Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

मिपा गंमतगूढ (२) : आपले लेखन ओळखूया

ह
हेमंतकुमार
गुरुवार, 09/02/2021 - 02:07
🗣 68 प्रतिसाद
भाग-1 इथे https://www.misalpav.com/node/49180 …... नमस्कार. या खेळाच्या पहिल्या भागामध्ये आपण आपल्या मिपाकर बंधू-भगिनींची सदस्यनावे ओळखली. एकंदरीत धमाल आली. आता सादर करीत आहे या मालेतील पुढील भाग: धागा-शीर्षके ओळखणे खाली 10 शोधसूत्रे दिलेली आहेत. त्या प्रत्येकावरून मिपावरील धागा-शीर्षके ओळखा. १. तुम्हाला संबंधित शीर्षकाचे सर्व शब्दसमूह ओळखायचे आहेत. हे धागे मिपाच्या विविध विभागांमधून निवडले आहेत. दिलेल्या सूत्रापुढे दोन कंस आहेत. २. पहिल्या कंसात ओळखायच्या शीर्षकातील प्रत्येक शब्दाची अक्षरसंख्या आहे. शीर्षक ओळखून झाल्यावर त्याची खात्री पटवण्यासाठीची माहिती दुसऱ्या कंसात दिली आहे. तुमचे उत्तर या माहितीशी जुळले पाहिजे. त्यामध्ये संपूर्ण शीर्षकातील काही अक्षरांची वैशिष्ट्ये एकत्रित दिलेली आहेत. हे देण्यामागे, एखाद्या सूत्राचे पर्यायी उत्तर शक्यतो येऊ नये असा प्रयत्न आहे. ३. दिलेल्या सूत्रातील माहिती ही धाग्याच्या फक्त शीर्षकाशीच संबंधित आहे. त्याचा संबंध धाग्याच्या आशयाशी वगैरे लावू नये. ४. ओळखायची सर्व शीर्षके मराठी भाषेत व देवनागरी लिपीत आहेत. त्यातील प्रत्येक शब्द हा सलग असून त्यात कुठेही जोड नाही. शीर्षकामध्ये अंकांचा बिलकुल समावेश नाही. ५. हा भाग जरा गुंतागुंतीचा वाटू शकेल. म्हणून आधी एक उदाहरण देतो: सूत्र असे आहे : भयानक संहाराची आठवण (५, ५) ( एकूण चार वेलांट्या, एक जोडाक्षर). याचे उत्तर : … ... हिरोशिमाचा स्मृतिदिवस ( स्मृ हे जोडाक्षर, एकूण चार वेलांट्या मोजाव्यात). …….. शोधसूत्रे : १. हे क्षुल्लक लक्षात आहेत ( ६, २) ( एकूण तीन वेलांट्या) २. भावना तशी अमर्याद (३, २, २) ( एक जोडाक्षर, दोन वेलांट्या) ३. त्याच खऱ्या, तुम्हीच खोटे (७, ४) ( दोन जोडाक्षरे एक वेलांटी) ४. कुठे तो थोर अन कुठे तो क्षुद्र (४, २,.३) ( दोन जोडाक्षरे, एक उकार) ५. नुसते पिऊ नका, जरा लांब पहा (३ , ४) (एक जोडाक्षर एक मात्रा) ६. सदानकदा तेच खाताय (२ ,२,३) ( दोन जोडाक्षरे ) ७. विचारून घ्या नाहीतर कायम पश्चात्ताप (४, २) ( एक वेलांटी, एक जोडाक्षर) ८. कलुषित भडिमार (४,३,५) (१ जोडाक्षर ,१ अनुस्वार ) ९. सुस्कारे टाकत हिंडा तेथे (३,३) ( एक जोडाक्षर, एक अनुस्वार) १०. हे पण दाद मागतात ? (४,३) ( २ वेलांट्या) …....

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 20604 views

🗣 चर्चा (68)
ग
गॉडजिला गुरुवार, 09/02/2021 - 03:45 नवीन
की मला गंमत उरतच नाही. इतरांना शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 09/02/2021 - 04:20 नवीन
मिपावर जवळजवळ ५० हजार धागे आहेत. त्यातून हे १० शोधायचे (कितीही सुप्रसिध्द असले तरी) हे म्हणजे गवताच्या गंजीतुन सुई शोधण्याचे आव्हान आहे. कुठे म्यागनेट सापडते का ते पहातो. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला गुरुवार, 09/02/2021 - 04:26 नवीन
http://misalpav.com/user/30033/track
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 09/02/2021 - 05:04 नवीन
नाही, तसं नाही म्हणता येणार . जी शीर्षके आकर्षक वाटली आहेत ती घेतली आहेत
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 09/02/2021 - 04:22 नवीन
धागे गेल्या १-२ वर्षातील आहेत. सूत्रातील माहितीनुसार विचार करावा
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 09/02/2021 - 05:18 नवीन
१. हे क्षुल्लक लक्षात आहेत ( ६, २) ( एकूण तीन वेलांट्या) - आठवणीतील किडे - प्रा.डॉ.दिलीप बिरुटे पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 09/02/2021 - 05:35 नवीन
आठवणीतील किडे - अगदी बरोबर उत्तम सुरुवात !!
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 09/02/2021 - 06:29 नवीन
५. नुसते पिऊ नका, जरा लांब पहा (३ , ४) (एक जोडाक्षर एक मात्रा)- चहाच्या पलीकडे - मायमराठी पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 09/02/2021 - 06:31 नवीन
चहाच्या पलीकडे अगदी बरोबर ! बुवा जमतंय कि वो छान तुम्हास्नी :)) मस्त...
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 09/02/2021 - 06:33 नवीन
९. सुस्कारे टाकत हिंडा तेथे (३,३) ( एक जोडाक्षर, एक अनुस्वार) - स्मरण रंजन - नीलकंठ देशमुख पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 09/02/2021 - 06:49 नवीन
कारण सुस्कारे पण विचारात घेतले पाहिजेत
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 09/02/2021 - 06:52 नवीन
स्मरणरंजन हा त्या धाग्यामध्ये सलग सहा अक्षरी शब्द आहे ३, ३ हवे
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 09/02/2021 - 07:30 नवीन
९. सुस्कारे टाकत हिंडा तेथे (३,३) ( एक जोडाक्षर, एक अनुस्वार) - श्वासांचा बाजार - आमचे परम मित्र - खिलजि पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 09/02/2021 - 07:36 नवीन
श्वासांचा बाजार बरोबर. ज्ञा पै तुमची सलग हॅटट्रिक थोडक्यात हुकली परंतु तुम्ही ओव्हर हॅटट्रिक केलेली आहे अभिनंदन.!
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 09/02/2021 - 07:08 नवीन
२. प्रेमाला सीमा नाही ???
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 09/02/2021 - 07:10 नवीन
२. प्रेमाला सीमा नाही अगदी बरोबर. वा !
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 09/02/2021 - 07:23 नवीन
प्रेमाला सीमा नसते. पण प्रेमाला सीमाशुल्क असते.. ;-)
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 09/02/2021 - 07:28 नवीन
बरोबर बोललात ! हा धागा 2020 या दिवाळी अंकातला असल्यावर गवि नाही ओळखणार, तर कोण ओळखणार.! :))
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 09/02/2021 - 11:49 नवीन
देखरेख करणारे सीमा शुल्क अधिकारी सुद्धा बराच त्रास देतात !
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर गुरुवार, 09/02/2021 - 08:30 नवीन
१०. हे पण दाद मागतात ? (४,३) ( २ वेलांट्या) कावळ्याची फिर्याद ???
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 09/02/2021 - 08:31 नवीन
कावळ्याची फिर्याद बरोब्बर ! छान. व इथे स्वागत !
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर गुरुवार, 09/02/2021 - 08:38 नवीन
एक तरी ओळ्खायला जमलं म्हणयचं :) बाकी पैजार बुवांची गाडी सुसाट चालली आहे... मस्त!
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 09/02/2021 - 08:34 नवीन
गती सुंदर आहे . निम्मे संपले आता आहे उरलेत : ३. त्याच खऱ्या, तुम्हीच खोटे (७, ४) ( दोन जोडाक्षरे एक वेलांटी) ४. कुठे तो थोर अन कुठे तो क्षुद्र (४, २,.३) ( दोन जोडाक्षरे, एक उकार) ६. सदानकदा तेच खाताय (२ ,२,३) ( दोन जोडाक्षरे ) ७. विचारून घ्या नाहीतर कायम पश्चात्ताप (४, २) ( एक वेलांटी, एक जोडाक्षर) ८. कलुषित भडिमार (४,३,५) (१ जोडाक्षर ,१ अनुस्वार )
  • Log in or register to post comments
ग
गुल्लू दादा गुरुवार, 09/02/2021 - 09:06 नवीन
आमचं डोकं काही चालेना या खेळात. मजा मात्र पूर्ण घेतोय.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 09/02/2021 - 09:22 नवीन
+१
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 09/02/2021 - 09:25 नवीन
४. कुठे तो थोर अन कुठे तो क्षुद्र (४, २,.३) ( दोन जोडाक्षरे, एक उकार) - विश्वामित्र आणि विषाणू - विवेकपटाईत पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 09/02/2021 - 09:49 नवीन
एकहाती सर्वच कोडी सोडवतात वाटते बुवा आज बुवा, एक्षेल शीट?? ;-) ह.घ्या.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 09/02/2021 - 10:05 नवीन
आधि नियम निट वाचले अन मग एक्सेल शीटच घेउन बसलो आहे..त्यात LEN चा यथेच्च वापर केला आणि मग Filter आणि लॉजिक लावत बसलो त्या शिवाय काही हे कोडे सुटले नसते कारण सप्टेंबर २०२० पासुन पुढे २१०० धागे निघाले आहेत आणि कुमार सरांनी २ वर्षांची रेंज दिली आहे. अन त्यातले दहा ओळखायचे आहेत . पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर गुरुवार, 09/02/2021 - 10:12 नवीन
Ethical Cracking... :) :) :) भारीच!
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख गुरुवार, 09/02/2021 - 11:48 नवीन
Ethical Cracking... :) :) :)
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 09/02/2021 - 10:26 नवीन
त्यात LEN चा यथेच्च वापर केला आणि मग Filter
हे काय असतं ते माझ्यासारख्या अडाण्याला शिकवा ना भाऊ !
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख गुरुवार, 09/02/2021 - 11:51 नवीन
एक्सेल शीटच घेउन बसलो आहे..त्यात LEN चा यथेच्च वापर केला आणि मग Filter आणि लॉजिक लावत बसलो
दिस् इझ् मात्र नॉट् फेअर् हं ! 😉
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 09/02/2021 - 10:19 नवीन
विश्वामित्र आणि विषाणू बरोब्बर !
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर गुरुवार, 09/02/2021 - 09:55 नवीन
६. सदानकदा तेच खाताय (२ ,२,३) ( दोन जोडाक्षरे ) ज्यात त्यात बटाटा ???
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 09/02/2021 - 10:21 नवीन
ज्यात त्यात बटाटा बरोब्बर ! एवढ छान उत्तर देता आणि मग ती प्रश्नचिन्ह कशाला टाकता राव ! बरोबर आहे तुमचं....
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 09/02/2021 - 10:23 नवीन
तसा काही नियम नसला तरी आता बुवा जरा काही तास विश्रांती घेतील काय ? म्हणजे इतरांना पण जरा बॅट फिरवून बघता येईल राव :))
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 09/02/2021 - 10:36 नवीन
आपका हुक्म सर आँखों पर मेरे आका, बसतो परत बाटलीत जाउन, नवी बाटली उघडलीत की पुन्हा प्रगट होईन, (बाटलीतला राक्षस) पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 09/02/2021 - 14:20 नवीन
पण ते एक्सेल शीट बनवले कसे ते सांगा की.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला गुरुवार, 09/02/2021 - 15:25 नवीन
आधी दोन वर्षांपूर्वी निघालेले धागे बाद करायचे त्या नंतर एक शोधसूत्र घेऊन त्याच्या शीर्षकाचे दिस्क्रिपशन असलेले शीर्षक धागे वेगळे करायचे व हे वेगळे झालेले धागे अर्थातच शब्द संख्या व वेलांटी याच्या साधर्म्यमुळे अतिशय कमी उरतात व त्याचा अर्थ सहजपणें ताडून उत्तर मिळून जाते...
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला गुरुवार, 09/02/2021 - 15:29 नवीन
तर यासाठीच कुमार१ यांना ट्रॅक करायचे म्हणजे त्यांनी असे कोणते धागे पाहीले जे जास्तीजास्त दोन वर्षे जूने आहेत यांची सहज माहिती मिळून आपल्याला अंदाज करणे अजून सोपे जाते :)
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 09/02/2021 - 15:30 नवीन
छान युक्ती आहे. अर्थात मला एक्सेल वगैरे काहीच येत नाही. शिकावे लागेल. :)
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 09/02/2021 - 15:35 नवीन
पण एक शंका आहे जी शीर्षके मी निवडली त्यांच्यावर टिचकी मारुन मी आत धाग्यात शिरलेलो नाही तरीसुद्धा ट्रॅक ने कसे काय जमेल
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला गुरुवार, 09/02/2021 - 15:54 नवीन
हा फुल्लप्रूफ मार्ग अर्थातच नाहीये फक्त एक सुरुवात म्हणून ठीक आहे... तसेही पुढील वेळीं तूम्ही रिसर्च डुआयडी वापरून कराल त्यावेळी तुम्हाला ट्रॅक करून देखील फायदा नाही.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 09/02/2021 - 15:59 नवीन
हे पण भारीच की ! हरकत नाही वरील सर्व युक्त्या वापरून होता कोण सोडवणार आहे 3, 7, व 8 ?
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला गुरुवार, 09/02/2021 - 16:45 नवीन
सोडवतील कारणं त्यांचेकडे एक्सेल शीट आहे ;)
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 09/02/2021 - 16:55 नवीन
ते चालणार नाही बर का ;) पहिल्या कसोटीमध्ये शेवटी मैदानात उतरून तुम्ही एक छान उत्तर दिले होते तसे या खेपेसही एक तरी उत्तर तुमच्याकडून हवेच त्याशिवाय धाग्याची सांगता नाही ...
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 09/02/2021 - 16:55 नवीन
म्हणजे "सर्व धाग्यांची नावे" हा मूळ विदा कसा जमवला ते कळत नाहीये. नावे टाईप करून नक्कीच नसावे ना?
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला गुरुवार, 09/02/2021 - 18:18 नवीन
कॉम्प्युटर वर हे सुलभ आहे मोबाइल वर किचकट
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला गुरुवार, 09/02/2021 - 18:18 नवीन
.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 09/02/2021 - 10:39 नवीन
धागा प्रकाशित केला तेव्हा निदान 36 तास चालेल अशी अटकळ बांधली होती. . परंतु या दुसऱ्या कसोटीतील खेळाडूंनी घणाघाती फलंदाजी करून आत्ताच 70 टक्के खेळ आटोक्यात आणलेला आहे . आता फक्त तीन राहिले आहेत. ३, ७,८. मागच्या पहिल्या कसोटीतील दमदार मंडळींची आठवण होत आहे कुठे गायब आहेत ? या मैदानात.....
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 10 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 10 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 10 hours ago
  • सुंदर !!
    1 day 10 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 10 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा