हटले होते ! पचनसंस्थेबद्दल धागा होता तो का ? तो तरी आपल्याला काही कचरा वाटला नाही .. उलट असे म्हणीन कि कचरा निर्मूलनाबद्दल (पोटातील ह ) चांगली माहिती मिळाली ( फुल्ल पन इंटेंडेड !) आपला ( सध्या फोड़ मॅप आहारी ) https://www.monashfodmap.com/ibs-central/i-have-ibs/starting-the-low-fodmap-diet/
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 01/14/2022 - 14:23 नवीन
>> कुमार सरांचे वैद्यकीय ज्ञानावरील अनुभवाधारित लेख आम्हाला अन अनेक मिपाकरांना मनापासुन आवडातात.
सहमत.
पचनसंस्थेबद्दल धागा होता तो का ? तो तरी आपल्याला काही कचरा वाटला नाही .. उलट असे म्हणीन कि कचरा निर्मूलनाबद्दल (पोटातील ह ) चांगली माहिती मिळाली ( फुल्ल पन इंटेंडेड !)
होय. माझ्या वाचनातून सुटला होता तो धागा. आत्ता दिक्षीत साहेबांनी सांगीतल्यावर लगेच जाऊन पाहिला. खूप माहितीपूर्ण धागा आहे तो. :-)
  • Log in or register to post comments
उ
उन्मेष दिक्षीत Fri, 01/14/2022 - 08:48 नवीन
मकर संक्रांती ! तिळ्गुळ घ्या गोड बोला !
  • Log in or register to post comments
ग
गड्डा झब्बू Fri, 01/14/2022 - 09:55 नवीन
डोक्याला शॉटचा नवा भाग लिहिण्याएवढे पोटेन्शीअल मिळेल या आशेनी वाचायला आलो. वाटलं होतं कमीतकमी डम्परभर तरी कचरा आणून ओताल! पण हे काय? फकस्त पाच सहा घमेली भरतील एवढाच कचरा ओतलात? आम्ही नाही जा! कट्टी तुमच्याशी!
  • Log in or register to post comments
उ
उन्मेष दिक्षीत Fri, 01/14/2022 - 11:36 नवीन
तुमच्या डोक्यातच कचरा भरला आहे त्याला बाकीचे काय करणार ?
  • Log in or register to post comments
उ
उन्मेष दिक्षीत Fri, 01/14/2022 - 11:40 नवीन
आणखी एक आय डी सुचवतो, डस्ट बीन असा एक नवीन अवतार घेउन या तुम्ही !
  • Log in or register to post comments
ग
गड्डा झब्बू Fri, 01/14/2022 - 11:59 नवीन
संक्षी सर! कट्टी आहे मी तुमच्याशी! आधी चार डम्पर कचरा आणून ओता तर बट्टी करीन.

मी माझंच खरं करणार!!

  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Fri, 01/14/2022 - 12:10 नवीन
काय संक्षी सर! छ्या घोर निराशा केलीत राव!
अच्छा हे म्हणजे ते आहेत होय? पुढील काही प्रतिसाद वाचून विश्वास बसला :) :)
  • Log in or register to post comments
ग
गड्डा झब्बू Fri, 01/14/2022 - 12:51 नवीन
मी
मी म्हणजे मी

मी म्हणजेच मी

मी म्हणजे मीच

मीच म्हणजे मी

अशी पंचसूत्री ओळख असलेले मिपावरचे शुप्रसिद्ध कचरा टायकून. ज्यांच्या स्तुतिप्रित्यर्थ डोक्याला शॉट [तृतीया], डोक्याला शॉट [चतुर्थी], डोक्याला शॉट [ (पेट्रोल) पंचमी ] हे तीन धागे मी पाडले होते :-)
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Fri, 01/14/2022 - 12:57 नवीन
जबराट :)
  • Log in or register to post comments
उ
उन्मेष दिक्षीत Fri, 01/14/2022 - 13:05 नवीन
नुसता एक प्रतिसाद (हुक) टाकला की अडकता आणि माशासारखे तडफडता ! आणि स्वतःच सांगताय किती वेळा शॉट लाऊन घेतले ते ! तुम्हारे बस की बात नही, माझा नाद सोडून द्या ! जाता जाता आणखी एक आय डी सुचवतो तुमच्यासाठी , डंपिंग ग्राउंड ! बाय !
  • Log in or register to post comments
ग
गड्डा झब्बू Fri, 01/14/2022 - 13:17 नवीन
बट्टी करायची असेल तर आधी आठ डम्पर कचरा आणून टाका. तो परेंत
कट्टी फू!

कट्टी फू!

कट्टी फू!

  • Log in or register to post comments
उ
उन्मेष दिक्षीत Sat, 01/15/2022 - 14:19 नवीन
तुम्हाला जो कचरा गोळा करायचाय ना तर विशिष्ट धाग्यावर मिळेलंच ! तुम्ही कचराफेक लोकांना आव्हान करा आणि तुमचा छंद आवडीने जोपासा ! आणि स्वतःच्या डोक्यातला कचरा इथे टाकू नका ! आणखी एक आयडी तुमच्यासाठी #झाडू !
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 01/14/2022 - 10:25 नवीन
जाऊं देत हो दिक्षीत साहेब.. आम्ही मिपाकर असेच आहोत. तुम्ही उगाच कशाला त्रास करून घेताय? अन् तसंही तुमची-आमची लेवलच निराळी.. तुम्ही हुच्चकोटीचे.. आम्ही पामर.. चालायचंच. सध्या, आमचा आनंदच या गोष्टींमधे आहे, त्याला तुम्ही काय करणार. आमची लेवल वाढेल, तशी आमची आनंदाची परिमाणं सुद्धा बदलतील. तोवर जरा धीर धरा! असं करा, दोन-तीन नवीन धागे टाका पाहू.. "आनंद" समजावून देणारे. आम्ही त्यावरही चर्चा करुच शकतो. तुम्हाला उगाच कोणी प्रतिसाद देत असतील तर आपण संपादकांना सांगून त्याचं/तिचं घर उन्हात बांधू तुमचे धागे वाचनमात्र करू. काळजी नसावी. बिनधास्त लिहा. :-)
  • Log in or register to post comments
उ
उन्मेष दिक्षीत Fri, 01/14/2022 - 11:37 नवीन
बी फ्रस्ट्रेटेड ! बाय द वे हु आर यु अगेन ?
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 01/14/2022 - 14:26 नवीन
फ्रस्ट्रेटेड
आम्ही? ;-)
बाय द वे हु आर यु अगेन ?
अरे काय दिक्षीत साहेब, इतक्यात विसरलात? आत्ता तर वर सांगीतलेय ना.. आम्ही पा म र. सर्वसाधारण मिपाकर. :D
  • Log in or register to post comments
उ
उन्मेष दिक्षीत Fri, 01/14/2022 - 15:06 नवीन
>> त्यानंतर बोलू आम्ही पा म र. सर्वसाधारण मिपाकर. :D >> आम्ही पण सर्वसाधारण मिपाकरच आहे, व्हि आय पी मिपाकर एकच आहेत (गड्डा) कारण ते असे एकटेच भूतयोनी सदस्य आहेत ! त्याचू कुठे गायब झाले कुणास ठाऊक, कि त्याचू ही गड्डा है !
  • Log in or register to post comments
उ
उन्मेष दिक्षीत Fri, 01/14/2022 - 15:12 नवीन
>> एकदा सांगून बघायचं हो, नियमात राहून बघायचं, ओपन ग्राउंड असेल तर ते ही बघूच ! अँड आय डिड दॅट फॉर संक्षी ओन्ली, मला घंटा फरक पडत नाही !
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 01/14/2022 - 15:14 नवीन
आम्ही पण सर्वसाधारण मिपाकरच आहे,
हा हा हा.. तसं असतं तर आपण चांगले मित्र झालो असतो. दुर्दैवानं तसं नाही. असो.
त्यानंतर बोलू
म्हणूनच एवढं लिहिलं होतं. तुमचं चालू देत. आम्ही थांबतो. :-)
  • Log in or register to post comments
उ
उन्मेष दिक्षीत Fri, 01/14/2022 - 15:42 नवीन
आणि त्यांचे मित्र आमचे मित्र होऊ शकत नाहीत ! एकवेळ गांजावाले होतील पण तुम्ही नाही !
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 01/14/2022 - 17:04 नवीन
मार्कसभौना हे नक्कीच आवडेल. हा हा हा...
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Fri, 01/14/2022 - 17:56 नवीन
:) तसेही आपली संक्षींसोबत दुश्मनी कधीच नव्हती , उलट मी त्यांच्या लेखनातील विचारांचा फॅन होतो आणि आजही आहे. मला फक्त त्यांची लेखन शैली खटकायची. पण मी म्हणतो तेच एक सत्य अन तोच अंतिम मार्ग ह्या त्यांच्या विचारसरणीवर हसु यायचे . म्हणुन आम्ही त्यांची खिल्ली उडवायचो पण ते तेही मजे मजेत न घेता अजुन प्रतिवाद करायचे म्हणुन आम्हाला अजुन चेव यायचा ! पण त्यांचे लेखन अन विचार मननीय होते ह्यात शंका नाही: एका क्षणात विदेहत्व किंव्वा काळ हा एक भास आहे किवा एक तर तुम्ही सिध्द असता किंवा नसता , देअर इज नो थर्ड ऑप्शन ! अशा त्यांच्या वाक्यांवर कित्येकदा चिंतन केले आहे ! हे विचार आम्हाला आमच्या माऊली , समर्थ , तुकोबांच्या वचनात अभंगात उपनिषदात सापडायचे की खुप भारी वाटायचे , एकदम कनेक्टिंग द डॉट्स ! पण संक्षी म्हणजे मी एकटाच म्हणतो तेच एकमेव सत्य अन त्याची बेशर्त स्विकृती करा असे काही म्हणायला लागले की खिल्ली ऊडवायचा चेव यायचा , मनापासुन हसु यायचं , अजुनही येतें =)))) असो. बाकी गांजाच्या बाबतीत माझे आजही स्पष्ट मत आहे की तो जितक्या लवकर डिक्रिमिनलाईझ होईल तितके ह्या देशातील लोकांचे भले होईल . युरोपातील अनेक देशांनी , कॅनडाने कधीच लीगल केले, अमेरिकाही पुढील ५ वर्षात फेडरली लीगल करेल ह्यात शंका नाही. आपले सरकार वराती मागून घोडे नेहमी प्रमाणे करणार आहे , एकट्या भारतातच जवळापास ३ बीलीयन डॉलर , जवळपास २० हजार कोटींची इंडस्ट्री उभी करायच्या संधीला आपण मुकत आहोत , जेव्हा लीगल करतील तेंव्हा कोणात्या तरी पेप्सी कोकोकोला फायझर जोन्सन अ‍ॅन्ड जॉन्सन किंवा तस्तम विदेशी ब्रॅड्स कडून वाढीव दरात गोष्टी विकत घ्यावा लागतील तेव्हा लोकांना अक्कल येईल . तेव्हा मी येथे येऊन म्हणेन की बघा भेंचो मी कित्येक वर्षांआधीपासुन सांगत होतो की लीगलाईझ करा लीगलाईझ करा !! असो.
  • Log in or register to post comments
उ
उन्मेष दिक्षीत Fri, 01/14/2022 - 18:16 नवीन
संक्षींचा काय संबंध आला इथं, ते इथे सायलेंट होऊन बराच टाईम झाला ! राहता राहीला गांजा, माझा तोच स्टँड आहे, मी पीत नाही, बाकी काय करतात देणे घेणे नाही !
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 01/14/2022 - 13:26 नवीन
आता कट्टा म्हटल्यावर सर्व प्रकारच्या गप्पा होणार, काही उपयोगी, काही निरुपयोगी, काही मंत्र देणार्‍या, काही फालतू, काही उच्च उच्चअभिरूची, काही चावट ..... ! राजहंस होऊन आपल्याला हवे ते टिपायचे आणि संतुष्ट होऊन आनंदी रहायचे ! Image removed.

जय मिपा, जय मराठी !

  • Log in or register to post comments
उ
उन्मेष दिक्षीत Fri, 01/14/2022 - 13:57 नवीन
कट्टा करायला जागा स्वच्छ् पाहीजे. क्युरेटरच झोपलेले असतात त्यामुळे काही बोलायचा प्रश्न नाही ! सेल्फ क्युरेटिंग तर सोडाच. काही आय डीं ना बघून भुतावळ आहे का हा प्रश्न पडतो ! डोक्याला शॉट लागलेली भुते असतात ( वरुन माणूस दिसत असली तरिही ) हे मला पटलेले आहे !
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 01/14/2022 - 17:13 नवीन
भुते परवडली पण अवतारी माणसे, मला तरी आवडत नाहीत .... एकदा हाकलले तरी, दुसरा अवतार घेऊन परत परत येतात ... माणसाने अहंकारी गरीब असावे, पण लोचट असू नये...
  • Log in or register to post comments
उ
उन्मेष दिक्षीत Fri, 01/14/2022 - 17:21 नवीन
डोक्याला शॉट लागलेली भुते !
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 01/14/2022 - 17:42 नवीन
लोचट, अवतारी मंडळी... अहंकारी मनुष्य परवडला. तो निदान, "मानी" तरी असतो, पण, "लोचट" मंडळींना, कुणीच मान देत नाही.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Fri, 01/14/2022 - 17:55 नवीन
पण अहंकारी आणि लोचट असे विचित्र कॉम्बिनेशन असलेल्यांचे काय करणार? :)
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 01/14/2022 - 17:59 नवीन
अशा धाग्यांचे, "काश्मीर" करायचे ... TRP मिळाला, म्हणून धागाकर्ता खूष आणि टाईमपास करायला, धागा मिळाला, म्हणून मिपाकर खूष... राजीखूषीचा मामला...
  • Log in or register to post comments
उ
उन्मेष दिक्षीत Fri, 01/14/2022 - 18:20 नवीन
एक असते फ्री गोष्ट वापरणे, दुसरी गोष्ट फ्री मिळते म्हणून पायदळी तुडवणे ! तर चालू द्या तुमच्या घडामोडी. मुवी, तुमची मुवी एकदमच चेंज झाली, असु दे ! टिआर पी द्यायला तुम्ही नाही आलात तरी चालेल ! अजिबात फिरकु नका.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 37 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 51 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 53 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 57 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा