Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - जून २०२१ (भाग १)

व
वामन देशमुख
Wed, 06/02/2021 - 14:18
🗣 99 प्रतिसाद
जून महिन्याच्या चालू घडामोडींचा पहिला धागा काढतोय. गिधाडी_पत्रकारिता की गिधाडी_रुग्णसेवा जिथे रुग्णांच्या नातेवाईकांना प्रवेश करू दिला जात नाही, प्रवेश मिळालाच तर मोबाइल बाहेर ठेवावे लागतात, तिथे माइक, कॅमेरे, लाइट्स इ घेऊन ही बाई मोकाट फिरते.

I am in Bengaluru as we continue our on ground reportage for @themojostory. Inside this COVID ICU nearly every patient is under 40. "Death upon Death, Pain upon Pain, 20 % Mortality in ICU" says Dr Taha Mateen in this searing reality check. Full report: https://t.co/HcMYjSymJ7 pic.twitter.com/TqlPAvy8TU

— barkha dutt (@BDUTT) June 1, 2021
रुग्णालयेदेखील गिधाडी पत्रकारितेत सामील झाली आहेत का?

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 36075 views

🗣 चर्चा (99)
च
चंद्रसूर्यकुमार Wed, 06/02/2021 - 15:05 नवीन
एका गोष्टीकडे मिडियातील किंवा अन्य क्षेत्रातील लोकांचे पाहिजे तितके लक्ष गेलेले दिसत नाही. उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथसिंग रावत यांनी १० मार्चला शपथ घेतली. त्यावेळी ते उत्तराखंड विधानसभेचे सदस्य नव्हते. त्यामुळे त्यांना ९ सप्टेंबरपर्यंत विधानसभेवर निवडून जाणे भाग आहे. म्हणजे त्यांच्याकडे आता तीन महिन्यांहून थोडासाच जास्त काळ राहिला आहे. पोटनिवडणुक घ्यायची एक प्रक्रीया असते. त्याप्रमाणे कोणा आमदाराने राजीनामा देणे, तो विधानसभा अध्यक्षांनी मंजुर करणे आणि निवडणुक आयोगाला ती जागा रिकामी झाली असे कळविणे आणि मग निवडणुक आयोग तिथे पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करतो. त्यापैकी पहिली पायरीच पूर्ण झालेली दिसत नाही. तसेच उत्तराखंडमध्ये १५ ऑगस्टपर्यंत खूप पाऊस पडतो. त्यामुळे तोपर्यंत तरी पोटनिवडणुक व्हायची शक्यता खूपच कमी. आणि त्यानंतरही कोरोनामुळे पोटनिवडणुक होईलच याची खात्री नाही. तसे असेल तर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पोटनिवडणुक न झाल्यास तिरथसिंग रावत यांना राजीनामा द्यावा लागेल. नवा मुख्यमंत्री नेमताना भाजपने उत्तराखंड विधानसभेतीलच एखादा सदस्य नेमायला हवा होता. उत्तराखंड विधानसभेच्या निवडणुका पुढच्या वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये होणार आहेत. जर नवा मुख्यमंत्री नेमायची वेळ आलीच तर निवडणुकांना काही महिन्यांचाच अवधी राहिला असताना आणखी नवा मुख्यमंत्री नेमणे पक्षाला जड जाऊ शकेल. हीच गोष्ट बंगालमध्येही व्हायची शक्यता आहे. पण ममतांकडे ४ नोव्हेंबरपर्यंतचा म्हणजे आणखी जवळपास दोन महिन्यांचा अवधी आहे. आता दुसरी लाट थोडी कमी होत आहे अशी चिन्हे आहेत. समजा तोपर्यंत परिस्थिती आणखी नियंत्रणात आली तर बंगालमध्ये पोटनिवडणुक घेता येणे शक्य होईलही. पण तिरथसिंग रावतांची वाट थोडी कठिण दिसत आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 06/03/2021 - 08:40 नवीन
“तुझ्या बापाला,” नेटकऱ्याचा बाप काढल्याने मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर वादात.... "Mumbai Mayor Kishori Pednekar Controversial Tweet BMC Global Tender sgy 87 | "तुझ्या बापाला," नेटकऱ्याचा बाप काढल्याने मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर वादात | Loksatta" https://www.loksatta.com/mumbai-news/mumbai-mayor-kishori-pednekar-controversial-tweet-bmc-global-tender-sgy-87-2488123/lite/ ---------- काय बोलावं? ते सुचेना ....
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 06/03/2021 - 08:47 नवीन
काय बोलावं? ते सुचेना ....
शिवसेनेची खरी संस्कृती हीच आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी जाहीर सभेत काढलेली अनेक वक्तव्ये अशी होती की माझ्यासारखा कोणी सामान्य माणूसही मिपासारख्या सार्वजनिक संकेतस्थळावरही ती देऊ शकणार नाही. अशी वक्तव्ये नेत्यांनी जाहीर सभेत केली होती. इतकी वर्षे वाजपेयी आणि अडवाणी शिवसेनेला मान द्यायचे म्हणून शिवसेनेचे असले प्रकार मान्य नसूनही मनापासून समर्थन कधी केले नसले तरी विरोधही करत नव्हतो. पण आता ते बंधन अजिबात नाही. शिवसेना हा पक्ष महाराष्ट्राच्या सुसंस्कृत वगैरे परंपरेला काळीमा आहे हे नक्की.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 06/03/2021 - 09:49 नवीन
महाराष्ट्रात आहे म्हणूनच बाकी वचकून असतात.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 06/03/2021 - 10:01 नवीन
+१
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 06/03/2021 - 11:21 नवीन
शिवसेना हा पक्ष महाराष्ट्राच्या सुसंस्कृत वगैरे परंपरेला काळीमा आहे हे नक्की. + ९९९९९९९९९... जन्मापासून हा पक्ष असाच आहे व राहील.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 06/03/2021 - 13:03 नवीन
तसाच रहावा. तो तसा आहे म्हणूनच मराठी माणसाच्या मनात घर करून आहे. मोदी लाटेत ही ६३ आमदार मराठी माणसाने दिले त्याना. २०१९ ला भाजप ची सत्ता ऊलथवून त्यानी महाराष्ट्र वाचवला.
  • Log in or register to post comments
द
दिगोचि Fri, 06/04/2021 - 06:41 नवीन
या बाई त्यान्च्या पूर्वीन्च्या वर्तनावरून उर्मट आहेत असा माझा समज झाला आहे. यानीच कन्गना रनौतचे घर पाडायला परवानगी दिली होती. आपल्या हातातील पॉवरचा दुरुपयोग करण्यात या पुढे आहेत. आता माझा फोन दुसर्याने वापरला असे खोटे सान्गून आपल्यावरचा आळ दुसर्यावर ढकलत आहेत. भारतात अनेक राजकारणी असेच उर्मट्पणे सामान्य लोकाबरोबर वागतात. उदा. अजित पवार व पाणी तुटवडा.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sat, 06/05/2021 - 07:37 नवीन
थोरले ठाकरे होते तेंव्हा ते कोणत्याही नेत्याला मैद्याचे पोते, बारामतीचा म्हमद्या , गॅस सिलेंडर अशी भाषा वापरत. त्याबद्दल त्यांना कोणीच काही बोलू शकत नसे. सामनाच्या अग्रलेखात अजित दादाम्बद्दल : मुतर्‍या तोंडाचे पवार " असा अत्यंत हीन उल्लेख केला गेला होता. https://www.saamana.com/saamana-editorial-on-ajit-pawar-statement-on-shivsena-president-uddhav-thackeray-ayodya-tour/ अजित दादा त्या नंतर त्याबद्दल बोलले नाही. हा खरेतर त्यांचा सुसंक्रुतपणा आहे. पण असे कोणी सेने बद्दल बोलले तर सेनेने ते शब्द आजन्म लक्षात ठेवून व्यवहार केले असते. सेनेची कदाचित हीच सुसंस्कृती आहे.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Sat, 06/05/2021 - 07:47 नवीन
थोरले ठाकरे होते तेंव्हा ते कोणत्याही नेत्याला मैद्याचे पोते, बारामतीचा म्हमद्या , गॅस सिलेंडर अशी भाषा वापरत. त्याबद्दल त्यांना कोणीच काही बोलू शकत नसे.
मैद्याचे पोते वगैरे तरी खूप सुसंस्कृत शब्द झाले. त्यांनी जाहीर सभेत वापरलेले काहीकाही शब्द असे होते की ते मिपासारख्या पब्लिक फोरमवर लिहिता पण येणार नाहीत.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 06/05/2021 - 09:40 नवीन
नारायण राणेंनी २००५ मध्ये शिवसेना सोडल्यानंतर सामना अग्रलेखात जे लिहिले होते ते वाचूनच अत्यंत किळस आली होती. आपल्या अनेक वर्षांच्या सहकाऱ्याबद्दल इतके गलिच्छ किळसवाणे विचार कोणाच्या मनात असतील अशी कधी कल्पनाही केली नव्हती.
  • Log in or register to post comments
स
सुक्या गुरुवार, 06/03/2021 - 09:50 नवीन
निर्लज्ज पणाचा कळस आहे हा ... https://www.lokmat.com/mumbai/mumbai-mayor-kishori-pednekar-reaction-troll-social-media-objectionable-language-twitter-a681/ लोक निर्लज्ज असतात ... पण इतके? काय तर म्हणे माझ्या मोबाईल वरुन दुसर्‍या कुणी ट्वीट केले ... हे लोक बाकी लोकांना काय मुर्ख समजतात काय ? मोबाईल या बाईचा ... ट्वीटर अकाउंट तिचे ... आनी ट्वीट म्हणे दुसर्‍याने केले ... आणी तो शिवसैनीकाचा राग होता ... काय् च्या काय ...
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 06/03/2021 - 11:19 नवीन
ही महिला सेनेच्या उच्च परंपरेला साजेशी आहे.
  • Log in or register to post comments
इ
इरसाल गुरुवार, 06/03/2021 - 13:24 नवीन
कार्यकर्त्याने केले म्हणे माझ्या मोबाईलवरुन. त्याची हकालपट्टी केली म्हणे. "माझा मोबाईल माझी जबाबदारी" आता मा. उद्धव थाकेराय (टी एच ए सी के ई आर ए वाय) यांना राग नाही कां येणार कार्यकर्त्याची हकालपट्टी करतात म्हणजे काय????
  • Log in or register to post comments
स
सॅगी गुरुवार, 06/03/2021 - 14:54 नवीन
त्यांना जबाबदारी माहीतच नाही...जबाबदारीची वेळ आली की एकतर केंद्राकडे नाहीतर जनतेकडे बोट दाखवायचं.... =)) माझे राज्य...केंद्राची जबाबदारी
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 06/03/2021 - 15:03 नवीन
माझे राज्य...केंद्राची जबाबदारी ते वाक्य "माझे खाद्य, जबाबदारी इतरांची" असे हवे.
  • Log in or register to post comments
य
यश राज गुरुवार, 06/03/2021 - 15:20 नवीन
त्यांचं कसे आहे की झाडून वर पासून खाली पर्यंत सगळ्यांचा एकाच फंडा आहे की, काम करायची वेळ आली की "आलं अंगावर ढकल केंद्रावर" केलेलं काम अंगावर शेकण्याची वेळ आली की, "आलं अंगावर ढकल कार्यकर्त्यावर" बाकी बाईंचा साळसूदपणाचा आव म्हणजे एक नंबर
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 06/03/2021 - 17:03 नवीन
आलं अंगावर ढकल कार्यकर्त्यांवर; यापुढे माझा मोबाईल माझी जबाबदारी'; मनसेचा महापौरांना टोला..... ----------- https://m.lokmat.com/mumbai/mns-leader-sandeep-deshpande-has-taunt-mumbai-mayor-kishori-pednekar-a642/amp/
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 06/03/2021 - 15:32 नवीन
+1 केंद्र फक्त महाराष्ट्रातून भरभक्कम gst वसूल करण्यासाठी आहे हे गुलामांना कधी कळणार??
  • Log in or register to post comments
स
साहना Fri, 06/04/2021 - 00:17 नवीन
असेच व्यक्तव्य आम्ही केले असते तर काही नवीन IT कायद्याचा धाक दाखवून आम्हाला जेल मध्ये पाठवायला सरकारने कमी नसते केले. तिथे मग "फोन आणखी कुणी तरी वापरला" हा युक्तिवाद चालला नसता. आम्ही सहन करून घेतो म्हणून हे सर्व चालते.
  • Log in or register to post comments
स
संजय पाटिल Fri, 06/04/2021 - 10:07 नवीन
एक वेळ मान्य करू कि हे खरं आहे..... तरी राग कशाचा आला? याना साधे प्रश्न विचारले कि राग येतो? का? तुम्हाला आम्हीच निवडुन दिलय म्हण्ल्यावर प्रश्न विचारायचा अधिकार आहे अम्हाला.... त्यावर असे उत्तर? तेही महपौर पदावरील व्यक्ती कडुन? निर्लज्ज पणा आहे हा सगळा....
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 06/03/2021 - 09:47 नवीन
मुख्यमंत्री झाल्या बरोबर वादग्रस्त विधाने करत होते ते.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस गुरुवार, 06/03/2021 - 10:33 नवीन
https://www.loksatta.com/maharashtra-news/ranjit-disale-got-appointed-as-world-banks-educational-advisor-vsk-98-2488237/ सरांचे अभिनंदन
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 06/03/2021 - 14:43 नवीन
शिवसेनेत शिवीगाळ संस्कृती आधीपासुन आहेच. बाळासाहेब असताना मीडियावाले अशा विचाराना 'ज्वलंत विचार्/रोखठोक विचार' वगैरे म्हणत. 'काँग्रेस पक्ष म्हणजे हिजड्यांची फौज' आहे हे बाळासाहेबानीच २००९ मध्ये काढलेले उद्गार आहेत. असो. त्या मेहुल चोक्सीची भानगड काय आहे? तेथील कोर्टाचा निकाल यायच्या आधीच "आम्ही त्याला आणायला विमान पाठ्वतोय" असे जाहीरपणे सांगण्याचा मूर्खपणा सरकारने केला? की ही बातमीच खोटी आहे?
  • Log in or register to post comments
स
साहना Fri, 06/04/2021 - 02:41 नवीन
"जिसकी लाठी उसकी भैस" ही म्हण तो पर्यंत प्रिय असते जो पर्यंत लाठी आपल्या हाती असते. तीच लाठी दुसऱ्याच्या हाती गेली कि अचानक "अहिंसा परमो धर्म" वाटायला लागतो.
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 06/03/2021 - 15:41 नवीन
https://thewire.in/communalism/thrashed-for-phoning-delhi-police-helpline-muslim-man-needs-spinal-surgery दिल्लीत एका व्यक्तीला १०० वर कॉल केल्यासाठी पोलिसांकडून मारहाण आणि धर्माधारीत शिवीगाळ झाल्याचा आरोप झाल्याचे वृत्त आहे. सदर व्यक्तीला स्पायनल सर्जरी करावी लागणार आहे असे वृत्तात दिले आहे. व्यक्तीने पोलिसांविरुद्ध २० मे ला तक्रार नोंदवली असून अजुन काहीही हालचाल झाली नाही असे दिसते आहे. घटना सुद्धा आजच समोर येते आहे. https://timesofindia.indiatimes.com/world/rest-of-world/netanyahu-opponents-reach-coalition-deal-to-oust-israeli-pm/articleshow/83187488.cms बेंजामिन नेत्यानाहूंच्या विरोधकांनी युती करुन सत्तास्थापन करायचा मार्ग मोकळा केला आहे. नेत्यानाहू यांनी त्यांचा मित्र तात्यांच्या पावलावर पाऊल टाकून विरोधक कसे दुष्ट आणि अरब प्रेमी, आणि डावे वैगेरे नेहमीची रडारड चालू केली आहे. अजून नेत्यानाहूंकडे आठवडाभर वेळ आहे, त्यामुळे काय होते पाहायचे.
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 06/03/2021 - 15:59 नवीन
नाफ्ताली बेनेट २०२३ पर्यंत प्रधान मंत्री असेल, तर येर लापीद पुढे दोन वर्षे. नाफ्ताली बेनेट हा कडवा उजवा आहे. त्याची पॅलेस्टाईन बद्दलची मते नेत्यानाहू पेक्षा अति जास्त कडवी आहेत. येर लापीद हा सेक्युलर मताचा पुरस्कर्ता आहे. या भागीदारीत एक राम (!) नावाची अरब संस्था सुद्धा आहे. उजव्या प्रबळ गटाच्या सरकारमध्ये सहभागी होणारी पहीलीच अरब संस्था.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 06/04/2021 - 07:00 नवीन
नविन :- Muzlim Barbarians Slaughter Hindus, Mass-Rape Hindu Women After Muzlim-Pandering Political Party’s Electoral Victory in Bengal. Does anyone care? Victim Pregnant Mahadalit Hindu Lady Says, 4-5 Muslim Men Tried To Rape Her During The Muslim Mob Attack in Purnia Another Hindu Man, Gopal, Belonging to the Scheduled Caste lynched to death by Muslim Mob in Kalyanpuri, Delhi Rajasthan minor Hindu girl gang-raped by 4 Muslims; Pressure mounts on survivor to withdraw case - Organiser जुन्या :- ‘You Bring Pistol I Will Take Care Of The Rest’; Haryana Judge Accused Of Exhorting Muslims To Shoot Hindu Adversaries Blot on Muslims for being beaten up, get the pistol, I will take care of rest: Haryana judge Fakhruddin incites Muslims to shoot Hindu adversaries जाता जाता :- I was in Tehran, Iran n Hameed Ansari was ambassador in Tehran. Ansari had played a crucial role in exposing RAW set-up in Tehran endangering lives of RAW unit members. But this very man was made vice President for two consecutive terms.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Change your thoughts and you change your world. :- Norman Vincent Peale
  • Log in or register to post comments
क
कॉमी Fri, 06/04/2021 - 07:15 नवीन
सातत्याने खोट्या आणि द्वेषमूलक बातम्या पसरवण्यात हातखंडा दिसतोय. पुन्हा बंगालच्या खोट्या बातम्या सुरु केल्या. हेच ते क्रेटली वाले जे हाथरस मध्ये सगळी डाव्यांची कन्स्पायरसी आहे म्हणणारे. असल्या द्वेषमूलक साईटी तुम्ही वाचता ह्यात आश्चर्य काहीच नाही. https://www.altnews.in/who-runs-kreately-alt-news-investigates-the-factory-of-hate-and-misinformation/
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 06/04/2021 - 07:58 नवीन
सातत्याने खोट्या आणि द्वेषमूलक बातम्या पसरवण्यात हातखंडा दिसतोय. पुन्हा बंगालच्या खोट्या बातम्या सुरु केल्या. कॉमी तुम्ही कोणत्या दृष्टीने पाहता हे देखील उघड आहे, कारण बाकीच्या बातम्यां बद्धल तुम्ही सोयिस्कर मौन राखले आहेत ! एखादे पोर्टल खोटे आहे हे जरी मान्य केले [ ही माझी चूक मान्य करतो. ]तरी बाकीच्या बातम्यांचे काय ? मुस्लिम जज फकरुद्दिन आणि मुस्लिम उपराष्ट्रपती हमिद अन्सारी जे मोठ्या पदावर बसले होते यांच्या बद्धल तुम्ही का बोलायचे टाळले ? तिथे देखील तुम्हाला द्वेष दिसला काय ?तिथे तुम्हाला हिंदू द्वेष दिसला नाही का ? देश द्रोह दिसला नाही का ? योग्य बातम्यांना देखील न वाचण्याचा तुमचा हातखंडा आहे का ? ही मागच्या वर्षीची बातमी देखील वाचा :- ‘Bengal recorded over 200 rapes, more than 600 kidnappings in August’: Governor Jagdeep Dhankhar कोणाचे सरकार होते / आहे बंगाल मध्ये ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Change your thoughts and you change your world. :- Norman Vincent Peale
  • Log in or register to post comments
क
कॉमी Fri, 06/04/2021 - 09:19 नवीन
१. बंगाल मधील बलात्काराचे स्टॅटिस्टिक देऊन तिथल्या कायदा व सुव्यवस्थेबद्दल तुम्ही चिंता व्यक्त केली असती तर मी आजिबात आक्रमक झालो नसतो. तुम्ही TMC च्या सहाय्याने/दुर्लक्षाने मुसलमान व्यक्ती करत आहेत असे मांडले. जे असत्य आहे. हे आधी एकदा मांडले होते, तरी परत तुम्ही तेच टाकले. पुर्निया मध्ये झालेल्या घटनेत सुद्धा संशयितांना अटक झाली आहे. TMC गुन्हेगारांचे रक्षण करत आहे असे त्या घटनेवरून तरी कसे म्हणू शकता येईल ? २. तुम्ही चुकीच्या बातम्या टाकल्या तर त्या प्रतिसादातल्या योग्य त्या बातम्या दुर्लक्ष होऊ शकतात हे स्वाभाविक आहे. ३. कोणत्या बातमीवर टिप्पणी करायची, कोणत्यावर नाही हे ज्याचे त्याचे प्रिरोगेटिव्ह आहे. मी खात्री देतो, कि कोणताही गुन्हा मला समर्थनीय वाटत नाहीच. कोणत्याही धर्माच्या लोकांचा द्वेष सुद्धा मला समर्थनीय वाटत नाही. मिसळपाव वर हिंदू द्वेषाचा समाचार घेणारे भरपूर रथी महारथी आहेत. मी सुद्धा तेच करण्याची गरज नाही. पण इथे, याच साईट वर सरळसरळ शांतता प्रेमी ह्यांव आणि त्यांव करतात असे पडद्याआडचे द्वेषमूलक कंटेंट सतत आणि अत्यंत नॉर्मल म्हणून येत असते. आणि माझ्या इथल्या कारकिर्दीत जे पाहिले आहे ते बऱ्याचवेळा सरळ सरळ फेक बातम्यांवर आधारित असते, किंवा एखाद्या उदाहरणाने एक संपूर्ण समाज हिंदूनविरुद्ध मोठे षड्यंत्र रचतो आहे असे सुचवणारे असते. तिथे मी आणि कदाचित आणखी एखादे दुसरे लोकं असतील त्यांच्याशिवाय इतर कोणी चकार शब्द काढत नाहीत. ३. हे रॉ चे N K Sood हमीद अन्सारींवर देशद्रोहाचा आरोप करत आहेत का ? तसं असेल तर ट्विटर वर चिवचिव करण्यापेकशा कोर्टात जाऊन पुरावे देऊन अन्सारिना जेल मध्ये टाकावं. जर पुरावा नसेल किंवा देण्यात रस नसेल तर मग त्यांचे म्हणणे इग्नोअर केले जाईल. हे N K sood whatsaap university मधले ऍक्टिव्ह सदस्य आहेत असे दिसते.
N.K. Sood, former Research and Analysis Wing (RAW) officer and author of the book My Prime Minister Narendra Modi (Foreign Visits & Achievements) according to his Twitter bio (and yes, I verified the book title on Amazon), tweeted a picture of a sprawling building earlier this week with “This is the house of unemployed Ghulam Nabi Azad in Kashmir. See how much loot he has made." Within an hour someone had called him out, posting a screenshot of the same building from Booking.com. It was a popular hotel in Srinagar. This person had used a favourite tool of fact-checkers across the world.
त्यांच्या TL वर तो "British Herald" आणि मोदींचा व्हाट्सअप वरचा प्रसिद्ध फोटो पण आहे. ह्याचा अर्थ असा नव्हे कि सूद गृहस्थांचे बोलणे कधीही गंभीरपणे घेऊ नये. पण जर फक्त ट्विटर वरून तोंड वाजवण्यात त्यांना रस असेल तर माझ्याकडून दुर्लक्षच होईल. पुढील गोष्ट. एक सेकंड मानले अंसरींकडून काही चूक झाली. तुम्ही ताबडतोब त्यांच्या धर्माशी संबंध जोडला. का ? काय आधारावर ? जर हेच हिंदू व्यक्तीकडून झाले असते तर तुम्ही जोडला असता का धर्माचा संबंध ?
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 06/04/2021 - 10:42 नवीन
बंगाल मधील बलात्काराचे स्टॅटिस्टिक देऊन तिथल्या कायदा व सुव्यवस्थेबद्दल तुम्ही चिंता व्यक्त केली असती तर मी आजिबात आक्रमक झालो नसतो. तुम्ही TMC च्या सहाय्याने/दुर्लक्षाने मुसलमान व्यक्ती करत आहेत असे मांडले. जे असत्य आहे. हे आधी एकदा मांडले होते, तरी परत तुम्ही तेच टाकले. सर्व प्रथम मी तुम्हाला आक्रमक होउन प्रतिसाद देत नाही, दुसरी गोष्ट मी एका विशिष्ठ समाजा विरुद्ध मी द्वेष पसरवत आहे हा जो बिनबुडाचा आणि चुकीचा आरोप करत आहात, ज्याला माझा आक्षेप आहे,असा आरोप पुन्हा करु नका ! टीएमसीच्या या आधीच्या काळात देखील बलात्कार झाले आहे आणि त्याचीही बातमी दिलेली आहे. जो स्त्रीचा व्हिडियो दिला होता त्याची देखील सत्यता तुम्हाला मान्य नाही [ यात माझा दोष नाही ] तुमची योग्य अयोग्य मोजमाप करणारी फुटपट्टी माझ्या जवळ नाही. तुम्ही चुकीच्या बातम्या टाकल्या तर त्या प्रतिसादातल्या योग्य त्या बातम्या दुर्लक्ष होऊ शकतात हे स्वाभाविक आहे. वा रे वा ! तुम्ही माझ्यावर द्वेष केले जाण्याचा खोटा आरोप करता आणि ही असली पळवाट घेता ? याला शुद्ध मराठीत सिलेक्टिव्ह रिडिंग म्हणतात. पण इथे, याच साईट वर सरळसरळ शांतता प्रेमी ह्यांव आणि त्यांव करतात असे पडद्याआडचे द्वेषमूलक कंटेंट सतत आणि अत्यंत नॉर्मल म्हणून येत असते. आणि माझ्या इथल्या कारकिर्दीत जे पाहिले आहे ते बऱ्याचवेळा सरळ सरळ फेक बातम्यांवर आधारित असते, किंवा एखाद्या उदाहरणाने एक संपूर्ण समाज हिंदूनविरुद्ध मोठे षड्यंत्र रचतो आहे असे सुचवणारे असते. तिथे मी आणि कदाचित आणखी एखादे दुसरे लोकं असतील त्यांच्याशिवाय इतर कोणी चकार शब्द काढत नाहीत. तुम्ही फक्त मुस्लिम समाजाच्या मुलाला मारहाण केली गेली ही बातमी देता, तेव्हा तुम्ही त्यांचे प्रवक्ते ठरता का ? नाही ना ? पण काही कंटेट चुकीचे दिले गेले असेल पण अन्य योग्य असेल त्यावर तुम्ही काहीच बोलत नाही ना ! बरं मी माझी चूक स्पष्टपणे आणि इथेच उघडपणे मान्य केलेली आहे. मुळात बलात्कार ही कृती मुस्लिम आक्रमांकडुनच हिंदुस्थानात आलेली आहे. हे रॉ चे N K Sood हमीद अन्सारींवर देशद्रोहाचा आरोप करत आहेत का ? तसं असेल तर ट्विटर वर चिवचिव करण्यापेकशा कोर्टात जाऊन पुरावे देऊन अन्सारिना जेल मध्ये टाकावं. जर पुरावा नसेल किंवा देण्यात रस नसेल तर मग त्यांचे म्हणणे इग्नोअर केले जाईल. हे N K sood whatsaap university मधले ऍक्टिव्ह सदस्य आहेत असे दिसते. पुरावा देता येत नसेल म्हणजे गुन्हा झालाच नसतो काय ? तुम्ही ज्यांचे म्हणणे इग्नोर केले जाईल असे म्हणत आहात ते पिठाच्या गिरणीत काम करणारे नसुन रॉ सारख्या एजंन्सी मध्ये कामास होते आणि त्यामुळेच ते म्हणणे इग्नोर करण्या सारखे मुळीच नाही. एक सेकंड मानले अंसरींकडून काही चूक झाली. तुम्ही ताबडतोब त्यांच्या धर्माशी संबंध जोडला. का ? काय आधारावर ? जर हेच हिंदू व्यक्तीकडून झाले असते तर तुम्ही जोडला असता का धर्माचा संबंध ? हिंदू व्यक्ती किवा अन्य धर्माची व्यक्ती, देशद्रोहाचे काम करणारा हा देश द्रोहीच आहे. इथे अंसारी हे मुस्लिम आहेत तरी ते दोषीच झाले ना ? बरं हे धर्मा बाबतचे कारण तुम्ही मला चिकटवण्याचा प्रयत्न करताना धर्माने मुस्लिम असणार्‍या जज बद्धल आणि त्याने केलेल्या वक्तव्या बद्धल तुम्ही बोलत नाही ! मग मी तुम्हाला मुस्लिमांचे समर्थक म्हणायचे काय ? माझ्यावर मुस्लिम द्वेषाचा खोटा आणि अयोग्य आरोप करण्या बद्धल, मीच लिहलल्या प्रतिक्रिया आता खाली देउन ठेवतो :- https://www.misalpav.com/comment/508334#comment-508334 https://www.misalpav.com/comment/1005084#comment-1005084 https://www.misalpav.com/comment/1046393#comment-1046393 आता तुम्ही जर परत हा खोटा आरोप केलात, तर संपादक मंडळाकडे या आरोपाची तक्रार केली जाईल हे इथे स्पष्ट करुन ठेवतो. जाता जाता :- छत्रपती शिवाजी महाराज की सगी चाची महाबत / महावत खां नाम के सरदारने जब वे त्रंबकेश्वर दर्शन करने गयी थी, तब दर्शन के समय उठाके ले गये. [३२:१५] अंबरीष फडणवीस :- शिवछत्रपती का हिन्दवी स्वराज्य

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Change your thoughts and you change your world. :- Norman Vincent Peale
  • Log in or register to post comments
क
कॉमी Fri, 06/04/2021 - 11:04 नवीन
जरुर तक्रार करा. मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. तुम्ही दिलेल्या सगळ्या गोष्टींवर मी माझे मत द्यायला मी बांधील नाही आहे.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 06/04/2021 - 12:05 नवीन
जरुर तक्रार करा. मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. ठीक आहे, तक्रार करण्यात आलेली आहे. तुम्ही दिलेल्या सगळ्या गोष्टींवर मी माझे मत द्यायला मी बांधील नाही आहे. तुम्हीच केलेल्या खोट्या आरोपांना मात्र तुम्ही नक्कीच बांधील आहात.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Change your thoughts and you change your world. :- Norman Vincent Peale
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 06/05/2021 - 16:00 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- We are twice armed if we fight with faith. :- Plato
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला गुरुवार, 06/03/2021 - 16:41 नवीन
महाराष्ट्र टाइम्स अशी बातमी कशी काय देउ शकते ? https://maharashtratimes.com/gadget-news/science-technology/how-to-watch-ott-content-for-free-know-details/articleshow/83174400.cms
  • Log in or register to post comments
स
साहना Fri, 06/04/2021 - 02:42 नवीन
मटा वाले इतके भिकेला लागले आहेत का ?
  • Log in or register to post comments
स
सॅगी Fri, 06/04/2021 - 06:28 नवीन
त्यांची भीकेची पातळी इतकी खाली गेली आहे की आता दुसर्‍या मुखपत्रातील अ(ह)ग्रलेखावरही अवलंबून राहावे लागत आहे त्यांना..त्यावर बातमी देण्यासाठी..
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 06/03/2021 - 16:42 नवीन
मोदींवर आणि केंद्र सरकारवर टिका केली म्हणुन हिमाचल भाजपाच्या एका जिल्हाप्रमुखाने विनोद दुआवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. सुप्रिम कोर्टाने आरोप उडवुन १९६२चा निर्णय अबाधीत ठेवला. https://indianexpress.com/article/india/supreme-court-sedition-case-bjp-vinod-dua-7342138/
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 06/04/2021 - 10:28 नवीन
गुन्हा दाखल करून न्यायालयात गेले म्हणजे कायदा हातात न घेता कायदेशीर प्रक्रिया वापरली. आपल्यावर टीका केली म्हणून किंवा एखादे आलेले व्यंगचित्र पुढे पाठविले म्हणून गुन्हा दाखल करणे वगैरे कायदेशीर सोपस्कार न करता गुंड पाठवून उचलून आणून बेदम मारहाण करून हाडे मोडणे, या प्रकाराविरूद्ध भोंदू पुरोगामी तोंडातून चकार शब्द काढत नाहीत.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Fri, 06/04/2021 - 10:35 नवीन
राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करणे असमर्थनिय, २००% चूक. आणी कायदा हातात घेणे घोडचूक... थोडक्यात सर्व एका माळेचे मणी असताना राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करणाऱ्या विरुद्ध चकार शब्द न काढणे संवेदनशील नागरिक्तवाचा बळी देणे होय कोर्टाचा, भारतीय संविधानाचा विरोध होय
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 06/04/2021 - 10:48 नवीन
गुन्हा दाखल केला म्हणजे कायदेशीर प्रक्रिया वापरली ना. जर गुन्हा दाखल खरणे ही चूक होती तर न्यायालयाने खटला दाखल करून न घेता तातडीने रद्द करायला हवा होता. परंतु त्यात सुरूवातीला तथ्य वाटल्यानेच न्यायालयाने सुनावणी करून शेवटी निकाल दिला. या प्रकरणात कोणी कायदा तर हातात घेतला नाही ना. कायदेशीर मार्गाने गुन्हा दाखल करून न्यायालयात दाद मागणे आणि कायद्याला न जुमानता आपल्या विरोधकांना गु़डांची टोळी पाठवून उचलून घरी आणून बेदम मारहाण करणे यात १८० अंशांचा फरक आहे. त्यापेक्षाही वाईट गोष्ट म्हणजे ही मारहाण करणारे निवांत असून मंत्रीपदावर विराजमान आहेत.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Fri, 06/04/2021 - 10:52 नवीन
त्याचाही विरोधच करायला हवा _/\_
  • Log in or register to post comments
क
कॉमी Fri, 06/04/2021 - 11:49 नवीन
चालायचंच कि हो गुरुजी.सगळे सगळ्या बाबीतीत बोलतील असे कसे होईल ? मी माझ्यापुरते बोलायचे तर नौसेनिकाच्या मारहाणी बद्दल निषेध नोंदवला आहेच. भंपक भक्त सुद्धा भोंदू पुरोगाम्यांसारखेच वागतात हो. महाराष्ट्रात काही झाले की लगेच तांडव. हरियानाचा मुख्यमंत्र्याने थेट सांगितले की आम्ही आमच्या पूर्ण क्षमतेइतके लसीकरण करत नाही आहोत तरी अळीमिळी गुपचिळी काही भक्त ठेवतातच कि नई ? तसेच हे. ज्या गोष्टी दुसरा पक्ष बोलत माही आहे त्याच आपल्याला बोलालयला लागतात. त्याचा अर्थ न बोललेल्या गोष्टीबद्दल सहमती आहे असा होत नाही.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 06/03/2021 - 16:59 नवीन
भारतात खूपच लोक देशद्रोह करायला लागले आहेत. १) लाच घेणे हा देशद्रोह नाही २(बँका बुडवणे हा देशद्रोह नाही. ३)सरकारी योजना लाभार्थी नाहीत तरी पदरात पडून घेणे हा देशद्रोह नाही. ४)काळाबाजार करणे हा देशद्रोह नाही. ५)खोटी कागद पत्रे वापरून जमिनी ,फ्लॅट हडपने हा देशद्रोह नाही. ६)सांडपाणी ,मृत देह नदीत सोडून नदीचे पाणी दूषित करणे हा देशद्रोह नाही. ७) खोट्या डिग्री चा वापर करून व्यवसाय( डॉक्टर की इत्यादी) नोकरी करणे हा देश द्रोह नाही. ८) लोकांची काम लाच घेतल्या शिवाय करायचीच नाही अशी वृत्ती देशद्रोही नाही. ९) भेसळ करणे हा देश द्रोह नाही. १०)प्रतेक सरकारी कामात कमिशन घेणे देश द्रोह नाही. ११) टॅक्स बुडवने हा देश द्रोह नाही. असे खूप प्रकार आहेत त्या मुळे देशाला प्रचंड नुकसान होते पण तो देश द्रोह नाही . पण सरकार वर टीका करणे हा मात्र देश द्रोह आहे . अजब कायदा आहे. सरकारी गुप्त माहिती शत्रू राष्ट्राला देणे हा देश द्रोह होवू शकतो. विविध समाजात वितुष्ट निर्माण करणे हा देश द्रोह होवू शकतो. सरकार विरुद्ध सशस्त्र उठाव करणे हा देशद्रोह होवू शकतो. पण सरकार वर,नेत्या वर टीका करणे हा देश द्रोह कसा असेल
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 06/03/2021 - 19:14 नवीन
योग्य बोललास रे राजेशा. करोना व त्यातून ठप्प झालेली अर्थव्यवस्था ह्यामुळे केंद्र सरकार कोंडीत सापडले आहे. कोणत्याही देशात राष्ट्रिय संकट येते तेव्हा त्याची मुख्य जबाब्दारी देशप्रमुखावर व त्याच्या मंत्रीमंडळावर येते. तशीच ती मोदी सरकारवर आहे. त्यामुळे राष्ट्रीय व जागतिक पातळीवर टीका ही होणारच. जेवढे राष्ट्रद्रोहाचे खटले दाखल केले जातील त्याच्या कित्येक पटीने सुशि़क्षित मतदार भाजपापासुन दूर जातील.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 06/03/2021 - 17:15 नवीन
अटी-शर्तींसह चित्रिकरणाला परवानगी द्या; मनोरंजन क्षेत्राची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.... ------- "Allow Filming With Terms Demand For Entertainment Sector To The CM Uddhav Thackeray | अटी-शर्तींसह चित्रिकरणाला परवानगी द्या; मनोरंजन क्षेत्राची मुख्यमंत्र्यांकडे मागणी" https://marathi.abplive.com/news/mumbai/allow-filming-with-terms-demand-for-entertainment-sector-to-the-cm-uddhav-thackeray-989230/amp -------- आता बियरबार पण सुरू होतीलच.... सरकारचा खरा इंटरेस्ट, सिनेमा आणि बियरबार मध्येच दिसतो आहे...
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 06/03/2021 - 20:56 नवीन
हाय कोर्टासमोर सादर केलेल्या ड्रग नियंत्रकांच्या अहवालात गौतम गंभीरला परवाना नसताना औषधे साठवणे आणि वितरण करणे या बाबत दोषी मानलं गेलं आहे. ड्रग कंट्रोल ओथोरिटी ने याआधी काही दिवसांपूर्वी तुटवडा नव्हता असा निर्वाळा आणि गंभीरला क्लीन चिट दिली होती, तेव्हा हाय कोर्ट न्यायाधीश संतापले होते, कारण तपास झाला नव्हता. कोर्ट म्हणाले की तुझा हेतू चांगला असला तरी तू जे केलंस त्यामुळे रुग्णांची गैरसोय झाली आणि तुटवड्यामध्ये भर पडली. https://indianexpress.com/article/cities/delhi/unauthorised-purchase-distribution-of-favipiravir-gautam-gambhir-foundation-has-committed-an-offence-drug-controller-to-hc-7342346/lite/
  • Log in or register to post comments
स
साहना Fri, 06/04/2021 - 04:56 नवीन
भारतीय संस्कृतीत अत्यंत रूटेड असलेल्या आमच्या मराठी पर्यावरण मंत्र्यांचे ज्ञान खरोखर खूप छान आहे : https://www.youtube.com/watch?v=Wumj9ptG6ug
  • Log in or register to post comments
क
कॉमी Fri, 06/04/2021 - 05:51 नवीन
हीही This is concrete !
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 13 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 13 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 13 hours ago
  • सुंदर !!
    1 day 13 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 13 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा