शेअरमार्केट ची बाराखडी... भाग ० : सुरुवात
शेअर मार्केट आणि माझा वर्षापुर्वी तसा काही संबंध नव्हता.. आज Share market मध्ये आलेल्यास १ वर्ष पुर्ण होत आहे.
गेल्या एक वर्षभर जो अभ्यास केला त्यावरुन हि लेखमाला सुरु करत आहे. मी तसा काही कॉमर्स किंवा अर्थशास्त्राचा अभ्यास केलेला नाहिये, पण mathematics & statistics हे माझे आवडते विषय होते. त्याचा शेअर मार्केट मध्ये खुप फायदा झाला. विशेषता Technical भ्यासा मध्ये .आणि या १ वर्षात १.५ लाखाचे ४ लाख करण्यात मी यशस्वी झालो. ते ही Intraday आणि future - Options न करता.
--
शेअर मार्केट हा तसा risky प्रकार समजला जातो.. पण तुम्ही जर अभ्यास करुन यात उतरत असाल तर नक्कीच risk खुप कमी असते ..
यात ढोबळ मनाने Long term आणि Short term ( positional) असे दोन भाग आहेत. Intraday आणि future - Options ( speculative ) हे विभाग अनुभवा नंतरच करावेत हे माझे म्हणणे आहे.
शेअर मार्केट म्हणजे निर्णय क्षमता, patience , timing आणी consistency ह्यांचे अचुक मिश्रण होय. शेअर मार्केट कडे व्यवसाय म्हणुन बघितला गेला की slow and steady wins the race ही म्हण लागु पडते. कुठल्याही प्रलोभनांकडे दुर्लक्ष करुन किंवा अभ्यास पुर्ण लक्ष दिले तर शेअर मार्केट मध्ये यशस्वी होता येते.
शेअर मार्केट मध्ये बौधीक कष्ट असतात.. कुठे ही फक्त बातम्या आणि प्रलोभनांमुळे तुम्ही तात्पुरते पैसे कमवु शकता परंतु कायम आणि सातत्य दाखवुन तुम्ही जर शेअर मार्केट मध्ये आला तर नक्कीच तुम्ही यसस्वी होउ शकता.
ज्यांना अभ्यास करायचा नसतो तेच लोक शेअर मार्केट मध्ये अयशस्वी होतात.
शेअर मार्केट मध्ये आपण आपले Target set करायचे.. Long term Target आणि Short term Target set केल्यावर त्या साठी लागणारा अभ्यास आपण करत जायचा..
महिन्याला आपण जे पैसे टाकु ते कश्या पद्धतीने गुंतवायचे , Short termसाठी काय काय गणिती साणि सांखिकी अभ्यास आपण करायचा ते आपण हळु हळु पुढे पाहु.
आपला portfolio आपण बनवायचा. त्या साठी आपण किती वर्षासाठी किती रक्कम जमा करतोय हे सेट करुन त्या प्रमाणे महिन्याला त्या त्या कंपणीमध्ये पैसे टाकायचा निर्णय घ्यायचा, त्याच बरोबर दर महिन्याला आपण Long term (fundamental नुसार) आणि Short term (Technical नुसार) साठी investment करत असु तर आपल्या महिन्याच्या रक्कमेतुन त्याचे distribution करायचे.
आता माझे २ उदा. देतो
समजा मी असे ठरवले आहे, की माझे जे १५ वर्ष राहिलेले होम लोन मला ५-८ वर्षात पुर्ण करायचे आहे, किंवा मला लॉंग टर्म साठी काही पैसे पाहिजेत तर मी ते पैसे Fundamentally strong असलेल्या shares मध्ये टाकत जायचे. १२-१५ Fundamentally strong shares अभ्यासांती आपण वेगवेगळ्या sector मधुन घ्यायचे आणी आपल्या Long term Investment च्या फक्त 7-8 % एका कंपणीत टाकायचे. यालाच तुम्ही स्वताचा Personal mutual fund पण म्हणु शकता.
या बरोबर , तुम्ही Short term Investment goal ठरवुन, उदा. मी माझ्या मुलीची पुढच्या वर्षीची फी जमा करण्यासाठी, माझा Term Insurance भरण्यासाठी Investment करत असेल तर Technical, graphs, indicators यांचा अभ्यास करुन त्यातुन कमी वेळेत पैसे निर्माण करायचे. या साठी वेगवेगळे portfolios बनवले तरी चालतील.
१. या फोटो मध्ये, मी अर्धे अर्धे पैसे दोन्ही Long term आणि Short term विभागात टाकत आहे. १० लाख मी ८ वर्षात टाकेल असे धरले आहे.

२. यामध्ये मी मुलीच्या फी जमण्यासाठी चा portfolio , काही ३०-४० हजार पहिल्यांदा(जमल्यास टाका) आणि नंतर महिन्याचे ३-५ हजार टाकुन दर महिन्याला ५ हजार काढतो आहे दो दाखवला आहे. आणि लागेल तसे Withdrawal पण केले आहेत पैसे . profit/month हा graph दाखवत आहे. यात दिसते आहे की थोड्या थोड्या profit ने माझ्या एका वर्षाच्या फी चे पैसे निघाले आहेत. म्हणजे येथे माझी Investment ६०-७० हजार झालीये आणि मला तितकेच रुपये मिळाले ( ८ मार्च ला फी भरली मी :-)
---- पुधील भागात आपण Share market fundamentals यावर भर देवु आणि नंतर Technical कडे जावु. क्रमशः अवांतर : तुमचे ही संपुर्ण ज्ञान यात देत राहिल्यास जास्त मज्जा येइल, आणि माझे ही त्यामुळे ज्ञान वाढेल. शेअर मार्केट हा खुप मोठा पसारा आहे आणि यात जितके शिकेल तितके कमीच आहे. technical short term shares च्या discussions साठी एक वेगळा धागा असावा असे वाटते आहे, जेथे रोजचे शेअर्स बोलले जातील, पण तो थोडा risky प्रकार वाटतोय. (मी जी माहिती लिहितोय ती नंतर English मध्ये लिहिणार आहे, English चांगले नसल्याने तेथे ही अवघड वाटते आहे :-), पण link देइल नंतर) - गणेशा (IT मध्ये असला तरी लेखक Account - finance कंपणीचा मालक आहे :-) :-) :-) )
२. यामध्ये मी मुलीच्या फी जमण्यासाठी चा portfolio , काही ३०-४० हजार पहिल्यांदा(जमल्यास टाका) आणि नंतर महिन्याचे ३-५ हजार टाकुन दर महिन्याला ५ हजार काढतो आहे दो दाखवला आहे. आणि लागेल तसे Withdrawal पण केले आहेत पैसे . profit/month हा graph दाखवत आहे. यात दिसते आहे की थोड्या थोड्या profit ने माझ्या एका वर्षाच्या फी चे पैसे निघाले आहेत. म्हणजे येथे माझी Investment ६०-७० हजार झालीये आणि मला तितकेच रुपये मिळाले ( ८ मार्च ला फी भरली मी :-)
---- पुधील भागात आपण Share market fundamentals यावर भर देवु आणि नंतर Technical कडे जावु. क्रमशः अवांतर : तुमचे ही संपुर्ण ज्ञान यात देत राहिल्यास जास्त मज्जा येइल, आणि माझे ही त्यामुळे ज्ञान वाढेल. शेअर मार्केट हा खुप मोठा पसारा आहे आणि यात जितके शिकेल तितके कमीच आहे. technical short term shares च्या discussions साठी एक वेगळा धागा असावा असे वाटते आहे, जेथे रोजचे शेअर्स बोलले जातील, पण तो थोडा risky प्रकार वाटतोय. (मी जी माहिती लिहितोय ती नंतर English मध्ये लिहिणार आहे, English चांगले नसल्याने तेथे ही अवघड वाटते आहे :-), पण link देइल नंतर) - गणेशा (IT मध्ये असला तरी लेखक Account - finance कंपणीचा मालक आहे :-) :-) :-) )
आपण मार्जिन लोन घेऊन करता कि फक्त स्वतःचे भांडवलवर ? - आपल्या अनुभवात कधी पूर्ण मंदी अनुभवली आहे काय? म्हणजे संपूर्ण बाजारच खाली गेलाय किंवा सामुर्ण बाजार नसला तरी एखादी कंपनी चा समभाग फारच खाली जाऊ लागलं तर % स्टॉप लॉस वापरता का? % त्यामुळे दीर्घ काळ मंदी असेल तर काय कराल?@ चौकस जी, प्रश्न जरी मार्जीन आणि मंदी बद्दल असले तरी थोडे विस्तृत लिहितो - मंदी खरे तर तुम्ही Short term आणि long term असे वेगवेगळे Portfolio बनवत असाल तर तुमच्या Strategies एकाच वेळेस या दोन्ही प्रकारतील shares साठी वेगळ्या असतील उदा. अ. जेंव्हा तुम्ही ५ - ८ वर्षाचा विचार करुन कुठले shares घेतले असतील तर त्याचा fundamental base हा उत्कृष्टच असला पाहिजे .. ते अभ्यासा व्यतिरिक्त फक्त बोली माहितीवर ऐकुन घेतलेले shares नसावेच नसावे. तर अश्या वेळेस मंदी आपल्याला खरेदीची उत्कृष्ट संधी देते.. तुमच्या कडे असलेले shares हे तुम्ही त्याच्या deep ला खरेदी केले पाहिजेत. त्यामुळे "मंदी म्हणजेच संधी" तरीही माणुस चुकू शकतो असे मान्य केले तर fundamental Portfolio बनवताना तुम्ही तुमच्यकडे असलेल्या एकुन भांडवलाच्या फक्त ७-८ % रक्कमच एका share मध्ये गुंतवली पाहिजे. जेणे करुन चुकुन तुमचा अभ्यास चुकीचा ठरला(शक्यता कमी असते ) किंवा कंपणी बंद झाली तरी तुमच्या एकुन भांडवलाचे फक्त ७-८ % च धोक्यात आलेले असतात. याचे माझ्या पोर्टफोलिओ मध्ये असलेल्या चुकीच्या share चे उदा देतो. तो का आहे ते. माझ्याकडे १० shares तीन महिने अभ्यास करुन घेतले होते, आणि करोना चे रुप पाहता मला वाटले पुढील काळात Credit cards/online business यांचीच चलती राहिल ते दिसतेय. म्हणुन मी SBI cards हा share समविष्ट केला. पण मला Telecom domain वाढेल असे पण वाटले. मग असलेल्या तीन कंपणीतुन मी reliance/Idea/ Airtel या मध्ये लक्ष घातले. मी जरी अभ्यासांती निर्णय घेत असलो तरी सारासार विचार करता भारतात फक्त तीन कंपणी आहेत त्यामुळे Idea बंद पडणार नाही अशी माझी खात्री झाली. सोबत माझा राजकीय अभ्यास असल्याने मी प्रथमच कर्जबाजारी असलेली Idea माझ्या long term portfolio मध्ये अॅड केली. हा तसा चुकीचा निर्णय ठरु शकत होता. असे खरे तर केले नव्हते पाहिजे. मग मी reliance १००० रुपयाला माझ्या portfolio ला अॅड केले, कारण जर Idea बंद पडली तर याचा फायदा reliance ला होईल. आणी Airtel Short term ला technical पध्दतीने घेत आणि विकत राहिलो. आता आपण समजु, मंदी आली किंवा इतर कारणाने idea बंद पडली, तर मी तीचे ३ रुपयाने ४००० shares घेतले आहेत, माझ्या long term portfolio च्या १० %. म्हणजे ते पैसे पुर्ण बुडले नाही तरी बुडतील असे धरले. त्यावेळेस reliance २२०० रुपये झालेला आहे, त्यामुळे त्यात गुंतवलेले १० हजार मला १२००० परत देतायेत. आणि प्रत्येक deep ला चांगले share घेताना मी १३०० ला १८०० ला हे अजुन घेतलेले आहेतच. पण आता Idea ने तग धरलाय आणि प्रत्येक १० रुपये वाढीला मला ४०००० रुपये मिळत आहेत. आणि reliance चे आता माझ्याकडे १५ share झालेत. त्यामुळे कधी कधी मंदीत असा एखादा चुकीचा शरे त्रास देवु शकतो , तर त्याची सोय व्यव्स्थीत केलेली असावी, आणि त्यात गुंतवलेले भांडवल हे योग्य प्रमाणात हवेच. उगाच तो share उद्या १३ ला जाईल म्हणुन लाखो रुपये एकाच share मध्ये टाकु नये. म्हणजे जास्त तोटा होणार नाही. पण ८ वर्षात चुकुन Idea १०० रुपये गेला तर तो मला ४ लाख देइल हे नक्की. पण ही Pure risk आहे, पण एखादा असा share आपल्या portfolio मध्ये असला तरी चालतो अपवाद म्हणुन. पण हा share fundamental criteria fulfil करत नसल्याने मी recommend करत नाहीये. फक्त असा long term portfolio मधील share बद्दल काय होउ शकते ते लिहिले आहे. बाकी चांगले share अॅडच करावेत. ब. Short term portfolio मध्ये मात्र या उलट राहते. तुम्ही ग्राफ प्रमाणे अभ्यास करता ( नंतरच्या भागात विस्तृत सांगेलच), आणि प्रत्येक analysis हे पुर्ण बरोबर कधीच नसते , त्यामुळे तुम्ही strict stop loss लावलेला हवाच. ( तरीही ऑक्टोबर पासुन माझे १०० % technical बरोबर आले आहे, पण त्या आधी २० % जे चुकले होते ते shares मी लॉस मध्ये काढलेले होते. मी या साठी GTT चा वापर जास्त करतो.दीर्घकाळ गुंतवणुकीत रिटर्न्स कमी मिळतात असे माझे मत आहे. उदा. अ आणि ब मधे माझ्या पाच वर्षाच्या गुंतवणुकीत रिटर्न्स करन्ट व्हाल्यु १९ % दिसत आहे, हे इतक्या दीर्घगुंतवणुकीत ठीक आहे का ?या साठीच मी या week end ला पुढचा भाग लिहायला घेतोय, त्यात तुम्हाला या संबंधी बरीच माहिती मिळेल... Long term goal आणि short term goal should be different for different reason.. आणि long term share साठीचे काय paramter आहेत तेच आपण पाहणार आहोत पुढच्या भागात... माझे mutual fund sip चे ३ वर्षाचे - २२% + वाढलेत, त्यामुळे दूसरा भाग लिहिल्यावर तुम्ही काय काय पाहिले आणि काय काय गोष्ट बरोबर आणि चूक केली हे पुन्हा तपासून पहा.. मी नक्कीच तुमच्या प्रतिसादा मुळे लवकरच लिहायला घेतो आहे...