Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - मार्च २०२१ (भाग ३)

च
चंद्रसूर्यकुमार
Mon, 03/08/2021 - 14:16
🗣 158 प्रतिसाद
आधीच्या भागात १५० पेक्षा जास्त प्रतिसाद झाले आहेत म्हणून नवा भाग काढत आहे. पूर्वीच्या भागातील एखाद्या प्रतिसादावर काही लिहायचे असल्यासच त्या भागात लिहावे अन्यथा या भागात लिहावे ही विनंती. इतके सगळे प्रतिसाद झाल्यानंतर नवे प्रतिसाद पुढच्या पानावर जाऊन वाचायला अडचण येते. १३ सप्टेंबर २००८ रोजी दिल्लीत बाटला हाऊस चकमक झाली होती. त्यात पोलिसांनी इंडियन मुजाहिदीनच्या काही दहशतवाद्यांना ठार मारले. तिथे असलेले दोघे जण पळून जाण्यात यशस्वी झाले होते. त्यापैकी एक- आरिझ खानला २०१८ मध्ये पोलिसांनी अटक केली होती. या चकमकीत दिल्ली पोलिसांचे एक इन्स्पेक्टर मोहनचंद्र शर्मा मारले गेले होते. त्यांना ठार मारल्याबद्दल आरिझ खानला दिल्लीच्या एका न्यायालयाने दोषी ठरविले आहे. https://www.hindustantimes.com/cities/delhi-news/in-batla-house-case-court-pronounces-ariz-khan-guilty-of-killing-delhi-police-inspector-mohan-sharma-101615193149179.html याच बाटला हाऊस चकमकीचे फोटो बघून सोनिया गांधी ढसढसा रडल्या होत्या असे काँग्रेस नेते आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद फेब्रुवारी २०१२ मध्ये म्हणाले होते. https://www.ndtv.com/india-news/sonia-gandhi-cried-bitterly-after-seeing-batla-house-encounter-images-salman-khurshid-in-azamgarh-571479 त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या प्रकरणी सोनिया गांधींवर टिकेची झोड उठवली होती. https://www.indiatvnews.com/news/india/bal-thackeray-lambasts-sonia-gandhi-on-batla-house-encounter-issue-news-india-14271.html इथले आणि इतर ठिकाणचे शिवसेना समर्थक काही बोलायला लागले तर त्याला प्रत्युत्तर द्यायला म्हणून ही लिंक इथेच दिली आहे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 44632 views

🗣 चर्चा (158)
R
Rajesh188 Tue, 03/09/2021 - 11:18 नवीन
फडणवीस परत तोंडावर पडून दात पाडून घेणार आहे.जसे सुशांत,अर्णव ह्यांच्या केस मध्ये ह्यांची पूर्ण इज्जत गेली अजुन सीबीआय काहीच सिद्ध करू शकली नाही. आता ह्या mansukh प्रकरणात अती शहनापणा bjp ला चांगलाच महागात पडणार पुढे. सिर्फ देखते रहो
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 03/09/2021 - 15:29 नवीन
संभाजी मालिकेत जसे दाखवले होते अण्णाजी पंत हा कारस्थान करून राजे कसे अडचणीत येतील ह्या साठी नेहमी प्रयत्न करत असतो. तशी same वृत्ती फडणवीस ह्यांची अनेक प्रकरणात दिसून येत आहे.राज्याच्या हितासाठी प्रयत्न करायचे सोडून फक्त सेना कशी अडचणीत येईल ह्या मध्येच फडणवीस ह्यांची सर्व बुध्दी लागलेली असते. लोक आता कंटाळली आहेत ह्यांच्या असल्या राजकारणाला. महाराष्ट्रात असले प्रकार ह्या अगोदर कधीच झाले नाहीत. जे राज्याच्या हिताचे तेच राजकारण इथे चालायचे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 03/09/2021 - 15:41 नवीन
साधूंच्या हत्याकांडाचे आणि फडणवीस यांचा काही संबंध आहे का? सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण केली, त्याचा आणि फडणवीस यांचा काही संबंध आहे का? हरामखोर हा शब्द उच्चारला त्याचा आणि फडणवीस यांचा काही संबंध आहे का? एका हिंदू माणसाला घरी बोलावून मारहाण केली, त्या घटनेचा आणि फडणवीस यांचा काही संबंध आहे का? करोनाचा वाढता प्रादुर्भाव पण, फडणवीस यांच्या मुळेच होत आहे का? बाकी चालू द्या....
  • Log in or register to post comments
प
पिनाक Tue, 03/09/2021 - 12:18 नवीन
आता लिंक लागते आहे. अंबानी च्या बंगल्याबाहेर स्फोटके वाझे आणि गावडे यांनीच ठेवली असणार. बहुधा खंडणी उकळण्यासाठी. दोघेही सध्या शिवसेनेत आहेत. दोघांवर हिरेन यांनीच दोन वर्षांपूर्वी 40 लाखाच्या खंडणीचा आरोप केला होता. चिवसेना मात्र अजूनही वाझेना अटक करायला परमिशन देत नाहीये.
  • Log in or register to post comments
प
पिनाक Tue, 03/09/2021 - 12:18 नवीन
https://youtu.be/2WQODUj4ABI
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 03/09/2021 - 14:00 नवीन
वाझेला वाचविण्याची पूर्ण तयारी दिसते. एकंदरीत या प्रकरणातूनही काही सत्य बाहेर येईल असे दिसत नाही.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Tue, 03/09/2021 - 12:36 नवीन
उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनी राजीनामा दिला आहे. २०१७ मध्ये भाजपने राज्यातील ७० पैकी ५७ जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला होता. तसेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यात तब्बल ६१.७% मते घेऊन राज्यातील पाचही लोकसभा जागा पक्षाने जिंकल्या होत्या. पण त्रिवेंद्रसिंग रावत यांच्याविरोधात पक्षाच्या आमदारांमध्ये नाराजी होती त्यामुळे अलीकडेच पक्षाने रमणसिंग आणि दुष्यंतकुमार गौतम या दोन नेत्यांना राज्यात पाठवून आमदारांची मते जाणून घेतली. त्यानंतर पक्षाने त्रिवेंद्रसिंग रावत यांना राजीनामा द्यायला सांगितले. उत्तराखंडमध्ये कोणत्याही पक्षाने दुसरी टर्म मिळवलेली नाही. तिथे २०२२ मध्ये विधानसभा निवडणुक आहे. सध्या काँग्रेसची पडझड होत असताना उत्तराखंडमध्ये विजय मिळून काँग्रेसला उर्जीतावस्था मिळायला हातभार लागू शकतो. तसे व्हायला नको आणि उत्तराखंड हे राज्य राखावे या उद्देशाने पक्षाने हा निर्णय घेतलेला दिसतो. आता पुढचा मुख्यमंत्री कोण होतो हे बघायचे.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Tue, 03/09/2021 - 15:30 नवीन
दिल्ली आणि जवळच्या भागातील तथाकथित शेतकरी आंदोलनावर ब्रिटनच्या संसदेत चर्चा करण्यात आली आहे. बर्‍याचदा ब्रिटनमधले खासदार आपल्या मतदारसंघात मतदारांमध्ये कोणाची संख्या बर्‍यापैकी आहे त्याप्रमाणे अशी भूमिका घेत असतात. तरीही काहीही झाले तरी असले खासदार चुकूनमाकून भारतात येत असतील तर त्यांना सुरवातीला यायला विरोध न करता विमानतळावरून हाकलून द्यावे. जर श्रीलंकेचे सरकार मानवाधिकाराचे डोस पाजायला येणार्‍या स्वीडनच्या परराष्ट्रमंत्र्याला असे विमानतळावरून हाकलून देऊ शकत असेल तर आपण त्या खासदारांबरोबर कडक वर्तन ठेवायला काहीच हरकत नसावी. तसेच त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवणार्‍या भारतातील स्वयंसेवी संस्थांवर कारवाई करण्यात यावी असे वाटते. हे गोरे लोक अजूनही आपल्या साम्राज्यावर सूर्य मावळत नाही अशा मानसिकतेत असतीलही पण तशी परिस्थिती नाही. त्यांना नाक घासत शरण यायला लावायला हवे.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 03/09/2021 - 15:42 नवीन
सरकार नी तुम्ही म्हणता तसे वागून दाखवावे अभिमान वाटेल त्यांचा. बघुया जमते आहे का हे काम आताच्या सरकार ला. भारताच्या अनेक गुन्हेगारांना सुद्धा ब्रिटन नी आश्रय दिला आहे. मल्ल्या ,निरव मोदी हे भारताचे मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार ब्रिटन मध्ये आरामात राहत आहेत आणि भारत सरकार काहीच करू शकले नाही. काय मजबुरी आहे त्यांची हे समजत नाही.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 03/09/2021 - 15:48 नवीन
हे पण सांगा .... आंतरराष्ट्रीय कायदे काय म्हणतात? हे पण सांगीतलेत तर उत्तम...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 03/09/2021 - 15:54 नवीन
https://www.loksatta.com/desh-videsh-news/west-bengal-chief-minister-mamata-banerjee-says-i-am-too-hindu-girl-sbi-84-2417202/ आधी कुणी, "जय श्रीराम" म्हटले की चिडत होती...भाजप मुळे एक चांगले झाले की, नेत्यांना आता, ते हिंदू आहेत, हे सांगावे लागत आहे....
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 03/09/2021 - 15:59 नवीन
श्री मोदी जी ना अमेरिकेने विसा देण्यास साफ नकार दिला होता किती तरी वेळा. त्या अपमान चा बदला पण सरकार नी घेतला पाहिजे. अमेरिकेच्या कोणत्याच मंत्र्याला किंवा अध्यक्षांना भारताने प्रवेश नाकारा ला पाहिजे. स्वाभिमान काय असतो की नाही.हे अवघड वाटत असेल तर एकाध्य लहान अमेरिकन सरकारी अधिकाऱ्याला तरी प्रवेश नाकारून बदला घ्यावा. तेवढेच समाधान भारत वासियांना मिळेल.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Tue, 03/09/2021 - 16:07 नवीन
घेतला की बदला, अगली बार... डायरेक्ट उडवून लावला अध्यक्षपदावरून. पुतीनही थक्क झाला.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 03/09/2021 - 16:24 नवीन
आणि अमेरिकेने व्हिसा दिलाच की ....
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 03/09/2021 - 16:54 नवीन
तर जॉर्ज फर्नांडिस हे संरक्षण मंत्री होते तेव्हा त्यांना कपडे काढून एअरपोर्ट वर अमेरिकेत चेक केले होते. मोदी ना अनेक वेळा अपमानित करून विसा नाकारला होता. अगदी praful patel, अब्दुल कलाम,मीरा शंकर आणि किती तरी लोकांना अमेरिकेत अपमान स्पद वागणूक दिली. तरी ते आमचा सन्मान च करतात असे वाटत असेल तर निर्लज्ज पणाच कळस झाला. काँग्रेस तर नालायक आहेच. पण आताचे bjp सरकार देश प्रेमी,आहे. समर्थ आहे. त्यांनी अमेरिकन संरक्षण मंत्री असलेल्या व्यक्तीला फक्त भारतात एअरपोर्ट चोकशी साठी दोन च प्रश्न विचारून दाखवावेत. तरच हे स्वाभिमानी ,देश प्रेमी,समर्थ सरकार आहे ह्याचा पुरावा मिळेल. की समर्थ लोकांपुढे लोटांगण आणि आणि गरीब वर दादागिरी हेच सूत्र आहे.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Wed, 03/10/2021 - 05:33 नवीन
त्यांनी अमेरिकन संरक्षण मंत्री असलेल्या व्यक्तीला फक्त भारतात एअरपोर्ट चोकशी साठी दोन च प्रश्न विचारून दाखवावेत.
हे एकदा आपण करावेच
  • Log in or register to post comments
ब
बापूसाहेब Wed, 03/10/2021 - 05:11 नवीन
श्री मोदी जी ना अमेरिकेने विसा देण्यास साफ नकार दिला होता किती तरी वेळा.
याला मोदी किंवा अमेरिका नव्हे तर त्यावेळेचे खांग्रेस सरकार जबाबदार होते..!! स्मरणशक्ती वाढवा..
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Tue, 03/09/2021 - 16:44 नवीन
प्रचाराचा व्हिसा दिला होता काय?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 03/09/2021 - 17:26 नवीन
मिपावरील नंबरी विचारवंतांसाठी - https://m.lokmat.com/photos/international/russia-woman-flight-was-trying-remove-her-clothes-cabin-crew-tied-her-rope-and-tape-a653/ विमानात गोंधळ करणारी अजून एक मोदीभक्त
  • Log in or register to post comments
प
पिनाक Tue, 03/09/2021 - 18:50 नवीन
एक बाळबोध शंका. स्वतःचेच कपडे काढणे हा गुन्हा कसा काय होऊ शकतो? माई चाहे ये करू माई चाहे वो करू मेरी मरझी.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 03/09/2021 - 19:11 नवीन
स्वतःच प्रयोग करा. उद्या ऑफिस मध्ये गेल्यावर सर्व कपडे अंगावरून काढून टाका आणि रोज जसे वावरता तसे ऑफिस मध्ये वावरा. आणि काय काय घडते आहे त्याची नोंद घ्या. पोलिस तुम्हाला तुम्ही कोणकोणत्या कलमाखाली गुन्हा केला आहे सांगतीलच. आणि एक शंका दूर होईल. तेथून सुटल्या नंतर जंगलात जा तिथे पूर्ण नागडे व्हा अगदी दिवसभर . काही ही घडणार नाही त्याची पण नोंद करून घ्या. दोन्ही ठिकाणी तुम्ही एक समान कृत्य केले होते ते म्हणजे पूर्ण कपडे काढले होते. पण त्याचा परिणाम दोन्ही ठिकाणी वेगळा होता. आता विचार करा कपडे काढणे हा गुन्हा जंगलात नव्हता पण ऑफिस मध्ये कपडे काढणे हा गंभीर गुन्हा होता. का का का विचार करत बसून रहा
  • Log in or register to post comments
स
सुक्या Tue, 03/09/2021 - 22:22 नवीन
पितळ उघडे पडते आहे हळु हळु ... https://www.lokmat.com/maharashtra/cm-uddhav-thackeray-admitted-no-proposal-sambhajinagar-a719/
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 03/10/2021 - 02:47 नवीन
सेनेचा ढोंगीपणा किंवा सेनेचे उसने अवसान याविषयी खूप उहापोह झाला आहे. परंतु आज फडणवीस, पाटील व इतर जे भाजप नेते तावातावाने हा विषय उचलून धरत आहेत ते सर्व नेते २०१४-२०१९ या काळात या विषयावर मूग गिळून का गप्प होते? केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असूनही त्या ५ वर्षात नामांतर का केले नाही? नेमकी आताच नामांतर करण्याची मागणी का? जर फडणवीस परत मुख्यमंत्री झाले असते तर भाजपच्या एकाही नेत्याने ही मागणी केली नसती याची मला १०१ टक्के खात्री आहे. आता ही मागणी करण्यामागे नामांतर हा उद्देश अजिबात नसून उद्धव ठाकरेंना अडचणीत आणणे हाच एकमेव उद्देश आहे.
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Wed, 03/10/2021 - 03:47 नवीन
तुमचा नेमका आक्षेप काय आहे?? भाजप ने ठाकरे सरकार अडचणीत येईल असे राजकारण करू नये? नामांतराचा मुद्दा हा सेनेचा पालिका निवडणुकीचा मुद्दा आहे, तो ते कायम वापरत आलेले आहेत. भाजप ने सेनेचा विरोधी पक्ष म्हणून तो राजकारणासाठी वापरू नये असे आपले म्हणणे आहे काय? भाजप ने जशास तसे राजकारण का करू नये असे आपल्याला वाटते? 'मंदिर वही बनाऐंगे, तारीख नाही बताऐंगे' अशी टीका करणाऱ्यांनी त्यांच्या काळात मंदिर बांधले होते का? भाजप ने अति आदर्शवादी असण्याची काहीही गरज नाहीये. जशास तसे आणि सध्य राजकारण ओळखून भाजप ने राजकारण करणे अपेक्षित आहे असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Wed, 03/10/2021 - 04:12 नवीन
फडणवीसांनी राजकारण करू नये, इतकीच त्यांची साधी अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Wed, 03/10/2021 - 07:07 नवीन
भाजप ने अति आदर्शवादी असण्याची काहीही गरज नाहीये. जशास तसे आणि सध्य राजकारण ओळखून भाजप ने राजकारण करणे अपेक्षित आहे असे मला वाटते.
सहमत. फडणवीसांचा विषय आला की गुरूजी इतर वेळी असलेला विश्लेषणाचा दृष्टीकोन गमावतात आणि काही कारणांमुळे फडणवीसांविषयी वाईट मत असले तर ते इतर संबंध नसलेल्या विषयांमध्येही घेऊन जातात हे निरीक्षण नोंदवून खाली बसतो.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 03/10/2021 - 07:22 नवीन
या विषयाशी फडणवीसांचा संबंध आहेच, म्हणून मी लिहिले. औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असे करावे असे मागील काही महिन्यांपासून फडणवीस, चंपा व काही भाजप नेते सांगत आहेत व त्यावरून ठाकरेंना धारेवर धरत आहेत. परंतु आपण ५ वर्षे हे नामांतर का केले नाही याविषयी ते बोलत नाहीत. हा निव्वळ ढोंगीपणा आहे. https://www.google.com/amp/s/www.tv9marathi.com/politics/chandrakant-patil-demand-aurangabad-name-change-to-sambhaji-nagar-188399.html/amp
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Wed, 03/10/2021 - 07:36 नवीन
औरंगाबादचे संभाजीनगर हे नामांतर करावे हा शिवसेनेच्या अजेंड्यावरील विषय होता. तो विषय भाजपच्या अजेंड्यावर असल्याचे ऐकिवात नाही. असल्यास ते दाखवून द्यावे ही विनंती. त्यामुळे फडणवीसांनी पाच वर्षात नामांतर का केले नाही हा प्रश्न गैरलागू आहे. मंदिर वही बनायेंगे लेकिन तारीख नही बतायेंगे किंवा ३७० चे काय झाले ही टीका काँग्रेसवाले अगदी मोदींवर पण पहिल्या टर्ममध्ये करत होतेच. मग २००४ ते २०१४ या काळात काँग्रेसची सत्ता असताना काँग्रेसवाल्यांनी राममंदिर का बांधले नाही किंवा ३७० का काढले नाही असा प्रश्न विचारला तर तो नक्कीच गैरलागू असेल. कारण मंदिर किंवा ३७० हे मुद्दे कधी काँग्रेसच्या अजेंड्यावर नव्हतेच तर ते भाजपच्या अजेंड्यावर होते. त्यामुळे आता सत्ता मिळाली आहे मग हे प्रश्न का सोडवत नाही हा प्रश्न काँग्रेस मोदींना विचारू शकत होती. त्याप्रमाणेच जर औरंगाबाद शहराचे नामांतर संभाजीनगर असे करावे हा मुद्दा फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्य भाजपच्या अजेंड्यावर कधी नसेलच तर तो प्रश्न त्यांना विचारणे गैरलागू आहे. महापालिका निवडणुकांमध्ये भाजपचा एखादा स्थानिक नेता काही म्हणाला असला तरी तो राज्य भाजपचा किंवा फडणवीस सरकारचा अजेंडा बनत नसतो. इतकेच नव्हे तर २०१८ मध्ये शिवसेनेने फडणवीसांना औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामांतर कधी करणार हा प्रश्न पण विचारला होता. https://www.republicworld.com/india-news/politics/shiv-sena-dares-maharashtra-cm-devendra-fadnavis-asks-when-he-plans-to-rename-aurangabad-and-osmanabad.html त्यामुळे आता सत्ता हातात आल्यानंतर तुम्ही याविषयी काय करत आहात हा प्रश्न फडणवीसांनी शिवसेनेला का विचारू नये?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 03/10/2021 - 08:12 नवीन
हा विषय जर भाजपच्या अजेंड्यावर नसेल तर आपल्या अजेंड्यावर नसलेल्या विषयाची भाजप वारंवार का मागणी करतोय? जर यावरून सेनेला डिवचणे हाच एकमेव उद्देश असेल तर भाजपला हे नाव बदलण्यात रस नाही एवढेच फक्त दिसून येते. कॉंग्रेसचा मुळातच श्रीराममंदीराला विरोध होता व न्यायालयात खटल्याचा निकाल लागल्याशिवाय भाजप याबाबत काहीही करू शकणार नाही हे ओळखून कॉंग्रेसने खटला लांबवून भाजपला डिवचणे सुरू ठेवले होते. शिवसेनेला डिवचणे एवढाच भाजपचा उद्देश असेल तर नाव बदलण्यास आपला विरोध आहे ही भूमिका भाजपने जाहीर करणे आवश्यक आहे. मुळात हे नाव बदलण्यास भाजपचा विरोध आहे का पाठिंबा आहे हे अजून स्पष्ट नाही. जर पाठिंबा असेल तर आपण ५ वर्षे का गप्प होतो हे भाजपने सांगावे. जर विरोध असेल तर नाव बदला अशी मागणी न करता नाव बदलण्यास विरोध करावा. नाव बदला अशी मागणी करीत राहणे, सत्ता असताना थंड बसून राहणे आणि हा आमच्या अजेंड्यावर नसलेला विषय आहे अशी मखलाशी करणे या पूर्ण परस्परविरोधी भूमिका आहेत.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Wed, 03/10/2021 - 08:23 नवीन
शिवसेनेला डिवचणे एवढाच भाजपचा उद्देश असेल तर नाव बदलण्यास आपला विरोध आहे ही भूमिका भाजपने जाहीर करणे आवश्यक आहे.
शिवसेनेला डिवचणे हा उद्देश आहेच आणि विरोधी पक्षात असल्याने भाजपने तसे करू नये ही अपेक्षा करणेही चुकीचे आहे. पण भाजप या विषयावर न्युट्रल राहू शकत नाही का? म्हणजे विषय अजेंड्यावर नसला तरी विरोधही नाही असे? भाजपची विचारसरणी लक्षात घेता या नामांतराला त्यांचा विरोध असायचे कारण नाही पण विरोध नसला म्हणजे अगत्याने तो विषय अजेंड्यावर असलाच पाहिजे असे थोडीच आहे? गुजरातमध्ये १९९५ पासून मधले दीड वर्ष सोडले तर कायम भाजपचे सरकार आहे. तरीही गुजरातमधील सगळ्यात मोठ्या शहराचे नाव अहमदाबाद हेच आहे. मुळातले कर्णावती हे नाव परत आणण्यात आलेले नाही. मग अहमदाबाद या नावाचे गुजरातीकरण अमदावाद असे अनेक ठिकाणी केलेले दिसते. कितीतरी दुकानांच्या पाट्यांवरही गुजरातीमध्ये अमदावाद असे लिहिलेले असते. तरीही शहराचे अधिकृत नाव अहमदाबाद हेच आहे. आजही शहराचे नाव कर्णावती असे करावे ही मागणी झाली तर त्याला भाजप विरोध करेल असे मानायचे कारण नाही पण तो विषय सध्या तरी पक्षाच्या आणि राज्य सरकारच्या अजेंड्यावर नाही. तसे औरंगाबादविषयी असू शकत नाही का? दुसरे म्हणजे वर दिलेल्या लिंकमध्ये कळेलच की २०१८ मध्ये नामांतर करा हे आव्हान शिवसेनेने फडणवीसांना दिले होते. त्यावेळी सत्तेत असूनही सतत सरकारविरोधात भूमिका घेऊन भाजपला डिवचण्यापेक्षा शिवसेनेने दुसरे काय केले होते? मग ते उट्टे भाजप काढणारच आणि काढायलाच पाहिजेत. आणि तेव्हा तुम्ही जर फडणवीसांना आव्हान देत होतात तर आता तुमच्याच हातात सत्ता आल्यावर तुम्ही त्याविषयी काय करत आहात हा प्रश्न का विचारायचा नाही? आणि १९८८ पासून शिवसेना अगत्याने त्या शहराच्या नावाचा उल्लेख संभाजीनगर असाच करत आहे इतका जिव्हाळ्याचा विषय तो आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 03/10/2021 - 08:30 नवीन
सारांश - नाव बदलण्यात शिवसेना व भाजप या दोघांनाही अजिबात रस नाही. फक्त एकमेकांना डिवचण्यासाठीच हा विषय वारंवार उकरला जातो.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 03/10/2021 - 07:07 नवीन
५ वर्षे केंद्रात, राज्यात व संभाजीनगरमध्ये सत्ता असूनही फडणवीसांनी नामांतर करण्याचा कणभरही प्रयत्न केला नाही, परंतु आता मात्र नामांतराची मागणी करीत आहेत या ढोंगीपणाला माझा आक्षेप आहे. भाजपने सेनेला जरूर अडचणीत आणावे, परंतु अशा ज्या मुद्द्यावर आपण तोंडावर पडतो ते मुद्दे टाळावे. योगी आदित्यनाथांनी तोंडातून निव्वळ फुसकी वाफ न सोडता अनेक शहरांचे नामांतर करून दाखविले. मग फडणवीसांना ते करण्यात काय समस्या होती? ५ वर्षे मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची खुशामत करण्यात व त्यांची प्रत्येक मागणी पूर्ण करण्यात वाया घालविलेल्या वेळातील काही वेळ नामांतरासाठी दिला असता तर नामांतर केव्हाच झाले असते. ५ वर्षे सत्ता असूनही स्वतः नामांतर का केले नाही हे आधी फडणवीसांनी सांगावे. तरच नामांतराची मागणी करण्याचा त्यांना हक्क मिळेल.
  • Log in or register to post comments
स
सुक्या Wed, 03/10/2021 - 07:17 नवीन
त्या सत्तेत आताची शिवसेना पण होती. पण त्यांनी कधीही सकारात्मक पाउले उचलली नाही. फक्त मुखपत्रात किंवा ट्वीटर वर संभाजीनगर लिहिले तर ते होउन जाते असे नाही. हे शिवसेनेला ही माहीत आहे. मुद्दे सोडवण्यापेक्षा ते आधांतरी ठेउन पोळी भाजुन घेणे ह्यात त्यांचा स्वार्थ आहे. बाकी नामांतराची मागणी शिवसेनेची आहे खुप जुनी. तेव्हा "करुन दाखवले" वगेरे वगेरे फुकाच्या गमजा मारण्यापेक्षा किमान ठोस काहीतरी करुन दाखवावे. गम्मत अशी आहे .. आता आघाडी मधील पक्षच ह्या नामांतरात कोलदांडा घालतील.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 03/10/2021 - 07:26 नवीन
या विषयासंबंधात सेना व भाजप हे दोघेही समान ढोंगी आहेत. नामांतर करा अशी विरोधात असताना सतत मागणी करायची आणि हातात नामांतराचे अधिकार आले की थंड बसायचे, असेच या दोन्ही पक्षांनी आजवर केले आहे. यांच्यापेक्षा कॉंग्रेस-राष्ट्रवादी बरे. सुरूवातीपासूनच त्यांचा नामांतरास विरोध आहे व या भूमिकेत सातत्य आहे.
  • Log in or register to post comments
स
सुक्या Wed, 03/10/2021 - 07:24 नवीन
सत्तेत असताना ५ वर्षे फडवणीसांच्या नाड्या पकडुन शिव्सेनेने नामांतर करुन घ्यायला हवे होते. तसेही राजीनामे खिशात घेउनच फिरत होते ते. मागे एका भाषनात "करु आम्ही .. संभाजीनगर .. एकदम करु. त्या अगोदर तुम्ही अहमदाबाद चे कर्णावती करुन दाखवा" वगेरे वगेरे फुकाच्या झोपडपट्टी टाळ्याकाढु वल्गना करायला काहीही अर्थ नव्हता ...
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 03/10/2021 - 07:29 नवीन
शिवसेनेने का करून घ्यायचे होते? फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना स्वतःच ते का केले नाही? स्वतः संधी व अधिकार असूनही केले नाही, मग आता का मागणी करता?
  • Log in or register to post comments
स
सुक्या Wed, 03/10/2021 - 07:35 नवीन
माझ्या माहीती प्रमाणे "संभाजीनगर आणी धाराशिव" ह्या शिवसेनेच्या मुळ मागण्या आहेत. भाजप त्यांना समर्थन देत होता. तसे नसल्यास चुभुदेघे.
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Wed, 03/10/2021 - 08:10 नवीन
नामांतराच्या मागणीची पार्श्वभूमी थोडी समजून घ्यावी लागेल. ही शिवसेनेची मागणी १९९० पासूनची आहे. मला जेवढे माहीत आहे किंवा आठवतेय त्याप्रमाणे शिवसेना भाजप सत्तेत आल्यानंतर त्यांनी हे नामांतर केलेदेखील. परंतु बहुदा सुप्रीम कोर्टाने त्या अध्यादेशाला स्टे दिला. कारण साधारणपणे असे असावे कि नाव चेंज करताना त्याच्या ऐतिहासिक संबंधाशी निगडित असावे, पॉप्युलर मागणीशी नाही. औरंगाबादचे नाव संभाजीनगरच का ठेवावे याकडे ते बोट असावे असे मला वाटते. नंतर सरकार बदलल्यावर बहुतेक आघाडीने तो अध्यादेश मागे घेतला. भाजपची ही ऍक्टिव्ह मागणी आधी कधी नव्हती, शिवाय यातील कायदेशीर इतिहास माहीत असल्यामुळे ते यापासून दूर राहिले असतील तर यात चूक काय? आताही तुमच्या बोलण्यावरून असे वाटतेय जणू काही भाजप ने हा मुद्दा उकरून काढलाय, पण तसे नाहीये. मनसे आणि सेनेच्या लोकल नेत्यांनी औरंगाबाद पालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांची ही मागणी पुढे रेटण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून मग भाजप ने करून दाखवाच ही राजकीय भूमिका घेतली. यातील भाजपची नरोवाकुंजरोवा चतुराई अशी असावी की दोन्ही बाजुंनी विजय आपलाच आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 03/10/2021 - 08:17 नवीन
म्हणून मग भाजप ने करून दाखवाच ही राजकीय भूमिका घेतली. यातील भाजपची नरोवाकुंजरोवा चतुराई अशी असावी की दोन्ही बाजुंनी विजय आपलाच आहे. भाजपची भूमिका नरो वा कुंजरो वा अशी आहे याविषयी सहमत. श्रीराममंदीर या विषयात कॉंग्रेसने अशीच डिवचणारी भूमिका घेऊन शेवटी कपाळमोक्ष करून घेतला. अशी भूमिका घेणाऱ्यांचा कोणत्याच बाजूने राजकीय विजय होत नाही.
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Wed, 03/10/2021 - 08:58 नवीन
अप्रस्तुत तुलना! संभाजीनगरचे नामांतर आणि राममंदिर हे अतिशय भिन्न उंची असणारे विषय आहेत. औरंगाबादचे नामांतर करून पाहिलेले असल्याने घेतलेली सोयीस्कर भूमिका म्हणजे रस नसणे हा अर्थ चुकीचा आहे. शिवसेनेच्या नामांतराच्या राजकारणाला दिलेले भूमीकात्मक उत्तर एवढाच हा विषय आहे.
  • Log in or register to post comments
प
पिनाक Wed, 03/10/2021 - 04:21 नवीन
तारांकित प्रश्न विचारला म्हणून खरं सांगावं लागलं. नाहीतर हा पोपट विधानसभेत पण बिनधास्त खोटं बोलतो. सतत केंद्राने केलं नाही, केंद्राने केलं नाही असं टूमण लावत होता. पुढच्या निवडणुकीत एक वेळ राष्ट्रवादी आली तरी चालेल, पण हा नको. आणि बिजेपी आलीच तर नारायण राणेला मुख्यमंत्री करावं. तो ह्याची संपत्ती खणून बाहेर काढेल.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 03/10/2021 - 04:51 नवीन
राज्य प्रगती पथावर जावे म्हणून लोक योग्य सरकार निवडून देतात. पक्षांचे स्वतःचे हेवेदावे सोडवण्यासाठी निवडून देत नाहीत. आणि विरोधी पक्षात असणाऱ्या लोकांवर सुड भावनेने कारवाई करण्यास तर नाहीच नाही.
  • Log in or register to post comments
स
सॅगी Wed, 03/10/2021 - 05:23 नवीन
मुंबई मनपा मध्ये सत्ता आहे इतकी वर्षे तेव्हा राज्यसरकारच्या नावाने गळे काढत होते. आता राज्यात स्वतःचा मुख्यमंत्री आहे तर केंद्राच्या नावाने गळे काढतात. . केंद्रात स्वतःचा पंतप्रधान असता तर चीन, रशिया आणि अमेरिकेच्या नावाने गळे काढले असते. स्वतः काहीही करायचे नाही आणि दुसर्‍यांच्या नावाने बाराही महिने शिमगा करायचा हेच यांचे एकमेव काम..
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत Wed, 03/10/2021 - 05:34 नवीन
स्वतः काहीही करायचे नाही आणि दुसर्‍यांच्या नावाने बाराही महिने शिमगा करायचा हेच यांचे एकमेव काम.
+१
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Wed, 03/10/2021 - 05:10 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 03/10/2021 - 05:25 नवीन
इंधन दरवाढीवरुन संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज बंद पडले, सरकारला वाटत असते की आपण काहीही केले तरी चालून जाईल. कधी नव्हे ते विरोधीपक्षाने दमदार विरोध केला आहे. पेट्रोल डिझेल दरवाढीबाबत केंद्र सरकार आपली काही जवाबदारी आहे हे मान्य करायला तयार नाही. फेकाफेकी करून लोकांना स्वप्न दाखविणा-या सरकारकडून दूसरी कोणती अपेक्षा करणार..? वस्तू व सेवाकरात पेट्रोल- डिझेलच्या समावेशाबाबत जीएसटी परिषदेकडे शिफारस करावी लागेल म्हणून इंधनदरवाढीबाबत कानावर हात ठेवले. उत्तराखंडमधे भाजपच्या अंतर्गत धुसमुसळीमुळे संघर्ष होऊन भाजपच्या मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आहे, वसूली कमी होत असेल त्यामुळे असे पक्षाला करावे लागले असेल असेही वाटते. नव्या कृषिकायद्याबाबत ब्रिटन सरकारने संसदेत चर्चा करण्याची काही गरज नाही, तो आमचा अंतर्गत प्रश्न आहे, ही भूमिका योग्यच आहे. आमच्या वैश्विक नेत्याला काही पुरस्कार वगैरेची संसदेत चर्चा केली असती तर आम्हाला चाललं असतं पण आम्ही हे सहन करणार नाही. पंतप्रधान यांच्या २० एक सभा, अमितशा यांच्या तितक्याच सभा, केंद्रीय मंत्री, देशातले आमदार, हजारो फ़टीचर अनुयायी, सोबतीला चोवीस बाय सात मीडिया विरुद्ध मोमता दीदी अशी बंगालमधील निवडणूक जोरदार रंगत आहे. च्यायला, देशातले सगळे प्रश्न संपले आहेत, फक्त बंगालमधील बाकी आहेत. :) चालू द्या....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Wed, 03/10/2021 - 05:31 नवीन
इंधन दरवाढीवर राज्यांनी केंद्राला अजिबात सहकार्य करू नये. राज्यांना कस्पटासमान वागणूक देणाऱ्या सरकारला राज्यांचे महत्त्व लवकरच समजेल.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 03/10/2021 - 05:48 नवीन
सहमत आहे. बरं अशी कस्पटासमान वागणूक दिल्यामुळे एकेकाळी सहकारी असलेल्या पक्षाने चोख बन्दोबस्त केल्यामुळे त्यांचे झालेले हाल संपूर्ण महाराष्ट्र पाहात आहे. कालच एक बातमी वाचत होतो, केंद्रसरकार राज्यांशी कसे भेदभाव करते त्याचा एक उत्तम नमूना बघायला मिळतो. महाराष्ट्राची तर आर्थिक कोंडी करायचा प्रयत्न सुरु आहे. सरकारने तब्बल ९६ हजार ९८७ कोटी ५४ लाख रुपयांचा विविध योजनांपोटीचा राज्याचा निधी अद्याप दिलेला नाही. त्यामुळे ही न मिळालेली रक्कम, कोरोनाचे संकट, राज्यात उत्पन्नाचे कमी झालेले मार्ग, आस्थापनेवरील खर्चात झालेली प्रचंड वाढ त्यामुळे राज्याचा रुळावरून घसरलेला गाडा पूर्वपदावर आणण्याचे मोठे आव्हान सध्याच्या महाराष्ट्र सरकारपुढे आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
पिनाक Wed, 03/10/2021 - 06:56 नवीन
कारण तो निधी जून ते जून असा दिला जातो. त्या दृष्टीने अजून 3 महिने पेंडिंग आहेत. माझ्या फ्लॅट च्या भाडेकऱ्याने अजून मला एक लाख रुपये द्यायचे आहेत. पण मी त्याच्या नावाने ठणाणा करत नाही, माझे पैसे देत नाही म्हणून, कारण ते पैसे दर महिन्याला पुढच्या वर्षापर्यंत येणे आहे. वाचत जावा की जरा गोष्टी.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 03/10/2021 - 07:16 नवीन
महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी केंद्रसरकारकडून 'विविध योजनांची' जी रक्कम येणार असते त्या रक्कमेची ही आकड़ेवाऱी आहे. ''१ मार्च रोजी केंद्राने राज्याचे ८० हजार कोटी रुपये थकवले, असे वृत्तांनंतर . मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी सर्व विभागांना सूचना देऊन कोणत्या विभागाचे किती पैसे येणे बाकी आहेत याची माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते. अर्थसंकल्प सादर होण्याच्या एक दिवस आधी ही माहिती संकलित झाली असून, हा आकडा एक लाख कोटीच्या घरात गेला आहे. यात जीएसटीची थकबाकी ३१ जानेवारी २०२१ पर्यंतची आहे. त्यात फेब्रुवारी व मार्चचे आकडे जोडले गेले तर ही थकबाकी एक लाख कोटींच्या वर जाते'' बातमी संदर्भ. केंद्र सरकार ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकारची कोंडी करू पाहात आहे त्याचा फायदा ' अध्यक्ष महोदय' 'अध्यक्ष महोदय' म्हणनारे ते काय नाव त्यांचं, ते आत्ता नाव आठवत नै ये... त्यांना काहीही फायदा होणार नाही. झालं तर नुकसानच होणार आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 16 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 16 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 16 hours ago
  • सुंदर !!
    1 day 17 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 17 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा