चालू घडामोडी - जुलै २०२१
अमेरिकेचे माजी संरक्षणमंत्री डॉनल्ड रम्सफेल्ड यांचे २९ जून २०२१ रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले.
त्यांनी प्रशासनिक जबाबदारीची पदे सांभाळायला सुरवात रिचर्ड निक्सन अध्यक्ष असताना १९६९ मध्येच केली. त्यानंतर अध्यक्ष झालेल्या जेराल्ड फोर्ड यांनी त्यांना सुरवातीला १९७४ मध्ये व्हाईट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ आणि १९७५ मध्ये संरक्षणमंत्री म्हणून नेमले. १९७७ मध्ये डेमॉक्रॅटिक पक्षाचे जिमी कार्टर अध्यक्ष झाल्यानंतर रम्सफेल्ड जी.डी.सर्ल या खाजगी औषध कंपनीचे सी.ई.ओ बनले. १९८१ मध्ये रिपब्लिकन पक्षाचे रॉनाल्ड रेगन अध्यक्ष झाल्यानंतर १९८३ मध्ये अध्यक्षांनी त्यांना इराकमध्ये सद्दाम हुसेनला भेटायला पाठवले होते. त्यावेळी इराण-इराक युध्द चालू होते आणि इराक अमेरिकेचा मित्रदेश होता आणि सद्दाम हुसेन अमेरिकेचा महत्वाचा साथीदार होता.
डॉनल्ड रम्सफेल्ड यांना जॉर्ज डब्ल्यू बुश अध्यक्ष झाल्यावर २००१ मध्ये परत एकदा संरक्षणमंत्री म्हणून नेमले गेले. २००२-०३ मध्ये इराकमध्ये अतिसंहारक शस्त्रे आहेत म्हणून बुश प्रशासनाने खोटारडेपणा केला. त्यात परराष्ट्रमंत्री कॉलिन पॉवेल यांच्याबरोबरच संरक्षणमंत्री डॉनल्ड रम्सफेल्ड हे पण त्या खोटारडेपणात होते. २० वर्षांपूर्वी ज्या सद्दाम हुसेनला रम्सफेल्ड भेटले होते तोच माणूस किती नालायक आहे याचा प्रचार करण्यात ते पुढे होते. बुश २००४ मध्ये दुसर्यांदा निवडून आले. दुसर्या टर्ममध्ये त्यांनी परराष्ट्रमंत्री पदावर कॉलिन पॉवेल यांच्याऐवजी कॉन्डोलिझा राईसना नेमले पण डॉनल्ड रम्सफेल्डना संरक्षणमंत्रीपदावर कायम ठेवले. २००३ चे इराक युध्द अमेरिकन जनतेत खूप अलोकप्रिय ठरले. २००४ मध्ये अध्यक्षीय निवडणुक झाली तेव्हापर्यंत तितकी प्रतिक्रिया आली नव्हती पण २००५-०६ मध्ये अनेक अमेरिकन सैनिकांचा इराकमध्ये हकनाक बळी गेल्यानंतर ती प्रतिक्रिया जास्त उमटली. २००६ च्या मध्यावधी निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाचा पराभव झाला आणि त्याबद्दल इराक युध्दाची घोडचूक जबाबदार ठरविण्यात आली. त्यानंतर रम्सफेल्ड यांना संरक्षणमंत्रीपदावरून काढण्यात आले. कॉलीन पॉवेल यांनी नंतरच्या काळात इराक युध्द आणि त्यावेळी केलेला खोटारडेपणा ही चूक होती असे निदान तोंडदेखल्या तरी म्हटले पण रम्सफेल्ड यांनी ते पण म्हटले होते असे वाटत नाही.
बुश प्रशासनाच्या पहिल्या टर्ममध्ये ९/११ आणि नंतर भारतात संसदभवनावर हल्ला आणि त्यानंतर कालुचक हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान युध्द होईल असे वातावरण निर्माण झाले होते. त्यावेळेस बुश प्रशासन भारताला 'संयम ठेवा' हा उपदेशाचा डोस पाजत होते. तसे करण्यातही डॉनल्ड रम्सफेल्ड पुढे होतेच. ९/११ नंतर आणि भारत-पाकिस्तान युध्द होईल असे वातावरण असताना रम्सफेल्ड भारतात आले होते. त्यावेळी परराष्ट्रमंत्री जसवंतसिंगांशी झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत जसवंतसिंग फारसे खुषीत दिसत नव्हते असे टिव्ही चॅनेल्सवर बघितल्याचे आठवते. म्हणजे कदाचित संयम ठेवा हा 'दम' रम्सफेल्ड यांच्याकडून दिला गेला असावा ही शक्यता आहे.
डॉनल्ड रम्सफेल्ड कितीही नालायक असले तरी त्यांची एक गोष्ट मला आवडायची असे नसले तरी भावायची. आपण अमेरिकेसारख्या महासत्तेच्या सर्वोच्च नेतृत्वामध्ये सत्ताधारी आहोत हा एक प्रकारचा अहंकार किंवा दर्प म्हणा असा त्यांच्या बोलण्यातून नेहमीच जाणवायचा त्यामुळे त्यांचे बोलणे नेहमीच एकदम 'डॉमिनेटिंग' किंवा खरं तर 'बुलिंग' करणारे असायचे.
असो. डॉनल्ड रम्सफेल्ड यांच्या निधनामुळे अमेरिकेच्या इतिहासातील नालायक मंत्र्यांपैकी एक अध्याय संपला. आता हेनरी किसिंजरचा नंबर कधी लागतो ते बघायचे. बांगलादेशात याह्याच्या अत्याचारांना पाठीशी घालून लाखो लोकांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या निक्सन आणि किसिंजर यांच्यासाठी नरकात जागा कायमस्वरूपी आरक्षित केली गेली असेल असे नेहमी वाटते. रम्सफेल्डही फार वेगळे नव्हते.

मग कुठलेही बुजगावणे निव्वळ भाजपामधे आहे, म्हणून ते मोठे होते का? मग खडसेंचे काय झाले? मुंडे भगिनी काय करताहेत ? मी फडणवीसांचा भक्त वगैरे नाही. मात्र ते चांगले कार्य करताहेत, हे नाकारता येणार नाही. आणी म्हणूनच त्यांचे पक्षष्रेष्ठी त्यांचे मत विचारात घेतात.मुळात मोठे म्हणजे भाजपत मोठे का सर्वत्र मोठे? भाजपत कितीही मोठे असले तरी भाजपबाहेर ते शून्य असतात अशी अनेक उदाहरणे आहेत व फडणवीसही त्यास अपवाद नाहीत. भाजपत कितीही मोठे असले तरी एकदा पक्षाने लाथाडायचे ठरविले की त्यांचा पालापाचोळा झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. एखाद्या जातीच्या मतांसाठी बनावट अहवाल तयार करून सवलतींचा वर्षाव करून इतर जातींंचा बळी देणे, खुर्ची टिकविण्यासाठी सहकाऱ्यांचा विश्वासघात करणे, भ्रष्टांना पाठीशी घालणे, अत्यंत भ्रष्ट जातीयवादी आयारामांची खोगीरभरती करणे, युतीसाठी लाचारी करून पक्षाचे नुकसान करणे इ. कार्ये निदान मी तरी मोठी कार्ये मानत नाही.ह्याच आठवड्यात भाजपाच्या राष्ट्रीय सचिवांच्या बैठकीतील वृत्तांताचा काही अंश, जो मुंडे भगिनींच्या सम्दर्भातला आहे, तो इथे पहावा. भाऊंनी म्हटल्याप्रमाणे, नुसती स्वतःच्या समाजाची काळजी घेत कुठलाही नेता मोठा होत नसतो. त्यासाठी त्याला जनताभिमुख होऊन बरेच कष्ट करावे लागतात. हेच थोडेफार, ह्या वृतांतानुसार त्यांना मोदींनी सुनावले आहे, असे दिसते.बीड जिल्ह्यातील पद्मश्री मिळालेल्या व्यक्तीला तुम्ही भेटला आहात का असे मोदींनी पंकजा मुंडेंंना विचारले म्हणे. महाराष्ट्रातील भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी, नवीन मंत्री झालेल्यांंपैकी किती जण या व्यक्तीला भेटले असावे? नुसती स्वतःच्या समाजाची काळजी घेत कुठलाही नेता मोठा होत नसतो. तसेच मतांसाठी एखाद्या विशिष्ट समाजाची काळजी घेत सुद्धा (ते सुद्धा लबाडी करून आणि इतर समाजांवर अन्याय करून) कुठलाही नेता मोठा होत नसतो. अवांतर - बाकी भाऊ तोरसेकरांचे राजकीय अंदाज आता फारसे खरे ठरत नाहीत असे जाणवित आहे.मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - श्री शिवभारत [ डाउनलोड लिंक ]