दाक्षिणात्य सिनेमे सुचवा.
आपल्याला माहीत असलेले काही छान दाक्षीणात्य सिनेमे सुचवावेत. सिनेमाच्या नावासोबत सिनेमाची कथा कशाशी निगडीत आहे हे देखील लिहावे. सिनेमा युट्युब वर असेल तर लिंक द्यावी. हिंदीत ऊपलब्ध आहे का तेही सांगावे.
आधीचे धागे पाहीले त्यात सिनेमांची नावे फार कमी आहेत. साऊथ सिनेमे कसे असतात ह्यावर चर्चा करायला हा धागा नाही. फक्त सिनेमा त्याची कथा कशावर नी लिंक वगैरे.
मी पाहीलेले काही. पहावेत असे सुचवेन.
-राक्षसन (तमीळ) हिंदीत मै हुं दंडाधीकारी - सायको किलर.
-फोरेन्सिक - बालगुन्हेगारी/ सायको किलर.
-सबसे बढकर हम १ - फॅमीली ड्रामा.
-रिअल जॅकपाॅट १ - संस्पेन्स. कथा हिंगलाज देवी मंदीर पाकिस्तान व काबूल ला घेऊन जाते.
-रिअल जॅकपोट २ - आजिबात पाहू नये.
-ह्रदय कळेयम -संपुर्णेश बाबूचा सुपर डूपर हीट सिनेमा. नक्की पहावाच. सिनेमा युगातील नवं काहीतरी. स्पूफ काॅमेडी (ह्याच्या छोट्या
क्लिप्स आपण ईतरत्र पाहील्याच असतील. सिनेमा हिंदीत ऊपलब्ध नाही. तेलूगूत आहे. तरी समजेल मस्ट वाॅच.
- हिरो नंबर झीरो.- स्पूफ कोमेडी. मस्ट वाॅच. (ईकी पीकी पोंकी ह्या गाण्याची क्लिप आपण पाहीलीच असेल नसेल पाहीली तर युट्युबला पहावीच.) हिंदीत ऊपलब्ध.
-दृश्यम २- दृश्यम १ पाहीलाच असेल. अनअधिकृत हिंदी डब युट्युब वर ऊपलब्ध.
🗣 चर्चा
(72)
च
चौथा कोनाडा
Sun, 10/10/2021 - 14:08
नवीन
आयला भारीच की !
रोबोचं ट्रेन मधल्या मारामारीचं शुटींग दापोडीच्या रेल्वे पुलावर करुन गेलेला रजनी !
- Log in or register to post comments
न
नि३सोलपुरकर
Mon, 10/04/2021 - 08:09
नवीन
रामचरण आणी सामंथा अभिनित " रंगस्थलम" हा चित्रपट सुचवितो,सिनेमा हा नेहमी प्रमाणे गावातील जमिनदार ,रा़जकारण , वंचितांचे शोषण आणी नायकाचे त्याविरोधात बंड दाखवितो .
वि.सु : चित्रपटाची सुरुवात आणी शेवट चुकवु नका ....
नि३
- Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर
Mon, 10/04/2021 - 10:02
नवीन
मस्त धागा!
तेलगू चित्रपट हे तामिळ, मल्याळम आणि कन्नड पेक्षा खूप अधिक मनोरंजक असतात असा माझा अनुभव आहे. मुख्य म्हणजे मल्याळम मध्ये अति प्रमाणात आणि तामिळ मध्ये जाणवण्या इतपत ख्रिश्चन प्रोपगंडाचा प्रभाव दिसून येतो तर तेलगू मध्ये भारतीय सांस्कृतीक मूल्ये जपण्याचे केलेले प्रयत्न प्रकर्षाने जाणवतात. वडील आणि मुलगा/मुलगी, आई आणि मुलगा/मुलगी, मामा भाचे/भाची, काका आणि पुतण्या/पुतणी, आजोबा आणि नातू/नात ह्यांचे मधुर नातेसंबंध दाखवण्यातले त्यांचे कसब तर कौतुकास्पद असते.
मी ह्या धाग्यात प्रतिसादरूपात अधून मधून थोडी भर घालत जाईन, सुरुवात करतो २ चित्रपटांपासून.
१) हर दिन दिवाली. (Har Din Diwali - Prati Roju Pandage)
साई धरम तेज, सत्यराज (कटप्पाची भूमिका करणारा अभिनेता), राशी खन्ना, मुरली शर्मा आणि राव रमेश ह्यांच्या प्रमुख भूमिका असलेला मूळ तेलगू सिनेमा.
वडील आणि मुलगा (राव रमेश-साई धरम तेज) व आजोबा आणि नातू (सत्यराज-साई धरम तेज) ह्यांचे नाते संबंध, प्रेम, जिव्हाळा बघण्यासाठी हा चित्रपट पाहण्याची मी शिफारस करतो! खूप छान सिनेमा असून युट्युबवर हिंदीत उपलब्ध आहे.
२) अनारकली (Anarkali)
पृथ्वीराज सुकुमारन, प्रियल गोर, कबीर बेदी, बिजू मेनन, मियां जॉर्ज आणि संस्कृती शेणॉय ह्यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा मूळचा मल्याळम चित्रपट!
चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण नितांत सुंदर, निसर्गरम्य लक्षद्वीप बेटांवर झालेले आहे ,हे लोकेशन सिनेमात फारसे कधी बघायला मिळत नाही. शंतनू (पृथ्वीराज) आणि नादिरा (प्रियल गोर) ह्यांची हि थोडी प्रेमकथा आहे. एकदा पाहण्यासाठी हा चित्रपट नक्कीच चांगला आहे आणि प्रेमकथा आवडत नसल्या तरी लक्षद्विपच्या निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी हा चित्रपट बघण्याची शिफारस मी करत आहे.
आधी हा सिनेमा हिंदीत सलग स्वरूपात युट्युबवर होता, आता हटवलेला दिसतोय. अर्थात १० भागात तो आजही तिथे बघायला मिळतोय त्याची लिंक खाली देत आहे.
https://www.youtube.com/watch?v=i9qEPUYvVQk&list=PLzujVaGo7zJXHRmrC-31hhsJBDpMpipUc
पुढच्यावेळेस आणखीन सुचवण्या घेऊन येईनात &#
- Log in or register to post comments
स
सुरिया
Wed, 10/06/2021 - 09:07
नवीन
.
ख्रिश्चन प्रपोगंडा मल्याळींचा आणि भारतीय सांस्क्रुतिक मुल्ये तेलुगुची. वावावा.
मल्याळी क्रिस्ती भारतीय नाहीत? त्यांची मुल्ये भारतीय नाहीत. चर्च दाखवले, ख्रिस्ती लोक दाखवले की ते भारतीय होत नाहीत का? आता केरळात आहेत बहुसंख्य क्रिस्ती मग त्यान्च्या कथेत येणारच ख्रिस्ती पात्रे आणि चर्च आणि कॉन्वेन्ट. तो प्रपोगंडा झाला का? पंजाबी पिक्चरमध्ये शीख येणार तसे मल्याळी पिक्चरात ख्रिस्ती येणारच. ते काही धर्मप्रसारासाठीच असतात असे आपल्याला वाटत असेल तर धन्य आहात. आणि ख्रिस्त्यांना आई बाप वडील मुलगी आणि इतर नाती नसतात क? त्यांच्या नात्याचे मधुर संबध दिसत नाहीत का? साधा मोहनलालचा दृश्यम घ्या. हिरो खरेतर ख्रिस्ती दाखवला आहे. जॉर्ज कुट्टी. त्यातले नाव सांगितले नाहीतर पूर्ण चित्रपटात तो कुठेच ख्रिस्ती वाटत नाही. लुंगी घालून दैनंदीन आयुष्यात जगणारा एक साधासुधा मल्याळी हेच दिसते. आपल्या कुटुंबासाठी काहीही करायला तयार होणारा एक कुटुंबाचा कर्ता पुरुष हिच भुमिका दृश्यम च्या दोन्ही चित्रपटात दिसली. ह्यात कुठे दिसला ख्रिश्चन प्रपोगंडा? त्याचे इतर भाषामध्ये रिमेक होताना फक्त नावे बदलली तरी कहाणी बदलावी लागली नाही इतके युनिव्हर्सल चित्रण बहुतंशी चित्रपटात असताना आपणास केवळ पात्रांमुळे प्रपोगंडा जाणवत असेल तर धन्य आहात. बाकी त्या राज्यातली धर्मांतरे हा वेगळा चर्चा करण्याचा विषय असेल पण हिंदू मुस्लीम ख्रिस्ती तिन्ही लोकांच्या सगळ्यात जुन्या (खरोखर अस्सल ही म्हणता येतील) परंपराचे चित्रण मल्याळी चित्रपटात जाणव्त असताना आपणासारख्या साक्षेपी प्रेक्षकाला त्यात प्रपोगंडा जाणवावा ह्याचे वाईट् वाटते.
- Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर
Wed, 10/06/2021 - 16:32
नवीन
.grid-container-1 {
display: grid;
grid-template-columns: auto auto auto;;
grid-template-rows: 33.33% 33.33% 33.33%;
grid-gap: 10px;
background-color: #eee;
padding: 10px;
}
.grid-container > div {
background-color: #fff;
}
इतके साधे-सोपे-सरळ वाटतंय का हे सगळं तुम्हाला? अर्थात तुम्हाला त्यात काही वावगे वाटत नसलयास त्याला माझी काही हरकतही नाहीये.
आपण किती वेळा केरळला गेला आहात, किती मल्याळम सिनेमे पाहिले आहेत आणि तिथली चित्रपट सृष्टी, त्यात काम करणारे किती सिने कलाकार आपल्या ओळखीचे आहेत वा त्या चित्रपट सृष्टीत कसे आणि कुठल्या थराचे राजकारण चालते हे आपल्याला माहित आहे ह्याची मला कल्पना नाही.
ह्या माझ्या विधानावर मी ठाम आहे कारण हे मत वर्तमानपत्रे, सोशल मिडियावरील फॉर्वर्डस वाचून बनलेले नसून खात्रीलायक माहिती असल्यानेच व्यक्त केले आहे. अर्थात त्याचे तपशीलवार स्पष्टीकरण देण्याची हि जागा नाही आणि तसाही तो विषय स्वतंत्र धागा काढण्याएवढा मोठा आहे.
तूर्तास केवळ तुमच्या माहितीकरता सांगतो, गेल्या २१ वर्षांत, मल्याळम (केवळ मल्याळमच नाही तर अल्प प्रमाणात तामिळही) रंगभूमीवरील नाटके, एशियानेट आणि कैराली ह्या वाहिन्यांवरील मालिका, राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळवलेल्या मल्याळम व इंग्रजी शॉर्टफिल्म्स, वेबसिरीज आणि कित्येक मल्याळम चित्रपटांमध्ये (त्यातला 'विरम (Veeram)' हा हिंदीसहित चार कि पाच भाषांत निर्माण झाला होता) अभिनय केलेला 'बिलास चंद्रहासन नायर' हा अभिनेता माझा अत्यंत जवळचा मित्र आहे.
बिलास चंद्रहासन नायर
ऍक्टिंग मध्येच करियर करण्याच्या ध्येयाने झपाटलेल्या बिलासने (आमच्या भाषेत "सोनीने") २१ वर्षांपूर्वी मुंबईहून केरळला प्रस्थान केले. सुरुवातीला उमेदवारीच्या काळात व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट/ डबिंग आर्टिस्ट म्हणून कामे करत करत आजच्या घडीला मल्याळम मनोरंजन क्षेत्रात त्याने चांगलेच बस्तान बसवले आहे, आणि त्याचा आम्हा मित्रमंडळींना सार्थ अभिमान आहे!
भौगोलिक अंतर वाढले असले तरी आमच्या मैत्रीत अजूनही कुठले अंतर आलेले नसून आम्ही एकमेकांच्या अगदी नित्य संपर्कात असतो. अधून मधून आमच्या भेटीगाठीही होत असतात.
असो, वरील सगळे रामायण तुम्हाला सांगण्याचा उद्देश एवढाच होता कि मी व्यक्त केलेले मत माझ्या जवळच्या मित्राकडून, तसेच त्यानेच ओळख करून दिलेल्या तिकडच्या काही स्त्री-पुरुष कलाकारांकडून मिळालेली खात्रीशीर माहिती आणि त्यांच्या प्रदीर्घ अनुभवावर आधारलेले आहे.
कळावे, लोभ असावा.
- Log in or register to post comments
H
hrkorde
Wed, 10/06/2021 - 20:40
नवीन
मग तुमचा मित्र कसा काय तिकडे सुपरस्टार झाला ?
की प्रभू येशूने त्याच्यावरही कृपा केली ?
- Log in or register to post comments
H
hrkorde
गुरुवार, 10/07/2021 - 07:35
नवीन
मृगा मृगैः सङ्गमनुव्रजन्तिगावश्च गोभिस्तुरगास्तुरङ्गैः।
मूर्खाश्च मूर्खै: सुधियः सुधीभिः समानशीलव्यसनेषु सख्यम्॥
पंचतंत्र लब्धप्रणाश.
हरिण हरणांसह, गाई गाईंसह, घोडे घोडयांसह. मूर्ख मूर्खांसह आणि शहाणे शहाण्य़ांसह असतात. ज्यांच्यात स्वभाव आणि सवयी जुळतात त्याच्यात मैत्री होते.
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
गुरुवार, 10/07/2021 - 09:20
नवीन
व्वा, टर्मीनेटररोचक माहिती,
यावर एक वेगळा धागा येऊ द्या. आमच्या सारख्या लोकांना मळ्याळी चित्रपटसॄष्टीची खुप माहिती आहे.
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
Fri, 10/08/2021 - 09:54
नवीन
खुप " *कमी " माहिती आहे हे लिहायचंच राहिलं राव !
- Log in or register to post comments
स
सुरिया
गुरुवार, 10/07/2021 - 14:48
नवीन
वा. मस्तच.
इतका मोट्ठा माणूस आपल्या एका मिपाकराचा जवळचा मित्र आहे हि गोष्ट खचितच मनाला सुखावणारी आहे. श्रीयुत नायर साहेबांनी इकडे शिक्षण घेऊन त्यांच्या मूल स्थानी जाऊन जे यश मिळवले आहे तेही अर्थात अलौकिक आहे. त्यांची विविध क्षेत्रातली मुशाफिरी अगदीच बेमिसाल आहे......
पण .....
तुम्ही तुमच्या मुद्द्यावर, जो तुम्ही नायरसाहेबांचे आणि त्यांच्या काही मित्रांचे काही अनुभव ऐकून बनवले आहे त्यावर ठाम आहात तर जरा आपण जरा बोलुयात काय?
त्याअधी मी सांगतो की मी केवळ प्रेक्षक आहे. चित्रपट मला आवडतात, दाक्षिणात्य चित्रप्ट जरा जास्तच. बाकी त्या चारीही चित्रपटसृष्टीतील बर्याच जणांना मी ओळखतो पण त्यातील कुणीएही मला ओळखत नाहीत. कारण खरोखर मी एक सामान्य माणूस आहे.
सर्वप्रथम आपला मुद्दा आहे की "मल्याळम मध्ये अति प्रमाणात आणि तामिळ मध्ये जाणवण्या इतपत ख्रिश्चन प्रोपगंडाचा प्रभाव दिसून येतो" तर...
ह्यात प्रपोगंडा म्हणजे आपणास काय अभिप्रेत आहे? मला तीन शक्यता वाटल्या.
१) चित्रपटामधून ख्रिस्ति धर्माचा प्रसार
२) चित्रपटातून प्रसार नाही पण ख्रिस्ती पात्रे आणि वातावरण ह्याचे चित्रण.
३) चित्रपटसृष्टीत पडद्यामागे ख्रिस्ती धर्मीयाची कंपूबाजी.
तर पहिल्या मुद्द्यानुसार जर ते प्रसार करत असतील तर कायदेशीरच चित्रप्ट निर्मीती करुन त्यावर पैसा घालून (भले तो कसाही येवोपण कायदेशीर येवो) खर्च करत आहेत. पाहणे किंवा न पाहणे सर्वस्वी प्रेक्षकाच्या हातात आहे. जबरदस्ती नाहीच.
दुसर्या मुद्द्यानुसार सुध्दा हेच आहे. निर्मीती करणारे, दिग्दर्शन करणारे, कथा लिहिणारे, अभिनय करणारे आणि सहभागी इतर लोक जोपर्यंत पैसा घालून हे करत आहेत तेंव्हा त्याला नाकारायचे किंवा स्वीकारायचे हे प्रेक्षकांच्या हातात आहे.
राहता राहिला मुद्दा कंपूबाजीचा. हा अर्थात गंभीर मुद्दा आहे. एखाद्या धर्मीयाचे लोक फक्त धर्माचा विचार करुन कामे देत असतील आणि दुसर्या कुणा धर्मीयांना संधी मिळूच देत नसतील तर इतर धर्मीय पात्र लोक चिडणारच. पण तुमच्या मित्राचे खुद्द यशस्वी उदाहरण पाहता आणि इतरही बर्याच कलावंताचे काम पाहता ह्या आरोपात फारसे तथ्य नसावे. अगदी बॉलीवूडमधले नेपोटिझम वर झालेली चर्चा अशाच वळणाने गेलेली होती. त्यातील निश्कर्ष हाच निघाला कि पैसा घालणारे ठरवणार की कुणाला काय काम द्यायचे. मग ते स्वीकारायचे की नाकारायचे हे परत प्रेक्षकांच्या हातात आहे. मल्याळी चित्रपट केरळात चालतात हे गृहीत धरले तरी ५५ टक्के लोकसंख्या आहे हिंदूची. जवळपास २७ टक्के मुस्लीम आणि १८ टक्के ख्रिस्ती. केरळात आधीपासूनच शिक्षणाचे प्रमाण भारतात सर्वाधिक आहे. त्यातल्या त्यात ख्रिस्ती लोक शिक्षणात पुढारलेले आहेत. सिरीअन ख्रिस्त्यांसारख्या काही जातींनी तर बर्याच क्षेत्रात आणि फक्त केरळात नव्हे तर बाहेरही आपली विजय पताका रोवली आहे. साहजिकच कला, अभिनय आदी क्षेत्रात त्यांचा टक्का लोकसंख्येपेक्षा जास्त प्रमाणात दिसतो. कित्येक ख्रिस्ती लोक तर उलट म्हणतात की ख्रिस्ती धर्मावर टीका करणारे चित्रपटही मल्याळी भाषेत बनतात पण मुस्लीम किंवा हिंदू जसे धर्माविषयी चिकीच्या गोष्टीला कडाडून विरोध करतात तसे केरळी ख्रिस्ती करत नाहीत म्हणून ख्रिस्ती कथानके चालवली जातात. अर्थात ह्यातील कांगावा मलाही कळतो पण सध्यकालीन पद्मावत, केदारनाथ सारख्या चित्रपटांना मिळालेले अनुभव पाहता धर्म ही गोष्ट चित्रप्ताच्या बाबतीत किती नाजूक झाली आहे त्याचा अंदाज येतो. किंबहुना तेथिल इंडस्ट्रीमध्ये काही कंपूबाजी चालत असेल तर त्याचा फटका बसलेल्या लोकांचे अनुभव हे दुहेरी असू शकतात. यशस्वी असले तर इतर लोक "खाल्ल्या थाळीत घाण करणारा म्हणतील" किंवा अयशस्वी असेल तर "कोल्ह्याला द्राक्षे आंबट" तेंव्हा असे अनुभ हे ज्याचे त्याचे असणार. त्यातून त्याने काढलेल्या अर्थाला संपूर्ण सामाजिक मत बनवून ते तुमच्या मताच्या समर्थनार्थ त्याच्या ओळखी सामाजिक माध्यामावर दर्शवून प्रदर्शित करणे योग्य वाटत नाही.
जर हे योग्य वाट्त असेल तर एक आपल्या इथलीच घटना सांगतो, त्यावरचे तुमचे मत कळले तर मला तुमचे मत ठाम कसे बनले हे कळण्यास अधिक मदत होईल.
काहि काळापूर्वी दिग्दर्शन आणि पटकथेसाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित मराठी दिग्दर्शक सुजय डहाकेने असे मत मांडले की मराठी टेलिव्हीजन आणि मनोरंजन क्षेत्रात ब्राह्मण ज्ञातीची प्रचंड कंपूबाजी चालते आणि त्यासाठी त्याने मराठी मालिकामधे एकतरी अब्राह्मण नायिका कलावंत दिसते का असा प्रश्न उपस्थित केला. मराठी इंडस्ट्रीने ह्या प्रश्नाला कडाडून विरोध केला. मालिकांमधून गाजलेला आणि नथूराम गोडसेच्या भुमिकेसाठी प्रेक्षकांची वाहवा मिळवलेला कलावंत सौरभ गोखले ह्याच्या फेसबुक कॉमेंटने तर फारच खळबळ उडाली. " स्वतःस अत्यंत प्रतिभावान आणि अभासू समजणारे दिग्दर्शक मा. सुजय डहाके.. आपण केलेली वक्तव्ये आणि विधाने यावर इतर कलाकारांनी आणि कलाक्शेत्रातील मान्यवरांनी स्पष्टीकरण द्यावे इतकी तुअम्ची लायकी नाही. पुन्हा याप्रमाणे जातीयवाद आणि जातीपातीचे राजकारण ह्या कलाक्षेत्रात घुसवण्याचा प्रमाद आपणाकडून घडल्यास आमच्या भावना सर्वासमक्ष आपल्या श्रीमुखावर उमटवण्यात येतील ह्याची नोंद घ्यावी"
मराठी कलाक्षेत्रातील बहुतांशी कलाकारांनी ह्याच भावनेने सुजय डहाके ह्यांना क्डकाडून विरोध केला व ह्या मुद्द्याच्या समर्थनार्थ ब्राह्मण सोडून अन्य जातीतील कलाकारांची नावे सादर केली.
आता हि घटना तर आपल्याच मायमराठीची आहे. आपल्या ओळखीचे कित्येक कलाकार मराठी चित्रपट, मनोरंजन आदी क्षेत्रात असणारच तेंव्हा ह्या प्रसंगाबद्दल आपले मत काय आहे? ते कळाले की आपल्या मायभाषेशिवाय इतर भाषेंना, आणि तेथिल सृष्टीला आपण कसे पाहतो त्याचा अंदाज येईल. आणि पुढील चर्चा करता येईल.
बाकी काय? लोभ आहेच. वृध्दींगत व्हावा ( मल्याळम चित्रपटावरही) हिच अपेक्षा.
धन्यवाद.
.
थिएटरच्या डोअरकीपरशीही ओळख नसणार एक सामान्य प्रेक्षक (कधी कधी पिटातून शिट्ट्याही असतात) ;)
- Log in or register to post comments
क
कॉमी
गुरुवार, 10/07/2021 - 15:17
नवीन
उत्तम प्रतिसाद.
- Log in or register to post comments
आ
आग्या१९९०
गुरुवार, 10/07/2021 - 15:50
नवीन
सुरिया, तुमचा वरील प्रतिसाद वाचून मी खात्री करून घेतली,मी नक्की मिपाच वाचतोय ना? इतका मुद्देसूद आणि समतोल प्रतिसाद मिपावर वाचायला मिळणे दुर्मिळ झाले आहे. मस्तच!
- Log in or register to post comments
ग
गॉडजिला
गुरुवार, 10/07/2021 - 16:59
नवीन
इज धिस यु ?
अमेजिंग.
- Log in or register to post comments
र
रंगीला रतन
गुरुवार, 10/07/2021 - 16:53
नवीन
लाल सेना एकत्र जमायला लागली म्हंजे घाव वर्मी लागला आहे. अजून बरंच काय लिहायचं होतं मला पण माझे प्रतिसाद हल्ली रोज च उडवले जातात :=)
- Log in or register to post comments
क
कॉमी
गुरुवार, 10/07/2021 - 19:03
नवीन
- Log in or register to post comments
क
कॉमी
Wed, 10/06/2021 - 16:42
नवीन
पूर्णपणे सहमत.
- Log in or register to post comments
न
नागनिका
Wed, 10/06/2021 - 09:25
नवीन
happy days
कॉलेज जीवनावर आधारित आहे. मस्त आहे.
- Log in or register to post comments
ग
गॉडजिला
Wed, 10/06/2021 - 09:31
नवीन
अरे हा कसा विसरलो...
तमन्ना ची येंट्री यातूनच झाली....
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Wed, 10/06/2021 - 19:28
नवीन
अवांतर: तमन्नाचा चित्रपटसृष्टीतील प्रवेश 2005 सालच्या "चांदसा रोशन चेहरा" या हिंदी चित्रपटातून झाला होता, तेव्हा मुंबईत बऱ्याच ठिकाणी भिंतीवर या चित्रपटाचे पोस्टर पाहील्याचे आठवते.
या धाग्यात ही दुसरी वेळ असा चूकीचा संदर्भ येण्याची :)
- Log in or register to post comments
ग
गॉडजिला
Wed, 10/06/2021 - 19:43
नवीन
पहीली चुक देखील आपण सांगाल ही अपेक्षा होती कृपया पुर्ण करावी.
- Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर
Sun, 10/10/2021 - 13:52
नवीन
तेलगू चित्रपटांमध्ये नायकाची भूमिका करणाऱ्या अनेक अभिनेत्यांपैकी माझे सगळ्यात आवडते दोन अभिनेते म्हणजे 'महेश बाबू' आणि 'रवी तेजा'.
ह्या दोघांचा एकही चित्रपट पाहायचा मी सोडला नसावा.
अनेक सुपरहिट 'अँक्शन-कॉमेडी' चित्रपट देणाऱ्या 'मास महाराजा' रवी तेजाने काही प्रेमकथा/Feel Good चित्रपटांतही काम केले आहे त्यापैकी मला आवडलेला एक चित्रपट सुचवतो.
ठोकर
रवी तेजा आणि भूमिका चावलाची प्रमुख भूमिका असलेला हा Feel Good चित्रपट.
(शाळेतल्या प्रेमकहाणीचा भाग थोडा संथ असूनही एकंदरीत सिनेमा चांगला वाटला.)
- Log in or register to post comments
M
mangya69
Fri, 10/15/2021 - 17:23
नवीन
https://www.youtube.com/watch?v=iGhqeaiK9rs
एक हिरो अमेय वाघ सारखा दिसतो
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2