सरकार व्यवस्थेची कोव्हिड हाताळणी तोलण्याचे निकष काय असावेत ?
चालू घडामोडी वरुन नवीन धागा. इथे भागवतजी म्हणतात त्याप्रकारे सांख्यिकी चर्चा झाली तरी हरकत नाही. आणि सगळे आकडे बकवास आहेत म्हणुन पट उधळुन लावणार्यांचे इथे काम नाही.
तर, राज्य/इतर व्यवस्थापन प्रदेशांच्या कामगिरीचे निकष काय असू शकतात-
१. केस संख्या, मृत्यु संख्या तसेच त्यांचे बाधितांसोबत्/लोकसंख्येसोबत गुणोत्तर-
ह्या निकषात थेट आकड्यांची तुलना तर चुकीची आहे हे स्पष्ट आहे. बाधितांच्या संख्येची एकूण लोकसंखेशी तुलना केल्यास त्या प्रदेशात संसर्ग किती पसरला हे समजेल. सरकारी व्यवस्थेच्या हातात खालीलप्रमाणे हत्यार असतात, संसर्ग रोखण्यासाठी-
१. टाळेबंदी, संचारबंदी, सो.डी. इत्यादी इतर नियम.
२. चाचण्या जोरात करुन बाधित व्यक्तींना वेगळे करणे.
३. लसिकरण. (अजुन सुचत असल्यास नक्की वाढवणे.)
वरील तिन गोष्टी निकष असू शकतात.
त्यापलिकडे, केवळ संसर्ग वाढला हा निकष पुरेसा नाही तर वरील पैकी कोणते हत्यार वापरले नाही हे सुद्धा समजणे गरजेचे आहे.
मृत्यु गुणोत्तराबाबत सुद्धा तेच मत आहे. केवळ मृत्त्यु गुणोत्तर हा निकष असू शकत नाही. तर, वैद्यकीय सुविधांअभावे किती रुग्णांचा मृत्यु झाला हा निकष असावा. त्यामुळे, ह्याबद्दलचा विदा भविष्यात उपलब्ध होईल अशी आशा करतो. कारण रुग्ण सेवेत सरकारी संस्थांचा सहभाग संसाधने उपलब्ध करुन देण्यापलिकडे असू शकत नाही.
२. वैद्यकिय संसाधने यांची उपलब्धता- प्राणवायू, व्हेंटिलेटर्स, औषधे, रुग्णपलंग संख्या, अतिदक्षता विभाग पलंग संख्या, वैद्यकिय कर्मचार्यांची संख्या.
ही संसाधने किती वेगाने उपलब्ध करण्यात आली, किती लवकर यांसाठी हालचाल सुरु झाली हा निकष असू शकतो.
हा झाला निकषांपुरता भाग. सांख्यिकी चर्चेसाठी प्रदीप यांच्या प्रतिसादांतून मिळालेले काही स्त्रोत-
https://www.covid19india.org/
https://www.mohfw.gov.in/
https://www.misalpav.com/comment/1110509#comment-1110509- आधी झालेली चर्चा
टेस्ट इमेज महीती एकत्र केल्याबद्दल धन्यवाद.
1. TN & Karnataka excess deaths are for months of April & May 2021 only.
2.Uttar Pradesh Data is only for 24 districts out of 75, and the data is for a longer period than others-(Jul20-March 21) It does not yet factor in April and May 21.
1. TN & Karnataka excess deaths are for months of April & May 2021 only.
2.Uttar Pradesh Data is only for 24 districts out of 75, and the data is for a longer period than others-(Jul20-March 21) It does not yet factor in April and May 21. आणि, स्त्रोत अमेरिकेत मार्च २०२०-जानेवारी २०२१ मध्ये झालेल्या excess mortality पैकी ७२% मृत्यु कोव्हिडमुळे झाले होते. भारतात ह्याचे प्रमाण खुप जास्त वेगळे असायचे कारण दिसत नाही. भारतात पाच राज्यान्मध्ये जानेवारी-मे २०२१ मध्ये ४,६०,००० जास्त मृत्यु झाले. त्यापैकी फक्त ६% मृत्यु कोव्हिड मृत्यु म्हणून नोंदवले गेले आहेत. आणि ही excess mortality एप्रिल आणि मे मध्येच सामावली आहे, त्यामुळे या मृत्युंचे कारण एकतर कोव्हिड/पोस्ट-कोव्हिड रोग किंवा इतर रोगांसाठी उपचार न मिळणे हे आहे असे दिसते, नाहीतर एप्रिल-मे मध्ये इतक्या जास्त संख्येत मृत्यु होण्याचे इतर काही कारण असू शकत नाही.
भारताचा अधिकृत कोव्हिड मृत्युदर सुद्धा इतर देशांच्या तुलनेत खुप कमी दिसत आहे.
आणि, राज्यनिहाय आकडेवारी- excess mortality च्या किती टक्के मृत्यु कोव्हिड मृत्यु म्हणुन नोंदवले गेले- ही माहीती- (जितके जास्त-तितके अन्डरर्रिपोर्टिन्ग कमी)
एकूण काय, मृत्युचा आकडा खूप जास्त अन्डररिपोर्ट झाला आहे.