आंतरराष्ट्रीय करार आणि व्यापार विषयक घडामोडी
आंतरराष्ट्रीय करार आणि व्यापार विषयक घडामोडींच्या नोंदींसाठी हा धागा तयार करत आहे. विवीध आंतरराष्ट्रीय करार आणि त्यांचे परिणाम त्यातले राजकारण शह काटशह यांचे विवेचन आणि चर्चा येथे करता येतील. रस असल्यास जिज्ञासूंनी जागतिकीकरणाची कहाणी हे भाग जरूर वाचावेत.
🗣 चर्चा
(159)
ग
गॉडजिला
Sat, 09/04/2021 - 19:54
नवीन
मी फक्त तुमचे महान अभ्यासु प्रतिसाद वाचुन आम्हाला आमच्याबद्दल काय वाटते ते विशद केलयं.
परत एक्दा सॉरि जर का तुम्हाला मी तुमचे प्रतिसाद तिसरी चौथितील मुलाच्या बुध्दीने दिले आसतात असे मी म्हटलो असं वाटत असेल तर तुम्ही तसे आजिबात वाटुन घेउ नका व जसे आहात तसेच लिहीत रहा खुप छान वाटते ते वाचुन. का वाटते तेन्वर स्पश्ट केले आहेच.
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Sun, 09/05/2021 - 08:01
नवीन
तुमचा हेतू तसा नाही पण तुमचा स्वभाव तसा बनला आहे असे वाटते.
म्हणजे एखादी गोष्ट, घटना किंवा प्रतिसाद जेव्हां तुमच्या समोर येतो तेव्हां त्यात काही सकारात्मक असते तर काही नकारात्मक असते. पण त्यातील नकारात्मक तुमच्या झटकन लक्षात येते. खरतर ही गोष्ट चांगली समजली पाहिजे. लूपहोल्स मिटवायला याचा खूप उपयोग होतो. निंदकाचे घर असावे शेजारी असं म्हटलं जातं ते यासाठीच.
पण
काहीवेळेस तुमच्या या स्वभावाचा अतिरेकही होतो. तुमच्या या स्वभावात तुमच्या राजकीय मतांची भर पडलीय. त्यामुळे तर आणखीच गंमत येतीय. निंदा कोणालाच आवडत नाही. त्यामुळेच तुमच्या प्रतिसादांमुळे मिपावर संतोषी होणारे खूप कमी असावेत या शक्यतेनुसार असंतोष हा शब्द वापरला.
हा धागा, धागाकर्त्याने भारताबद्दल काही तरी सकारात्मक वाचायला मिळावे यासाठी काढला असावा असा माझा अंदाज आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी मराठी माध्यमातून बर्याच वेळेस जे वाचायला मिळत नाही किंवा खूप उशीराने वाचायला मिळते ते येथे लवकर वाचायला मिळू शकेल या हेतूने सभासद इथे येत असावेत असे मला वाटते. त्यामुळे तुमचे प्रतिसाद लोकांना फारच खटकत असावेत, कारण प्रयत्न करूनही त्यात कोणतीही आंतरराष्ट्रीय घडामोड सापडत नाही. सकारात्मकता सापडत नाही.
त्यामुळे तुम्हालां "मिपावरील असंतोषाचे जनक" अशी उपमा दिली.
पण मला काही तुमचा त्रास नाही. मी तुमचे प्रतिसाद शांतपणे वाचू शकतो किंवा टाळू शकतो.
असो.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Sun, 09/05/2021 - 08:22
नवीन
पण माझ्या लक्षात आले नाही ते दाखवून दिल्या बद्द्ल आभार.येथून पुढे काळजी घेतली जाईल.
- Log in or register to post comments
ग
गॉडजिला
Sun, 09/05/2021 - 08:58
नवीन
Please don't do that dear, don't change your writing style its fun...its priceless... Please be yourself... stay yourself.
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Sun, 09/05/2021 - 13:46
नवीन
खरंच घ्या
मुळ धाग्याच्या विषयांप्रमाणे तरी लिहा हो
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 09/02/2021 - 14:38
नवीन
फेसबुकवर, ट्विटरवर एखाद्याला ब्लॉक केले की आपल्या पोस्ट त्याला दिसत नाहीत व त्याच्या पोस्ट आपल्याला दिसत नाहीत.
असे काहीतरी मिपावर करण्याची सुविधा हवी.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
गुरुवार, 09/02/2021 - 17:32
नवीन
बाकी मुद्धये चुकीचे आहेत असे वाटत नाही.
मेडिकल कॉलेज लोकसंख्येचे मानाने कमी आहेत.
अतिशय हुशार मुलांना पण मेडिकल ला प्रवेश मिळत नाही.परत प्रतेक राज्यात अतिशय व्यस्त प्रमाण आहे.
खासगी कॉलेज ची फी प्रचंड असल्या मुळे प्रवेश नाही.
सरकारी कॉलेज कमी असल्या मुळे तिकडे प्रवेश नाही.
आयआयटी ची संख्या पण कमी आहे.
आणि प्रवेश परीक्षा ची तयारी करणाऱ्या क्लास ची फीस लाखो रुपये आहे.
सरकार नी ह्याला प्राध्यान्य दिले पाहिजे होते.
देशातील बुद्धिमान मुलांना संधी मिळत नाही.
ह्या समस्या चुकीच्या आहेत असे वाटत असेल तर माझ्या पोस्ट वर टीका जरूर करावी.
- Log in or register to post comments
ग
गुल्लू दादा
गुरुवार, 09/02/2021 - 17:44
नवीन
एक सांगा ना इतकी स्पर्धा आहे मग त्यातून निवड होऊन कमी हुशार डॉ बनत असतील हा तर्क कसा लावला तुम्ही. बाकी डॉ ची संख्या लोकसंख्येच्या मनाने कमी आहे मान्य. कॉलेज कमी आहेत हे पण मान्य. एकतर मेहनत करण्याची तयारी हवी (बुद्धिमत्ता) किंवा बापाकडे चिक्कार पैसा हवा.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
गुरुवार, 09/02/2021 - 18:01
नवीन
ज्या मुलांची मेडिकल चा अभ्यासक्रम सहज पूर्ण करण्याची उत्तम कुवत आहे अशा लाखो मुलांना संधीच मिळत नाही.
आणि ह्या मुलांमध्ये च उत्तम डॉक्टर आहेत आपण ते गमावत आहोत
हा पॉइंट आहे.
- Log in or register to post comments
ॲ
ॲबसेंट माइंडेड…
गुरुवार, 09/02/2021 - 18:34
नवीन
तुमचा पॉइंट बरोबर धरला तर मी पण अशा लाखो मुलांपैकि एक आहे असे समजा. माझी डिग्री विचारणार नसलात तर तुमच्या आजाराबाबत खात्रिने सांगु शकतो २०२९ पर्यन्त तो बरा होण्यची शक्यता नाही. २०२४ च्या पहिल्या तिमाहीत तो आणखिन बळावेल. जुन महिना तुमच्यासाठी अधिक धोकादयक ठरु शकतो त्या महिन्यात जास्त काळजी घ्यावी लागेल. तोपर्यन्त शक्यतो आराम करा आणि चा॑गला नसला तरी डॉक्टर कडुनच औषध घ्या, कंपाउंडर कडुन घेउ नका. अन्यथा असे म्हणावे लागेल-आपको दवा की नहि दुवा कि जरुरत है|
एका डिग्री मिळवण्या पासुन वंचित राहिलेल्या उत्तम डॉक्टरचा सल्ला तुम्ही ऐकाल अशी आशा ठेवतो.
- Log in or register to post comments
र
रंगीला रतन
Fri, 09/03/2021 - 14:56
नवीन
काही उपयोग होणार नाही. हि केस हाताबाहेर गेलेली आहे.
त्यांना ignore मारणे आपल्या प्रक्रुतिसाठी चांगले.
- Log in or register to post comments
ॲ
ॲबसेंट माइंडेड…
गुरुवार, 09/02/2021 - 17:46
नवीन
पुन्हा विषयाशी संबंधित नसलेला प्रतिसाद देउन दुसरी चुक केलीत. तुम्हाला काहि दिवस आरामाची सक्त गरज आहे.
- Log in or register to post comments
क
कंजूस
Fri, 09/03/2021 - 02:38
नवीन
"तुमचं म्हणणं बरोबर आहे पण थोडक्यात सांगा"
" तुमचं म्हणणं योग्य खिडकीवर सांगा."
- Log in or register to post comments
स
सुक्या
गुरुवार, 09/02/2021 - 18:51
नवीन
तैवान च्या विस्ट्रोन कोर्प या कंपणीने भारतातील ओप्टीएमुस एलेक्ट्रोनिक्स या कंपणीबरोबर भारतात मोबाइल व ईतर संगणकाचे सुटे भाग बनवण्यासाठी करार केला आहे. यात दोन्ही कंपण्या भारतात स्मार्ट फोन बनवण्यासाठी जोईंट हब स्थापित करणार आहेत.
या करारानुसार विस्ट्रोन पुढील ३ ते ५ वर्षात भारतात २०० मिलियन डॉलर ची गुंतवणुक करणार आहे.
https://www.livemint.com/technology/tech-news/make-in-india-iphone-supplier-announces-big-expansion-of-india-business-11629794890781.html
- Log in or register to post comments
न
निनाद
Fri, 09/03/2021 - 02:16
नवीन
चांगला निर्णय आहे - हा प्रकल्प बहुदा उ प्र मध्ये असणार आहे.
- Log in or register to post comments
र
रावसाहेब चिंगभूतकर
Fri, 09/03/2021 - 05:39
नवीन
भारताला सध्या मोबाईल फोन, टॅब्लेटस पेक्षा जास्त चिप मॅन्युफॅक्टअरिंग कंपनी ची गरज आहे. त्या साठी आपण तैवान आणि चीन किंवा मग अमेरिकेवर वर अवलंबून आहोत. मिलिटरी infrastructure मध्ये वापरल्या जाणाऱ्या चिप्स भारताला स्वतः बनवाव्या लागतील आणि ते तंत्रज्ञान अतिशय niche आहे.
- Log in or register to post comments
न
निनाद
Fri, 09/03/2021 - 05:48
नवीन
सहमत आहे. प्रामुख्याने काउंटर ड्रोन सोल्यूशन्स, लिथियम-आयन बॅटरी, मायक्रोवेव्ह सेमीकंडक्टर आणि एआय सिस्टीम सारख्या तंत्रज्प्रामुख्यानेकरतांना याचा उपयोग फार मोठा आहे.
- Log in or register to post comments
ब
बापूसाहेब
Fri, 09/03/2021 - 07:53
नवीन
सहमत. भारतात चीप डिझाईन आणि development क्षेत्रात काहीच नवीन होताना दिसत नाही. भारतातले इले्ट्रॉनिक्स इंजिनिअर देखील शिक्षण झाल्यावर IT हमाली करण्यात धन्यता मानतात.
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Sat, 09/04/2021 - 20:10
नवीन
इले्ट्रॉनिक्स इंजिनिअरसाठी IT हमाली करायच्।इ नसेल तर इतर काय पर्याय आहेत?
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Sat, 09/04/2021 - 20:25
नवीन
मग आयटी वाले अजुन काय वेगळे करतात .इन्फोसिस चे chairman नी स्पष्ट पण हेच वाक्य बोलले होते भारतीय आयटी professional अमेरिकेत बोद्धिक हमाली च करतात.
इतके उच्च शिक्षित भारतात असून सुद्धा नवं नवीन सॉफ्टवेअर ,नवीन technology, ची निर्मिती भारतात जगा पेक्षा अगोदर आणि उत्तम दर्जा ची का निर्माण होत नाही.
Outsource कामावर किती दिवस काढणार.
अगदी मराठी मध्ये किंवा इतर भारतीय भाषेत टाईप करण्याची सुविधा पण विदेशी लोकांनीच निर्माण केली आहे असे वाचनात आहे.
चुकीचे असेल पण असा माझा तरी समज आहे.
नवीन निर्माण झालेल्या आयटी क्षेत्रात भारतीय लोकांना अमेरिका किंवा बाकी देशांनी योग्यता पेक्षा जास्त पगार देवून त्यांना कुचकामी केले.
सर्व भारत सोडून दोन चार लाखांच्या नोकऱ्या करू लागले.
ही हमाली तेव्हा केली नसती आणि भारत सरकार नी त्या हुशार लोकांना थोडा सपोर्ट केला असता तर भारत आज आयटी क्षेत्रात अग्रेसर असता.
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
Sun, 09/05/2021 - 12:26
नवीन
स्वतः इन्फोसिस ने Outsource व्यतरिक्त, नवीन सॉफ्टवेअर ,नवीन technology, ची निर्मिती भारतात जगा पेक्षा अगोदर आणि उत्तम दर्जा ची निर्माण होण्यासाठी काय केले आहे
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 09/05/2021 - 14:41
नवीन
इन्फोसिसचे प्रॉडक्ट्स कमी असले तरी त्यांनी Finale हे अनेक देशात शेकडो इन्स्टॉलेशन्स असलेले खूप चांगले core banking product तयार केले आहे. याव्यतिरिक्त त्यांची अजून काही उत्पादने आहेत. संगणकीकृत सेवा हा मुख्य व्यवसाय असल्याने अर्थातच उत्पादने करण्याऐवजी सेवाक्षेत्रावर जास्त भर आहे.
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Sun, 09/05/2021 - 12:59
नवीन
इतके उच्च शिक्षित भारतात असून सुद्धा नवं नवीन सॉफ्टवेअर ,नवीन technology, ची निर्मिती भारतात जगा पेक्षा अगोदर आणि उत्तम दर्जा ची का निर्माण होत नाही.
अगदी मनातील बोललात पण हे लक्षात घ्या कि पाणी जसे सगळ्यात सोप्या वाटेने प्रवास करते तसे हे काहीसे आहे
संगणक क्षेत्रात भारताला नैसर्गिक फायदे होते आणि त्याचा भारताने फायदा भारताने घेतला त्यात चूक नाही
- इंग्रजी भाषिक हुशार .कामगार फौज
- उतपादन कार्यामागची कटकट नाही
- गणित आणि तर्क यात मुरलेला समाज
मग सर्वात सोपे काय तर हमाली दर्जाचे काम घ्या = सगळेच आनंदी
आता यातून जी "माया" कमावली आहे ती वपरून मात्र आत्तापर्यंत भारतीय उद्योगांनी निदान आय टी क्षेत्रात तरी "हे जगप्रसिद्ध भारतीय उत्पादन " आणायला पाहिजे होते हे खरे
"निदान आय टी" असे म्हनल कारण कि आय टी कि जिथे इतर उत्पादनासाठीचे प्रचंड भांडवल लागत नाही तिथे तरी हि अपॆक्षा रास्त आहे
इतर सत्रात आधी संशोधनावर आणि पुढे विपानावर खूप खर्च करावा लागतो ती भरतोय कंपन्यांना कर्यायाचे नसते
अहो श्रीलंकेचा "दिलमाँ" चहा येथे जाहिरात करते पण भारतीय चहा काहीही जाहिरातीवर खर्च करीत नाही .. लिप्टन ला पुरवठा करण्यात धन्यता
- Log in or register to post comments
ग
गॉडजिला
Sun, 09/05/2021 - 18:06
नवीन
तेंव्हा काळाच्या पुढील प्रोडक्ट होटमेल जे मायक्रोसॉफ्ट ने विकत घेतले जे भारतीयाने तयार केले होते पणं तो भारतीय एक्स ऍपल एम्प्लॉइ होता... आणि उत्पादन भरतात तयार झाले नाही कारण ती पोषक इको सिस्टीम भारतात उपलब्ध न्हवती... म्हणजेच गुणवत्ता ही फक्त एक बाजू झाली एकोसिस्टीम असणे ही दुसरी बाजू होय... भारतात ती नाही व ती तयार करायची मानसिकता देखील नाही...
मागून येऊन पुढं जाणाऱ्या कम्युनिस्ट चीनमधे देखील ती आहे म्हणूनच चायनीज ॲप ban होई पर्यंत प्ले स्टोअर वरिल काही मोजकी ॲप सोडली तर सर्व मोस्ट डाऊनलोड ॲप (भारतातही) ही चायनीज ॲप होती
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Mon, 09/06/2021 - 01:12
नवीन
उत्पादन भरतात तयार झाले नाही कारण ती पोषक इको सिस्टीम भारतात उपलब्ध न्हवती... म्हणजेच गुणवत्ता ही फक्त एक बाजू झाली एकोसिस्टीम असणे ही दुसरी बाजू होय... भारतात ती नाही व ती तयार करायची मानसिकता देखील नाही...
हे पटले...
त्याच बरोबर हे हि म्हणता येईल कि "गरज हि शोधाची जननी असते "
उदाहरण द्यायचे तर
- बार कोड हा भारतात अस्तित्वात नवहता आणि अजूनही बऱ्याच उत्पादांन्वर नसला तरी चालतो .. त्याची गरज वेळ वाचवन्याची होती म्हणून पाश्चिमात्य देशात त्याचा शोध लागला कारण ताशी कामगाराचा दर जास्त उलट भारतात ताशी दर कमी मग कशाला ?
- विटांचे पॅलेट पॅकिंग .. आणि पॅलेट जॅक ट्रॉली किंवा फोर्कलिफ्ट अगदी छोट्या उद्योगात सुद्धा वापरतात कारण गरज मालाची ने आन झटपट आणि सोपी झाली पाहिजे .. भारतात विटा ट्रक मध्ये भरणे आणि त्या उतरवणे यात ४ मजूर उपलब्ध असतात
पण "गरज नाही " हे कारण किती दिवस देत राहणार.. इन्फोसिस कडे प्रचंड पैसे , न्यान आहे त्यांचे एक तरी जगभर नावाजलेले प्रोडक्त्त आहे का?
जसे कि सॅप सुरु झाले जर्मनीतून, काम्पुटर एडेड डिझऐन मधील "कटिया " सुरु झाले फ्रांस मधून ,
सगळे काही सिलिकॉन व्हॅली तुन सुरु झाले नाही
रेसमेड आणि कॉक्लिएअर हि व्यद्यकीय उपकरणे सुरु झाली ऑस्ट्रेलयातून
न्यू झीलंड सारखा छोटा देश फिशर अँड पायकेल सारखे उच्च दर्जाचे वॉशिंग मशीन बनवतो .. फक्त ६० लाख लोकसंखय देशाची काय गरज होती शोध लावण्याची ... सरळ अमेरिकेतून आयात कार्यायाचे ना
इनोवेशन साठी उद्योग आणि सरकार ने प्रोत्सहन दिले पाहिजे आणि इनोवेशन म्हणजे फक्त MOBILE AP बनवणे नव्हे
- Log in or register to post comments
ग
गॉडजिला
Mon, 09/06/2021 - 04:42
नवीन
म्हणजेच कोणत्याही स्थितीत काम चालवणे.
भारताची मानसिकता जुगाडू आहे... म्हणजे आहे त्या संसाधनात काम बसवणे. ही फार मोठी जमेची बाजु आहे जेंव्हा तुम्ही सेवा देता आणि फार मोठा अडसरही जेंव्हा तुम्ही इनोव्हेटिव्ह उत्पादन बनवता. इनोवेशन जुगाड वापरून होऊ शकते पण इकोसिस्टीम जुगाडू मानसिकता असणारे उभे करू शकत नाहीत.
मोबाइल ॲप उपरोध म्हणून घ्या व आता सांगा बरे तुम्ही असे किती प्रोडक्ट वापरता जे मेड इन चायना नाहीत :)
कधी काळी चायनीज मोबाईल म्हंटले की चार चौघात लाज घालवणारे प्रकरण होते आता चायनीज मोबाईल कंपन्या आयपिएल पुरस्कृत करतात... एकोसिस्टीम.
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Mon, 09/06/2021 - 06:26
नवीन
माझ्या म्हणण्याचा अर्थ असा होता कि बरेचदा फ्याड म्हणून इनोव्हेशन हब म्हणजे फिनतटेक नावाखाली ऍप बनवले आणि त्यातून करोडो कमावले असे स्वपन नुसते लोकांना दिसत असते .. सगळे प्रश्न काही ऍप बनवून सुटणार नाहीत इनोव्हेशन सर्व क्षेत्रात लागेल तेव्हा प्रगती होईल मग ते पाणी शुद्धीकरण असो किंवा विवाद्यकीय उपकरण असो कि रोबो इन्वेस्टींग किंवा मत्स्यशेती
असो "इकोसिस्टीम जुगाडू मानसिकता असणारे उभे करू शकत नाहीत.
या विधनाशी सहमत
टाटा च्या टाटा एलेक्सि नावाचं बंगळूर येथे जे काही संशोधनाचे काम चालते ती जागतिक ग्राहकांसाठी कधी टाटा सारख्या बलाढ्य उद्योगाला हे का वाटले नाही कि फक्त भारतीय बाजारपेठे साठी एखादी गोष्ट ना बनवता आपलं ठसा जगभर होईल असे उत्पादन काढावे ?
आज कोरियन गाड्या ऑस्ट्रलिया सारखी छोटी बाजारपेठ काबीज करू शकतात तर महिंद्र किंवा टाटा ला का नाही करता येत
आता सांगा बरे तुम्ही असे किती प्रोडक्ट वापरता जे मेड इन चायना नाहीत
माझ्य देशात तर उपाय च नाही बहुतेक बाहेरूनच येते
भारतात तुम्ही निदान अभिमानाने हे म्हणू शकता कि काही गोष्टी तरी भारतीय बनावटीच्या आहेत
- Log in or register to post comments
ग
गॉडजिला
Mon, 09/06/2021 - 09:13
नवीन
सगळे प्रश्न सोडावायच्या मागे का धावता ? जे सुटतिल ते सोडवा कि. फ्याड म्हणुन इनोवेशन होत नसतेच…
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Tue, 09/07/2021 - 01:21
नवीन
मला काही कळले नाही ,, कोण सगळे प्रश्न सोडवयायाला निघालाय ? मी?
काही वर्ष स्टार्ट अप नामक "फ्याड" मध्ये काय चाललंय ते पाहून मग लिहितो .. काही खरंच उत्साहवर्धक असते , नावीन्यपूर्ण असता ,, काही नुसती हवा असते.. म्हणून फ्याड म्हणले
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Mon, 09/06/2021 - 06:27
नवीन
इनोवेशन जुगाड वापरून होऊ शकते
बर कळला तर्क पण प्रत्यक्षात तसे तरी भारताने किती केलाय?
मूळ संशोधन हे हि लागते
- Log in or register to post comments
ग
गॉडजिला
Mon, 09/06/2021 - 09:17
नवीन
सर्व मूळ संशोधन हे हिते घडेलच असे नाहि… आपलि इन्डस्ट्रि बर्याच बाबिंवर अवलंबुन आहे…. तुलनेने अॅप बनवायला फार डोके देखिल लागत नाहि म्हनुन ते आपण करु शकतो गरज आहे याला फ्याड न समजण्याची…
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Tue, 09/07/2021 - 01:39
नवीन
फार डोके देखिल लागत नाहि म्हनुन ते आपण करु शकतो गरज
डोकं लागत असणार... लागत नसेल ते फारसे भांडवल ( म्हणजे नवीन तवे बनवण्याची किंवा चष्मे बनवणायचा ब्रँड काढायचा तर किती भांडवल लागेल त्या अर्थाने )
गरज आहे आहे याला फ्याड न समजण्याची…
मग मी फ्याड का म्हणले... उदाह्रणसकट सांगतो कारण यात बरेचदा उगाचच हवा असते... म्हणजे नकटीवरील नवीन वडा पाव टपरी ला "फुडटेक बिझिनेस " म्हण णे असली तो "हवा"
तर उदाहरण
- येथे निवृत्ती साठी जे फंड असतात ( मिळकतीचे १०% सक्तीचे बचत म्हणून यात टाकावे लागते ) ते फंड हे खाजगी उद्योग चालवतात , म्युच्युअल फंड सारखेच पण जास्त कडक नियंत्रणाखाली आणि कोण्ही पगारी किंवा उद्योजक यात गुंतवू शकतो यांना सुपर फंड असे संबोधले जाते
फिनटेक क्षेत्रात :
तर " मिलिनिअम" ला आकर्षित करण्यासाठी एक भन्नाट आम्ही बनवले त्यात " ऑनबोर्डिंग किती सहज आणि सेकशी आहे " म्हणून तुम्ही आमच्य्याच सुपर फंड चे सभासद व्हा अशी ती जाहिरात
हा फंड तास साधा होता इतर अनेक बुजुर्ग फुंडांप्रमाणेच विशेष काही जादू नवहती
प्रश्न हा होता कि कितीतरी जाणकार गुंतवणूक दरांनी याकडे बघितले आणि एक मूलभूत प्रश्न विचारला " सेक्सी ऑनबोर्डिंग वैगरे बाजूल ठेवा हो आधी हे सांगा कि तुमची मानजेमेंट फी येवदही जास्त का ? शेताची तुम्ही जी सेवा देताय ती इतर फुंदांपेक्षा काह्ही वेगळी नाहीये .. उगाचच फिनतेक म्हणून काय वाट्टेल ते दावे करू नका
इनोव्हेशन हब हे जरुरीचे असले तरी ते खरे तर "रियल इस्टेट बिझिनेस आहेत " उगाच त्याला वेगळे काहीतरी भारी असले संबोधने याला फ्याड म्हणतो ( मॅक्डोनाल्ड हि एक पदार्थ बनवणारी कंपनी नसून हा एक रिअल ईस्टेट धंदा आहे हि कल्पना ऐकली आहेत का तसेच )
स्टार्ट उप म्हणजे काय तर "नवीन उद्योग".. कि जो अनंत काळापासून चालू आहे , उगाच नवीन नाव दिले कि काहीतरी भारी असे होत नाही
आर्थिक धोका हा तोच असतो त्यात गुंतवणूक करणाऱ्यांना
- Log in or register to post comments
ग
गॉडजिला
Tue, 09/07/2021 - 02:10
नवीन
सपशेल चुक..
स्टार्टप म्हणजे एखादी गोष्ट करायचा नवा मार्ग. स्टार्टप म्हणजे एखादी अथवा चार लोक अशा निष्कर्शावर पोचणे की यापुढे हि गोश्ट जगात अशा पध्दतीने होइल… म्हणजे एमेल तयार झाली लेखी पत्रे कमी झाली तारा बंद झाल्या… व्हट्सअप आले इमेल कमी झाल्या….
स्टार्टप इज रेवोल्युशन ब्रो…
नवीन धंदा सुरु करणे म्हणजेच स्टर्टप म्हणने हीच ती जुगाडु सडकी भारतीय मानसीकता…
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Tue, 09/07/2021 - 07:09
नवीन
ब्रो… मला स्टार्टप म्हणजे काय ते माहित आहे भाऊ मी येथे त्यात सतत भाग घेत असतो कोण काय सादर करताय , काय बिझिनेस कल्पना आहेत आणि मी असे म्हणत नाही कि प्रत्येक कल्पना म्हणजे नुसती हवा असते किंवा उगाच जुन्यकाह कल्पनेला उजाळा दिलेला असतो मी फक्त म्हणतोय कि त्याची "काही" कल्पना खरंच हवा असतात , मी सविस्तर उदाहरण रिटायरमेंट फंड चे फिनतेक मधील पुनर्जीवन या बद्दल लिहिले.. लक्षात घ्या जरा
- Log in or register to post comments
ग
गॉडजिला
Tue, 09/07/2021 - 07:15
नवीन
सर्व काही माहित आहे तर नेमकी तक्रार "काही" कल्पना खरंच हवा असतात इतकीच कशी काय आहे होलिस्टिक विधान नको का ?
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Tue, 09/07/2021 - 08:49
नवीन
क्षमा पण कळत नाहीये तुम्ही काय म्हणताय .. मी सग्ळ्यांनाचाच "हवा" म्हणले असे माझ्य विधानातून सूचित होत असेल तर ती माझी चूक
मी अश्या अनेक स्टार्ट पीच ला जेवहा जातो ( शार्क टॅंक ऑडियन्स) तेव्हा एक गुंतवणूक दार म्हणून बघत असतो.. उगाच भारावून वगैरे ना जाता म्हणून कदाचित जरा कठोर पने मांडले असेल,,, तिथे असे गुलाबी चष्मे लावून आलेलं बरेच दिसतात .. आणि एक प्रकारची कल्ट विचारसरणी कधी कधी दिसते
दुसरे असे कि स्टार्ट अप म्हणजे जणू काही फक्त मोबाइल डिवाइस आप बनवणे असे बरेच जणांना वाटते
आमूलाग्र बदल करणारे उद्योग फार कमी ...
असो या विषयात उर्सुक्ता असेल तर हे काही जुने कार्यक्रम पहा ( स्टार्ट अप हे नाव त्यावेळेस प्रचलित नवहते )
https://www.youtube.com/watch?v=FUnbqoxRRVk
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Tue, 09/07/2021 - 08:55
नवीन
तुम्ही सांगीतलेली व्याख्या तांत्रिक दृष्टया बरोअबर असले पण उगाच "जुगाडु सडकी भारतीय मानसीकता: हे लेबल मला कशाला लावताय.. मी फक्त यातील कधी कधी दिसणारा फोल पणा दाखवून दिला एवढेच ,, शार्क टॅंक / इनोवेशषन हब चा मी भोक्ता आहे राव
- Log in or register to post comments
ग
गॉडजिला
Tue, 09/07/2021 - 17:19
नवीन
:) तूम्ही भोक्ते आहात ही बाब फार रोचक आहे दुर्दैवाने ते विधान फक्त तुम्हास उद्देशून न्हवे तर स्टार्टअप सुरू करणे म्हणजे नवीन धंदा सुरू करणे हा विचार करणाऱ्या अथवा मांडणाऱ्या प्रत्येकासाठी आहे... स्टार्टअप कीतीही क्षुल्लक असली तरीती एक इंडिपेंडंट क्रांती आहे आशा क्रांत्या घडतात म्हणूनच सिलिकॉन व्हॅली अस्तित्वात आहे...
जूगाडू सडकी मनोवृत्ती हे ना पचवू शकते ना आकलन करु शकते. आज आयआयटी सोडली तर कुठेही स्टार्टअप बाबत व्यवस्थित जागरूकता नाही आणि आयआयटी चे लोकं किती हवेत असतात हे तर सर्वांना माहित त्यामूळे हे क्रांतिकारी तर नक्किच नाहीत... यांना फक्त रिसोर्स सहज उपलब्ध आहेत इतकेच. आजही भारतात तूम्ही ई-कॉमर्स अथवा सोशल नेटवर्क अशी दोन प्रोडक्ट्स घेउन गेलात तर funding हे ecommerce लाच मिळेल.
मोदींनी स्टार्टअप योजना सुरू केली खरी पण त्यापूर्वी स्टार्टअप म्हणजे काय याबाबत कोणतीही जागृती केलेली नाही... मग सगळे पैशाच्या मागे पळून प्रत्यक्षात हाती काय उरणार ?
एक मोबाईल ॲप आख्खे जग जितक्या लवकर बदलू शकते तसे मेकॅनिकल प्रोडक्ट बाबत चटकन होत नाही म्हणूनच महिती तंत्रज्ञनातील क्रांति ही फार चांगली असते आणि भारतात तेच होत नाही...
(हा प्रतिसादही तुम्हाला उड्डेशून नाही तर आपल्याशी चर्चा करता करता जे मुद्दे/विचार निघाले त्याअनुषगाने कोणी विचार करत असेल तर त्यासाठी आहे.)
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
गुरुवार, 09/09/2021 - 06:46
नवीन
एक मोबाईल ॲप आख्खे जग जितक्या लवकर बदलू शकते तसे मेकॅनिकल प्रोडक्ट बाबत चटकन होत नाही म्हणूनच महिती तंत्रज्ञनातील क्रांति ही फार चांगली असते आणि भारतात तेच होत नाही...
हो अगदी बरोबर आणि तेच तर दुर्दैव आहे
बर मी जे "हवा स्टार्ट उप बद्दल म्हणालो त्यात खूप गंभीरता होती उदाहरण देतो
मुद्दा हा आहे कि सगळी कडे हे दोन पार्वती चे शब्द वापरून ग्राहकाला आणि गुंतवणुकीदारांना आणि रेग्युलेटर ना फसविले तर जात नाही ना ...
१) फिनतेक मध्ये
आमूलाग्र बदल आहे म्हणून रेगुलेशन नको असे बरेच कॅरॅपतो एक्सचेंज वाल्यांचे टुमणे ,होते त्या हवेत अनेक लोक भुलले
, पण शेवटी तो पैसा आहे कमावलेली सपंथी आहे .. जसे नवीन ट्रेडिंग एक्सचानेज उघडायचे तर केवढी मोठी कुस्ती असते सरकारशी आणि शी पण त्यालाच नवीन क्रिप्टो फिनतेक हे नाव देऊन आम्हाला असेल नियम लावू नका असे ह्यांचे म्हणणे .. अरे पण शेवटी तुम्ही जे उभे करताय ते एक आर्थिक उलाढालीचे केंद्र आहे ना मग त्यावर देखरेख का नको ? ( हा विषय गुंतागुंतीचा आहे पण मूळ मुद्दा हाच कि नाव गोंडस देऊन फरक पडत नाही
२) मेड टेक :
चांगले उद्धरण : पॅथॉलॉजि लॅब मध्ये पेट्री डिश मधील वाढ्लेलाय जिवाणूंचे पृथकारां करण्यातील यांत्रिकरण
https://www.philips.com/a-w/about/news/archive/blogs/innovation-matters/examining-digital-pathologys-increasingly-important-role-in-care.html
बेकार उदाहरण : दिवस शेवटी ( AT THE END OF THE DAY ) आपण एक जीवाशी खेळणारी महत्वपूर्ण अशी सेवा देतोय हे लक्षात ना घेत आत्याचे सिलिओन व्हॅली तीळ हवा भरणे आणि लोकांना गंडवणे याचे उत्तम उद्धरण "थेरानोस " ७ बिलं डॉलर चा खेळ आणि धोका पहा जरूर
https://www.youtube.com/watch?v=-kbja1EI1kQ
https://www.youtube.com/watch?v=BgNfrDXr7uA
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
गुरुवार, 09/09/2021 - 06:56
नवीन
दोन पार्वती - दोन परवलीचे
कॅरॅपतो एक्सचेंज - क्रीप्टो क्सचेन्ज
सरकारशी आणि शी पण - सरकारशी आणि sebi INDIA / sec USA
- Log in or register to post comments
र
राघव
Mon, 09/06/2021 - 08:18
नवीन
जुगाड म्हणजे जोवर मूळ अडचणीवर योग्य उपाय सापडत नाही, तोवर काम चालवण्यासाठी केलेला तात्पुरता उपाय. पण बर्याचदा योग्य उपाय मिळेपर्यंत कधी कधी इतका वेळ लागतो की तात्पुरता उपायच अंगवळणी पडून जातो. बाकी जुगाड हा मूळ संशोधनाला पर्याय ठरू शकत नाही हे खरे.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Mon, 09/06/2021 - 09:03
नवीन
कमी स्किल असलेल्या लोकांकडून काम करून घेणे हा पण एक प्रकारचा jugad च आहे.
पोलिस डिपार्टमेंट बघा.
Physically फिट, ज्युडो, कराटे ह्या मध्ये तरबेज,हत्यार चालवण्यात अतिशय पटाईत ,आणि तेवढेच संयमी,बुद्धिवान लोक त्या डिपार्टमेंट असली पाहिजेत.
प्रत्यक्षात तसे मनुष्य बळ तिथे आहे का तर नाही.
शालेय जीवनापासून मुलांचे गुण ओळखून त्यांना संधी देत गेले तर अतिशय कुशल मनुष्यबळ सर्वच क्षेत्रात उपलब्ध होईल.
संधी मिळत नाही म्हणून कुवत असून सुद्धा भारत संशोधन क्षेत्रात मागं आहे.
माझ्या स्किल संधी मिळवून दिली जात आहे असे वातावरण जेव्हा निर्माण होईल तेव्हा भारतात.संशोधन,निर्मिती,च नाही तर खेळ ह्या क्षेत्रात पण भारत अग्रेसर होईल.
Engineering collage मध्ये जावून कंपन्या उत्तम मुलांना निवडून त्यांना संधी देतात ही पद्धत खरोखर उत्तम आहे.
त्या मुळे मुल जास्त चांगली कामगिरी करायचा प्रयत्न करतात.
तेच ॲप्लिकेशन,ओळख, अस्या मार्गाने गेले की कुवत असून पण संधी मिळेल ह्याची खात्री कमी असते.
- Log in or register to post comments
स
सुक्या
Mon, 09/06/2021 - 20:25
नवीन
उत्पादन भरतात तयार झाले नाही कारण ती पोषक इको सिस्टीम भारतात उपलब्ध न्हवती
आणी ती अजुनही भारतात नाही , जवळच्या भविष्यातही ती शक्यता खुप कमी आहे. अगदी भरवशाचे ईंटरनेट जियो येईपर्यंत नव्हते. एखादे प्रोडक्ट बनवले तर ते वापरणारा उपभोक्ता असायला हवा. उपभोक्त्याने सुद्धा आपण जे वापरतोय ते काही आभाळातुन पडलेले नाही, ते बनवायला कुणालातरी पैसा लागला आहे म्हणुन मी ते विकत घ्यायला हवे किंवा त्या वापराचे पैसे द्यायला हवे ही मानसिकता भारतीय लोकांमधे नाही. घरोघरी च्या संगणकामधे किती पायरेटेड सोफ्ट्वेयर असतील याची गणना नाही. मग रीटर्न ओन इंनवेस्ट्मेंट कशी मिळणार? घाटे का सौदा कोण करणार?
अगदी दोन साधे उदाहरणे घ्या:
नेट्फ्लिक्स ही कंपणी ओन्लाईन स्ट्रीमींग यायच्या अगोदर घरोघरी सीडी पोचवायची. आपण घरी बसुन ऑर्डर करायची . . दोन दिवसांनी सीडी पोस्टाने घरी . . ७ दिवसांनी तीच सीडी पोस्टाने परत करायची. लोक त्याचे सब्स़्रिपशन घ्यायचे पिक्चर बघायचे पैसे द्यायचे. तेच भारतात काय होत होते ... सीडी तिथेही होत्या पण सार्या पायरेटेड. स्वस्त माल मिळायच्या नादात कसाही म्हणजे अगदी चिपाड क्वालीटी चा पिक्चर फु़कटात बघायचे. वरुन एका सीडी च्या अनेक कोप्या. त्यामुळे रिलायंस ने प्रयत्न केलेले बिग्फ्लिक्स चाललेच नाही. परदेशात मात्र नेट्फ्लिक्स मोठी झाली ... भरभराटीला आली ...
मोदी सरकार ने केलेल्या नोटबंदी मधे नकद मिळत नव्हती तेव्हा अगदी जिवावर आल्यासारखे दुकान्दारांनी डेबीट / क्रेडीट कार्डे घ्यायला सुरुवात केली. पुन्हा तेच. सर्विस घेताय मग त्याचे कमीशन द्यायला नको कां? पण नाही जशी जशी नकद मिळत गेली तशी तशी डेबीट / क्रेडीट कार्डे घ्यायला बंद होत गेली. पर्देशात मात्र square नावाच्या कंपणीने अगदी स्मार्ट फोन वर वापरता येइल असे यंत्र बनवले आनी अगदी भाजीपाला विकणारा शेतकरी डेबीट / क्रेडीट कार्डे पेमेंट म्हंणुन घ्यायला लागला. त्यामुळे स्वाईप मशीन लागतच नाही .. फोन असला की झाले ..
आजही जे शोध मातं क्षेत्रात लागत आहेत (एआय्/क्लाउड) ते शोधणारी अर्धी टीम भारतीय असते. त्यामुळे भारतीय इंजीनियर च्या क्वालीटी वर प्रश्न नाहीच. प्रश्न आहे सपोर्ट चा. भारत देशात संशोधन का होत नाही हे शोधायला हवे.
तोपर्यंत दुसर्याने शोधावे आनी आम्ही ते (फुकट) वापरावे हेच चालु राहील.
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Tue, 09/07/2021 - 01:18
नवीन
सुक्या भारतीय बाजारपेठेपुरते आपले म्हणणे पटले ... पण माझ्या डोक्यात असा प्रश्न आहे कि जे भारतीय बलाढ्य उद्योग आहेत त्यांनी भारताबाहेर उद्योग काबीज करण्यासाठी स्वतःचा ब्रँड निर्माण करण्यासाठी का कष्ट घेतले नाहीत?
असे उद्योग कि ज्यात भारत हा मूळ उत्पादक आहे म्हणजे चहा ! दिलमः चा मालक येथील गोऱ्या समाजात टीव्ही वर आपली अप्लाय श्रीलंकन पद्धतीचं इंग्रजीत ना लाजता जाहिरात करतो तर ती भारतातातील उद्योगाला का नाही जमत?
महिंद्रा येथे ऑस्ट्रेल्यात अनेक वर्षे आहे , टाटा आहे , आणि त्यांनी सुरवात छोटी गावातून केली "युट " मालवाहक आणि काही ट्रॅक्टर विकायला , आता त्यानं ४ वव्हील ड्राईव्ह विकायची पण कोठेही मुख शहरात जाहिरात नाही ... खर्च कार्याला नको ! कोरियन करू शकतात पण भारतीय नाही
स्वयंपाकाची भांडी बनवण्यात भारत माहीर आहे ना , तर जगात नाव असेल असा एक तरी तवा भांडे आहे का?
व्हाईआयपी किती वर्षे बाग बनवते .. पण इतर पाश्चिमात्य देशात निर्यात? नाव?
या दोन उत्पादनात कसे बनवल्याचे हि तर महती हविकणा , TT आणि ब्लो प्लास्ट ल आहे ना ! पण नवीन निर्याती साठी लागणारे संशोधन करायाला नको . जाहिरात खर्च कोण करणार
स्वतः अनुभवलेले : भारतीय नामवंत कुलुपे बनवणारी कंपनी चे चालक इकडे आले , ते अम्हला लागणारी आमचं डेझीने ची कुलुपे बनवून देत होते, त्या दौऱ्यात त्यांचा हेतू असा होता कि त्यांची भारतीय उत्पादने येथे कशी निर्यात करता येतील! .. त्यात सूर असा कि आहे तसे घ्या... असे काही दिसले नाही कि "हा या बाजारात हे चालते का मग हे हे उत्पादन आम्ही बदलू ... "
- Log in or register to post comments
ग
गॉडजिला
Tue, 09/07/2021 - 17:29
नवीन
आपण एकोसिस्टीम भारतीय मानसिकता लक्षात घेउन बनवावी लागेल हे दुर्लक्षित करता आहात आपणं प्रगतिशील राष्ट्र आहोत प्रगत राष्ट्रातील मानसिकता एकदम तयार नाही होऊ शकत...
Netflix इथे बनले नसते हे खरं आहे पण टी- सिरीज इथेच ऊभी राहीली जुनी महागडी वितरण व्यवस्था मोडून...
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
गुरुवार, 09/09/2021 - 06:32
नवीन
एकदम नाही तयार होऊ शकत मान्य आणि खास करून छोट्या उद्योगांची नाही किंवा सरकारी बाबू लोकांनी भरलेल्या विद्यपीठांची पण नाही ( काही अपवाद सोडता )
पण भल्यामोठ्या उद्योणगविषयी बोलतोय ,, आज बिग ५ आयटी या जगातील मोठ्या नावाजलेलंय कंपनी आहेत किंवा टाटा / महिंद्रा आणि गोदरेज सारखेच उत्पादक त्यांच्या विषयी काय ?
सॅप सारखेच भारतीय भारतीय बनावटीचा कार्याला काही फोर्ड मोटार कंपनी एवढी भांडवल लागत नाही ! कि येई आरपी सॉफ्टवेअर साठी कार्दो डॉलर चे प्रोडूकशन युनिट टाकावे लागत नाही ...
फार्म क्षेत्रात सुद्धा तसे असावे ( माहित नाही ) पन ब्रँड EQUITY साठी काही केलं जाते का ?
- Log in or register to post comments
ब
बापूसाहेब
Sun, 09/05/2021 - 08:04
नवीन
?
पर्याय नाही आहेत आणि त्यामुळेच ते it हमाली करण्यात धन्यता मानतात...
पर्याय तयार झाले पाहिजेत.
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Sun, 09/05/2021 - 12:45
नवीन
मुळात ज्या विषयात आपण शिकलो आहोत त्यात पुढे काम ना करणे म्हणजे त्या शिक्षणाचा उपयोग १००% ना करणे असा तर्क आपण काढू शकतो
पण याला सुद्धा दोन बाजू आहेत
१- इले ट्रोनिक उद्योगात तेवढे काम उपलब्ध नसेल तर?
२- इले ट्रोनिक किंवा इतर अभियांत्रिकी शिक्षणात गणित आणि तर्क पद्धतीची जी शिकवण मिळते ती संगणक क्षेत्रात चांगलीच उपयोगी पडते! नाही का? त्यामुळे अगदीच त्याला हमाली का? म्हणता हे कळले नाही ,,,IT मध्ये उत्तम दर्जाचे काम पण भारतात चालत असेल ना? फक्त कोडिंग नाही ? याशिवाय IT मान्यजमेण्ट च्या संध्या ?
दुसरे असे कि इले ट्रोनिक क्षेत्रात सुद्धा मूळ संशोधन किंवा अत्याधुनिक उत्पादन करण्यात संध्याच नसतील तर कदाचित तिथेही हमालीच करावी लागत असेल
साधारणपणे भारतात मूळ संशोधन खूप कमी होते ( आता होत असले कारण बहुराष्ट्रीय उद्योगांचे संशोधन विभाग भारतात आहेत पण मूळ रिसर्च कमीच ) मला आठवतंय मेडिकल डिवाइस क्षेत्रात जर्मन बहुराष्ट्रीय उद्योगाच्या भारतीय शाखेत कधीच मूळ संशोधन केले गेलेले आठवत नाही जर्मन रचनेचे ( ते सुद्धा जुन्य ) भारतीयाकरण करणे एवढेच )
अर्थात आय आय टी अभियांत्रिकी करून मग एम बी ए करून बँकेत फिनॅन्सील कंन स्लटिंग मध्ये काम करणे यात मूळ आय आय टी वॉर सरकारने केलेला खर्च वाया जाणे असेच म्हणावे लागेल .. हा आरोप पूर्वीपासून चालू आहे ( बोड्कीचायांनी शेवटी फिनॅन्सील कंन स्लटिंग मध्ये जायचे तर आय आय टी ची ४ वर्षे तरी का घालवता,, ३ वर्षात बीकॉम करून मग एम बी ए करा १ वर्षी वाचेल आणि सरकारचे पैसे पण )
माझा अंदाज असा आहे कि
भारतात सुरवातीला तरी आयटी उद्योगांना सहजतेने अभियांत्रिकी चाय बऱयापैकी अवघड कार्यक्रमातून गेलेला कामगार वर्ग सहजी मिळाला आणि तेच जणू स्टॅंडर्ड झाले ... मग आर्ट किंवा कॉमर्स झालेल्यांना कशाला घ्या ...
असो मी अजूनही अभियांत्रिकीतच काम करीत असल्यामुळे अंदाज नाही ( उलट कधी कधी असे वाटते कि भारतात राहिलो असतो तर माझ्यसारख्याला आज देशातलयदेशात घडल्यापासून एअर कंडिशनर / गाडी . उतपादन करणाऱ्या किती तरी उद्योगात संधी मिळाली असती... , पिंपरी, चाकण, अंबड, भोसरी
त्यामानाने नुसते खनिज निर्यात करणाऱ्या माजया या देशात जवळ जवळ सर्वच गोष्टी मेड इन चीन तरी किंवा यूरोप आणि कधी कधी अमेरिका
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Fri, 09/03/2021 - 10:40
नवीन
पहिल्या बेसिक गरज bhagva.
खेड्या पाड्यात पाहिले पक्के रस्ते हवे आहेत.
प्रतेक घरात वीज हवी आहे.( आज पण पण किती तरी मोठी लोकसंख्या vije वीणा आहे)
नळाने पाणी हवं आहे.
मुंबई सोडली तर देशात एक पण शहर, किंवा गाव शुध्द पाणी पुरवठा आज पण सर्व लोकसंख्येला करत नाही.
ही खरंच सत्य स्थिती आहे.
दिल्ली मध्ये पण सर्व लोकसंख्येला शुध्द पाणी नळा द्वारे आज पण मिळत नाही.
राजधानी आहे देशाचीम
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 09/03/2021 - 11:49
नवीन
बरं मग?
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- ›
- »