Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - जुलै २०२१

च
चंद्रसूर्यकुमार
Fri, 07/02/2021 - 18:59
🗣 171 प्रतिसाद
अमेरिकेचे माजी संरक्षणमंत्री डॉनल्ड रम्सफेल्ड यांचे २९ जून २०२१ रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. rumsfeld त्यांनी प्रशासनिक जबाबदारीची पदे सांभाळायला सुरवात रिचर्ड निक्सन अध्यक्ष असताना १९६९ मध्येच केली. त्यानंतर अध्यक्ष झालेल्या जेराल्ड फोर्ड यांनी त्यांना सुरवातीला १९७४ मध्ये व्हाईट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ आणि १९७५ मध्ये संरक्षणमंत्री म्हणून नेमले. १९७७ मध्ये डेमॉक्रॅटिक पक्षाचे जिमी कार्टर अध्यक्ष झाल्यानंतर रम्सफेल्ड जी.डी.सर्ल या खाजगी औषध कंपनीचे सी.ई.ओ बनले. १९८१ मध्ये रिपब्लिकन पक्षाचे रॉनाल्ड रेगन अध्यक्ष झाल्यानंतर १९८३ मध्ये अध्यक्षांनी त्यांना इराकमध्ये सद्दाम हुसेनला भेटायला पाठवले होते. त्यावेळी इराण-इराक युध्द चालू होते आणि इराक अमेरिकेचा मित्रदेश होता आणि सद्दाम हुसेन अमेरिकेचा महत्वाचा साथीदार होता. डॉनल्ड रम्सफेल्ड यांना जॉर्ज डब्ल्यू बुश अध्यक्ष झाल्यावर २००१ मध्ये परत एकदा संरक्षणमंत्री म्हणून नेमले गेले. २००२-०३ मध्ये इराकमध्ये अतिसंहारक शस्त्रे आहेत म्हणून बुश प्रशासनाने खोटारडेपणा केला. त्यात परराष्ट्रमंत्री कॉलिन पॉवेल यांच्याबरोबरच संरक्षणमंत्री डॉनल्ड रम्सफेल्ड हे पण त्या खोटारडेपणात होते. २० वर्षांपूर्वी ज्या सद्दाम हुसेनला रम्सफेल्ड भेटले होते तोच माणूस किती नालायक आहे याचा प्रचार करण्यात ते पुढे होते. बुश २००४ मध्ये दुसर्‍यांदा निवडून आले. दुसर्‍या टर्ममध्ये त्यांनी परराष्ट्रमंत्री पदावर कॉलिन पॉवेल यांच्याऐवजी कॉन्डोलिझा राईसना नेमले पण डॉनल्ड रम्सफेल्डना संरक्षणमंत्रीपदावर कायम ठेवले. २००३ चे इराक युध्द अमेरिकन जनतेत खूप अलोकप्रिय ठरले. २००४ मध्ये अध्यक्षीय निवडणुक झाली तेव्हापर्यंत तितकी प्रतिक्रिया आली नव्हती पण २००५-०६ मध्ये अनेक अमेरिकन सैनिकांचा इराकमध्ये हकनाक बळी गेल्यानंतर ती प्रतिक्रिया जास्त उमटली. २००६ च्या मध्यावधी निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाचा पराभव झाला आणि त्याबद्दल इराक युध्दाची घोडचूक जबाबदार ठरविण्यात आली. त्यानंतर रम्सफेल्ड यांना संरक्षणमंत्रीपदावरून काढण्यात आले. कॉलीन पॉवेल यांनी नंतरच्या काळात इराक युध्द आणि त्यावेळी केलेला खोटारडेपणा ही चूक होती असे निदान तोंडदेखल्या तरी म्हटले पण रम्सफेल्ड यांनी ते पण म्हटले होते असे वाटत नाही. बुश प्रशासनाच्या पहिल्या टर्ममध्ये ९/११ आणि नंतर भारतात संसदभवनावर हल्ला आणि त्यानंतर कालुचक हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान युध्द होईल असे वातावरण निर्माण झाले होते. त्यावेळेस बुश प्रशासन भारताला 'संयम ठेवा' हा उपदेशाचा डोस पाजत होते. तसे करण्यातही डॉनल्ड रम्सफेल्ड पुढे होतेच. ९/११ नंतर आणि भारत-पाकिस्तान युध्द होईल असे वातावरण असताना रम्सफेल्ड भारतात आले होते. त्यावेळी परराष्ट्रमंत्री जसवंतसिंगांशी झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत जसवंतसिंग फारसे खुषीत दिसत नव्हते असे टिव्ही चॅनेल्सवर बघितल्याचे आठवते. म्हणजे कदाचित संयम ठेवा हा 'दम' रम्सफेल्ड यांच्याकडून दिला गेला असावा ही शक्यता आहे. डॉनल्ड रम्सफेल्ड कितीही नालायक असले तरी त्यांची एक गोष्ट मला आवडायची असे नसले तरी भावायची. आपण अमेरिकेसारख्या महासत्तेच्या सर्वोच्च नेतृत्वामध्ये सत्ताधारी आहोत हा एक प्रकारचा अहंकार किंवा दर्प म्हणा असा त्यांच्या बोलण्यातून नेहमीच जाणवायचा त्यामुळे त्यांचे बोलणे नेहमीच एकदम 'डॉमिनेटिंग' किंवा खरं तर 'बुलिंग' करणारे असायचे. असो. डॉनल्ड रम्सफेल्ड यांच्या निधनामुळे अमेरिकेच्या इतिहासातील नालायक मंत्र्यांपैकी एक अध्याय संपला. आता हेनरी किसिंजरचा नंबर कधी लागतो ते बघायचे. बांगलादेशात याह्याच्या अत्याचारांना पाठीशी घालून लाखो लोकांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या निक्सन आणि किसिंजर यांच्यासाठी नरकात जागा कायमस्वरूपी आरक्षित केली गेली असेल असे नेहमी वाटते. रम्सफेल्डही फार वेगळे नव्हते.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 53342 views

🗣 चर्चा (171)
श
श्रीगुरुजी Wed, 07/07/2021 - 10:43 नवीन
तावडेंना अकार्यक्षमता, भ्रष्टाचार अशा कारणांवरून उमेदवारी नाकारली असेल तर ते योग्यच होते. परंतु त्यामागे वेगळेच कारण होते. भावी मुख्यमंत्री असे तावडेंसंबंधात काही माध्यमांनी लिहिले होते. जनतेच्या मनातील मुख्यमंत्री मीच असे पंकजा मुंडे बोलल्या होत्या. वरीष्ठतेनुसार मीच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होते, असे खडसे बोलले होते. हे आपल्या मार्गातील काटे आहेत या समजुतीतून फडणवीसांनी खडसे, तावडे तसेच वरीष्ठ नेते बावनकुळे यांना उमेदवारी मिळून दिली नाही. पंकजा मुंडे व खडसेंच्या सुनेला पाडले व आपला मार्ग निष्कंटक केला.विधानपरीषद व राज्यसभेतही पंकजा मुंडेंना उमेदवारी दिली नाही. मुंडे घराण्याला राजकारणातून संपविण्यासाठी मुंडेंच्याच वंजारी जातीतील कराड आडनावाच्या कोणालातरी विधानपरीषदेत आमदार केले व भागवत कराड यांना राज्यसभेत खासदार केले. त्याच भागवत कराडांना केंद्रात आज मंत्रीपद मिळणार आहे म्हणे. केंद्रात मंत्रीपदासाठी कालपर्यंत प्रीतम मुंडेंचे नाव चर्चेत होते. परंतु आज त्यांचा पत्ता कापलेला दिसतोय. मुंडे घराण्याला संपविण्यासाठी कणभरही जनाधार नसलेले त्याच जातीचे उमेदवार पुढे आणून निवडणुकीत फायदा न होता तोटाच होईल. पण हाय रे दैवा! जनतेनेच फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाच्या मार्गावर नो एंट्री करून त्यांच्या सर्व चाली, कारस्थाने व्यर्थ ठरविली.
  • Log in or register to post comments
M
mayu4u Sat, 07/10/2021 - 06:17 नवीन
सिरियसली? तुमचा फ20 वरचा राग समजू शकतो; पण हे विधान धडधडीत असत्य आहे!
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 07/10/2021 - 06:44 नवीन
जनतेने भाजपला फक्त १०३ (अधिक मित्रपक्षांच्या २) जागा देऊन भाजप बहुमताच्या १४५ या आकड्यापासून बराच लांब राहील अशी व्यवस्था केली. त्यामुळे १२५-१३० जागा मिळून निकालानंतर सेनेला २०१४ प्रमाणे शरण आणता येईल ही योजनाच अपयशी ठरली. सेनेबरोबर युती करून जागा वाढवायच्या, मित्रपक्षांच्या १८ उमेदवारांना भाजपच्या कमळ चिन्हावर लढायला लावून भाजपची संख्या वाढवायची, मराठ्यांवर सवलतींचा वर्षाव करून राखीव जागा देऊन मराठा मते मिळवायची, आयारामांची खोगीरभरती करून पक्ष फुगवायचा ही योजना धुळीस मिळाली. फक्त एकाच आघाडीवर यश मिळाले. ते म्हणजे पंकजा मुंडे, खडसे, तावडे, बावनकुळे या प्रतिस्पर्ध्यांंचा यशस्वीपणे काटा काढून मार्ग निष्कंटक बनविला. परंतु त्यामुळे मुंडे व खडसेंंच्या जागा हरल्या व विदर्भातील १५ जागा गेल्या. तसेच ३५-३६ आयारामांपैकी अंदाजे निम्मे निवडून आल्याने यातही अंशात्मक यश मिळाले.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Sat, 07/10/2021 - 11:43 नवीन
जनतेने भाजपला फक्त १०३ (अधिक मित्रपक्षांच्या २) जागा देऊन भाजप बहुमताच्या १४५ या आकड्यापासून बराच लांब राहील अशी व्यवस्था केली. -- भाजपा-शिवसेना युती होती ना, २०१९ च्या निवडणुकीत ? की चारही पक्षांनी वेगवेगळी निवडणुक लढवली होती.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 07/10/2021 - 12:10 नवीन
उपयोग काय झाला युती करून? बंद खोलीत युतीच्या वाटाघाटी करताना दोघांनी एकमेकांना कोणती आश्वासने दिली होती त्याविषयी दोघेही परस्परविरोधी सांगताहेत. भाजपसमर्थक शहा/फडणवीसांच्या व्हर्जनवर विश्वास ठेवतात, तर सेना समर्थक उधोजींचे व्हर्जन खरे मानतात. अभद्र पक्षाशी अमंगळ युती केल्यानेच कदाचित मतदारांनी भाजपला बहुमतापासून बरेच लांब ठेवले असावे.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sat, 07/10/2021 - 13:41 नवीन
पण युती तुटून जागावाटप झाले नसते तर ? तर खरी चाचणी करता आली असती जनमत नाकारले कि नाही. किती जागांवर भाजप लढला होता ? त्यापैकी किती टक्के जिंकला ?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 07/10/2021 - 14:52 नवीन
भाजपने स्वपक्षाचे १४६ उमेदवार अधिक मित्रपक्षांचे १८ उमेदवार कमळ चिन्हावर असे १६४ उमेदवार उभे केले होते. त्या १६४ पैकी भाजपचे १०३ व मित्रपक्षांचे २ असे एकूण १०५ उमेदवार जिंकले. फडणवीसांनी २०१७-२०१९ या सुमारे ३ वर्षात जे निर्णय घेतले त्यामुळे कट्टर भाजप समर्थक असलेले इतर मागासवर्गीय व ब्राह्मण मतदार नाराज झाले होते. मराठ्यांवर सवलतींचा वर्षाव करून व लबाडी करून खोटा अहवाल तयार करून १६% राखीव जागा देऊनही मराठ्यांची वाढीव मते मिळणार नाहीत हे दिसत होते. स्वपक्षातील प्रतिस्पर्ध्यांंना पाडण्याचे कारस्थान होते व त्यामुळे काही जागा कमी होणार होत्या. यामुळे सेनेबरोबर युती करणे व पक्षात आयारामांची खोगीरभरती करून जाणाऱ्या जागांची भरपाई करणे फडणवीसांसाठी अपरिहार्य झाले होते. युती न करता स्वतंत्र निवडणुक लढली असती तर माझ्या मते भाजपला सुमारे ६० जागा, सेनेला सुमारे ३० जागा व कॉंग्रेस-राष्ट्रवादी युतीला किमान स्पष्ट बहुमत मिळाले असते.
  • Log in or register to post comments
र
रावसाहेब चिंगभूतकर Sat, 07/10/2021 - 13:59 नवीन
थोडक्यात सांगायचे तर ज्या भाजप मतदारांनी शिवसेनेला मते दिली त्यांना मूर्ख ठरवण्यात आले. जर युती नसती तर त्यांनी मते फडणविसनाच दिली असती. शिवसेनेशी युती हा भाजप केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय होता आणि फडणवीस ना त्या निर्णयाला मानणे भाग होते. अमंगल युती वगैरे गोष्टी बोलायला ठीक आहेत पण ही पाश्चातबुद्धी आहे. आता पुढच्या निवडणुकीत चित्र स्पष्ट होईल की शिवसेनेची खरी ताकत किती आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 07/10/2021 - 15:06 नवीन
शिवसेनेशी युती या निर्णयावर अंतिम शिक्का केंद्रीय नेतृत्वाचा असेल, परंतु युतीसाठी फडणवीसांचाच अत्याग्रह होता (या आग्रहामागील कारणे वर दिली आहेत). वारंवार मातोश्रीवर हेलपाटे घालून त्यांनीच उधोजींना युतीसाठी राजी केले होते. अमित शहा फक्त अंतिम सहीसाठी आले होते. युतीसाठी नक्की काय ठरले होते त्याची सेना व भाजपची परस्परविरोधी व्हर्जन्स आहेत. परंतु ज्या त-हेने फडणवीस युती करण्यासाठी कासावीस होते ते बघता भाजपनेच-युतीसाठी सेनेला (निदान मोघम स्वरूपात तरी) काही अव्यवहार्य आश्वासने (अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद, निम्मी मंत्रीपदे इ.) दिली असावी अशी मला शंका आहे.
  • Log in or register to post comments
M
mayu4u Sat, 07/10/2021 - 16:20 नवीन
अभद्र पक्षाशी अमंगळ युती केल्यानेच कदाचित मतदारांनी भाजपला बहुमतापासून बरेच लांब ठेवले असावे. आधी बाण मारून मग त्याच्या भोवती वर्तुळ काढणं सुरू आहे तुमचं!
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 07/26/2021 - 12:44 नवीन
पण हाय रे दैवा! जनतेनेच फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाच्या मार्गावर नो एंट्री करून त्यांच्या सर्व चाली, कारस्थाने व्यर्थ ठरविली.
सर्वात इनोदी वाक्याला एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. राडतराऊत आणि उधोजींना बरोबर घेतले या चुकीच्या निर्णयाचा फटका फडणविसांना बसला.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 07/26/2021 - 12:54 नवीन
सेना बरोबर नसती तर राष्ट्रवादी चे धुरंधर पवार साहेब आणि महाराष्ट्रात रुजलेली काँग्रेस ह्यांनी bjp च पुर्ण विनाश केला असता.औषधाला पण bjp महाराष्ट्रात राहिली नसती. उगाच स्वतःची लाल करू नका. 105 नाही 5 पण आले नसते सेना विरोधी असती तर. राज्याच्या विकासात फडणवीस आणि बाकी BJP च्या नेत्याचे काडी चे कार्य नाही .
  • Log in or register to post comments
स
सॅगी Mon, 07/26/2021 - 14:34 नवीन
:)
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Mon, 07/26/2021 - 14:50 नवीन
मिपावर या प्रतिभेसाठी एक स्पेशल विभागच सुरू केला जावा
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 08/05/2021 - 18:01 नवीन
सहमत राजेश जी.
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Wed, 07/07/2021 - 07:33 नवीन
मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन कृपाशंकर ला पक्षात घ्यायचा निर्णय घेतला असेल, पण फायदा होणाऐवजी नुकसानच होण्याची चिन्हे आहेत. राणेंना शिवसेनेला विरोध करण्यासाठी मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 07/07/2021 - 10:51 नवीन
कृपाशंकर सारख्या अजिबात जनाधार नसलेल्या बदमाषाला पक्षात आणून तोटाच होणार आहे. राणे स्वतः दोन वेळा पडलेत, मोठा मुलगा सुद्धा पडलाय. कोकणात कणकवलीच्या बाहेर त्यांना कोणी ओळखत नाही. मागील १६ वर्षे राणेंनी सेनेला विरोध करूनही ते सेनेचे कणभरही नुकसान करू शकले नाही. अशा माणसाला मंत्री करून फक्त तोटाच होईल.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 07/07/2021 - 12:13 नवीन
भारतात जनाधार फुकांदेवी ल पण मिळाला होता.जनाधार असला खूप मोठा शब्द भारतात आता तरी वापरण्या योग्य नाही शब्दाचा अपमान आहे तो उत्तर भारतीय लोकांची मत मिळवायला उत्तर भारतीय गाढव नेता पण चालतो. त्या साठी काही वेगळे गुण असण्याची गरज लागत नाही. भारतीय मतदार हे आज पण परिपक्व नाहीत. त्या मुळे कृपा शंकर ला bjp madhye घेणे हा निर्णय राजकीय दृष्ट्या योग्य आहे जेव्हा युती होती तेव्हा उत्तर भारतीय मतदार ची बिलकुल गरज नव्हती सेने ची मराठी मत आणि BJP ची गुजराती,मारवाडी मत आरामात कोणाला पण जिंकून देवू शकतात. आणि दक्षिण भारतीय उत्तर भारतीय नेत्यांची पाठराखण कधीच करणार नाहीत ,आणि करत पण नाहीत .
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Wed, 07/07/2021 - 14:19 नवीन
उत्तर भारतीय लोकांची मत मिळवायला उत्तर भारतीय गाढव नेता पण चालतो. त्या साठी काही वेगळे गुण असण्याची गरज लागत नाही.
उत्तर प्रदेशातूनच निवडुन येणारे नेहरू/शास्त्री/इंदिरा/राजीव/वाजपेयी गाढव नेता होते की नव्हते?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 07/07/2021 - 15:28 नवीन
मुळात मुंबई महापालिकेची निवडणुक डोळ्यासमोर ठेवून कृपाशंकरला भाजपत आणले, हे कारणच चुकीचे वाटते. २०१७ मध्ये भाजपने मुंबई महापालिकेची निवडणुक शर्थीने लढवून ८२ नगरसेवक निवडून आणले होते. सेनेकडे फक्त २ जास्त नगरसेवक होते. स्वतः फडणवीसांच्या बरोबरीने आशिष शेलार, तावडे, भातखळकर यांनी त्या निवडणुकीत जिवापाड प्रयत्न केला होता. बहुमतासाठी ११४ नगरसेवकांची गरज होती. परंतु ३१ नगरसेवक असलेली कॉंग्रेस भाजपप्रमाणे सेनेला सुद्धा पाठिंबा देण्यास तयार नव्हती. त्यामुळे बहुमतासाठी ९८-९९ नगरसेवक हवे होते. फोडाफोडीत अत्यंत कुशलता प्राप्त केलेल्या भाजपला मनसेचे ७, राष्ट्रवादीचे ७ व काही अपक्ष फोडणे सहज शक्य होते. परंतु निकालानंतर महापौरपद, स्थायी समिती अध्यक्षपद, इतर समित्यांची अध्यक्षपदे यासाठी प्रयत्न करण्याऐवजी फडणवीसांनी पांढरे निशाण दाखवून संपूर्ण माघार घेतली व सेनेला महापालिकेत संपूर्ण रान मोकळे करून दिले. महापौरपद तर सोडाच उपमहापौर, वेगवेगळ्या समित्यांंवरील सदस्यता यातही सहभाग घेतला नाही. विरोधी पक्षनेतेपद सुद्धा नाकारल्याने ते कॉंग्रेसकडे गेले. उद्धव ठाकरेंची चाटुगिरी करण्याचे व्यसन लागल्याने त्यांना खुश करण्यासाठी फडणवीसांनी माघार घेतली. आता ते विरोधी पक्षनेतेपद मिळावे यासाठी भाजप उच्च न्यायालयात गेला होता. परंतु उच्च न्यायालयाने भाजपची मागणी फेटाळून लावली. स्वत:हून सोडलेले पद आता मिळणार नाही असा निकाल दिला. २०२२ मध्ये सुद्धा भाजपने जोरदार तयारी करून महापालिकेत कितीही जोरदार लढत दिली तरी अवसानघातकी फडणवीस आयत्यावेळी कच खाऊन माघार घेऊन सेनेला मोकळे रान देऊन आपल्या नगरसेवकांना पुन्हा एकदा तोंडावर पाडतील.
  • Log in or register to post comments
स
सुक्या Wed, 07/07/2021 - 20:02 नवीन
अजित पवारांबरोबर सत्ता स्थापण केल्यवर आपल्य इमेज ला तडा गेला व तो काही शहाणपणाचा निर्णय नव्हता हे फडवणीसांनी कबुल केल्याचे आठवते ..
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Sat, 07/10/2021 - 15:46 नवीन
फडणवीस विरोधातही पूर्ण परीपक्व नेतृत्व वाटत नाहीत, त्यांची इमेज अजून खालावत आहे असेच भासते. स्वतःच्या पक्षातीलच लोक असे त्यांनी संपवायला नको होते स्वताचे स्थान मजबूत करायला त्यांनी इतर पक्षातील लोकांशी जुळते घेतले ही राजकीय अपरिहार्यता जरी समजून घेतली तरीही पण स्वगृही काही कलह टाळायला हवे होते
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 07/10/2021 - 16:06 नवीन
राजकीय पक्षात एक ठराविक उंची गाढली की ती जागा टिकवणे हे सर्वात अवघड काम असते . प्रतिस्पर्धी व्यक्ती ला कमजोर करणे पण पक्षात आपल्या विरोधात आघाडी निर्माण होवू नये ही काळजी घेणे आणि निवडणुका पण जिंकणे हे सर्व करावे लागते. कोणी डोईजड होईल असे वाटायला लागले की त्या व्यक्ती ला निवडणुकीत पाडण्याचे काम स्व पक्षीय लोक च करत असतात . आणि हे सर्व राजकीय पक्षात होते. फडणवीस नी स्व पक्षीय विरोधकांचे पंख झाटण्याचे काम केले असेल तर ते स्वतःची जागा टिकवण्यासाठी गरजेचेच असते. शेवटी पद आणि सत्ता ह्याच्या मागे सर्व असतात. पक्ष निष्ठा,तत्व,हे असं काही नसते. एकच व्यक्ती च्या पक्ष निष्ठा,तत्व एकच आयुष्यात दर पाच वर्षांनी बदलणारी नी खूप नेते मंडळी आहेत.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 07/10/2021 - 16:43 नवीन
महाराष्ट्र भाजपत आता फक्त फडणवीसच (आणि त्यांचे शेपूट चंपा) आहेत. इतर सर्व नेते संपले आहेत. महाराष्ट्र संबंधात सर्व निर्णय फक्त फडणवीसच घेतात असे चित्र दिसत आहे. चंपाचा आचरटपणा आणि थिल्लरपणा पराकोटीचा वाढला असून पक्षावर त्याचा नकारात्मक परीणाम होत आहे. २०१४ पर्यंत महाराष्ट्रात गडकरी, गोपीनाथ मुंडे, खडसे, मुनगंटीवार, बावनकुळ, फडणवीस, तावडे अशी नेत्यांंची फळी होती. चंपा हे नाल सुद्धा कोणाला माहिती नव्हते.गडकरी केंद्रात गेले तर गोपीनाथ मुंडे अपघातात गेले. आता इतर सर्व नेते निष्प्रभ झाले आहेत किंवा त्यांना निष्प्रभ केले गेले आहे.
  • Log in or register to post comments
स
सुक्या Wed, 07/14/2021 - 11:05 नवीन
या आधी एक प्रतीसाद होता ... संपादक मंडळाला काय आक्षेपार्ह दिसले कुणास ठाउक. तो प्रतीसाद उदवण्यात आला ... असो. फडणवीसांचा आक्रस्थाळेपणा वाढला आहे हे नक्की. परंतु एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करताना त्याचा सखोल अभ्यास ते करतात. त्यात त्यांचा वेळ वाया जातो हे खरे परंतु तसे करणारा दुसरा नेता मला तरी महाराष्ट्रात दिसत नाही. त्यात अजुन तरी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत ... वासरात लंगडी गाय शहाणी म्हणुन फडणवीसांना अजुन तरी पर्याय दिसत नाही .. राहीली गोष्ट तिघाडी सरकारची ... यात अजुन तरी ताळमेळ दिसत नाही ... एका सरकारात आहे तरीही एकमेकांचे पाय ओढणे चालु आहे .. २ वर्षे झाली तरी अजुन काही भरीव काम दिसत नाही. लहान मुलांसारखे हिशेब चालु आहेत .. कुठलेही प्लॅनिंग दिसत नाही ... बर्‍याच वेळा बेधडक खोटे बोलणे चालु आहे .. भीक नको पण कुत्रा आवर असली परीस्थीती आहे ...
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Wed, 07/14/2021 - 13:30 नवीन
हे सुक्या ह्यांना उद्देशून नाही, पण हा अनेकदा दिसून येणारा ट्रेंड- विशेषतः उजव्या बाजूच्या जनतेत -- मी पाहिला आहे व तो थोडा अस्वस्थ करणारा आहे. तर ह्या बाजूची बहुतांश जनता, त्यांच्या आवडत्या नेत्याविषयी नेहमीच असा अ‍ॅपोलोजॅटिक सूर का ठेवते? म्हणजे.' काय करणार? त्यांच्यापेक्षा दुसरा चांगला नेता सध्या दिसत नाही'. मोदींपासून, फडणवीसांपर्यंत हे भाजपचे समर्थक असेच का म्हणत असतात? आता हे उदाहरण पहा: "(१)एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करताना त्याचा सखोल अभ्यास ते करतात......तसे करणारा दुसरा नेता मला तरी महाराष्ट्रात दिसत नाही. (२) त्यात अजुन तरी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत .." मग आपल्या अजून आपल्या नेत्यांत कसले गुण हवे आहेत? बरे, फडणवीसांनी बर्‍यापैकी राज्यशकट, अतिशय कठीण राजकीय परिस्थीतीत, पाच वर्षे चालवला.' हो, ते तर आहेच, पण आम्हाला ह्यापे़क्षा सक्षम, सर्वांना बरोबर घेऊन जाणारा नेता पाहिजे' म्हणजे असा सर्वगुणी, बहुसंपन्न नेता जगात कोठे कोण आहे? भाजप सोडा, इतर कुठल्या प़षात सध्या तो आहे? पूर्वी होता? (हे थोडे साधे ठेवण्यासाठी आपण हे भारतापुरतेच मर्यादित ठेऊयांत. कारण बाहेरील नेत्यांविषयी आपली माहिती मर्यादित असेल. हेही एक ह्यानिमीत्ताने मी नमूद करतो-- इतर कुठल्याही पक्षाचे समर्थक त्यांच्या नेत्याविषयी इतके उदासिन दिसत नाहीत-- अगदी केजरीवालच्या आपचे समर्थकही.
  • Log in or register to post comments
र
रावसाहेब चिंगभूतकर गुरुवार, 07/15/2021 - 13:37 नवीन
फक्त त्याबाबतीतच नव्हे, इतरही बाबतीत असाच बोटचेपेपणा अनुभवास येतो. आणि फक्त अशा फोरम्स वरच नव्हे, तर समोरासमोर च्या चर्चेत सुद्धा. म्हणा ना, "भारत हे हिंदुराष्ट्र व्हावे हे माझे मत आहे", किंवा "काँग्रेसमुक्त भारत हाच सुखी भारत"! तर ते तसं म्हणणार नाहीत. भारतात मुसलमान जास्त सुखी आहेत त्याचे कारण हिंदू सहिष्णू असतात असं काही तरी तर्कट मांडत बसतात. डायरेक्ट बोलायला लोकांना लाज वाटते की काय कोण जाणे. कुणी तरी "यांनी पोलीस केसेस केल्या म्हणून त्यांनी ईडी लावली आणि म्हणून भाजप सरकार हे सुद्धा भाजप विरोधी सरकार प्रमाणेच आहे" असं काही तरी तर्कट लावलं तर हो ला हो म्हणून माना डोलावतात. भारत पाकिस्तान दोन्ही देशातली जनता एकमेकांवर प्रेम करते असं कुणी तरी फालतू लिहिलं तरी हो करतात. "पण काय करणार, पाकिस्तानातली आर्मी वाईट" असं काही तरी गुळमुळीत बोलतात. हाच प्रयत्न आधीच्या काँग्रेस सरकारने केला. "आम्ही पहिल्यांदा अणुबॉम्ब वापरणार नाही". "स्वतः हल्ला करणार नाही". इ.इ. मी अशा वेळी सरळ उलटा स्टान्स घेतो. हो, आम्हाला पाडायचच आहे हे सरकार; हो, आम्हाला पाकिस्तानला आणि तिथल्या जनतेला पण संपवायचं आहे; हो, आम्हाला हिंदुराष्ट्रच हवं आहे आणि बाकीचे इथे दुय्यम नागरिकच असतील असं म्हटलं की हा सेक्युलर प्रयत्न गप्प होतो.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Wed, 07/07/2021 - 08:28 नवीन
दिग्गज अभिनेते दिलीप कुमार ह्यांचे ९८ व्या वर्षी निधन. एकूण ६५ चित्रपट त्यानी केले. राज-देव-दिलीप पैकी दिलीप हे त्या पिढीतले हयात असणारे अभिनेते होते. भावपूर्ण श्रद्धांजली
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Wed, 07/07/2021 - 11:10 नवीन
वाचून वाईट वाटले...
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 07/07/2021 - 12:06 नवीन
त्या मुळे दिलीप कुमार ह्यांचे जाणे ही काही दुःखद घटना नाही.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Wed, 07/07/2021 - 14:12 नवीन
कोणाचा रे तू राजेशा? सभ्यतेचे काही संकेत असतात.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Wed, 07/07/2021 - 16:40 नवीन
वाह. दुःख झाले नाही तर ठीक आहे हो. मला दुःख झालेच नाही सांगायची काय गरज आहे ?
  • Log in or register to post comments
ग
गुल्लू दादा Wed, 07/07/2021 - 18:02 नवीन
एखाद्या कलाकाराचे जाणे काहीच वाईट नाही असे म्हणणे त्यालाच शोभते ज्याला कलेची आवड नाही. त्यामुळे तुमच्या वाक्याशी सहमत नाही. असे वाक्य फक्त वादविवाद वाढवू शकतात. सहमती नाही.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 07/07/2021 - 16:52 नवीन
सर्व धर्मांना,जाती ना प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे.सर्व राज्यांना पण योग्य प्रतिनिधित्व मिळणे गरजेचे आहे. आताच्या भारताच्या केंद्रीय मंत्री मंडळात मुस्लिम धर्माला प्रतिनिधित्व न देणे हे काही चांगले लक्षण नाही.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Wed, 07/07/2021 - 17:20 नवीन
मुस्लिम धर्माला प्रतिनिधित्व
असं घटनेत कुठे लिहिलं आहे?
  • Log in or register to post comments
र
रावसाहेब चिंगभूतकर Wed, 07/07/2021 - 19:21 नवीन
झालं! म्हणजे आता त्यांनी घटना पण वाचायची? अरे कुठे नेवून ठेवलाय मिपा माझा !!
  • Log in or register to post comments
क
कोण Wed, 07/07/2021 - 20:24 नवीन
राजेश१८८ - जरा नीट माहिती घ्या लिहीण्या आधी. Mukhtar Abbas Naqvi गूगल करा.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Wed, 07/07/2021 - 19:11 नवीन
ए आर रेहमानचे पूर्वीचे नाव दिलीप कुमार होते आणि त्याच्या पत्नीचे नाव सायरा बानू आहे असे वाचले !
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Sat, 07/24/2021 - 14:17 नवीन
तो यशस्वी झाल्यावर अनेक लोकं भेटत अन विचारत असत की जर त्यांनी त्यांचा धर्म बदलला तर ते देखील यशस्वी होतील का त्यावर रेहमान हसून उत्तर देत असे नो, दॅट्स नॉट हाऊ इट वर्क्स :)
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 07/08/2021 - 06:37 नवीन
हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री विरभद्रसिंग यांचे निधन झाले आहे. ते वेगवेगळ्या कारकिर्दीत राज्याचे २० पेक्षा जास्त वर्षे मुख्यमंत्री होते. Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Sat, 07/10/2021 - 16:57 नवीन

तोल सांभाळा ⁦@BhaiJagtap1⁩ . महाराष्ट्रात अभद्र आघाडी करताना राजकीय तोल गेलाच आहे. तुमचे ओझे पेलताना दोन बैलांनी अंग काढून घेतल्यावर आता सगळे काँग्रेसी कोसळात तसे राज्याच्या राजकारणातही होईल. गाडीला कोणते दोन बैल जोडावे याचा आधीच विचार करा. pic.twitter.com/OzvZelLRHt

— Keshav Upadhye (@keshavupadhye) July 10, 2021
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Mon, 07/12/2021 - 15:19 नवीन
क्युबाच्या कम्युनिस्ट सरकारविरोधात लोक रस्त्यावर उतरले आहेत. गेली ६० पेक्षा जास्त वर्षे कम्युनिस्ट दमनचक्राखाली राहिलेल्या क्युबन लोकांची स्वातंत्र्याची मूलभूत प्रेरणा उफाळून आली. कधीतरी हे होणारच होते. लवकरच क्युबातून कम्युनिस्ट राजवटीचे समूळ उच्चाटन होईल आणि क्युबातील लोकही स्वातंत्र्याचा अनुभव घेऊ शकतील ही अपेक्षा. आपण आरोग्यक्षेत्र आणि शिक्षणात अगदी फार मोठी क्रांती केली आहे असा या डाव्या राजवटींचा नेहमीच दावा असतो. पण ते बिंग कधीनाकधी फुटतेच. क्युबात ते फुटले म्हातार्‍या झालेल्या फिडेल कॅस्ट्रोवर उपचार करायला स्पेनहून डॉक्टर बोलवावा लागला तेव्हा. भारतातल्या डाव्या पुरोगामी विचारवंतांचा लाडका चे गव्हेरा याच फिडेल कॅस्ट्रोच्या मंत्रीमंडळात मंत्री होता. त्याने क्युबात फायरींग स्क्वाडद्वारे हजारो लोकांना ठार मारले होते. (एकीकडे अहिसेंचे जप जपणार्‍या आपल्या पंतप्रधानांनी असल्या खुनशी दहशतवाद्याला क्रांतिकारक असे म्हणत दिल्लीत घरी प्रमुख पाहुणा म्हणून बोलावून मोठा सन्मान केला होता). कम्युनिस्ट राजवट अशी सरकारी दहशत असते तोपर्यंतच चालू शकते. जेव्हा त्या दहशतीची पकड सैल व्हायला लागले तेव्हा ही जुलमी राजवट पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळते हे जगात अनेक ठिकाणी बघायला मिळाले आहे. पण ही दहशत असते तेव्हा इतकी असते की तिथल्या लोकांना आपला जीव धोक्यात घालूनही तिथून पळून जाणे नाहीतर तिथेच कुजून मरणे हे दोनच पर्याय शिल्लक राहतात. विकीपीडीयावरील बातमी खरी असेल तर अमेरिकेत २०१९ मध्ये २३ लाख ८१ हजार क्युबन वंशाचे लोक होते. आणि खुद्द क्युबाची २०१९ मधील लोकसंख्या किती? तर १ कोटी १३ लाख. म्हणजे गेल्या ५० वर्षात क्युबातून किती लोक अमेरिकेत पळून गेले असतील बघा. आणि असे समुद्रातून पळून जाताना किती लोक मरण पावले असतील कोणाला माहित. इतक्या लोकांना इतकी वर्षे गुलामीत ठेवणारी ही राजवट लवकरात लवकर नष्ट व्हावी ही सदिच्छा. हे सगळे होत असताना तरी जगातील मोठ्या विद्यापीठांमधील डाव्या विचारांनी भारलेल्या ढुढ्ढाचार्य प्रोफेसर लोकांना सद्बुध्दी सुचावी ही अपेक्षा.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Mon, 07/12/2021 - 20:34 नवीन
आपण आरोग्यक्षेत्र आणि शिक्षणात अगदी फार मोठी क्रांती केली आहे असा या डाव्या राजवटींचा नेहमीच दावा असतो. पण ते बिंग कधीनाकधी फुटतेच.
थोडक्यात सर, डॉ व प्रा हे टोटल गंडलेलेच प्रकरण असते म्हणताय का डावीकडे ?
हे सगळे होत असताना तरी जगातील मोठ्या विद्यापीठांमधील डाव्या विचारांनी भारलेल्या ढुढ्ढाचार्य प्रोफेसर लोकांना सद्बुध्दी सुचावी ही अपेक्षा.
काही लोक मानसिकदृष्ट्या आतून इतके कमकुवत झालेले असतात की तर्कशुद्ध विचार करता आला नाही तर ते भयंकर अस्वस्थ होतात चीडचीड व असुरक्षित फील करू लागतात, मानसिक पातळीवर म्हणून त्याना सतत भारलेले (नामस्मरणाने न्हवे तर तर्कशुद्धतेने) असणे व्यसन बनते त्यातून ते कधीच बाहेर न पडून निखळतेची अनुभूती विसरलेले सुप्तक्रांतीवादाचे आत्मकैदी असतात, मग ते ना तुमचे ऐकतील ना इतर कोणाचे... खरे तर असा प्राणी हार्मलेस असायला हवा आणि असतोही जोपर्यंत तो आतील गाठ आपसूक जपायच्या स्थानी नसतो म्हणूनच क्युबा अजून टिकला... त्याच्या भौगोलिक स्थानामुळे
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Tue, 07/13/2021 - 05:43 नवीन
थोडक्यात सर, डॉ व प्रा हे टोटल गंडलेलेच प्रकरण असते म्हणताय का डावीकडे ?
अगदी असेच. जगातील आघाडीच्या विद्यापीठांमध्ये समाजवादी/डाव्या विचारांनी प्रभावित असलेले अर्थशास्त्राचे प्रा.डॉंचा आकडा बघितला तर हैराण व्हायला होईल. हार्वर्ड, केंब्रिज, बर्कले वगैरे या लोकांचे मोठे बालेकिल्ले आहेत. यांचे एक आश्चर्य वाटते. अगदी इकॉन-१०१ म्हणजे अर्थशास्त्रातील पहिला कोर्स त्यांनी घेतलेला असतो त्याला हरताळ फासणारी मते त्यांची असतात. उदाहरणार्थ मागणी-पुरवठा न्यायाने 'इक्विलिब्रिअम पॉईंट'च्या वर मिनिमम वेज वाढवल्यास त्याचे दुष्परिणाम होतात हे अगदी इकॉन-१०१ मध्ये असते. पण तरीही या प्रोफेसर लोकांपैकी अनेकांचे मिनिमम वेज वाढवावे हे मत असते. वेनेझ्युएलाची समाजवादी धोरणांमुळे कशी वाट लागली आहे हे जगजाहिर आहे. पण २००७ मध्ये जोसेफ स्टिगलिझ या नोबेल पारितोषिक मिळालेल्या ढुढ्ढाचार्यांनी कॅराकसला जाऊन ह्युगो चॅवेझचे अगदी तोंड फाटेपर्यंत कौतुक केले होते. पण त्यानंतर ४-५ वर्षात त्याच धोरणांचे दुष्परिणाम समोर आल्यावर हे महाशय गायब झाले. आपल्या विषयाच्या मूलभूत तत्वांविरोधात मते ठेवली तरी नोबेल पारितोषिक मिळाले असे इतर कोणत्याही विषयाच्या बाबतीत होत नसावे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 07/13/2021 - 06:52 नवीन
अर्थ शास्त्रात नोबेल मिळवणारे एकंदर प्राध्यापक आणि शांततेसाठी नोबेल मिळवणारे एकंदर राजकारणी हे धन्यवाद लोकच आहेत. खरं तर हि दोन्ही नोबेल पारितोषिके हि मूळ नोबेल पारीतोषिकाला कलंकच आहेत असे माझे मत आहे.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Tue, 07/13/2021 - 07:11 नवीन
अर्थशास्त्राच्या नोबेलविषयी बराचसा सहमत पण १००% सहमत नाही. याचे कारण हे नोबेल पारितोषिक मिळालेल्या लोकांच्या यादीत पुढील मोठी नावेही आहेत- १. फ्रेडरीक हायेक २. मिल्टन फ्रीडमन ३. जेम्स बुकॅनन ४. गॅरी बेकर ५. डॅनिएल कॅनेमन ६. थॉमस सार्जंट ७. रिचर्ड थेलर पण त्याबरोबरच अमर्त्य सेन, अभिजीत बॅनर्जी, जोसेफ स्टिगलिझ वगैरे नावेही आहेत.
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Tue, 07/13/2021 - 07:17 नवीन
खरं तर हि दोन्ही नोबेल पारितोषिके हि मूळ नोबेल पारीतोषिकाला कलंकच आहेत असे माझे मत आहे. सहमत, मलाला आणि ओबामा यांना शांततेचा नोबेल पुरस्कार कशासाठी जाहीर झाला हे समजत नाही.
  • Log in or register to post comments
स
सुक्या Wed, 07/14/2021 - 11:13 नवीन
सहमत ... अगदी शब्दाशब्दाशी सहमत. अर्थशास्त्र व शांतता ... ही दोन्ही नोबेल फक्त चमकोगिरी साठी आहेत. (अर्थशास्त्रचे नोबेल हे "नोबेल मेमोरी प्राईझ" आहे. ते एक अजुन सबळ कारण चमकोगिरी साठी.)
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 07/14/2021 - 09:08 नवीन
क्युबा ह्या देशाला आंदोलन करण्याचं अनुभव आहे.आंदोलन होणे समाज जिवंत असण्याचे लक्षण आहे. आता पर्यंत क्युबा चा मानवी निर्देशांक उच्च च होता . भारता पेक्षा उत्तम. Source wikipedia. आता corona मुळे संकट आले आहे .ते प्रश्न सोडण्यास समर्थ आहेत. अमेरिका किंवा बाकी साम्राज्य वादी देशांनी तिथे हस्तक्षेप करू नये.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 07/13/2021 - 16:24 नवीन
हल्लीच अमेरिकेन नेव्हीने समुद्रात प्रचंड मोठा स्फोट घडवुन, त्यांच्या नौदलातील जहाजावर [ USS Gerald R Ford - सगळ्या नवी आणि सगळ्यात अद्ययावत आण्विक शक्तीने संचालित] त्या स्फोटामुळे काय परिणाम होतो हे पाहणे या स्फोटाचे कारण होते. [ यासाठी १८ टन स्फोटके वापरली गेली आणि या स्फोटामुळे 3.9 क्षमतेचा भूकंप उत्पन्न झाला. ] हा व्हिडियो मुद्दामुन मोठा आकारात देत आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति।तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः।।9.26।।
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 13 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 13 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 13 hours ago
  • सुंदर !!
    1 day 13 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 13 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा