Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

काय वाचताय ?

क
कॉमी
Wed, 05/19/2021 - 09:40
🗣 96 प्रतिसाद
प्रेरणा- मदनबाण यांचा मी सध्या काय पाहतोय धागा. मला वाटते, की सिनेमे, टिव्ही/ओटीटी सिरीज, युट्यूब व्हिडीओज सारखेच पुस्तकं, ब्लॉग्ज, पेपर/नियतकालिकांमधली विशिष्ठ विषयांवरची सदरे किंवा कोणतेही वाचायचे माध्यम यांच्या बद्द्ल देवाणघेवाण सुद्धा मनोरंजक राहील. वाचण्यासाठी नवनवीन गोष्टी समजतील. मी सुरुवात करतो. मी खालील दोन पुस्तके वाचत आहे: १. फ्रॅन्क हर्बर्टची कादंबरी ‘ड्युन’ (Frank Herbert’s ‘Dune’)- १९६५ पृष्ठसंख्या- ४१२

-विज्ञानकादंबर्‍यांमध्ये खुप प्रसिद्ध कादंबरी आहे ही. सर्वोत्तम विज्ञानकथांच्या याद्यांमध्ये हटकून ड्युन दिसत होती. म्हणल ट्राय करुन बघुया. आता जिथपर्यंत वाचून झाली आहे तिथपर्यंत ही कादंबरी फक्त विज्ञानकथा नसून सरळ सरळ एपिक फॅन्टसी सारखी वाटते आहे. पूर्ण नवीन विश्व लेखकाने उभारले आहे. कथा- मानवजात एका इम्पेरियम/साम्राज्यामध्ये एकत्र आहे. साम्राज्याचा प्रमुख म्हणुन एक सम्राट आहे, आणि वेगवेगळ्या ग्रहांवर सम्राटाच्या नावे व्यवस्थापन करणारी घराणी आहेत, (अंतराळातले गेम ऑफ थ्रोन्स म्हणता येईल, फक्त हे GoT च्या आधी प्रकाशित झाले आहे.) तर, आर्टेड्स घराण्याचा, स्पेसिफिकली, पॉल आर्टेड्स या मुलाचा प्रवास आपण पाहातो. त्यांच्या होम-ग्रहावरुन आर्टेड्सना नवीन ग्रहाचे व्यवस्थापन दिले असते- आराकीस नावाच्या ग्रहाचे. ह्या ग्रहाचा ९०%+ वाळवंटी असतो. पाणी इतके दुर्मिळ असते की तेच चलन आणि संपत्ती असते. तिथे खोल वाळवंटामध्ये "मलेन" नावाचा पदार्थ सापडत असतो, जो जिवन वाढवणारा असतो, आणि त्यामुळे अत्यंत मौल्यवान. पण हा पदार्थ गोळा करणे सुद्धा तितकेच अवघड असते, कारण वाळूमधून झटकन प्रवास करु शकणार्‍या राक्षसी अळ्या नेहमी त्या पदार्थांच्या साठ्याच्या आसपास असतात. त्यापुढे, हार्कोनेन घराणे, जे आर्टेड्सचे काही पिढ्यांपासूनचे शत्रू असतात, त्यांनी बरेच वर्ष आराकीस वर राज्य केले असते. त्यामुळे, त्यांनी आर्टेड्स साठी काहीना काही सापळा आराकीस वर रचून ठेवलाय हे नक्की असते. आराकीस वरचे नेटिव्ह लोक म्हणजे फ्रेमेन. हे फ्रेमेन लोक पाण्याच्या दुर्भिक्षात राहाण्यासाठी अ‍ॅडॅप्ट असतात. वाळवंटात फिरताना शरीरातला ओलावा वातावरणात आजिबात निसटू नये म्हणून 'स्टिलसूट' नावाचे वस्त्र वापरत असतात. आणखी मसाला असतो तो म्हणजे 'बेने गेशेरीत' नावाची संस्था असते, जी फ्रेमेन सारख्या "रानटी" किंवा मुख्य धारेतल्या बाहेरच्या लोकांचा पुढे मागे वापर करुन घेण्यासाठी त्यांच्यात, (खोट्या) प्रोफेसीज/भविष्यवाण्या पेरुन ठेवत असते. एकूण, पॉल ह्या भविष्यवाण्यांच्या आधारे स्वतःला मुआ'दीब नावाने फ्रेमेन्सच्या लढाऊ आणि आक्रमक धर्माचा प्रेषित कसा बनवतो, आणि हार्कोनेन घराण्याशी कसा लढतो अशी कथा आहे. ह्यात ईस्लामच्या उदयाशी पॅरॅलल स्पष्ट आहेत. बरेच फारसी शब्द वापरले आहेत. कथेवर तीन वेळा सिनेमा येऊन गेला आहे आणि चौथ्यांदा यावर्षी येणार आहे. टिमोथी कॅल्मेट पॉलच्या भुमिकेत दिसेल. २. द कमिंग ऑफ द थर्ड राईश- रिचर्ड एव्हन्स. (२००४) पृष्ठसंख्या- ६५६

वाळींबेंचे नाझी भस्मासूराचा उदयास्त न वाचलेल्या दुर्मिळ लोकांपैकी मी एक आहे. तेव्हा हे अगदी क्लीन स्लेट घेऊन वाचत आहे. नाझी जर्मनी वरच्या त्रिधारेतले हे पहीले पुस्तक आहे. त्रिधारा अशी आहे- १. द कमिंग ऑफ द थर्ड राईश २. थर्ड राईश अ‍ॅट पॉवर ३. थर्ड राईश अ‍ॅट वॉर. पुस्तकाची दिर्घ प्रस्तावना खुप उत्तम आहे. नाझी जर्मनीवर इतकी पुस्तके येऊन गेली आहेत, मग आणखी एक लिहायचे प्रयोजन काय? ह्या प्रश्नाचे उत्तर लेखक एव्हन्स ह्यांनी दिले आहे. की नाझी जर्मनीचा संक्षिप्त, किंवा निवडक पैलूंवर प्रकाश टाकणारी बरीच चांगली आणि वाईट पुस्तकं असली तरी, नाझी जर्मनीतल्या नागरीकाला सभोवताली काय दिसत होते ? त्या वेळी काय चर्चा, काय राजकीय प्रश्न होते ? आणि एकूणच नाझी जर्मनीचे सखोल आणि सर्वांगीकचित्रणपाहाण्यास मिळत नाही. ते या त्रिधारे द्वारा देण्याचा प्रयत्न आहे. पहीले पुस्तक जिथपर्यंत वाचून झाले त्यावरुन सखोल महीती मिळणार हे समजले आहे. आत्तापर्यंत बिस्मार्क, कैसर विल्यम दुसरा ह्यांचे शासन, आणि पहील्या महायुद्धानंतर धाधांत अराजकतेनंतर जर्मनी मध्ये पहीले लोकशाही शासन १९१८ मध्ये कसे आले, आणि व्हर्सेलीस करारातल्या अपमानकारक अटींचा राजकारण आणी नागरी जीवन यांच्यावर काय प्रभाव पडला हे सांगितले आहे. जर्मनीत धार्मिक दृष्टीतून ज्यूंचा द्वेष, ते वांशिक दृष्टीतून ज्यूंचा द्वेष हा प्रवास तपशीलवार दाखवला आहे. यापुढे पुस्तक लोकशाही राज्य १९१८-१९३३ दरम्यान कसे चालले, लोकांचा वैचारीक कल कुठे होता आणि तो कसा हळूहळू बदलत गेला, असे जाईल आणि शेवटी १९३३ मध्ये नाझी जर्मनीचा उदय होऊन संपेल. पुस्तक अत्यंत तपशीलवार आहे, आणि ह्या बद्दल रस असल्यास उत्तम पर्याय आहे. तुम्ही काय वाचताय ? (चित्रे आंतरजालावरुन साभार.)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 43389 views

🗣 चर्चा (96)
ह
हेमंतकुमार Wed, 05/19/2021 - 10:35 नवीन
छान परिचय. मी काही दिवसांपूर्वी ही वाचली : पुस्तकवेड्यांचं वेड तेंडुलकर अजूनही अ-जून !
  • Log in or register to post comments
क
कॉमी Wed, 05/19/2021 - 15:10 नवीन
दोनीही पुस्तकपरिचय भारी आहेत. शांतता ! कोर्ट... आवडते नाटक आहे. 'अ-जून' वाचायच्या यादीत वाढवले आहे.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 05/19/2021 - 15:20 नवीन
शांतता ! कोर्ट... आवडते नाटक आहे.
>> हवे तेवढे अनुमोदन !
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 05/19/2021 - 18:22 नवीन
कालच तूनळीवर हे नाटक पाहिले. रेणुका शहाणे बेणारे बाईंंच्या भूमिकेत आहे. अप्रतिम नाटक आहे!
  • Log in or register to post comments
आ
आंद्रे वडापाव Wed, 05/19/2021 - 11:07 नवीन
चांदोबा चे जुने अंक ..
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Wed, 05/19/2021 - 18:25 नवीन
पुस्तके वाचण्याबद्दल धागा निघाला हे खूपच छान. बरेच लोक हल्ली पुस्तके फारशी वाचत नसले तरी वाचणारांनी इथे अवश्य लिहीले पाहिजे. चांदोबाचे जुने ( विशेषतः १९५५-७०) म्हणजे अगदी मर्मबंधातली ठेव. मला मध्यंतरी हिंदी चंदामामाचे हे अंक कुठूनतरी डाऊनलोडायला मिळाले. परंतु एकतर ते स्पष्ट दिसत नाहीत आणि मराठीत नाहीत. तुम्हाला मराठीत कुठे मिळाले हे कृपया कळवावे. चांदोबातली चित्रे पूर्वी Sankar आणि CHITRA यांची खूपच सुंदर असायची. नंतर मात्र कुणी Vapa नामक चित्रकाराची येऊ लागली ती मला अजिबात आवडत नसत. त्याने सगळी घाण करून ठेवली असे वाटायचे त्यामुळे नंतर चांदोबातील गोडी ओसरली.
  • Log in or register to post comments
स
संग्राम Wed, 05/19/2021 - 20:38 नवीन
https://archive.org/search.php?query=chandoba https://www.chandamama.in/marathi/marathi.php
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 05/20/2021 - 05:04 नवीन
खूप धन्यवाद !
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त गुरुवार, 05/20/2021 - 11:34 नवीन
मराठी चांदोबा मिळाला हे फार छान झाले. साधारणपणे 1970 नंतरचे चांदोबे मी बघितले नव्हते पण काल 1995 च्या चांदोब्यात माझ्या लहानपणीच्या भुवनसुंदरी वगैरे कथामाला पुन्हा येत असलेल्या बघून खूप आनंद झाला. आता सावकाशीने एकेक बघेन. अनेक आभार.
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 05/21/2021 - 10:14 नवीन
संग्रामशेठ, भरपूर दिवस पुरेल एवढा ऐवज मिळालाय. खूप खूप धन्यवाद.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 05/24/2021 - 06:28 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Wed, 05/19/2021 - 11:15 नवीन
माझं हिच्या घरच्यांशी जमावं म्हणून काही टिप त्यात मिळते का ते हुडकतोय... पण जळ्ळ मेलं लिंगभेदी प्रकरणं निघालं, आजच्या काळातील पुरुषांनी बायकोच्या घरच्यांना कसे सहन करावे, कसे जुळवुन घ्यावे याबद्दल एक अवाक्षर नाय :(
  • Log in or register to post comments
B
Bhakti Wed, 05/19/2021 - 14:24 नवीन
फ्रॅन्क हर्बर्टची कादंबरी ‘ड्युन, सिनेमांचा शोध घ्यावा लागेल.बाकी कथा वाचून प्रिंस ऑफ पर्शिया: द सैंड्स ऑफ टाइम आठवला :)
  • Log in or register to post comments
क
कॉमी Wed, 05/19/2021 - 15:23 नवीन
प्रिन्स ऑफ पर्शिया+स्टार वॉर्स+गेम ऑफ थ्रोन्स= ड्यून ड्यून २०२१ ची कॉल मी बाय युअर नेम मधला टिमोथी, स्पायडरमॅन मधली झेंडाया, ऍक्वामॅन जेसन मोमोआ, गार्डीयन्स मधला डेव्ह बतीस्ता, थॅनोसफेम जॉश ब्रोलीन अशी तगडी कास्ट आहे. तोच पहा सिनेमा.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Wed, 05/19/2021 - 16:56 नवीन
किती दिवसांनी ही नावं ऐकली (Wow Aquaman ) . ट्रेलर पाहिला ठीक आहे.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sat, 08/03/2024 - 14:32 नवीन
ड्यून भाग दुसरा आज पाहिला. कमाल! ज्या पद्धतीने आता पुढे काय होणार ही उत्सुकता शेवटपर्यंत राहते, त्यानुसार तिसऱ्या भागाची बहूप्रतिक्षा!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 08/03/2024 - 15:33 नवीन
पाहण्यात येईल.... -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sat, 08/03/2024 - 18:30 नवीन
हा भाग इतका रोमांचित आहे की तिसरा भाग कंपलसरी थिएटरमध्ये पाहावा वाटणार. ओटीटी -जिओ सिनेमा
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Wed, 05/19/2021 - 14:29 नवीन
कमिंग ऑफ थर्ड राईश वरती लेखमाला लिहिता अली तर बघा असे सुचवतो.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Wed, 05/19/2021 - 15:24 नवीन
नक्कीच प्रयत्न करीन. _/\_
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 05/19/2021 - 16:12 नवीन
गेल्या लॉकडाऊनपासून पुन्हा एकदा महाभारताला सुरुवात केली. आता शांतीपर्वाच्या मध्यात पोहोचलोय. अजून ५/६ महिने ते खाद्य पुरेल.
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 05/20/2021 - 05:07 नवीन
आमच्या सारख्या नूब्जनी कोणते महाभारत वाचावे ? (पाडगावकरांनी अनुवाद केलेले वाचले आहे.)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 05/20/2021 - 05:37 नवीन
पाडगावकरांनी अनुवाद केलेले कथारूप महाभारत आहे. तुम्हास वाचावयाचे असेल तर विदर्भ मराठवाडा बुक कं आणि वरदा प्रकाशन ह्यांनी मराठीत अनुवाद केलेले महाभारताचे खंड उपलब्ध आहेत. विदर्भ मराठवाड्याचे खंड वाचण्याच्या दृष्टीने सुगम आहेत तर वरदा प्रकाशनाने एकाच पानावर दोन कॉलम केल्याने वाचताना डोळ्यांना त्रास होऊ शकतो. संस्कृत डॉक्युमेंट्स संस्थळावर भांडारकर संशोधित प्रत संस्कृतमध्ये उपलब्ध आहे किंवा किसारी मोहन गांगुली ह्यांनी इंग्रजीत केलेला अनुवाद sacred-texts.com वर वाचू शकता.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Fri, 05/21/2021 - 10:00 नवीन
माझ्याकडे हे आहे. पुर्ण वाचायला दोन महिन्यांपेक्षा जास्त वेळ लागला होता. खूप गोष्टी पहिल्यांदाच कळल्या. मूळ महाभारतात आहेत की प्रक्षिप्त आहेत कल्पना नाही. उदा. पांडवांच्या जन्माआधीच्या सर्व गोष्टी अगदी शंतनू, मत्स्यगंधा, व्यास, अंबा-अंबिका-अंबालिका, देवव्रत, पंडू-युधिश्ठीर-विदूर या गोष्टी मी पहिल्यांदा वाचल्या.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 07/02/2021 - 19:55 नवीन
@ प्रचेतस आणि तुषार महाभारत यावर आपले भास्य रचल्याने खाली देत असलेला व्हिडियो तुम्हास रोचक वाटु शकेल. [ मी आत्ता तेच ऐकतोय आणि त्यात पर्वाचा उल्लेख आल्यामुळे आणि तुमचे प्रतिसाद वाचल्याने इथे द्यावासा वाटला.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Vaathi Raid Lyric + Vaathi Raid Video :- Master
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 07/02/2021 - 19:56 नवीन
भास्य रचल्याने हे भाष्य करत असल्याने असे वाचावे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Vaathi Raid Lyric + Vaathi Raid Video :- Master
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Wed, 05/19/2021 - 16:42 नवीन
विजय देवधरांचं डेझर्टर वाचून संपवलं आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 05/19/2021 - 16:46 नवीन
क्या बात है वांडोबा, लै दिसांनी दिसलात. डेझर्टर मला फारसे आवडले नाही, अनुवाद उत्कृष्टच आहे, पण कथाच फार अतिशयोक्त वाटते.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Wed, 05/19/2021 - 17:17 नवीन
डेझर्टर त्यातल्यात्यात सत्यतेच्या जास्त जवळ आहे एस्केप स्टोरी असल्याने....
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 05/21/2021 - 09:10 नवीन
एस्केप स्टोरी वरून मागे वाचलेला मला निसटलंच पाहिजे हा द लाँग वॉक या पुस्तकाचा अनुवाद आठवला. खूप आवडलेला.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Wed, 07/07/2021 - 20:33 नवीन
सत्यार्थाने बघता दुसरे महायुद्धच अतिशयोक्त होते की हो हिटलर अतिशयोक्त अमेरिका अतिशयोक्त स्टालिन नक्कीच अतिशयोक्त मुसोलिनी पण अतिशयोक्त सगळेच तसले मग एक सामान्य शिपाई कसला वाचतोय हो !
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख गुरुवार, 05/20/2021 - 12:15 नवीन
प्रकाशनपूर्ण नोंदणी केलेलं, शरद पोंक्षेंचं मी आणि नथुराम हे पुस्तक आजच घरपोच आलं, शनिवारी वाचून काढीन. Image removed. पुस्तक इथेही उपलब्ध आहे.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख गुरुवार, 05/20/2021 - 12:21 नवीन
वीसेक वर्षांपूर्वी वाचलेली, माजी पंतप्रधान श्री पी वी नरसिंह रावांची द इन्साइडर ही आत्मचरित्रात्मक कादंबरी पुन्हा एकदा वाचत आहे. राजकीय जीवनापलीकडे राव हे बरेच कलाप्रेमी, साहित्यप्रेमी, रसिक होते.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला गुरुवार, 05/20/2021 - 12:44 नवीन
याचा मराठी अनुवाद अंतःस्थ म्हणूनही उपलब्ध आहे, कळत्या वयात याचे वाचन न झाल्याने मला हे प्रकरण तितके नीट समजले न्हवते पण माझे वडील मात्र या पुस्तकावर जरा जास्तच फिदा होते...
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 05/20/2021 - 17:10 नवीन
या पुस्तकाबद्दल माहित नव्हते. ब्लॅक क्लाउड वर सिनेमा आला नाही आहे असे दिसते, आणि कोरा वर का नाही ह्याची उत्तर दिसले- https://www.quora.com/Why-isnt-The-Black-Cloud-by-Fred-Hoyle-a-movie-yet?top_ans=250554478 फ्रेड हॉईल हे जयंत नारळीकरांच्या आदरस्थानी होते असे किमयागार मध्ये वाचल्याचे आठवते. त्यांनी सायन्स फिक्शन लिहिली असल्यास त्यात खरोखरच सायन्स मिळेल असे वाटते!
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख गुरुवार, 05/20/2021 - 12:31 नवीन
फ्रेड हॉइल यांची द ब्लॅक क्लाउड ही अनेक वर्षांपासून संग्रही असलेली पण काही न काही कारणांमुळे पूर्ण वाचायचा मुहूर्त न लागलेली अप्रतिम कादंबरी पुढच्या आठवड्यात वाचणार आहे. याच कादंबरीचे कृष्णमेघ हे मराठी भाषांतर दहाएक वर्षांपूर्वी वाचलं होतं. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये एक प्रचंड मोठा सजीव वायुरूपी ढग येऊन विसावतो आणि मग त्या ग्रहणात मानवजात हवालदिल होते असे कथानक आहे. द ब्लॅक क्लाउड या कादंबरीवर हॉलिवूडमध्ये सिनेमा निघाला आहे का? मला शोधून सापडला नाही म्हणून इथे विचारतोय.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख गुरुवार, 05/20/2021 - 12:31 नवीन
फ्रेड हॉइल यांची द ब्लॅक क्लाउड ही अनेक वर्षांपासून संग्रही असलेली पण काही न काही कारणांमुळे पूर्ण वाचायचा मुहूर्त न लागलेली अप्रतिम कादंबरी पुढच्या आठवड्यात वाचणार आहे. याच कादंबरीचे कृष्णमेघ हे मराठी भाषांतर दहाएक वर्षांपूर्वी वाचलं होतं. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये एक प्रचंड मोठा सजीव वायुरूपी ढग येऊन विसावतो आणि मग त्या ग्रहणात मानवजात हवालदिल होते असे कथानक आहे. द ब्लॅक क्लाउड या कादंबरीवर हॉलिवूडमध्ये सिनेमा निघाला आहे का? मला शोधून सापडला नाही म्हणून इथे विचारतोय.
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 05/20/2021 - 16:36 नवीन
यावर दुमत असेल. कारण फार मोठे ग्रंथ असतात किंवा संस्कृतात. मग कोणी ते वाचून 'मला समजलेले महाभारत' त्याच्या पद्धतीने लिहितात. पण महाभारतात आलेले शहरांचे उल्लेख आणि बुद्धकाळातील सापडलेले अवशेष यावर अधुनमधून प्रकाश टाकणारे लेख येत असतात. उदाहरणार्थ - अहिछत्र https://www.livehistoryindia.com/story/history-daily/ahichhatra/ तर https://www.livehistoryindia.com ही साइट उघडून लेख वाचत असतो.
  • Log in or register to post comments
न
निपा Fri, 05/21/2021 - 08:51 नवीन
A World Without Islam हे पुस्तक वाचतोय. Graham Fuller ह्या CIA च्या संचालका नि लिहिले आहे . जर इस्लाम नसता तर जग कसे असते ह्या कल्पने वर आधारित आहे . pipeline मध्ये अजून दोन आहेत .. सवड मिळताच सुरु करेन - a clash of civilizations - gun germs and steel
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 05/21/2021 - 09:24 नवीन
सध्या द सेवन्थ स्क्रोल हे अनुवादित पुस्तक वाचतोय. अनुवाद उत्तम आहे, पण मूळ इंग्रजी पुस्तकच वाचायला आणिक मजा येईल असे वाटते. तसंच आपल्या जयंत कुलकर्णीं सरांनी केलेला द सायकोलॉजी ऑफ मनी चा अनुवाद वाचतोय. :-)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 05/21/2021 - 09:40 नवीन
त्याच्या आधीचे द रिव्हर गॉड वाचलेले असणे गरजेचे आहे का?
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Fri, 05/21/2021 - 10:10 नवीन
मी सेवेन्थ स्क्रोल वाचले आहे (मराठी अनुवाद) रिव्हर गॉडचे काहीच रेफरन्सेस नाहीत. पुस्तक जबरदस्त आहे. बादवे रिव्हर गॉड मराठी अनुवाद उपलब्ध आहे का?
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 05/21/2021 - 10:23 नवीन
धन्यवाद. मेहता लवकरच द रिव्हर गॉडचा मराठी अनुवाद प्रकाशित करत आहेत.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Fri, 05/21/2021 - 17:48 नवीन
सेवन्थ स्क्रोल रोचक वाटतेय.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 05/21/2021 - 18:06 नवीन
यावरचे पुस्तक 'The story of the horse ....by Yeshaswini chandra. ( लोकसत्ता समिक्षा - ब्याटमन ,खफवर आलेली.) ते पुस्तक वाचतो आहे. बरं आहे.
  • Log in or register to post comments
र
रामदास२९ Sat, 05/22/2021 - 10:10 नवीन
द मित्रोखिन अर्काएव्स - द केजीबी इन द वोर्ल्ड हे पुस्तक वाचत आहे
  • Log in or register to post comments
ग
गुल्लू दादा Sun, 05/23/2021 - 21:05 नवीन
'अमिताभ शहेनशहा' हे बाबू मोशाय यांचं पुस्तक वाचायला चालू केलंय.
  • Log in or register to post comments
P
Pratham Mon, 05/24/2021 - 07:53 नवीन
सध्या व्यंकटेश माडगूळकरांचे कथासंग्रह,ललित यांचा फडशा पाडत आहे. नुकतीच गो नि दांडेकर यांची वाघरू आणि त्या तिथं रुखातळी वाचली. कोण निसर्गप्रेमी असेल तर एखादे पुस्तक नक्की सुचवा. चितमपल्ली जवळजवळ सगळे वाचून झालेत.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 05/24/2021 - 11:19 नवीन
bafut beagles पुस्तके बघा.
  • Log in or register to post comments
P
Pratham Mon, 05/24/2021 - 14:10 नवीन
लगेच बघतो!!!
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 13 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 13 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 13 hours ago
  • सुंदर !!
    1 day 13 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 13 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा