Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

५ राज्यांची विधानसभा निवडणुक - २०२१

श
श्रीगुरुजी
Tue, 03/09/2021 - 05:41
🗣 167 प्रतिसाद
केरळ, तामिळनाडू, पुदुच्चेरी, आसाम व बंगाल या ५ राज्यांची विधानसभा निवडणुक एप्रिल २०२१ मध्ये होत आहे. निकाल २ मे २०२१ या दिवशी जाहीर होतील. याच राज्यांच्या २०१६ मधील निवडणुकीनिमित्त काढलेला हा धागा. ५ राज्यांची विधानसभा निवडणुक - २०१६ या राज्यातील प्रमुख पक्षांची माहिती वरील धाग्यात सविस्तर दिली असल्याने पुनरावृत्ती करीत नाही. २०१६ च्या तुलनेत यावेळी वेगवेगळ्या पक्षांच्या आघाड्यांमध्ये काही बदल झालेत. २०१६ मध्ये भाजपबरोबर आघाडीत असलेल्या बोडोलँड पीपल्स फ्रंट पक्षाने आता कॉंग्रेसबरोबर घरोबा केलाय. तामिळनाडूतही नवीन आघाड्या होत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मागील ३० वर्षे प्रभाव असलेले जयललिता व करूणानिधी नसलेली ही पहिलीच निवडणुक आहे. आतापर्यंत आलेल्या वेगवेगळ्या मतपूर्व सर्वेक्षणांनुसार तामिळनाडूत यावेळी द्रमुक आघाडीला मोठे बहुमत मिळून करूणानिधींचे चिरंजीव स्टॅलिन मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मागील १० वर्षे सत्तेत असणाऱ्या अद्रमुकची सत्ता जाणार आहे. पुदुच्चेरी या अत्यंत लहान असलेल्या केंद्रशासित प्रदेशातही सत्तांतर होण्याची शक्यता असून कॉंग्रेस ऐवजी भाजप आघाडीत असलेले सरकार सत्तेत येण्याची शक्यता आहे. केरळमध्ये मागील अनेक दशकांची परंपरा खंडीत होऊन विद्यमान डाव्या आघाडीचे सरकार पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता आहे. बंगालमध्ये अत्यंत चुरशीची लढत असून विद्यमान तृणमूल कॉंग्रेस सरकार सत्ता टिकविण्याची शक्यता आहे. परंतु तृणमूलला किमान ५७ जागा गमावून १५७ जागा व भाजपला ३ वरून १००+ जागा मिळण्याची शक्यता आहे. या राज्यात डावे पक्ष व कॉंग्रेसची वाट लागण्याची शक्यता आहे. आसाममध्ये विद्यमान भाजप आघाडीचे सरकार काही जागा गमावून १२६ पैकी ६७ जागा मिळवून सत्ता टिकविण्याची शक्यता आहे. एकंदरीत भाजप बऱ्यापैकी फायद्यात दिसतो. कॉंग्रेसला तामिळनाडू वगळता कोठेही भवितव्य दिसत नाही. ममता सलग तिसऱ्यांदा निवडणुक जिंकून राष्ट्रीय स्तरावर मोदींना पर्याय म्हणून प्रथम क्रमांकावर पोहोचेल. हे काल प्रसिद्ध झालेल्या सी-व्होटर मतपूर्व सर्वैक्षणाचे अंदाज - https://maharashtratimes.com/india-news/assembly-election-2021-west-bengal-bjp-mamata-banerjee-tamil-nadu-assam-kerala-and-puducherry/articleshow/81397589.cms तामिळनाडूत भाजपच्या अपेक्षांना मोठा फटका बसण्याची चिन्ह आहेत. तिथे यूपीएचे सरकार बनू शकते. दुसरीकडे पुदुच्चेरीत मात्र एनडीएचे सरकार सत्तेत येऊ शकते, असा अंदाज आहे. आसाममध्ये एनडीए पुन्हा सत्तेत येताना दिसते आहे. केरळमध्ये एलडीएफ पुन्हा सत्तेत येऊ शकते. आसाममध्ये भाजप १२६ पैक ६७ जागा जिंकेल आणि सत्ता कायम ठेवेल असा अंदाज आहे. तर पश्चिम बंगालमध्ये मोठी शक्ती लावणाऱ्या भाजपची कामगिरी दमदार असेल. पण सत्ता मिळण्याची शक्यता कमीच आहे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपची कामगिरी या निवडणुकीत दमदार असेल. गेल्या निवडणुकीत ३ जागा जिंकणारा भाजप या निवडणुकीत १०० हून अधिक जागा जिंकेल, असा अंदाज आहे. तर सत्ताधारी ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला ५७ जागांचे नुकसान होऊ शकते. ममता यांना गेल्या निवडणुकीत २११ जागा जिंकल्या होत्या. यावेळी ममतांच्या तृणमूल काँग्रेसला १५४ जागा मिळतील. तर काँग्रेस-डाव्या पक्षांच्या आघाडील ३३ जागा मिळतील, असा अंदाज आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण २९४ जागांसाठी निवडणूक होतेय. तामिळनाडूमध्ये AIADMK सोबत भाजपने युती केली आहे. पण इथे भाजपच्या अपेक्षांना मोठा झटक बसेल असा अंदाज आहे. राज्यातील विधानसभेच्या २३४ जागांपैकी यूपीए (डीएमके-काँग्रेस ) १५८ जागा जिंकेल. तर एआयएडीएमके- भाजप युतीला ६५ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर एमएनएमला ५, एएमएमकेला ३ आणि इतरांना ३ जागा मिळतील, असा अंदाज आहे. तामिळनाडूत डीएमकेचे प्रमुख एम.के. स्टॅलिन यांना मुख्यमंत्रीपदाची पहिली पंसती देण्यात आली आहे. तर कमल हसन, रजनीकांत आणि शशीकला यांना १० टक्के नागरिकांनीही मुख्यमंत्री म्हणून पसंती दिलेली नाही. आसाममध्ये एनडीएच्या जागा कमी होतील पण सत्ता राहणार आसाममध्ये भाजपसाठी चांगली बातमी आहे. राज्यात एनडीएची पुन्हा सत्ता येण्याची दाट शक्यता आहे. इथे एनडीएला १२६ पैकी ६७ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर यावेळी यूपीएची कामगिरी चांगली होईल आणि गेल्या वेळेच्या ३९ जागांवरून ५७ पर्यंत जागा वाढतील. तसंच इतरांना २ जागा मिळतील, असा अंदाज आहे. पुदुच्चेरीतील विधानसभेच्या ३० जागांपैकी एनडीए १६ ते २० जागा जिंकेल असा अंदाज आहे. तर यूपीएच्या खात्यात १३ जागा मिळतील असं बोललं जातंय. पुदुच्चेरीत ६ एप्रिलला मतदान होणार आहे. सर्वेक्षणानुसार केरळमधील १४० जागांवर डाव्या पक्षांचे नेतृत्व असलेल्या सत्ताधारी एलडीएफला ८२ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसप्रणित यूडीएफला ५६ जागा जिंकेल असा अंदाज आहे. या सर्वेक्षणात मुख्यमंत्री पी. विजयन हे जनतेची पहिली पसंत आहेत. तर केरळमध्ये भाजपला झटका बसण्याची शक्यता आहे. राज्यात भाजपला फार फार तर १ जागा मिळेल, असा अंदाज आहे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 52972 views

🗣 चर्चा (167)
आ
आनन्दा Sun, 03/14/2021 - 05:48 नवीन
माझ्यामते शिवसेना + राष्ट्रवादी असे सरकार स्थापन करायचा प्लॅन होता, त्यासाठी भाजपला 100च्या आत ठेवणे आवश्यक होते.. त्याच्या डावपेचांमध्ये युती करणे हा एक डावपेच, आणि भाजपचे उमेदवार पडणे हा दुसरा डावपेच होता. अर्थात भाजपला याची कल्पना होती, त्यामुळे वेळेवर राणे वगैरे उमेदवार उभे करून आणि अंतर्गत राजकारण करून सेनेचे पण साधारण 10 उमेदवार भाजपने पडले असावेत. युती हिते तेव्हा बंडखोरी होतेच आणि साधारण 20 अपक्ष निवडून येतात. हे वीस अपक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मिळून जात 120+ होऊ शकले असते तर काँग्रेसला सोबत घ्यायची गरज नव्हती. पण परळी वगैरे काही महत्त्वाचे मतदारसंघ सोडल्यास जिथे भाजपचे उमेदवार पडले तिथे फायदा अपक्षांचा ना होता काँग्रेसचा झाला असावा, त्यामुळे ही गणिते चुकली. मग काँग्रेसला बरोबर घ्यावे लागले , त्यामुळे बरीच मोठी नाटके करून शेवटी तिघाडी दाखवावी लागली.. असे माझे मत. बाकी शाम भागवत म्हणतात त्याप्रमाणे, काही फॅक्टर्स बदलत आहेत, त्यामुळे यावेळेस निवडणूक झाली तर सेनाची अवस्था मनसेप्रमाणे होऊन भाजप वि आघाडी असे समीकरण व्हायची शक्यता आहे. बाकी, भाजपचे नेतृत्व 5 वर्षांचा नाही, तर 25 वर्षे पुढचा विचार करून डावपेच आखत असते, सध्या तरी, त्यामुळे 2024 मध्ये सुद्धा भाजप येईलच महाराष्ट्रात, असे मी छातीठोकपणे सांगणार नाही, पण 2024 मध्ये शिवसेना संपलेली असेल हे मात्र नक्की सांगू शकतो. याशिवाय, भाजप अनेक चुका करत आहेच, आमच्या भागात स्थानिक उमेदवरबद्दल प्रचंड असंतोष असताना पण त्यालाच उमेदवारी दिली, परिणाम एकेकाळी जो भाजपचा बालेकिल्ला होता, त्यातुन शक्य असूनही भाजपची सीट 2014 ला अली नाही, कारण बऱ्याच लोकांनी उमेदवार पाडायला भाजपच्या विरोधात मतदान केले. 2019मध्ये युतीत ती सीट शिवसेनेकडे गेली, आता 2024 ला बघू.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 03/14/2021 - 06:23 नवीन
आमच्या भागात स्थानिक उमेदवरबद्दल प्रचंड असंतोष असताना पण त्यालाच उमेदवारी दिली, परिणाम एकेकाळी जो भाजपचा बालेकिल्ला होता, त्यातुन शक्य असूनही भाजपची सीट 2014 ला अली नाही, कारण बऱ्याच लोकांनी उमेदवार पाडायला भाजपच्या विरोधात मतदान केले. ---‐----------- चला, निदान काही लोकं तरी, व्यक्तीपुजा आणि घराणेशाही, याला विरोध करत आहेत....
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 03/15/2021 - 07:32 नवीन
आनंदा, निवडणूक कशी होईल, कोण निवडून येतील हे काळ ठरवेलच.. पण याही सरकारणे, कुठल्या परिस्थिती मध्ये कुठली कामे केली हे ५ वर्षानंतर सांगितले नाही तर हे सुद्धा सरकार पडले पाहिजे.. जसे २०१४-२०१९ या काळात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार येताना केलेल्या घोषणा.. कुठे न्हेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा, ह्या जाहिराती पुढच्या निवडणुकीला सरळ समाज माध्यमातून डिलीट कराव्या लागल्या.. या घोषणातील खड्डे, नोकऱ्या आणि इतर गोष्टी मध्ये काहीच बदल झाला नाही.. निवडणुका विकास, कामे या मुद्द्यावर न होता काश्मीर आणि इतर मुद्द्यावर लढल्या गेल्या.. हे असेच कोणतेही सरकार करणार असेल तर ते पडले पाहिजेच.. यात मग ते bjp चे सरकार असो वा राष्ट्रवादी किंवा शिवसेनेचे.. दरवेळेस हिंदूचें bjp किंवा घराणेशाहि म्हणुन काँग्रेस किंवा इतर असल्या पोकळ टीमक्या वाजवून लोकांच्या हाती काहीच लागत नसते.. २०१४-२०१९ या काळात २.५ लाख करोड वरुन महाराष्ट्राचे कर्ज ५ लाख करोड झालेले तेंव्हा वाचले होते,मग हा खर्च नक्की कुठे, कसा आणि का झाला हे तरी पारदर्शक असावे.. किंवा सांगावे.. नंतर येणार्या सरकारने असला कर्ज बोजा घेऊन आणि कोविड परिस्तिथी असताना वर्षात काय केले असले प्रश्न विचारने मला योग्य वाटत नाही.. त्या पेक्षा ५ वर्षात काय केले हे घेऊन पुढे आले पाहिजे.. किंवा कर्ज कमी केले, कर्ज का लागले वगैरे सांगावे.. पण १ वर्षात काय केले, मागचे सरकार असे न आताचे असे.. असल्या वांझोट्या चर्चा काही कामाच्या नसतात असे मला वाटते..
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 03/14/2021 - 14:30 नवीन
https://maharashtratimes.com/india-news/west-bengal-election-bjp-released-list-of-candidates-minister-babul-supriyo-and-mps-will-fight-election/articleshow/81495597.cms
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 03/15/2021 - 08:14 नवीन
सर्वात पहिले कारण सांगता येईल कोणतेच प्रश्न न सोडवता ते भिजत ठेवणे. आणि त्याच प्रश्नांचे कित्येक वर्ष राजकारण करणे. ही वाईट खोड काँग्रेस ला होती. इंदिरा जी सारख्या धडाडीच्या नेत्या गेल्यानंतर काँग्रेस मध्ये निर्णय घेवून तो अमलात आणण्याची धमक असणारा नेता च नव्हता. त्या मुळे खूप प्रश्न सुटले च नाहीत. महाराष्ट्र विषयी बोलायचे झाले तर कृष्णा खोरे पाणीवाटप विषयी जो आदेश आयोगाने दिला होता त्या आदेशाकडे राज्यातील काँग्रेस सरकार नी गंभीर पने बघितलेच नाही. नेहमीच्या सवयप्रमाणे प्रश्न भिजत ठेवला. आणि जेव्हा महाराष्ट्र च्य हक्काच्या पाण्यावर अधिकार सुटण्याची स्थिती आली तेव्हा हे वेडे झाले. पण तेव्हाच सत्ता बदल होवून सेना bjp सत्तेवर आली. निर्णय घेण्याची प्रचंड क्षमता bjp मध्ये आहे. पण त्या निर्णयाचे काय काय परिणाम होवू शकतात ह्या विषयी ह्यांना काहीच समज नसते,अभ्यास नसतो. हाच bjp ची काळी बाजू आहे. पूर्ण विचार न करता निर्णय घेणे. आणि कृष्णा नदीचे पाणी अडवण्यासाठी प्रचंड कर्ज bjp सेना सरकार नी घेतले आणि हीच ती वेळ होती महाराष्ट्र वर कर्ज बाजारी होण्याची. निर्णय तर घेतला पण काम पूर्ण झाली नाहीत. मध्ये सर्व पैसे पाण्यात गेले. कालवे नाहीत त्या मुळे पाणी नाही फक्त धरण बघत बसा अशी वेळ आली. Bjp निर्णय घेण्यात सक्षम पक्ष आहे कशी होईल ते होईल ह्याची महत्वाची उदाहरणे काश्मीर मधील ३७० कलम,राज्याचे विभाजन, आणि हाच bjp च गुण लोकांना आवडला आणि ३०२ जागा bjp ni जिंकल्या. जशी काँग्रेस सत्तेनी माजली होती तशीच BJP pan आता सत्ता मिळाल्यामुळे माजली आहे. त्याचा परिणाम म्हणून सरकार बदल हा होणारच. अरेरावी ची भाषा सत्ताधारी बोलू लागले आहेत. काही वर्षा पूर्वी काँग्रेस ची भाषा पण अरेरावी चीच होती. लोकांनी त्यांना सत्तेमधून बाहेर केले
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Mon, 03/15/2021 - 18:19 नवीन
भाजपने बंगाल विधानसभा निवडणुकांसाठी काही उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यात लोकसभेचे तीन खासदार (त्यातील एक केंद्रीय मंत्री) आणि राज्यसभेचा एक खासदार उमेदवारांच्या यादीत आहे. असनसोलचे खासदार, गायक आणि केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो कलकत्ता शहरातील टॉलीगंज विधानसभा मतदारसंघातून, हुगळीच्या खासदार आणि बंगाली अभिनेत्री लॉकेट चॅटर्जी चुचुरा मतदारसंघातून, कूचबिहारचे खासदार निशिथ प्रामाणिक कूचबिहार जिल्ह्यातील दिनहाटा विधानसभा मतदारसंघातून तर राज्यसभा खासदार आणि पत्रकार स्वपन दासगुप्ता हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर विधानसभा मतदारसंघातून निवडणुक लढवणार आहेत. उमेदवारांच्या यादीत अर्थतज्ञ अशोक लाहिरी यांचे नाव अलिपूरद्वार विधानसभा मतदारसंघातून आहे. तर अनेक बंगाली तारे/तारकांचाही समावेश आहे. यश दासगुप्ता हुगळी जिल्ह्यातील चंडीटाला मतदारसंघातून, पायल सरकार कलकत्त्यातील पूर्व बेहाला मतदारसंघातून, तनुश्री चक्रवर्ती हावरा जिल्ह्यातील श्यामपूर मतदारसंघातून तर अंजना बसू दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील सोनारपूर दक्षिण मतदारसंघातून उमेदवार असणार आहेत.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Tue, 03/16/2021 - 07:30 नवीन
बंगालमध्ये उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी त्याविरोधात पक्ष कार्यालयासमोर घोषणाबाजी केली. बहुतेक अमित शहांना स्वतःला या प्रकरणात लक्ष घालून कार्यकर्त्यांमधील नाराजी दूर करावी लागेल. अन्यथा भाजपपुढे ती डोकेदुखी होऊ शकेल. केरळमध्ये उमेदवारी नाकारल्याच्या निषेधार्ध केरळ राज्य काँग्रेसच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा लतिका सुभाष यांनी डोक्याचे मुंडन केले आहे. त्या कोट्टायम जिल्ह्यातील एट्टूमन्नूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुक लढवणार आहेत.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Tue, 03/16/2021 - 07:37 नवीन
काँग्रेसने केरळ विधानसभा निवडणुकांसाठी ८६ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यातील महत्वाचे उमेदवार पुढीलप्रमाणे: १. माजी मुख्यमंत्री ओम्मेन चंडी: कोट्टायम जिल्ह्यात पुथुपल्ली २. केरळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते रमेश चेनिथल्ला: अलापुष्षा जिल्ह्यातील हरिपद ३. खासदार के.मुरलीधरनः तिरूवनंतपुरम जिल्ह्यातील नेमम. या मतदारसंघातून भाजपचे ज्येष्ठ नेते ओ.राजगोपाल २०१६ मध्ये जिंकले होते. ४. अभिनेता धर्मराजनः कोईकोड जिल्ह्यातील बालुसेरी
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 03/18/2021 - 09:11 नवीन
.... हत्या झालेल्या १३० भाजपा कार्यकर्त्यांच्या…”; शाह यांची ममतांच्या दुखापतीवरुन टीका..... https://www.loksatta.com/elections-news/mamata-banerjee-did-not-feel-the-pain-of-mothers-of-130-bjp-workers-who-were-killed-says-amit-shah-scsg-91-2421276/ कॉंग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष, जनतेच्या भल्यासाठी विचार करत नाहीत....
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 03/18/2021 - 13:48 नवीन
https://www.loksatta.com/desh-videsh-news/ramayan-ram-character-arun-govil-joins-bjp-in-delhi-ageah-of-5-state-elections-pmw-88-2423730/
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 03/18/2021 - 17:13 नवीन
मुळात सोनिया जी ह्यांचा जन्म कुठे झाला हा प्रश्न कपटी लोकांच्या मनातच येईल त्या भारताच्या प्रथांमंत्री असलेल्या व्यक्तीच्या सून बाई आणि सौभाग्य वती आहेत.. त्यांनी भारतीय संस्कृती आत्मसात केलेली आहे. जन्माचे ठिकाण आणि देश निष्ठा ह्याचा काडी चा संबंध नाही. ह्या देशाशी गद्धारी करणारे सर्वात जास्त लोक जन्मानी भारतीय च होती.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 03/19/2021 - 02:08 नवीन
छान छान
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 03/19/2021 - 07:06 नवीन
@राजेश १८८ हा विनोद छान होता असे अजून येऊ द्या
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 03/19/2021 - 07:45 नवीन
मला पण असेच वाटते
  • Log in or register to post comments
ब
बापूसाहेब Fri, 03/19/2021 - 08:06 नवीन
सचीन पोटे असेच काहीतरी नाव असणारे सद्गृहस्थ मिपावर होते.. त्यांची आठवण आली.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 03/19/2021 - 11:19 नवीन
त्यांच्या इतके अवतार, कुणीही घेऊ शकलेले नाही...
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 03/19/2021 - 08:35 नवीन
तुम्ही न लिहता प्रतिसाद ची जागा मोकळी ठेवली तर सर्व मिपकरांना तुम्ही काय लिहल आहे ते वाचायला येते. तुमचा महिमा च महान आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 03/19/2021 - 11:18 नवीन
आपले प्रतिसाद छान असतात तुम्ही लिहीत रहा ...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 03/19/2021 - 14:38 नवीन
“नागपुरात जन्मलेली संघटना आख्ख्या देशाला नियंत्रित करू पाहतेय”, राहुल गांधींची परखड टीका! https://www.loksatta.com/desh-videsh-news/congress-rahul-gandhi-slams-narendra-modi-bjp-rss-in-assam-election-rally-pmw-88-2424654/ जिन के घर शीशे के होते हैं, वो दुसरों के घर पर पत्थर नहीं फेका करते. गेली काही दशके, सत्ता एकाच घराण्यातील लोकांच्या हातात हातात असूनही, हे असे काय बोलू शकतात? "गरिबी हटाव", ही घोषणा तर लहानपणा पासून ऐकत आहे...
  • Log in or register to post comments
ब
बापूसाहेब Fri, 03/19/2021 - 14:56 नवीन
“नागपुरात जन्मलेली संघटना आख्ख्या देशाला नियंत्रित करू पाहतेय”, राहुल गांधींची परखड टीका! नागपूर भारतातच आहे आणि तिथे भारतीय लोकच राहतात.. त्यांनी देश नियंत्रणात नाही ठेवायचा तर मग इटली वरून नियंत्रणात ठेवायचा का?? आणि एका इंग्रजाने तयार केलेल्या संघटनेने स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर देखील आख्या देशाला नियंत्रित केले त्याचे काय??
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 03/19/2021 - 15:17 नवीन
व्यक्ती तितक्या प्रकृती....
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 03/19/2021 - 16:10 नवीन
किती छान....बहिणीने, चहाच्या मळ्यात काम केलेच आहे...असंच साधं आयुष्य पाहिजे... https://www.loksatta.com/desh-videsh-news/rahul-gandhi-food-with-tea-estate-workers-in-assam-dibrugarh-ahead-of-elections-pmw-88-2424784/ महात्मा गांधी आणि त्यांचे शेळीपालन आठवले...ते पण असेच साधे रहात होते...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 03/23/2021 - 06:04 नवीन
https://www.loksatta.com/desh-videsh-news/only-bjp-can-save-assam-shah-abn-97-2426665/ आसामच्या अस्मितेचे संरक्षण करण्याच्या गोष्टी काँग्रेस नेते राहुल गांधी करीत आहेत, मात्र एआययूडीएफचे प्रमुख बदरुद्दीन अजमल यांच्याशी आघाडी करून हे शक्य आहे का, असा सवाल शहा यांनी गांधी यांना केला. बदरुद्दीन अजमल आणि AIUDF, यांचा अभ्यास करायला हवा....
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 03/23/2021 - 06:28 नवीन
आसाम पुढे कोणते महत्वाचे प्रश्न आहेत आणि ते कसे सोडवले पाहिजेत. ह्या वर कोणताच राजकीय पक्ष बोलत नाही. बाजूच्या देशातून होणारी हा प्रश्न आहेच देशांतर्गत स्थलांतरित लोकांची वाढती संख्या हा पण प्रश्न आहे. त्या साठी आसाम मध्ये हिंसक आंदोलन झाली आहेत. स्थानिक लोकांचे हित कसे जपले जाईल ह्या विषयी कोणाकडे roadmap आहे का. अगदी अमित शह ह्यांच्या कडे पण नाही आणि काँग्रेस कडे पण नाही.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 03/23/2021 - 06:56 नवीन
काश्मीर आणि आसामच्या बाबतीत, "विवेकने" चांगली माहिती गोळा केलेली होती.... भाजप सत्तेत असतांना, दंगली जास्त होत नाहीत, हा निव्वळ योगायोग आहे...
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 03/23/2021 - 06:28 नवीन
आसाम पुढे कोणते महत्वाचे प्रश्न आहेत आणि ते कसे सोडवले पाहिजेत. ह्या वर कोणताच राजकीय पक्ष बोलत नाही. बाजूच्या देशातून होणारी हा प्रश्न आहेच देशांतर्गत स्थलांतरित लोकांची वाढती संख्या हा पण प्रश्न आहे. त्या साठी आसाम मध्ये हिंसक आंदोलन झाली आहेत. स्थानिक लोकांचे हित कसे जपले जाईल ह्या विषयी कोणाकडे roadmap आहे का. अगदी अमित शह ह्यांच्या कडे पण नाही आणि काँग्रेस कडे पण नाही.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 03/24/2021 - 08:41 नवीन
बंगाल विधानसभा निवडणुकीवर एबीपी-सीएनएक्स च्या नवीन सर्वेक्षणाचे अंदाज - मतांची टक्केवारी तृणमूल - ४२.०५ भाजप - ४३.६१ डावे + कॉंग्रेस - ६.७४ संभाव्य जागा तृणमूल - १३६ ते १४६ भाजप - १३० ते १४० डावे + कॉंग्रेस - १४ ते १८ https://news.abplive.com/news/india/abp-news-cnx-opinion-poll-2021-vote-share-predictions-wb-election-state-assembly-seat-wise-analysis-abp-west-bengal-1449806/amp
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 03/24/2021 - 08:45 नवीन
पण उतरणार आहे का? कारण, बंगाल मध्ये, 31% मुस्लिम मतदार आहेत, असे वाचलेले आठवत आहे...
  • Log in or register to post comments
र
रंगीला रतन Wed, 03/24/2021 - 09:03 नवीन
उतरली पाहिजे, मजा येईल. आधी मला ओवेसी राजू पेंटर सारखेच येडछाप वाटायचे पण ते दिवसेंदिवस बरेच यशस्वी होताना दिसत आहेत
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 03/24/2021 - 09:20 नवीन
https://www.google.com/amp/s/www.nationalheraldindia.com/amp/story/india%252Faimim-and-owaisi-cast-a-shadow-in-west-bengal-ahead-of-the-assembly-poll
  • Log in or register to post comments
र
रंगीला रतन Wed, 03/24/2021 - 09:54 नवीन
बरोबर. तृणमूल आणि काँग्रेसला मिळणारी मुस्लिम मते कमी करत काही जागा जिंकण्याची करामत ते करू शकतील. अमित शहा त्यांना रसद पुरवतील असा माझा अंदाज.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 03/28/2021 - 06:25 नवीन
काल आसाम विधानसभेसाठी व बंगाल विधानसभेसाठी पहिल्या फेरीचे मतदान झाले. आसाममध्ये ७७% मतदान झाले असून २०१६ च्या तुलनेत ५% कमी मतदान झाले आहे. बंगालमध्ये ७९.८% मतदान झाले आहे (२०१६ मध्ये ८०%).
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 04/07/2021 - 03:36 नवीन
आसाममध्ये तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात ७८.४९ टक्के मतदान झालं. तर पश्चिम बंगालमध्ये तिसऱ्या टप्प्यात संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ७७.६८ टक्के मतदान झालं. राज्यात मतदानाचे आणखी ५ टप्पे बाकी आहेत. दुसरीकडे केरळमध्ये संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ६९.९५ टक्के मतदान झालं. तामिळनाडूत ६३.४७ टक्के आणि पुदुच्चेरीत ७७.९० टक्के मतदान झालं. या तिन्ही विधानसभांसाठी एकाच टप्प्यात मतदान झालं.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Tue, 04/13/2021 - 15:53 नवीन
यावेळच्या विधानसभा निवडणुकांमध्ये, विशेषतः बंगालमधील विधानसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधान मोदी इतका प्रचार का करत आहेत हा एक आक्षेप घेतला जात आहे. दुसरा आक्षेप असे नाही म्हणता येणार पण बंगालमध्ये 'बाहेरचे' लोक नकोत असे ममता बॅनर्जी म्हणत आहेत. या दोन्ही मुद्द्यांविषयी इतिहासकाळात काय झाले होते याविषयी लिहितो आणि स्वतःला फार मोठे ढुढ्ढाचार्य समजणारे पुरोगामी विचारवंत त्यावेळी काय भूमिका घेत होते हे दुसर्‍या मुद्द्यासंदर्भात कळून येईल. १. उत्तर प्रदेशात १९६९ मध्ये मध्यावधी विधानसभा निवडणुक झाली आणि काँग्रेसचे चंद्रभानू गुप्ता आणि त्यानंतर भारतीय क्रांती दलाचे चौधरी चरणसिंग यांची काही महिने सरकारे बनली आणि पडली. १९६९ च्या राष्ट्रपती निवडणुकांनंतर काँग्रेसमध्ये फूट पडली आणि काही आमदारांचा गट काँग्रेस (ओ) मध्ये गेला. हा गट, चरणसिंगांचा भारतीय क्रांतीदल, जनसंघ, आणि स्वतंत्र पक्ष यांचे संयुक्त विधायक दल ही खिचडी बनली आणि त्या खिचडीचे नेते म्हणून काँग्रेस(ओ) चे त्रिभुवन नारायण सिंग ऑक्टोबर १९७० मध्ये मुख्यमंत्री बनले. ते मुख्यमंत्री बनले तेव्हा उत्तर प्रदेश विधानसभा किंवा विधानपरिषद यापैकी कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते. त्यामुळे त्यांनी जानेवारी १९७१ मध्ये गोरखपूर जिल्ह्यातील मनीराम विधानसभा पोटनिवडणुक लढवली. त्यापूर्वी कोणाही मुख्यमंत्र्याने विधानसभेच्या पोटनिवडणुकीत प्रचार केला नव्हता म्हणून स्वतः त्रिभुवन नारायण सिंग उमेदवार असूनही प्रचारात उतरले नाहीत. त्यांच्या प्रचारासाठी पक्षाच्या स्थानिक नेत्यांबरोबरच अटलबिहारी वाजपेयी, मोरारजी देसाई वगैरे नेते आले होते. इंदिरा गांधींना मात्र असल्या गोष्टींची पर्वा करायची गरज नव्हती. तसेच २७ डिसेंबर १९७० रोजी चौथी लोकसभा विसर्जित झाल्यामुळे लवकरच लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका होणार अशावेळी मनीराम पोटनिवडणुक आली होती. त्यामुळे या पोटनिवडणुकीतून उत्तर प्रदेशात आणि देशात वारे नक्की कुठे वाहात आहेत याचा अंदाज येणार होता. तसेच काँग्रेस (ओ) मध्ये गेलेल्या (की राहिलेल्या) सगळ्या नेत्यांना धडा शिकवायची एकही संधी सोडायची नाही असे इंदिरा गांधींनी ठरविले होते. त्यामुळे त्यांनी या पोटनिवडणुकीत रामकृष्ण द्विवेदी या काँग्रेस उमेदवाराचा प्रचार केला. तुम्ही पंतप्रधान असूनही एका विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा प्रचार का करत आहात असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर 'कोणतीही निवडणुक लहान नसते आणि प्रत्येक निवडणुकीत मोठे उलटफेर करायची ताकद असते' हे उत्तर इंदिरा गांधींनी दिले होते.या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री त्रिभुवन नारायण सिंग यांच्यापेक्षा काँग्रेसच्या रामकृष्ण द्विवेदींना दुप्पट मते मिळाली आणि मुख्यमंत्र्यांचा पराभव झाला. एकेकाळी देशाच्या पंतप्रधानांनी विधानसभेच्या पोटनिवडणुकीतही प्रचार केला होता हे विसरता कामा नये. २. मुळचे पुण्याचे समाजवादी नेते मधू लिमये बिहारमधील मुंगेर लोकसभा मतदारसंघातून निवडून जात. त्यांचा इंदिरा गांधींच्या गरीबी हटाओ लाटेत १९७१ मध्ये पराभव झाला. पण लगेचच १९७२ मध्ये बिहारमध्ये बांका लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुक लागली. तेव्हा संयुक्त सोशालिस्ट पक्षाचे मधू लिमये विरूध्द बिहारचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे दरोगाप्रसाद राय अशी लढत होती. त्यावेळी दरोगाप्रसाद राय यांनी मधू लिमयेंना 'बंबईय्या' आणि बिहारबाहेरचा उमेदवार असे म्हटले. संसोपाचे दुसरे नेते जॉर्ज फर्नांडिस (जे स्वतः सुध्दा मुळचे कर्नाटकचे होते) आपले मित्र आणि सहकारी मधू लिमयेंचा प्रचार करत होते. तेव्हा जॉर्ज फर्नांडिस प्रचारात म्हणाले की बरं झालं दरोगाप्रसाद राय गांधीजींच्या मोतीहारीच्या चंपारण सत्याग्रहाच्या वेळी सक्रीय नव्हते नाहीतर त्यांनी गांधीजींना पण 'हे मुळचे गुजरातचे नेते इथे बिहारमध्ये काय करत आहेत' असा प्रश्न विचारला असता. त्यानंतर दरोगाप्रसाद राय यांच्या या मुद्द्यातील हवाच निघून गेली आणि मधू लिमये आरामात जिंकले. त्यावेळी पुरोगामी विचारवंत कोणा 'बाहेरच्याच्या' बाजूने होते आणि कोणाच्या विरोधात आहेत हे वेगळे सांगायलाच हवे का? :)
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Tue, 04/13/2021 - 18:01 नवीन
धन्यवाद माहितीबद्दल! ************ माझ्या मते दोन्हीही मुद्दे नुसते तर्कशुन्यच नाही तर मूर्खपणाचे देखील आहेत. प्रादेशिक पक्ष, ज्यांना राष्ट्रीय नेतेच नसतात ते हे रडगाणे जास्त गात असतात. एका बाजूला तुम्ही कोणालाही आणा जिंकणार आम्हीच म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला हे रडगाणं गायचं. अरे जिंकणारच आहात तर रडता कशाला?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 04/26/2021 - 18:43 नवीन
बंगालमध्ये मतदानाची ७ वी फेरी आज पार पडली. आज ७५% हून अधिक मतदान झाले. शेवटच्या ८ व्या फेरीचे मतदान २९ एप्रिलला आहे. कोरोनामुळे ८ व्या फेरीचा प्रचार एक दिवस आधी म्हणजे आजच संपला. मतमोजणी रविवार २ मे या दिवशी आहे.
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे गुरुवार, 04/29/2021 - 15:46 नवीन
पाच राज्यांच्या निवडणुकीचे Exit-poll चे निष्कर्ष जाहीर होत आहेत. Exit poll मध्ये तरी भाजपा पुढे आहे.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 04/29/2021 - 15:56 नवीन
बंगालमध्ये एकच चाचणी भाजपला १३८ ते १४८ जागा देत आहे. बाकी चाचण्या तृणमूल १५०-१६० जागा घेऊन जिंकेल असे म्हणत आहे. बंगालमधील निकाल बघणे रोचक असेल. आसामात भाजप, केरळमध्ये डावे आणि तामिळनाडूमध्ये द्रमुक-काँग्रेस जिंकणार असे चाचण्या म्हणत आहेत. आसामात सरबानंद सोनोवाल परत मुख्यमंत्री व्हावेत अशी फारच इच्छा आहे. आणि हिमंत बिस्व सर्मांना केंद्रात नेले पाहिजे नाहीतर दुसर्‍या कारकिर्दीत या दोघांमध्ये महत्वाकांक्षेचा संघर्ष व्हायचा.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 04/29/2021 - 16:53 नवीन
तृणमूल कॉ. भाजपा काँग्रेस- डावे एबीपी १५२/१६४ १०९/ १२१। १४/२५ टाइम्स नाऊ। १५८ ११५ १९ मोमता दीदी पुढे राहतील, असे वाटत असले तरी बहुमत की काठावर पास निकाल आल्यावर समजेल. पण तृणमूल काँग्रेस १३० विधानसभा क्षेत्रातच मजबूत मानल्या जात होते. ही आघाडी किती वाढते, कमी होते ते पाहावे लागेल. भाजपा किती जागा मिळतील आणि ते सत्तेच्या जवळ पोहोचेल असे वाटत असेल तर, ते कोणत्याही परिस्थितीत तोड़फोड़ करुन सत्ता मिळवतील कारण निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 04/29/2021 - 18:58 नवीन
पण ममता जर सत्तेच्या जवळ पोहोचल्या, तरी सत्ता मिळवणे ही गोष्ट त्या प्रतिष्ठेची करणार नाहीत. त्यामुळे त्या तोडफोड करून सत्ता मिळवतील असे काही वाटत नाही. असं काही सुचवायचे आहे का? कृहघ्या. 😉
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 04/29/2021 - 19:22 नवीन
सर्व मतदानोत्तर सर्वेक्षणांच्या अंदाजानुसार - आसामात भाजप, तामिळनाडूत द्रमुक-कॉंग्रेस आघाडी, केरळात डावी आघाडी व पॉंडीचेरीत भाजपचा सहभाग असलेली राष्ट्रीय लोकशाही आघाडी सत्ता मिळविण्याची शक्यता आहे. बंगालात ३ संस्थांनी तृणमूलला सर्वाधिक जागांचा अंदाज दिलाय, तर ४ संस्थांनी भाजपला सर्वाधिक जागांचा अंदाज दिलाय. सर्व अंदाजात भाजपला १००+ जागा दिल्या आहेत.
  • Log in or register to post comments
V
Vichar Manus Sat, 05/01/2021 - 06:58 नवीन
गुरुजी जसे मोदींना पर्याय कोण असे विचारतात तसे त्यांनी फडणवीसांना महाराष्ट्रात भाजप मध्ये पर्याय कोण ते नाव सांगावे नुसतेच कोणीही चालेल असे म्हणू नये
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 05/01/2021 - 07:09 नवीन
मोदींना पर्याय कोण हा प्रश्न इतर पक्षांशी संबंधित आहे, भाजपशी नाही. कारण मोदींना भाजपत इतर पर्याय आहेत, परंतु सध्या इतर कोणताही पक्ष वा त्यांचा नेता मोदींना सध्या तरी पर्याय नाही. ज्याप्रमाणे दुसरी अधिक चांगली नोकरी मिळाल्याशिवाय पहिली सुरू असलेली नोकरी सोडत नाहीत, तसेच दुसरा अधिक चांगला पक्ष पर्याय म्हणून असल्याशिवाय सध्याच्या सत्ताधारी पक्षाला जनता बदलत नाही. बाकी फडणवीस नको असतील भाजपत दुसरा पर्याय कोण याचे उत्तर मी आधीच दिले आहे.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Sat, 05/01/2021 - 07:27 नवीन
उद्या चार राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेश यातील विधानसभा निवडणुकांची मतमोजणी होईल. त्याबरोबरच महाराष्ट्रातील पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठीही मतमोजणी होणार आहे. या चर्चेत आणि ताज्या घडामोडींच्या कोणत्याही धाग्यात या पोटनिवडणुकीविषयी विशेष काही लिहिले गेले नाही म्हणून त्याविषयी इथे लिहित आहे. ही पोटनिवडणुक राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचे कोरोनामुळे निधन झाल्याने होत आहे. राष्ट्रवादीने भारत भालकेंचे पुत्र भगीरथ यांना उमेदवारी दिली आहे तर भाजपने समाधान औताडे यांना उमेदवारी दिली आहे. समाधान औताडे यांनी २०१४ मध्ये शिवसेनेचे उमेदवार म्हणून जवळपास १८% तर २०१९ मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून २२% मते घेतली होती. तेव्हा समाधान औताडे यांचे पंढरपूर भागात थोडेफार बळ आहे असे दिसते. तसेच भारत भालके यांच्या कोरोनामुळे निधन झाल्यामुळे काही प्रमाणात त्यांच्या पुत्राला सहानुभूतीमुळे मते मिळतीलच. तेव्हा या पोटनिवडणुकीचा निकाल काय लागेल याचा अंदाज लावता येणे सोपे नाही. निकाल काहीही लागला तरी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. मतदार आपण नक्की कोणत्या निवडणुकीसाठी मत देत आहोत याचे भान ठेऊन मत देत असतात. पोटनिवडणुकीत स्थानिक आमदार निवडायला मत देत असतात तर तेच उमेदवार त्याच विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री निवडायला मत देत असतात. २०१७ मध्ये दिल्लीतील राजौरी गार्डन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीत आआपच्या उमेदवाराचा धुव्वा उडाला होता. पण त्याच राजौरी गार्डनमध्ये २०२० च्या विधानसभा निवडणुकीत आआपच्या उमेदवाराने आरामात विजय मिळवला. २०१७-१८ मध्ये भाजपचा अनेक लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत पराभव झाला होता. सुरवात पंजाबमधील गुरदासपूरपासून झाली. त्यानंतर उत्तर प्रदेशात गोरखपूर, फूलपूर आणि कैराना या लोकसभा मतदारसंघात, राजस्थानात अजमेर आणि अल्वर लोकसभा मतदारसंघात, महाराष्ट्रात भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात तर कर्नाटकात बेल्लारी आणि मंड्या लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजप उमेदवारांचा पराभव झाला होता. तेव्हा २०१९ मध्ये नरेंद्र मोदींचा पराभव होणे ही निव्वळ औपचारिकता आहे असेच काहीसे वातावरण मिडियात उभे करण्यात आले होते. पण २०१९ मध्ये प्रत्यक्ष लोकसभा निवडणुक झाली तेव्हा यापैकी प्रत्येक (हो अगदी प्रत्येक) मतदारसंघात भाजप उमेदवारांनी आरामात विजय मिळवला. याचे कारण काय? तर स्थानिक पोटनिवडणुकांमधून राज्याचा मुख्यमंत्री/ देशाचा पंतप्रधान ठरत नसतो तर स्थानिक आमदार/खासदार ठरत असतो त्यामुळे मतदार स्थानिक आमदार/खासदार निवडून द्यायला मत देत असतात. त्याउलट विधानसभा/लोकसभा निवडणुकांमधून राज्याचा मुख्यमंत्री/देशाचा पंतप्रधान निवडला जात असतो. त्यामुळे तेच मतदार त्याप्रमाणे मत देतात. तेव्हा सांगायचा मुद्दा हा की पंढरपूरमध्ये समजा राष्ट्रवादीचा उमेदवार हरला तरी लगेच महाविकास आघाडी सरकारविरोधात लोकांचा कौल आहे असे म्हणता येईलच असे नाही. तसेच समजा राष्ट्रवादीचा उमेदवार जिंकला तरी तो कौल महाविकास आघाडी सरकारच्याच बाजूने आहे असे म्हणता येईल असे वाटत नाही. राष्ट्रवादीचा उमेदवार जिंकला तर सामनात मोठेमोठे दावे केले जातील ही गोष्ट वेगळी. हा पण जर निवडणुक पूर्ण एकतर्फी झाली आणि जर दुसर्‍या उमेदवाराचा पूर्णच पराभव झाला, दुसर्‍या उमेदवाराची अनामत रक्कम वगैरे जप्त झाली तर काही प्रमाणात असा दावा करता येईल.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 05/01/2021 - 10:40 नवीन
२०१९ मध्ये राष्ट्रवादी-कॉंग्रेस युतीच्या राष्ट्रवादीच्या भारत भेलकेंना ८९,७८७ मते तर भाजप-सेना युतीच्या भाजपच्या सुधाकर परिचारकांना ५९,९७६ मते मिळाली होती. मतांचा एकूण फरक अंदाजे ३०,००० मतांचा होता. सुधाकर परिचारक पूर्वी अनेक वर्षे कॉंग्रेस व राष्ट्रवादीत होते व काही वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यामुळे त्यांना मिळालेल्या मतांमध्ये काही स्वत:ची मते, काही भाजपची व काही शिवसेनेची मते होती. आता ते नसल्याने त्यांची स्वतःची मते कोठे जातील हे सांगता येणार नाही. शिवसेनेची बरीचशी मते भगीरथ भेलकेंना जातील. समाधान औताडेंना स्वतःची मते व भाजपची काही मते मिळतील. २०१९ च्या तुलनेत या पोटनिवडणुकीत किती टक्के मतदान झाले हे पाहिले नाही. परंतु २०१९ च्या निकालाची पुनरावृत्ती होण्याची बरीच शक्यता वाटते.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 05/01/2021 - 16:27 नवीन
दुर्दैवाने पोटनिवडणुकीसाठी सुद्धा भाजपने एखादा पक्षातील स्थानिक उमेदवार न निवडता एक आयाराम पक्षात आणून उमेदवारी दिली.
  • Log in or register to post comments
म
मोहन Sat, 05/01/2021 - 08:06 नवीन
कालच "जयपूर डायलॉग" या यू ट्यूब चानेल वर २ मे नंतर पश्चीम बंगालमधे काय होणार यावर चर्चा सुरू होती. त्यात विष्णू बिहारी या पत्रकाराने कुठलीही पार्टी निवडून आली तरीही प्रचंड प्रमाणात राजकिय हिंसाचार होईल असे भाकित केले आहे. त्यांच्या मते ममता सरकार स्थापन झाले तर भाजप व वामपंथीयांच्या हत्या मोठ्या प्रमाणात होतील. भाजप सरकार आल्यास भाजप व त्रिणमूल दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या फार मोठ्या प्रमाणात हत्या होतील. विष्णू बिहारी निवडणूक काळात बंगाल कव्हर करत होते व त्यांची बंगालच्या राजकिय परीस्थितीची जाण चांगली वाटली. भाजप - ममता च्या नादात ह्या गोष्टी कडे लक्ष गेले नव्हते. बंगाली लोक फारच भावनीक आहेत. मी ८०च्या दशकात कलकत्यात स्वतः फुट्बॉल सामन्यावरून बसेस जाळतांना पाहिल्या आहेत. ट्रामचे तिकीट १० पैशांनी वाढवले म्हणून ट्राम जाळलेल्या पाहिल्या आहेत. आणि हे सर्व कम्युनिस्ट सरकार असतांना. तेंव्हा आता इतक्या हाय व्होलटेज इलेक्षन नंतर कल्पनाच करवत नाही. देव बंगाली जनतेचे रक्षण करो.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 05/01/2021 - 11:08 नवीन
प्रतिसाद खूप उजवीकडे गेल्याने मुविंंना येथे प्रतिसाद देतोय. क्रिकेटचेच उदाहरण देतो, संघ निवडायचे काम कॅप्टन करत नाही संघ निवडायचे काम, समिती करते .. हे पूर्णांंशाने खरे नाही. अंतिम संघात कोणते खेळाडू खेळवायचे हे ठरविण्यात कर्णधाराचे मत सुद्धा महत्त्वाचे असते. २००७ मध्ये ट-२० विश्वचषक स्पर्धेसाठी धोनीला कर्णधार करण्याचा निर्णय घेतल्यानंतर धोनीने सचिन, गांगुली, द्रविड वगैरे तुलनेने वयस्कर खेळाडूंना संघात घेण्यास विरोध केला होता व निवड समितीने त्याचे म्हणणे ऐकले होते. त्यामुळे रोहीत शर्मा, युसुफ पठाण, जोगिंदर शर्मा, रूद्र प्रताप सिंंग अशा तरूण नव्या खेळाडूंना संधी मिळाली होती. फडणवीस केंद्रीय मंत्रीमंडळात, आज नाही तर उद्या, नक्कीच जाणार.... ते केंद्रात जाऊ देत किंवा एखादा राज्याचे राज्यपाल होऊ देत, ते कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात नको आणि त्यांच्याबरोबर त्यांचे शेपूटही पाठवा. आणि त्यांना अर्थमंत्री किंवा संरक्षण दल, ह्यापैकी एक खाते नक्कीच मिळेल... काही नेत्यांचा जळफळाट इथेच आहे... अर्थमंत्री नक्कीच नाही, संरक्षण मंत्री शक्य आहे. बघू या ते केंद्रात जाऊन काय दिवे लावतात कारण तेथे जाऊन कोणाची चाटुगिरी करणार? बरं, यामुळे कोणत्या नेत्यांचा जळफळाट होतोय ते सांगा. काही नेत्यांना फडणवीस मुख्यमंत्री पदावर नको आहेत आणि त्यासाठी फडणवीस हे सत्तेसाठी कसे हपापलेले आहेत, हे चित्र रंगवण्यात आले आहे.... फडणवीस सत्तेसाठी किती हपापलेले होते हे वेगळे चित्र रंगविण्याची आवश्यकता नाही, कारण त्यांची सत्तेसाठीची वखवख, त्यासाठी केलेल्या असंख्य तडजोडी, लाळघोटेपणा व जनतेचा आणि समर्थकांचा वेळोवेळी केलेला विश्वासघात हे ५ वर्षात अनेकदा दिसले आहे. तुरूंगात चक्की पिसायला पाठविणार असे जाहीर सांगून त्याच माणसाशी हातमिळवणी करणे, "नाही नाही नाही, भाजप राष्ट्रवादी बरोबर कधीही युती करणार नाही, एकदा नाही, त्रिवार नाही" असे काळी पाच स्वरात किंचाळून सांगूनही भल्या पहाटे राष्ट्रवादी बरोबरच युती करणे हे सत्तेसाठी अत्यंत हपापलेल्या व अत्यंत कासावीस झालेल्या व्यक्तीचेच उदाहरण आहे.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sat, 05/01/2021 - 12:07 नवीन
मला भ्रष्टाचार न करणारा मुमं पाहिजे. एखादे नाव असेल तर सांगा. हे नको ते नको याचा काय उपयोग? मोदी विरोधक फक्त मोदी नको एवढेच सांगत असतात. मोदींना पर्याय काय ते सांगत नाहीत. त्यामुळे परत मोदीच येतात. 🤣 तसेच निव्वळ पर्याय पुढे न आल्याने परत फडणवीसच मुमं व्हायचे. 😉 तर महत्वाचा मुद्दा म्हणजे फडणवीसांना पर्याय कोण? म्हणजे ज्यांना फडणवीस नकोसे झाले आहेत त्यांनी पर्याय द्यायला पाहिजे. 😜 फडणविसांना भरपूर शिव्या देत राहिल्याने मोदी फडणविसांना डच्चू देतील असं वाटत नाही. उलट जो जास्त शिव्या खातो तो चांगला असतो. कामं करत असताना, स्वत: खात नाही, दुसऱ्याला खाऊ देत नाही असंच मोदींना त्यांच्या स्वत:च्या उदाहरणावरून वाटायची शक्यता जास्त वाटते. 😂 थोडक्यात फडणविसांना स्वगृही तसेच मवीआ कडूनही जास्त शिव्या मिळाल्याने, मोदींना फडणवीसच जास्त लायक वाटायचे. 😉
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sat, 05/01/2021 - 12:17 नवीन
समजा, फडनवीसांना एकही पर्याय नाही, पण गुरुजींचे फडनवीसांबाबतचे म्हणणे खरे आहे/ फॅक्च्युअल आहे. तर, खालील पैकी काय निवडाल? १. फडनवीसांना पर्याय नसल्याने फडणवीसांच्या चुका दुर्लक्ष करायच्या. २. चुका दाखवायच्या, आणि त्यापुढे फडनवीसांना राज्याबाहेर पाठवावे का नाही विचार करावा. (चुका किती मोठ्या आहेत पाहावे) ३. कायका हुईना, कुणाचं काय जातंय ४. नवीन पर्याय शोधण्यासाठी जगा करन देणे. (माझा मुद्दा- श्री गुरुजींचे आक्षेप कितपत योग्य ह्यावर फोकस व्हावा, पर्याय आहे की नाही, शोधायचा का नाही हे पुढे आले.)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 16 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 16 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 16 hours ago
  • सुंदर !!
    1 day 17 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 17 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा