Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२१ (भाग ३)

च
चंद्रसूर्यकुमार
Wed, 02/10/2021 - 09:49
🗣 266 प्रतिसाद
आधीच्या भागात २००+ प्रतिसाद झाल्याने फेब्रुवारी २०२१ च्या ताज्या घडामोडींसाठी तिसरा भाग काढत आहे. पहिल्या आणि दुसर्‍या भागातील प्रतिसादांवर काही लिहायचे असेल तरच त्या धाग्यांवर लिहावे अन्यथा या धाग्यावर लिहावे ही विनंती. २६ जानेवारीला शेतकरी आंदोलनातील झालेल्या हिंसाचारात भडकावायचे काम केल्याबद्दल भारत सरकारने दिलेल्या यादीतील काही ट्विटर खाती भारतातून बघता येणार नाहीत असे ट्विटरने जाहीर केले आहे. मात्र सिविल सोसायटीमधील 'अ‍ॅक्टिव्हिस्ट'ची खाती ब्लॉक करण्यात आलेली नाहीत असे ट्विटरने म्हटले आहे. https://timesofindia.indiatimes.com/india/withheld-some-a/cs-within-india-to-continue-advocating-right-of-free-expression-twitter/articleshow/80781473.cms

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 67522 views

🗣 चर्चा (266)
आ
आग्या१९९० Sat, 02/13/2021 - 18:53 नवीन
स्विस बँकेतील भारतीयांचा काळा पैसा भारतात आणणार होते हे सरकार , ६ वर्ष झाली आता . काळ्या पैसेवाल्यांच्या नावांची यादी होती ना यांच्याकडे ? काय झाले त्या यादीचे?
  • Log in or register to post comments
ट
टीपीके Sat, 02/13/2021 - 21:56 नवीन
अगदी बरोबर, अत्यंत कुचकामी, बेकार आणि कर्मदरिद्री सरकार आहे. त्या पेक्षा पुढच्या वेळी माझे मत त्यांनाच ज्यांनी आधी हा पैसा स्विस बँकेत जमा केला होता. पोलिसांना आपलं काम नीट करता येत नसेल तर त्यांनामदतकरण्यापेक्षा आपण चोरांचेच हात बळकट केले पाहिजेत, आणि आधी जसे चोरांनी कधीतरी टाकलेल्या सडक्या कुजक्या तुकड्यांवर जगत होतो तसे जगू. साल आजकाल तर ते तुकडे पण धड मिळत नाहीयेत, आणि आता ईमानदारी मधे कामही कसे करायचं हेही माहीत नाहीये, जगायचेच वांदे झालेय.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 02/13/2021 - 18:59 नवीन
https://m.lokmat.com/national/uttar-pradesh-mission-2022-priyanka-gandhi-will-be-cm-face-congress-a653/ उत्तर प्रदेशात फेब्रुवारी २०२२ मधील विधानसभा निवडणुकीत प्रियांका वड्रा कॉंग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार असणार. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने स्वबळावर निवडणुक लढण्याचे जाहीर करून शीला दिक्षितांचे नाव संभाव्य मुख्यमंत्री म्हणून जाहीर केले होते. परंतु मतदानाच्या एकदीड महिना आधी समाजवादी पक्षाबरोबर युती करून ४०३ पैकी फक्त १०३ जागा लढवून तब्बल ७ जागा जिंकल्या होत्या. २०२२ मध्ये तसेच होणार.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 02/14/2021 - 04:04 नवीन
https://www.indiatoday.in/world/story/donald-trump-statement-impeachment-acquittal-1769028-2021-02-14 ट्रंप वाचले. ट्रंपविरूद्ध महाभियोग चौकशी करण्यास प्रतनिधीगृहाने परवानगी दिली नाही. चौकशीसाठी परवानगी दिली असती तर चौकशीच्या निमित्ताने मोदींचा छळ झाला तसाच ट्रंपचाही छळ झाला असता.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 02/14/2021 - 04:20 नवीन
काही समान वैशिष्ट. १) उथळ स्वभाव जो निर्णय घेतात त्याचे काय परिणाम होतील ह्या विषयी कसलाच खोलवर विचार न करणे. २) जे पूर्ण करणे अशक्य आहे अशीच आश्वासन देणे. ३) स्वतः ल काहीतरी वेगळाच सुपरमॅन समजून बाकी राष्ट्र शी वागणे.त्या मुळे मित्र तर गमावून बसलेच पण नवीन शत्रू निर्माण केले. ४) जे जाणकार मंडळी सांगतात त्याच्या कडे पूर्ण दुर्लक्ष करणे . ५) समजत फूट पडेल अशीच वक्तव्य करणे. नेता कसा धीर गंभीर ,विचारी असावा . पण हा गुण ह्या दोघा मध्ये पण बिलकुल नाही. महाभियोग चालला च पाहिजे होता.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 02/14/2021 - 04:25 नवीन
पण आता दोघेही जिवंत नाहीत ... जवाहर लाल नेहरू पण नाहीत आणि इंदिरा गांधी पण नाहीत ..
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Sun, 02/14/2021 - 04:35 नवीन
१०० % सहमत राजेशजी . जे हयात आहेत त्यांच्याकडे कानाडोळा करायचा आणि दुसऱ्यांची मढी उकरायची हे 'डोंबिवली फिवरचे' लक्षण आहे. ह्या फिवरला ईलाज नाही.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 02/14/2021 - 05:18 नवीन
आम्ही मुळाशी हात घालतो... घराणेशाही कडे, कानाडोळा करायचा आणि सामान्य शेतकरी वर्गाच्या मढ्यावर नाचणार्या मंडळींना पाठिंबा द्यायचा, ही आमची वृत्ती नाही ... व्यक्तिपूजा करणार्यांना ह्याचा "ताप" होणारच ....
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sun, 02/14/2021 - 05:29 नवीन
एकीकडे घराणे शाही आहे आणि एकीकडे संघाची चाकरी करणारे.. दोघेही चूकच... कोणाला घराणेशाही चे गोडवे गाणारे योग्य वाटतात.. कोणाला संघाचे झुपे एजंट.. हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण जे चूक आहे ते चूक.. बरोबर ते बरोबर यावर न बोलता एक साईड कशी बरोबर हेच बोलत बसायचे.. पेट्रोल वाढले तर तो कर देश सेवेला जातोय.. आणि विरोधात असताना तो कर आमच्या पैश्यातून घेतला जातोय.. देशविघातक शक्ती ला.. मग लगेच या असल्या मेसेज वर विश्वास ठेवायचा.. Are पण विरोधात असताना तुम्ही काय बोलत होता? तुम्ही म्हणाला होता का हा कर आम्ही घेणार आणि असे करणार.. तुम्ही फेकूगिरी करत होता.. मान्य तरी करा.. बाकी घराणेशाही ला घरी बसवले आहे ना..? मग आताच्या सरकार ला प्रश्न विचारणारच ना.. जर प्रत्येक गोष्टीला आधी असे होते हेच उत्तर असेल तर मग सरकार बदल करून काय उपयोग आहे? असो..
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 02/14/2021 - 05:45 नवीन
एकीकडे घराणे शाही आहे आणि एकीकडे संघाची चाकरी करणारे.. या दोन्हींंची तुलना होऊच शकत नाही. संघात कोणत्याही व्यक्तीचे किंवा कुटुंबाचे स्तोम नाही. संघात भ्रष्टाचाराला वाव नाही कारण संघाकडे कोणतेही शासकीय अधिकार नाहीत. संघाला देशासंबंधी कोणताही निर्णय घ्यायचे अधिकार नाहीत. घराणेशाहीत बरोबर उलट असते. मागील काळात संपूर्ण शासन, पंतप्रधान आपली घटनात्मक कर्तव्ये विसरून देशहिताकडे संपूर्ण दुर्लक्ष करून एका विशिष्ट घराण्याची चाकरी करण्यात मग्न होते. Are पण विरोधात असताना तुम्ही काय बोलत होता? तुम्ही म्हणाला होता का हा कर आम्ही घेणार आणि असे करणार.. तुम्ही फेकूगिरी करत होता.. मान्य तरी करा.. कसली फेकूगिरी? घेतलेल्या कराचा जनतेसाठी कसा विनियोग होतोय याची अनेक उदाहरणे आधी दिली आहेत. मंत्र्यांचे परदेश दौरे, संसदेच्या उपहारगृहातील अनुदानित स्वस्त अन्नपदार्थ, परदेश दौऱ्यावर जाताना सरकारी खर्चाने माध्यम बातमीदारांचा ताफा नेणे अशा अनेक प्रकारच्या उधळपट्टीवर नियंत्रण आणले आहे.
  • Log in or register to post comments
क
काळे मांजर Sun, 02/14/2021 - 06:01 नवीन
नेहरू घराणे वाईट आहे मनेका आणि वरुण आकाशातून पडले का ? ज्यांचे बाप काँग्रेस , राष्ट्रवादीत आमदार खासदार होते , त्यांची पोरे पळवून भाजपाचे 280 फुगले आहेत भाजपात घरणेशाही नाही म्हणणारे सतरंज्या उचलत आहेत
  • Log in or register to post comments
स
सॅगी Sun, 02/14/2021 - 06:33 नवीन
नाहीतरी दुसरे काय काम आहे तुम्हाला?
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Sun, 02/14/2021 - 06:04 नवीन
सहमत. बऱ्याच मुद्द्यावर मी सरकारच्या बाजूने बोलतो त्यामुळे माझ्यावर बऱ्याच वेळेला लोकं भाजपाई, संघी इ आरोप करतात. पण तसे नाहीये. सध्याचे सरकार धुतल्या तांदळासारखे नाहीये. पेट्रोल आणि डझेलच्या बाबतीत यांची धोरणे न पटण्यासारखी आहेत. हेच मोदी, अडवाणी, सुषमा स्वराज इ लोकांनी पेट्रोल डिझेल वरून आकांडतांडव केले होते. रास्ता रोको, रेल रोको, बैलगाडी मध्ये टू व्हीलर नेणे इ सर्व प्रकारचे चाळे केले होते. त्याला फिल्म जगतातील लोक जसे की अनुपम खेर हे पण सामील होते. पण सत्तेत येताच त्यांनी काहीच केले नाही. उलट अजून टॅक्स वाढवले. जागतिक बाजारातील मंदीचा कोणताही फायदा ग्राहकांना होऊ दिला नाही. उलट त्याचा फायदा घेऊन सरकारची गंगाजळी वाढवत बसले. त्यांनतर खूप वाजत गाजत GST आणला. जणूकाही आर्थिक क्रांतीच आहे असं वातावणनिर्मिती केली पण प्रत्यक्षात पेट्रोल डिझेल दारू आणि इतर काही "मलिदा" देणाऱ्या वस्तू GST च्या कक्षेतून बाहेर ठेवल्या. One nation one tax असा भ्रामक आणि चुकीचा प्रचार केला गेला. आज महाराष्ट्रात पेट्रोल १०० री पार गेले आहे. आणि याला केंद्र सरकारची हावरट वृत्ती कारणीभूत आहे. या दरवाढीचा बचाव करणे तेही विकासकामांचा हवाला देऊन.. म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे. चुकीला चूक म्हणण्याची प्रवृत्ती जाऊन आता एखाद्या पक्षाची/व्यक्तीची/ विचाराची गुलामी करण्याची प्रवृत्ती वाढत आहे. आपला तो बाब्या.. आणि दुसऱ्याचे कार्ट असा काहीसा प्रकार आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 02/14/2021 - 16:00 नवीन
2 पुस्तके वाचा हा तेल नावाचा इतिहास आहे आणि एका तेलियाने ... तेलावर खूप काही गोष्टी अवलंबून आहेत .... सुदान, व्हेनेझुएला, गॅस टू लिक्विड प्रोसेस, कतार, युनायटेड अरब एमिरेट्स चा इतिहास ..... एकात एक गोष्ट फसलेली आहे ...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 02/14/2021 - 15:34 नवीन
तुम्ही कधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात गेला आहात का? मी तुम्हाला काही पत्ते देतो .... 1. मुरबाडच्या आसपास, संघाची गोशाळा आहे. स्वतः जा आणि खात्री करा... 2. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कुठल्याही, वनवासी आश्रमात जा... 3. गोळवली, चिपळूण ते संगमेश्र्वर रोड वरती आहे, तिथे जा... स्वतः तर जाणार नाहीत, स्वतः चौकशी करणार नाहीत, नुसतेच हवेत गोळीबार करू नका... बाय द वे, तुम्ही दापोलीला कधी जाणार आहात? कोकणातील शेतकरी वर्गाला नक्की काय हवे आहे? ते स्वतः विचारा ....
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Mon, 02/15/2021 - 07:10 नवीन
तुम्ही कधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात गेला आहात का?
ह्यावर एकाने मला उगाच विषाची परिक्षा कशाला घ्या? म्हणुन निरुत्तर केले होते.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 02/15/2021 - 08:16 नवीन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, इतर राष्ट्रांसाठी, विषासमानच आहेत... 1970 पासून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, काश्मीरच्या बाबतीत सांगत होते, ते 1980 नंतर, काश्मीरच्या पंडितां बाबतीत खरे निघाले.... 1960 पासून, सप्त राज्यांच्या बाबतीत, जे संघाचे विचार होते, ते अद्यापही प्रत्यक्षांत येत आहेत ... ही झाली वैचारिक पार्श्र्वभूमी ..... ====================== राष्ट्रीय पातळीवर किंवा राज्य पातळीवर, कुठलेही संकट येऊ दे... राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आधी धाऊन येतात .... ही झाली सामाजिक बांधीलकी ..... ====================== राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कधीच जबरदस्तीने देणगी गोळा केलेली नाही... वैयक्तिक पातळीवरच, देणगी जास्त करून स्वीकारल्या जाते.... एकाही नव्या पैशांचा घोटाळा, ह्या संघटनेत होत नाही .... ही झाली, आर्थिक जबाबदारी.....
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 02/15/2021 - 08:19 नवीन
तुम्ही कधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात गेला आहात का?
हो, शाळेत असतानाच शाखेत गेलो होतो. माझे नशिब आहे, मी तेंव्हाच लवकर त्यातून बाहेर पडलोही. बाकि तुलना करता येत नाही म्हणजे? घराणेशाही चा आणि लोकशाही ची तुलना करता येती काय मग? कारण, लोकशाही मार्गाने निवडून आलेले गांधी असो वा मोदी ते निवडणूच आलेले असतात. मग घराणेशाहीचे लाचार आलेच कुठून? जर लोकशाहीत घराणेशाही ला नावे ठेवली जातात, तर मग कोणी संघाच्या चाकर असणाऱ्यांना नावे ठेवली तर काय झाले..? बाकी, तुम्ही लगेच दापोली ला या वगैरे जे बोलताय.. तुम्ही माझ्या शेतात या, सांगतो काय परिस्तिथी आहे, टाकलेले पैसे पण परत निघत नाही, पाउस पाण्यावाचून कसे हाल असतात.. आणि मला कोकण आणी इतर शेतकरी भेदभाव आवडत नाही, प्रत्यकाचे problem वेगळे असतात, प्रत्यकाचे plus point वेगळे असतात. तुम्ही असा का समज केलाय कि तुम्ही सगळीकडे अनुभव घेताय आणि आम्ही अनुभव हीन बोलतोय? तुमचे अनुभव वेगळे असतील, त्याबद्दल दुमत नाही, पण आम्ही करतो ते अनुभवहीन हे चूक आहे..
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 02/15/2021 - 08:25 नवीन
तुमच्या मता शी पूर्ण सहमत . मी बोलतो, मला वाटतं तेच खरे ही प्रवृत्ती काही लोकांनी सोडणे गरजेचे आहे. समोरचा जो मत व्यक्त करतो तो त्याचा अनुभव असतो आणि तो खराच असतो . मीच खरा ही वृत्ती काही लोकांनी सोडली पाहिजेत.
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Mon, 02/15/2021 - 09:34 नवीन
गणेश जी आणि राजेश जी.. तुम्हाला शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम कळालेत असे एकंदरीत वाटतेय. तुमच्या मते त्या प्रॉब्लेम चे सोल्युशन्स काय आहेत?? जरा विस्ताराने सांगा. वाटल्यास एखादा धागा काढून त्यावर चर्चा करू. पण दुसरा एखादा उपाययोजना करत असेल तर फक्त विरोधाला विरोध करून चर्चेची चव घालवू नका. तुमचे मुद्दे पुरावा आणि फॅक्ट्स सोबत मांडत चला. उगाच एखाद्या व्यक्ती किंवा विचारसरणीबद्दल तुमचा एक स्पेसिफिक पूर्वग्रह आहे म्हणून जिथे तिथे कडवट प्रतिसाद टाकून विनाकारण वातावरण गढूळ करू नका.. आणि हो.. ते शेतकऱयांच्या प्रॉब्लेम्स च्या सोल्युशन्स बाबतच्या धाग्यबद्दल विचार करा. शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 02/15/2021 - 12:32 नवीन
बाप्पू जी, कसली चव आणि कसले वातावरण गढूळ केले? वरचे कुठलेही माझे रिप्लाय सांगा, आणि काय चव घालवली? असो.. तुम्ही प्रतिसाद वाचले असतील माझे त्यात कुठे कोणाला वयक्तिक आणि कोणाच्या विचारांना तूसडे पणाने उत्तरे दिलेली नाहीत.. तुमच्या विचारां विरोधात मते असतील तर चव घालवणे होते का? बाकी शेती वरील माझे मत आणि विश्लेषण http://misalpav.com/node/45446 शेती.. समस्या आणि राजकारण याच बरोबर, लोकसंख्या आणि शहरी करण.. मेळघाट.. हसदेव अरण्य(जे आडाणी ची घश्यात घातले आहे ), शिक्षण आणि इतर मते ही पुर्ण अभ्यासाने दिलेत.. वाचा... मते वेगवेगळी असु शकतात.. पण त्यांचा आदर करून स्वतःचे मत मांडणे नेहमी चांगले.. आपले तेच बरोबर इतरांचे चूकच हे मानणे कधीही योग्य नाही.. असो..
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Mon, 02/15/2021 - 17:10 नवीन
आपल्या लिखाणाची link दिल्याबद्दल धन्यवाद. वाचतो. माझा प्रतिसाद आपणास आणि राजेश जी दोघांना मिळून तो प्रतिसाद होता त्यामुळे तसा अर्थ निघणे स्वाभाविक आहे.
कसली चव आणि कसले वातावरण गढूळ केले?
ते वाक्य राजेश जी यांना उद्देशून होते कारण तुम्ही या चर्चेत फार उशिरा आलात. याआधीही जवळपास एक दीड महिना हेच रहाटगाडगे चालू आहे. आधी सहना यांच्या धाग्यावर आणि मग मंथली धाग्यावर. असो. तुमच्या बाबतीत मी माझे शब्द मागे घेतो.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 02/15/2021 - 18:29 नवीन
धन्यवाद.. आणि sorry जर अनावधानाने काही बोललो असल्यास
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 02/15/2021 - 12:35 नवीन
राजेश जी, धन्यवाद...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 02/15/2021 - 13:00 नवीन
कलेले पैसे पण परत निघत नाही, पाउस पाण्यावाचून कसे हाल असतात.. गेली काही वर्षे जर हीच परिस्थिति असेल तर, तुम्हाला शेती जमत नाही... स्वतःला जमत नसेल, ते काम करू नये .... मोदी हे घराणेशाही मुळे निवडून आलेले नाहीत, तर काही माणसे ही फक्त घराणेशाही मुळेच निवडून आलेली आहेत... जो, ढाई हजार पाच सौ क्विंटल, म्हणतो, त्याला मत देणे, ही घराणेशाहीच आहे .... विश्र्वेश्र्वरैय्या, हे नाव पण ज्याला धड उच्चारता येत नाही, त्याला मत देणे, ही पण घराणेशाहीच आहे ..... पुलावामा हत्याकांड, आपल्याच लोकांनी केले, असे जो म्हणतो, त्यालाच मत देणे, ही घराणेशाहीच आहे ..... आतंकवादी हल्ल्यांच्या सूड घेतला तर त्याचे पुरावे मागणार्या उमेदवाराला, निवडून आणणे, ही घराणेशाहीच आहे ..... स्वतःच पडून, दुसर्याने ढकलले म्हणून कांगावा, करण्याइतपत, घराणेशाही रुजलेली आहे..... संघात, तुम्हाला काय त्रास झाला? हे जर सांगीतलेत तर उत्तम ... मला पण, शिवसेनेची ओढ होती, कामे पण करत होतो .... पण ज्या दिवशी, बाळासाहेब ठाकरे यांनी, संजय दत्तला माफी दिली आणि मी शिवसेना सोडून दिली ....
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 02/15/2021 - 13:33 नवीन
स्वतःला जमत नसेल, ते काम करू नये ....
बरं. आपण तुमच्या म्हणण्याने प्रॉब्लेम काय आहे हे न बघता सरळ जमतच नाही हे मान्य करू. पण याचा अर्थ मला काहीच ज्ञान नाही, उगाच बोलतोय असा नक्कीच होत नाही.. आपण शेती करता.. म्हणुन इतर विषयावर बोलत किंवा मते नोंदवत नाहीत का? नाही म्हणजे सगळ्याचा अभ्यास हा फक्त ते काम करत असल्यावर होतो असे काही नसते.. असो..
मोदी हे घराणेशाही मुळे निवडून आलेले नाहीत, तर काही माणसे ही फक्त घराणेशाही मुळेच निवडून आलेली आहेत...
निवडून आलेत हे महत्वाचे आहे.. तुम्ही त्यावर त्यांना निवडून देणाऱ्यांना गुलाम, म्हणत असाल तर मग लोक संघाच्या चाकर असणाऱ्यांना पण तेच बोलतील ना.. आपला रोख घराणेशाही नसावी हा असला तर मान्यच आहे, पण घराणेशाही ला निवडून देणारे मूर्ख आणि आपण काय बरोबर हे जे समजणे आहे ते चूक...
जो, ढाई हजार पाच सौ क्विंटल, म्हणतो, त्याला मत देणे, ही घराणेशाहीच आहे .... विश्र्वेश्र्वरैय्या, हे नाव पण ज्याला धड उच्चारता येत नाही, त्याला मत देणे, ही पण घराणेशाहीच आहे
हाच न्याय मोदीजींना पण लावा कि.. ६०० करोड जनता, श्रीलंकेच्या पाहून्यात mrs. आणि नाव होते. त्याला भर लोकांसमोर एम आर एस (मिसेस म्हणतात हे वाचताना न कळणारे ) गटारात नळी टाकून लगेच गॅस निर्माण होतो म्हणणारे..हि आलेच कि.. माझे म्हणणे हे आहे कि दुसऱ्यांची चूक दाखवताना स्वतः ज्यांचा उदो उदो करतात त्यांच्या पण चुकांवर पांघरून का मग?
पुलावामा हत्याकांड, आपल्याच लोकांनी केले, असे जो म्हणतो, त्यालाच मत देणे, ही घराणेशाहीच आहे
एक voter म्हणुन, हा हत्याकांड कसा झाला हे तपासायची मागणी करणे, airlift करायला गुप्ताचर यंत्रणे ने सांगितले असले तरी तसे न करता येणे.. त्याच वेळेस आपल्या हास्य छटा प्रदर्शित करणे यावर प्रश्न उठवले पाहिजेत.. यात पंत प्रधान कोण आपले मोदी कि काँग्रेस चे यावर आपले प्रश्न उभे राहिले नाही पाहिजे.. यात गैर ते काय आहे? तपास पुर्ण करा आणि मग जे असे म्हणत आहेत त्यांना उत्तरे द्या... आपण म्हणजे तपास हि पुर्ण करायचा नाही आणी दोष हि द्यायचा हे चुकीचेच आहे...
संघात, तुम्हाला काय त्रास झाला? हे जर सांगीतलेत तर उत्तम ...
कट्टरता होती तेथे... आणि कुठलीही कट्टरता मी नाकरतो..मग ती जातीय तेढ निर्माण करणारी असो वा इतर कुठलीही... कट्टरता हि नकोच.. ज्याला आवडते त्याने खुशाल जावे.. मी संघाला नावे ठेवत नाहीच... पण जर घराणेशाही नको म्हणणारे, संघांचे हस्तक असणाऱ्यांना मात्र झुकते माप देतात तेंव्हा चूक वाटते.. सरळ म्हणा ना तुम्ही घराणेशाही ला वोट देतो आम्ही संघांच्या एजंट ला.. बस्स.. आणि असे नसेल तर लोकशाही मान्य करा जो निवडून येतो तो येतोच.. मग त्यात घराणेशाही, संघ येतोच कुठे.. पण आपण दुसऱ्याला जे बोलतो त्यावर आपल्यावर बोलणारे आले कि तुलना होत नाही असे कसे?
मला पण, शिवसेनेची ओढ होती, कामे पण करत होतो .... पण ज्या दिवशी, बाळासाहेब ठाकरे यांनी, संजय दत्तला माफी दिली आणि मी शिवसेना सोडून दिली ....
तुमच्या वयक्तिक निर्णयाचा आदर आहेच.. त्यात प्रश्न चिन्ह मी का उचलावे.. संजय दत्त ला माफी दिली म्हणुन तुम्ही शिवसेना सोडू शकता.. कोणी कट्टरता आहे म्हणुन संघ नाकारू शकतो.. कोणी हाथरस मुळे योगी आणि मोदी यांना नावे ठेवू शकतो.. कोणी पुंजीवादाचे तळवे चाटणाऱ्या आताच्या bjp ला सोडचिठठी देऊ शकते... यात ते त्यांच्या जागेवर योग्यच असतात.. पण आपण मानले ते च योग्य इतर म्हणजे घराणेशाही चे पाईक हे चूकच.. आणि महत्वाचे, मी कधीच काँग्रेस या पक्षाला वोट दिले नाही.. पण मोदी आणि मोदी भक्त यांच्या मार्फत जे राजकारण चालवले गेले आहे त्याला वैतागून मी काँग्रेस ला वोट देणार आहे.. हे माझे मत आहे.. मला, धार्मिक तेढ आणि कट्टरतेपेक्षा काँग्रेस बरी वाटायला लागली आहे.. मला काँग्रेस bjp पेक्षा जास्त सुशिक्षित वाटते... हे माझे मत आहे.. मला फेकूगिरी आवडत नाही.. मला नोटबंदी मुळे केलेले आर्थिक नुकसान मान्य नसल्याने मला काँग्रेस ची अर्थनीती आता योग्य वाटत आहे.. मला अडाणी साठी जे जंगल तोडले आहे ते मान्य नाही.. मला आरे ची झाडे एका रात्रीत तोडणे हि मान्य नाही... मला महंगाई कि मार कमी करू म्हणुन ज्या गोष्टीं वर मत माहीतले ती फेकू गिरी हि मान्य नाही... उद्या पुन्हा काँग्रेस चुकली तर आम्ही तिचे हि वाभाडे काढू.. पण हाच एक बरोबर हे कदापि चालणार नाही... काँग्रेस सत्तेतून जाण्यासाठी असे प्रश्न उपस्तिथ करणारेच जबाबदार आहेत.. ना कि एकाच पक्षाची पालखी उचलणारे .. आणि प्रत्येक जण वेगळा विचार करतो.. तो आपल्या सारखा विचार करत नाही म्हणजे चुकच हे विचारच किती चूक आहेत...
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Mon, 02/15/2021 - 16:45 नवीन
बातमी खरी आहे, बाकी चालुद्या. सावरकरांच्या त्यागाची माहिती ज्याला नाही, बर नसुदे माहिती पण तरीही त्यांच्या कर्तुत्वावर चिखल उडवणे हे आपल्या देशाचा भावी पंतप्रधान करू शकतो तर असा पंतप्रधान फक्त उकिरडे फुंकायच्या लायकीचा आहे
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Mon, 02/15/2021 - 17:44 नवीन
कट्टरता होती तेथे. दोन वेगवेगळ्या ठिकाणी शाखेत गेलो, तब्बल ८ वर्षे पण हा अनुभव कधीच आला नाही. काही वर्षांपूर्वी काश्मीर मध्ये आलेल्या पुरात पण संघाने केलेले काम पूर्ण देशाने पाहिले. माझे चुलत, आतेभाऊ पण वेगवेगळ्या गावात संघात जायचे पण असा अनुभव कोणाचाच नाही. तुम्हाला आलेला अनुभव हा दुर्दैवी आहे पण त्यावरून पूर्ण संघावर प्रश्नचिन्ह लावणे चूक आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 02/15/2021 - 18:02 नवीन
मी काही काळ संघात जात होतो. मला सुद्धा कट्टरता अजिबात अनुभवास आली नाही. अत्यंत प्रामाणिक व तळमळीचे कार्यकर्ते संघात भेटले. अर्थात काही कार्यकर्ते झापडबंद व पढीक विचारसरणीचे होते. संघातील बौद्धिकवर्ग अत्यंत कंटाळवाणे होते. मी कोणत्याच ठिकाणी फार काळ रमत नाही. मग तो संघ असो वा एखादी कंपनी वा एखादे काम. फार मोठी जबाबदारी घेणे माझ्या स्वभावात नाही. त्यामुळे संघातही मी फार काळ रमलो नाही. परंतु अनेक संघकार्यकर्त्यांशी अजूनही परिचित आहे. संघाच्या कार्यक्रमात फारसा जात नसलो तरी संघकार्याला माझा पाठिंबा आहे.
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Mon, 02/15/2021 - 19:25 नवीन
सहमत. मीदेखील अत्यंत थोडा काळ संघाशी संबंधित होतो. पण कुठेही कट्टरता नव्हती. आता कट्टरता मोजण्याची स्केल ज्याची त्याची वेगळी असू शकेल. उदा. कोणाला आपल्या पूर्वजांचा ( शिवाजी, महाराणा प्रताप, अशोक इ ) इतिहास वाचणे म्हणजे कट्टरता वाटते.. लोकांना इतिहासाच्या आडून धार्मिक कट्टर बनवण्याचे कारस्थान वाटते.. असं असेल तर अवघड आहे. उदाहरण एवढ्यासाठी दिले कारण मी जेव्हा शाखेत गेलो होतो तेव्हा काही स्वयंसेवकांनी याविषयी 10-15 मिनिटाचे छोटेखानी भाषण किंवा माहिती दिल्याचे आठवते. आता याला तुम्ही कट्टर म्हणणार असाल तर मग एकदा सेकुलर रुपी मदरश्याची फेरी मारून या.. किंवा गेला बाजार दिवसातून 5 वेळा भोंगा वाजवून जो काही भंपकपणा (हो i mean it ) केला जातो त्याचा नेमका अर्थ समजून घ्या. त्याच्या शब्दांवर लक्ष ठेवून अर्थ समजून घ्या.. पण ते तुम्ही करणार नाही.. कारण -- सेकुलरपणाचा किडा. असो.. बापाला बाप म्हणणे आणि देशाला माझी आई, माझा बाप, माझी कर्मभूमी, माझा भाग्यविधाता म्हणणे हा कट्टरतावाद असेल तर आहोत आम्ही कट्टर. बाकी तुम्ही ज्या शाखेत गेला होता त्याच नाव आणि पत्ता दिलात तर बरे होईल. व्यनि केला तरी चालेल. नेमकी कोणती कट्टरता पसरवली जातेय त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करेल.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 02/15/2021 - 20:08 नवीन
बापाला बाप म्हणणे आणि देशाला माझी आई, माझा बाप, माझी कर्मभूमी, माझा भाग्यविधाता म्हणणे हा कट्टरतावाद असेल तर आहोत आम्ही कट्टर.
मग मुळ मुद्द्याकडे येतो.. घराणेशाही विरुद्ध जर संघांचे चाकर असे जे मी म्हणालोय तर मग इतकी देशभक्ती असेल तर मोदी हे संघांचे स्वयंसेवक आहेत आणि म्हणुन तसे म्हणाल्यावर जाज्वल अभिमान पाहिजेच.. म्हणुन कोणाला घराणेशाही योग्य वाटत अससेल कोणाला संघांचे एजंट यात ज्याचा त्याचा प्रश्न.. शेवटी दोघे लोकांतून निवडून आलेत.. मग गांधी किंवा इतर निवडून देणारे लाचार पण आपण मात्र देशभक्त असे का? त्यामुळे हि जी घराणेशाही घराणे शाही लावली आहे ती आहे कुठे? आणि ती जर असेल तर तुमच्याकडे घराणेशाही नाही तर संघांचा बिल्ला घेतलेला आहे.. मग हे दोन्ही हि चूकच... आणि हि तुलना मान्य नसेल तर लोकशाही तुन निवडून येणारे गांधी असो वा मोदी ते निवडूनच येतात.. आणि त्यांना निवडून देणारे हे मतदारच असतात.. त्यांच्यात भेद का? असो.. बाकी संघ असो वा ब्रिगेड वा कोणी... मी प्रत्येक व्यक्तीला माणुस म्हणुन पाहतो.. मग तो मुसलमान असो.. हिंदू असो वा अन्य कोणी आणि माझ्या मते हीच खरी देशभक्ती
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 02/16/2021 - 01:34 नवीन
त्यामुळे हि जी घराणेशाही घराणे शाही लावली आहे ती आहे कुठे?" - घराणेशाही वर बेतलेलं पक्ष म्हणजे "निदवडूं दिलेले नेते नाही तर वारसा हक्क असल्या सारखे राजा नंतर राजपूत्र त्यामुळे सभासदांना काही बदलण्याचा अधिकार कमीच -एकीकडे जवाहरला, इंदिरा, राजीव आणि राहुल ( अधे मध्ये नाईलाजाने राव साहेब किंवा मनमोहन सिंग ) दुसरीकडे दिन दयाळ उपाध्याय , जोशी, वाजपेयी अडवाणी, मोदी शहा किंवा गोळवलकर पासून ते भागवत आता सांगा भाजपचं सभासदनां "चॉईस "होता कि "काँग्रेस च्या ? आणि ती जर असेल तर तुमच्याकडे घराणेशाही नाही तर संघांचा बिल्ला घेतलेला आहे.. मग हे दोन्ही हि चूकच... गांधी किंवा इतर कोणत्याही घराण्याची राजकीय पक्षातील घराणेशाची आणि मोदी किंवा गडकरी यांची संघ निष्ठा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत ते दोन्ही एकाच ? संघ आणि भाजप द्वेष जरूर करावं पण असला विचित्र तर्क लावू नये तो हास्यस्पद - मोदींची संघाशी नाळ म्हणजे जसे राष्ठ्रवादी आणि काँग्रेस दोन्हीही पक्ष समाजवादाला बांधलेले आहेत ( आणि यात काह्ही चुकीचे नाही ) तसेच - संघ जरी एकचालक यावर बेतलेले असले तरी संघचालक पदी कुठे आहे घराणेशाही ?
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 02/15/2021 - 20:11 नवीन
@ बाप्पू पुन्हा देतो रिप्लाय.. रिप्लाय खूप लहान दिसत आहे म्हणुन
बापाला बाप म्हणणे आणि देशाला माझी आई, माझा बाप, माझी कर्मभूमी, माझा भाग्यविधाता म्हणणे हा कट्टरतावाद असेल तर आहोत आम्ही कट्टर.
मग मुळ मुद्द्याकडे येतो.. घराणेशाही विरुद्ध जर संघांचे चाकर असे जे मी म्हणालोय तर मग इतकी देशभक्ती असेल तर मोदी हे संघांचे स्वयंसेवक आहेत आणि म्हणुन तसे म्हणाल्यावर जाज्वल अभिमान पाहिजेच.. म्हणुन कोणाला घराणेशाही योग्य वाटत अससेल कोणाला संघांचे एजंट यात ज्याचा त्याचा प्रश्न.. शेवटी दोघे लोकांतून निवडून आलेत.. मग गांधी किंवा इतर निवडून देणारे लाचार पण आपण मात्र देशभक्त असे का? त्यामुळे हि जी घराणेशाही घराणे शाही लावली आहे ती आहे कुठे? आणि ती जर असेल तर तुमच्याकडे घराणेशाही नाही तर संघांचा बिल्ला घेतलेला आहे.. मग हे दोन्ही हि चूकच... आणि हि तुलना मान्य नसेल तर लोकशाही तुन निवडून येणारे गांधी असो वा मोदी ते निवडूनच येतात.. आणि त्यांना निवडून देणारे हे मतदारच असतात.. त्यांच्यात भेद का? असो.. बाकी संघ असो वा ब्रिगेड वा कोणी... मी प्रत्येक व्यक्तीला माणुस म्हणुन पाहतो.. मग तो मुसलमान असो.. हिंदू असो वा अन्य कोणी आणि माझ्या मते हीच खरी देशभक्ती
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 02/16/2021 - 02:59 नवीन
मग गांधी किंवा इतर निवडून देणारे लाचार पण आपण मात्र देशभक्त असे का? त्यामुळे हि जी घराणेशाही घराणे शाही लावली आहे ती आहे कुठे? १-२ उदाहरणे देतो. १९८४ मध्ये इंदिरा गांधींचा खून झाल्यानंतर, कॉंग्रेसमध्ये अनेक अनुभवी नेते असूनही, कॉंग्रेसने सरपंचपदाचा सुद्धा अनुभव नसलेल्या राजीव गांधींना थेट पंतप्रधान केले. त्यावेळी अनुभवी प्रणव मुखर्जींंनी (जे कॉंग्रेसचे संसदेतील क्र. २ चे नेते होते) आक्षेप घेतल्याने पुढील अनेक वर्षे त्यांची हकालपट्टी झाली होती. १९९१ मध्ये राजीव गांधींचा खून झाल्यानतर, ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नसलेल्या व जन्माने भारतीय नसलेल्या सोनिया गांधींना, कॉंग्रेसींनी थेट अध्यक्ष म्हणून निवडले होते. परंतु सोनिया गांधींनी स्वत:च त्यात रस दाखविला नव्हता. १९९८ मधील लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार कॉंग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेता व विरोधी पक्षनेता होते. एप्रिल १९९९ मध्ये वाजपेयी सरकार पडल्यानंतर विरोधी पक्षांंच्या सरकारसाठी विरोधी पक्षनेता व कॉंग्रेसचा विधीमंडळ पक्षनेता या पदांमुळे शरद पवार पंतप्रधानपदाचे उमेदवार असणे योग्य होते. परंतु खासदार सुद्धा नसलेल्या व शून्य अनुभव असलेल्या सोनिया गांधींनी पंतप्रधान पदावर दावा करून बहुमताची जमवाजमव करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे पवारांनी नंतर १ महिन्यातच सोनिया गांधींविरूद्ध बंड केले होते. या उदाहरणातून घराणेशाही दिसत नसेल तर सोडून द्या.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 02/16/2021 - 07:19 नवीन
सहमत गुरुजी याशिववाय राष्ट्रीय म्हणवणार्या राष्ट्रवादी मध्ये किती पुढले पवार "लाँच होतात ते मोजला तर ! सेनेची ठाकरे इनकॉर्पर्टेड , काश्मीरचे अब्दुल्ला इत्यादी.. आता अर्थातच अशीही उद्धरणे दिली जातील कि , प्रमोद महाजन , मुंढे यांचं पुढील पिढ्या राजकारणात आल्या भाजपमध्ये मग ती नाही का घराणेशाही.. हो ती हि आहे फरक एवढा आहे ( अजून तरी) कि भाजपच्या आणि त्यापाठी असणारी संघाच्या सर्वोच्य नेत्यांच्या निवडीत घराणेशाही कमी दिसते.. या मागचे मुख्य कारण हे असावे कि आत्तापर्यंत पंतप्रधान पदी पोचलेले भाजपचे नेते हे संघाच्या कामासाठी मिशनरी सारखे वाहून घेतलेले आहेत अर्थात गडकरी किंवा शाहंचं बाबतीत तसे नाही म्हणा .
  • Log in or register to post comments
B
Bhakti Mon, 02/15/2021 - 18:30 नवीन
मी ९ वी पर्यंत शाखा चालवली आहे.दृर्गावाहिनीची शिबर केली आहे.खुप शिकायला मिळालं. पण कट्टरता होती तेथे... या बाबतीत मला थोडेफार अनुभव आले.मी शांतीप्रिय आहे..तसेच प्रत्येक गोष्ट संकुचित वृत्तीने वा पुराणातील वांग्यावर पुढे जाऊ शकत नाही.मी अनेकदा बापूंचे सत्याचे विचार वा भजन पोस्ट केल्यावर ओळखींच्याकडून खुप टीका सहन करावी लागते. पण आजही मी संघातील कोणालाही हक्काने मदतीला बोलावू शकते,हे देखील सत्य आहे.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 02/15/2021 - 20:20 नवीन
@भक्ती.. मदतीला येणारे माणसे असतात... अजूनही ती मदतीला धावून येतात कारण त्यांच्यात माणुस पण असते... बाकी संघ.. ब्रिगेड.. घराणेशाही.. वा अन्य कोणी हे फक्त मुखवटे आहेत, आपल्या आतील भावानेला चिकटवलेले... ते उतरले कि कदाचीत माणुस उरत असेल... मदत जर धर्म पाहून केली जात असेल तर ती मदत नाही उपकार असतो.. आणि मदत जर माणसाला केली जात असेल तर ते उपकार नाही माणुसकी असते. वयक्तिक : माझे असंख्य मित्र संघ, ब्रिगेड आणि सेक्युलर आहेत, पण जेंव्हा ते माझ्याबरोबर असतात तेंव्हा ते माणुस असतात.. त्यांना मुसलमान, हिंदू फलाना रंग नसतो... ना नसतात त्यांच्यात पक्षीय राजकारणाचे दलाल.. असो.. खूपच फिलॉसॉफिकल झाले वाटते..झोपले पाहिजे :-))
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 02/16/2021 - 01:40 नवीन
मदत जर धर्म पाहून केली जात असेल तर ती मदत नाही उपकार असतो.. अगदी बरोबर आणि हीच टीका खास करून ख्रिस्ती मिश्नर्यांवर होत असते खास करून ख्रिस्तेतर देशात पण तेव्हा मात्र सर्व "उदारमतवादी" मूग गिळून गप्पा बसतात मदर तेरेसांवर पण हि टीका फक्त हिंदू नाही तर इतर हि करायचे धर्मपरिवर्तन हाच मूळ हेतू असतो मिशनऱ्यांच्या ... पण असं बोलला कि लागेचच सन्नकुचित "पॉलिटिकली इनकॅरेक्ट "
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 02/14/2021 - 05:52 नवीन
अब्जावधी रुपयांच्या खर्च तसाच चालू आहे आणि बचत अशा क्षेत्रात करत आहेत त्यांचे बजेट काही लाखात असेल. काय ती काटकसर आणि काय ती स्वामी निष्ठा.
  • Log in or register to post comments
स
सॅगी Sun, 02/14/2021 - 05:59 नवीन
देशाचे काही लाख का होईना वाचत आहेत हे तरी मान्य केलेत....
काय ती स्वामी निष्ठा.
सेम टू यू!!! काय ती काँग्रेस निष्ठा आणि काय ती गांधिनिष्ठा...
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Sun, 02/14/2021 - 05:59 नवीन
काय ती काटकसर आणि काय ती स्वामी निष्ठा. -- उधळपट्टीची एक दोन उदाहरणे द्या पाहू ?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 02/14/2021 - 06:08 नवीन
खास विमान त्यांच्या साठी अमेरिका हून मागवले होते . न्यू ब्रँड. त्याची किंमत आहे 1 हजार 200 कोटी. त्यांच्या सुरक्षेवर रोजचा खर्च होतो. 1 कोटी 67 लाख . ही फक्त दोनच काटकसरी ची उदाहरण सांगितली आहेत. अजुन बरीच काटकसर सरकार करते .
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 02/14/2021 - 06:26 नवीन
ते विमान पंतप्रधान पदासाठी आहे. उद्या पप्पू पंतप्रधान झाला तर तोसुद्धा ते वापरेल आणि सोनियामाता, वड्रा कुटुंबीय सुद्धा खाजगी सहलींसाठी वापरतील.
  • Log in or register to post comments
क
काळे मांजर Sun, 02/14/2021 - 06:57 नवीन
मग काँग्रेसने नेहरू गांधी नावे देऊन शाळा रस्ते विमानतळ बांधली तीही जनतेसाठीच आहेत ना ? ----- एक भक्ताड नेहरू गांधी नावे असलेली 600 संस्थाची यादी व्हॅटसपवर फिरवत होते व रडत होते . मी म्हटले .. तो उसमे बुरा क्या है हमारा पीजी डिप्लोमा इगणु का है , इंदिरा गांधी जीस दिन मोदी युनिव्हर्सिटी मुझे एम डी डिग्री या कोई बडा पोस्ट देगी मै उनको वोट दुन्गा काँग्रेस के 60 साल हुये है भाजप के भी 15 हुये है जनता पक्ष 2 व्हीपिसिंग 1 वाजपेयी 5 मोदी 7 तो अब अगर काँग्रेस के नाम पे 600 संस्था है , तो भाजप के भी 150 की लिस्ट दो ते फरारफुर्र झाले
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 02/14/2021 - 07:04 नवीन
एवढे मोठे आकडे मागत जावू नका. त्यांचा वेग तरी बघा अजुन 1 संस्था स्थापन करून चालू करू शकले नाहीत आणि 150 संस्था ची नाव देण्यास सांगत आहात
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sun, 02/14/2021 - 09:46 नवीन
ते विमान पंतप्रधान पदासाठी आहे.
माझ्या पंतप्रधानाने विमान घेतलेले असणे मला चालेल.. नक्कीच. मग ते मोदी असो वा काँग्रेस चे कोणी.पंतप्रधानाने उच्च रहावे यात काही गैर नाही..त्याने उलट फकिरा सारखे राहू नये असे मला वयक्तिक वाटते पण याच १४ डिसेंबर ला जवान लोकांना airlift करावे हे गुप्तचर यंत्रणे ने सांगून ही ते करण्यास असमर्थता दाखवणे मला चालणार नाही.. शोकसागरात सगळे बुडाले असताना आपल्या हसऱ्या कॅमेरा छटा न्यूज माध्यमात प्रसिद्ध करणे मला आवडणारे नाही. रोड वर हल्ला कसा झाला याचा शोध घेण्यास आम्ही कमी पडलोय.. असे हि मला मान्य नाही.. असो..
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 02/14/2021 - 06:34 नवीन
एवढे महाग विमान हवंच कशाला. इथे किती तरी करोड अशी लोक आहेत त्यांना दोन वेळचे जेवण मिळत नाही .आणि 1200 करोड चे विमान पंतप्रधान ना. वा छान काटकसर आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 02/14/2021 - 07:22 नवीन
लोकांना २ वेळचे जेवण मिळत नसताना काही जणांना दिवसभर महागडे आंंतरजाल वापरून मोदींना शिव्याशाप देण्यात धन्यता वाटते. बरोबर ना?
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Sun, 02/14/2021 - 10:46 नवीन
विमानाची डील पप्पूची पार्टी सत्तेत असताना झाली होती पण 2014ला ईव्हीएम घोटाळा झाला आणि इटालियन सरकार पायउतार झाले
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Sun, 02/14/2021 - 09:28 नवीन
नोटाबंदीनंतर नवीन चलनाचे प्रमाण कमी होण्याऐवजी दरवर्षी वाढतच आहे. GDP घसरतोय. टॅक्स कलेक्शन वाढतंय असा सरकार दावा करतंय तर पेट्रोलजन्य पदार्थांवर अधिक कर का लावतंय? आणि पीएम केअर फंड गोळा का करतंय? पारदर्शकतेचा आव आणतंय तर हा फंड कुठे आणि किती खर्च केला हे का सांगत नाहीं ? इंफ्रास्ट्रक्चरला लागणाऱ्या निधीची अजिबात कमतरता नाही , आणि गरज पडलीच तर लाखो कोटी बाजारातून आणि तेही छोट्या गुंतवणुकदारांकडून उभे करता येईल असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणतात. हे जर खरं असेल तर सरकार इंफ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली अनेक वस्तू व सेवांवर कर का लादतेय?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 16 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 16 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 16 hours ago
  • सुंदर !!
    1 day 17 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 17 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा