महाराष्ट्रीय सण आणि होत असलेली भेसळ ( ? )
आज कोजागिरी पौर्णिमा.
लहानपणापासून मी पहात आलोय की आजच्या दिवशी मातीच्या किँवा इतर कोणत्याही भांड्यात दूध तापवून ते उकळवले जाते, आकाशातील पूर्ण चंद्र दिसत असतो. त्याची प्रतिबिंब दुधात पडेल अश्या ठिकाणी ते उकळवून नंतर घरातील सर्व जण ते दुध पितात.. परंतु आजकाल अश्या पद्धतीने सण साजरा न करता आमच्या इथे दांड्या खेळल्या जातायत. सर्व अरेंजमेंट मारवाडी फॅमिली ( संख्या फक्त २) आहे त्यांनी केलेली आहे... गाणी पण बहुतांश मारवाडी आहेत. नाचणारे ९८ टक्के मराठी आहेत. अर्थातच असं करायला विरोध नाही पण हे करताना आपण आपले सण साजरा करण्याची पद्धत विसरत चाललोय का ??
दसऱ्याच्या दिवशी घरी सोने ( अपट्याची पाने ) द्यायला लहान मुले आले होती ( मराठी ७-८ आणि ईतर भाषिक १-२ ). परंतु सर्व जण " हॅप्पी दसरा " असं म्हणतं होती. सोन घ्या सोन्यासारखे रहा असं म्हणण्याची पद्धत कुठे गेली ते समजेना. मकर संक्रातीच्या दिवशी पण " तिळगूळ घ्या गोड बोला " मागे पडून हॅपी मकर संक्रांती आणि पतंगबजी वाढत चाललीय.
आम्हीं लहान असताना नवरात्रीत दांडिया खळण्यासाठी जायचो तेव्हा सर्व मराठी आणि हिंदी गाणी वाजवली जायची. कृष्णाचे गवळणी, गणपतीची गाणी , अंबेमातेची आणि इतर हिंदी गाणी वाजायची ( हे नाम रे .. सबसे बडा तेरा नाम हे गाणे तोंडपाठ होते. ) पण आमच्या गल्लीत मारवाडी , गुजराती गाणी वाजत होती... आणि विशेष म्हणजे त्यावर नाचणारे ९० टक्के मराठी होते. त्यामुळें मराठी लोकांना मराठी गाणी वाजवायला "लाज " वाटते का असा विचार मनात येऊन गेला.
नवरात्रीत जे काही दांडिया कार्यक्रम होतात तेथे मराठी लोक साड्याऐवजी किंवा मराठी पेहरावा ऐवजी गुजराती ड्रेस का घालतात ?
हीच गोष्ट लग्नात देखील.. मराठी मुलं आणि मुली विदेशी किंवा इतर धर्मीय पेहराव का करतात. उदा. मुली साडी सोडुन वेडिंग ड्रेस ( ख्रिश्चन लोकामध्ये घातला जातो तसा) किंवा घागरा घालतात..
याउलट कोणत्याही ख्रिश्चन मुलीने किंवा गुजराथी मुलीने लग्नात नऊवारी साडी घातलेली मी आजवर पहिली नाही..
पूर्वी हत्ती नक्षत्रात भोंडला/ हतका /हादगा हा खेळ / सण साजरा केला जायचा. पण बहुतेक आता नामशेष झाला. मी गेल्या ५-६ वर्षात कोणत्याही मुला मुलींनी हा प्रकार साजरा केल्याचे पाहिलेले नाही. ही पद्धत नष्ट झाली का ?? एलामा पैलामा.. आज कोन वार बाई आज कोन वार.. अशी अनेक गाणी आजही मला पाठ आहेत. पण आजकाल बहुतांश मराठी मुलांना किंवा मुलींना हे महिती आहे?? आणि ईथे ( महाराष्ट्रात) आल्यावर इथले पाहून किती मारवाडी गुजराथी लोकांनां ही गाणी महिती आहेत??
आमच्या वेळी रंगपंचमी आणि होळी हे दोन वेगवेगळे सण होते.
आजही कोणतेही कॅलेंडर उघडुन पहा दोन्ही सण वेगवेगळे दाखवलेले आहेत. होळीच्या दिवशी आम्ही होळी पेटवायचो. पुरण पोळी खायचो. आणि रंगपंचमीला रंग खेळायचो. पण आता रंगपंचमी हा सण राहिलेला नाही... आणि होळीच्या दिवशी होळी कोणी पेटवत नाही ( पर्यावरण ह्या विषयावर ईथे चर्चा नको ). याउलट होळीच्या दिवशी रंग खेळले जातात.. आणि "हॅपी होली " च्या मेसेज ने इनबॉक्स फुल होतो.
ज्या पद्धतीने आपण मारवाडी , गुजराती इ लोकांना सामावून घेउन त्यांच्या कलाने आपले सण साजरे करतोय त्या पद्धतीने ते लोक आपले सण साजरे करताना दिसत नाहीत. मी आजवर कोणी इतर भाषिक व्यक्तिने किंवा फॅमिली ने गुढी उभी करून गुढीपाडवा साजरा केला असं पाहिलेले नाही. किंवा हद्ग्याची गाणी म्हणत फेर धरलेले आठवत नाही.
पुण्यात याआधी कधीही न दिसणारी कबुतरे आता प्रत्येक चौकाचौकात उदंड संख्येने आलेली आहेत, याला कारणीभूत जैन आणि मारवाडी लोक आहेत. अर्थात कोणी कोणाला काय खायला घालावे हा त्यांचा प्रश्न पण मी पाहिले की हिच लोक इथे येऊन सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती इ वेळी वर्गणी देताना चींधिगिरी करतात पण आपली प्रथा आहे म्हणून पुण्यात जागोजागी कबुतरांच्या शिटा पसरवून ठेवलेत, त्यांना घातलेले खाद्य कुजून कुजून जाते पण तरीही ते शेकडो / हजारो रुपये महिना खर्च करतात. .. या लोकांचं पाहून आजकाल मराठी लोक देखील अश्याच पद्धतीने कबुतरांना खाद्य घालून " पुण्य " कमवू पाहतायत...
दिवाळीच्या सणाच्या वेळी पण पारंपरिक फराळ नामशेष होऊन सोनपापडी, बिस्किटे, चॉकलेट इ प्रकार वाढत चाललीय आहेत. कोणी इतर भाषिक इथे येऊन इथल्या लोकांप्रमाणे चकल्या, लाडू, करांजिर करताना दिसत नाहीत. पण इथले लोक त्यांचं पाहून सोनपापडी कडे वळले.
तर.. चर्चेचा मुद्दा हा की आपण आपले सण साजरे करायची पद्धत बदलत चाललोय का. ? ईतर भाषिक लोकं यांनी इथे आल्यावर इथल्या संस्कृतीत मिक्स होण्याऐवजी अल्पसंख्य असुन सुध्दा संस्कृतीक आक्रमण करत आहेत का?? की आपण होऊन आपल्या पद्धती सोडुन या नव्या पद्धती आत्मसात करत आहोत. ? आणि जर करत आसु तर का करतोय? याचे दूरगामी परिणाम काय होतील??
मी जे काही वर लिहिलय ते माझा गैरसमज आहे का ?? इतर मिपाकर या बाबतीत काय विचार करतात ??
टीप - हा धागा राजकीय हेतूने किंवा इतर भाषिक लोकांच्या द्वेष करण्यासाठी काढलेला नसुन आपल्या सण आणि परंपरा यामध्ये भेसळ होतेय की नाहीं या गोष्टीची चाचपणी करण्यासाठी काढला आहे. मी माझी मते मांडली आहेत.. ती बरोबरच आहेत असं माझं म्हणणं नाही. मी कदाचित चुकीचा असू शकेल.
धाग्याला मोदी ,.bjp , मनसे इ राजकीय संघटना कडे नेऊ नये.
🗣 चर्चा
(129)
स
सुक्या
Tue, 10/26/2021 - 18:36
नवीन
कुठल्याही प्राण्याला किंवा पक्षाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात जगु द्यावे. माणसे त्यांना खायला देत नव्हती तेव्हाही ते मुक्त जगतच होते.
दुर्दैवाने या बाबी धर्म / पाप / पुण्य या बाबींशी जोडल्यामुळे लोक असले थेरे करतात. रस्त्यावरच्या मोकाट कुत्र्यांच्या बाबतीतही हेच खरे आहे ..
काही लोकांना अक्कल नसते काय करणार ..
- Log in or register to post comments
M
mangya69
Sat, 10/23/2021 - 09:25
नवीन
वाघ सिंह म्हणजे स्वाभिमान व इतर म्हणजे क्षुद्र हे राजकीय पक्षांनी सिम्बॉलीसज करून भिनवलेले आहे.
सगळे पक्षी प्राणी आपापल्या जीवनचक्राअनुसार जगत असतात.
माणसाच्या घरात प्राणी पक्षी येतात , कारण माणसांनी आक्रमण करून त्यांची स्पेस कमी केली आहे. माणूस घर बांधताना अनेक सजीव मरतात , त्यांची घरे मोडतात , म्हणूनच नवीन घरात गेल्यावर त्यांच्या आत्म्यासाठी वास्तुशांत करतात.
माणसाच्या घरात कोणते प्राणी रहातात , हे समर्थ रामदासांनी दासबोधात लिहिले आहे.
दासबोध समास दहावा
सांग नरदेह जोडलें । आणी परमार्थबुद्धि विसर्ले ।
तें मूर्ख कैसें भ्रमलें । मायाजाळीं ॥ ३३॥
मृत्तिका खाणोन घर केलें । तें माझें ऐसें दृढ कल्पिलें ।
परी तें बहुतांचें हें कळलें । नाहींच तयासी ॥ ३४॥
मुष्यक म्हणती घर आमुचें । पाली म्हणती घर आमुचें ।
मक्षिका म्हणती घर आमुचें । निश्चयेंसीं ॥ ३५॥
कांतण्या म्हणती घर आमुचें । मुंगळे म्हणती घर आमुचें ।
मुंग्या म्हणती घर आमुचें । निश्चयेंसीं ॥ ३६॥
विंचू म्हणती आमुचें घर । सर्प म्हणती आमुचें घर ।
झुरळें म्हणती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥ ३७॥
भ्रमर म्हणती आमुचें घर । भिंगोर्या म्हणती आमुचें घर ।
आळीका म्हणती आमुचें घर । काष्ठामधें ॥ ३८॥
मार्जरें म्हणती आमुचें घर । श्वानें म्हणती आमुचें घर ।
मुंगसें म्हणती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥ ३९॥
पुंगळ म्हणती आमुचें घर । वाळव्या म्हणती आमुचें घर ।
पिसुवा म्हणती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥ ४०॥
ढेकुण म्हणती आमुचें घर । चांचण्या म्हणती आमुचें घर ।
घुंगर्डी म्हणती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥ ४१॥
पिसोळे म्हणती आमुचें घर । गांधेले म्हणती आमुचें घर ।
सोट म्हणती आमुचें घर । आणी गोंवी ॥ ४२॥
बहुत किड्यांचा जोजार । किती सांगावा विस्तार ।
समस्त म्हणती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥ ४३॥
पशु म्हणती आमुचें घर । दासी म्हणती आमुचें घर ।
घरीचीं म्हणती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥ ४४॥
पाहुणे म्हणती आमुचें घर । मित्र म्हणती आमुचें घर ।
ग्रामस्त म्हणती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥ ४५॥
तश्कर म्हणती आमुचें घर । राजकी म्हणती आमुचें घर ।
आग्न म्हणती आमुचें घर । भस्म करूं ॥ ४६॥
समस्त म्हणती घर माझें । हें मूर्खहि म्हणे माझें माझें ।
सेवट जड जालें वोझें । टाकिला देश ॥ ४७॥
अवघीं घरें भंगलीं । गांवांची पांढरी पडिली ।
मग तें गृहीं राहिलीं । आरण्यस्वापदें ॥ ४८॥
किडा मुंगी वाळवी मूषक । त्यांचेंच घर हें निश्चयात्मक ।
हें प्राणी बापुडें मूर्ख । निघोन गेलें ॥ ४९॥
ऐसी गृहांची स्थिती । मिथ्या आली आत्मप्रचीती ।
जन्म दों दिसांची वस्ती । कोठें तरी करावी ॥ ५०
https://mr.m.wikisource.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%A7/%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95_%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Wed, 10/20/2021 - 09:13
नवीन
महाराष्ट्र विषयी बोलायचे झाले तर महाराष्ट्र मधील सर्वात प्रगत शहर आणि देशातील सर्वोत्तम शहर मुंबई.
ह्या शहरात जितके प्रगत infrastructure आहे तेवढे देशातील कोणत्याच शहरात नाही.
मुंबई मध्ये सर्व प्रांतातील लोक आहेतच पण विदेशातील पण लोक आहे.
Cosmopolitan शहर आहे.
मग मराठी लोकांनी सर्वच लोकांची संस्कृती परंपरा का आत्मसात केल्या नाहीत.
किती मराठी लोक बंगाली,तामिळी,केरळी , आसामी,Etc ह्यांच्या पद्धतीने सण , उस्तव,साजरे करतात.
किती लोकांनी ह्यांचा पेहेराव ,रीतिरिवाज आत्मसात केले आहेत.
ह्याचे उत्तर आहे बिलकुल नाही ..
त्या विषयी मराठी लोकांना माहिती पण नाही.
गुजराती रिती नी साडी मराठी स्त्रिया नसतात मग यूपी ,बिहार प्रमाणे साड्या का नेसत नाहीत.
हा प्रश्न खूप महत्व चा आहे.
लोक विजेत्या लोकांना फॉलो करतात.
ब्रिटिश लोकांनी जगावर राज्य केले ते विजेते होते.
नंतर इंडस्ट्रिअल क्रांती झाली त्या मध्ये पण तेच विजेते होते.
विजेत्या लोकांची परंपरा,चालीरीती,भाषा ह्याचा स्वीकार करणे म्हणजे प्रगत.
जग जवळ आले आहे ना मग आफ्रिकन लोकांचे पेहराव,रीतिरिवाज भारताने का स्वीकारले नाहीत.
युरोपियन च का स्वीकारले.
ह्या प्रश्नाचे उत्तर महत्वाचे आहे.
मराठी लोक विजेते आहेत पण सर्वांनी मिळून त्यांचे मानसिक खाच्चिकरण केलेले आहे..त्या मुळे एक कमीपणाची भावना मराठी लोकात आहे.
मीडिया ही पूर्ण गुजराती ,मारवाडी लोकांच्या हातात आहे कोणत्या ही भाषेतील असली तरी..त्यांनी मराठी लोकांच्या मनावर तुम्ही किरकोळ आहात हे ठसवले आहे .
त्याचाच परिणाम म्हणून मराठी लोक बाकी देशातील विविध परंपरा आत्मसात ने करता .मारवाडी आणि गुजराती परंपरा च आत्मसात करतात....
जग सुद्धा आफ्रिकन परंपरा आत्मसात करत नाही युरोपियन परंपरा आत्मसात करतात.
जपान,जर्मनी,चीन, कोरिया हे फक्त स्वतःचीच परंपरा पळतात .
मराठी लोकांनी पाहिले स्वतःला कमी समजणे सोडून द्यावे..ह्या देशात सर्व नवीन गोष्टी फक्त आणि फक्त मराठी लोकांनीच निर्माण केल्या आहेत.
मग ते आरमार असू,cricket मधील विश्व विक्रम असू,सिनेमा असू ,ऑलिम्पिक पदक असू ,स्वराज्य स्थापन करणे असू,गायिका असू, परमवीर चक्र असू.
अगदी पाहिले उद्योगपती असू
सर्व मराठी च होते.
- Log in or register to post comments
र
रामदास२९
Wed, 10/20/2021 - 09:51
नवीन
एकदम सहमत.. आपले सण , परंपरा आणि संस्कृती यान्चा न्यूनगन्ड न बाळगता साजरे करावेत, परक्यान्ना , नवीन पीढीला शिकवावेत...
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 10/20/2021 - 10:55
नवीन
कुटुंबाने काही काळ एकत्र येऊन मजेत घालवावा हा बहुसंख्य सणांमागील उद्देश होता. बदलत्या काळानुसार वेळ मजेत चालविण्याच्या संकल्पना बदलत आहेत. त्यामुळे काही जुन्या गोष्टी कालबाह्य होऊन त्यांची जागा नवीन गोष्टींनी घेतली जात आहे. त्यामुळे भोंडला, दसऱ्याला आपट्याची पाने देणे, होळी, बोंब मारणे, दिव्यांची अमावस्या अशा गोष्टी हळूहळू बंद होत आहेत. फक्त सण किंवा उत्सव नव्हे तर विटीदांडू, बैदूल, लगोरी, सागरगोटे असले खेळ सुद्धा बरेचसे बंद झाले आहेत व त्यांची जागा नवीन खेळ घेत आहेत.
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
Wed, 10/20/2021 - 19:11
नवीन
पूर्वी जन्मापासून मृत्यूपर्यंत १६ संस्कार असायचे. आता बारसे, लग्न आणि अंत्यसंस्कार हे तीनच राहिले आहेत. व्रतबंधही केला जातोच असे नाही. हे कशामुळे झाले? कदाचित बदललेल्या काळात १६ संस्कार करणे हे तितकेसे गरजेचे राहिलेले नसावे (हा तर्क).
तसेच पूर्वी पुरूषांमध्ये गंगाधर, बाळकृष्ण, गोपाळ, वामन आणि स्त्रियांमध्ये सत्यभामा वगैरे नावे असायची. फार पूर्वी नाही- अगदी पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत अशी नावे असायची. आता ही नावे कालबाह्य झाली आहेत. नव्या पिढीत ही नावे आता क्वचितच आढळतील. ते कशामुळे? काळाचा महिमा.
त्याप्रमाणेच सणांमध्ये काही प्रमाणावर बदल होतीलच. भारत इतका विविधतेने नटलेला देश आहे की अमुक एक सण फक्त मराठी माणसांचाच असे मर्यादित ठेवणे कठीण आहे. मुंबईत आज कित्येक अमराठी लोक घरी गणपती बसवतात. गणेशोत्सव नुसता महाराष्ट्र आणि गोव्यातच नाही तर गुजरात आणि दिल्लीमध्येही बर्यापैकी साजरा केला जातो. आपण ज्याला गुढी पाडवा म्हणतो त्यालाच आंध्रमध्ये उगदी म्हणतात. इतकेच नाही तर इंडोनेशियात बालीमध्ये (७०% हिंदू लोकसंख्या असलेल्या बेटावर) आपला गुढीपाडवा असतो तो दिवस शांततादिन म्हणून साजरा करतात. त्या दिवशी रूग्णवाहिका सोडून रस्त्यावर कोणीही जाणे अपेक्षित नसते. सगळी पर्यटनस्थळे- अगदी विमानतळही बंद असतो. त्या दिवशी आपण मागचे एक वर्ष कसे घालवले, आपण काय चुका केल्या, आपल्यात काय सुधारणा करायला हव्यात हे आत्मपरीक्षण करण्यात पूर्ण दिवस घालवणे अपेक्षित असते. दिवाळी, होळी हे हिंदूंचे सण आहेत- फक्त मराठी माणसांचे नाहीत. उत्तर भारतात होळी अगदी प्रचंड उत्साहाने साजरी करतात. त्या दिवशी दिल्ली बंद असल्यासारखे वातावरण असते असे म्हटले तरी चालेल. मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी महाराष्ट्रात भोगी असते त्या दिवशी उत्तर भारतात थंडी आता कमी होणार म्हणून लोहडीचा सण साजरा करतात. हिंदूंमध्येच आपापसात झालेल्या अशा देवाणघेवाणीतून अमराठी भाषिकांनी गणेशोत्सव स्विकारला तशा आपणही चार गोष्टी चांगल्या वाटल्या तर घ्यायला हरकत नसावी. आपल्याकडे लग्नाच्या दिवशी नवर्यामुलाचे जोडे लपवायची प्रथा 'हम आपके है कौन' पूर्वी कोणाला माहित असेल असे वाटत नाही. पण आज ती अनेक मराठी लग्नांमध्ये बघितली आहे. मला स्वतःला तो पोरकटपणा वाटतो त्यामुळे माझ्या लग्नात माझे जोडे वगैरे लपवायचे नाहीत हे आधीच सांगून ठेवले होते. पण ज्यांना तो प्रकार आवडत असेल, त्यात तेवढ्यापुरती मजा येत असेल त्यांना ते करू दे की. त्यावर 'अमराठी' प्रकार म्हणून लगेच टीका नको.
फक्त ही सगळी देवाणघेवाण हिंदूंमध्येच मर्यादित हवी. दिवाळीला जश्न-ए-रिवाज म्हणायला लागले किंवा दिवाळीच्या शुभेच्छा देताना 'दिवाली मुबारक' म्हणायला लागले तर ते मात्र तिथल्या तिथे हाणून पाडायलाच पाहिजे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 10/20/2021 - 19:45
नवीन
+ १
दसऱ्याच्या दिवशी इतरांना आपट्याची वाळलेली पाने देणे ही प्रथा मला निरर्थक वाटते. त्यामुळे यावर्षीच्या दसऱ्याला घरातील किंवा बाहेरील कोणालाही मी आपट्याची पाने दिली नाही.
नारळ फोडण्यापूर्वी नारळाला पाणी लावतात. त्यामागील कारण मला माहिती नाही. परंतु पाणी न लावता सुद्धा नारळ व्यवस्थित फुटतो हे मागील काही वर्षांच्या माझ्या अनुभवावरून दिसले आहे.
मी हळूहळू निरर्थक प्रथा बंद करीत आहे.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 10/21/2021 - 03:22
नवीन
पूर्वी यज्ञात , शुभकार्याच्या आरंभी किंवा युद्धास बाहेर पडताना बळी देण्याची प्रथा होती. बळी देण्यापूर्वी पशूला स्नान घालत. कालांतराने पशूची जागा नारळाने घेतली, नारळ फोडण्यापूर्वी त्याला लावलेले पाणी हे बळीला मारण्यापूवी घातलेल्या स्नानाचे प्रतीक.
- Log in or register to post comments
क
कॉमी
गुरुवार, 10/21/2021 - 04:25
नवीन
ह्यावर एकदा मोठी खडाजंगी झाल्याचे आठवते, श्री अत्रुप्त आत्मा तुमच्यात आणि श्रीगुरुजींच्यात.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 10/21/2021 - 06:22
नवीन
मला जे काही सांगायचे होते ते मी तेव्हा सांगितले होते. नारळाला पाणी लावणे आणि नारळाची शेंडी हे ब्राह्मण मुलाला बळी देण्याचे प्रतीक आहे असे कोणीतरी लिहिले होते. त्याविरूद्ध मी लिहिले होते. अर्थात त्या धाग्यात माझ्याविरूद्ध बरेच असभ्य व वैयक्तिक पातळीवर लिहिले गेले होते. जेव्हा मुद्द्यांचा प्रतिवाद करता येत नाही, तेव्हा महानुभव वैयक्तिक पातळीवर उतरतातच.
- Log in or register to post comments
त
तर्कवादी
गुरुवार, 10/21/2021 - 13:10
नवीन
आपल्या प्रथांबद्दल सारासार विचार करण्याची तुमची भूमिका कौतुकास्पद आहे.
हळूहळू धर्माची भूमिकाही केवळ कौटूंबिक /सामाजिक पातळीवर एक मनोरंजक गोष्ट म्हणून असेल. जगण्यासाठी धर्माच्या चौकटीची आवश्यकताही खरेतर कालबाह्य झालेली आहे.
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
गुरुवार, 10/21/2021 - 07:38
नवीन
हिंदूंमध्येच आपापसात झालेल्या अशा देवाणघेवाणीतून अमराठी भाषिकांनी गणेशोत्सव स्विकारला तशा आपणही चार गोष्टी चांगल्या वाटल्या तर घ्यायला हरकत नसावी.
अगदी नसावी पण होत काय . कि असे "घेताना " आपले जे स्थानिक आहे त्याचं कडे एक प्रकारच्या "हे स्थानिक , हे ,बुरसटलेले " दृष्टीने पहिले जाते .. आणि आपण "इतर" स्वीकारतोय म्हणजे आपण पुरोगामी . पुढारलेले असा एक तोरा असतो... तो सिद्ध करणे अवघड असते पण तो जाणवतो ... आक्षेप त्यावर आहे
या बाबत महाराष्ट मंडळात (भारताबाहेर) शक्यतो मराठीच कार्यक्रम असावेत कि नाही यावर "बरीच पुरोगामी" मंडळी वाद घालतात .. पाजळतात आणि जेव्हा मग का रे बाबा "तामिळ संघात कितीदा हिंदी गाण्याचा कार्यक्रम होतो" कीवा उद्या "मराठी कार्यक्रमाचे निवेदन बंगाली मधून करू का? तर मग गप्प बसतात !
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
गुरुवार, 10/21/2021 - 07:40
नवीन
हो. आपले ते बुरसटलेलेच असणार असा न्यूनगंड असलेला दृष्टीकोन असेल तर त्यावर नक्कीच आक्षेप घ्यायला हवा.
- Log in or register to post comments
त
तर्कवादी
गुरुवार, 10/21/2021 - 13:07
नवीन
बरोबर आहे.. आणि तसंच हॅपी दिवाली / हॅपी दसरा म्हणणही पण तितकंच चूक.
- Log in or register to post comments
क
कॉमी
गुरुवार, 10/21/2021 - 14:49
नवीन
जश्ने रिवाज वैगेरे बघून राईट विंग आउटरेज किती बालिश होऊ शकते दिसून आले. काहीच्या काही.
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
गुरुवार, 10/21/2021 - 15:27
नवीन
शेअरमार्केट ट्रेडिंगमध्ये चार्ट पॅटर्नवरून सिग्नल आला तरी कन्फर्मेशन कँडल महत्वाची असते. म्हणजे किंमत मागे वर गेली होती त्याच पातळीला परत गेली आणि रेजिस्टन्स घेऊन खाली आली (म्हणजे डबल टॉप केला) तरी जोपर्यंत त्या कँडलचा लो जात नाही तोपर्यंत ट्रेड घ्यायचा नसतो. म्हणजे कन्फर्मेशन महत्वाचे.
आपली मते आपणच बनवायची पण डाव्यांकडून असे कन्फर्मेशन आले की मग आपण योग्य मार्गावर आहोत याविषयी अजिबात शंकेला वाव उरत नाही.
धन्यवाद.
- Log in or register to post comments
क
कॉमी
गुरुवार, 10/21/2021 - 16:03
नवीन
.
- Log in or register to post comments
उ
उन्मेष दिक्षीत
Wed, 10/20/2021 - 19:40
नवीन
वगैरे राहू देच
" मी आली " " मी करेल " इथनं सुरुवात आहे. लोकसत्ता वगैरे तर सरळ सरळ वाटेल तसे हिंदी शब्द घुसवत असतात. अवांतर झाले, पण भाषेचाच जिथं प्रश्न आहे, तिथे बाकीचं काय घेऊन बसलात. पण मराठी माणसांना अ-मराठी म्हणजे ट्रेंडी असे वाटते यातच सगळं आलं.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 10/21/2021 - 06:26
नवीन
अनेक मराठी लोक मराठी ऐवजी हिंदीत संभाषण सुरु करतात
यावेळेस त्यांना मराठी शुद्ध येत नाही याचा न्यूनगंड असल्याने हिंदीत बोलत आहेत असे जाणवते.
दुर्दैवाने त्यांचे हिंदी सुद्धा तितकेच भिकार असल्याचे स्पष्टपणे जाणवते परंतु हिंदी कशीही बोलली तर चालते अशा (गैर)समजातून ते हिंदी बोलत असतात.
- Log in or register to post comments
स
सौन्दर्य
गुरुवार, 10/21/2021 - 19:45
नवीन
वर म्हंटल्याप्रमाणे व्याकरणाच्या अनेक चुका आपण दैनंदिन जिवनात करतअसतो व दुर्दैवाने त्या आपल्याला एखाद्या जाणकाराने दाखवूनदिल्याशिवाय कळतंही नाहीत. ह्याची मुख्य कारणे -
१) पुस्तक वाचन बंद झालं आहे.
२) आसपासच्या विवीध भाषा बोलणाऱ्या लोकांमुळे चुकीची भाषा सतत कानावर पडणे.
३) मराठी बोलणाऱ्या लोकांची शुद्ध मराठी बोलण्याची, आग्रह धरण्याविषयी अनास्था.
४) “समोरचा जे सांगू ईच्छितो आहे ते कळल्याशी मतलब, भाषेचा तोच ऊपयोग आहे त्यामुळे भाषा शुचिर्तेचा आग्रह धरणे चुकीचे आहे” हा पसरलेला (चुकीचा -खिक) गैरसमज.
५ ) टिव्ही, सोशल मिडीया, वृत्तपत्रे, विवीध फलक (ही यादी भरपूरलांब होईल) ह्यातील चुकीच्या मराठीमुळे चुक काय बरोबर काय हेच कळेनासे झाले आहे.
६ ) समोरची व्यक्ती चुकीचे मराठी शब्द, व्याकरण वापरत असेल तर तीला न सुधरवणे. ह्यात आपले कुटूंबिय, नातेवाईक, शेजारीपाजारी व मित्रही आले. असे न करण्यामागची अनेक कारणे आहेत.
मी माझ्या परीने वरील सर्व काळजी घेतो. मराठीत आलेले फॉर्वर्डेड संदेश त्यातील व्याकरणाच्या चुका सुधारूनच पुढे पाठवतो.
आपण आपापल्या परिने शक्य तितकी काळजी घेतली तर मराठीचीही अनावस्था काही अंशी तरी दूर होईल अशी खात्री आहे.
- Log in or register to post comments
उ
उन्मेष दिक्षीत
गुरुवार, 10/21/2021 - 20:56
नवीन
नाही हो, लोकांची :) भाषा तिच्या तिच्या जागी आहे.
- Log in or register to post comments
त
तर्कवादी
Fri, 10/22/2021 - 14:51
नवीन
इथे मिपावरदेखील 'लोक्स', 'वीकांत' असे शब्द येतात. त्यांनाही विरोध व्हायला हवा.
- Log in or register to post comments
अ
अनिंद्य
गुरुवार, 10/21/2021 - 07:36
नवीन
एक निरीक्षण - ज्या मराठी सणांचे व्यवस्थित ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंग झाले आहे ते गणेशोत्सव आणि दहीहंडी सारखे सण अमराठी लोकही प्रचंड उत्साहात साजरे करू लागले आहेत. गेली काही वर्षे सार्वजनिक गणेशोत्सव दिल्ली, गुजरात आणि राजस्थानात गल्लोगल्ली जोरात होतो आहे आणि दरवर्षी आधीपेक्षा अधिक थाटामाटात.
तसेच तथाकथित 'नवसाला पावणाऱ्या' म्हणजे ब्रॅण्डिंग व्यवस्थित झालेल्या गणपतीं मंडळांना भेट देणाऱ्या लोकांमध्ये अमराठी लोकांची संख्या प्रचंड आहे.
- Log in or register to post comments
B
Bhakti
गुरुवार, 10/21/2021 - 07:37
नवीन
सण भेसळ वगैरे cosmopolitan प्रकार आहे.पण करायचं म्हटलं की सण पारंपारिकच करणारेही आहेतच.ओळखीच्या काही उच्चपदस्थ स्त्रीया सणाला एक पेला पुरण घालतातच.वेळाचा अभाव आणि जलद झालेले युग मराठी सणांचे रूप बदलत आहेत.आपले सणही बाकीच्यांना आनंदाने शिकवावे.
- Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी
गुरुवार, 10/21/2021 - 15:21
नवीन
लेख वाचकानां आकृष्ट आणी सहभागी करून घेण्यात यशस्वी झाला आहे. सणांचे स्वरूप खुपच बदलले आहे. पुरोगामी प्रतीगामी कोण बरोबर कोण चुक, बाजारीकरण वैगरे मत माडंणी व्यवस्थीत केली आहे. नौकरी निमीत्ताने संपूर्ण देशात फिरताना लक्षात आले की महाराष्ट्र बाहेरील प्रदेशातील मराठी कुटुंब आपले सणवार व्यवस्थित पार पाडतात. बारमेड, शिलाँगं सारख्या दुरप्रदेशात मराठी मंडळे महाराष्ट्रातून येणार्या मंडळीचे यथासांग आदरातिथ्य करतात. लखनऊ, अजमेर, जयपुर, जबलपूर,, दिल्ली जोधपुर अशा अनेक शहरांमध्ये मराठी लोकांसाठी रहाण्याची खाण्याची अतिशय कमी दरात सुरेख सोय आहे. अमेरीकेतील बऱ्याच ठिकाणी मराठी माणूस संघटीत आहे व आपली अस्मीता जपण्यासाठी प्रयत्नशील आहे. मल्लखांब, ढोल लेझीम पथक, हळदीकुंकू गोष्टी उत्साहाने साजरा करतात.
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Fri, 10/22/2021 - 01:47
नवीन
अमेरीकेतील बऱ्याच ठिकाणी मराठी माणूस संघटीत आहे व आपली अस्मीता जपण्यासाठी प्रयत्नशील आहे.
सहमत परंतु भारताबाहेरील मराठी मंदलात एक गोष्ट जाणवते कधी कधी १० पैकी ४-६ सुद्धा गाण्यावरील.. नाच ..हिन्दि ! का? जणू काही मराठीतील गाणी नामशेह्स झाली आहेत ..
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 10/22/2021 - 03:30
नवीन
अनेक मराठी वाहिन्यांच्या कार्यक्रमात हिंदी गीतांवर समुहनृत्य करतात. सारेगमप वगैरे कार्यक्रमात स्पर्धक अनेकदा हिंदी गीते गातात.
- Log in or register to post comments
श
शानबा५१२
गुरुवार, 10/21/2021 - 18:07
नवीन
थोड्या दीवसांनी फाफडा व चहा खाण्याला वडापावपेक्षा जास्त मागणी येईल.
- Log in or register to post comments
M
mangya69
गुरुवार, 10/21/2021 - 20:02
नवीन
वडापावमधला पावपण पोर्तुगीज आहे
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Fri, 10/22/2021 - 01:43
नवीन
मुद्दा तुमच्या लक्षात येत नाहीये बहुतेक ... जरूर जगातील गोष्टी आत्मसात करावयात, पण ते करतांना आपले जे आहे त्याबद्दल एक प्रकारची तुच्छतेचि भावना दाखवली जाते त्याबद्दल चाललंय ...
साध उदाहरण घ्या. अजूनही अशी समजूत दिसते कि "कोफी पिणे म्हणजे उच्चभ्रू" आणि चहा पिणे म्हणजे गावंढळ " इंग्रजीत "डाऊन मार्केट "
माझा एक ओलखीचा आहे त्याला विविध देशातील चहा आवडतो तो काही चहा येथील क्वारंटाईन नियमनमुळे आयात करता येत नाहीत म्हणून तो कानडा मार्गे आयात करतो ,,, ५-१० हजार रुपये किलो च्या भावाने !
- Log in or register to post comments
त
तर्कवादी
Fri, 10/22/2021 - 15:11
नवीन
मी २०२० मध्ये सुरतला गेलो होतो. नंतर स्टॅच्यू ऑफ युनिटी, सापूतारा ई ठिकाणी फिरलो. तिथे गुजराती थाळीचे जेवण फारसे मिळत नाही असे दिसले.
सुरतच्या प्रसिद्ध बॉम्बे मार्केटमध्ये 'जय महाराष्ट्र' अशा पाट्या लावलेली व दुकानांची संक्षिप्त जाहिरात मराठीत असलेली अनेक दुकाने दिसली. बहुतेक दुकानदार आमच्याशी आनंदाने मराठीतही बोलत होते.
या सगळ्यात भाषेच्या प्रेमापेक्षा ग्राहकच्या भावनेला हात घालून व्यापार वाढवणे हाच उद्देश असतो.
बाकी वडापाव , मिसळपाव हे अतिशय लोकप्रिय पदार्थ आहेत. त्यांची लोकप्रियता महाराष्ट्रात कधी कमी होईल असे वाटत नाही कदाचित महाराष्ट्राबाहेरही ती वाढत असेल (मला फारसे माहीत नाही). काही दिवसांपुर्वी प्रियांका चोप्राच्या अमेरिकेतील उपहारगृहात वडापाव विकला जातो अशी बातमी वाचली.
- Log in or register to post comments
स
सर टोबी
Fri, 10/22/2021 - 16:40
नवीन
मला तर दल लेकच्या काठी एक स्थानिक व्यापारी मराठी बोलताना आढळला. गुजराथी लोकांची बस आल्यावर गुजराथी देखील बोलत असणार.
एका दक्षिण भारतीय मित्राचे कुटुंब गेल्या दोन पिढ्या पुण्यात राहतात. पत्नी पण महाराष्ट्रीयन. मुलांना तर मल्याळी येतच नाही. याच्या मुळ गावी गेल्यावर इतरांना बोलताना बघून येथेच्छ हसतात.
गेली कित्येक पिढ्या महाराष्ट्रात राहिलेली मारवाडी कुटुंब तर फक्त त्यांच्या चेहरेपट्टी मुळे मराठी नाही हे लक्षात येतं. या जमातीला तर आपली भाषा आणि परंपरा जिवंत राहील का असल्या उठाठेवी सुचत नाही. एवढंच काय परंतु साहित्य आणि कला क्षेत्रात आपला दबदबा नाही असले फालतू प्रश्न पडत नाहीत.
- Log in or register to post comments
त
तर्कवादी
Fri, 10/22/2021 - 17:22
नवीन
मला आमच्या कंपनीत छान मराठी बोलणारे अनेक दाक्षिणात्य भेटलेत.
गुजराथी, दाक्षिणात्य असे सगळे लोक मराठी शिकतात व बोलतातही असे दिसते. बहुतांशी हिंदी भाषिक लोकांना मात्र मराठी भाषा शिकायची इच्छा नसते. मराठी म्हणजे डाउन मार्केट वगैरे गोष्टी या प्रामुख्याने सधन हिंदी भाषिक लोकांनी पसरवलेले समज आहेत असेच मला वाटते.
- Log in or register to post comments
T
Trump
Fri, 10/22/2021 - 17:38
नवीन
गुजराथी, दाक्षिणात्य असे सगळे लोक मराठी शिकतात व बोलतातही असे दिसते.
+१
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Fri, 10/22/2021 - 17:41
नवीन
बाकी गैर मराठी जे मुंबई मध्ये राहतात ते मराठी समजतात आणि कित्येक बोलतात पण.
अगदी तमिळ,केरळ वाले पण मराठी बोलतात.
गुजराती ,मारवाडी हा समाज तर जिथे जाईल तेथील भाषा आत्मसात करतात.
अपवाद फक्त देशातील मागास राज्यातील हिंदी भाषिक कोणतीच भाषा शिकत नाहीत .हिंदी ला विरोध असण्याचे हे पण एक मुख्य कारण आहे.
ह्या मागास राज्यातील लोक दुसऱ्या राज्य राहतील पण तेथील समाजात कधीच एक
जीव होतं नाहीत.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sat, 10/23/2021 - 15:16
नवीन
गैरसमज आहे
मुंबईत अनेक वर्षे राहणारे भय्ये व्यवस्थित मराठी बोलतात. माझ्या संपर्कात येणारे असे असंख्य भय्ये आहेत.
मुळात भय्या लोकांची आवकच इतकी जास्त आहे की तुमच्या संपर्कात येणारे बहुतेक भय्ये उदा. भाजीवाले, मासे विकणारे, दूध वाले किंवा इस्त्री करणारे असे चतुर्थ श्रेणी कर्मचारी असतात जे गेल्या काही वर्षातच इथे आलेले आहेत त्यामुळे त्यांना तेवढे चांगले मराठी येत नाही. जे इथे राहून वरच्या श्रेणीत आले आहेत ते सर्व मराठी बोलू शकतात. घरी गणपती आणतात आणि दही हंडीतही भाग घेतात.
पण दुर्दैवाने आपले मराठी लोकच त्यांच्याशी आवर्जून मराठी बोलत नाहीत.
बाकी मारवाडी आणि गुजराती मराठी वस्तीत धंदा करत असतील तर मराठी व्यवस्थित शिकून घेतात.
तेच जर पश्चिम उपनगराच्या पश्चिम भागात राहत असतात तेंव्हा मात्र मराठी शिकत नाहीत कारण तेथे असलेले मराठी बांधव सुद्धा मराठीत बोलणे डाऊन मार्केट समजतात.
चेन्नईला गेलात तर बरीच दागिन्यांची दुकाने मारवाडी लोकांची आहेत ते अस्खलीत तामिळ बोलतात. तेथे असलेली हार वेअर ची दुकाने शुद्धबीओहरी समाजाची आहेत ते सुद्धा अस्खलीत तामिळ बोलतात.
शेवटी धंदा महत्त्वाचा. अस्मिता वगैरे भरल्या पोटाचे चोचले आहेत.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Fri, 10/22/2021 - 04:23
नवीन
हे 100% सत्य आहे स्वतःच्या भाषेचा,स्वतःच्या खाण्याच्या सवयीचा,स्वतःच्या परंपरेचा .
किती लोक टिफीन मध्ये ज्वारी ची भाकरी घेवून जातात
जी ज्वारीची भाकरी मराठी माणसाच्या आहारातील महत्वाचा भाग आहे.
एकदा मी आणि माझा मुस्लिम (आणि परप्रांतीय सुद्धा) मित्र cuffparade वरून
शेअर टॅक्सी
टॅक्सी नी सीएसटी ला जात होतो.आम्ही दोघे आणि दुसरे pure मराठी दोघे टॅक्सी मध्ये होतो.
तो परप्रांतीय आणि मुस्लिम असून सुद्धा आम्ही पूर्ण मराठी मध्ये संवाद साधत होतो आणि ते दोन pure मराठी आपसात हिंदी मध्ये बोलत होतो.
शेवटी मीच त्यांना टोकल मराठी असून हिंदू मध्ये बोलत आहात लाज वाटते काय स्वतःच्या भाषेची.
- Log in or register to post comments
त
तर्कवादी
Fri, 10/22/2021 - 15:11
नवीन
असं काही नाहीये. महाराष्ट्रातदेखील विविध ठिकाणचा पारंपारिक आहार भिन्न आहे. सरसकटीकरण करु नये. कोकणात ज्वारीची भाकरी किती खातात ते बघा.
तसेच भाकरी डब्यात नेण्यास तितकीशी सोयीस्कर नसते हा मुद्दाही आहे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 10/22/2021 - 16:18
नवीन
आमच्याकडे एका महिन्यात फार तर दोनवेळा भाकरी असते. इतर वेळी पोळी.
- Log in or register to post comments
स
सौंदाळा
Fri, 10/22/2021 - 05:31
नवीन
मीच त्यांना टोकल
वा!!
टोका टोका, अगदी काट्याची टक्कर झाली तरी चालेल पण अशा लोकांना टोकलच पाहिजे.
- Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत
Fri, 10/22/2021 - 09:26
नवीन
असे एक वाक्य कानावरून गेले आहे. ते उद्गगार आजतागायत डोक्यात बसले आहे. हे वाक्य मराठी आहे का इंग्रजी हे मला आजतागायत लक्षात आले नाही.
- Log in or register to post comments
व
वामन देशमुख
Sat, 10/23/2021 - 07:25
नवीन
मराठी लॅन्ग्वेज् सेव् करा !
- Log in or register to post comments
स
सुक्या
Sat, 10/23/2021 - 08:01
नवीन
मदरटंग मधुन जितके चांगले एक्स्प्रेस होता येते तितके ऑदर लँग्वेजेस मधुन जमत नाही . . यु नो...
मराठी इज द बेस्ट.....
- Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे
Sat, 10/23/2021 - 10:52
नवीन
पु. लं. चं पूर्वरंग मधील वाक्य...
देशी लोक सहा महिन्यांसाठी साहेबाच्या देशात जातात आणि आल्यानन्तर मराठी वर्ड रिमेम्बर करायला त्यांना डीफिकल्ट जातं ☺️
- Log in or register to post comments
न
नचिकेत जवखेडकर
Mon, 10/25/2021 - 08:00
नवीन
अगदी अगदी. मी एकदा माझ्या मुलीला खाली घेऊन गेलो होतो सायकल चालवायला तेव्हा कोणीतरी एक भेटले खाली. आम्ही पहिल्यांदाच भेटत होतो. त्यांच्याकडची लहान मुलगी माझ्या मुलीची सायकल ढकलायला लागली तेव्हा तिची आई तिला म्हणाली, ए असं नको करू.ते बेबी फॉल होईल ना सायकलवरून. चल आपण त्या गार्डन मध्ये जाऊन प्ले करू ! :D
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Mon, 10/25/2021 - 09:00
नवीन
तरी खरा आहे.पुरुषानं पेक्षा स्त्रिया ना मॉडर्न वागण्याची भारी हौस असते.(मॉडर्न चे त्यांचे विचार पण दिव्य असतात.टीव्ही,सिनेमे सांगतात ते मॉडर्न) अगदी खेड्यातील मुलगी लग्न होवून अमेरिका,मुंबई मध्ये आली की सहा महिन्यात नाकात बोलायला सुरुवात करते .कपडे पण लगेच बदलून जातात.खेड्यातील पुरुषाने पूर्ण आयुष्य अमेरिका,मुंबई मध्ये काढले तरी तो बोलणार गावठी भाषा च भला कोणत्या कंपनीत सीईओ असला तरी.
- Log in or register to post comments
स
सर टोबी
Fri, 10/22/2021 - 12:53
नवीन
ठराव पारीत होणे मसुदा/ठराव मंजूर होणे
संकेत मिळणे. लक्षणं दिसणे
पाणी फेरणे. पाणी पडणे
आजच्या तारखेला. आज घडीला
उजवीकडील शब्द प्रयोग माहिती असल्यास आपण वृद्ध आहात हे ओळखून वागावे.
- Log in or register to post comments
स
सर टोबी
Sat, 10/23/2021 - 10:46
नवीन
स्थानिक भाषा न शिकण्याचे कारण म्हणजे बऱ्याच मोठ्या प्रांतात हिंदी बोलली जाते आणि हिंदी भाषिक नसऱ्यांना देखिल ती समजते हे असावे. त्यात स्वतःला वरचढ समजणे असा उद्देश नसावा. माझ्या हिंदी मित्रांची मुलं जी महाराष्ट्रातच लहानची मोठी होत आहेत ती तर व्यवस्थित हेल काढून मराठी बोलतात.
- Log in or register to post comments
M
mangya69
Sat, 10/23/2021 - 10:58
नवीन
मराठी हिंदी लिपी एक असल्याने आपण शाळेत दुसरी तिसरी भाषा हिंदी ( किंवा संस्कृत) घेतो , म्हणून हिंदी आपल्याला चटकन येते, शाळेत पाचवीला हिंदी सुरू होण्यापूर्वीच आपल्याला हिंदी येते.
साऊथवाले , बंगाली इ इ ना देवनागरी लिपीच नवीन असल्याने हिंदी आणि मराठी तितक्याच दूर वाटतात
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Sat, 10/23/2021 - 11:08
नवीन
बोलण्यासाठी लिपी लागत नाही.एकदा व्यक्ती परकीय भाषा बोलत असेल म्हणून त्याला ती लिहिता ,वाचता येते असे काही नाही.
ज्या प्रदेशात राहतो तेथील भाषा शिकण्याची इच्छा असणे महत्वाचे आहे.आणि हिंदी भाषिक लोकात ती नाही.
त्यांची सर्वात मोठी गैर समजूत आहे हिंदी राष्ट्र भाषा आहे आणि बाकी भाषिक लोकांचं कर्तव्यच आहेत त्यांनी ती शिकावी.
काही दिवस पूर्वीच तमिळ nadu मध्ये. त्या वरून मोठा गोंधळ झाला होता.
आणि मराठी लोकांनी पण हिंदी राष्ट्र भाषा आहे हे खूळ डोक्यात ठेवले आहे.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- ›
- »