Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

काय वाचताय ?

क
कॉमी
Wed, 05/19/2021 - 09:40
🗣 96 प्रतिसाद
प्रेरणा- मदनबाण यांचा मी सध्या काय पाहतोय धागा. मला वाटते, की सिनेमे, टिव्ही/ओटीटी सिरीज, युट्यूब व्हिडीओज सारखेच पुस्तकं, ब्लॉग्ज, पेपर/नियतकालिकांमधली विशिष्ठ विषयांवरची सदरे किंवा कोणतेही वाचायचे माध्यम यांच्या बद्द्ल देवाणघेवाण सुद्धा मनोरंजक राहील. वाचण्यासाठी नवनवीन गोष्टी समजतील. मी सुरुवात करतो. मी खालील दोन पुस्तके वाचत आहे: १. फ्रॅन्क हर्बर्टची कादंबरी ‘ड्युन’ (Frank Herbert’s ‘Dune’)- १९६५ पृष्ठसंख्या- ४१२

-विज्ञानकादंबर्‍यांमध्ये खुप प्रसिद्ध कादंबरी आहे ही. सर्वोत्तम विज्ञानकथांच्या याद्यांमध्ये हटकून ड्युन दिसत होती. म्हणल ट्राय करुन बघुया. आता जिथपर्यंत वाचून झाली आहे तिथपर्यंत ही कादंबरी फक्त विज्ञानकथा नसून सरळ सरळ एपिक फॅन्टसी सारखी वाटते आहे. पूर्ण नवीन विश्व लेखकाने उभारले आहे. कथा- मानवजात एका इम्पेरियम/साम्राज्यामध्ये एकत्र आहे. साम्राज्याचा प्रमुख म्हणुन एक सम्राट आहे, आणि वेगवेगळ्या ग्रहांवर सम्राटाच्या नावे व्यवस्थापन करणारी घराणी आहेत, (अंतराळातले गेम ऑफ थ्रोन्स म्हणता येईल, फक्त हे GoT च्या आधी प्रकाशित झाले आहे.) तर, आर्टेड्स घराण्याचा, स्पेसिफिकली, पॉल आर्टेड्स या मुलाचा प्रवास आपण पाहातो. त्यांच्या होम-ग्रहावरुन आर्टेड्सना नवीन ग्रहाचे व्यवस्थापन दिले असते- आराकीस नावाच्या ग्रहाचे. ह्या ग्रहाचा ९०%+ वाळवंटी असतो. पाणी इतके दुर्मिळ असते की तेच चलन आणि संपत्ती असते. तिथे खोल वाळवंटामध्ये "मलेन" नावाचा पदार्थ सापडत असतो, जो जिवन वाढवणारा असतो, आणि त्यामुळे अत्यंत मौल्यवान. पण हा पदार्थ गोळा करणे सुद्धा तितकेच अवघड असते, कारण वाळूमधून झटकन प्रवास करु शकणार्‍या राक्षसी अळ्या नेहमी त्या पदार्थांच्या साठ्याच्या आसपास असतात. त्यापुढे, हार्कोनेन घराणे, जे आर्टेड्सचे काही पिढ्यांपासूनचे शत्रू असतात, त्यांनी बरेच वर्ष आराकीस वर राज्य केले असते. त्यामुळे, त्यांनी आर्टेड्स साठी काहीना काही सापळा आराकीस वर रचून ठेवलाय हे नक्की असते. आराकीस वरचे नेटिव्ह लोक म्हणजे फ्रेमेन. हे फ्रेमेन लोक पाण्याच्या दुर्भिक्षात राहाण्यासाठी अ‍ॅडॅप्ट असतात. वाळवंटात फिरताना शरीरातला ओलावा वातावरणात आजिबात निसटू नये म्हणून 'स्टिलसूट' नावाचे वस्त्र वापरत असतात. आणखी मसाला असतो तो म्हणजे 'बेने गेशेरीत' नावाची संस्था असते, जी फ्रेमेन सारख्या "रानटी" किंवा मुख्य धारेतल्या बाहेरच्या लोकांचा पुढे मागे वापर करुन घेण्यासाठी त्यांच्यात, (खोट्या) प्रोफेसीज/भविष्यवाण्या पेरुन ठेवत असते. एकूण, पॉल ह्या भविष्यवाण्यांच्या आधारे स्वतःला मुआ'दीब नावाने फ्रेमेन्सच्या लढाऊ आणि आक्रमक धर्माचा प्रेषित कसा बनवतो, आणि हार्कोनेन घराण्याशी कसा लढतो अशी कथा आहे. ह्यात ईस्लामच्या उदयाशी पॅरॅलल स्पष्ट आहेत. बरेच फारसी शब्द वापरले आहेत. कथेवर तीन वेळा सिनेमा येऊन गेला आहे आणि चौथ्यांदा यावर्षी येणार आहे. टिमोथी कॅल्मेट पॉलच्या भुमिकेत दिसेल. २. द कमिंग ऑफ द थर्ड राईश- रिचर्ड एव्हन्स. (२००४) पृष्ठसंख्या- ६५६

वाळींबेंचे नाझी भस्मासूराचा उदयास्त न वाचलेल्या दुर्मिळ लोकांपैकी मी एक आहे. तेव्हा हे अगदी क्लीन स्लेट घेऊन वाचत आहे. नाझी जर्मनी वरच्या त्रिधारेतले हे पहीले पुस्तक आहे. त्रिधारा अशी आहे- १. द कमिंग ऑफ द थर्ड राईश २. थर्ड राईश अ‍ॅट पॉवर ३. थर्ड राईश अ‍ॅट वॉर. पुस्तकाची दिर्घ प्रस्तावना खुप उत्तम आहे. नाझी जर्मनीवर इतकी पुस्तके येऊन गेली आहेत, मग आणखी एक लिहायचे प्रयोजन काय? ह्या प्रश्नाचे उत्तर लेखक एव्हन्स ह्यांनी दिले आहे. की नाझी जर्मनीचा संक्षिप्त, किंवा निवडक पैलूंवर प्रकाश टाकणारी बरीच चांगली आणि वाईट पुस्तकं असली तरी, नाझी जर्मनीतल्या नागरीकाला सभोवताली काय दिसत होते ? त्या वेळी काय चर्चा, काय राजकीय प्रश्न होते ? आणि एकूणच नाझी जर्मनीचे सखोल आणि सर्वांगीकचित्रणपाहाण्यास मिळत नाही. ते या त्रिधारे द्वारा देण्याचा प्रयत्न आहे. पहीले पुस्तक जिथपर्यंत वाचून झाले त्यावरुन सखोल महीती मिळणार हे समजले आहे. आत्तापर्यंत बिस्मार्क, कैसर विल्यम दुसरा ह्यांचे शासन, आणि पहील्या महायुद्धानंतर धाधांत अराजकतेनंतर जर्मनी मध्ये पहीले लोकशाही शासन १९१८ मध्ये कसे आले, आणि व्हर्सेलीस करारातल्या अपमानकारक अटींचा राजकारण आणी नागरी जीवन यांच्यावर काय प्रभाव पडला हे सांगितले आहे. जर्मनीत धार्मिक दृष्टीतून ज्यूंचा द्वेष, ते वांशिक दृष्टीतून ज्यूंचा द्वेष हा प्रवास तपशीलवार दाखवला आहे. यापुढे पुस्तक लोकशाही राज्य १९१८-१९३३ दरम्यान कसे चालले, लोकांचा वैचारीक कल कुठे होता आणि तो कसा हळूहळू बदलत गेला, असे जाईल आणि शेवटी १९३३ मध्ये नाझी जर्मनीचा उदय होऊन संपेल. पुस्तक अत्यंत तपशीलवार आहे, आणि ह्या बद्दल रस असल्यास उत्तम पर्याय आहे. तुम्ही काय वाचताय ? (चित्रे आंतरजालावरुन साभार.)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 43389 views

🗣 चर्चा (96)
B
Bhakti Mon, 05/24/2021 - 18:48 नवीन
'बुडता मज आवरी' १/४ राहिलय.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 05/25/2021 - 15:36 नवीन
सध्या या पुस्तकाचे पुनर्वाचन चालू आहे : एक शून्य मी
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 05/27/2021 - 19:08 नवीन
ड्यून संपले. पुढचा भाग वाचण्याइतपत नक्की चांगले आहे. पुढे मागे वाचायचा प्लॅन आहे. पण ड्यून सायन्स फिक्शन आजिबात वाटले नाही. कथेच्या कोअरमध्ये कोणतीही वैज्ञानिक संकल्पना नाही आहे. फक्त स्पेस आणि परग्रहावर घडते म्हणून साय-फाय वर्गीकरण- पटले नाही. फॅण्टसीच म्हणावे लागेल. साय-फाय+फँटसी पण नाही म्हणता येणार कारण वैज्ञानिक संकल्पने वर आधारित कथा फारशी नाहीच. केवळ लाईटसेबर नावाची फंकी 'वैज्ञानिक' वस्तू सिनेमात असल्याने स्टार वॉर्स सायन्स फिक्शन होत नाही थर्ड राईश हळूहळू पुढे चालले आहे पण मजेदार आहे. कंटाळा येत नाही. ग्रेट रीड ! 'द डेंजर्स ऑफ स्मोकिंग इन बेड' हा मारियाना एनरीकेझ यांचा बुकर २०-२१ साठी शॉर्टलिस्ट झालेला अनुवादित कथासंग्रह वाचायला चालू केला. भयकथा आहेत, पण वेगळ्याच. कथा मनोरंजक आहेत. त्यातल्या एका कथेत (अवर लेडी ऑफ द क्वेरी) मध्ये निवेदनाची पद्धत वेगळीच आहे. यात कथेत निवेदन आहे ते एका गटाचे. (म्हणजे We did this, We did that.) ह्या गटात नक्की किती मुली आहेत (गट शाळा/कॉलेजवयीन मुलींचा आहे.), त्या मुलींची नावे- काहीच उल्लेख नाही. 'नातालिया' या एका मुलीच्या नावाचा फक्त उल्लेख आहे, आणि तिच्या काही कृती तेव्हढ्या गटापासून वेगळ्या निवेदित केल्या आहेत. (म्हणजे Natalia did this, Natalia did that.) आणि नातालिया सुद्धा गटातली एक आहेच. (Out of all of us, Natalia was the most obsessed.) या व्यतिरिक्त, एक्च्युअल निवेदक, किंवा गटातील दुसरा कोणत्याही व्यक्तीबद्दल चकार शब्द नाही. कुठेही I did this असे नाहीच. ह्या असल्या वेगळेपणातून कथा जास्त रंगत नसेल तर त्याचा व्यक्तिष: काही फायदा दिसत नाही. वेगळेपण फॉर द सेक ऑफ वेगळेपण इरिटेट होते.पण, कथा सुद्धा, बाय देमसेल्फ, हटके आहेत. विचित्र, कधीकधी भीतिदायक, दुःखी, काही वेळेस किळसवाण्या कथा आवडत असतील तर वाचायला चांगल्या आहेत. Image removed.

  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 10/21/2021 - 16:46 नवीन
ड्यूनचे टिमोथी कॅल्मेट स्टारर व्हर्जन नुकतेच रिलीज झाले. सुंदर सिनेमा बनवला आहे. आराकीस ग्रह, वेशभूषा, अभिनय... सगळंच जमून आलंय. पुस्तकांशी बराच जुळणारा आहे. HBO Max वर पाहू शकता.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 06/02/2021 - 07:13 नवीन
नुकतेच मी सॉमरसेट मॉम यांच्या Rain चे पुनर्वाचन केले. त्यावर स्वतंत्र लेख इथे.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 06/02/2021 - 09:41 नवीन
आम्ही लढलो-आम्ही घडलो, हे एस एफ आय कार्यकर्त्यांचं अनुभव असलेलं पुस्तक वाचलं. चळवळी कार्यकर्त्यांच्या प्रेरणा अनुभव आणि संघर्षाचे अनुभव. दुसरं पुस्तक, 'मराठी संतांचे सामाजिक कार्य' हे डॉ. वि.भि.कोलते यांचं महात्मा चक्रधर, संत ज्ञानेश्वर नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, संत रामदास यांच्याबद्दल सुंदर विवेचन असलेलं पुस्तक आहे. सध्या 'स्वातंत्र्योत्तर मराठी कविता' वसंत पाटणकरांच्या पुस्तकातला कवितांचं वाचन सुरु आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ध
धनावडे Wed, 06/02/2021 - 09:56 नवीन
लव्हाळी - श्री ना पेंडसे
  • Log in or register to post comments
र
रामचंद्र Sat, 08/03/2024 - 20:20 नवीन
खरं त्याचा काळ आहे मुंबईतला दुसऱ्या महायुद्धाचा पण अगदी आजच्या काळातलं असावं इतकं ते कथानक ताजंतवानं वाटतं. धडपडणारा तरुणवर्ग, त्यांच्या वाटेत तडमडणारे ज्येष्ठ, परिस्थितीचा कचाटा आणि चाळीतल्या सगळ्यांचीच जगण्याची धडपड. पेंडशांच्या या कादंबरीला स्वानुभवाचा भक्कम आधार असावा असं वाटतं.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Fri, 06/04/2021 - 12:54 नवीन
श्री संत एकनाथ महाराज कृत भावार्थ रामायण अनुवाद-डॉ. म.वि.गोखले सहा वर्षांपूर्वी गर्भसंस्कार भाग म्हणून वाचलं होते.आता स्वचैतन्यासाठी वाचतेय.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 06/10/2021 - 07:21 नवीन
गी द मोपासां ( Maupassant) यांची "Mother Sauvage" कथा वाचली. त्यावर लेखImage removed.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 06/10/2021 - 07:22 नवीन
त्यावर लेख इथे
  • Log in or register to post comments
क
कॉमी Mon, 06/21/2021 - 13:24 नवीन
ग्राफिक नॉव्हल म्हणजे कॉमिक कादंबरी. मी पूर्वी या प्रकारात काही वाचले नाही आहे. पण मार्जेन सेत्रापी यांच्या पर्सेपोलिस (persepolis) बद्दल वाचले आणि वाचावे (कि पाहावे ?) वाटले, सुरु केले. Image removed.

ही मार्जेनची आत्मकथा आहे. वर्ष- १९७८, इराण. इराण मध्ये पहलवी घराण्याची सत्ता आहे, पण ती संपुष्टात त्याच वर्षी आली. मार्जिचे वय होते- १०. ती उच्चशिक्षित आणि धर्माच्या प्रभावातून मोकळे असणाऱ्या प्रेमळ घरात राहत होती. मार्जिचे आई वडील दोघेही मार्क्सिस्ट होते. ती स्वतः फ्रेंच प्रभाव असलेल्या युनिसेक्स शाळेत जात असे. त्या वेळेस पहलवी घराण्याच्या शहाने आपल्या विरोधकांचा आवाज दडपण्याचे प्रयत्न चालू केले होते. रेक्स नावाच्या थिएटरला आतील लोकांसकट जाळून टाकल्याने (पोलिसांनीच जाळले असे विरोधकांचे म्हणणे होते.) लोकांचा आक्रोश वाढला, आणि हुकूमशाही संपवण्याची चळवळ जोराने उभी राहिली. मार्जिचे आईवडील सुद्धा चळवळीत सहभागी होते. पण, १९७९ मध्ये इराणीयन रिव्हॉल्युशन किंवा इस्लामिक रिव्हॉल्युशन मुळे आयातुल्ला खोमेनी सत्तेवर आला, आणि इराण आगीतून फुफाट्यात गेला, आणि इस्लामिक राष्ट्र म्हणून इराणची स्थापना झाली. त्या नंतर झालेल्या सामाजिक बदलांचे चित्रण सेत्रापी यांनी पर्सेपोलिस मधून केली आहे. पर्सेपोलिस म्हणजे पर्शियन साम्राज्याची राजधानी. पर्शियन साम्राज्याच्या वैभवाची आठवण म्हणून नाव पर्सेपोलिस ठेवले आहे. सेत्रापी म्हणतात-
Since then, this old and great civilization has been discussed mostly in connection with fundamentalism, fanaticism, and terrorism. As an Iranian who has lived more than half of my life in Iran, I know that this image is far from the truth. This is why writing Persepolis was so important to me. I believe that an entire nation should not be judged by the wrongdoings of a few extremists. I also don’t want those Iranians who lost their lives in prisons defending freedom, who died in the war against Iraq, who suffered under various repressive regimes, or who were forced to leave their families and flee their homeland to be forgotten. One can forgive but one should never forget
Image removed.

  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Mon, 06/21/2021 - 13:47 नवीन
असा विषय कॉमीक बुकमधुन हाताळणे अजुन मस्त.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 06/21/2021 - 13:51 नवीन
रोचक !
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 06/30/2021 - 16:43 नवीन
पर्सिपोलिस नाव वाचून आपल्याकडील लेण्यात असलेले पर्सिपोलिटन धर्तीचे स्तंभ डोळ्यांसमोर आले. स्तंभांवर असलेली प्राण्यांची जोडगोळी ही पर्शियाच्या पर्सिपोलिस येथील स्तंभांची शैली. त्याच धर्तीचे स्तंभ येथील बेडसे, कार्ले, नाशिक लेणीत आढळतात.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Wed, 06/30/2021 - 17:57 नवीन
अशोकस्थंब सुद्धा पर्सिपोलिटन शैलीत बांधला आहे असे विकी म्हणते.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 06/30/2021 - 19:00 नवीन
अशोकस्तंभ म्हणजे तुम्ही सारनाथचा स्तंभ म्हणताय की एकुणात अशोकाने बांधलेले स्तंभ. शैली जरी काहीशी मिळतीजुळती असली तरी दोन्हीत काही फरक आहेत. अशोकस्तंभ हे मुख्यतः सिंहस्तंभ म्हणून ओळखले जातात.
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 07/01/2021 - 04:27 नवीन
दोनीही. विकित सारनाथचा स्तंभ आणि अशोकाचे इतर स्तंभ आणि मौर्यन बांधकामातल्या बर्याच वास्तू पर्सिपोलिटन शैलीवरून प्रेरित आहेत असे दिले आहे. ह्या शैलीचा प्रभाव कसा पडला असेल ?
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 07/01/2021 - 05:59 नवीन
मौर्यन स्तंभ हे स्वतंत्र उभे असतात तर पर्सिपोलिटन धर्तीचे स्तंभ हे छताला आधार देण्याच्या स्थितीत उभे असतात. अशोकस्तंभ उंचीकडे निमूळते होत गेलेले दिसतात तर पर्सिपोलिटन एकसमान असतात शिवाय इतरही अनेक फरक आहेत. तत्कालीन काळात होणार्‍या व्यापारासोबत कलासंस्कृतीचे आदानप्रदानही होत गेले त्यामुळे तिकडील शैलीचा प्रभाव येथे व इकडील शैलीचा प्रभाव तेथे पडत गेला.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Wed, 06/30/2021 - 16:13 नवीन
ऋषिकेश गुप्तेंचा अंधारवारी कथासंग्रह वाचला. (त्यातली काळ्याकपारी हि कुप्रसिद्ध कथा काही पाने वाचून स्किप केली, कारण किंगची "N" वाचलीये.) इतर कथा छान आहेत ! विशेषतः गानूआजींची अंगाई ही कथा फारच भीतीदायक वाटली, चांगलाच थरकाप उडाला.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Wed, 06/30/2021 - 18:12 नवीन
तुंबाड मध्ये गानू आजींची प्रेरणा घेतली होती, असे वाटले.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Wed, 06/30/2021 - 18:35 नवीन
हो, कारण- धारपांची तळघर (बहुदा? नक्की नाव आठवत नाही.) किंगची ग्रॅनी आणि गानुआजी तिन्ही गोष्टी खूपच समान थीमवर आहेत. धारपांची कथा ग्रॅनी वरच आधारित होती, आणि तुंबाड ऑफिशियली धारपांच्या कथेवर आहे. ग्रॅनी मध्ये थेट हस्तर नाव पण आहे !
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Wed, 06/30/2021 - 18:22 नवीन
जगात अनेक क्रुरकर्मे झाले पण जग अजूनही ज्यात रस घेऊन ज्याच्याबद्द्ल वाचतेय, लिहितेय, चित्रपट बनवतेय, चर्चा करतेय तो म्हणजे हिटलर. हे हिटलर चे यश म्हणावे काय ? मी देखील हिटलर बद्द्लची बरीच पुस्तके (मराठी) वाचलीत, चित्रपट पाहिलेत पण हा विषय लोकांना (आणि मला) देखील नक्की का आकर्षित करतो हे कळाले नाही.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Wed, 06/30/2021 - 19:04 नवीन
तुर्त इतके म्हणता येइल की हिटलर इतके समर्थ्यवान नसतीलही पण तशी प्रवृत्ती राखणारे लोक आजही आजुबाजुला आहेत तीच गोष्ट हिटलरचा बिमोड करणार्‍यांची... त्यांची प्रवृत्ती राखणारे लोकही आजुबाजुला आहेत आणी हा दोन प्रव्रुत्तींमधील संघर्ष जो वर्तमानातील लोकांमधे अस्तित्वात आहे त्यांच्या बाजुचे अथवा विरोधाचे प्रतीक म्हणुन जे उदाहरण ठळक आहे ते उदाहरण पुन्हा पुन्हा विवीध कारणांनी चर्चेत येते व त्यापेक्षा मोठे उदा तयार होइल पर्यंत पुन्हा पुन्हा चर्चेत येत राहील... हेच कारण आहे महाभारत आजही अमर वाटते त्यातील कथानक अथवा विवीध पात्रे आजही विवीध कांगोरे धुंडाळुन चर्चीली जातात...
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Wed, 06/30/2021 - 19:13 नवीन
हेच कारण आहे महाभारत आजही अमर वाटते त्यातील कथानक अथवा विवीध पात्रे आजही विवीध कांगोरे धुंडाळुन चर्चीली जातात...
वस्तुतः हि चर्चा महाभारत वा त्यातील कथान अथवा पात्रांबाबत नसतेच मुळी, अंडर दी सरफेस ही चर्चा तुमची माझी व आपल्याबाबतच असते... फक्त आपण ठळक उदाहरण बनलेले नसल्याने अशा चर्चेत आपण आपली नावे घेण्या ऐवजी प्रमुख पात्रांची नावे त्यांची वर्तणुक व त्याचे विश्लेशण करतो... अगदी संतांची उदाहरणे लिहणार्‍यांनाही संतांबाबत त्यांच्या ज्ञानाबाबत काडीची फिकीर नाही म्हणुन त्यांचे कर्तुत्वही दांभिक व फक्त आणि फक्त स्वांत आत्मकेंद्रीत सुखासाठी आहे पण त्यांची कसलीच योग्यता नसल्याने ते ठळक उदाहरणे प्रसिध्द असणार्‍या संताची नावे घेउन स्वताची बोलबच्चन मांडत असतात आणी त्याला ते संतांचा महीमा असा समज करुन पसरवत असतात... वस्तुतः ते तितकेच स्वार्थी, मतलबी आणि आत्मकेंद्रीत असतात जितके स्वार्थी, मतलबी आणि आत्मकेंद्रीत संतांना न मानणारे असतात
  • Log in or register to post comments
B
Bhakti गुरुवार, 07/01/2021 - 12:19 नवीन
तीन हजार टाके -सुधा मूर्ती
  • Log in or register to post comments
म
मनो Fri, 07/02/2021 - 21:21 नवीन
नुकतंच 'किशोर शांताबाई काळे' यांचं 'कोल्हाट्याचं पोर' वाचलं. सुरुवात केल्यावर पुस्तक खाली ठेवता आलं नाही, काही तासात सलग वाचलं. काळजाला चटका लावणारं पुस्तक आहे. Against all odds म्हणजे काय ते हे पुस्तक वाचून कळतं. किरकोळ अडचणीमुळे नाउमेद होणार्यांनी जरूर वाचावं. यासारखं एकही पुस्तक पुन्हा लिहिता येऊन नये अशी परिस्थिती निर्माण झाली, तेंव्हा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं सुधारला असं म्हणता येईल!
  • Log in or register to post comments
ग
गुल्लू दादा Sat, 07/03/2021 - 06:47 नवीन
पुस्तक छान आहे. त्यांच्या अपघाती मृत्यू बद्दल बऱ्याच शंका उपस्थित झाल्या होत्या.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 07/03/2021 - 08:10 नवीन
या सुधारण्याच्या प्रवासाला आपणच खोडा घालत असतो. एक समाज म्हणून आपल्याला आहे तिथेच रेंगाळण्यात जास्त सुख वाटते का? जेव्हा जेव्हा आपल्यातीलच कोणीतरी आपल्याच एखाद्या उणीवेवर बोट ठेवले तेव्हा आपणच त्याविरुद्ध प्रतिकार करतो. कोल्हाट्याचं पोर या पुस्तकाला बंदी घालावी अशी मागणी त्याच समाजातून झाली होती. तेदेखील लेखकाच्या अकाली मृत्यूच्या सहा वर्षांनी. आता काय परिस्थिती आहे, माहिती नाही. पण कोणत्याही पक्षाचे असो, उठसूठ संवेदनशील गळवांच्या उपचारासाठी दिसेल त्यावर बंदी घालणारे सरकार असतेच. तेव्हा अशा पुस्तकांवर आमच्या भावना दुखावल्या किंवा आमच्या समाजाची बदनामी झाली या सबबीखाली बंदी आल्यास आश्चर्य वाटणार नाही. लोकरंग पुरवणीतील २०१३ सालचा एक लेख.
  • Log in or register to post comments
ग
गुल्लू दादा Sat, 07/03/2021 - 10:37 नवीन
ज्यांना स्त्री ही भोग्यवस्तू म्हणून कायम रहावी असे वाटते तेच लोक याला विरोध करू शकतात. हा लेख इथे दिल्याबद्दल आपले आभार तुषार.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sat, 07/03/2021 - 11:09 नवीन
बापरे. वाचायलाच पाहिजे.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 07/17/2021 - 09:09 नवीन
काळजाला चटका लावणारं पुस्तक आहे. हे अंडरस्टेटमेंट झालं. याच्यापेक्षा बरचसं काही जाणवतं. ते शब्दात मांडता येणार नाही. वाचताना जर असं वाटतं असेल तर तो मुलगा आयुष्य कसं जगला असेल. जन्मल्यापासून परवड सुरू झाली. आणि जेव्हा आयुष्याचा आनंद घेता येईल अशी परिस्थिती आली, तेव्हा ते निघून गेले. दुर्दैवाने मरेपर्यंत त्यांचा पिच्छा सोडला नाही. दोन चार अपवाद सोडले तर, प्रत्येक पात्र तिरस्करणीय आहे. कुणाचा स्वभाव वाईट असेल, कुणाची मजबुरी असेल, पण प्रत्येक जण स्पर्धा असल्यासारखं ज्या निष्ठूर आणि नीचपणे वागतो, त्याला तोड नाही. डॉक्टर होणं लांब, हा मुलगा तोपर्यंत जगलाच कसा याचं आश्चर्य वाटत राहतं. भीडभाड न ठेवता त्यांनी ज्याप्रकारे खरी नावे वापरली आहेत, त्यांचा अपघात हा घातपात होता असं जर कधी सिद्ध झालं तर अजिबात आश्चर्य वाटणार नाही.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Mon, 07/05/2021 - 18:23 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 07/05/2021 - 18:50 नवीन
हो, वाचलंय. सुरुवातीला पकड घेणारे पुस्तक नंतर नंतर रटाळ होत जाते.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Fri, 10/22/2021 - 08:38 नवीन
यावर चित्रपट निघणार होता म्हणे .. जॉनी डेप आणि अमिताभ असणार होते ...
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Tue, 07/06/2021 - 05:49 नवीन
एकदा वाचायला चांगले आहे. खूपवेळा अंडरवर्ल्डच्या दादाचे तत्वज्ञानाचे परिच्छेद अगम्य, रटाळ आहेत आणि रिपीट झाले आहेत. मधेच पुस्तक भरकटल्यासारखे वाटते. तरी एकंदरीत चांगलेच आहे.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 07/11/2021 - 17:30 नवीन
आज सकाळी मेडिटेशनवर असलेली पॉडकास्ट ऐकताना मुलाखत घेणार्‍या व्यक्तीने ज्या व्यक्तीची मुलाखत घेतली जात आहे त्या व्यक्तीला काही पुस्तके रेफरन्ससाठी विचारली होती... त्यात एका पुस्तकाचे नाव आणि ज्या व्यक्तीने हे पुस्तक लिहले आहे त्या बाबत उत्सुकता चाळवल्याने मी ते पीडीएफ डाउनलोड करुन वाचण्यास सुरवात केली असुन आज त्या पुस्तकाचा १ला धडा [चॅप्टर ] वाचुन पूर्ण केला... आता काही काळ मी हे पुस्तक वाचुन पूर्ण करण्यासाठी देण्याच्या विचारात आहे. पुस्तकाचे नाव :- Many Lives, Many Masters The True Story of a Prominent Psychiatrist, His Young Patient and the Past-life Therapy That Changed Both Their Lives लेखक :- Dr. Brian Weiss हा प्रतिसाद लिहताना मी या डॉक्टरांचा छोटासा व्हिडियो पाहिला. तो खाली देत आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Aaj Phir Full Video Song | Hate Story 2 | Arijit Singh | Jay Bhanushali | Surveen Chawla
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Sun, 07/11/2021 - 17:35 नवीन
त्यात या पुस्तकाचा नंबर फार फार फार वरचा आहे
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 07/17/2021 - 05:54 नवीन
अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या या ३ कथा वाचल्या : Cat in the Rain The Killers Hills Like White Elephants त्यापैकी "Hills Like White Elephants" आवडल्याने त्यावर स्वतंत्र लेख लिहिलाय.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 10/17/2021 - 08:45 नवीन
' इश्क में अजनबी, न रहे तो इश्क नही होता' रवीश कुमार, आजच्या वृत्तांकनाच्या काळात पत्रकार म्हणून त्यांचे वेगळेपण नजरेत भरते. पत्रकार म्हणून केवळ विविध बातम्यांच्या वाहिन्यावर फक्त त्यांनाच ऐकणाराही एक वर्ग आहे. (याबद्दल वेगवेगळी मतं असू शकतील) बाकी, माणूस म्हणून तो उत्सुकतेचा विषय वाटला नाही तर नवल नाही. अशा रवीश कुमारचं लघुकथांच्या साखळीत विणलेलं छोट्या छोट्या ओळीतलं प्रेयसी सोबतचा दिल्ली शहरातल्या भटकंती बरोबर समाज, सांस्कृतिक घटनांच्या स्पर्शात लिहिलेलं सुंदर पुस्तक म्हणजे 'इश्कमे शहर होना' कितीतरी वाक्य 'कोट' करावीत अशी आहेत.'जगह की तलाशमें हम इस शहरमें और कितने शहर बदलेंगे' 'इश्क में अजनबी, न रहे तो इश्क नही होता' ' जब कुछ नही भी बचेगा तो इस टिफिन बॉक्स में हम मोहब्बत की दो रोटिया रखा करेंगे' चार-चार तर कधी कधी दहा एक ओळीतलं, सुंदर चित्रांसहित चितारलेले पुस्तक वाचनीय आहे. सलग दोन तास वाचायला बसले की पुस्तक संपते. प्रेमात पडलेल्या प्रत्येकाचा, आपापल्या प्रेमाच्या आठवणींचा एक गोड कोपरा असतो. रवीश कुमारच्याही आयुष्यातल्या आपापल्या ठरलेल्या जागा आहेत. विशेषत: दिल्ली. लेडीज होस्टेल समोर उभे राहणे आहे, पाऊस, मंदिर, मशीद, गल्ली, रस्ते, रात्र, पहाट,चाँद, सार्वजनिक आंदोलने, टीव्ही, मीडिया, अण्णाचं आंदोलन, मार्क्स, लोकपाल ते लवपाल असा सुरेख प्रवास आहे. काही काही वाक्य आणि कथा कोट करून लिहावीत अशी आहेत पण सर्वच सांगण्यापेक्षा पुस्तक एकदा वाचायलाच हवं...! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
क
कॉमी Mon, 10/18/2021 - 04:57 नवीन
पुस्तक छान वाटतयं.
  • Log in or register to post comments
स
सुरिया Mon, 10/18/2021 - 07:34 नवीन
आह्ह्हा, इश्कमे शहर होना. "मगध एक्स्प्रेस बोगी नं एस वन. दिल्ली से पटना लौटते वक्त उसके हाथ में बर्नार्ड शॉ देखकर वहांसे कट लिया. लगा की इंग्लिश झाडेगी. दूसरी बोगीयोंमे घूम घूमकर प्रेमचंद पढनेवाली ढूंढने लगा. पटना से आते हुये कई लडकीयोंके हाथ में गृहशोभा तक दिखा था. सोचते सोचते बेचारा कर्नल रंजीत पढने लगा. लफुआ लोगोंका लॅन्ग्वेज प्रॉब्लेम अलग होता है." . . झीरो टीआरपी वाला अँकर आमच्यासाठी टॉप नंबरच्या वर असतो.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 10/21/2021 - 18:47 नवीन
भाऊ पाध्ये यांचे १९६५ मध्ये प्रकाशित झालेले व खूप गाजलेले "वासूनाका" हे पुस्तक वाचले. पुस्तक वाचून खूपच निराशा झाली. अत्यंत सामान्य पुस्तक वाटले.
  • Log in or register to post comments
र
राजाभाउ Fri, 10/22/2021 - 10:08 नवीन
वसुनाका फार पुर्वी वाचल होतं आणि आवडल होतं पण तुम्ही म्हणता तसा अनुभव मला भाऊ पाध्येंचच राडा वाचताना आला होता. जेंव्हा ते पुस्तकं आल तेंव्हा त्याचे बरेच काही वाद झाले आणि नंतर ते out of print होत त्यामुळ ते मिळालच नव्हत पण मित्रांकडुन खुप ऐकल होत, मध्यंतरी,ते परत आलं तेव्हा वाचल. तेव्हा मला ही असच वाटल कि किती सामान्य पुस्तक आहे (overrated) पण मग नंतर विचार केला तेव्हा जाणवल कि ते पुस्तक वेगळ्या काळात लिहील होत त्या नंतर बरेच संदर्भ बदलले आहेत बाहेरचे आणि माझे सुध्दा. आपण सुध्दा बरच वेगळ वाचल , पाहिलं वेगळे अनुभव घेतले त्यामुळे ते पुस्तक तेव्हा जसं भिडल असत तस आज भिडत नाहिये, तेव्हाच्या क्रांतिकारक गोष्टी आता सामान्य झाल्यात. म्हणुन पुन्हा वाचायला घेतल तर तेच पुस्तक थोड वेगळ जाणवलं रच्याकान भाउ पाध्येंच "बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर" हे एक अप्रतिम पुस्तक आहे
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 08/03/2024 - 14:53 नवीन
कायदाविषयक. चौदा वर्षे वकीली आणि नंतर न्यायाधिश झालेल्या रमेश बापट यांनी कायदा आणि विविध खटल्यांचे मजेदार किस्से सांगणारे पुस्तक हल्लीच वाचले.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sun, 08/04/2024 - 07:50 नवीन
अधर्मयुध्द हे गिरीष कुबेर ह्यांचे पुस्तक वाचतोय. त्यावरूनच विद्यार्थी ही शशक सुचली. त्या आधी निळू दामले ह्यांचे सीरिया सगळे विरुद्ध सगळे वाचले.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 15 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 15 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 15 hours ago
  • सुंदर !!
    1 day 15 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 15 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा