शेअरमार्केट ची बाराखडी... भाग ० : सुरुवात
शेअर मार्केट आणि माझा वर्षापुर्वी तसा काही संबंध नव्हता.. आज Share market मध्ये आलेल्यास १ वर्ष पुर्ण होत आहे.
गेल्या एक वर्षभर जो अभ्यास केला त्यावरुन हि लेखमाला सुरु करत आहे. मी तसा काही कॉमर्स किंवा अर्थशास्त्राचा अभ्यास केलेला नाहिये, पण mathematics & statistics हे माझे आवडते विषय होते. त्याचा शेअर मार्केट मध्ये खुप फायदा झाला. विशेषता Technical भ्यासा मध्ये .आणि या १ वर्षात १.५ लाखाचे ४ लाख करण्यात मी यशस्वी झालो. ते ही Intraday आणि future - Options न करता.
--
शेअर मार्केट हा तसा risky प्रकार समजला जातो.. पण तुम्ही जर अभ्यास करुन यात उतरत असाल तर नक्कीच risk खुप कमी असते ..
यात ढोबळ मनाने Long term आणि Short term ( positional) असे दोन भाग आहेत. Intraday आणि future - Options ( speculative ) हे विभाग अनुभवा नंतरच करावेत हे माझे म्हणणे आहे.
शेअर मार्केट म्हणजे निर्णय क्षमता, patience , timing आणी consistency ह्यांचे अचुक मिश्रण होय. शेअर मार्केट कडे व्यवसाय म्हणुन बघितला गेला की slow and steady wins the race ही म्हण लागु पडते. कुठल्याही प्रलोभनांकडे दुर्लक्ष करुन किंवा अभ्यास पुर्ण लक्ष दिले तर शेअर मार्केट मध्ये यशस्वी होता येते.
शेअर मार्केट मध्ये बौधीक कष्ट असतात.. कुठे ही फक्त बातम्या आणि प्रलोभनांमुळे तुम्ही तात्पुरते पैसे कमवु शकता परंतु कायम आणि सातत्य दाखवुन तुम्ही जर शेअर मार्केट मध्ये आला तर नक्कीच तुम्ही यसस्वी होउ शकता.
ज्यांना अभ्यास करायचा नसतो तेच लोक शेअर मार्केट मध्ये अयशस्वी होतात.
शेअर मार्केट मध्ये आपण आपले Target set करायचे.. Long term Target आणि Short term Target set केल्यावर त्या साठी लागणारा अभ्यास आपण करत जायचा..
महिन्याला आपण जे पैसे टाकु ते कश्या पद्धतीने गुंतवायचे , Short termसाठी काय काय गणिती साणि सांखिकी अभ्यास आपण करायचा ते आपण हळु हळु पुढे पाहु.
आपला portfolio आपण बनवायचा. त्या साठी आपण किती वर्षासाठी किती रक्कम जमा करतोय हे सेट करुन त्या प्रमाणे महिन्याला त्या त्या कंपणीमध्ये पैसे टाकायचा निर्णय घ्यायचा, त्याच बरोबर दर महिन्याला आपण Long term (fundamental नुसार) आणि Short term (Technical नुसार) साठी investment करत असु तर आपल्या महिन्याच्या रक्कमेतुन त्याचे distribution करायचे.
आता माझे २ उदा. देतो
समजा मी असे ठरवले आहे, की माझे जे १५ वर्ष राहिलेले होम लोन मला ५-८ वर्षात पुर्ण करायचे आहे, किंवा मला लॉंग टर्म साठी काही पैसे पाहिजेत तर मी ते पैसे Fundamentally strong असलेल्या shares मध्ये टाकत जायचे. १२-१५ Fundamentally strong shares अभ्यासांती आपण वेगवेगळ्या sector मधुन घ्यायचे आणी आपल्या Long term Investment च्या फक्त 7-8 % एका कंपणीत टाकायचे. यालाच तुम्ही स्वताचा Personal mutual fund पण म्हणु शकता.
या बरोबर , तुम्ही Short term Investment goal ठरवुन, उदा. मी माझ्या मुलीची पुढच्या वर्षीची फी जमा करण्यासाठी, माझा Term Insurance भरण्यासाठी Investment करत असेल तर Technical, graphs, indicators यांचा अभ्यास करुन त्यातुन कमी वेळेत पैसे निर्माण करायचे. या साठी वेगवेगळे portfolios बनवले तरी चालतील.
१. या फोटो मध्ये, मी अर्धे अर्धे पैसे दोन्ही Long term आणि Short term विभागात टाकत आहे. १० लाख मी ८ वर्षात टाकेल असे धरले आहे.

२. यामध्ये मी मुलीच्या फी जमण्यासाठी चा portfolio , काही ३०-४० हजार पहिल्यांदा(जमल्यास टाका) आणि नंतर महिन्याचे ३-५ हजार टाकुन दर महिन्याला ५ हजार काढतो आहे दो दाखवला आहे. आणि लागेल तसे Withdrawal पण केले आहेत पैसे . profit/month हा graph दाखवत आहे. यात दिसते आहे की थोड्या थोड्या profit ने माझ्या एका वर्षाच्या फी चे पैसे निघाले आहेत. म्हणजे येथे माझी Investment ६०-७० हजार झालीये आणि मला तितकेच रुपये मिळाले ( ८ मार्च ला फी भरली मी :-)
---- पुधील भागात आपण Share market fundamentals यावर भर देवु आणि नंतर Technical कडे जावु. क्रमशः अवांतर : तुमचे ही संपुर्ण ज्ञान यात देत राहिल्यास जास्त मज्जा येइल, आणि माझे ही त्यामुळे ज्ञान वाढेल. शेअर मार्केट हा खुप मोठा पसारा आहे आणि यात जितके शिकेल तितके कमीच आहे. technical short term shares च्या discussions साठी एक वेगळा धागा असावा असे वाटते आहे, जेथे रोजचे शेअर्स बोलले जातील, पण तो थोडा risky प्रकार वाटतोय. (मी जी माहिती लिहितोय ती नंतर English मध्ये लिहिणार आहे, English चांगले नसल्याने तेथे ही अवघड वाटते आहे :-), पण link देइल नंतर) - गणेशा (IT मध्ये असला तरी लेखक Account - finance कंपणीचा मालक आहे :-) :-) :-) )
२. यामध्ये मी मुलीच्या फी जमण्यासाठी चा portfolio , काही ३०-४० हजार पहिल्यांदा(जमल्यास टाका) आणि नंतर महिन्याचे ३-५ हजार टाकुन दर महिन्याला ५ हजार काढतो आहे दो दाखवला आहे. आणि लागेल तसे Withdrawal पण केले आहेत पैसे . profit/month हा graph दाखवत आहे. यात दिसते आहे की थोड्या थोड्या profit ने माझ्या एका वर्षाच्या फी चे पैसे निघाले आहेत. म्हणजे येथे माझी Investment ६०-७० हजार झालीये आणि मला तितकेच रुपये मिळाले ( ८ मार्च ला फी भरली मी :-)
---- पुधील भागात आपण Share market fundamentals यावर भर देवु आणि नंतर Technical कडे जावु. क्रमशः अवांतर : तुमचे ही संपुर्ण ज्ञान यात देत राहिल्यास जास्त मज्जा येइल, आणि माझे ही त्यामुळे ज्ञान वाढेल. शेअर मार्केट हा खुप मोठा पसारा आहे आणि यात जितके शिकेल तितके कमीच आहे. technical short term shares च्या discussions साठी एक वेगळा धागा असावा असे वाटते आहे, जेथे रोजचे शेअर्स बोलले जातील, पण तो थोडा risky प्रकार वाटतोय. (मी जी माहिती लिहितोय ती नंतर English मध्ये लिहिणार आहे, English चांगले नसल्याने तेथे ही अवघड वाटते आहे :-), पण link देइल नंतर) - गणेशा (IT मध्ये असला तरी लेखक Account - finance कंपणीचा मालक आहे :-) :-) :-) )
प्रश्न : समजा शेअर विकायचा नाही फक्त Dividend वर च समाधान मानायचे तर . हा निर्णय योग्य असेल का.. आपण शेअर विकत घेणारी कंपनी निरंतर नफा कमवत असेल तर Dividend हक्का नी मिळतो की. Promoter share holder ल किती Dividend द्यायचा हे ठरवतात?-- > Dividend बद्दल प्रत्येकाची मते वेगळी असतात.. परंतु Fast growing company शक्यतो Dividend देत नसेल तर जास्त उत्तम असते. कारण Dividend हा profit चा हिस्सा असतो .. कंपणीच्या cash flow requirements साठी किंवा तो cash flow वाढण्यासाठी जर हे पैसे कंपणी वापरत असेल तर त्या कंपणीच्या Expansion activities साठी हा पैसा जास्त उपयोगी येऊन share holder ला भविष्यात जास्त फायदा मिळु शकतो.. थोडक्यात Dividend ऐवजी Rate of return on Equity हा जास्त लाभदायक असतो. आणि तो महत्वाचा. हा जर कंपणी Stable असेल आणि growth easily achieve होत असेल आणि surplus cash कंपणीकडे रहात असेल तर तीचा काही portion कंपणी Dividend म्हणुन देतात ( उदा. TCS) पण एकुणात, Fast growing economy मध्ये Dividend कंपणीच्या Cash flow , reinvestment आणि profit मध्ये dilution चे काम करतो. त्यामुळे Dividend वर समाधान मानण्यापेक्शा Rate of return on Equity जास्त महत्वाची. दुसरी गोष्ट .. ५००० च्या पुढील Dividend वरती वर्षाला आता(२०२० पासुन) सरकार १० % tax आकारत आहे, त्यामुळे त्या पेक्षा कधी ही Fast growing कंपणी आणि जी Cash flow व्यवस्थीत वापरते भले ती Dividend देत नसेल किंवा अत्यल्प Dividend देत असेल तरी त्या कंपणीत investment करणे कधी ही फायद्याचे . (tax साठी नंतर वेगळा धागा काढणार आहे मी)दुसरी गोष्ट .. ५००० च्या पुढील Dividend वरती वर्षाला आता(२०२० पासुन) सरकार १० % tax आकारत आहे,आता संपूर्ण लाभांश करपात्र आहे. लामांश एकूण करपात्र उत्पन्नात मिळवून त्या एकूण रकमेवर tax slab नुसार कर आकारणी होईल. ५००० पेक्षा जास्त लाभांश असेल तर उद्गम करकपात होईल.मग शेअर बाजारात ज्या कंपन्यांचे शेअर चे खूप जास्त आहेत ते कोण खरेदी करते.याच्या उत्तरासाठी मी एक Case study सांगतो :- समजा मी एक साधा व्यवसाय टाकला, आपण असे समजु की मी पेन्सिल बनवण्याचा व्यवसाय टाकला. नंतर मला नफा व्हायला लागला, तर मला असे वाटते की मला माझा Business वाढवण्यास भांडवल लागेल जेणे करुन मी दुकान्/कंपणी टाकुन जास्त प्रमाणात विक्री करुन जास्त नफा कमवेल. मग मी Entity निर्माण करतो , तुम्ही याला कंपणी पण म्हणु शकता. माझ्याकडे दोन रस्ते आहेत, पहिला लोन घ्यायचे, पण यात रिस्क आहे, जर माझा व्यवसाय निट चालला नाही तर मला त्या कर्जाचे हप्ते तर नियमित फेडावे लागेलच. आणी यात मुद्दल बरोबर व्याज पण जाईलच. दुसरा मार्ग समजा मी माझ्या काही मित्रांना सांगितले की माझ्या व्यवसायात येव्हडा profit होतो आहे तर तुम्ही पैसे गुंतवत असाल तर मी तुम्हाला भागिदार (partner ) करुन घेतो. त्या बद्दल तेव्हड्या हिस्स्याचा नफा तुमचा. यात मला व्याज ही जात नाही आणि मुद्दल हि परत द्यावी लागत नाही. यात जे मित्र म्हणजे भागिधारक जे आहेत, ते म्हणजे share holder/भागिदारक. आता समजा मी १० रुपये face value ने shares allot केले ( through IPO) आणि माझ्या कंपणीचा व्यवसाय, त्याच्या पुढील ऑर्डर्स, माझे balance sheet असे पाहुन जास्त लोकाना हे allot झालेले shares पाहिजे असतील तर ते जास्त भावाने ते विकत घेतात. म्हणजे १० रुपये भाव असेल तर ११ रुपयांनी घेतील, मग काही अजुन जास्त .. अशी त्या shares ची किंमत वाढत जाते, shares ची quantity हि ठराविक असते, त्यामुळे Seller असले तरच buyer buy करु शकतात. त्यामुळे जास्त buyer असल्यास share price वाढत जाते. जास्त Seller असल्यास share price कमी होत जाते. त्यामुळे जास्त भाव म्हणजे खरीददार नाही असे होणार नाही. उलट बर्याचदा चांगली कंपणी तीचा चांगला Cash flow तीच्या ऑर्डर्स या पाहुन तीचा भाव वाढत जातो. (मला वाटते नंतर share market basics असा एक धागा काढुन असे प्रश्नांची उत्तरे एकत्र टाकता येतिल ) - गणेशा