Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

श्रीमंतीचे नियम??

उ
उपयोजक
Sat, 03/20/2021 - 04:26
🗣 180 प्रतिसाद
भरपूर पैसे मिळवावेत असे कोणाला वाटणार नाही? बहुतांश लोकांना तसे वाटते तरी किंवा भोवतालची परिस्थिती तरी त्यासाठी प्रयत्न करायला भाग पाडते. भारत हा अफाट लोकसंख्या असलेला देश आहे. साहजिकच इथे संघर्ष खूप आहे, भ्रष्टाचारसुद्धा बराच आहे. शिवाय भारतात श्रममूल्य हे पाश्चात्य देशांच्या तुलनेत कमी आहे. अशा परिस्थितीतून प्रयत्न करुन आर्थिक समृद्धी आणण्याचे महत्कार्य पार पाडावे लागते. थिंक अँड ग्रो रिच हे श्रीमंत कसे व्हावे या विषयावर बरेच गाजलेले पुस्तक विशेषत: अमेरिकन जनता डोळ्यासमोर ठेवून लेखक नेपोलियन हिल यांनी हे पुस्तक लिहिले होते. यालाही साधारण ८४ वर्षे होऊन गेली. चर्चेचा विषय हाच आहे की भारतासारख्या देशात श्रीमंत होण्यासाठीचे काही ठाशीव नियम असू शकतात का? अर्थात प्रत्येक नियमाला काही अपवाद असतात. ते व्यक्तिपरत्वे थोडे बदलूही शकतात. ते कायम तसेच राहतात असेही नाही. पण अपवादानेच नियम सिद्ध होतात हे ही खरे आहे. ते अपवाद गृहित धरुन श्रीमंत होण्यासाठीचे काही ठराविक नियम असू शकतात का? हेच पहायचे आहे. आता श्रीमंत कोणाला म्हणावे? तर एका त्रिकोणी कुटूंबाला ज्यातल्या कुटूंबप्रमुखाचे पुण्यासारख्या शहरात, वयाच्या तिशीच्या आत किमान ६० हजार रुपये वैयक्तिक मासिक उत्पन्न असेल तर तो सुद्धा श्रीमंत म्हणायला हरकत नसावी. यात त्याच्याकडे बाईक आहे पण चारचाकी नाही, कसलेही खर्चिक व्यसन नाही असे गृहित धरले आहे. ही झाली किमान मर्यादा. आता याउपर ही मर्यादा कितीही असू शकते. जसे उत्पन्न वाढेल तसतसे चारचाकी किंवा खर्चिक व्यसन किंवा अजून खर्चायला लावणार्‍या बाबी उत्पन्नाच्या प्रमाणात अॅड करायला हरकत नाही. धाग्याचा उद्देश प्रामुख्याने उपरोल्लिखित किमान कमाईपेक्षा कमी उत्पन्न असणार्‍यांना श्रीमंत होण्यासाठी मार्गदर्शनपर चर्चा हाच असावा. आधीच भरपूर कमवणार्‍यांना अजून कसे कमवता येईल यासाठी हा धागा नाही. _/\_ विषयानुषंगाने काही प्रश्न की जेणेकरुन चर्चेला दिशा मिळेल. १) नशीब हा फॅक्टर श्रीमंतीसाठी किती महत्वाचा आहे? २) मराठी लोक व्यापारात फारशी जोखीम घेत नसल्याने त्यांना पंगुसिंमा (पंजाबी, गुजराती, सिंधी, मारवाडी) इतके यश व्यापारात मिळत नाही असे म्हटले जाते. पण पंगुसिंमांच्या व्यापाराच्या अशा काही पद्धती किंवा ट्रिक्स असू शकतात का की ज्यामुळेच ते व्यापारात यशस्वी होतात? उदा. एका मारवाडी व्यक्तीने दुसर्‍या मारवाड्याला धंद्यासाठी कर्ज दिले. ते व्याजासहीत वसूल होण्याचा कालावधी हा मराठी माणसाने दुसर्‍या मराठी माणसाला धंद्यासाठी दिलेल्या कर्जवसूलीच्या कालावधीपेक्षा जास्त असू शकतो का? पंगुसिंमा हा तग कसा धरु शकतात? अशाच अजून काही युक्त्या असू शकतात का पंगुसिंमांच्या? ३) शहर जितके मोठे तितकी आर्थिक समृद्धी जास्त असे काही असते का? ४) काही क्षेत्रे अशी आहेत ज्यातील कौशल्यातून चांगले पैसे मिळतात. ते कौशल्य शिकण्यासाठी गुंतवलेल्या पैशाच्या तुलनेत परतावा जास्त आहे. काही मिपाकरांशी चर्चा करुनच ही यादी बनवली आहे. यात अजून काही सुधारणा किंवा वाढ करता येईल का? १. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात लागणारं कोणतंही कौशल्य २. कॉम्प्युटर हार्डवेअर इन्स्टॉलेशन,फिक्सिंग ३. सेल्स अँड मार्केटिंग ४. कायिक आरोग्यसेवांतर्गत येणारे कोणतेही कौशल्य ५. गणित, विज्ञान, इंग्रजी हे विषय शिकवता येणे. ६. आर्थिक गुंतवणूकीचे सल्लागार ७. रसायनशास्त्र (कॅटॅलिस्टस्) ८. विद्युत अभियांत्रिकी (कॅप्टीव्ह जनरेशन) ९. लोगो डिझाईनिंग १०. चारचाकी किंवा जड वाहन सफाईदारपणे चालवता येणे. ११. धार्मिक,अध्यात्मिक सेवा पुरवणे १२. कार, बाईक दुरुस्ती, स्वच्छता १३. न्यायिक सेवा (वकील वगैरे) १४. स्पर्धापरीक्षा उत्तम गुणांनी पास होणे. १५. वातानुकूलन यंत्र दुरुस्ती,निगा १६. चेतनकला १७. स्टँडअप कॉमेडी

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 75462 views

🗣 चर्चा (180)
च
चौकटराजा Sun, 03/21/2021 - 09:03 नवीन
बुद्धीमत्ता असली की श्रीमंत होता येते नव्हे २१ व्या शतकात तीच श्रम , भांडवल ई गोष्टीचा पराभव करीत वरचढ ठरणार आहे पण ती आली तरी श्रीमंत कशासाठी व्हायचे याचे निरनिराळ्या माणसाचे निकष फार भिन्न असतात . तसे म्हणाल तर ५ किलो सोन्याचा सदरा घालणारा माणूस हा आनंदयात्रीचा असतो तत्वतः कारण त्याला त्यातून काहीतरी आनंद नक्कीच मिळत असतो पण एवढे सोने जमविण्यासाठी त्याला अपार कष्ट , कल्पकता ,फसवाफसवी ,गुन्हेगारी ई कशाचाही वापर दीर्घकाळ करीत बसावे लागते ते केवळ मी सोन्याचा सदरा घातला या एका आनंदासाठी ! आपल्या धाग्याचे शीर्षक आर्थिक सुरक्षेततेसाठी काय काय केले पाहिजे असे असावयास हवे होते . श्रीमंती, आर्थिक सुबत्ता व आर्थिक सुरक्षितता या तशा वेगळ्या गोष्टी आहेत . उदा जे दुसर्या अनेकांना येत नाही ते तूम्हाला येत असेल व ही प्रक्रिया अव्याहत असेल हा खरा आर्थिक सुरक्षिततेचा मंत्र आहे . आपला एक मिपाकर च सांगत होता त्याला टिकून राहण्यासाठी गेल्या १५ वर्षात तीन वेळा त्याच्या क्षेत्रातील नवीन असे काहीतरी शिकावे लागले . यात त्याच्या बुद्धीमत्तेपेक्षा त्याच्या मानसिकतेचा विजय अधिक आहे . येत्या १० वर्षात आजचे ६० टक्के रोजगार अस्तित्वातच असणार नाहीत अस कयास आहे . १९७० च्य सुमारास टेलिफोन ऑपरेटर , स्टेनोग्राफर या अजरामर लाईन्स आहेत असते म्हटले जात असे ! आज टाईपरायटिंग इन्सटिट्यूट प्रसादाला तरी सापडेल का जगात ? जाता जाता - पियानो वाजविण्यासाठी पियानो विकत घ्यावा लागतो त्यासाठी पैसे लागतात पण संगीताचा आनंद शीळ वाजवूनही मिळविता येतो . मुळात तुम्हाला संगीताचा आनंद लुटण्याची दैवी देणगी आहे की नाही हे महत्वाचे ! ती श्रीमंती मिळविण्याचा कोणताही फार्म्युला जगात नाही !
  • Log in or register to post comments
स
साहना Mon, 03/22/2021 - 22:30 नवीन
प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा अनुभव वेगळा असतो. उपचारासाठी पैसे नसल्याने एकुलता भाऊ गमावला ह्याचे प्रचंड दुःख राजेश्वर ला झाले आणि हीच परिस्तिथी आपल्या मुलांवर ओढवू नये म्हणून हृदयावर दगड ठेवून तो दुबईला गेला आणि बायकोला परभरणीत ठेवले. इतर लोकांची मनस्थिती आपण जणू शकत नाही त्यामुळे विनय ठेवून लोकांना त्यांचे स्वतःचे हित कश्यांत आहे हे समजण्याची टाकत आहे असे मानून चालावे. धर्म अर्थ काम आणि मोक्ष ह्या चारी गोष्टीचा बॅलन्स अत्यंत आवश्यक आहे. ह्या समाजांत संपन्नता नाही तो समाज काहीही उच्च दर्जाची मूल्ये निर्माण करू शकत नाही. वाल्मिकी पासून कालिदास पर्यंत भारतांतील सुबत्ता, चांगले व्यवस्थापन इत्यादी त्याच्या कार्यासाठी पोषक होते. आर्यभट असो वा ब्रम्हगुप्त सर्वांचे ज्ञान हे भारत समृद्ध होता म्हणून शक्य झाले. आर्थिक सुबत्ता हा अध्यात्माचा सुद्धा पाया आहे. पतिव्रता हे बिरुद सुंदर आणि युवा स्त्रीच मिरवू शकते त्या प्रमाणे वैराग्य सुद्धा ज्याने राजभोग सोडून दिला त्या बुद्धाला शोभा देते. नाहीतर वृद्धा नारी पतिव्रता ह्याला काहीही अर्थ नाही. आर्थिक सुबत्तेने माणसाला मोकळा वेळ मिळतो ज्यातून काव्य शास्त्र विनोद निर्माण होतो. आज शाकाहाराची सर्वांत मोठी चळवळ अमेरिकेत आहे. बीफ का खाऊ नये ह्यावर जास्त रिसर्च अमेरिका प्रकाशित करते. ध्यान मार्गांचे आणि योगा चे महत्वाचे संशोधक आहे अमेरिकेत आहेत. इतकेच नव्हे धर्मादायी, पर्यावरण, बाल आरोग्य, स्त्री अधिकार, मानव अधिकार, पशु अधिकार ह्या अनेक विषयावर खरोखर मन लावून काम करणाऱ्या मोठ्या संघटना अमेरिकेसारख्या श्रीमंत आणि मुक्त समाजांत निर्माण झाल्या (सोव्हिएट मध्ये नाही). > एक भयानक जग आपल्यासमोर उभे रहाणार आहे सर्वच पिढ्या असे भाकीत वर्तवत आल्या आहेत आणि काळपुरुषाने त्यांना चुकीचे ठरवले आहे.
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Tue, 03/23/2021 - 05:06 नवीन
आर्थिक सुबत्तेने माणसाला मोकळा वेळ मिळतो ज्यातून काव्य शास्त्र विनोद निर्माण होतो.
१०० % सहमत. चंदेल राजकाळात झालेली खजुराहो ची शिल्पकला वा अजंठा वेरुळ येथील शिल्पकला ह्याला फार मनुष्यबळ लागले असणार आणि त्याकाळची अर्थव्यवस्था अश्या लोकांचे पालनपोषण करायला सुदृढ होती. किंबहुना ऑलिम्पिक अथवा तत्सम क्रिडा स्पर्धात एखाद्या देशाला मिळणारे यश हे त्या देशाच्या आर्थिक सुबत्तेचे प्रतिक असते.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 03/23/2021 - 05:30 नवीन
परकीय आक्रमण नसल्याने, शांतता पण होती .... ------ ऑलिम्पिक अथवा तत्सम क्रिडा स्पर्धात एखाद्या देशाला मिळणारे यश हे त्या देशाच्या आर्थिक सुबत्तेचे प्रतिक असते. आणि शांतता, हा पण एक महत्वाचा भाग आहे...
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा गुरुवार, 03/25/2021 - 13:05 नवीन
शिल्पकला व स्थापत्यकला कधीपासून काव्य शास्त्र विनोद या सदराखाली येउ लागली बुवा ? इन्डिया गेट ,ताजमहाल हे सारे भव्य आहे ! मग भारत देश संपन्न हे नक्की का ? आता आठवत नाही पण शहाजहान बादशाहला शिव्या घालणारी एक कविता लिहिली गेली आहे ताज बान्धल्यावर म्हणे त्याने कारागिरान्चे हात तोडून टाकले !
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा गुरुवार, 03/25/2021 - 12:46 नवीन
सर्वच पिढ्या असे भाकीत वर्तवत आल्या आहेत आणि काळपुरुषाने त्यांना चुकीचे ठरवले आहे. अशा किती पिढ्याचा अभ्यास तुम्ही केला आहे ? मी वतरवलेला एक केवळ अन्दाज तो ही आज जे तांत्रिक ज्ञान व लोकसंख्येचे स्वरूप यावर आधारित आहे ! तो उलट चुकला तर आनंदच आहे ! तुम्ही मात्र वेळोवेळी कुठल्या पिढीने काय काय वर्तवले व कधी याचा नीट शोध घ्या ! कारण तुमचे विधान घडून गेलेल्या गोष्टीवर आधारित आहे आमचे नाही !
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा गुरुवार, 03/25/2021 - 12:54 नवीन
आर्थिक सुबत्तेने माणसाला मोकळा वेळ मिळतो ज्यातून काव्य शास्त्र विनोद निर्माण होतो आरे बाप रे लई भारी शोध आहे ! संत ज्ञानेश्वर , तुकाराम सर्व सुबत्ता भोगणारे होते म्हणायचे !पैसे गाठीशी आल्यावर माणसात काव्य बुद्धी एकदम जन्म घेते ? माडगूळ कर आता याचे कसे उत्तर देणार नि रस्त्यावर सामानसह फेकून दिलेले बाबूजी ( सुधीर फडके ) तरी कसे देणार आता ?
  • Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी Sat, 03/20/2021 - 08:23 नवीन
Image removed. मी नुकतेच अनुवाद केलेले हे पुस्तक माझ्यामते उपयोगी पडावे... पैशाचे मानसशास्त्र गेल्या काही दिवसात एका पुस्तकाचा अनुवाद हातावेगळा केला. हे पुस्तक अनुवाद करताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषतः तरूणांसाठी. मी वाचत गेलो आणि झपाट्याने त्याचा अनुवादही पूर्ण केला. अनुवाद सोप्यात सोप्या शब्दात करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. हा अनुवादही तुम्हाला सोपा आणि रंजक वाटेल. असो आता पुस्तकाबद्दल - श्री मॉर्गन हाऊजेल यांनी पैशाच्या संदर्भात आपण कसे वागावे याचा जो धडा घालून दिला आहे तो खरेच डोळ्यात अंजन घालणारा आहे. त्यांनी नुसता उपदेश केलेला नाही तर अनेक चमत्कारिक आणि मजेशीर उदाहरणे देऊन त्यांचे मुद्दे आपल्याला पटवून सांगितले आहेत आणि त्यामुळेच अवघड विषयावरील हे पुस्तक वाचताना एक क्षणही कंटाळा येत नाही. त्यांनी या पुस्तकात प्रस्तावना आणि वीस प्रकरणात हा विषय मांडून एकप्रकारे आपल्याला मदतच केली आहे. ज्याप्रमाणे वॉल्डन आपल्याला जिवनाची काही रहस्यं उलगडून दाखवते त्याचप्रमाणे हे पुस्तक आपल्याला सध्याच्या काळात पैशाशी कसे वागावे याचे धडे देते आणि ते अत्यंत आवश्यक आहेत. कोणाला वाटेल हे पुस्तक शेअरमधे गुंतवणूक करण्यासाठी आहे पण हा विषय फार व्यापक आहे आणि आपल्या आयुष्याच्या सगळ्या अंगांना स्पर्ष करून जातो. यात आपले मन, बुद्धी, समाज, संस्कार, ज्या काळात आपण वाढलो त्याचा परिणाम, सुखाच्या आणि दुःखाच्या कल्पना, गरज, हव्यास, पुरेसे म्हणजे काय... अशा अनेक बाबींचा ऊहापोह आपल्याला आढळेल. उदा. प्रस्तावनेत तो म्हणतो - दोन विषयांचा प्रत्येकाच्या आयुष्यावर परिणाम होतोच मग तुम्ही ते माना किंवा न माना. - तुमची प्रकृती आणि पैसा. तेथेच पुढे त्याने एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट प्रकाशात आणली आहे. तो म्हणतो, ‘‘आधुनिक वैद्यकीय शास्त्राच्या अशक्य वाटणाऱ्या विजयाने माणसाचे आयुर्मान जगभर उंचावले गेले आहे. माणसाच्या शरीराचे कार्य कसे चालते याबाबतीत डॉक्टरांच्या जुनाट ज्ञानाची जागा नवनवीन शोधांनी घेतली आहे आणि मला वाटते त्यामुळे प्रत्येकाचे प्रकृतीस्वास्थ्य आता तुलनेने निरोगी झाले आहे. वित्त उद्योगात म्हणजे - गुंतवणूक, वैयक्तिक वित्तव्यवस्थापन, औद्योगिक व्यवस्थापनात गोष्ट वेगळी आहे. गेल्या वीस वर्षापासून उच्च दर्जाच्या विद्यापिठातून उच्च दर्जाची बुद्धिमत्ता व शिक्षण यात ओढले जात आहे. काही वर्षांपूर्वी फायनांशियल इंजिनियरींग या विषयाचे प्रिन्स्टन विद्यापिठात सगळ्यात जास्त स्तोम माजले होते. पण या विषयाने आपल्याला एक उत्तम गुंतवणुकदार बनवले आहे का? हा खरा प्रश्न आहे. मला तरी तसे काही झाल्याचे दिसत नाही. चुकत माकत आणि अनुभवातून शिकत आपण चांगले शेतकरी झालो, कुशल प्लंबर झालो आणि अत्याधुनिक केमिस्टही झालो. पण चुकत माकत आणि त्यातून शिकत आपण आपल्या पैशाचे चांगले व्यवस्थापन करण्यास शिकलो आहे का? आपली कर्जात बुडण्याची शक्यता कमी झाली आहे का? आपण संकटकाळासाठी पैशाची पुरेशी बचत करण्यास शिकलो आहे का? आपण आपल्या निवृत्तीसाठी आर्थिकदृष्ट्या तयार आहोत का? आपल्या सुखासाठी पैसा काय करू शकतो आणि काय करू शकत नाही याबाबतीत आपले विचार स्पष्ट आहेत का? याची उत्तरे होकारार्थी आहेत असे मी दुर्दैवाने म्हणू शकत नाही. म्हणजे तसा ठाम पुरावा माझ्याकडे तरी नाही. आपल्याला पैशाबद्दल जे शिकवले जाते ते पदार्थविज्ञानासारखे (नियम आणि समीकरणे). मानसशास्त्रात शिकवतात तसे नाही (भावना आणि त्याच्या अनेक छटा) आपण काय शिकलो नाही आणि काय शिकायला पाहिजे ते या पुस्तकातून जाणून घेण्यास तुम्हाला आवडेल... आता प्रत्येक प्रकरणात कशावर लिहिले आहे हे पुढच्या लेखात लिहीन पण तोपर्यंत मला खात्री आहे की तुम्ही हे पुस्तक वाचलेले असेल आणि मला पुढे लिहावे लागणार नाही. नव्हे, तुम्ही ते वाचावेच असा माझा आग्रह आहे... - जयंत कुलकर्णी.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 03/20/2021 - 13:10 नवीन
माहिती बद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sun, 03/21/2021 - 17:02 नवीन
परिचय खुप आवडला. सध्या माझ्यासाठी महत्वाचा विशय आहे
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Mon, 03/22/2021 - 08:08 नवीन
आत्ताच पुस्तक अक्षरधारा मधून आणले व वाचायला सुरवात केली आहे
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Sat, 03/20/2021 - 09:00 नवीन
फारच छान. वाचलेच पाहिजे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 03/20/2021 - 10:39 नवीन
आता श्रीमंत कोणाला म्हणावे? माझी व्याख्या - यापुढील आयुष्यात कोणत्याही मार्गाने एकही रूपया सुद्धा मिळाला नाही तरी ज्याला आपली सध्याची जीवनशैली कायम ठेवता येईल तो श्रीमंत.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 03/20/2021 - 11:56 नवीन
सहमत आहे
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Sat, 03/20/2021 - 12:11 नवीन
माझी व्याख्या - यापुढील आयुष्यात कोणत्याही मार्गाने एकही रूपया सुद्धा मिळाला नाही तरी ज्याला आपली सध्याची जीवनशैली कायम ठेवता येईल तो श्रीमंत.
++९
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sun, 03/21/2021 - 17:20 नवीन
माझी व्याख्या - यापुढील आयुष्यात कोणत्याही मार्गाने एकही रूपया सुद्धा मिळाला नाही तरी ज्याला आपली सध्याची जीवनशैली कायम ठेवता येईल तो श्रीमंत.>>>> वा क्या बात है|
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 03/20/2021 - 12:22 नवीन
पण आत्मविश्वास नाय.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 03/20/2021 - 13:41 नवीन
वाचतोय.
  • Log in or register to post comments
स
साहना Sun, 03/21/2021 - 05:27 नवीन
माझी डिग्री मला हाती मिळाली तेंव्हा माझ्या संपूर्ण परिवाराचे नेट वर्थ होते ७५ हजार रुपये. पण माझ्या विशीतच मी स्वतःला श्रीमंत म्हणू शकते इतकी लक्षमी देवीची कृपा झाली. ह्याला सरस्वती देवीची कृपा सुद्धा कारणीभूत होती. म्हणून तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी देऊ शकते. १. नशीब प्रचंड प्रमाणात महत्वाचे आहे. पण सर्वच गोष्टी नशिबाने होतात असेही नाही आपले प्रयत्न आवश्यक आहेत. २. मराठी लोक व्यापारात फारशी जोखीम घेत नसल्याने त्यांना पंगुसिंमा असल्या पराभूत मानसिकतेला काहीही अर्थ नाही. ह्या सर्व लोकांना अपंगत्व सुद्धा आहे जी मी इथे मांडणार नाही. मराठी लोक विविध क्षेत्रांत योगदान देतात, बौद्धिक तसेच शारीरिक दोन्ही प्रकारची कामे उत्कृष्ट पणे करतात, पुरोगामी आहेत आणि बुरसटलेल्या विचारणा तिलांजली देण्याची क्षमता सुद्धा ह्यांच्यात आहे. मराठी माणसाने टिळक निर्माण केले तसे आगरकर सुद्धा केले. कान्होजी आंग्रे केले आणि शिवाजी सुद्धा केले. ब्राम्हण पेशवे केले तसेच आंबेडकर प्रमाणे दलित सुद्धा केले. ह्या विविधतेने मराठी माणसाने अमुकच एका क्षेत्राला बळकावले असे दिसत नसले तरी प्रत्येक क्षेत्रांत मराठी माणसाने जबरदस्त ठसा उमटवला आहे. यशस्वी होण्याची काहीही युक्ती नाही. आणि मराठी माणसाने मोठे ध्येय ठेवले पंगुसिमा लोकांना आदर्श मानू नये. महाराष्ट्र राज्याचे किमान ४ तुकडे केले तरी राज्याची प्रगती वेगाने होईल. ३) शहर जितके मोठे तितकी आर्थिक समृद्धी जास्त असे काही असते का? लोक जितके जास्त तितकी समृद्धी जास्त. त्याशिवाय भौगोलिक स्थान आणि हवामान सुद्धा महत्त्वाचे आहे. सर्वाधिक संपत्ती उच्च मूल्याच्या वस्तुंनी निर्माण होते (गाड्या, कम्प्युटर चिप्स, सॉफ्टवेर, इत्यादी) अश्या गोष्टींचे शोध आणि काम फक्त शहरांत होऊ शकते कारण शेकडो प्रकारच्या लोकांची मेहनत त्यांत जाते. (आमच्या पूर्वजांनी सुद्धा हे ओळखले होते आणि गावाच्या संपन्नतेसाठी १८ पगड जाती हव्यात हे त्यांनी हेरले होते. आता समृद्धी साठी १८,००० प्रकारच्या लोकांची गरज भासते हि गरज फक्त शहरे पुरवी शकतात) ४. ते कौशल्य शिकण्यासाठी गुंतवलेल्या पैशाच्या तुलनेत परतावा जास्त आहे. असल्या याद्या बनवून फायदा नाही. कारण त्यांत व्यक्तीची प्रतिभा सुद्धा पाहायला पाहिजे. एक चांगला प्लम्बर मुंबईत एका सुमार दर्जाच्या IT वाल्या पेक्षा कित्येक पटीने जास्त कमावू शकतो. -- माझी टीप तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर गुंतवणूक करायला शिका. गुंतवणूक हि क्षमता, माणसे, बाजार आणि संपत्ती तीन प्रकारची असते. सगळी कडे चक्रवाढ दर हि संकल्पना समजून घ्या. ह्यावर कधी विस्ताराने लिहीन.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 03/21/2021 - 06:08 नवीन
नक्की लिहा... काही वेळा, तुमचे विचार पटत जरी नसले तरी, माझेच विचार पारखून घ्यायला मदत होते... वैचारिक मतभेद असणे, हे लोकशाहीचे महत्वाचे लक्षण आहे...आणि हे आपण दोघेही जाणतो...
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Sun, 03/21/2021 - 06:47 नवीन
मराठी माणूस व्यापारात मागे असला तरी सामाजिक स्थित्यंतरांमधे ठसा उमटवत होता,उमटवत आहे हे मान्य आहे आणि त्याचा अभिमानही आहे. सर्वांना सर्व जमणे शक्य नाही हे ही खरे पण "सर्वे गुणाः काञ्चनमाश्रयन्ति" हे ही तितकेच खरे आहे. अगदी कर्तुत्ववान पेशव्यांनाही राज्यशकट हाकण्यासाठी बर्‍याचदा कर्ज घ्यावे लागले होते. ह्यावर कधी विस्ताराने लिहीन. खरंच लिहा. मागेही हेच म्हणालो होतो. _/\_
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Tue, 03/23/2021 - 03:21 नवीन
१. नशीब प्रचंड प्रमाणात महत्वाचे आहे. भरपूर कष्ट करायची एखाद्याची तयारी आहे पण नशीब साथ देत नाहीये असे असेल तर श्रीमंत होण्याचा विचार सोडून द्यावा का? की अजून काही उपाय करता येतील? कारण बर्‍याचदा आपण पेपरात वाचतो की झोपडपट्टीत राहणारी मुलगी बनली पोलिस अधिकारी, चहाची गाडी चालवणार्‍याचा मुलगा १०/१२ वीच्या गुणवत्ता यादीत किंवा एकंदरीत गरीबाच्या मुलाने मिळवलेले घवघवीत यश. पण ही उदाहरणे अपवादात्मक असतात. झोपडपट्टीत राहणार्‍या सर्वांनाच संघर्ष पाचवीला पुजलेला असतो. त्यातले बरेचसे कष्टाळूही असतात तरीही हजारात एखादाच तसे घवघवीत यश मिळवतो , आपली आर्थिक स्थिती बदलवून टाकतो. आता यात नशीबाचा सहभाग खूप मोठा असेल तर कष्टाला तसे फारसे महत्व नाहीच की!
  • Log in or register to post comments
स
साहना Tue, 03/23/2021 - 07:11 नवीन
> पण ही उदाहरणे अपवादात्मक असतात. अजिबात नाही. आमच्यातील प्रत्येक परिवार काही पिढी मागे अत्यंत गरीब होता. अगदी टाटा पासून अंबानी पर्यंत कोणीही इथे अपवाद नाही. झोपडपट्टीतील लोक सुद्धा ३-४ पिढ्यांत तेथून बाहेर येतात. चहावाल्याचा मुलगा श्रीमंत झाला हे सांख्यिकी दृष्टया खूप दुर्मिळ वाटले तर प्रत्येक श्रीमंत व्यक्तीचे आजोबा किंवा पणजोबा गरीब होते हा नियम मात्र जवळ जवळ सर्वत्र लागू पाडतो. ज्या समाजांत आर्थिक स्वातंत्र्य जास्त तिथे हि प्रगती आणखीन वेगाने होते तर जिथे आर्थिक स्वातंत्र्य कमी तिथे हि प्रगती हळू होते त्यामुळे भारत त्यामानाने बराच गरीब आहे. > भरपूर कष्ट करायची एखाद्याची तयारी आहे पण नशीब साथ देत नाहीये असे असेल तर श्रीमंत होण्याचा विचार सोडून द्यावा का? माझ्या मते भगवान श्रीकृष्ण ह्यांची गीता शेवटी हेच सांगते. कर्म करावे, फळाची अपेक्षा करू नये. कर्मयोग म्हणजे आपण पाऊल उचलत राहावे, शेवटी गंतव्य स्थानावर पोचावे कि नाही हि श्री ची इच्छा. खूप कष्ट केले म्हणून श्रीमंत होणार असे नाही, आणि श्रीमंत झाले म्हणून ते उपभोगता येते असेही नाही. अवघ्या टिशींत किडनी फेल किंवा अपघात होऊन मेलेले लोक पहिले आहेत. त्यांना पहिले कि मला दोन वेळचे खायला मिळते हेच मोठे भाग्य वाटते. त्यामुळे जे काही आहे त्यासाठी भगवंताचे आभार मानावेत आणि कष्ट करत राहावे.
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 03/23/2021 - 11:47 नवीन
प्रत्येक श्रीमंत व्यक्तीचे आजोबा किंवा पणजोबा गरीब होते हा नियम मात्र जवळ जवळ सर्वत्र लागू पाडतो.
व्युत्क्रमही तितकाच लागू. गरीब व्यक्तीचे आजोबा किंवा पणजोबा खूप श्रीमंत (अर्थात बहुधा जमीनदार, जहागीरदार, सावकार इ इ) होते हा नियमही जवळ जवळ सर्वत्र लागू पडत असावा अशी शंका येते.. फुकट मिळालेल्याची पुढील पिढीला किंमत असण्याची शक्यता कमीच. हे एक फिरते चाक, टर्निंग व्हील आहे असे वाटते.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sun, 03/21/2021 - 05:54 नवीन
गुंतवणूक हि क्षमता, माणसे, बाजार आणि संपत्ती तीन प्रकारची असते. सगळी कडे चक्रवाढ दर हि संकल्पना समजून घ्या. ह्यावर कधी विस्ताराने लिहीन.
नक्की लिहा
.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Mon, 03/22/2021 - 01:50 नवीन
की कोणतीही गुंतवणूक ही सदा सर्वदा फायदेशीर असतेच असेही नाही ! वाढत्या लोकसंख्येला आळा एकाएकी बसणार नाही सबब त्यातल्या त्यात फायदेशीर गुंतवणूक जमीन ही असेल पण कधीतरी तो आळा बसणारच !
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sun, 03/21/2021 - 17:33 नवीन
लहानपणी मला ज्याच्याकडे जास्त पैसा तो जास्त सुखी असे वाटत असे
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 03/21/2021 - 18:06 नवीन
श्रीमंती ही स्थलकाल सापेक्ष आहे.मुंबई ,न्यूयॉर्क,आणि खेडेगावातील श्रीमंत व्यक्ती चे मोजमाप वेगळे असते. फक्त व्यक्ती पुरताच विचार केला तर सर्व गरजा आरामात भागतील एवढे धन असेल तर तो श्रीमंत आणि सुखी च माणूस असतो. गरजा व्यवस्थित भागात असून अजुन पैसे जमा करण्याचा हेतू हा फक्त आपले अधिकार गाजवण्याची जी प्राण्याची नैसर्गिक वृत्ती आहे त्याच्या शी निगडित आहे. अधिकार हे बुध्दी नी गाजवता येतात , सत्ता असेल तर गाजवता येतात आणि मनगटात ताकत असेल तरी गाजवता येतात. त्या मधून biproduct म्हणून रोजगार निर्माण होतात ही गोष्ट वेगळी आहे. लोकांना रोजगार मिळावा म्हणून खूप पैसे कमावण्याचा हेतू ह्या जगात कोणाचाच नसतो. १०० sq feet च्या bedroom मध्ये झोपेचे मिळणारे सुख आणि करोडो रुपये खर्च करून सजावट केलेल्या ५०० sq feet bedroom मध्ये मिळणारेे झोपेचे सुख एक सारखेच असते त्या मध्ये काहीच फरक नसतो. सुखाचा चा उपभोग हा शरीराने च घेतला जातो. मग ते शारीरिक सुख असू ध्या,विविध चविष्ट अन्न ग्रहण करण्याचे सुख असू ध्या.सुखाची जाणीव शरीर च करून देते. त्या मुळे आरोग्य आणि उत्तम शरीर हीच खरी संपत्ती आहे . शरीर रोगिट असेल तर त्या व्यक्ती कडे किती ही पैसे असले तरी तो सुखाचा उपभोग घेवू शकतं नाहीं पहिला माणूस जंगलात भटकत होता तेव्हा एका जागेवर स्थिर होण्यात च त्याला सुख वाटत होते स्थिर जीवन आणि आधुनिक साधनांचा वापर करण्याचे सुख घेणारी ज्यांचे वय आता ५० च्या आसपास आहे ती जगातील शेवटची पिढी असेल. आता आयुष्भर अस्थिर जीवन ,आयुष्यभर संघर्ष करण्यात च माणसाचा वेळ जाईल. तंत्र सारखे बदलत असल्या मुळे टिकून राहायचे असेल तर आयुष्भर नवीन स्किल प्राप्त करण्या शिवाय पर्याय नाही आणि ती धडपड फक्त टिकून राहण्यासाठी करायची आहे आवड म्हणून नाही. परत माणसाचे जीवन १००० वर्ष पाठीमागे जात आहे. कशाचीच शास्वती नाही आयुष्भर अस्तित्वात राहण्यासाठी संघर्ष ( माणूस जंगलात राहत होता तेव्हा त्याची हीच स्थिती होती) आमची पिढी ही मानवाच्या इतिहासातील सर्वात सुखी पिढी म्हणून ओळखली जाईल.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Mon, 03/22/2021 - 01:19 नवीन
याला मी एक आणखी गोष्ट जोडेन जी सर्वात महत्वाची आहे ती म्हनजे उत्तम सन्तुलित मन ! मी मागे पुरुषत्व यावर एक लेख वाचला होता .त्यात दाढी, मिशा, लिंग म्हणजे खरे पुरुषत्व नव्हे तर मी पुरूष आहे असे वाटणे हे खरे पुरुषत्व आहे व त्याचे बाह्य व्यवछेदक लक्षण म्हणजे स्त्री विषयी आकर्षण साधारणपणे वयात आल्यानन्तर हयात भर वाटणे असे लेखकाने प्रतिपादित केले होते. श्रीमन्तीचे असेच काही असते " मी श्रीमन्त आहे असे मला वाटले पाहिजे " हे श्रीमन्तीचे प्रमुख लक्षण आहे ! त्याचे दिसेल असे रूप म्हणजे सत्ता ,आरोग्य व स्वातन्त्र यान्चा त्रिवेणी संगम ( यात पैसा कुठे आला ... तर नक्कीच आला कारण काही प्रमाणात या तिन्ही गोष्टी साठी पैसा लागतो ). पण पैसा हे साधन न रहाता साध्य झाले की या तिन्हीचा संकोच झालाच म्हणून समजा !
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Mon, 03/22/2021 - 01:31 नवीन
त्या मुळे आरोग्य आणि उत्तम शरीर हीच खरी संपत्ती आहे . १००% खरे आहे , आटोक्यात सर्व करावे , हे हि खरे पण हे हि खरे कि "पैशाने जरी सर्व प्रश्न सुटत नसले तरी बऱ्याच गोष्टी सोप्या करण्यात / शक्य करण्यात मदत हि निशिच्त होते .. माझे मन मारे उदार असेल पण गरजूंना मदतीला माझ्याकडे आधी पैसा हवा ना .!. उगाच साधुत्वाचे सोंग पांघरून नाही करता येणार अशी सेवा परंतु एकूण भारतीय मनस्थितीत अनेकदा असे दिसते कि पैसे मिळवणे म्हणजे वाईट... अरे पण दोन टोके कशाला...सुवर्णमध्य गाठण्याचा प्रयत्न का करू नये..तो गाठणं अवघड आहे हे मात्र खरे
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Mon, 03/22/2021 - 05:45 नवीन
आमची पिढी ही मानवाच्या इतिहासातील सर्वात सुखी पिढी म्हणून ओळखली जाईल.
एवढं वगळता बाकी सर्व प्रतिसादाशी सहमत! - (सुखी माणसाचा सदरा शोधणारा) सोकाजी
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Mon, 03/22/2021 - 07:35 नवीन
ज्या शी तुम्ही सहमत नाही तेच परम सत्य आहे !!! १९५३ साली जन्माला आल्यामुळे मी हे अनुभवले आहे !! खरे तर त्यापेक्षाही आता जे साधारण पणे ८० ते ८५ वर्षे वयाचे आहेत ते अधिक भाग्यवान !
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Mon, 03/22/2021 - 11:00 नवीन
कमनशिबी कशी? कृपया उलगडून सांगा.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 03/22/2021 - 11:39 नवीन
१) वयाच्या १२ ते पंधरा वर्षा पर्यंत शिक्षण हे हसत खेळत होते . आता वयाच्या चार वर्षा पासून शाळा आणि अभ्यास ह्या साठी दबाव बालपण कोमोजून जात. २) मैदानी खेळ,व्यायाम,गिर्या रोहन ह्या वर लहान वयात पूर्ण लक्ष आणि मोकळीक. ३) शाळा ही शिक्षण घेण्यासाठी होती फक्त जास्त मार्क मिळावे म्हणून नव्हती. मार्क हे हुशार असण्याचे प्रमाणपत्र नव्हते तर.. बाकी activity आणि विषयातील सखोल ज्ञान हेच त्याचे प्रमाण पत्र होते. आता गाईड,जे परीक्षेत येईल तेवढाच अभ्यास आणि त्या वर मिळणारे भरघोस मार्क हे हुशार असण्याचे प्रमाण पत्र आहे.. पण सखोल अभ्यास त्या विषयात नसतो. ४) नोकरी ही सरकारी असेल तर कायम स्वरुपी. खासगी असेल तरी कायम स्वरुपी. तंत्र सारखे बदलत नसल्या मुळे पूर्ण नोकरीत तुम्ही सुरक्षित. ५) एकत्रित कुटुंब पद्धत असल्या मुळे घरात खूप माणसं ,एकटेपणा जाणवत नव्हता वरिष्ठ नागरिकांची सेवा करण्यास खूप लोक असायची नातू,मुल,सूना घरातच असायच्या. एकटेपणा जाणवत नव्हता. आता नवरा ,बायको,एक मुलगा. आत्ताची पिढी व्यक्ती स्वतंत्र ला महत्व देणारी . त्या मुळे सर्व च वयातील लोकांना एकटेपणा आणि नैराश्य ह्यांनी ग्रासले आहे. आमच्या पिढीत लोकांनी रॉकेल चे दिवे पण बघितले आहेत आणि अती आधुनिक विजेचे दिवे पण बघितले. बैलगाडी पण आम्ही चालवली आणि अतिशय आधुनिक अशी मर्सिडीज पण आम्ही चालवली. आयुष्यात खूप मोठा संघर्ष कधीच करावा लागला नाही . आता वय वर्ष दोन पासून संघर्ष नशिबात येतो. बालपण हरवून जाते. तारुण्य चुकीच्या सवयी मध्ये जाते. आणि म्हातारपण केविलवाणे जाते.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Mon, 03/22/2021 - 12:42 नवीन
१९५० च्या सुमारास जन्माला आलेली पिढी मानवी इतिहासातील सर्वात भाग्यवान पिढी असे मीच मागे एका धाग्यावर मिपात लिहिले होते. आता असे पहा तो धागा राजेश१८८ यानी पाहिल्याची शक्यता मला कमी वाटते तरीही त्यानी अगदी त्याच शब्दात या पिढीच्या भाग्याचे वर्णन केले आहे. दुसरे असे की असे जर म्हटले की आजची पिढी कम नशीबवान आहे असे प्रत्येकच पिढी म्हणते तर आमच्या पूर्वीच्या पिढीचा आमच्या कमनशीबाचा मुद्दा काय असे माहीताय ? ते म्हणत "लेकानो तुम्ही नशीबाने जरा कमीच आमच्या वेळी काय नीरसे दूध असे कासंडी तोंडाला लावून प्यायचे आम्ही ! ( काय भारी निकष आहे नाही ? ) तिसरे असे म्हणायचे की आमच्या पिढीपेक्षा आमच्या मागची पिढीच कमी नशीबवान असे परंपरागत चालत आले आहे असे मानायचे झाले तर माझ्या प्रतिसादात माझ्या मागची ( म्हण्जे आज जे ८० ते ८५ आहेत ) त्यान्ची पिढी अधिक भाग्यवान असे मी म्हटले आहे . याचा अर्थ हे नशीब वगरे पिढी पिढीच्या उतरण्डीवर अवलंबून नसून ते सर्व साधारण सुखाची सर्वांगीण पातळी यावर अवलम्बून आहे ! शिवाजी महाराजांचे काळातील वा सम्राट अशोकाचे काळातील पिढी आमच्या वा आमच्या मागच्या पिढीपेक्षा भाग्यवान होती असे कधीच म्हणता येणार नाही !
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Mon, 03/22/2021 - 15:16 नवीन
१) म्हणजे तांत्रिक प्रगती जसजशी वाढत गेली तसतसा तणाव वाढत गेला असे म्हणावे का? २) आजची पिढी आजच्या काळात जन्मल्याने कमनशिबी असली तरी ती आजच्या काळात जन्माला आली यात त्यांचा काय दोष? त्यांनी यातून सुटका कशी करुन घ्यावी? हीबतांत्रिक प्रगती प्रामुख्याने पाश्चात्त्यांची देणगी आहे.त्या पाश्चात्यांचे प्रबोधन करावे का? त्यांना प्रगतीचा वेग जरा धीमा करायला सांगावा का?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 03/22/2021 - 17:17 नवीन
प्रगती चा वेग constant असू ध्या त्यासाठी वेगाने बदल घडवत वेगाने बदल नकोत. साधी गाडी चालवताना पण constant स्पीड ठेवले तर इंधन बचत तर होतेच पण इंजिन ला सुद्धा त्रास होत नाही. ऑटोमेशन मुळे आर्थिक प्रगती चे फायदे कमीत कमी लोकांना मिळतील . फक्त उत्पादन वाढून वस्तू स्वस्त होतील असे म्हणायला लॉजिक आहे. पण इंडस्ट्री वाढ आणि रोजगार वाढ समांतर झाली तर निरोगी अर्थ व्यवस्था निर्माण होईल. पण फक्त इंडस्ट्री मध्ये गुंतवणूक वाढ ,त्या मधून भरमसाठ उत्पादन होत असेल आणि रोजगार निर्मित च होत नसेल तर रोजगानिर्मिती कशी होणार. बेकरी कमी करणे हाच आता पर्यंत च प्रश्न होता आणि तो प्रश्न निकाली काढण्यासाठी industrialization झाले पाहिजे हा मार्ग होता. आणि खूप मोठ्या प्रमाणात तो यशस्वी पण झाला. पण ऑटोमेशन मुळे उत्पादन वाढ नक्कीच होईल पण रोजगाराच्या संध्या कमी होतील असे समजायला जागा आहे. जगात खूप मोठी जनसंख्या बेरोजगार असेल तर उत्पादन वाढ कोणासाठी. यंत्राचा वापर केला की कमी वेळात काम पूर्ण होते आणि कामगार लागत नाहीत . पण लवकर काम पूर्ण करून कुठली स्पर्धा jinkayachi आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 03/23/2021 - 03:09 नवीन
एकदा एक शेतकरी, बोअरवेल खणण्यासाठी, मशीन आणतो. सरपंच म्हणतो, ह्या मशीनच्या वापरामुळे, गावातील कामगारांचा रोजगार बुडाला. माझ्याकडे मजूर आहेत, ते कुदळ आणि फावडे वापरून, विहीर खणून देतील.... गावातच रहायचे असल्याने, शेतकरी माणसाने, कुठला पर्याय निवडायचा?
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 03/23/2021 - 03:46 नवीन
अवघड आहे हा प्रश्न सोडवणं .. याला झटपट समाधानी उत्तर नाही... एक उत्तर म्हणजे: मशीन वापरलं तर तुमची विहीर लवकर खणून होईल , लवकर पाणी मिळेल त्यावर तुमचा शेतीचा "व्यवसाय " चांगला होईल आणि मग तो भाजी काढायला किंवा शेतीतील इतर कामाला तुम्हाला मजूर लागतीलच कदाचित काम एवढे होईल कि २ पाल्यात काम चालेल आणि तीच गावातील माणसे तुस्तही कमल ठेवत येतील... त्यातील दोन माणसे काचचित शेतीमाल बाजारी नेण्यास तुम्हाला लागतील.... असा विकास होऊ शकतो.. पण जर सर्वच जण जर असून बसलं कि आम्ही हातांनीच करणार तर अवघड आहे अजून एक उदाहरण माल चढ उतरवण्यास पॅलेट आणि फोर्कलिफ्ट कारखान्यात किंवा शेतीचं ठिकाणी पण वापरणे.. कराल तर मजुरी कामे कमी ना कराल तर उद्योग हळू हळू चालणार , मग असं कुठेतरी मधय गाठलेच पाहिजे कि
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 03/23/2021 - 04:35 नवीन
सरपंच ज्या पक्षाचा असेल त्या पक्षाच्या आमदाराची ओळख काढायची... आणि सरपंचाला बरोबर घेऊन जायचे... दुसरा मार्ग असा आहे की, तडजोड करायची... पण, तडजोड एकदा केली की, सतत करावी लागते... तिसरा मार्ग सगळ्यात सोपा आणि आर्थिक दृष्टीने फायदेशीर, बाबा महाराज यांचे मंदिर स्थापन करणे.... शहरातील नियम, गावांत चालत नाहीत... शहरांत तुम्ही लपूनछपून कामे करू शकता, गावांत काहीच लपून रहात नाही..गावातील, लोकांना, तुम्ही "कुणीतरी" आहात, हे सतत दाखवावे लागते...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 03/23/2021 - 04:37 नवीन
मशीन शिवाय पर्याय नाही ...
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 03/25/2021 - 11:13 नवीन
बोअर आणि विहीर यातला फरक सरपंचाला माहिती नाही की शेतकऱ्याला ? बोअरच्या बजेट मध्ये कोणता माणूस विहीर खणून देईल ?
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Tue, 03/23/2021 - 10:04 नवीन
मी जिथे कामाला होतो तिथे एखादे व्हाउचर नॅरेशन सकट प्रिंट होऊन येत असे. नेहमी लागणारी अनेक नॅरेशन कोडीफाईड करून ठेवली होती. ही गोष्ट १९९५ च्या दरम्यानची असेल . आजही राष्ट्रीकृत बँकेत व्हाउचर हाताने लिहिले जाते. कारण खाजगी नोकरीत नव नवे प्रयोग करून नोकर वर्ग कमी कसा होईल हे पाहावे लागते .सरकारी नोकरीत मुद्दाम होऊन अप्रगत राहून नोकर्या टिकवाव्या लागतात ! जसजसे सरकारीकारण कमी होत जाईल तसतसा रोजगार कमी होत जाईल .माझ्यासारखे " कॉस्ट " वाले असतील तर रोजगार तीव्रतेने कमी होत जाईल . अशा रीतीने तणाव वाढत जाईल यात शंका नाही ! तुमच्या दुसर्या प्रष्णांचे उत्तर असे की आज कोणत्याही तरुणाला एक लाख पगार असला तरी त्याचे महिन्याचे सेव्हिंग ५०००० इतके असले पाहिजे कारण त्याला नोकरीवरून कधी हाकलतील याचा पत्ता याचा पत्ता नाही ! ( नारायण मूर्तीच्या भाषेत नो बडी नोज व्हेन युवर कंपनी स्टॉप्स लविन्ग यू ) कर्ज चोरीचा धंदा करायचा म्हटला तरी मिळेल ! पण अमेरिकन लोकांसारखे या कर्ज नावाच्या सापळयात अडकून आपली जीवनशैली उगीच चंगळ बाजींची करू नये ! शक्यतो एकाच मुलाला जन्म देऊन त्याचे मनापासून पालनपोषण करावे मुलगी झाली तरी ! आजच्या पिढीला अनेक संकटांचा सामना करावयाचा आहे त्यात उपभोगाच्या सांधनांनी मिळणारे अतिरिक्त फायदे वाचवून किती वाचवणार ?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 03/23/2021 - 10:09 नवीन
आर्थिक षडरिपू आणि इतरही अनेक आर्थिक रिपू, जितके टाळता येतील, तितके टाळणेच उत्तम...
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 03/25/2021 - 07:32 नवीन
१९५० च्या सुमारास जन्माला आलेली पिढी मानवी इतिहासातील सर्वात भाग्यवान पिढी अजिबात नाही. १९७० पर्यंत लोकांकडे गॅसच काय रॉकेल पण नसे. रेशन च्या लांब रांगेत उभे राहून तांबडा गहू विकत मिळत असे. लोक डालडा खात असत तूप म्हणून. दुधासाठी कार्ड काढायचं पहाटे उठून मैलभर रांगेत उभं राहून टोन्ड दूध विकत घ्यायचं. घरात लग्न असलं तर चार महिने अगोदरपासून काटकसर करून साखर वाचवून ठेवायची. ( ( सामना चित्रपटातील कुणीतरी अशी पटापट गंमत आम्हां सांगेल काय हे गाणं पहा) कोकणात जायचे असेल तर मुंबई सेंट्रल स्थानकात आदल्या दिवशी रात्री रांग लावून झोपायचं. कोकणात पोचल्यावर पहिल्याच दिवशी परतीच्या आरक्षणाची झकाझकी करायची. घरी फोन येण्यासाठी १५ वर्षे थांबायला लागत असे. मुंबईतल्या मुंबईत फोन न लागणे रॉंग नंबर जाणे हे सर्रास असे. १९८४ साली माझा एम बी बी एस च्या पहिल्या वर्षाचा निकाल आईवडिलांना कळवण्यासाठी पुण्यातून ट्रँक कॉल बुक केला होता ६ तास होऊनही मुंबईत कॉल लागला नाही. शेवटी ९ वाजता केंद्रीय तारघर बंद झालं. बहुसंख्य गावातुन नजीकच्या रस्त्यापर्यंत डोलीत घालून रुग्णाला आणायला लागायचं. वैद्यकीय उपचार जेमतेमच होते. रेल्वेच्या पुढच्या प्रवासाचे बुकिंग करण्यासाठी पुढच्या स्थानकावर पत्र/ तर पाठवायचे. ते पोचले नाही तर आडवळणी स्थानकावर बायकामुलांसकट लटकत बसावे लागत असे. चाळीतच ओलावा होता सारखा दांभिकपणा दुसरा नसेल. नवरा बायकोला सुद्धा खाजगी बोलायची चोरी होती. सेक्स म्हणजे अंधारात कसं तर आटपून घेण्याची गोष्ट होती. दीड खोलीत पाच मुलं आईवडील आजी आजोबा रहात असतील तर अजून काय होणार? उगाच जुना काळच कसा चांगला होता, एकत्र कुटुंबच कसे चांगले आणि चाळीतच प्रेम मिळत असे सारखे भंपक गहिवर काढले कि संताप होतो. १०० पैकी १०० लोक चाळीतून फ्लॅट मध्ये गेले. एक तरी उदाहरण आहे का गंगा उलटी वाहिल्याचं? एक तरी मुलगी आनंदाने एकत्र कुटुंबात जायला तयार आहे का? संतती नियमन न करता ८-१० पोरं काढून त्यातील अर्ध्या मुलांची जबाबदारी मोठ्या भावंडांवर टाकणारा काळ चांगला कसा असेल? गेलेल्या काळापेक्षा येणारा काळ चांगलाचा असणार आहे आणि तो नसला तर ती चूक जुन्या पिढीचीच आहे.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक गुरुवार, 03/25/2021 - 07:50 नवीन
उगाच जुना काळच कसा चांगला होता, एकत्र कुटुंबच कसे चांगले आणि चाळीतच प्रेम मिळत असे सारखे भंपक गहिवर काढले कि संताप होतो. सहमत. +११११११११११११११११११११११११
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 03/25/2021 - 08:01 नवीन
उगाच जुना काळच कसा चांगला होता, एकत्र कुटुंबच कसे चांगले आणि चाळीतच प्रेम मिळत असे सारखे भंपक गहिवर काढले कि संताप होतो.
१००% सहमत. उगीच जुन्या काळाविषयी नोस्टाल्जियाचे गळे काढण्यात काही अर्थ नाही.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 03/25/2021 - 08:01 नवीन
उगाच जुना काळच कसा चांगला होता, एकत्र कुटुंबच कसे चांगले आणि चाळीतच प्रेम मिळत असे सारखे भंपक गहिवर काढले कि संताप होतो.
सहमत आहे
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० गुरुवार, 03/25/2021 - 08:14 नवीन
अगदी खरंय. सार्वजनिक स्वच्छतागृह आठवणही नको. घरात गुळाचा डबा लपवून ठेवत.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 03/25/2021 - 10:21 नवीन
म्हणजे 1970 नंतर चा ज्यांचा जन्म आहेत ते. माझा जन्म 1975 चा आहे आणि मी माझे अनुभव वरून ती पिढी भाग्यवान होती असे मत व्यक्त केले होते. माझे बालपण गावी च गेले खरे म्हणतात तशी 8 मुल तेव्हा कोणालाच नव्हती एकदा अपवाद असू शकेल. चार मुल सरासरी त्या वेळी असायची. माझ्या लहानपण पासून गावात वीज होती.वीज नव्हती तो काळ मी बघितलेला नाही . गावात 10 पर्यंत मराठी शाळा आणि तीन किलोमीटर वर कॉलेज अगदी graduation पर्यंत. गावात st ची सोय , जवळ जवळ प्रतेक घरात आड ( आड म्हणजे लहान विहीर चार पाच फूट व्यास असलेली) त्याचे पाणी वापरले जायचे. पिण्यासाठी आणि बाकी घरगुती वापरा साठी. पाण्यासाठी वण वण हा प्रकार नव्हता. शेती साठी धरणातून आलेला कालवा होता. बाकी विहारी चे पाणी असायचेच. आता पेक्षा जास्त आणि वेळेवर पावूस असायचाच. योग्य भोगलिक ठिकाणी गाव असल्या मुळे पाण्याचा दुष्काळ हा प्रकार काही अनुभवलं नाही. फक्त घरात संडास नव्हती.त्या साठी पूर्ण मोकळे रान आपलेच तो पण मोठा कार्यक्रम असायचा सर्व मित्र मिळून एकत्र त्या कार्यक्रमासाठी बाहेर पडायचो . आणि जी जागा आवडेल त्या जागी पार्सल सोडून घरी यायचो. अन्न,धान्य ह्यांची कमी असायचीच नाही. ना रासायनिक खत,ना हायब्रीड बियाणे उत्तम दर्जा चे अन्न धान्य,. प्रतेक घरात पाळीव जनावर ही असायचीच. बैल, गायी,म्हैस , शेरड्या ह्या असायच्याच. शाळा म्हणजे अती महत्वाची असली काही भानगड नव्हती. पण शाळेत शिक्षक मात्र प्रामाणिक पने च शिकवायचे. पाठांतर,स्पेलिंग ,पाढे, ह्यांचे असायचेच. त्या मुळे आम्हाला बेरीज वजाबाकी करायला अजुन पण calculator ची गरज लागत नाही. भाषा ही व्याकरण शुध्द च असली पाहिजे ह्या विषयी शिक्षक आग्रही असतं. त्या मुळे अमेरिकेत सर्वात योग्य आणि व्याकरण शुध्द इंग्लिश मराठी लोक बोलतात असा त्या विषयी केलेल्या सर्वे चा निष्कर्ष होता. दहावी सहज झाली ती पण first class नी. विशेष काही लोड न घेता. आणि सर्व विषयच सखोल अभ्यास करून फक्त येणाऱ्या प्रश्नाची उत्तरं पाठ करून नाही. दहावी पर्यंत मनसोक्त मैदानी खेळ ,व्यायम शाळा,जॉगिंग सर्व करून झाले... दहावी नंतर सहज प्रवेश आता सारखे हाल नव्हते . १२ वी नंतर मुंबई ,मुंबई मध्ये सहज प्रवेश कॉलेज मध्ये.. Bsc पण आरामात झाली . आणि पुढे नोकरी पण. त्या मुळे भयंकर संघर्ष करावा लागला नाही. सर्व सहज साध्य होत गेले. त्या मुळे आम्ही सर्वात सुखी असे मी मत व्यक्त केले होते
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 15 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 15 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 15 hours ago
  • सुंदर !!
    1 day 15 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 15 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा