Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

दाक्षिणात्य सिनेमे सुचवा.

अ
अमरेंद्र बाहुबली
Fri, 10/01/2021 - 19:21
🗣 72 प्रतिसाद
आपल्याला माहीत असलेले काही छान दाक्षीणात्य सिनेमे सुचवावेत. सिनेमाच्या नावासोबत सिनेमाची कथा कशाशी निगडीत आहे हे देखील लिहावे. सिनेमा युट्युब वर असेल तर लिंक द्यावी. हिंदीत ऊपलब्ध आहे का तेही सांगावे. आधीचे धागे पाहीले त्यात सिनेमांची नावे फार कमी आहेत. साऊथ सिनेमे कसे असतात ह्यावर चर्चा करायला हा धागा नाही. फक्त सिनेमा त्याची कथा कशावर नी लिंक वगैरे. मी पाहीलेले काही. पहावेत असे सुचवेन. -राक्षसन (तमीळ) हिंदीत मै हुं दंडाधीकारी - सायको किलर. -फोरेन्सिक - बालगुन्हेगारी/ सायको किलर. -सबसे बढकर हम १ - फॅमीली ड्रामा. -रिअल जॅकपाॅट १ - संस्पेन्स. कथा हिंगलाज देवी मंदीर पाकिस्तान व काबूल ला घेऊन जाते. -रिअल जॅकपोट २ - आजिबात पाहू नये. -ह्रदय कळेयम -संपुर्णेश बाबूचा सुपर डूपर हीट सिनेमा. नक्की पहावाच. सिनेमा युगातील नवं काहीतरी. स्पूफ काॅमेडी (ह्याच्या छोट्या क्लिप्स आपण ईतरत्र पाहील्याच असतील. सिनेमा हिंदीत ऊपलब्ध नाही. तेलूगूत आहे. तरी समजेल मस्ट वाॅच. - हिरो नंबर झीरो.- स्पूफ कोमेडी. मस्ट वाॅच. (ईकी पीकी पोंकी ह्या गाण्याची क्लिप आपण पाहीलीच असेल नसेल पाहीली तर युट्युबला पहावीच.) हिंदीत ऊपलब्ध. -दृश्यम २- दृश्यम १ पाहीलाच असेल. अनअधिकृत हिंदी डब युट्युब वर ऊपलब्ध.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 26642 views

🗣 चर्चा (72)
ग
गॉडजिला Fri, 10/01/2021 - 20:45 नवीन
डॅशिंग डिटेक्टीव एका लहान मुलाचा कुत्रा मृत होण्याच्या वरवर मामुली वाटणार्‍या घटनेतुन सुरु होतो… अफलातुन मसालेदार रहस्य अ‍ॅक्शनपट. https://www.youtube.com/watch?v=R_MRs9G9BdM
  • Log in or register to post comments
र
राघवेंद्र Fri, 10/01/2021 - 22:44 नवीन
शाळेतील एकतर्फी प्रेमाची कथा जानू. साधा सरळ चित्रपट. काहीही हाणामारी नाही.
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Sat, 10/02/2021 - 01:38 नवीन
दृश्यम २ (मल्याळम) - (अण्णा) सोकाजी
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sat, 10/02/2021 - 02:46 नवीन
परवाच पाहिला. मल्याळम आहे.आवडेल तुला.मधेच थोडी संथ होते.पण ड्रामा,इमोशन, सामाजिक समस्या सगळे आहे. Hey I’m watching Raame Aandalum Raavane Aandalum. Check it out now on Prime Video! https://app.primevideo.com/detail?gti=amzn1.dv.gti.4ccb8dd4-40ff-4374-8b26-1c3ca7936bc4&ref_=atv_dp_share_mv&r=web
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sat, 10/02/2021 - 06:24 नवीन
Image removed. सिद्धार्थ, जेनेलिया, प्रकाश राज अभिनित 2006 सालचा हा तेलुगू चित्रपट आहे. चित्रपटाच्या नावाप्रमाणेच एक चांगले घर असते, सधन आणि संपन्न. वडिलांचा व्यवसाय व्यवस्थित चालू असतो, आई प्रेमळ गृहिणी असते. मात्र सर्व साधारण भारतीय घरात जी समस्या असते तीच इथेही असते. मुलांनी कसं वागावं, काय करावं हे वडील ठरवत असतात. अगदी मुलाने कपडे कोणते घ्यावेत आणि केस कसे कापावेत हे ही वडील ठरवत असतात. मुलाला हे सर्व जाचक वाटत असते. यथावकाश मुलगा मोठा होता, वडिलांच्या मर्जीनेच एका मुलीशी त्याचा साखरपुडा होतो. आणि अचानक कहाणीमध्ये ट्विस्ट येतो.... हलका फुलका, सिद्धार्थ आणि प्रकाश राज या ताकदीच्या अभिनेत्यांच्या अभिनयाची जुगलबंदी असलेला हा आवर्जून पाहावा असा नितांत सुंदर चित्रपट आहे. चित्रपटातील गाणीही श्रवणीय आहेत, काही कळले नाही तरी ऐकत राहाविशी वाटतात.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Sat, 10/02/2021 - 09:15 नवीन
Image removed. सिध्दार्थ जेनेलिया चे चित्रपट सृष्टीत पदार्पण यातून झाले... चित्रपटात ओसंडून अश्लीलता आहे. ३५+ लोकांनी अजिबात बघू नये. चित्रपटात सिध्दार्थ संपूर्ण निवरस्त्र अवस्थेत भर वर्दळ असलेला रस्ता क्रॉस करतो असे दृश्य बॉडी डबल न वापरता देऊन बरीच धमाल अन् राळ उडाली होती. चित्रपट भारताचा जेम्स केमेरोन अर्थातच शंकर. संगीत अर्थातच फॉर्म असलेला ए आर रेहमान त्यामूळे एकही गाणे कंटाळा देत नाही व सर्वच गाणी एक से बढकर एक अन पूर्णपणे वेगवेगळी मुड सेटिंग असलेली पण मला अले अले विशेष आवडते
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Sat, 10/02/2021 - 09:19 नवीन
चित्रपट दिग्दर्शक भारताचा जेम्स केमेरोन अर्थातच शंकर. कोणाला इंग्रजी वाचता येत नसेल तर चित्रपटाचे नाव आहे Boys साल २००३. आमच्या काळी काय मस्त चित्रपट होतें...
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sat, 10/02/2021 - 09:27 नवीन
हे वाक्य चित्रपटात ओसंडून अश्लीलता आहे. ३५+ लोकांनी अजिबात बघू नये. आवडले !
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 10/02/2021 - 09:42 नवीन
हिंदी डब नाही का?
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Sat, 10/02/2021 - 09:53 नवीन
पणं त्या संवादात मजा नाही जी सबटायटल भाषांतरात आहे व एक तर चांगल्या गाण्याची हिंदीत वाट तरी लावली आहे अथवा सरळ कापून टाकन्याचा उद्योग केला आहे.
  • Log in or register to post comments
र
रावसाहेब चिंगभूतकर Sat, 10/02/2021 - 13:57 नवीन
माझ्या मोबाईल मध्ये ही सगळी गाणी आहेत. डेटिंग, सरीगमे आणि मारो मारो ही माझी आवडती गाणी. बाकी जेनेलिया ने रितेश ला पसंत केल्यावर दिलात एक कळ उठली होती (माकडाच्या हातात .. वगैरे वगैरे). चित्रपट लागला असताना मी चेंनै मधेच होतो, पण पहायचा राहून गेला. ता.क. हे 35+ काय समजलं नाही. हा चित्रपट बनवणारी मंडळी आता नक्कीच 35+ असणार. शिवाय वय हे रोमॅंटिसिझम चे मेजरिंग युनिट कधीपासून झाले?
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sat, 10/02/2021 - 14:43 नवीन
बाकी जेनेलिया ने रितेश ला पसंत केल्यावर दिलात एक कळ उठली होती
या दोघांनी "तुझे मेरी कसम" या हिंदी चित्रपटामधून एकत्र चित्रपट सृष्टीत पदार्पण केले होते.
  • Log in or register to post comments
स
सुरिया Sat, 10/02/2021 - 15:39 नवीन
आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हा चित्रपट केवळ थिएअटरमध्येच पाहता आला लोकांना. स्व. विलासरावांनी आपली सारी पुण्याई वापरुन चित्रपटाची पायरसी होऊ दिली नाही, थिएटर प्रिंट बनु दिली नाही, डिव्हीडी आली नाही की चॅनलवर दाखवला गेला नाही पिक्चर. आता यू ट्युअबवर आहे ती प्रचंड घाण थेटर कॉपी आहे.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Sat, 10/02/2021 - 17:41 नवीन
ता.क. हे 35+ काय समजलं नाही. हा चित्रपट बनवणारी मंडळी आता नक्कीच 35+ असणार. शिवाय वय हे रोमॅंटिसिझम चे मेजरिंग युनिट कधीपासून झाले?
रोमॅंटिसिझम चे मेजरिंग युनिट वय असते हे मी म्हटलेलेच नाही. बाकी जे सांगायचे ते सांगितले असल्याने याउपर काहीही नाही.
माझ्या मोबाईल मध्ये ही सगळी गाणी आहेत. डेटिंग, सरीगमे आणि मारो मारो ही माझी आवडती गाणी.
:) गाणी सगळीच मस्त आहेत पण मॅट्रिक्स मधुन बुलेट टाइम इफेक्ट मारधाडीची ची चलती सुरु झाल्यावर ती अ‍ॅक्शनमधे न वापरता अले अले सारख्या उडत्या प्रेमगीतात २००३ मधे वापरणे म्हणजे कहर होता व त्यात मला भावणारी चाल व जेनेलीआ पण खुप क्युट दिसत असल्याने ते गाणं फेवरीट आहे.. फुल्टु जबानी याद आहे वर्ड टु वर्ड.
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Sat, 10/02/2021 - 20:04 नवीन
Boys चित्रपटातील ए आर रेहमानचे संगीत असलेली गाणी मस्त होती . त्यापैकी "अय्यो लव्ह इज फुल्ल ऑफ पेन " हे गाणे छान जमले आहे . काही इतर लक्षात राहिलेल्या चित्रपटांमधील एक म्हणजे 'कन्नतिल मुथमित्तल' . याबद्दल पुर्वी लिहिलेली माहिती परत डकवत आहे . -- 'कन्नतिल मुथमित्तल' हा मणीरत्नमच्या दहशतवाद/दहशतवादी या विषयांवर आधारीत असलेल्या चित्रपटांमधील एक गाजलेला क्लासिक चित्रपट आहे . रोजा ,बॉम्बे , दिलसे , रावण या मालिकेतला एक. एका तामिळ भारतीय कुटुंबामध्ये राहणारी अनाथ लहान मुलगी , तिला आपल्या खरया आईला भेटविण्यासाठी श्रीलंकेला ते कुटुंब घेउन जाते , व शेवटी एल टी टी मध्ये असणारया आईशी तिची भेट असे कथानक आहे . मणिरत्नम दिग्दर्शक - अभिनय - माधवन - नन्दिता दास - ए र रह्मानचे संगीत व अप्रतिम लोकेशन्स , फोटोग्राफी असे कॉम्बिनेशन एकदम जुळुन आले आहे . https://www.misalpav.com/node/46978 https://www.misalpav.com/node/42653
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sun, 10/03/2021 - 06:11 नवीन
कॉलेजात सुरुवातीच्या वर्षांत कल्ट बनलेल्या पिच्चरांपैकी एक. (दुसरा रेहना है तेरे दिल में). गर्लफ्रेंड आणि डेटिंग ही गाणी शेकडो वेळा रिपीट-रिपीट बघितलेली आहेत. कोवळा सिद्धार्थ आणि त्याहून नाजूक जेनेलिया! जेनेलिया तेव्हापासून जी काळजात शिरली आहे, ती अजून तिथेच आहे!
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Sun, 10/03/2021 - 09:13 नवीन
(दुसरा रेहना है तेरे दिल में).
अगदी अगदी... Maddy was awesome... at that time. हा चित्रपट नेमका अपेक्षे इतका का चालला नाही कोणालाच फारसे समजलें नसेल.. पणं त्यावेळी पीसी चे युग सुरू झाले होते अन हा चित्रपट हमखास प्रत्येक स्टुडंट्स पीसी वरती स्टोअर असेच.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 10/02/2021 - 09:42 नवीन
सर्वांचे धन्यवाद. आणखी येऊद्या.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 10/02/2021 - 09:54 नवीन
आंबला हा विशाल चा असाच एक कोमेडी अधिक ड्रामा सिनेमा. टाईमपास म्हणून पाहण्यास चांगला.
  • Log in or register to post comments
भ
भीमराव Sat, 10/02/2021 - 12:19 नवीन
अवने श्रीमन नारायण बघीतलाय का? नसेल तर आताच बघा. तुनळीवर आहे https://youtu.be/l4BXM7lcVQw
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Sat, 10/02/2021 - 12:36 नवीन
.
  • Log in or register to post comments
H
hrkorde Mon, 10/04/2021 - 20:40 नवीन
जयरामचा हिंदी आवाज हेरी पॉटरमधल्या हिंदी वोलडेमोर्टच्या आवाजासारखा वाटला. हिंदी voldemort dark lord चा आवाज ऋषभ शुक्लाचा आहे , महाभारतात शंतनूची भूमिका केली होती. हा जयरामचा आवाज त्याचाच आहे का ? Image removed.
  • Log in or register to post comments
H
hrkorde Sat, 10/09/2021 - 03:51 नवीन
https://www.stupidgag.com/harry-potter-hindi-voice-dubbing-cast-2634
  • Log in or register to post comments
स
सुरिया Sat, 10/09/2021 - 04:29 नवीन
Wow, मायुस मीना चा आवाज आपल्या मेघना एरंडे ने दिलाय. बोलणारी टोपी तर आपला उदय सबनीस आहे. आणि इतर पात्रे पण केलीत त्यांनी. मस्तच. आपला निनाद कामत व्हॉईस ओव्हर मध्ये बराच प्रसिद्ध आहे. आयर्नमन वगैरे. जाहिरातीमध्ये बऱ्याच शेलेब्रिटीचे आवाज तोच देतो.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 10/09/2021 - 09:14 नवीन
भारी यादी दिलीत. आता प्रत्येक वेळी aragog, sorting hat आणि Vernon Dursley बघताना उदय सबनीस डोळ्यांपुढे येणार :) अती अवांतर : अलादिन animation मालिकेत (नव्वदीच्या दशकात शुक्रवारी संध्याकाळी ४.०० ला लागायची) इयागो पोपटाचा आवाज अविनाश नारकरांचा होता. हिंदी बाहुबली मध्ये प्रभाससाठी शरद केळकर ने आवाज दिलाय.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sat, 10/09/2021 - 09:42 नवीन
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 10/02/2021 - 12:42 नवीन
१. Anbirkiniyal तामिळ: अतिशीत खोलीत अडकलेल्या तरुणीची सुटका छान दाखवली आहे २. होम: मल्याळम आई-वडील व मुलांच्या पिढीतले अंतर, मतभेद , मोबाईलचे व्यसन इत्यादी शेवट ऋदयस्पर्शी आणि तीन तास लांबी मात्र अनावश्यक
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Sat, 10/02/2021 - 12:44 नवीन
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 10/02/2021 - 13:47 नवीन
का Unexplored but good?
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sat, 10/02/2021 - 14:41 नवीन
Image removed. एक पोलीस अधिकारी गुन्हेगारी संपवण्यासाठी गुन्हेगारांना सामील होतो, त्यांच्यातील एक बनून त्यांना एक एक करून संपवतो त्याची ही गोष्ट. इथे महेश बाबू आणि प्रकाश राज या अभिनेत्यांच्या अभिनयाची जुगलबंदी आहे. महेश बाबूच्या देहबोलीसाठी पहावा असा हा चित्रपट आहे. सलमान खान अभिनित Wanted हा हिंदी चित्रपट पोकिरीचा रिमेक आहे. 15 Years For Pokiri: Why The Mahesh Babu And Ileana Starrer Became An All-Time Industry Hit
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Sat, 10/02/2021 - 14:54 नवीन
३० दिवसांत कसे प्रेम करावे अश्या मजेशीर नावाचा तेलगू चित्रपट - नायक-नायिकेच्या पुनर्जन्मावर आधारलेली कथा काही फार विशेष नाही. पण त्यातलं निली निली आकासम् हे गाणं फारच मधुर आणि एकदा ऐकताच ठेका धरायला लावणारं आहे.
  • Log in or register to post comments
H
hrkorde Sat, 10/02/2021 - 15:40 नवीन
प्रीतीचे झुळझुळ पाणीच्या ओळी मागेपुढे करून वापरल्यात की काय ?
  • Log in or register to post comments
H
hrkorde Sat, 10/02/2021 - 15:43 नवीन
सोनू निगमचेही असेच एक गाणे आहे , त्याचा प्रायव्हेट अलबम होता हो हो हो हो , अशी सुरुवात आहे, शब्द आठवत नाहीत
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sat, 10/02/2021 - 16:24 नवीन
तेरा मिलना पल दो पल का?..हो हो हो~~ रच्याकने हे नीलीनीली गाणं मस्त आहे.
  • Log in or register to post comments
H
hrkorde Sat, 10/02/2021 - 16:24 नवीन
https://www.youtube.com/watch?v=RB8uRCLvchU ह्याच्याही काही ओळी सारख्या वाटतात.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Sat, 10/02/2021 - 15:01 नवीन
बोम्मरिल्लू, पोकिरी, दुकडू, अतडू, हॅप्पी डेज् हे आणि असे अनेक तेलुगू सिनेमे पाहण्यासारखे आहेत.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Sat, 10/02/2021 - 17:50 नवीन
बोमारिलु मधील बोम्मन गिस्ते माझ्या ऑल टाइम फेवरीटमधे येते. गाण्याची गोड चाल सुंदर चित्रीकरण आणि त्याच्या ओळीचा अर्थ सगळेच एकदम लाजवाब. :)
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Sat, 10/02/2021 - 17:53 नवीन
शांत पडुन चोकोलेट+ वाइन चा हलका हलका तरल अस्वाद घेत हे गाणे ऐकणे/पाहणे खुप सुखद अनुभव असतो.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Sat, 10/02/2021 - 15:11 नवीन
सुनील-सलोनीचा मर्यादा रामण्णा अवश्य पहा, तेलुगू कळत नसेल तरीही सिनेमा जवळपास संपूर्ण कळेल. त्यातलं "मुलगी खिडकीजवळ बसलेली आहे" अश्या अर्थाचं गाणं आणि इतरही सर्वच गाणी मस्त आहेत. या सिनेमाचा अत्यंत भ्रष्ट रिमेक म्हणजे हिंदीतला सन ऑफ सरदार.
  • Log in or register to post comments
H
hrkorde Sat, 10/02/2021 - 15:47 नवीन
ओखा क्षणम मस्त आहे
  • Log in or register to post comments
फ
फुटूवाला Sun, 10/03/2021 - 03:20 नवीन
मोहनलाल आणि विवेक ओबोरॉय चा चित्रपट
  • Log in or register to post comments
फ
फुटूवाला Sun, 10/03/2021 - 03:22 नवीन
पहिला पहिला अन आता दुसऱ्याच्या प्रतीक्षेत आहे. संजय दत्त आणि रविना टंडन आहेत KGF २ मध्ये. एप्रिल २०२२ ला येतोय.
  • Log in or register to post comments
फ
फुटूवाला Sun, 10/03/2021 - 03:30 नवीन
Image removed. चालू करून काम करत बसतो मी :)
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sun, 10/03/2021 - 06:35 नवीन
शशीकुमार दिग्दर्शित. मूळ तमिळ नाव सुब्रमणियापुरम्. मल्याळम मध्ये त्याच नावाने आणि तेलुगू मध्ये अनन्तपुरम नावाने डब आहे. युट्यूब वर फक्त डब व्हर्जन्स आहेत. मूळ तमिळ पिच्चर प्राईमवर होता. आता प्राईमवर त्यासाठी एरॉसचं वाढीव पॅक घ्यायला सांगतात (माजलेत साले!!) हिरो : जय, हिरॉईन : स्वाती Image removed. चित्रपटाची कथा १९८० सालच्या मदुराई शहरातील सुब्रमणियपुरम भागात घडते. एक स्थानिक नेता सोमू, त्याचा भाऊ कनुगू, त्याच्या आशिर्वादाने टपोरीगिरी करणारे पाच उनाड तरुण- अळगर (हिरो), परमन आणि अजून तिघे , सोमूची मुलगी स्वाती (हिरॉईन). राजकारण, विश्वासघात, प्रेम, मैत्री असा अतिशय मनोरंजक चित्रपट! थीम व्हिडिओ : कंगल इरंदल : अतिशय सुंदर गाणं
  • Log in or register to post comments
स
संगणकनंद Sun, 10/03/2021 - 09:39 नवीन
मात्र हे सर्व चित्रपट युट्युबवर पाहायला मिळतील का? आणि इंग्रजी सबटायटल्स असतील का? वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे हिंदी डबिंगवाले "मन्ने तो खबर नथी" टाईप हिंदी त्या पात्रांच्या तोंडी घालून मजाच घालवून टाकतात.
  • Log in or register to post comments
H
hrkorde Sun, 10/03/2021 - 14:50 नवीन
आणि व्हिडिओत चेन्नै चे लोकेशन असते आणि डबिण्ग मध्ये डोंबिवलिचा इन्स्पेक्टर मालाडच्या चोराला धरायला बाइकने जात असतो
  • Log in or register to post comments
श
शित्रेउमेश Mon, 10/04/2021 - 06:02 नवीन
अभिनेता विक्रम चा १ . "I" - https://www.youtube.com/watch?v=xY3IRTNF8MA Vikram and Samantha २. "10 ka dum" - https://www.youtube.com/watch?v=Xlsd_dIbrpQ
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sun, 10/10/2021 - 09:33 नवीन
१० का दम पहायला सुरुवात केला , फारच दक्षिणी मसाला प्रवास पट, विस्कळीत पटकथा .... विविध सुंदर लोकेशन्स पण धरुन ठेवू शकली नाहीत. .... मग अर्धा पाऊण पाहून सोडुन दिला. तारारा, तरारा हे गाणं ( हिंदी ) हे छान वाटलं. याच सिनेमातील एका गाण्याच्या शूटिंगसाठी पुण्यात अडीच कोटी रुपयांचा सेट उभारण्यात आला होता. याच्या साठी २.५ कोटी रु खर्च करण्आण्यार आले, गाणे चक्क ९ मिनिटाचे आहे असे उल्लेख विकिपेडियात वाचले, ते कोणते गाणे हे मात्र समजले नाही.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sun, 10/10/2021 - 09:51 नवीन
अवांतर : शिवाजी द बॉस चित्रपटात दाखवलेले हॉस्पिटल, तसेच नंतर शिवाजी अमिताभ बच्चन (हिंदीत. तमिळ मध्ये एम जी आर) नावाने येतो ती जागा मगरपट्टा सायबर सिटी आहे. :)
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Sun, 10/10/2021 - 11:52 नवीन
शिवाजी द बॉस चित्रपटात दाखवलेले हॉस्पिटल, तसेच नंतर शिवाजी अमिताभ बच्चन (हिंदीत. तमिळ मध्ये एम जी आर) नावाने येतो ती जागा मगरपट्टा सायबर सिटी आहे. :)
हायला... डू आयडी.. रजिनी सिनेमात.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 13 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 13 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 13 hours ago
  • सुंदर !!
    1 day 13 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 13 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा