Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - जून २०२१ (भाग २)

म
मदनबाण
Sat, 06/05/2021 - 16:57
🗣 216 प्रतिसाद

Lakshadweep is India’s jewel in the ocean.

The ignorant bigots in power are destroying it.

I stand with the people of Lakshadweep.

— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 26, 2021

The people of Lakshadweep deeply understand and honour the rich natural and cultural heritage of the islands they inhabit. They have always protected and nurtured it.
The BJP government and its administration have no business to destroy this heritage, to harass the people… 1/3

— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) May 25, 2021
गांधी भाऊ आणि बहिण यांना इतक्या वर्षां नंतर लक्षद्वीप या छोट्याश्या बेटाची अचानक आठवण येउन, अचानक काळजी उत्पन्न होउन त्यांनी टिवटिवाट केला, इतर संबंधीत मिडिया देखील चाटुकारितेची संधी दवडणार कसा ? पण अचानक कुठेतरी गडबड झाली... कारण याच लक्षद्वीप बेटावर त्यांच्या तिर्थरुपांनी [ या सहलीत राहुल आणि प्रिया़का देखील अर्थातच होते. ] कशी सहल केली होती आणि त्या सहलीसाठी इंडियन नेव्हीला कसे दावणीला लावण्यात आले होते याची माहिती बाहेर येउ लागली ! ती माहिती खालील व्हिडियोत आपणास पाहता येइल. मग अचानक या दोघांना त्या ट्रीपची आठवण न येता त्या लक्षद्वीप बेटाची काळजी का वाटली असेल ? त्याचे उत्तर तुम्हाला खाली मिळाले तर पहा !

मदनबाण.....


वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 70832 views

🗣 चर्चा (216)
आ
आग्या१९९० Mon, 06/07/2021 - 19:44 नवीन
मंजुल कारवाई टाळू शकतो. ह्या व्यंगचित्रात टेबलाखाली जोडीला नेहरूपण दाखवायचे.
  • Log in or register to post comments
स
साहना Mon, 06/07/2021 - 22:10 नवीन
आपल्या थोर राष्ट्राच्या सार्वभौमतेला अश्या प्रकारे खाजगी आणि वैयक्तिक टीका करून मंजुळ ह्यांनी बट्टा लावला आहे. चीन पाकिस्तान अमेरिका आणि सौदी अरेबिया सर्वाकडून ह्यांनी पैसे घेतले असावेत. त्यामुळे अफवा पसरवण्याच्या कायद्याखाली किंवा राष्ट्रद्रोहाचा कायद्याखाली देशांतील सर्वांत दुर्गम असा भाग आहे तिथे ह्यांच्या विरोधांत फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे. त्याशिवाय गुगल, ट्विटर इत्यादींनी ह्याला ban केले पाहिजे आणि ह्याचे सर्व OTP एका तासानेच डिलिवर होतील अशी शिक्षा द्यायला पाहिजे. म्हणजे कळेल कि विश्वगुरू राष्ट्राच्या प्रखर राष्ट्राभिमानी राजयोगीची खिल्ली उडवणे का चुकीचे आहे. बिरुटे ह्यांनी शेअर करून ते सुद्धा ह्या गुन्ह्यात accomplice आहेत, त्यांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे. त्यांना प्रकाश जावडेकर ह्यांची मुलाखत १० वेळा पाहण्याची शिक्षा द्यावी. ज्या मिपाकरांनी हे कार्टून पहिले आहे त्यांनी डोळे फिनाईल घालून धुवावेत.
  • Log in or register to post comments
ल
लिओ Mon, 06/07/2021 - 20:26 नवीन
२०१४ पासुन इतिहास बदलत आहे. २०१४ पुर्वी जर फक्त ६० % लसीकरण भारतात होत होते आणि २०१४ ते २०२१ या कालावधीत भारतातील लसीकरण हे ९०% च्या वर गेले आहे. कदाचित हे बरोबर असेलच जर २०१४ पुर्वी भारतात लसीकरण हे फक्त ६० % पर्यंत होत होते तर............. २०१४ पर्यंत नुसत्या पोलिओच्या लसीकरणाचा दर सुध्दा १००% हा नक्कीच असु शकणार नाही. जर पोलिओच्या लसीकरणाचा दर ९०% पेक्षा कमी असेल तर २०१४ पर्यंत भारतात पोलिओ किती विदारक असता याची कल्पना करु शकाल काय ? या दाव्यानुसार एखाद्याला अफ्रिकेत जाण्याआधी यलो फिव्हर ची लस घेण्यासाठी कित्येक दिवस ताटकळत बसावे लागेल. इतिहास बदलणार काय ? Image removed. हे भाजपा उ. प्र. च्या ट्वीटर वरील बदलेले चित्र पं प्र मोदींशिवाय,,,, यावर वाद होऊ लागला म्हणुन पुन्हा ट्वीटरवर लावलेले चित्र Image removed. सांगण्याचा उद्देश "मल्टि टास्कींग " ला तयार रहा.....
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 06/07/2021 - 20:31 नवीन
https://www.lokmat.com/mumbai/arrey-handed-over-286-hectare-land-forest-department-chief-minister-uddhav-thackeray-tweeted-a601/ आरेची जागा वनविभागाला दिली. हा निर्णय आवडला. निवडणुक आचारसंहिता सुरू असतानाही एका रात्रीत २६०० वृक्षांची कत्तल करणाऱ्या फडणवीसांची अत्यंत चीड आली होती. निदान आता त्या जागेतच पुन्हा वृक्षलागवड व्हावी.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Tue, 06/08/2021 - 06:02 नवीन
काही दिवसांपासून ट्रम्पतात्या आपल्या मित्रांना "मी ऑगस्ट मध्ये पुन्हा सत्तेवर येईन, जेव्हा ballot लेखापरीक्षण अहवाल येईल." असे सांगतो आहे असे चर्चेत आहे. एका फंडरेसिंग मध्ये तात्या म्हणाला- "रिपब्लिकन पक्ष सिनेट घेणार , व्हाइट हाऊस घेणार,आणि तुम्हाला वाटते त्याच्या आधी हे होणार." किती स्वप्नरंजन करावे माणसाने ! रिपब्लिकन पक्षाने या व्यक्तीला स्वतःपासून दूर करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत नाहीतर अवघड आहे, रिपब्लिकन पक्षासाठीच !
  • Log in or register to post comments
स
साहना Tue, 06/08/2021 - 19:05 नवीन
ट्रम्प तात्या सध्या हिमेश रेशमिया लेव्हल वर पोचले आहेत. इतका मिस्प्लेंस्ड सेन्स ऑफ इगो आहे कि त्यांच्या भोवतालची मंडळी ह्यांचा पोपट करत आहेत. हिमेश ने काही हिट गाणी देऊन खूप पैसे केले मग त्याच्याच मित्रांनी त्याला हिरो बनण्याचा सल्ला दिला आणि सर्वानी मिळून व्यवस्थित लुबाडले. आज सुद्धा बिचारा कर्जझझ्झ हिट झाला आहे आणि पोरी आपल्यावर मरतात ह्या गैरसमजूतीत जगतो.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Tue, 06/08/2021 - 19:51 नवीन
एकदम चपखल तुलना !
आज सुद्धा बिचारा कर्जझझ्झ हिट झाला आहे आणि पोरी आपल्यावर मरतात ह्या गैरसमजूतीत जगतो.
😂
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Tue, 06/08/2021 - 10:34 नवीन
सत्तेत एकत्र नसलो तरी नाते तुटले नाही... :-)
  • Log in or register to post comments
स
सॅगी Tue, 06/08/2021 - 10:52 नवीन
अहो कसे तुटणार? टिकवण्याखेरीज दुसरा पर्याय आहे तरी का? "किंबहूना""माझे राज्य, केंद्राची जबाबदारी" अभियान राबवायचे असेल तर असे करावेच लागणार :)
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 06/08/2021 - 12:35 नवीन
त्याचा पहिला शोध घ्या.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Tue, 06/08/2021 - 12:48 नवीन
केंद्र सरकार अस्तित्वात आहे का
एक तांत्रिक प्रश्न. केंद्र सरकार अस्तित्वात नसेल तर शेतकर्‍यांना देशोधडीला लावणारे कायदे केले, कोरोना परिस्थिती व्यवस्थित हाताळली नाही वगैरे दिवसरात्र कोणाविरूध्द ठणाणा चालू असतो?
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Tue, 06/08/2021 - 12:56 नवीन
माहित नाही. असावे बहुतेक! ते मोदी का कुणितरी निवडुन दिलेले पं.प्र. आहेत म्हणे. असोत बापडे!
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 06/08/2021 - 13:36 नवीन
केंद्र सरकार अस्तित्वात नसल्याने आज जगातील सर्वोत्तम मुख्यमंत्री शिष्टमंडळ घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाच्या सरचिटणीसांच्या भेटीस गेले होते.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 06/08/2021 - 15:51 नवीन
लाखो मजूर लोक चालत त्यांच्या गावी गेली .अंतर पण कमी नाही 1500 km पेक्षा जास्त. योगी साहेबांच्या राज्यातील लोक पण चालत शहरा मधून गावी येत होते.सरकार नावाचे कुठेच अस्तित्व नव्हते.पोलिस राज चालू आहे असेच वाटत होते . तेव्हा पासून भारताला केंद्र सरकार आहे का हा प्रश्न नेहमी पडतो.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 06/08/2021 - 16:04 नवीन
मग या प्रश्नाचे उत्तर काय आहे?
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Tue, 06/08/2021 - 13:55 नवीन
https://www.majhapaper.com/2021/06/08/mahatma-gandhi-great-granddaughter-sentenced-to-7-years-in-prison-in-south-africa-for-fraud-and-forgery/
  • Log in or register to post comments
क
कॉमी Tue, 06/08/2021 - 14:10 नवीन
इंडियन एक्सप्रेसच्या एका अहवालानुसार दिसून आले आहे की कालच्या धोरणात्मक बदलाआधी जो कोटा खाजगी रुग्णालयांना होता, त्यातल्या ५०%+ जास्त लसी फक्त ९ खाजगी रुग्णालय साखळ्यांनी उचलल्या आहेत (फोर्टिस, रिलायन्स इत्यादी.). ह्या साखळ्या मेट्रो शहर आणि इतर मोठ्या शहारांमध्येच काम करतात. उरलेल्या लसी ३००+ ऑड रुग्णालयांची घेतल्या असून त्यातलेही बरेचशे रुग्णालय शहरांमध्येच आहेत. यावरून असे दिसते की जो खाजगी रुग्णालयांसाठी कोटा असतो तो बेसिकली शहरांसाठी असतो, ग्रामीण भागाचा त्यातील सहभाग नगण्य असतो. https://indianexpress.com/article/india/covid-vaccine-doses-private-hospitals-coronavirus-cases-7344769/
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Tue, 06/08/2021 - 14:35 नवीन
ग्रामीण भागात अजूनही 45 पेक्षा कमी वय असणाऱ्यांना लस मिळत नाही.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Tue, 06/08/2021 - 16:32 नवीन
शहरात सुद्धा १८-४४ स्लॉट मिळत नाहीये.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 06/08/2021 - 16:17 नवीन
चिनी विषाणूमुळे भारतात आजपर्यंत ३,५१,००० हून अधिक नागरिकांचा मृत्यु झाला आहे, त्यात महाराष्ट्रातील १ लाखाहून अधिक नागरिकांचा समावेश आहे. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Tue, 06/08/2021 - 18:11 नवीन

Welcum 2 Twitter pic.twitter.com/PsztOZaOlw

— Jerin Mathew (@browngunde) June 8, 2021
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Wed, 06/09/2021 - 06:18 नवीन
हे असले काहीबाही सर्वच बाजूंनी येथे टाकता येते. तुमच्याकडून ही अपे़क्षा नाही. असली साधार/ निराधार चित्रे व मीम्स वगैरे इथे आपण टाकत बसलो, तर त्याला अंत नाही. तेव्हा, कृपया हे तुम्हीतरी टाळा.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Wed, 06/09/2021 - 08:27 नवीन
असले काहीबाही इथे टाकले जात असतेच कि. काही बोलले कि सामना वाचतात, त्याचा "योग्य वापर" करून मग वाचतात इत्यादी प्रतिक्रिया इथे आल्या आहेत. त्यामुळे मी काही आधीच खूप वर असलेला बार खाली आणतोय असे मला वाटले नाही. असो, नोटेड. पुढे होणे नाही.
  • Log in or register to post comments
स
समाधान राऊत Tue, 06/08/2021 - 18:26 नवीन
आजची भेट म्हणजे दिदींच्या जळजळीमुळे घेतलेली आत्म सांत्वना दुसरे काय !!
  • Log in or register to post comments
क
कॉमी Tue, 06/08/2021 - 18:50 नवीन
१)केरळ मधील भाजपा अध्यक्षावर (सुरेंद्रन) बसपाच्या उमेदवारास निवडणुकीतून माघार घेण्यासाठी २.५ लाख रुपयांची लाच दिल्याचा आरोप झाला आहे. सुरेंद्रन ह्यांच्याविरुद्ध तक्रार सुरेंद्रन यांच्या विरुद्ध उभारणारे कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार रामेसन यांनी केली आहे. आरोप सुरेंद्रन यांनी अमान्य केला आहे. २)तसेच, याच सुरेंद्रन व्यक्तीवर JRS पक्षाला NDA कडून निवडणूक लढवण्यासाठी १० लाख रुपयांची लाच JRS च्या अध्यक्षा जानु यांना दिल्याचा आरोप झाला आहे. आधी जानु यांनी १० करोड मागितले होते असे सुद्धा आरोपात आहे. हा आरोप jrs च्या खजिनदार व्यक्तीने केला आहे, आणि आरोपाचे समर्थन करणारी ध्वनिमुद्रिका सुद्धा आहे असे बातमीत म्हणले आहे. ह्या आरोपाला सुद्धा सुरेंद्रन यांनी धुडकावले आहे. ३) एका हायवे दरोड्यात २५ लाख रुपये चोरीला गेले म्हणून एका RSS सभासद व्यक्तीने तक्रार नोंदवली. त्या चोरीचा मग घेतल्यावर जास्त, म्हणजे ३.५ करोड रुपये सापडले. त्यामुळे काळा पैसा निवडणुकी साठी वापरला गेला आणि हवाला अश्या दोन शक्यता केरळ पोलीस तपासत आहेत. केरळ भाजपामध्ये अंतर्गत दुही माजली आहे असे सुद्धा एक्सप्रेस लेखात बर्याच नेत्यांनी निनावी पणे कबूल केले आहे. या घटनेचा तपास करण्यासाठी भाजपने निवृत्त आणि भाजपाशी संबंधित IAS अधिकाऱ्यांचे पॅनल बनवले आहे. पूर्व राज्य भाजप अध्यक्ष पद्मनाभन म्हणतात-
Senior leader and former party state president C K Padmanabhan said that everyone has to pay a price for their act. “That is nature’s law,” he said. “Nature as well as politics has become dirty — that’s all I want to say on World Environment Day.”
  • Log in or register to post comments
क
कॉमी Tue, 06/08/2021 - 18:54 नवीन
एका "वरिष्ठ भाजप नेत्याने" निनावी राहण्याच्या अटीवर असे कबूल केले की हायवे दरोड्याचे प्रकरण पक्षातल्याच एका फळीने घडवून आणले होते. जर पक्ष एकत्र असता तर हे उघडकीस आलेच नसते !
“The highway robbery case would not have come out had the party been united. It got exposed only because of factionalism,” the leader said, adding that the ‘robbery’, which some alleged as stage-managed, got reported to the police only because the rival faction “realised” the funds did not reach them or their candidates. “Now it has become a major embarrassment for the BJP and the RSS, because RSS leaders’ names are also dragged into it,” the leader pointed out.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 06/08/2021 - 18:58 नवीन
ज्या राज्यात एकाही भाजप उमेदवाराला अनामत रक्कम वाचविण्याएवढी मते सुद्धा मिळणे अवघड आहे, त्या राज्यात पैसे वाटून भाजप उमेदवार कशासाठी पैसे वाया घालवितील?
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Tue, 06/08/2021 - 19:00 नवीन
म्हणजे इतर ठिकाणी पैसे वाटतात मतांसाठी.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Tue, 06/08/2021 - 19:13 नवीन
निनावी वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना माहित. बघायचं, तपासात काय येतंय का पुढे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 06/08/2021 - 19:19 नवीन
१० कोटी मागितले पण शेवटी १० लाख दिले, हा आरोप वाचून हसू आवरले नाही. हे सर्व आरोप अत्यंत हास्यास्पद वाटतात.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Tue, 06/08/2021 - 19:30 नवीन
हसू येणे आणि हास्यास्पद वाटणे - काहीच हरकत नाही. भाजपाने स्वतः हे आरोप गंभीरपणे घेतले आहेत. आणि हास्यास्पद गोष्टी कधीकधी घडत असतात. त्या १० लाख रुपयांची एक ऑडियो टेप पण आहे असा आरोप आहे, हे विसरून चालणार नाही. (एक्सप्रेस लेखात आतमध्ये दुवा आहे, तो देतो- https://indianexpress.com/article/india/new-headache-for-kerala-bjp-audio-tape-on-pre-poll-cash-deal-with-ally-7341688/)
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 06/08/2021 - 20:19 नवीन
असल्या ऑडिओ टेप्सला तसा काही अर्थ नसतो. बघूया काय होतंय ते.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Tue, 06/08/2021 - 20:24 नवीन
http://toi.in/RixAzY26 आग्र्याच्या एका खाजगी रुग्णालयातून एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात इस्पिटलाचा मालक म्हणत आहे की "एक मॉक ऑक्सिजन ड्रिल करूया, कोणते पेशंट ऑक्सिजन नसले तर मरतील हे कळेल" या मालकावर वर आता २२ रुग्णांच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. (कारण तो म्हणतो- मॉक ड्रिल के बाद २२ छट गये) त्या आरोपात तथ्य नाही असे समोर आले तरी रुग्णाला असे तडफडवणे हे मानवतेला काळिमा फासणारे कृत्यच आहे. नर्स ने भरलेल्या सिरींज कचऱ्यात टाकल्या आणि ती नर्स मुसलमान होती म्हणून कान टवकारून आणि घसा फाडून ओरडणाऱ्या लोकांना यात व्यक्तीचा धर्म पहावा वाटणार नाही अशी शंका आहे. बघूया, काय म्हणतात द्वेष्टे मंडळी. https://youtu.be/Z0TLArCJdhA
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Wed, 06/09/2021 - 09:12 नवीन
दोन्ही प्रकार वाईट च. पण सोइस्कर गल्लत केली आहे. हे वाचा “Since everyone had been saying that oxygen must be used judiciously we decided to adjust levels to see if we could use less. We identified 22 patients who required high flow oxygen. We had sleepless nights over oxygen supply and this was our experiment to stabilise supply. We did not cut off oxygen as is being said everywhere. There is no irreversible impact of lowering oxygen supply,” आणि हे ही वाचा. “We get to hear rumours like vaccines sterilise people or that it’s Modi’s ploy to control the Muslim population,” he said, however, adding that “educated Muslims have come forward and got vaccinated”. धर्मामधे हराम असे कुणाचेतरी कुठेतरी वाचुन लसी कचरा कुंडीत फेकणे ह्याचे समर्थन कसे करणार? नर्स शिक्षित नव्हती काय का तिला लसीचे महत्व कळाले नव्हते?
  • Log in or register to post comments
क
कॉमी Wed, 06/09/2021 - 09:42 नवीन
धर्मामधे हराम असे कुणाचेतरी कुठेतरी वाचुन लसी कचरा कुंडीत फेकणे ह्याचे समर्थन कसे करणार?
कशावरून निष्कर्ष काढला ? जसे तो डॉक्टर म्हणतो मी काही केले नाही, तसे ती नर्स सुद्धा फार्मसी मालक मुद्दामून मी मुस्लिम असल्याने मला टार्गेट करतोय असे म्हणत आहे. धर्मामध्ये हराम हे वाचून केलं हा निष्कर्ष काय आधारावर? मुळात त्या नर्सने सुद्धा असे काही करणे अमान्य केले आहे.. असं काहीही आगापिछा नसताना कोणालाही जिहादी म्हणणे हे चूक आहे. हाच मुद्दा मला वरील बातमी देऊन दाखवायचा होता. जसे तो डॉक्टर काय म्हणतो हे पाहण्याची कर्टसी दिली तशी त्या नर्सला पण दिली जावी, हाच मुद्दा मला मांडायचा होता. त्या मॉक ड्रिल मुळे कोणी दगावले नाही ही चांगली बातमी आहे.
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Wed, 06/09/2021 - 11:54 नवीन
संधी नक्कीच दिली जाइल. पण ह्याच ताईंनी २५ मे ला कबुली जवाब दिला आहे. अचानक जवाब बदल व धर्माचा संबंध कुठुन आला? त्यांची फार्मावाल्या बरोबर काय खुन्नस होती जि त्यांनी गुलदस्त्यात ठेवली आहे? साक्षिदार पण आहे. Anu, who goes by a single name and was on duty with Khan on 22 May, said she saw Khan disposing of syringes without using them. “I could see she’s not pushing the injection properly. A patient also asked her to vaccinate him properly after he saw Khan just pricking him with a needle. २९ सापडल्या. किती फेक्ल्या असतील काय माहित :-( त्या २९ जणांना प्रमाणपत्र पण मिळाले (मोदींच्या फोटो सकट :-) ) अल्पसंख्यांचे (?) कार्ड खेळले कि बर्याचदा सर्व खोटे आणि निष्प्रभ करायचा मार्ग बराचसा मोकळा होतो किंवा होत असे. असो. बादवे: माझ्या प्रतिसादात मी जिहाद हा शब्द वापरलेला नाही ह्याची क्रुपया नोंद घ्यावी.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Wed, 06/09/2021 - 12:08 नवीन
तुम्ही जिहाद शब्द वापरला नाही मान्य. पण नर्सने जे केले ते धार्मिक पुस्तकात वाचून केले असे तुम्ही मानून चालला आहात. असो.
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Wed, 06/09/2021 - 12:51 नवीन
धार्मिक पुस्तकात च वाचून असे नाही. मध्ये असे काय झाले कि विचारात आणि क्रुतीत बदल झाला खानताईंनी स्वत:चे हि जानेवारीत लसीकरण करुन घेतले असेही वाचले! इत्यलम.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Wed, 06/09/2021 - 04:37 नवीन
मागच्या आठवड्यातील एक बातमी द्यायची राहिली. केरळ सरकारने अल्पसंख्यांकांसाठीच्या शिष्यवृत्त्यांमध्ये ८०% मुसलमानांना आणि उरलेल्या २०% ख्रिश्चनांना द्यायचा वादग्रस्त आदेश २०१५ मध्ये काढला होता. २०१६ मध्ये विजयन यांचे कम्युनिस्ट सरकार आल्यावरही तो कायम राहिला होता. तो आदेश घटनाबाह्य आहे असे म्हणत केरळ उच्च न्यायालयाने तो आदेश रद्द केला आहे. एकूणच कम्युनिस्ट आणि धर्मांध यापैकी दोघेही सत्तेत नसतात तोपर्यंत त्यांचे गळ्यात गळे असतात. अशावेळी धर्म ही अफूची गोळी आहे वगैरे गोष्टी कम्युनिस्ट बासनात गुंडाळून ठेवत असतात. भारत देशात ही परिस्थिती आहे. पण या दोघांपैकी एक गट सत्तेत आल्यास दुसर्‍याला अगदी दयामाया न दाखवता चिरडतो हे अनेक ठिकाणी बघायला मिळेल.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Wed, 06/09/2021 - 08:24 नवीन
धर्म हि अफूची गोळी आहे हे एकुलते एक म्हणून बघायला गेले तर बरेच आउट ऑफ कंटेक्सट घेतलेले वाक्य आहे. त्यात उलट मार्क्स धर्म हा गरीब, दु:खित आणि पीडितांच्या दु:खावरचे मलम आहे असे म्हणतो. म्हणजे, हे पर्टीक्युलर वाक्य खरेतर धर्माकडे सहानुभूतीचा नजरेतून बघते. बाकी धर्म म्हणजे गरिबांना आपले अन्याय सहन करायला लावण्यासाठी बनवलेली आणि पसर्वलेली गोष्ट वैगेरे मार्क्सची मते आहेतच, नो डाऊट.
"Religion is the sigh of the oppressed creature, the heart of a heartless world, and the soul of soulless conditions. It is the opium of the people."
आणि न्यायालयाने आदेश रद्द केला त्याचे स्वागत आहे.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Wed, 06/09/2021 - 08:28 नवीन
बरेच आउट ऑफ कंटेक्सट घेतलेले वाक्य आहे.
हे माहीत न्हवते... ही रुपेरी किनार खरोखर स्वागतार्ह.
बाकी धर्म म्हणजे गरिबांना आपले अन्याय सहन करायला लावण्यासाठी बनवलेली आणि पसर्वलेली गोष्ट
नक्किच, गरीबच का श्रीमंतही धर्माच्या दबावाखाली दबलेच जातात अशी सुधारणा हवी.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Wed, 06/09/2021 - 08:58 नवीन
नाही, दाबले तर सगळेच जातात. पण आपल्यावर होणारे अन्याय विसरण्यासाठी धर्म मदत करतो, असं मार्क्स म्हणतो. स्पेसिफिकली, क्रान्ती करणारा वर्ग, प्रोल्स (proletariat) यांना तात्पुरती शांती देऊन क्रान्ती करण्यापासून रोखतो. मार्क्स या शांततेला illusory happiness म्हणतो- भ्रामक शांती. त्यामुळे मला ही भ्रामक शांती काढून घ्यायची आहे, जेणेकरून त्यांना खरी शांतता मिळेल- असे तो म्हणतो. त्यापलीकडे मार्क्स ला अध्यात्म आणि धार्मिकतेबद्दल काहीही द्वेष नव्हता, उलट आयुष्यात ह्या गोष्टी गरजेच्या आहेत असे तो म्हणे. फक्त ह्या गोष्टी करायच्या असतील तर आधी शारीरिक आणि मटेरियल गरजा भागवणे आवश्यक आहे असे त्याचे म्हणणे होते. ओपियम रुपकात बसवायचे झाले तर-ओपियम मुळे वेदना विसरून व्याधी कडे न बघणाऱ्या माणसाला ओपियम सोडण्यास वळवावे, जेणेकरून व्याधींकडे पहिले जाईल, निराकरण होईल . त्यानंतर व्याधी निराकरण झाल्यावरसुद्धा ओपियमचा आनंद आनंदासाठी घेण्यास कोणाची हरकत असायचे कारण नाही.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 06/09/2021 - 09:50 नवीन
त्यानंतर व्याधी निराकरण झाल्यावरसुद्धा ओपियमचा आनंद आनंदासाठी घेण्यास कोणाची हरकत असायचे कारण नाही.
खूपच आशादायी व सुंदर वाक्य आहे. आवडले. . पण ओपिअम शिल्लक राहील अशी तुम्हाला आशा वाटते? कदाचित ओपिअम औषधालाही शिल्लक राहणार नाही अशीही अवस्था येऊ शकते. खरतर सगळ्या व्याधी व अन्याय संपल्यावर ओपिअमची गरजच का भासावी? किंवा खरतर मार्कस् वाद एवढ्या सर्वोच्च उंचीवर गेल्यावर ओपिअमच्या बाजूने कोणितरी बोलायची शक्यता तुम्हाला वाटते? शिवाय त्याला अजिबात विरोध न होता सगळे जण स्वखुषीने ती वक्तव्ये आनंदाने ऐकतील असं तुम्हाला खरोखरीच वाटते? का मार्कस् वाद एवढ्या सर्वोच्च उंचीवर गेल्यावर, ओपियमच्या बाजूने बोलायची कोणाची हिंम्मत होणार नाही अशी परिस्थिती असायची शक्यता असेल? असो. तुमच्या विचारांचा आदर आहेच. पण जगातील कम्युनिस्ट, हुकुमशाही, एक पक्ष पध्दती व विरोधी विचारांचा केला जाणारा बिमोड वगैरे बद्दल आत्तापर्यंत जे काही थोडसं आकलन झालंय त्यावर आधारित मनात शंका आल्या व त्या मांडल्या इतकेच. 🙏
  • Log in or register to post comments
क
कॉमी Wed, 06/09/2021 - 11:06 नवीन
मी एक सोशालिस्ट डेमोक्रॅट आहे. सोशालिस्ट हा शब्द खरेतर चुकीचाच, कारण आम्ही वेल्फेअर स्टेट पुरस्कर्ते आहोत. सोशालिस्ट हा शब्द अमेरिकन राजकारणातल्या अति उजव्या निओ लिबरल लोकांनी आम्हाला घ्यायला लावला, ते असो. वेल्फेअर स्टेट म्हणजे सोशलिझम पासून मैलोन मैल दूर आहे, आणि खऱ्या सोशलिझमच्या वाटेतला अडसर आहे. मार्क्स मी ज्याचा पुरस्कार करतो त्याला बुरज्वा ओपीएट म्हणला असता, धर्मासारखंच ! तर, मी डेमोक्रॅट सुद्धा आहे. म्हणजे लोकशाही चा पुरस्कर्ता. कोणत्याही धर्म/विचारांवर जबरदस्तीने बंदी आणणे हे मला पटणार नाहीच. पण हे मी नक्की सांगीन, जर धर्मामुळे स्वतःच्या आयुष्यातील दुःखांचा स्वीकार करून, मोक्ष/स्वर्ग/आफ्टरलाईफ वर लक्ष लागत असेल तर त्यातली आतार्किकता दाखवून देणे क्रमप्राप्त आहे. तार्किक प्रश्न विचारणे ह्यात काही गैर नाही. जर त्यातून धर्म नैसर्गिकरित्या संपून गेले तर मला अश्रू ढाळायचे कारण दिसणार नाही हे खरे. मात्र, दंडुका दाखवून धर्म पालन थांबवणे हे तिरस्करणीय वाटतेच. त्यासोबत हेही समजणे आवश्यक आहे की मार्क्स जेव्हा धर्म म्हणतो, त्याच्या डोळ्यासमोर प्रिडोमिनंटली ख्रिश्चन धर्म असतो. मार्क्स काय म्हणत होता याचे एक उदाहरण म्हणून व्हिन्सेंट व्हॅन गॉग या माधुरी पुरंदरे अनुवादित पुस्तकातील घटना सांगतो. (पुस्तक हाताशी नाहीये, कदाचित काही पैलू निसटले सुद्धा असू शकतात.) व्हिन्सेंट कोळसा खाणकामगारांच्या वस्तीत प्रिचर/प्रवचनकार म्हणून नेमला गेला होता. तिथे त्यांचे भयंकर आयुष्य पाहून तो मुळापासून हादरून गेला. अत्यंत हलाखीत ते जगत होते. त्यामुळे त्यांच्या सेवेत व्हिन्सेंटने स्वतःला झोकून दिले. त्याच्या पगाराचे सर्व पैसे तो त्यांच्यासाठी खर्च करू लागला, स्वतःचे आरामातले भाड्याचे घर सोडून भाडे वाचवण्यासाठी कामगारांच्या सारख्या खोपट्यात तो राहू लागला. घरी वापरण्यासाठी कोळसा मिळावा म्हणून त्यांच्यासारखेच दगडांच्या (कचऱ्याचा) ढिगात हात पाय खरचटवून कोळसा शोधू लागला. थोडक्यात, बायबल मधले अमूर्त विचार कोळसा कामगारांना पोहोचवण्यापेक्षा त्याला कामगारांचे भौतिक आयुष्य बदलणे कित्येक पट जास्त महत्वाचे वाटले. पण प्रिचर पदाची शोभा घालवली म्हणून एव्हनजेलिस्ट कमिटीने त्याचा हुद्दा काढून घेतला. थोडक्यात, व्हिन्सेंट कडून अपेक्षित होते ते इतकेच कि खाण कामगारांना प्रवचने देऊन त्यांना शांत ठेवणे. त्यांना मानसिक समाधान देणे, जमल्यास वैद्यकीय शुश्रूषा देणे. पण त्यांच्या भीषण परिस्थितीला अधोरेखित करणे हे त्याच्याकडून आजिबात अपेक्षित नव्हते. त्याऊलट, त्यांना "धीर" देणे आणि चालू परिस्थिती स्वीकारण्यास मदत करणे हे त्याचे अपेक्षित काम होते. ही घटना ओपीयेट रुपकातून पाहिल्यास तुम्हाला मार्क्सचे मत समजेल अशी आशा करतो. त्याचा आक्षेप धर्मावर नाही, तर त्याच्या ह्या उद्देशयावर आहे. धर्म नष्ट करणे हा त्याचा उद्देश नाही. धर्मामुळे मिळणारी आश्वत्तता भौतिक समाधानाशिवाय कशी पोकळ आहे हे दाखवणे त्याचे उद्दिष्ट आहे. आणि ते मलासुद्धा मनापासून पटते.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Wed, 06/09/2021 - 11:20 नवीन
हीच तर खरी गंम्मत आहे तिकडे तत्ववेत्ते तिकडच्या धर्मावर प्रहार करतात अन इकडले तो हवेतीत तीर अत्यंत आदराने स्व्तःमधे सामावुन घेतात आणी त्याहुन वाइट म्हणजे तो तीर जगातील सर्वधर्मावर सोडला आहे असे इकडचेही तिरासमोर मान तुकवणारे मानतात... फक्त भारताचा विचार केला तर मुळातच इथल्या धार्मीक (?) संस्कृतीतील उत्तमांनी कधीच उजवे डावे बघितले नाही तर फक्त योग्य अयोग्याची फिकीर केली म्हणूनच आर्य चाणक्य चंद्रगुप्ताला सर्व सरकारी अधिकार्‍यांची मालमत्ता ठरावीक वर्षांनी सतत जप्त केली जावी आणी त्यांचे त्यांच्या हुद्यानुसार पुनर्वसन करत रहावे अशीही सुचना देतो आणी ना ती डावी ठरवली जाते
  • Log in or register to post comments
क
कॉमी Wed, 06/09/2021 - 11:38 नवीन
आपला इतिहास आणि संस्कृती पाश्चात्त्यांपेक्षा अत्यंत वेगळी आहे, त्यामुळे पाश्चात्त्य तत्वज्ञान तोलताना आपल्या परिस्थितीचा विचार होणे गरजेचे आहे.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Wed, 06/09/2021 - 10:25 नवीन
पण प्रोब्लेम हा आहे की जे व्याधीमुक्त आहेत त्यांनाही मार्क्सवादीयांच्या रोषाला सामोरे जावे लागते त्याचे काय ?
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Wed, 06/09/2021 - 10:32 नवीन
पण प्रोब्लेम हा आहे की जे व्याधीमुक्त आहेत त्यांनाही मार्क्सवादीयांच्या रोषाला सामोरे जावे लागते त्याचे काय ?
आणि मार्क्सवाद हीच व्याधी असेल तर?
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Wed, 06/09/2021 - 10:37 नवीन
आणि मार्क्सवाद हीच व्याधी असेल तर?
अशक्य कारण ही बाब दैवी (अथवा निसर्ग निर्मीत) नसल्याने तो अपुरा, अप्रगत अथवा प्रसंगी कुचकामीही असु शक्तो... पण व्याधी नक्किच नाही. मानव निर्मीत प्रत्येक गोष्ट ही आधुनीक विज्ञाना इतकीच प्रयोगशील बाब आहे ज्यात सातत्याने सुधारणा करुन प्रगती साधता येउ शकते
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Wed, 06/09/2021 - 10:40 नवीन
अशक्य कारण ही बाब दैवी (अथवा निसर्ग निर्मीत) नसल्याने तो अपुरा, अप्रगत अथवा प्रसंगी कुचकामीही असु शक्तो... पण व्याधी नक्किच नाही. मानव निर्मीत प्रत्येक गोष्ट ही आधुनीक विज्ञाना इतकीच प्रयोगशील बाब आहे ज्यात सातत्याने सुधारणा करुन प्रगती साधता येउ शकते
सहमत. फक्त यात गोम अशी की मार्क्सवादात सुधारणा केल्यास तो 'मार्क्सवाद' राहणार नाही तर ती सुधारीत आवृत्ती मध्याच्या डावीकडे न राहता उजवीकडे सरकेल. :)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 13 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 13 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 13 hours ago
  • सुंदर !!
    1 day 13 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 13 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा