सरकार व्यवस्थेची कोव्हिड हाताळणी तोलण्याचे निकष काय असावेत ?
चालू घडामोडी वरुन नवीन धागा. इथे भागवतजी म्हणतात त्याप्रकारे सांख्यिकी चर्चा झाली तरी हरकत नाही. आणि सगळे आकडे बकवास आहेत म्हणुन पट उधळुन लावणार्यांचे इथे काम नाही.
तर, राज्य/इतर व्यवस्थापन प्रदेशांच्या कामगिरीचे निकष काय असू शकतात-
१. केस संख्या, मृत्यु संख्या तसेच त्यांचे बाधितांसोबत्/लोकसंख्येसोबत गुणोत्तर-
ह्या निकषात थेट आकड्यांची तुलना तर चुकीची आहे हे स्पष्ट आहे. बाधितांच्या संख्येची एकूण लोकसंखेशी तुलना केल्यास त्या प्रदेशात संसर्ग किती पसरला हे समजेल. सरकारी व्यवस्थेच्या हातात खालीलप्रमाणे हत्यार असतात, संसर्ग रोखण्यासाठी-
१. टाळेबंदी, संचारबंदी, सो.डी. इत्यादी इतर नियम.
२. चाचण्या जोरात करुन बाधित व्यक्तींना वेगळे करणे.
३. लसिकरण. (अजुन सुचत असल्यास नक्की वाढवणे.)
वरील तिन गोष्टी निकष असू शकतात.
त्यापलिकडे, केवळ संसर्ग वाढला हा निकष पुरेसा नाही तर वरील पैकी कोणते हत्यार वापरले नाही हे सुद्धा समजणे गरजेचे आहे.
मृत्यु गुणोत्तराबाबत सुद्धा तेच मत आहे. केवळ मृत्त्यु गुणोत्तर हा निकष असू शकत नाही. तर, वैद्यकीय सुविधांअभावे किती रुग्णांचा मृत्यु झाला हा निकष असावा. त्यामुळे, ह्याबद्दलचा विदा भविष्यात उपलब्ध होईल अशी आशा करतो. कारण रुग्ण सेवेत सरकारी संस्थांचा सहभाग संसाधने उपलब्ध करुन देण्यापलिकडे असू शकत नाही.
२. वैद्यकिय संसाधने यांची उपलब्धता- प्राणवायू, व्हेंटिलेटर्स, औषधे, रुग्णपलंग संख्या, अतिदक्षता विभाग पलंग संख्या, वैद्यकिय कर्मचार्यांची संख्या.
ही संसाधने किती वेगाने उपलब्ध करण्यात आली, किती लवकर यांसाठी हालचाल सुरु झाली हा निकष असू शकतो.
हा झाला निकषांपुरता भाग. सांख्यिकी चर्चेसाठी प्रदीप यांच्या प्रतिसादांतून मिळालेले काही स्त्रोत-
https://www.covid19india.org/
https://www.mohfw.gov.in/
https://www.misalpav.com/comment/1110509#comment-1110509- आधी झालेली चर्चा
🗣 चर्चा
(65)
क
कॉमी
Fri, 05/06/2022 - 15:09
नवीन
एक्सेस मोरटालिटी वरून WHO ने सुद्धा अंदाज वर्तवला आहे. त्या अंदाजानुसार भारतात मृत्यूचे ९X अंडररिपोर्टींग झाले आहे. या धाग्यात लिहिल्याप्रमाणे- हे कॅल्क्युलेशन कोव्हिड काळात नेहमीपेक्षा अतिरिक्त मृत्यू किती झाले त्यावर अवलंबून आहे.
इजिप्त, भारत, पाकिस्तान, इंडोनेशिया या देशांमध्ये सर्वात जास्त अंडररिपोर्टींग झालेले दिसत आहे.
आणि अतिरिक्त मृत्यू आणि रिपोर्टेड कोव्हिड मृत्यू एकत्र धरल्यास पेरू, रशिया, साऊथ आफ्रिका आणि भारत या देशांमध्ये सर्वात जास्त मृत्युदर आहे.
Who च्या या अंदाजानुसार एकूण १.५ करोड लोकांचा कोव्हिड मुळे मृत्यू झाला. एकूण रिपोर्टेड आकडा ५४ लाख आहे. म्हणजे ह्यातून असा अर्थ निघतो- कि मागच्या वर्षीच्या मृत्यूच्या आकडेवारीला चालू ट्रेंड प्रमाणे ऍडजस्ट केल्यावर, या वर्षी जितके अपेक्षित मृत्यू होते, त्यापेक्षा १.५ करोड जास्त लोकांचा मृत्यू झाला. आणि हे जास्तीचे मृत्यू बहुतांशी कोव्हिड औटब्रेक महिन्यांमधलेच आहेत.
अतिरिक्त मृत्यू गणन करण्यासाठी चुकीचे मॉडेल वापरले आहे असे भारत सरकार म्हणत आहे. त्यावर उत्तरादाखल WHO च्या टेक्निकल अडवायसरी ग्रुप सद्सयाने वापरलेल्या मेथडोलॉजीचा पेपर ट्विट करून स्पष्टीकरण दिले- कि भारताचा ऑल कॉज मृत्यू आकडा उपलब्ध नव्हता- पण विविध पत्रकारांनी जो डेटा CRS सिस्टीम मधून गोळा केलेला तोच वापरला आहे आणि स्टॅटिस्टिकल मॉडेल नाही वापरले. त्यावर , विविध राज्यांमधून मिळालेला all cause data हा verified नाहीये असे भारत सरकारने स्पष्टीकरण दिले.
https://www.thehindu.com/news/national/indias-excess-covid-deaths-statement-inaccurate-says-who-technical-group-member/article65335162.ece
भारत सरकारने अधिकृत all cause mortality data दिल्यावर काय बरोबर ह्यावर निष्कर्ष निघेल.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 05/06/2022 - 16:16
नवीन
अगतिक आरोग्य संघटनेपेक्षा भारतीय डॉक्टरांचा भारत सरकार वर जास्त विश्वास आहे.
भारतात इतक्या मोठ्या प्रमाणावर इतके मृत्यू ( एक कोटी अतिरिक्त मृत्यू ) लपवणे इतके सोपे नाही.
अगतिक आरोग्य संघटना चीनची बटीक आहे तेंव्हा चीन मधील मृत्यू दर कमी दाखवण्यासाठी जगभरातील विशेषतः भारत सारख्या अति लोकसंख्येच्या देशांतिल मृत्यू दार अधिक दाखवण्यासाठी हा चावट पणा असू शकेल.
त्यातून फायझर च्या PAXLOVID या औषधाची रेम्डेसीव्हीर आणि टॉसिलीझूमॅब सारखी तडाखेबंद विक्री अजून व्हायची आहे.
हे अर्थकारण आणि राजकारण आहे.
तेंव्हा चालू द्या
- Log in or register to post comments
क
कॉमी
Fri, 05/06/2022 - 16:51
नवीन
एक कोटी मृत्यू नाही, तर चाळीस लाख मृत्यू अंडर रिपोर्ट झालेत असे WHO म्हणते आहे. हे मृत्यू 'लपवलेत' असे त्यांचे म्हणणे नाही. ते मृत्यू मृत्यू म्हणून नोंद झालेले आहेत. पण त्यांचे वर्गीकरण कोव्हिड म्हणून झाले नाही. पण हे चाळीस लाख लोक गेल्यावर्षीपेक्षा 'अतिरिक्त' गेले आहेत, म्हणजे आतापर्यंतचा ट्रेंड पाहून जितके जायला हवे होते त्यापेक्षा जास्त गेले. बरेच अतिरिक्त मृत्यू कोव्हिड पीक वर होता त्याच वेळेस झाले आहेत.
एक कोटी पूर्ण जगभरातले अंडर रिपोर्टींग आहे.
- Log in or register to post comments
S
sunil kachure
Fri, 05/06/2022 - 17:16
नवीन
Covid मुळे मृत्यू ही term चुकीची आहे.
Covid काळात मध्ये झालेले मृत्यू हे योग्य वाक्य आहे
मग हे मृत्यू .
1)Covid मुळे झाले असतील
२)Covid वरील चुकीच्या उपचार मुळे झाले असतील.
३)बाकी आजार असणाऱ्या लोकांवर लॉक डाऊन आणि अनेक निर्बंध मुळे उपचार मिळाले नाहीत
इतर गंभीर आजार लॉक डाऊन मुळे detect jhale नाहीत म्हणून मृत्यू.
अशी अनेक प्रकारे विभागणी करता येईल ती विभागणी who नी ठरवून केली नाही.
Who दबावात आहे
- Log in or register to post comments
क
कॉमी
Sun, 01/14/2024 - 14:42
नवीन
https://journals.plos.org/globalpublichealth/article?id=10.1371/journal....
We find that the surveillance of pandemic mortality in India has been extremely poor, with around 8–10 times as many excess deaths as officially recorded COVID-19 deaths. India is among the countries most severely impacted by the pandemic, and the pandemic is the gravest mortality crisis India has faced since its independence.
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Sun, 01/14/2024 - 16:01
नवीन
हे त्रिवार सत्य आहे. त्यावेळी दैनिक भास्करने पोलखोल केली होती. अनेक ठिकाणी पत्रे लावून स्मशानभूम्या पॅक केल्या होत्या.
दानिक भास्करने हुशारी करून जिरोन कॅमेराने फोटो काढले, कोविड प्रोटोकोल प्रमाणे १०० चावर मृतदेहवदळत होते. पण सराकरी आकडा १५ होता. ह्याची शिक्षा म्हणून दैनिक भास्करचा चौकशा लावून “सरकारी” छळ करण्यात आला होता.
सरकारी आकडा फक्त साडे पाच लाख मेल्याचा आहे पण प्रत्यक्षात ३ ते ५ कोटींचा दरम्यान असावा.
- Log in or register to post comments
ट
टीपीके
Wed, 01/17/2024 - 11:06
नवीन
बाब्बो , म्हणजे २.५% ते ४% लोकसंख्या? यातील महाराष्ट्रातील किती? महाराष्ट्रातील घोषित आकडा किती आणि तुमच्या अंदाजाप्रमाणे खरा आकडा किती?
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 01/17/2024 - 14:11
नवीन
प्रत्यक्षात ३ ते ५ कोटींचा दरम्यान असावा.
छे छे
इतका कमी कसा असेल.
मोदी सरकारने कित्येक पार्थिवे खड्डा खणून त्यात गाडून टाकलेली असणार.
प्रत्येक चार जणांच्या कुटुंबात सहा तरी मृत्यू झालेले आहेतच.
प्रत्यक्षात मृत्यू चा आकडा निदान ३० ते ५० कोटींचा दरम्यान असावा.
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Wed, 01/17/2024 - 17:42
नवीन
युपीतील नदीकिनार्यावरील फोटो आठवत असतीलच??
- Log in or register to post comments
व
वामन देशमुख
Wed, 01/17/2024 - 18:42
नवीन
मॉर्फ केलेले फोटो आठवून काय करणार?
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 01/18/2024 - 04:00
नवीन
मोर्फ होते?? व्वा.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 01/18/2024 - 05:08
नवीन
नक्की किती पार्थिव शरीरे होती याचा आकडा सांगणार का?
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 01/17/2024 - 09:49
नवीन
लिंकवरील पान सपडत नाही.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
क
कॉमी
Wed, 01/17/2024 - 11:22
नवीन
पेपरचा पत्ता बदलला असे दिसते.
https://journals.plos.org/globalpublichealth/article?id=10.1371/journal.pgph.0000803
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 01/17/2024 - 16:46
नवीन
सुधारित दुव्याबद्दल आभार.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2