Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

लसीचे अर्थकारण

स
साहना
Mon, 04/19/2021 - 21:43
🗣 117 प्रतिसाद
Price is what you pay value is what you get - Warren Buffet बराच काळ ह्या लेखावर माझे काम सुरु होते. विकारी नाम संवत्सर मध्ये कोरोना सुरु झाला आणि शर्वरी मध्ये ह्याचे सावट संपूर्ण जगावर पसरले. डॉक्टर सुनेत्रा गुप्ता ह्यांनी ह्या विषयावर २०१३ मध्येच लिहिले होते. अगदी ज्योतिष्य प्रमाणे त्यांनी विमानवाहतूक आणि वाढलेला प्रवास ह्यामुळे पुढील महामारी जागतिक स्तरावरील असेल आणि त्याच वेळी मानवजात सुद्धा अश्या महामारीला पुरून उरेल असे प्रतिपादन त्यांनी ह्या पुस्तकांत केले होते. जाणकारांनी वाचावे. (डॉक्टर गुप्ता ह्यांनी कोविड लोकडाऊन ला विरोध केला होता). औषध निर्माण कि एक क्लिष्ट गोष्ट आहे. आपण फ्रिज विकत घेतला आणि त्या फ्रिज मुळे घराचे शॉर्ट सर्किट होऊन आग लागली तर कदाचित फ्रिज कंपनी विमा वापरून तुम्हाला दुसरे घर देऊ शकेल पण वजन कमी करण्याची जादुई गोळी घेतली आणि किडनी फेल झाली तर मग काय ? कितीही पैसा दिला तरी तिथे नुकसान भरपाई होत नाही. त्यामुळे कुठलेही औषध घेताना ग्राहकाला त्या औषधावर विश्वास असणे गरजेचे आहे. मागील १०० वर्षांत वैद्यकीय क्षेत्राने भूतो न भवती अशी प्रगती केली आहे आणि विविध औषधें दिवसें दिवस अधिक परिणामशाली पण त्याच वेळी अधिक क्लिष्ट होत चालली आहेत. ह्या औषधांवर विश्वास कसा ठेवावा हे खूपच कठीण समस्याच झाली आहे. ह्याला प्रत्युत्तर म्हणून बहुतेक सरकारांनी स्वतःला ह्या मोर्च्याच्या पुढे लीडर म्हणून नियुक्त केले आहे. कुठलेही औषध निर्माण झाले कि FDA सारख्या संस्थेने त्याला मान्यता दिल्याशिवाय अमेरिकेत ते विकले जाऊ शकत नाही. अशीच संस्था भारतांत सुद्धा आहे. त्यामुळे कुठल्याही कंपनीने नवीन औषध शोधले कि किमान २-३ वर्षे ह्या संस्थेच्या मागे फिरल्याशिवाय ते पेशंट पर्यंत पोचत नाही. FDA सारख्या संस्थांनी लोकांचा फायदा होतो कि नुकसान ह्यावर अनेक अभ्यास उपलब्ध आहेत. काही ठिकाणी FDA ने जीव वाचवले असले तरी अनेक ठिकाणी दिरंगाई, चुकीचे सल्ले इत्यादींनी अनेक मृत्यू सुद्धा FDA मुळे झाले आहेत. वैयक्तिक मत म्हणून FDA सारख्या संस्था असायला पाहिजेत असे मला वाटते पण त्याच वेळी ह्या संस्थांना स्पर्धा सुद्धा असायला पाहिजे असे माझे मत आहे. आणि ज्या पेशंटला विशेषतः जो नाही तरी मरणारच आहे त्याला कुठलीही ट्रीटमेंट स्वखुशीने घ्यायला मनाई नसावी असे मला वाटते. औषध निर्माणाची प्रक्रिया हि कॅपिटल इंटेन्सिव्ह आहे म्हणजे ह्याला प्रचंड भांडवल लागते पण रियल इस्टेट प्रमाणे नाही. औषध निर्मिती हे जुगार खेळण्याप्रमाणे आहे. तुम्ही वर्षभर दररोज एक रुपयाची लॉटरी घेतली आणि डिसेम्बर ३१ ला तुम्हाला १०० रुपये लागले तर ? काही लोक एक रुपयाची लॉटरी आणि शंभर बक्षीस म्हणजे नफा १:१०० आहे असे म्हणतील पण प्रत्यक्षांत हा रेशो ३६५:१०० म्हणजे नुकसानीचा धंदा आहे. कारण ज्या लॉटरी लागल्या नाहीत त्या सुद्धा इथे गृहीत धरल्या पाहिजेत. ३६४ रुपये जे तुम्ही न लागलेल्या लॉटरीवर खर्च केले तो होतो संक कॉस्ट, म्हणजे तो पैसा गेला पण कुठल्याही औषध निर्मितीत हा खर्च अपेक्षित असतोच. त्यामुळे तुम्ही औषध शोधले तर कंपनीला फायद्यांत ठेवण्यासाठी फक्त त्याचा उत्पादन खर्च आणि रिसर्च खर्च गृहीत धरून भागत नाही तरी इतर औषधांचा (जी फेल झाली) संक कॉस्ट सुद्धा तुम्हाला वसूल करावा लागेल. अनेक वेळा औषधे शोधणारी कंपनी आणि ती विकणारी कंपनी वेगळी असते. ऑक्सफर्ड ने औषध शोधले आणि अस्त्रा झेनेकाला त्याचे हक्क विकले आणि भारतांत सिरम ने त्याची निर्मिती करण्याचे हक्क घेतले. त्याशिवाय विविध देशांच्या FDA प्रकारच्या संस्थांबरोबर काम करून त्यांची परवानगी घेऊन देणाऱ्या वेगळ्या कंपन्या दलाल स्वरूपाची कामे करणाऱ्या असतातच. जी कंपनी औषधे शोधते तिला त्यातून नफा अपेक्षित असतो. नफा जितका जास्त तितकी गुंतवणूक जास्त, विद्वान लोकांना नोकरीत ठेवण्याची क्षमता जास्त इत्यादी त्यामुळे एकदा औषध शोधले कि इतर कंपन्या त्याला कॉपी करून आपला नफा चोरणार नाहीत ह्याची शाश्वती ह्या कंपन्यांना हवी असते, हि शाश्वती नसेल तर हि विविध औषधे शोधलीच जाणार नाहीत. त्यामुळे पेटंट वगैरे विषय येतात, जे पुन्हा क्लिष्ट आहेत. पण FDA मधील सरकारी अधिकाऱ्याना पैसे चारून सर्वसाधारण औषधांवर सुद्धा आपले हक्क प्रस्थापित करणे असली कामे सुद्धा औषध कंपन्या करतात. कोविड ची लस शोधण्याचे काम वेगाने अनेक कंपन्यांनी केले.कोट्यवधी लसी विकल्या जाऊन आपण अब्जावधी पैसे कमावू अशी अपेक्षा असल्याने विविध कंपन्यांनी ह्यांत पैसा ओतला, सिरम ने साधारण ५०० लोकांना आधीच ह्या कामासाठी कामावर घेतले होते आणि काही शेकडो कोटी रुपये परताव्याची काहीही खात्री नसताना आधीच खर्च केले होते. नफ्याची अपॆक्षा नव्हती तरी कुणीही ह्या भानगडीत पडले नसते. फायझर वगैरेंनी ह्या वर्षीचा डोस आपण कमी किमतीत देऊ असे सांगितले असले तरी भविष्यांत त्याच्या किमती वाढवून आपण फायदा करू असे आपल्या गुंतवणूकदारांना सांगितले आहे. सिरम आणि भारत सध्या भारतात लसीची चणचण जाणवू लागली आहे. अमेरिकेचे उदाहरण पाहता किमान ५०% लोकांना लस दिल्याशिवाय कोरोना आटोक्यांत एणार नाही असे वाटते. भारत सरकारने वाटाघाटी न करता तुघलकी न्यायाने लसीची किंमत १५० रुपये (सिरम साठी, हॉस्पिटल फी १००) ठेवली. पुनावाला ह्यांची शेंडी सरकारी हातांत असल्याने त्यांना निरुपाय होता. पण बायोकॉन च्या किरण शॉ वगैरेंनी सरकारवर बरेच तोंडसुख घेतले. भारत सरकारचे आडमुठे धोरण पाहून इतर अनेक कंपन्यांनी ह्या क्षेत्रांत न घुसण्याचा निर्णय घेतला. फायझर वगैरेंनी सुद्धा भारतात उतरण्याचा आपला निर्णय बदलला. लस जनतेसाठी फुकट असणे चांगले. बहुतेक भारतीय अत्यंत गरीब असल्याने ह्यांना विनामूल्य लस उपलब्ध करून देणे संपूर्ण समाज हिताचे आहे. ज्या प्रमाणे प्राथमिक शिक्षण फुकट असते किंवा पोलिओ लस फुकट दिली जाते त्याच पद्धतीने लस सुद्धा फुकट द्यावी ह्यांत दुमत नाही. पण लस निर्माण कायाला पैसे लागतातच त्यामुळे हे पैसे कुणी द्यायचे हा प्रश्न आहे. ज्यांना लस फुकट दिली जाते त्या लसीचे पैसे सरकारने द्यावेत किंवा इतर धर्मादायी संस्थांच्या द्वारे हि किंमत दिली जावी हे योग्य आहे. पण इथे सरकारने सिरमवर निर्बंध टाकून त्यांना आर्थिक ओझे दिले. भारतांत लसीचा सर्वांत मोठा ग्राहक भारत सरकार असल्याने निव्वळ मार्केट तत्वावर सिरम कडून चांगला डिस्काऊंट मिळवणे सरकारला सहज शक्य होते त्याशिवाय खाजगी इस्पितळांत काहीही निर्बंध ठेवले नसल्यास सिरम ला अजून पर्यंत बऱ्यापैकी पैसा उभारणे शक्य होते. बॉलिवूड तारका आणि गलेलठ्ठ पगाराच्या व्यक्ती खाजगी इस्पितळांत जाऊन ३०० रुपयांत लस टोचून घेत आहेत ह्या पेक्षा मूर्खपणाची ती गोष्ट कुठली ? संपूर्ण जगांत लस साठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा प्रचंड तुटवडा जाणवू लागला आहे. काही तुटवडा डिमांड मुळे आहे तर काही ठिकाणी हा तुटवडा त्यांच्या मूळ देशाने निर्बंध घातल्याने झाला आहे. अमेरिकेने काही महत्वाच्या गोष्टींवर निर्बंध घातल्याने सिरम आपली लस वेगाने निर्माण करू शकत नाही. पण त्याच वेळी १५० रुपयांचे बंधन घातल्याने हाच कच्चा माल इतर देशांतून जास्त पैसे देऊन आणणे सुद्धा सिरम ला शक्य नाही. त्याशिवाय प्रचंड मोठा देश असल्याने वाहतूक आणि स्टोरेज सुद्धा कठीण आहेत. विदर्भांत लस पोचवणे आणि पुण्यात लास पोचवणे ह्यासाठी वेगवेगळा खर्च येतो. त्यामुळे सर्वानाच १५० रुपये परवडणारे नाही त्यामुळे लसी कदाचित दुर्गम भागांत पोचणार नाहीत. काही बातम्याप्रमाणे काही भारतीय बाबूंनी सिरम ला १५० रुपये तरी का द्यावेत असा मुद्दा उठवला होता. किमंत निर्धारित करून सिरम ची आर्थिक स्थिती खराब केल्यानंतर आता भारत सरकारने त्यांना ३००० कोटी ची "मदत" देऊ केली आहे. जुन्या मराठी चित्रपटांत निळू फुले विविध खेळ्या खेळून गरीब शेतकऱ्याला आपल्याकडून कर्ज घ्यायला भाग पडायचा तसाच हा घाणेरडा प्रकार आहे. भारत सरकाने एकूण ६ कोटी लसी विकत घेतल्या आहेत. त्यातील १ कोटी लसी जरी ३००० रुपयांना विकल्या असत्या तर हे पैसे सिरमला आपल्या हक्काच्या पैश्याप्रमाणे २ महिने आधीच मिळाले असते. (लस वर GST का लावला आहे हे सुद्धा तर्काच्या पलीकडले आहे. मध्याच्या डोक्यावरचे लोणी खाण्याचा हा प्रकार आहे). अर्थतज्ञ् अजय शाह ह्यांची हि संपुन मुलाखत वाचाच https://www.indiaspend.com/indiaspend-interviews/price-caps-limit-private-sector-covid-19-vaccinations-to-cities-734842 लसीचा तुटवडा आणखीन गंभीर होणार आहे. कदाचित पुनावाला बोलून दाखविणार नाहीत पण त्यांना ह्या भानगडीत पडण्याचा पश्चात्ताप होत असेलच.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 39765 views

🗣 चर्चा (117)
म
मुक्त विहारि Wed, 04/21/2021 - 15:51 नवीन
गोल गोल राणी....
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 04/21/2021 - 16:02 नवीन
विकत घेणार ?
  • Log in or register to post comments
अ
अमर विश्वास Wed, 04/21/2021 - 16:07 नवीन
हो ... तशीच बनवून दे .. नक्की घेतो
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Wed, 04/21/2021 - 15:43 नवीन
एखाद्या गाडीच्या इंजिनचा साचा बनवायला किती खर्च येतो हे एखाद्या ऑटोमोबाईल इंजिनियरला विचारून बघा. त्याचा खर्च वसूल व्हायला किती गाड्या बाजारातील स्पर्धा विचारात घेता विकाव्या लागतील हेही विचारा.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 04/22/2021 - 13:23 नवीन
२०२० मध्ये जवळपास २,२६,००० Honda Activa विकल्या गेल्यात रच्याकने ६५ हजाराच्या स्कूटरच्या क्वालिटीची स्कूटर २५ हजारात बनवून अगदी ३५ हजाराला जरी विकली आणि फक्त १,००,००० स्कूटर विकल्यात तर तुमचा नफा वट्ट १०० कोटी तुम्ही अशी स्कूटर बनवा आणि खराब झाली तर मेकॅनिकऐवजी पंक्चर काढणार्याकडे न्या =)) नैतरी तुमचे दैवत डॉक्टर ऐवजी कंपौंडरवर जास्त विश्वास ठेवणारे आहे =))
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख गुरुवार, 04/22/2021 - 13:35 नवीन
तुमचा नफा वट्ट १०० कोटी
हे बरोबर नाही हं. सारखं सारखं त्या १०० कोटींचा उल्लेख करायचा म्हणजे काय? अहो लोकशाही टिकवण्याची किंमत आहे ती! स्कूटरच्या वीस हजारांचा आणि त्या १०० कोटींचा काही संबंध आहे का? हे थांबवा, नाहीतर मी मिपा सोडून जाईन बघा!
  • Log in or register to post comments
ब
बापूसाहेब गुरुवार, 04/22/2021 - 13:38 नवीन
अरे बाप रे.. १०० कोटी नफा स्कूटर विकूनही मिळवता येतो?? मला वाटल त्यासाठी फक्तं पोलिस दल हाताशी ठेवावं लागते..
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Wed, 04/21/2021 - 15:26 नवीन
स्कूटरमध्ये वापरल्या जाणाऱ्या धातू , प्लॅस्टिक आणि काच ह्याचे वजन करून त्यांच्या किलोचा भाव काढून स्कुटरची किंमत अजून कमी करता येईल की.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/21/2021 - 15:29 नवीन
अशा गाड्या मिळत पण असतीलच
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Wed, 04/21/2021 - 16:17 नवीन
हे होणारच होते. Image removed.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Wed, 04/21/2021 - 16:33 नवीन
यात ' आपदा देश की' हे कळलं. पण अवसर मोदी मित्रोंका हे नाही कळलं. एकतर पूनावाला हे प्रो- बिजेपी नक्की नाहीत. मोदी अथवा भाजपा आणि पुनावाला/सिरम यांचा पूर्वी कधीही संबंध आल्याचे ऐकिवात नाही. (नशीब, पूनावाला अहिंदू आहेत. नाहीतर तेवढ्याने शिक्कामोर्तब झालं असतं मैत्रीवर.) अन्याय केंद्र सरकार का हे पण नाही कळलं. म्हणजे बऱ्याच गोष्टीत सध्या केंद्र सरकार कडून महाराष्ट्राबद्दल दूजाभाव होत आहे, हे माझं वैयक्तिक मत आहे. पण पूनावाला यांचं मीडिया स्टेटमेंट अन अन्याय यातला संबंध लक्षात नाही आला. काँग्रेस अख्खा पक्ष यांना डोक्यावर घेऊन का बसतो हे अनाकलनीय आहे.
  • Log in or register to post comments
ब
बापूसाहेब गुरुवार, 04/22/2021 - 13:34 नवीन
याचं आणि देशातल्या उद्योगपतींचे वाकडं आहे. प्रत्येक उद्योगपती वर काहीही टीका आणि आरोप करुन मोदींशी संबंध जोडायचा.. आता पूनावला यांच्या मागे लागलेत.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा गुरुवार, 04/22/2021 - 02:57 नवीन
अवांतर पुनावाला किंवा इतर सगळेच, यांच्यावर कमी प्रॉफिट मध्येबलास विकावी लागली म्हणून अन्याय का होतोय कळले नाही. १. त्यांना research कॉस्ट नाहीये. त्यांनी काही पेटंट माफक दरात विकत/ भाड्याने घेतली आहेत. २. Phase 2/3 टेस्टिंग वरती त्यांना फारसा खर्च करावा लागला नाही. 3. मार्केटिंग कॉस्ट शून्य 4. किमान 40कोटी ची ऑर्डर नक्की अश्या परिस्थितीत एक लाशिमागे 10रु जरी फायदा धरला तरी 400कोटी नेट प्रॉफिट होते. तेव्हढेही त्यांना मिळत नाहीये असे म्हणायचे आहे का? नेमके माझे काय चुकतेय या हिशोबात?
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 04/22/2021 - 04:17 नवीन
आनन्दा योग्यच मुद्दे मांडले आहेत आपण त्याना फक्त १) "कॅश फ्लो" आणि २) क्षमता ववाढवण्यासाठी लागणारे भांडवल याबद्दल प्रश्न असतील.... आणि ३) मनात फारतर याचे दुख्ख असेल कि १५० मध्ये फार कमी नफा आहे ... पण इतर कुणाला मिळण्यापेक्षा आपल्याला कंत्राट मिळाले यात आनंदच असावा ! अर्थात हि भीती असेलच कि समजा उद्या ती लस निरुपयुगी म्हणून देशाने किंवा इतर ग्रहक्कानी वापरयाची बंद केली तर सरकार किंवा इतर ग्राहक पुढील कंत्राट टप्पे पूर्ण करणार नाहीत आणि पैसे अडवतील ? पण त्यासाठी कोट्याधीष पुनावाला यांनी यौग्य तो वकिली सल्ला घेतलाच असले एकूण काय यात नक्की काय प्रश्न आहे मूळ धागाकर्ती ला आणि इतरांना हे नीट समजत नाहीये
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी Fri, 04/23/2021 - 06:46 नवीन
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Mon, 04/26/2021 - 09:25 नवीन
"प्रत्येकाला मोफत लस मिळणार" हे सांगण्यासाठी राज्यांची चढाओढ लागली आहे. सगळ्यांना देता येईल इतकी लस भारतात कधी उपलब्ध होईल हे निश्चित सांगता येत नसतानाच प्रत्येक राजकीय पक्षांनी "खयाली पुलाव" पकवायला सुरुवात केली आहे. प्रत्येक जण लस खरेदी करु शकेल असे नाही मात्र ज्यांना शक्य आहे त्यांनी ती विकत घ्यावी हा पर्याय प्रत्येक राज्याने नागरीकांसमोर ठेवला पाहिजे. त्यासाठी वेगळा न्यास किंवा सीएम केअर फंडात पैसे जमा करणे असा काही पर्याय निवडता येणे शक्य आहे काय याचा विचार करावा.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 04/26/2021 - 10:08 नवीन
हे सरकार नंतर परत, बियर बार टॅक्स वाढवण्याची शक्यता आहेच....
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 15 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 15 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 15 hours ago
  • सुंदर !!
    1 day 15 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 15 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा