चालू घडामोडी - मे २०२१ (भाग ५)
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन आज बरोबर दीड वर्ष पूर्ण झाले. त्यांना खऱ्या अर्थाने जेमतेम ३ महिनेच निर्वेध कारभार करता आला. त्यांनी शपथ घेतल्यानंतर ४ महिन्यांच्या आतच चिनी विषाणूने भारतात व महाराष्ट्रात धुमाकूळ घालायला सुरूवात केली व तो धुमाकूळ अजूनही सुरू आहे. या विषाणूचा भारताला व महाराष्ट्राला फार मोठा फटका बसला आणि अजूनही बसत आहे.
दुर्दैवाने एकूण रूग्णांची संख्या व एकूण मृत्यु यात अगदी प्रारंभापासूनच महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. यासाठी जनतेचा निष्काळजीपणा जेवढा कारणीभूत आहे तेवढीच केंद्र व राज्यसरकारची नियोजनशून्य उपाययोजना कारणीभूत आहे.
हे दीड वर्ष अत्यंत वादळी ठरले. महाराष्ट्रावर एकापाठोपाठ एक संकटे येत गेली. दुर्दैवाने बहुतेक सर्व प्रसंगात राज्य सरकारचे व मुख्यमंत्र्यांचे अस्तित्व क्वचितच दिसले. मागील सव्वा वर्षात मुख्यमंत्री बहुतांशी घरात बसून आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पूर्ण खेळखंडोबा झाला आहे. यातील काही संकटे अनपेक्षित निसर्गनिर्मित होती तर काही राज्य सरकारने स्वतः ओढवून घेतली होती. सुशांतसिंग राजपूत व त्यानंतर घडलेले महाभारत, कंगना रनौटवर सूडबुद्धीने केलेली कारवाई, टीकाकारांना मंत्र्यांनी घरी उचलून आणून बेदम मारणे, सचिन वाझे व अनिल देशमुख प्रकरण, संजय राठोड व धनंजय मुंडे प्रकरणे, औषध उत्पादकांना धमकावणे अशी अनेक प्रकरणे टाळता येण्यासारखी होती. राऊत, नबाब मलिक, पटोले, सचिन सावंत असे अनेक वाचाळ सरकारच्या बाजूने व भाजपविरूद्ध अत्यंत प्रक्षोभक वक्तव्ये करीत आहेत.
दुर्दैवाने विरोधी पक्ष म्हणून भाजपही अपयशी ठरला आहे. हे सरकार पडावे यासाठी फडणवीस व चंपा पाण्यात देव ठेवून वाट पहात आहेत. सुशांतसिंग प्रकरण, वाझे प्रकरण, प्रताप सरनाईकांवर धाड, १२ नियुक्त आमदारांची यादी अडवून ठेवणे अशा प्रकारातून सरकारची जास्तीत जास्त कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अत्यंत वाचाळ असलेले चंपा सरकार पडण्याचा रोज एक नवीन मुहूर्त सांगतात. आधी म्हणत होते की नोव्हेंबर २०२० मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीनंतर हे सरकार पडणार. नंतर म्हणायला लागते की २ मे नंतर हे सरकार पडणार हे शाळेतला मुलगाही सांगेल. आता म्हणतात महाराष्ट्र झोपेत असतानाच हे सरकार पडणार. नंतर म्हणाले की राज्यात सत्ताबदल निश्चित आहे व कसा होणार ते अजित पवारांना माहिती आहे. फडणवीस म्हणाले की २ मे नंतर हे सरकार पाडणार. पण हे सरकार काही केल्या पडत नाही.
भाऊ तोरसेकर व इतर काही पत्रकार सुद्धा सरकार पडणार अशी भाकिते सातत्याने करीत आहेत. अमित शहा व पवारांचं काहीतरी शिजतंय, महाराष्ट्रात काहीतरी घडणार अशी भाकिते किमान ७ महिन्यांपासून सुरू आहेत.
शरद पवार आजार किंवा कोणत्या तरी कारणाने मागील जवळपास २ महिन्यांपासून राजकारणापासून संपूर्ण दूर राहून गप्प आहेत. त्याचाही सोयिस्कर अर्थ काढला जात आहे.
एकंदरीत बार्शी लाईटच्या वेगाने या सरकारने दीड वर्षांची मजल मारली आहे. दीड वर्षात यांनी काहीही केले नाही व यांचे अस्तित्वही दिसत नाही. महाराष्ट्राच्या भाळी हा खेळखंडोबा अजून किती काळ चालणार हे सांगता येणे अवघड आहे.
🗣 चर्चा
(171)
च
चंद्रसूर्यकुमार
Fri, 05/28/2021 - 11:31
नवीन
कोकणात दोन चक्रीवादळे आली आणि खूप नुकसान झाले. मागच्या वर्षीच्या निसर्ग चक्रीवादळानंतर मामु एक आठवड्यानंतर स्वतः पाहणी करायला गेले. आताच्या चक्रीवादळानंतरही ते असेच तीन-चार दिवसांनंतर तिथे गेले. पंतप्रधान मोदी गुजरातमध्ये नुकसानीची पाहणी करायला गेले पण महाराष्ट्रात आले नाहीत आणि गुजरातला पॅकेज जाहीर केले गेले तसे महाराष्ट्राला जाहीर केले गेले नाही अशी टीका झाली. मात्र केंद्र सरकारकडून मदत मागण्यापूर्वी राज्य सरकारने नक्की किती नुकसान झाले याचा आढावा घेऊन ते आकडे केंद्राला सादर केले होते का हा पण प्रश्नच आहे. हे वादळ महाराष्ट्रातून पुढे गुजरातला गेले. त्यानंतर दोन दिवसांनंतर मोदी तिथे पाहणी करायला गेले. तोपर्यंत तरी आपले मामु महाराष्ट्रात झालेल्या नुकसानीची पाहणी करायला गेले होते का नाही ही शंकाच आहे.
विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते वादळ पुढे सरकल्यावर लगेच नुकसानीची पाहणी करायला कोकणात गेले होते. ते तीन दिवस तिथे होते. आणि आपले मामु तीन-चार तासात पाहणी करून घरी परतले सुध्दा.
असले नादान आणि अकार्यक्षम सरकार अशा संकटांच्या वेळी महाराष्ट्राच्या कपाळी आले हे नक्की कोणाचे आणि कधीचे भोग म्हणायचे हेच समजत नाही.
- Log in or register to post comments
प
पिनाक
Fri, 05/28/2021 - 12:03
नवीन
वादळात मदत करायचीच करायची असते आणि ते सगळं काम केंद्र सरकारचे असते अशी काही तरी त्यांची कल्पना असणार. गुजरातला मदत झाल्यावर मग मदत किती हवी असते ते पण चेक करायचं असतं ते त्यांना समजलं असणार. तसंही वादळामुळे कोकण चं नुकसान झालं म्हटल्यावर NCP आणि काँग्रेस चा काही संबंध च नाही. तेव्हा त्यांनी ते शिवसेनेवर सोडून दिलं. मोदींनी पश्चिम बंगाल आणि ओरिसा चा दौरा करण्याचं निश्चित केलंय. दोन्ही ठिकाणी बीजेपी चं सरकार नाही. तेव्हा फक्त बीजेपी वाल्या गुजरातला मदत करायची होती हा दावा फोल ठरतो. याचा अर्थ या माणसाने काही तरी महत्वाचा शासकीय प्रोटोकॉल केलेला नसणार. कदाचित पंतप्रधानांच्या दौऱ्या च्या आधी त्या भागाचे assessment करायचं mandatory असणार आणि ते या माणसाला माहीत नसणार.
- Log in or register to post comments
इ
इरसाल
Fri, 05/28/2021 - 16:25
नवीन
कदाचित पंतप्रधानांच्या दौऱ्या च्या आधी त्या भागाचे assessment करायचं mandatory असणार आणि ते या माणसाला माहीत नसणार.
अखिल वैश्विक चाणक्य ज्याने अख्ख्या भारताचं राजकारण ढवळुन काढलय तो सोबत असतानासुद्धा माहित नाही म्हणजे नवलच म्हणायचं ????
- Log in or register to post comments
इ
इरसाल
Fri, 05/28/2021 - 16:28
नवीन
ठीक आहे, नवीन मुख्यमंत्र्याना माहित नाही मग ते त्यांचे सत्तासोबती काय फक्त १०० कोटी वसुल करायला आहेत काय?
- Log in or register to post comments
प
पिनाक
Fri, 05/28/2021 - 16:57
नवीन
खिक.. विंगर्जी मध्ये याला rhetorical question असे म्हणतात
- Log in or register to post comments
प
पिनाक
Fri, 05/28/2021 - 17:00
नवीन
कंपाऊंडर लोकसभेवर निवडून आले नसल्यामुळे आणि राजकारण हा त्यांचा साईड धंदा असल्यामुळे (खरा धंदा टोमणे मारणे आणि तोंडावर पडणे) त्यांना प्रोटोकॉल ची माहिती नसावी
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Fri, 05/28/2021 - 17:02
नवीन
म्हणजे मोदींनी महाराष्ट्राला मदत केली नाही त्याची चूकीपण राज्य सरकारचीच. व्वा.
- Log in or register to post comments
प
पिनाक
Fri, 05/28/2021 - 17:07
नवीन
पश्चिम बंगाल आणि ओरिसा मध्ये त्यांचा दौरा आहे. तिथे मदत दिली जाणार. खरं तर पश्चिम बंगाल ला मदत नाकारली गेली असती. बरं महाराष्ट्रात तिन्ही पक्षांमध्ये कुरबुरी असताना आणि दोन्ही पैकी निदान एक पक्ष गळाला लावण्याचे प्रयत्न होत असताना उगीचच नाकावर लाथ मारण्याचा प्रयत्न करण्याचे काय कारण?
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Fri, 05/28/2021 - 17:20
नवीन
अच्छा म्हणून राज्य सरकारचीच चूकी, केंद्र सरकारच चांगलं होणा??
- Log in or register to post comments
आ
आग्या१९९०
Fri, 05/28/2021 - 18:24
नवीन
कदाचीत महाराष्ट्राचे सक्षम सरकार चक्रीवादळ नुकसान झेलू शकेल असा केंद्राला विश्वास असावा म्हणून त्याने दुबळ्या राज्यांना मदतीचा हात दिला असावा.
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Fri, 05/28/2021 - 18:47
नवीन
+१
किल्लारी भूकंपावेळी महाराष्र पुन्हा ऊभा करनारे तसेच कछ वेळीसमीतीवर नेमले गेलेल पवार साहेब ज्या राज्यात आहेत तिथे आपली काय गरज??? हे माहीत असल्याने मोदी महाराष्ट्रात आले नसावेत. जे मोदींच्या लक्शाक आले ते समर्थकांच्या कधी लक्शात येईल?? राज्य पवार साहेबांच्या हातात सुखरूप असल्याने मोदीही महाराष्ट्राबद्दल काळजी वाहत नाहीत.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 05/28/2021 - 19:12
नवीन
खरं आहे. विश्वातील सर्वोत्तम मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलेत.
पण हे सेना समर्थकांंना सांगा जे मोदी महाराष्ट्रात आले नाहीत म्हणून ओरडत आहेत.
- Log in or register to post comments
आ
आग्या१९९०
Fri, 05/28/2021 - 19:36
नवीन
असं कोणीही ओरडत नाहीत. हल्ली भास होण्याची साथ आली वाटतं.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 05/28/2021 - 19:44
नवीन
शून्य वाचन असल्याचे सिद्ध होतंय. वाचन वाढवा. नुसत्या हवेत फुसक्या सोडणे थांबवा.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Fri, 05/28/2021 - 20:29
नवीन
असेच लोकांना वाटत .
ते आले नाहीत म्हणून लोक खूष आहेत .
वादळ मुळे महाराष्ट्र मध्ये खूप नुकसान झाले आहे तेव्हा महाराष्ट्राला मोदी नी का मदत जाहीर केली नाही म्हणून लोक रागात आहेत.
केंद्रीय करा मध्ये येथून खूप पैसा गेला आहे मदत मिळणे हा हक्क आहे ह्या राज्याचे च पैसे आहेत.
मोदी आले नाहीत म्हणून लोक नाराज आहेत हे लॉजिक काय च्या काय आहे.
येवून इथे नजर लावू नये.
- Log in or register to post comments
ध
धनावडे
Sat, 05/29/2021 - 03:59
नवीन
मग मंत्री लोक का बोंबलत होते?
नेहमी प्रमाणे तुम्ही उत्तर देणार नाहीच, तरीसुद्धा welcome back.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sat, 05/29/2021 - 07:54
नवीन
राज्य पवार साहेबांच्या हातात सुखरूप असल्याने मोदीही महाराष्ट्राबद्दल काळजी वाहत नाहीत.
अगदी अगदी
पण महाराष्ट्राच्या जनतेला अगदीच अक्कल नाही.
साहेबाना फक्त ५४ जागा देऊन महराष्ट्राच्या जनतेने त्यांचा उपमर्द केलेला आहे. नुसतं एकदाच नव्हे तर सातत्याने.
एकदा सुद्धा पाऊणशे जागा दिल्या नाहीत.
५८,७१ ६२,४१ आणि आता ५४ हे काय आकडे आहेत?
या वयात एवढे पावसात भिजले त्याची जरा सुद्धा जाणीव नाही.
महाराष्ट्राच्या जनतेला भर चौकात फटकेच मारले पाहिजेत.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sat, 05/29/2021 - 08:00
नवीन
ते आले नाहीत म्हणून लोक खूष आहेत .
श्री मोदीच काय
साहेब सुद्धा आले नाहीत कि काँग्रेसमधील कोणीही आले नाहीत.
आपले मुख्यमंत्री आपल्या अत्यंत व्यस्त कार्यक्रमात वेळात वेळ काढून संपूर्ण चार तास कोकणच्या दौऱ्यावर गेले होते.
त्याची तुम्हा लोकांना कदरच नाही.
- Log in or register to post comments
क
कॉमी
Fri, 05/28/2021 - 12:55
नवीन
सुशांत सिंह च्या प्रकरणाचे नाव उगाच यादीत घातले असे वाटते. ते घडवलेले प्रकरण आहे, कोणी ते सांगायला नकोच.
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Fri, 05/28/2021 - 14:28
नवीन
महाराष्ट्राच्या भाळी हा खेळखंडोबा अजून किती काळ चालणार हे सांगता येणे अवघड आहे. >>>>
आणी देशाच्या??? देशाच्या भाळी खेळखंडोबा असला तर चालतो का??
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sat, 05/29/2021 - 08:03
नवीन
देशाच्या भाळी खेळखंडोबा असला तर चालतो का??
अगदी अगदी
देशाच्या जनतेला अक्कल नाहीच.
आणि आता २०२४ मध्ये परत श्री मोदींना निवडून देऊन खेळखंडोबाच काय तर भारतीय लोक देशाला पार रसातळाला नेणार.
अगदी पाकिस्तान कडे आपल्याला मदतीची याचना करायला लागणार असे दिसतंय.
देशाच्या दोन साडेसात्या ( पंधरा वर्षे) एका पाठोपाठ एक चालू आहेत असे दिसते.
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Sat, 05/29/2021 - 09:22
नवीन
त्याचे परिणाम देश भोगतोय ना??
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sat, 05/29/2021 - 09:36
नवीन
अगदी अगदी
देशाच्या जनतेला अक्कल नाहीच.
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Sat, 05/29/2021 - 10:03
नवीन
मोठमोठ्या घोषणांना भूलली जनता. आता कळालंय जनतेला.
- Log in or register to post comments
ग
गॉडजिला
Sat, 05/29/2021 - 10:16
नवीन
हेच ना की देशाच्या जनतेला अक्कल नाही ?
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Fri, 05/28/2021 - 14:31
नवीन
दुर्दैवाने विरोधी पक्ष म्हणून भाजपही अपयशी ठरला आहे >>>
आणी राज्याच्या सुदैवाने ते विरोधी पक्शात आहेत. नाहीतर महाराष्ट्राचा कोल्हापूर-सांगली झाला असता. लोक कोरोनाशी लढताहेत आणी हे आता सरकार पडेल तेव्हा पडेल ह्याच्या घोषणा करताहेत. भाजप सत्तेतच काय पण विरोधी पक्शातही राहण्या लायक नाही.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sat, 05/29/2021 - 07:49
नवीन
भाजप सत्तेतच काय पण विरोधी पक्शातही राहण्या लायक नाही.
अगदी अगदी
भाजप सत्तेतच काय पण विरोधी पक्शातही काय या पृथ्वीतलावरच राहण्या लायक नाही.
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Sat, 05/29/2021 - 09:22
नवीन
+१
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Sat, 05/29/2021 - 07:00
नवीन
परंपरेनुसार मालकांच्या सूचनेला फाट्यावर मारलेले आहे.
चालू द्या !
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Sat, 05/29/2021 - 08:32
नवीन
चालू घडामोडी..
या नावामागून आपले म्हणणे रेटण्याचे 'चालू' प्रयत्न कायम दिसत आहेतच..
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 05/29/2021 - 08:41
नवीन
काल एक घडामोड वाचली. मा. मोदी आणि केंद्रीय मंत्रीमंडळाच्या नाकावर टीच्चून असा बंगालमधे तृणमुल कॊंग्रेसने विजय मिळवला तरी ममतादीदी आणि केंद्रसरकार यांच्यातला तेढ काही कमी झालेले नाही असे दिसते. जिंकणे आणि पराभव हा राजकारणाचा नियमित असलेला भाग असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या ओडिशा आणि पश्चिम बंगालची पाहणी केली आणि नंतर दोन्ही राज्यांचे मुख्यंमंत्री व अधिका-यासोबत बैठक घेतली. मात्र मोमता दिदी तिथे ३० मिनिटापर्यंत बैठकीतच आल्या नाहीत, आल्यानंतर ममतांनी एक अहवाल पंतप्रधानांकडे सोपवला व निघून गेल्या. दुसरीकडे मा.मोदींनी ओडिशाला पाचशे कोटी देण्याची घोषणा केली तर नवीन पटनायक म्हणाले आम्हाला कोणतेही पॅकेज नको. राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान व मुख्यमंत्री हे व्यक्ती नव्हे तर संस्था असतात, असे वागणे चुकीचे आहे, असे म्हटले आहे. एकूणच देशात केंद्र आणि राज्यांचे वाद पुढेही चालूच राहतील असे वाटते.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
आ
आग्या१९९०
Sat, 05/29/2021 - 08:53
नवीन
ज्यांना राज्यांना १००% कोविडच्या लसी मोफत द्यायची इच्छा नाही त्यांच्याकडून नुकसानीसाठी कोण अपेक्षा करेल? सगळी राज्य आत्मनिर्भर आहेत, त्यांचे ते घेतील बघून. ह्यांनी पुढील इलेक्शनच्या तयारीच कराव्या.
- Log in or register to post comments
ब
बापूसाहेब
Sat, 05/29/2021 - 08:56
नवीन
बिरुटे सर यांचा प्रतिसाद वाचून रबिष कुमार ची आठवण झाली.
केंद्र सरकारची काही चुकी नसेल तर फक्त वार्तांकन करायचे.. आणि केंद्र सरकार कडून थोडेसे खट्ट झाले तर बातमीच्या नावाखाली टीका, उणे दुणे काढणे आणि वयक्तिक टीका सुरू करणे.
- Log in or register to post comments
आ
आग्या१९९०
Sat, 05/29/2021 - 09:05
नवीन
आरत्या ओवळणारे खूप आहेत. आसूड ओढणारे कमी असूनही इतका त्रास का होतोय?
- Log in or register to post comments
क
कॉमी
Sat, 05/29/2021 - 09:07
नवीन
सहमत. सगळे अर्णब सारखे कडवट भाट असून कसं चालेल ?
- Log in or register to post comments
आ
आग्या१९९०
Sat, 05/29/2021 - 09:28
नवीन
सगळया भाज्यांमध्ये गुळच हवा.
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Sat, 05/29/2021 - 09:21
नवीन
+१
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Sat, 05/29/2021 - 10:06
नवीन
काल सावरकर जयंती साजरी झाली. शिवसेनेच्या सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मागणीला भाजपचा विरोध आहे का?? सावरकरांना भारतरत्न का देत नाहीये भाजप सरकार?? प्रणव मुखर्जी हेया काॅंग्रेसच्या व्यक्तीला भाजपने भारतरत्न दिला पण हिंदूत्ववादी सावरकरांना दिला जात नाहीये. भाजपला हिंदूत्वाशी काही प्राॅब्लेम आहे का??
- Log in or register to post comments
आ
आग्या१९९०
Sat, 05/29/2021 - 10:14
नवीन
ते गोमातेला उपयुक्त प्राणी मानता होते म्हणून विरोध असेल. असंही त्यांना दुसऱ्या पक्षांच्या लोकांचा गौरव करायला आवडतो. त्यांच्यासाठी गालीच्या अंथरतात, बिचारे खरे कार्यकर्ते सतरंज्या उचलतात.
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Sat, 05/29/2021 - 12:39
नवीन
फडणवीस विरोधक आता खवळणार
😁 🤣
- Log in or register to post comments
न
नावातकायआहे
Sat, 05/29/2021 - 13:48
नवीन
क्लिप बघीतली. त्यात खवळण्यासारखे काय वाटले नाही.
अनिल थत्ते कोण, कुठला (पुणेरी वाट्टोय) आणि त्यांचा टोन हा कट्टावर शिळोपाच्या गप्पा मारताना काही मंडळीचा असतो तसा आहे. मी लै भारी इस्टाइल....
त्यांनी चित्रविचित्र टिकल्या का लावल्यात?
- Log in or register to post comments
आ
आग्या१९९०
Sat, 05/29/2021 - 14:09
नवीन
ठाणेकर आहे हो थत्ते. त्यांचं सगळंच रंगीबेरंगी. ८० च्या दशकात प्रभात टॉकीजच्या बाजूला त्यांची मारुती गाडी उभी असायची,भडक रंगाची. त्या गाडीची प्लॅस्टिक सर्जरी झालेली असायची. का ते सांगायची गरज आहे का?
- Log in or register to post comments
न
नावातकायआहे
Sat, 05/29/2021 - 14:34
नवीन
भा. पो! "अभ्यास" वाढवला पाहिजे :-)
- Log in or register to post comments
प
पिनाक
Sat, 05/29/2021 - 18:39
नवीन
ऐंशी च्या दशकात मी लै म्हंजे लै ल्हान हुतो. आमास्नी पन वाईच सांगा काय ते.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 05/29/2021 - 17:27
नवीन
अनिल थत्ते हा माणूस दखल घेण्याच्या सुद्धा लायकीचा नाही. आचरटपणा करणारा विदूषक आहे तो. अशा लायकीची माणसे फडणवीसांचे समर्थक असतील तर फडणवीसांचं भविष्य अवघड आहे एवढेच सांगू शकतो.
- Log in or register to post comments
प
पिनाक
Sat, 05/29/2021 - 18:43
नवीन
ते त्यांच्या पोशाखाकडे बघून दिसतंय, पण समर्थकांमुळे नेते लोकांचं भविष्य अवघड कसं आहे ते कळलं नाही. फडणवीसांचे करोडो समर्थक असावेत (१०५ आमदार x क्ष मते = किती मते?) त्यातला एखादा आचरट असला तर त्यांचं भविष्य अवघड? अवघड आहे.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Sat, 05/29/2021 - 18:59
नवीन
तो इतिहास झाला आता ती स्थिती राहिली नाही फक्त आमदार राहिलेत.
ते पण संधी शोधत आहेत
- Log in or register to post comments
प
पिनाक
Sat, 05/29/2021 - 19:17
नवीन
हे कुठून कळले? काही आतल्या गोटातली बातमी / लिंक / मुलाखत? मनाने छापणार्या बातम्यांना "राहुल गांधी बातमी" म्हणतात हे आपणास विदित असेलच.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Sat, 05/29/2021 - 18:59
नवीन
तो इतिहास झाला आता ती स्थिती राहिली नाही फक्त आमदार राहिलेत.
ते पण संधी शोधत आहेत
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Sat, 05/29/2021 - 19:00
नवीन
तो इतिहास झाला आता ती स्थिती राहिली नाही फक्त आमदार राहिलेत.
ते पण संधी शोधत आहेत
- Log in or register to post comments
- 1
- 2
- 3
- 4
- ›
- »