Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

मिपा गंमतगूढ (१) : आपणच ओळखू आपल्याला !

ह
हेमंतकुमार
गुरुवार, 08/26/2021 - 15:19
🗣 113 प्रतिसाद
आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो आहे एक रोचक खेळ ! खाली 10 शोधसूत्रे दिलेली आहेत. त्या प्रत्येकाच्या कंसामध्ये ओळखायच्या शब्दाची अक्षरसंख्या आहे. तुम्हाला हे सर्व शब्द ओळखायचे आहेत. या सर्व शब्दांचे एक समान वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे हे शब्द ही सर्व मिपावरची सदस्यनामे आहेत. शोध सूत्रांमध्ये दिलेली भाषिक माहिती ही निव्वळ संबंधित सदस्यनाम ओळखण्यापुरतीच दिलेली आहे. कुठल्याही शोधसूत्राचा शब्दशः अर्थ कोणीही व्यक्तिगत घेऊ नये ही विनंती. हा निव्वळ खेळ आहे. संबंधित सूत्र हे इथल्या कुठल्याही व्यक्तीचे वर्णन नाही याची नोंद घ्यावी. ओळखायची सर्व नामे ही सलग आहेत; त्यात कुठेही खंड अथवा जोड नाही. सर्व अपेक्षित शब्द हे मराठी भाषेतील व देवनागरीत आहेत. सूत्रे : १. शांत असलेला शक्तिदायी मुलगा (७) २. साहित्यिक प्रश्न विचारतो (७) ३. चित्रपटात आणि खेळात सुद्धा आहे (५) ४. अंधारात खात बस (४) ५. 'आपल्या ' पैशांवर इंग्रज बसला (५) ६. समजून बर्फ पडले (५) ७. आकाशातले व्यसन (४) ८. मूळाक्षराला ओशट स्पर्श (३) ९. श्रेष्ठ-पैलवानाचा कारभार बघतो (५) १०. ज्येष्ठ सत्ताधीश डाळी भरडतो (७)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 36579 views

🗣 चर्चा (113)
ह
हेमंतकुमार गुरुवार, 08/26/2021 - 15:25 नवीन
एखाद्याने ओळखलेला शब्द हा जर अपेक्षित उत्तरापेक्षा वेगळा असेल , तर संबंधिताने त्याचे शोधसूत्रानुसार स्पष्टीकरण द्यावे. ते योग्य वाटल्यास पर्यायी उत्तर म्हणून बरोबर दिले जाईल.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 08/26/2021 - 16:24 नवीन
२. साहित्यिक प्रश्न विचारतो (७) >>>>> नावातकायआहे (शेक्सपिअर)
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 08/26/2021 - 16:27 नवीन
२ अगदी बरोबर ! छान सुरुवात अमरेंद्र
  • Log in or register to post comments
ग
गुल्लू दादा गुरुवार, 08/26/2021 - 16:43 नवीन
खूप डोकं लावलं पण काही जमतं नाहीये बुवा. अजून प्रयत्न करून पाहीन. मजबूत शब्दसंग्रह दिसतोय सरांचा.
  • Log in or register to post comments
B
Bhakti गुरुवार, 08/26/2021 - 16:44 नवीन
एकपण ओळखू येईना बाई :(
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 08/26/2021 - 16:58 नवीन
दोघेही प्रयत्न करत आहात त्याबद्दल आभार ! ओ दादा , तुम्ही एवढ मोठ्या मोठ्या नीट परीक्षा देते आणि ही बारावीची जमेना व्हय ? असं नाही चालणार !
  • Log in or register to post comments
स
संजय पाटिल गुरुवार, 08/26/2021 - 16:54 नवीन
चंद्रसुर्यकुमार....
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 08/26/2021 - 16:55 नवीन
चंद्रसुर्यकुमार.... बरोबर !
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 08/26/2021 - 17:04 नवीन
कसंकाय??
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 08/26/2021 - 17:06 नवीन
चंद्र शांत (शीतल )असतो, सूर्य शक्तिदायी आहे
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 08/26/2021 - 17:08 नवीन
अच्छा. मला वाटलं चंद्रसुर्यकुमार शांत आहेत असं. त्याना जर तलवार मिळाली तर ते सर्व कम्युनिस्टांच्या मुंडक्या छाटत फिरतील :)
  • Log in or register to post comments
र
रामदास२९ गुरुवार, 08/26/2021 - 17:37 नवीन
:)
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 08/26/2021 - 17:11 नवीन
४. अंधारात खात बस (४) >>> गुपचूप??
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 08/26/2021 - 17:12 नवीन
वर धाग्यात म्हटल्याप्रमाणे व्यक्तिगत शेरेबाजी टाळूया . सूत्र आणि शब्द शोध एवढीच व्याप्ती असू द्यावी ही विनंती :)
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 08/26/2021 - 17:14 नवीन
ओके. :) होप चंसुकूना वाईट वाटनार नाही :)
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 08/26/2021 - 17:14 नवीन
४. अंधारात खात बस (४) >>> गुपचूप?? चूक.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 08/26/2021 - 17:16 नवीन
३. चित्रपटात आणि खेळात सुद्धा आहे (५) >>>>> टर्मिनेटर?
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 08/26/2021 - 17:18 नवीन
नाही. खेळात कसे ?
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 08/26/2021 - 17:22 नवीन
विडीओ गेम. :)
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 08/26/2021 - 17:25 नवीन
३. पर्यायी बरोबर धरू अपेक्षित मराठी शब्द आहे तो पण ओळखा सर्व अपेक्षित शब्द मराठी भाषेतील आहेत
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Fri, 08/27/2021 - 09:48 नवीन
३. मदनबाण?
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 08/27/2021 - 09:58 नवीन
चौकटराजा
  • Log in or register to post comments
र
रंगीला रतन गुरुवार, 08/26/2021 - 21:10 नवीन
टर्मिनेटर नावाचा चित्रपट आणि व्हिडीओ गेम दोन्ही आहेत त्यामुळे मला पण हेच वाटलं होतं :) पण मराठी नाव आहे म्हणाले कुमार सर मग चौकटराजा असावे. बाकीचे काहीच ओळखता येत नाहीत :(
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 08/27/2021 - 02:32 नवीन
चौकटराजा बरोबर.!
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला गुरुवार, 08/26/2021 - 18:02 नवीन
आपल्या बुध्दी पलीकडील प्रकरण आहे हे. मिपाकरांचे आयडी ओळखायचे ? आपली तेव्हढी मती नाही.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 08/26/2021 - 18:23 नवीन
आघाडीच्या फलंदाजांनी छान कामगिरी केलेली आहे. आता पुढच्या फळीत येणाऱ्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा ! मी उद्या सकाळी इथे येईपर्यंत सर्व सुटलेले असेल या सदिच्छांसह शुभ रात्री
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 08/26/2021 - 20:11 नवीन
९. श्रेष्ठ-पैलवानाचा कारभार बघतो (५) >>>> ऊपयोजक.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 08/27/2021 - 02:33 नवीन
ऊपयोजक नाही
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 08/26/2021 - 20:18 नवीन
९. श्रेष्ठ-पैलवानाचा कारभार बघतो (५) >>>> ऊपयोजक.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 08/26/2021 - 20:18 नवीन
१०. ज्येष्ठ सत्ताधीश डाळी भरडतो (७) >>>> धर्मराजमूटके
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 08/27/2021 - 02:34 नवीन
धर्मराजमुटके सुंदर !! अगदी बरोबर.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 08/26/2021 - 20:22 नवीन
चित्रपटात आणि खेळात सुद्धा आहे (५) >>>> कपीलमुनी? (कपील शर्मा आणी कपीलदेव)
  • Log in or register to post comments
र
रंगीला रतन गुरुवार, 08/26/2021 - 21:02 नवीन
३ चौकटराजा
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 08/27/2021 - 02:36 नवीन
१ २ ३ १० सुटलेत, छान !
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 08/27/2021 - 05:03 नवीन
४. अंधारात खात बस (४) ५. 'आपल्या ' पैशांवर इंग्रज बसला (५) ६. समजून बर्फ पडले (५) ७. आकाशातले व्यसन (४) ८. मूळाक्षराला ओशट स्पर्श (३) ९. श्रेष्ठ-पैलवानाचा कारभार बघतो (५) ... अपेक्षित सर्व शब्द मराठी भाषेत, देवनागरी लिपीत आणि सलग असे आहेत. येऊ द्यात...
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Fri, 08/27/2021 - 09:16 नवीन
६.माहितगार
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 08/27/2021 - 09:37 नवीन
६.माहितगार बरोबर वा !
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 08/27/2021 - 10:02 नवीन
नवीन स्पर्धकांनी वर तूप प्रसाद उपप्रतिसादात न.जाता सरळ शेवटाकडे यावे म्हणजे काय राहिलेले आहे ते समजते आता हे राहिले आहेत ४ ५ ७ ८ ९
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Fri, 08/27/2021 - 10:05 नवीन
८.कंजुस
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 08/27/2021 - 10:20 नवीन
८.कंजुस चूक
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 08/27/2021 - 11:27 नवीन
उत्तरांमध्ये पुरुषप्रधानता दिसत असली तरी स्त्रियांना विसरून कसे चालेल मंडळी !
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Fri, 08/27/2021 - 11:39 नवीन
८.पियुशा?
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 08/27/2021 - 11:43 नवीन
८.पियुशा? चूक तुमच्या उत्तरात मूळाक्षर कुठले ते सांगा बरं ?
  • Log in or register to post comments
स
संग्राम Fri, 08/27/2021 - 13:20 नवीन
निशाचर
  • Log in or register to post comments
क
कॉमी Fri, 08/27/2021 - 13:21 नवीन
८- अनिन्द्य
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 08/27/2021 - 13:25 नवीन
४ निशाचर बरोबर ! ८- अनिन्द्य चूक , ओशट ??
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 08/27/2021 - 13:58 नवीन
अतिशय सुरेख खेळत आहात सर्वजण . खेळ अगदी योग्य गतीने चालू आहे. मुख्य म्हणजे दोघातिघांनीच तो संपवण्या ऐवजी अनेक जण सहभागी होत आहेत याचा आनंद वाटतो अजून दोन तासांनी धाग्याचे 24तास झाल्याचे टोल पडतील. मला खात्री आहे की आता येणारे खेळाडू खेळ त्याआधीच संपवतील ! ..... आता हे : ५. 'आपल्या ' पैशांवर इंग्रज बसला (५) ७. आकाशातले व्यसन (४) ८. मूळाक्षराला ओशट स्पर्श (३) ९. श्रेष्ठ-पैलवानाचा कारभार बघतो (५)
  • Log in or register to post comments
स
संग्राम Fri, 08/27/2021 - 14:24 नवीन
जे.पी.मॉर्गन (?)
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 08/27/2021 - 14:27 नवीन
अपेक्षित सर्व शब्द मराठी भाषेत, देवनागरी लिपीत आणि सलग असे आहेत.
  • Log in or register to post comments
स
संग्राम Fri, 08/27/2021 - 14:26 नवीन
चामुंडराय (?)
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 13 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 13 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 13 hours ago
  • सुंदर !!
    1 day 13 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 13 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा