Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

मिपा गंमतगूढ (१) : आपणच ओळखू आपल्याला !

ह
हेमंतकुमार
गुरुवार, 08/26/2021 - 15:19
🗣 113 प्रतिसाद
आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो आहे एक रोचक खेळ ! खाली 10 शोधसूत्रे दिलेली आहेत. त्या प्रत्येकाच्या कंसामध्ये ओळखायच्या शब्दाची अक्षरसंख्या आहे. तुम्हाला हे सर्व शब्द ओळखायचे आहेत. या सर्व शब्दांचे एक समान वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे हे शब्द ही सर्व मिपावरची सदस्यनामे आहेत. शोध सूत्रांमध्ये दिलेली भाषिक माहिती ही निव्वळ संबंधित सदस्यनाम ओळखण्यापुरतीच दिलेली आहे. कुठल्याही शोधसूत्राचा शब्दशः अर्थ कोणीही व्यक्तिगत घेऊ नये ही विनंती. हा निव्वळ खेळ आहे. संबंधित सूत्र हे इथल्या कुठल्याही व्यक्तीचे वर्णन नाही याची नोंद घ्यावी. ओळखायची सर्व नामे ही सलग आहेत; त्यात कुठेही खंड अथवा जोड नाही. सर्व अपेक्षित शब्द हे मराठी भाषेतील व देवनागरीत आहेत. सूत्रे : १. शांत असलेला शक्तिदायी मुलगा (७) २. साहित्यिक प्रश्न विचारतो (७) ३. चित्रपटात आणि खेळात सुद्धा आहे (५) ४. अंधारात खात बस (४) ५. 'आपल्या ' पैशांवर इंग्रज बसला (५) ६. समजून बर्फ पडले (५) ७. आकाशातले व्यसन (४) ८. मूळाक्षराला ओशट स्पर्श (३) ९. श्रेष्ठ-पैलवानाचा कारभार बघतो (५) १०. ज्येष्ठ सत्ताधीश डाळी भरडतो (७)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 36579 views

🗣 चर्चा (113)
ह
हेमंतकुमार Sat, 08/28/2021 - 16:13 नवीन
आपल्या म्हणजे भारतीय नोटांवर बापू असतात की नाही? त्याला अजून एका साहेबाची भर लावली.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Sat, 08/28/2021 - 16:15 नवीन
हा हा हा _/\_
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 08/30/2021 - 05:03 नवीन
व्यक्तिगत संपर्कातून एकदोघांनी शोधसूत्रांसंबंधी काही कुतूहल दाखविले म्हणून थोडे स्पष्टीकरण. या खेळातील शोधसूत्रे पाहून काहींना थोडेसे बुचकळ्यात पडलेल्या सारखे वाटू शकेल. यानिमित्ताने शोधसूत्रांच्या प्रकारांबद्दल काही लिहितो १.साधी : यामध्ये दिलेल्या सूत्राचा समानार्थ किंवा भावार्थ सरळ घ्यायचा असतो किंवा थेट माहितीच अपेक्षित असते. ती ओळखायची. इथे खेळ रचणारा आणि सोडवणारा यांच्यात शेवटी एकमत होते. गरजेनुसार निवाडा करण्यासाठी शब्दकोश उपयुक्त ठरतो. २. गूढ : या प्रकारात सूत्राच्या थेट अर्थाला तसे महत्त्व नसते. किंबहुना इथे शाब्दिक कसरतीना अधिक महत्त्व असते. मात्र सुत्रात दिलेल्या प्रत्येक शब्दाचा उत्तराशी काही ना काही संबंध असतो. अशा प्रकारच्या खेळामध्ये निर्मात्याला जे काय अपेक्षित आहे ते अखेर सोडवणार्याला पूर्णपणे पटतेच असे नाही. ही चांगल्या प्रकारे रचायला शास्त्रशुद्ध अभ्यास असतो. प्रस्तुत खेळामध्ये मी जी सूत्रे बनवली होती ती वरील दोन्हीपैकी थेट कुठल्याच प्रकारची नाहीत. परंतु त्या दोघांच्या मध्ये कुठेतरी आहेत. एक प्रकारे ही गंमतगूढ प्रकारची सूत्रे म्हणता येतील.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Tue, 08/31/2021 - 09:33 नवीन
मला एकही सदस्यनाम ओळखता आले नसल्याने ती बरोबर ओळखता आलेल्या मिपाकरांचे प्रचंड कौतुक वाटतय!
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 08/31/2021 - 12:05 नवीन
टर्मिनेटर तुमचं नाव खेळात घेतलं नव्हतं परंतु एक पर्यायी उत्तर म्हणून ते बरोबर आलेले आहे हा पण सुंदर योगायोग.!
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 09/01/2021 - 00:58 नवीन
लवकरच सादर होईल : मिपा गंमतगूढ खेळ : भाग २ यावेळेस वेगळी गंमत असेल. सर्वांनी सामील व्हावे हे आवाहन !
  • Log in or register to post comments
ग
गुल्लू दादा Wed, 09/01/2021 - 03:08 नवीन
वाट पाहतोय.
  • Log in or register to post comments
ल
लई भारी Wed, 09/01/2021 - 06:24 नवीन
भारीच प्रकार होता! पुढचा भाग येऊ दे लवकरच.
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य Wed, 09/01/2021 - 15:10 नवीन
गामा पैलवान?
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 09/01/2021 - 15:14 नवीन
असे म्हणायला हरकत नव्हती :)) पण या खेळामध्ये खालील सूचना दिलेली आहे ओळखायची सर्व नामे ही सलग आहेत; त्यात कुठेही खंड अथवा जोड नाही. शिवाय पाच अक्षरी हवे. म्हणून हे उत्तर नाही.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 10/13/2021 - 09:08 नवीन
नवे एकच सदस्यनाम देतो ओळखायला: ५ अक्षरी व त्यात एकच वेलांटी सूत्र : दोन मुली एकत्र आल्या की जग सुंदर होते !
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 10/13/2021 - 09:16 नवीन
नाव सलग आहे; त्यात कुठेही खंड अथवा जोड नाही. अपेक्षित शब्द मराठी भाषेतील व देवनगरीत आहे.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 11/11/2021 - 07:42 नवीन
सृष्टीलावण्या
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 11 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 11 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 11 hours ago
  • सुंदर !!
    1 day 11 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 12 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा