श्रीमंतीचे नियम??
भरपूर पैसे मिळवावेत असे कोणाला वाटणार नाही? बहुतांश लोकांना तसे वाटते तरी किंवा भोवतालची परिस्थिती तरी त्यासाठी प्रयत्न करायला भाग पाडते. भारत हा अफाट लोकसंख्या असलेला देश आहे. साहजिकच इथे संघर्ष खूप आहे, भ्रष्टाचारसुद्धा बराच आहे. शिवाय भारतात श्रममूल्य हे पाश्चात्य देशांच्या तुलनेत कमी आहे. अशा परिस्थितीतून प्रयत्न करुन आर्थिक समृद्धी आणण्याचे महत्कार्य पार पाडावे लागते.
थिंक अँड ग्रो रिच हे श्रीमंत कसे व्हावे या विषयावर बरेच गाजलेले पुस्तक विशेषत: अमेरिकन जनता डोळ्यासमोर ठेवून लेखक नेपोलियन हिल यांनी हे पुस्तक लिहिले होते. यालाही साधारण ८४ वर्षे होऊन गेली.
चर्चेचा विषय हाच आहे की भारतासारख्या देशात श्रीमंत होण्यासाठीचे काही ठाशीव नियम असू शकतात का? अर्थात प्रत्येक नियमाला काही अपवाद असतात. ते व्यक्तिपरत्वे थोडे बदलूही शकतात. ते कायम तसेच राहतात असेही नाही. पण अपवादानेच नियम सिद्ध होतात हे ही खरे आहे. ते अपवाद गृहित धरुन श्रीमंत होण्यासाठीचे काही ठराविक नियम असू शकतात का? हेच पहायचे आहे.
आता श्रीमंत कोणाला म्हणावे? तर एका त्रिकोणी कुटूंबाला ज्यातल्या कुटूंबप्रमुखाचे पुण्यासारख्या शहरात, वयाच्या तिशीच्या आत किमान ६० हजार रुपये वैयक्तिक मासिक उत्पन्न असेल तर तो सुद्धा श्रीमंत म्हणायला हरकत नसावी. यात त्याच्याकडे बाईक आहे पण चारचाकी नाही, कसलेही खर्चिक व्यसन नाही असे गृहित धरले आहे. ही झाली किमान मर्यादा. आता याउपर ही मर्यादा कितीही असू शकते. जसे उत्पन्न वाढेल तसतसे चारचाकी किंवा खर्चिक व्यसन किंवा अजून खर्चायला लावणार्या बाबी उत्पन्नाच्या प्रमाणात अॅड करायला हरकत नाही.
धाग्याचा उद्देश प्रामुख्याने उपरोल्लिखित किमान कमाईपेक्षा कमी उत्पन्न असणार्यांना श्रीमंत होण्यासाठी मार्गदर्शनपर चर्चा हाच असावा. आधीच भरपूर कमवणार्यांना अजून कसे कमवता येईल यासाठी हा धागा नाही. _/\_
विषयानुषंगाने काही प्रश्न की जेणेकरुन चर्चेला दिशा मिळेल.
१) नशीब हा फॅक्टर श्रीमंतीसाठी किती महत्वाचा आहे?
२) मराठी लोक व्यापारात फारशी जोखीम घेत नसल्याने त्यांना पंगुसिंमा (पंजाबी, गुजराती, सिंधी, मारवाडी) इतके यश व्यापारात मिळत नाही असे म्हटले जाते. पण पंगुसिंमांच्या व्यापाराच्या अशा काही पद्धती किंवा ट्रिक्स असू शकतात का की ज्यामुळेच ते व्यापारात यशस्वी होतात? उदा. एका मारवाडी व्यक्तीने दुसर्या मारवाड्याला धंद्यासाठी कर्ज दिले. ते व्याजासहीत वसूल होण्याचा कालावधी हा मराठी माणसाने दुसर्या मराठी माणसाला धंद्यासाठी दिलेल्या कर्जवसूलीच्या कालावधीपेक्षा जास्त असू शकतो का? पंगुसिंमा हा तग कसा धरु शकतात? अशाच अजून काही युक्त्या असू शकतात का पंगुसिंमांच्या?
३) शहर जितके मोठे तितकी आर्थिक समृद्धी जास्त असे काही असते का?
४) काही क्षेत्रे अशी आहेत ज्यातील कौशल्यातून चांगले पैसे मिळतात. ते कौशल्य शिकण्यासाठी गुंतवलेल्या पैशाच्या तुलनेत परतावा जास्त आहे. काही मिपाकरांशी चर्चा करुनच ही यादी बनवली आहे. यात अजून काही सुधारणा किंवा वाढ करता येईल का?
१. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात लागणारं कोणतंही कौशल्य
२. कॉम्प्युटर हार्डवेअर इन्स्टॉलेशन,फिक्सिंग
३. सेल्स अँड मार्केटिंग
४. कायिक आरोग्यसेवांतर्गत येणारे कोणतेही कौशल्य
५. गणित, विज्ञान, इंग्रजी हे विषय शिकवता येणे.
६. आर्थिक गुंतवणूकीचे सल्लागार
७. रसायनशास्त्र (कॅटॅलिस्टस्)
८. विद्युत अभियांत्रिकी (कॅप्टीव्ह जनरेशन)
९. लोगो डिझाईनिंग
१०. चारचाकी किंवा जड वाहन सफाईदारपणे चालवता येणे.
११. धार्मिक,अध्यात्मिक सेवा पुरवणे
१२. कार, बाईक दुरुस्ती, स्वच्छता
१३. न्यायिक सेवा (वकील वगैरे)
१४. स्पर्धापरीक्षा उत्तम गुणांनी पास होणे.
१५. वातानुकूलन यंत्र दुरुस्ती,निगा
१६. चेतनकला
१७. स्टँडअप कॉमेडी
अत्यंत बाळबोध विचार आहेत.
मी ज्या सोनोग्राफी उपकरणावर काम करतो ते सेकंदाला ७० प्रतिमा निर्माण करते म्हणजे एका रुग्णाचे यकृत मी तपासतो त्याला ३ मिनिटे लागतात गृहीत धरले तर १२६०० प्रतिमा माझा मेंदू ३ मिनिटात पाहून ते माझ्या मेंदूत साठवलेल्या आणि ३१ वर्षाच्या अनुभवाने सिद्ध झालेल्या प्रतिमांशी पडताळून हे व्यवस्थित आहे कि आजारी आहे हे ठरवतो. हे केवळ एका अवयवा बद्दल आहे. असे केवळ एका रुग्णाच्या एका व्यवस्थित अवयवाबद्दल लक्षात घेतल्यास प्रत्येक अवयवासाठी आणि प्रत्येक आजारासाठी संगणकाला अब्जावधी प्रतिमा शिकवाव्या लागणार आहेत. या प्रतिमा पडताळून त्या रुग्णाचे अवयव ठीक आहेत का हे ठरवल्या जाईल. आणि ठीक नसेल तर कोणता आजार असू शकेल त्याच्या प्रतिमांशी संगणकाला तुलना करून अशा आजाराची शक्यता वर्तवावी लागेल यासाठी काही खर्व निखर्व प्रतिमा संगणकाला शिकवाव्या लागतील . हे काम रेडिओलॉजिस्ट सोडून दुसरा कोणीही करू शकणार नाही. असे झाल्यावर आजार किती गंभीर आहे हे ठरवण्यासाठी अजून फार मोठा पल्ला गाठावा लागेल. उदा. माझ्या मित्राच्या आईला स्तनात गाठ होती ती पाहून मागच्या आठवड्यात मी त्यांना तो कर्करोगाच आहे परंतु तुमच्याकडे १०-१२ वर्षे तरी आहेत एवढे अनुभवाने सांगितले. ८० वर्षाच्या स्त्रीला हा फार मोठा दिलासा आहे. असा दिलासा संगणक देऊ शकेल असे पुढच्या २५ वर्षात तरी शक्य आहे असे वाटत नाही. तेंव्हा येणाऱ्या २५ वर्षात तरी कृत्रिम बुद्धिमत्ता मानवाला पर्याय होणार नाही. माझ्या सोनोग्राफी उपकरणात कृत्रिम बुद्धिमत्ता वापरली जाते उदाहरणार्थ बाळाच्या डोक्याची प्रतिमा घेतली तर त्याचा व्यास आणि परिमिती संगणक मोजून देतो. पण डोक्याचा आकार वेगळा असेल तर संगणक गोंधळतो. हे मी अहंभाव दुखावला गेला आहे म्हणून लिहितो आहे असे नसून वस्तुस्थिती आहे. साधा संगणकीय ई सी जी घ्या, जो गेली २० वर्षे तरी प्रचलित आहे त्यावर संगणक आपला अहवाल (रिपोर्ट) देतो. हा कृत्रिम बुद्धिमत्तेचाच एक अवतार आहे. त्या अहवालाबद्दल हृदयरोग तज्ज्ञ दुजोरा देत नाही तोवर त्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही. राहिली गोष्ट. जी गोष्ट बिनडोकपणे वारंवार करावी लागते अशा कमी कौशल्याच्या गोष्टी मध्ये संगणक पुढे येईल याबद्दल शंका नाही. पण एखाद्या स्त्रीला तू सुंदर दिसतेस हे संगणकाने सांगितले तर तिला त्याचे समाधान होईल का? बाकी चालू द्याच
बायकोचं समाधान होतं. याने कितीही गुगल वाचून संप्रेरकांच्या उलथापालथीने होते असे सांगून तिला काही फरक पडत नाही तेंव्हा त्याला हतबल वाटतं. जाता जाता -- २०१० च्या ३६५ पट वेगाने काम करणारा संगणक अजूनही करोनाची १०० % गुणकारी लस निर्माण करू शकलेला नाही. असो