Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

मिपा गंमतगूढ (२) : आपले लेखन ओळखूया

ह
हेमंतकुमार
गुरुवार, 09/02/2021 - 02:07
🗣 68 प्रतिसाद
भाग-1 इथे https://www.misalpav.com/node/49180 …... नमस्कार. या खेळाच्या पहिल्या भागामध्ये आपण आपल्या मिपाकर बंधू-भगिनींची सदस्यनावे ओळखली. एकंदरीत धमाल आली. आता सादर करीत आहे या मालेतील पुढील भाग: धागा-शीर्षके ओळखणे खाली 10 शोधसूत्रे दिलेली आहेत. त्या प्रत्येकावरून मिपावरील धागा-शीर्षके ओळखा. १. तुम्हाला संबंधित शीर्षकाचे सर्व शब्दसमूह ओळखायचे आहेत. हे धागे मिपाच्या विविध विभागांमधून निवडले आहेत. दिलेल्या सूत्रापुढे दोन कंस आहेत. २. पहिल्या कंसात ओळखायच्या शीर्षकातील प्रत्येक शब्दाची अक्षरसंख्या आहे. शीर्षक ओळखून झाल्यावर त्याची खात्री पटवण्यासाठीची माहिती दुसऱ्या कंसात दिली आहे. तुमचे उत्तर या माहितीशी जुळले पाहिजे. त्यामध्ये संपूर्ण शीर्षकातील काही अक्षरांची वैशिष्ट्ये एकत्रित दिलेली आहेत. हे देण्यामागे, एखाद्या सूत्राचे पर्यायी उत्तर शक्यतो येऊ नये असा प्रयत्न आहे. ३. दिलेल्या सूत्रातील माहिती ही धाग्याच्या फक्त शीर्षकाशीच संबंधित आहे. त्याचा संबंध धाग्याच्या आशयाशी वगैरे लावू नये. ४. ओळखायची सर्व शीर्षके मराठी भाषेत व देवनागरी लिपीत आहेत. त्यातील प्रत्येक शब्द हा सलग असून त्यात कुठेही जोड नाही. शीर्षकामध्ये अंकांचा बिलकुल समावेश नाही. ५. हा भाग जरा गुंतागुंतीचा वाटू शकेल. म्हणून आधी एक उदाहरण देतो: सूत्र असे आहे : भयानक संहाराची आठवण (५, ५) ( एकूण चार वेलांट्या, एक जोडाक्षर). याचे उत्तर : … ... हिरोशिमाचा स्मृतिदिवस ( स्मृ हे जोडाक्षर, एकूण चार वेलांट्या मोजाव्यात). …….. शोधसूत्रे : १. हे क्षुल्लक लक्षात आहेत ( ६, २) ( एकूण तीन वेलांट्या) २. भावना तशी अमर्याद (३, २, २) ( एक जोडाक्षर, दोन वेलांट्या) ३. त्याच खऱ्या, तुम्हीच खोटे (७, ४) ( दोन जोडाक्षरे एक वेलांटी) ४. कुठे तो थोर अन कुठे तो क्षुद्र (४, २,.३) ( दोन जोडाक्षरे, एक उकार) ५. नुसते पिऊ नका, जरा लांब पहा (३ , ४) (एक जोडाक्षर एक मात्रा) ६. सदानकदा तेच खाताय (२ ,२,३) ( दोन जोडाक्षरे ) ७. विचारून घ्या नाहीतर कायम पश्चात्ताप (४, २) ( एक वेलांटी, एक जोडाक्षर) ८. कलुषित भडिमार (४,३,५) (१ जोडाक्षर ,१ अनुस्वार ) ९. सुस्कारे टाकत हिंडा तेथे (३,३) ( एक जोडाक्षर, एक अनुस्वार) १०. हे पण दाद मागतात ? (४,३) ( २ वेलांट्या) …....

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 20604 views

🗣 चर्चा (68)
ल
लई भारी गुरुवार, 09/02/2021 - 10:58 नवीन
आपला पास, पण मजा येतेय खेळ बघायला सुद्धा :-)
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख गुरुवार, 09/02/2021 - 11:52 नवीन
आपला पास, पण मजा येतेय खेळ बघायला सुद्धा :-)
हेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 09/02/2021 - 11:55 नवीन
सर्व प्रेक्षक मंडळींनो, बिंदास मैदानात यायचं आणि बॅट फिरवून बघायची. बसतो एखादा चौकार ... खेळून तर बघा
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 09/02/2021 - 12:57 नवीन
चाक फिरवतो गरागरा मडकी घडवतो भराभरा । मी कोण? तसं आइडींचं लिहा. मागे एकदा अभ्या.. ने टी शर्ट काढलेले. चित्रवाले आइडी.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 09/02/2021 - 18:02 नवीन
आता राहिलेले तीन रात्रपाळीची मंडळी संपवतील अशी आशा आहे. तसे न झाल्यास उद्या बुवांवर कुठलेच बंधन असणार नाही. त्यांनी खुशाल बाटलीचे बूच उडवुन बाहेर यावे आणि उरलंसुरलं एक हाती संपवून टाकल्यास आनंद होईल !
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 09/03/2021 - 07:39 नवीन
शेवटचे ४ तास.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 09/03/2021 - 11:38 नवीन
१. हे क्षुल्लक लक्षात आहेत ( ६, २) ... आठवणीतील किडे २. भावना तशी अमर्याद (३, २, २) …. प्रेमाला सीमा नाही. ३. त्याच खऱ्या, तुम्हीच खोटे (७, ४) …... वेश्याव्यवसायाची नैतिकता. ४. कुठे तो थोर अन कुठे तो क्षुद्र (४, २,.३) ….. विश्वामित्र आणि विषाणू. ५. नुसते पिऊ नका, जरा लांब पहा (३ , ४) …. चहाच्या पलीकडे. ६. सदानकदा तेच खाताय (२ ,२,३) …. ज्यात त्यात बटाटा. ७. विचारून घ्या नाहीतर कायम पश्चात्ताप (४, २) ... शेवटची इच्छा. ८. कलुषित भडिमार (४,३,५) …. बातम्यांचे विषारी गुलाबजाम. ९. सुस्कारे टाकत हिंडा तेथे (३,३)..... श्वासांचा बाजार. १०. हे पण दाद मागतात ? (४,३) .. कावळ्याची फिर्याद. ..... आपणा सर्वांचे अभिनंदन व आभार.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 09/03/2021 - 12:03 नवीन
मजा आली हे कोडे सोडवताना, या कोड्या मुळे वेगळा आणि वेगवान विचार कसा करायचा याची चाचणी करता आली. आता तुमच्या पोतडीतुन नवे काय निघते आहे त्याची वाट पहातो आहे. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Fri, 09/03/2021 - 13:07 नवीन
नवे काय निघते आहे त्याची वाट पहातो आहे.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 09/03/2021 - 13:24 नवीन
ते ठीक आहे हो :) पण वरील खेळात तीन सात आणि आठ पैकी तुम्ही एक तरी उत्तर द्यायचे होते की ! बरीच वाट पाहिली... पण तुम्ही सांगितलेल्या संगणकीय युक्तींच्या मुळे मात्र धमाल आली ! धन्यवाद
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Fri, 09/03/2021 - 13:36 नवीन
कारण काल रात्री मनी हिस्ट चा नवासिजन बघायचा प्रोग्राम होता त्यामुळं इतर कामे त्या नुसार अरेंज केली होती त्यामूळे धाग्यकडे फिरकलो नाही मग उशीरा लक्षात आले सीजन रात्री १२.३० न्हवे तर दुपारी १२.३० ला रिलीज होणार आहे व त्यात गुंतून पडणे होणार मग पुन्हा सर्व वेळ नवीन टाईमटेबल नुसार आज दुपारची कामे रात्रीच संपविण्यात घालवला गेला यात जागरणही झाले त्यामुळे धाग्याकडे पुरेसे लक्ष देता आले नाही... त्यामूळे माफी असावी _/\_
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 09/03/2021 - 14:10 नवीन
हरकत नाही ,गंमत केली. पण या एक उत्तराचं कर्ज तुमच्यावर लागू आहे एवढ हक्काने सांगतो. पुढच्या खेपेस त्याची परतफेड हवीच ! ......... रच्याकने, तुम्ही मनी हाईस्ट चा विषय काढलाच आहे तर त्या संदर्भातील माझा एक लेख इथे वाचता येईल : https://www.misalpav.com/node/43940 ही मालिका आणि मदारी चित्रपट यांच्यावर एकत्रित असा तो लेख आहे. या मालिकेचे पहिले दोन मोसम मी पाहिले. नंतर नेटफिक्सला कौटुंबिक रामराम झाल्यामुळे पुढचे पहायला मुकलो. पण हरकत नाही. शेवटच्या मोसमामध्ये शेवटी काय झाले ,(टोकियो सगळी गोष्ट सांगायला जिवंत राहणार हे तर उघड आहे) ते तुमच्याकडून कळले तरी पोट भरल्यासारखे वाटेल !
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Fri, 09/03/2021 - 15:59 नवीन
शेवटच्या मोसमामध्ये शेवटी काय झाले ,(टोकियो सगळी गोष्ट सांगायला जिवंत राहणार हे तर उघड आहे) ते तुमच्याकडून कळले तरी पोट भरल्यासारखे वाटेल !
शेवटचा मोसम १० भागांचा आहे त्यातील निम्मे भाग आज प्रदर्शित झाले निम्मे बहुदा डिसेंबर मधे होतील म्हणजेच अजून शेवट झालेला नाही... :) वाट पहायची. बाकी थोडे काही जरी बोललो तर आपोआप स्पोयलर बनेल इतकी रोचकता या सिजन मध्ये आहे, पुढे मागे हा शो बघणारच नसाल तर तुमच्यासाठी रोचक गोष्टी व्यनीत आत्ताच सांगेन... तशाही या आठवडाभरात कथेवर जालावर सर्वत्र अनेक चर्चा होतीलच त्यामूळे गोपनीय तर जास्त वेळ काहिच असणार नाही :)
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 09/03/2021 - 16:05 नवीन
जरूर ! आभार
  • Log in or register to post comments
ग
गुल्लू दादा Fri, 09/03/2021 - 14:01 नवीन
+1
  • Log in or register to post comments
र
रंगीला रतन Fri, 09/03/2021 - 15:04 नवीन
पहिल्या डावात एक उत्तर देता आले होते, या डावात शुन्यावर बाद :-)
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Tue, 09/07/2021 - 03:12 नवीन
वेगळा, अभिनव खेळ. मजा आली. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 09/07/2021 - 18:02 नवीन
आगामी: मिपा गंमतगूढ (३) : नाती गुंतागुंतीची हा भाग लिहून तयार आहे. तो उद्या परवा उरकून घ्यायचा की श्रीगलेमा संपल्यानंतर आरामात पुढच्या महिन्यात घ्यायचा हे वाचकांनी सांगावे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 11 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 11 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 11 hours ago
  • सुंदर !!
    1 day 11 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 12 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा