चालू घडामोडी - मार्च २०२१ (भाग ३)
आधीच्या भागात १५० पेक्षा जास्त प्रतिसाद झाले आहेत म्हणून नवा भाग काढत आहे. पूर्वीच्या भागातील एखाद्या प्रतिसादावर काही लिहायचे असल्यासच त्या भागात लिहावे अन्यथा या भागात लिहावे ही विनंती. इतके सगळे प्रतिसाद झाल्यानंतर नवे प्रतिसाद पुढच्या पानावर जाऊन वाचायला अडचण येते.
१३ सप्टेंबर २००८ रोजी दिल्लीत बाटला हाऊस चकमक झाली होती. त्यात पोलिसांनी इंडियन मुजाहिदीनच्या काही दहशतवाद्यांना ठार मारले. तिथे असलेले दोघे जण पळून जाण्यात यशस्वी झाले होते. त्यापैकी एक- आरिझ खानला २०१८ मध्ये पोलिसांनी अटक केली होती. या चकमकीत दिल्ली पोलिसांचे एक इन्स्पेक्टर मोहनचंद्र शर्मा मारले गेले होते. त्यांना ठार मारल्याबद्दल आरिझ खानला दिल्लीच्या एका न्यायालयाने दोषी ठरविले आहे.
https://www.hindustantimes.com/cities/delhi-news/in-batla-house-case-court-pronounces-ariz-khan-guilty-of-killing-delhi-police-inspector-mohan-sharma-101615193149179.html
याच बाटला हाऊस चकमकीचे फोटो बघून सोनिया गांधी ढसढसा रडल्या होत्या असे काँग्रेस नेते आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद फेब्रुवारी २०१२ मध्ये म्हणाले होते. https://www.ndtv.com/india-news/sonia-gandhi-cried-bitterly-after-seeing-batla-house-encounter-images-salman-khurshid-in-azamgarh-571479
त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या प्रकरणी सोनिया गांधींवर टिकेची झोड उठवली होती. https://www.indiatvnews.com/news/india/bal-thackeray-lambasts-sonia-gandhi-on-batla-house-encounter-issue-news-india-14271.html इथले आणि इतर ठिकाणचे शिवसेना समर्थक काही बोलायला लागले तर त्याला प्रत्युत्तर द्यायला म्हणून ही लिंक इथेच दिली आहे.
🗣 चर्चा
(158)
म
मुक्त विहारि
Wed, 03/10/2021 - 06:30
नवीन
त्यामुळे, इंधन दरवाढ थांबणार आहे का? कामकाज बंद करायला, यांना निवडून दिले आहे का?
ओपेकनेच भाव कमी करायला आणि जास्त प्रमाणात उत्पादन करायला नकार दिला आहे. मागणीपेक्षा, पुरवठा मुद्दामच कमी केला आहे.
- Log in or register to post comments
प
पिनाक
Wed, 03/10/2021 - 06:59
नवीन
बरं महाराष्ट्राला किती रुपये मिळतात त्यातले? 27 रुपये. सेंटर जे collect करते त्यातले पैसे पण महाराष्ट्राला परत येतात. पण ना फावडा ते सांगणार, ना प्रोफेसर!
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Wed, 03/10/2021 - 07:05
नवीन
केंद्राने अजुन महाराष्ट्र चे दिलेले नाहीत.तेवढं तुमची ओळख वापरून महाराष्ट्र ला मिळवून ध्या.
- Log in or register to post comments
प
पिनाक
Wed, 03/10/2021 - 07:07
नवीन
वर्ष संपलेलं नाही अजून. वाट बघा. 4 महिने आहेत अजून.
- Log in or register to post comments
स
सॅगी
Wed, 03/10/2021 - 08:23
नवीन
त्यापेक्षा केंद्राच्या नावाने मिडियामधुन बोंबा मारण्यापेक्षा योग्य त्या मार्गाने घ्यावा की पैसा केंद्राकडून..
चोरलेली सत्ता मिळालीच आहे तर एवढी तरी कामे करा म्हणावं.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Wed, 03/10/2021 - 07:02
नवीन
पेट्रोल भाव वाढीची वेगळीच कारण सांगत होते.
सैन्यावर कसा खर्च करावा लागतो,नवीन infrastructure कसे चीन च्या सीमेवर निर्माण केले.
देश हितासाठी पेट्रोल वाढ केलेली आहे देश हितासाठी आम्ही ती सोसू.
आता ही मध्येच ओपेक कुठून आली.
कमीत कमी सहा महिने तरी एकच मत ठेवा.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Wed, 03/10/2021 - 07:02
नवीन
पेट्रोल भाव वाढीची वेगळीच कारण सांगत होते.
सैन्यावर कसा खर्च करावा लागतो,नवीन infrastructure कसे चीन च्या सीमेवर निर्माण केले.
देश हितासाठी पेट्रोल वाढ केलेली आहे देश हितासाठी आम्ही ती सोसू.
आता ही मध्येच ओपेक कुठून आली.
कमीत कमी सहा महिने तरी एकच मत ठेवा.
- Log in or register to post comments
प
पिनाक
Wed, 03/10/2021 - 07:06
नवीन
दोन दोन वेळा रिस्पॉन्स येतोय. दोन दोन वेळा ट्रोल व्हायचं नसेल तर अंबानींना शिव्या देण्यापेक्षा जिओ वापरा.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 03/10/2021 - 12:39
नवीन
ह्या प्रश्र्नाचे उत्तर, स्वतः शोधा...
- Log in or register to post comments
आ
आग्या१९९०
Wed, 03/10/2021 - 08:08
नवीन
मग केंद्र तर इंधनदर कमी होऊ शकतात असे का म्हणतय?राज्यांना विनवणी का करतंय? केंद्र इंधनावरील कर कमी करेल राज्यांनीही त्यांचे इंधनावरील कर कमी करावे व जनतेला दिलासा द्यावा असे काकुळतीला येऊन केंद्र आताच का विव्हळते? आंतरराष्ट्रीय इंधनदर आणि उत्पादन ह्यावर पुरवठादार देशांवर दबाव का आणत नाही? त्यांचे सगळे पैसे फेडले ना इंधनावर जास्त कर लावून ?
- Log in or register to post comments
र
राघव
Wed, 03/10/2021 - 15:44
नवीन
याचा काही विदा असल्यास द्यावा. माझ्या अभ्यासासाठी कामास पडेल. धन्यवाद.
- Log in or register to post comments
आ
आग्या१९९०
Wed, 03/10/2021 - 16:23
नवीन
अभ्यास करण्यासाठी अजिबात विदा मागू नका. शब्दशः अर्थ लावू नका. मागील सरकारने तेल उत्पादक कंपन्यांना कच्चे तेल शुद्ध करून विक्री करताना जो काही तोटा होत होता तो भरून काढण्यासाठी ऑईल बाँड काढले होते. ह्या सरकारच्या काळात त्याची मुदत संपत असल्याने सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर कर लावून ते पैसे फेडले, असा प्रचार इंधन दरवाढ समर्थक करत होते. खरे खोटे त्यांनाच माहीत. हे बाँड मुदतपूर्व विकत घेता येत नाही.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Wed, 03/10/2021 - 15:55
नवीन
स्वस्तात खनिज तेल द्यायला तयार होता इराण ते भारत अशी गॅस पाइप लाइन ची योजना सुद्धा तयार होती.
पण अमेरिकेच्या नादाला लागून इराण शी संबंध बिघडवले आता ओपेक देशांनी सुद्धा फटकारल आहे.
हीच कर्माची फळ असतात.
परराष्ट्र धोरण देशाचे हित बघून ठरवायची असतात कोणत्या तरी श्रीमंत देशाच्या नादाला लागून ठरवायची नसतात
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 03/10/2021 - 16:00
नवीन
हे आपल्याला ठाऊक असेलच...
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 03/10/2021 - 15:56
नवीन
मआंतरराष्ट्रीय इंधनदर आणि उत्पादन ह्यावर पुरवठादार देशांवर दबाव का आणत नाही?
दोन पुस्तके जरूर वाचा, खालील क्रमानेच वाचा
1, हा तेल नावाचा इतिहास आहे
2, एका तेलियाने
दोन्ही पुस्तके, गिरीश कुबेर, यांनी लिहिलेली आहेत...
कुठल्याही प्रकारचे, नकारात्मक विचार न करता वाचा, मनोरंजक इतिहास आहे...
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
Wed, 03/10/2021 - 07:21
नवीन
गढवालचे खासदार तिरथसिंग रावत हे उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री असतील. लवकरच ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.
त्रिवेंद्रसिंग रावत यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यसभा खासदार अनिल बलुनी, गढवालमधील श्रीनगरचे खासदार धनसिंग रावत आणि त्रिवेंद्रसिंग रावत यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री (आणि १९९६-९७ मध्ये केंद्रातील देवेगौडा-गुजराल सरकारमधील मंत्री) सत्पालसिंग रावत उर्फ सत्पाल महाराज यांची नावे आघाडीवर होती. पण मोदी-शहांनी गुजरातमध्ये आघाडीवर असलेल्या नितीन पटेल यांच्याऐवजी विजय रूपाणी हा त्यामानाने अनपेक्षित चेहरा मुख्यमंत्रीपदासाठी पुढे आणला तसेच उत्तराखंडमध्येही होताना दिसत आहे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 03/10/2021 - 07:50
नवीन
नोव्हेंबर २००० ते फेब्रुवारी २००२ या १५ महिन्यांच्या काळात भाजपचे दोन मुख्यमंत्री होते. परंतु २००२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता. नंतर २००७-२०१२ या काळात भाजपचे ३ मुख्यमंत्री होते. परंतु २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री बदललाय व २०२२ मध्ये विधानसभा निवडणुक आहे.
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
Wed, 03/10/2021 - 10:03
नवीन
गढवालमधील श्रीनगरचे खासदार आमदार धनसिंग रावत अशी सुधारणा हवी.
तिरथसिंग रावत यांना सहा महिन्यात म्हणजे १० सप्टेंबरपर्यंत उत्तराखंड विधानसभेवर निवडून यावे लागेल. सध्या विधानसभेतील अलमोडा जिल्ह्यातील सल्ट ही जागा आमदार सुरेंद्रसिंग जीना यांचे कोविडमुळे निधन झाल्यामुळे रिकामी आहे. तिथे पोटनिवडणुक होईल तिथून रावत यांना लढता येईल. प्रश्न इतकाच की हा मतदारसंघ रावत यांच्या गढवाल लोकसभा मतदारसंघात न येता अलमोडा लोकसभा मतदारसंघात येतो त्यामुळे त्या अर्थी ते तिथे बाहेरचे उमेदवार असतील. नाहीतर गढवाल लोकसभा मतदारसंघातील एखाद्या विधानसभा मतदारसंघातून निवडून गेलेल्या आमदाराला राजीनामा द्यायला सांगून तिथून रावत विधानसभेची पोटनिवडणुक लढवतील आणि तो आमदार गढवाल लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणुक लढवेल असे काहीतरी गणित असेल.
- Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर
Wed, 03/10/2021 - 09:40
नवीन
सचिन वाझे ह्यांची बदली झाली आहे. मात्र विरोधकांना त्यांचे निलंबन हवे आहे.
ह्या 'एन्काउंटर स्पेशालिस्ट' अधिकार्यांच्या करोडोच्या मालमत्ता कशा असतात? ६०/७० लाखाच्या एस. यु.व्ही. गाड्या कशा काय घेउ शकतात?
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 03/10/2021 - 12:48
नवीन
https://www.loksatta.com/maharashtra-news/bjp-atul-bhatkhalkar-shivsena-aditya-thackeray-bajaj-company-midc-land-sgy-87-2417774/
काय बोलावं, ते सुचेना........
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 03/10/2021 - 12:54
नवीन
आणि काम बजाजचे
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 03/10/2021 - 12:53
नवीन
https://www.loksatta.com/maharashtra-news/maharashtra-assembly-budget-session-bjp-devendra-fadanvis-vidhansabha-rajendra-raut-sgy-87-2416113/?utm_source=Taboola_Recirculation&utm_medium=RC&utm_campaign=LS
शिवसेना आता काय Action घेणार?
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 03/10/2021 - 13:02
नवीन
https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/the-chief-minister-belongs-to-shiv-sena-and-no-provision-has-been-made-in-the-budget-for-marathi-says-shiv-sena-leader-diwakar-raote/articleshow/81419545.cms
घरचा आहेर.... घराणेशाहीची पुजा करणार्यांना, हे कधीच कळणार नाही....
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
Wed, 03/10/2021 - 13:16
नवीन
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या सरकारविरोधात काँग्रेसने आणलेला अविश्वास प्रस्ताव ३२ विरूध्द ५५ मतांनी फेटाळण्यात आला आहे. दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पक्षाच्या आमदारांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला पण पक्षादेश मोडल्यास आपली आमदारकी जाईल या भितीने सरकारच्या बाजूनेच मत दिले.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 03/10/2021 - 13:23
नवीन
माहिती बद्दल धन्यवाद
- Log in or register to post comments
V
Vichar Manus
Wed, 03/10/2021 - 14:08
नवीन
हरियाणातील खट्टर सरकार अतिशय वाईट कामगिरी करत आहे, ते पडले असते तर बरे झाले असते. काही दिवसांपूर्वी त्यांनी एक अतिशय वाईट कायदा केला आहे, कंपन्या मध्ये नोकरी संदर्भात, शेखर गुप्तांचा कार्यक्रम बघितला होता या संदर्भात
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 03/10/2021 - 14:18
नवीन
खट्टरांनी योग्य कायदा आणलाय.
स्थानिकांना खाजगी क्षेत्रात ७५% नोकऱ्या राखीव ठेवण्याचा कायदा महाराष्ट्रात सुद्धा हवा.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 03/10/2021 - 14:29
नवीन
पण,
ह्या कायद्याचा फायदा, गालगुंड घेतात...
बिहार, तामिळनाडू येथे हा अनुभव घेऊन झाला आहे...
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 03/10/2021 - 14:39
नवीन
कोणत्याही कायद्याचा काही जण गैरफायदा घेतातच. पण म्हणून कायदाच नको का? असा कायदा नसल्याने आजवर महाराष्ट्रात परप्रांतीयांचे लोंढे येत आहेत. कायदा केल्यास निदान काही प्रमाणात तरी पायबंद बसेल.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 03/10/2021 - 14:42
नवीन
स्व-उन्नतीला पर्याय नाही...
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 03/10/2021 - 17:28
नवीन
जोपर्यत परप्रांतीय कमी वेतनावर काम करण्यास तयार आहेत, तोपर्यंत कितीही स्वोन्नती करूनही फारसा फायदा नाही.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Wed, 03/10/2021 - 17:42
नवीन
कमी वेतनावर काम करण्याची स्थिती देशातून नष्ट केली पाहिजे.सर्व लोकांना पैसे कमविण्याची संधी देशभरात असलीच पाहिजे
आणि ती संधी फक्त शेती,दुग्ध व्यवसाय, कुकुट पालन,हीच क्षेत्र देवू शकतात..
आणि फक्त ह्याच कारण मुळे मुळे
मी काही गोष्टी ल विरोध करत आहे
१) शेती मध्ये कोणत्याच मोठ्या कंपन्यांची entry नको त्या मुळे परत स्थिती खराब होईल.
२)मोठे उद्योग पती ना लगाम लावा आणि रोजगाराचे विकेंद्रीकरण करा.
काही क्षेत्र ही उद्योगपती साठी कधीच ओपन नकोत.
ह्या साठी तर शेती विषयक कायद्यानं विरोध आहे.
- Log in or register to post comments
ब
बापूसाहेब
Wed, 03/10/2021 - 17:54
नवीन
कमी वेतनावर काम करण्याची स्थिती देशातून नष्ट केली पाहिजे.सर्व लोकांना पैसे कमविण्याची संधी देशभरात असलीच पाहिजे
आणि ती संधी फक्त शेती,दुग्ध व्यवसाय, कुकुट पालन,हीच क्षेत्र देवू शकतात..
आणि फक्त ह्याच कारण मुळे मुळे
मी काही गोष्टी ल विरोध करत आहे
माझ्या घरी दोन गायी आणि एक म्हैस आहे.. तिथे बेरोजगार लोकं कामाला ठेवयाचे म्हणले तर किती जण तयार होतील?? आणि मी त्यांना कितीसा पगार देऊ शकेल??
पण अमूल, कात्रज इथे लोकं लाईन लावून भरती होतील.
आणि तुम्ही कंपन्यांना विरोध कसा काय करता आहात??? म्हणजे कोणत्या तर्कावर?? कंपन्या म्हणजे वाईट असं जे काही डोक्यात आहे.ते चुकीचे आहे.
आणि सगळ्यांनीच कुक्कुट पालन, दुग्धव्यवसाय केला तर मग ते विकत कोण घेणार?? आणि नाही घेतले कि भाव पडणार.. आणि पुन्हा तुम्ही अनुदान, हमीभाव इ मागणार...
- Log in or register to post comments
स
सुक्या
Wed, 03/10/2021 - 18:50
नवीन
त्यांच्या द्रुष्टीने कारखानदार लोकांचे शोषण करतात. म्हणुन त्यांना लगाम घालावा. म्हणजे नक्की काय करावे हे त्यांना पण माहीत नाही. :-)
- Log in or register to post comments
प
पिनाक
Wed, 03/10/2021 - 19:03
नवीन
त्यांना काहीच माहिती नाही. एका मोठ्या कंपनीने बनवलेला मोबाईल वापरून असल्या फालतू गोष्टी लिहिता मात्र येतात त्यांना. सरकारी मोबाईल का वापरत नाहीत देव जाणे (सॉरी, चेअरमन माओ जाणे).
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Wed, 03/10/2021 - 19:18
नवीन
सामान्य लोक काय उद्योग करू शकतात.
१) शेती करू शकतात
२), दुग्ध उत्पादन घेवू शकतात.
३) मासे पालन करू शकतात.
४) रिक्षा ,टॅक्सी ,बस विकत घेवून त्या चालवू शकतात.
५) किराणा मालाचे दुकान चालवू शकतात.
६) भाजी आणि फळ विक्री करू शकतात.
७) विजेच्या मोटारी दुरुस्त करू शकतात.
७) रक्त चाचणी करणाऱ्या lab चालवू शकतात.
८)पिठाच्या चक्या चालवू शकतात.
ह्या आणि ह्या संबंधित कोणत्याच क्षेत्रात मोठ्या कंपन्यांना बिलकुल प्रवेश नाही ही क्षेत्र फक्त सामान्य लोकांसाठी च राखीव असतील.
बाकी शेती मालावर प्रक्रिया उद्योगात कंपन्या असाव्यात.
लोकांना नोकऱ्या देवून पाच ते सात हजारात नोकर बनवू नका त्यांना स्वतः उद्योग करू ध्या .
त्या साठी मोठ्या उद्योगपती ना काही क्षेत्र ही निषिद्ध च केली पाहिजेत.
हा दर्जा राखण्यासाठी कडक नियम बनवा त्याची अंमलबजावणी करा.
अमेरिकेत काय चालत ह्याच्या शी भारताला काही देणे घेणे nasave .
त्यांचे आणि आपले प्रश्न वेगळे आहेत.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Wed, 03/10/2021 - 19:30
नवीन
Hotel ची चैन जरी निर्माण करायची असेल तर फक्त five star ह्या श्रेणी मध्येच त्यांना व्यवसाय करता येईल.त्याच्या खालच्या श्रेणी मध्ये त्यांना व्यवसाय करता येणार नाही असे निर्बंध असेलच पाहिजेत.
पैसे आहेत म्हणून बाकी लोकांचे हक्क हिरावून घेता येणार नाहीत.
इतके साफ माझे मत आहे.
मला नाही वाटत हे समजण्यास अवघड आहे.
- Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत
Wed, 03/10/2021 - 20:10
नवीन
कोणी छोट्या हॉटेलची/ रेस्टॉरंटची चेन उभी केली (उदा. जोशी/ कामत) तर त्यांनी फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये गुंतवणूक करायला नको?
एखाद्याने छोटी कंपनी सुरु केली तर ती मोठी करायला नको?
- Log in or register to post comments
P
pspotdar
गुरुवार, 03/11/2021 - 18:05
नवीन
नमस्कार, पोल पोट साहेब,
पोल पोट हा एक क्रुर हुकूमशहा होता ज्याने कंबोडियामध्ये संपूर्ण कृषीप्रधान साम्यवाद अंगिकार करण्याचा घाट घातला होता.
अधिक माहिती करिता दुवा - https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2_%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%9F
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Fri, 03/12/2021 - 11:08
नवीन
आयला नाव भारी दिलात तुम्ही पोळ पोट साहेबाना.. आता यापुढे त्यांना याच नावाने संबोधण्यात यावे.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Wed, 03/10/2021 - 14:49
नवीन
महाराष्ट्रात असा कायदा करायला गेले की सर्व हिंदी चॅनेल वेडे होते मुर्खासारखे २४ तास महाराष्ट्र कसा देशाची एकता तोडत आहे अशी बोंब मारली जाते.
यूपी,बिहारी नेते बैचेन होतात आणि वेड्या सारखे महाराष्ट्र ला शिव्या शाप द्यायला सुरू करतात.
त्यांना भीती असते तिथले बेरोजगार त्यांच्या डोक्यावर बसतील.
पण देशात अनेक राज्यांनी असे कायदे केले तरी कोणाला काही फरक पडला नाही.
ह्याचा अर्थ सरळ आहे महाराष्ट्र वीणा देशातील युवा वर्गाला रोजगार देण्यास एकपण राज्य सक्षम नाही.
उत्तरेतील कमी शिक्षित लोकांना महाराष्ट्र शिवाय दुसरा कोणताच आधार नाही.
मग योगी,नितीश किती ही प्रगती च्या गप्पा मारत असले तरी.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 03/10/2021 - 15:08
नवीन
मग बघू...
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 03/10/2021 - 13:22
नवीन
https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/breach-of-privilege-motion-against-anil-deshmukh-and-ashok-chavan-by-devendra-fadanvis/articleshow/81427831.cms
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अन्वय नाईक प्रकरणात काल काही आरोप केले होते. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात स्वयंस्पष्ट अभिप्राय नोंदविले आहेत. त्यामुळे त्यांनी खोटे आरोप करून सुप्रीम कोर्टाचा सुद्धा अवमान केला आहे.....इति फडणवीस.....
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
Wed, 03/10/2021 - 13:43
नवीन
केरळमधील ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि थ्रिसुरचे माजी खासदार पी.सी.चाको यांनी पक्षातील गटबाजीला कंटाळून पक्ष सोडायचा निर्णय घेतला आहे. पक्ष सोडताना त्यांनी आरोप केला की केरळमधील काँग्रेस पक्ष हा काँग्रेस (ए) आणि काँग्रेस (आय) या दोन गटांमध्ये विभागलेला आहे. त्यांच्या मते काँग्रेस (ए) म्हणजे माजी मुख्यमंत्री ओम्मेन चंडी यांचा गट तर काँग्रेस (आय) हा केरळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते रमेश चेनिथ्थला यांचा गट आहे. अशा परिस्थितीत केरळमध्ये काँग्रेसला भवितव्य नाही असे म्हणत त्यांनी पक्ष सोडला आहे. विधानसभा निवडणुक तोंडावर आलेली असताना हा काँग्रेस पक्षाला लागलेला धक्का आहे असे म्हटले तरी चालेल.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 03/10/2021 - 13:46
नवीन
सुरूच राहणार....
एकाच घराण्यात सत्ता एकवटणे, लोकशाहीला अयोग्य आहे...
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 03/10/2021 - 14:16
नवीन
चाको मूळचे पवारांच्या समाजवादी कॉंग्रेसचे. १९८६ मध्ये पवारांबरोबर तेही स्वगृही परतले. परंतु नंतर १९९९ मध्ये पवारांबरोबर बाहेर पडले नव्हते.
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
Wed, 03/10/2021 - 15:12
नवीन
या गटातील मंडळींचा इतिहास रोचक आहे. पी.सी.चाकोंप्रमाणेच ए.के.अॅन्टनी, प्रियरंजन दासमुन्शी आणि अंबिका सोनी हे नेते पण काही काळ समाजवादी काँग्रेसमध्ये होते. मला वाटते वायलार रवी पण त्यात होते. तपासून बघायला हवे. हे सगळे नेते काँग्रेसमध्ये परत जाण्यासाठी १९८६ पर्यंत थांबले नाहीत. पण के.पी.उन्नीकृष्णन हे पवार काँग्रेसमध्ये परत गेल्यानंतरही उन्नीकृष्णन समाजवादी काँग्रेसमध्येच राहिले. पुढे ते वि.प्र.सिंगांच्या मंत्रीमंडळात मंत्री पण झाले. ते १९९६ मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये परत आले पण त्यात पराभूत झाल्यानंतर ते सक्रीय राजकारणातून निवृत्त झाले. यापैकी कोणीही १९९९ मध्ये पवारांबरोबर बाहेर पडून राष्ट्रवादीत गेले नाहीत.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 03/10/2021 - 15:24
नवीन
हे त्यांना माहिती होते
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Wed, 03/10/2021 - 15:44
नवीन
१९८९ पर्यंत bjp लोकसभेच्या ५ सीट पण कोणत्याच निवडणुकीत जिंकू शकली नाही.
.
३५० पेक्षा जास्त लोकसभेच्या जागा काँग्रेस नी किती तरी निवडणुकीत जिंकल्या आहेत.
लोकसभेच्या ४०२, जागा जिंकून राजीव गांधी नी जो रेकॉर्ड केला आहे तो अजुन अबाधित आहे आणि पुढे कोणी तोडेल ह्याची बिलकुल शास्वती नाही.
हा पण जरा इतिहास सांगावा.
आपल्याला फक्त आताच ३०० च्या वर जागा मिळाल्या आहेत तर जनता परेशान झाली आहे.
जमिनी वर च रहा म्हणजे पुढे यशाची आशा ठेवता येईल.
- Log in or register to post comments
ब
बापूसाहेब
Wed, 03/10/2021 - 16:21
नवीन
त्यावेळी मीडिया नव्हता. आजकाल कुठेही खट्ट झाले तरी आवाज पूर्ण जगभर होतो.. त्यावेळी नेमके सरकारमध्ये चाललंय काय हे सामान्य माणसाला समजत नव्हते.. लोकांना काहीबाही सांगून एकाच चिन्हावर शिक्का मारायला सांगितले जायचे..
आणि राहता राहिला 402 तर त्यावेळी सहानुभूतीच्या लाटेवर निवडून आलेले आहेत ते. त्यात त्यांचे कर्तृत्व काय?? गांधी आडनाव असल्यामुळेच साधा ग्रामपंचायत न जिंकलेला माणूस डायरेकट पंतप्रधान झाला.. ते त्यावेळी शक्य होते.. आज भारतातील जनता बऱ्यापैकी मॅच्युअर झालेली आहे. त्यामुळे आता ते होणं इतक्या सहजासहजी शक्य नाही.. किंबहुना अशक्यच आहे.
आणि हो... येणाऱ्या काही वर्ष्यात तुमचा हां 402 चा रेकॉर्ड देखील तुटेल..
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- ›
- »