Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२१ (भाग ३)

च
चंद्रसूर्यकुमार
Wed, 02/10/2021 - 09:49
🗣 266 प्रतिसाद
आधीच्या भागात २००+ प्रतिसाद झाल्याने फेब्रुवारी २०२१ च्या ताज्या घडामोडींसाठी तिसरा भाग काढत आहे. पहिल्या आणि दुसर्‍या भागातील प्रतिसादांवर काही लिहायचे असेल तरच त्या धाग्यांवर लिहावे अन्यथा या धाग्यावर लिहावे ही विनंती. २६ जानेवारीला शेतकरी आंदोलनातील झालेल्या हिंसाचारात भडकावायचे काम केल्याबद्दल भारत सरकारने दिलेल्या यादीतील काही ट्विटर खाती भारतातून बघता येणार नाहीत असे ट्विटरने जाहीर केले आहे. मात्र सिविल सोसायटीमधील 'अ‍ॅक्टिव्हिस्ट'ची खाती ब्लॉक करण्यात आलेली नाहीत असे ट्विटरने म्हटले आहे. https://timesofindia.indiatimes.com/india/withheld-some-a/cs-within-india-to-continue-advocating-right-of-free-expression-twitter/articleshow/80781473.cms

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 67522 views

🗣 चर्चा (266)
स
साहना Wed, 02/10/2021 - 10:07 नवीन
एलोन मस्क ह्यांच्या स्पेस कंपनीतून स्टारलिंक नावाची नवीन कंपनी निर्माण होणार आहे आणि ह्या कंपनीने ऑर्डर घेणे चालू केले आहे. हि कंपनी सुमारे २४ हजार उपग्रह सोडणार असून (१००० सोडले आहेत) त्यातून संपूर्ण पृथ्वीवर स्वस्त आणि वेगवान इंटरनेट सेवा देणार आहेत. ५०mbps ते १५० mbps स्पीड मिळेल असे कंपनी सांगत आहे. स्टेरलिंक च्या मागोमाग ऍमेझॉन सुद्धा अशीच सेवा देणार आहे. ह्या बातमीने ATT आणि इतर कंपन्यांचे धाबे दणाणले आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 02/10/2021 - 10:12 नवीन
https://maharashtratimes.com/international/international-news/coronavirus-origin-who-investigators-back-china-claim-that-australian-beef-could-have-caused-covid-19/articleshow/80780859.cms चीनच्या हातातले बाहुले असणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेने अपेक्षेप्रमाणे कोरोनाचा उगम व प्रसारासाठी चीनला क्लीन चिट दिली आहे व हे खापर चीनच्या विरोधात असलेल्या ऑस्ट्रेलियावर फोडले आहे. ज्या संघटनेचे सल्लागार उद्धव ठाकरे आहेत, त्या संघटनेकडून वेगळी अपेक्षा नव्हतीच. जागतिक आरोग्य संघटनेतून अमेरिकेला बाहेर काढण्याचा ट्रंप यांचि निर्णय योग्यच होता असं दिसतंय.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 02/10/2021 - 13:39 नवीन
चीन हातपाय पसरत आहे
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 02/10/2021 - 15:53 नवीन
हे निःशंक पण सिद्ध झाले आहे का? कोणत्या देशाकडे त्याचे स्पष्ट पुरावे आहेत का .? तसे पुरावे नसतील तर who चीन ची बटिक आहे असे कसे म्हणू शकता.
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Wed, 02/10/2021 - 18:56 नवीन
आमच्या मराठवाड्यात एक म्हण आहे. येडं पांघरूण पेडगावला जाणे. इतके दिवसापासून बातम्यात बघत होतो कि सर्वप्रथम कोरोना चीनमधे झाला, वुहानमधून पसरला, पहिले लॉकडाऊन चीनमधेच झाले. एवढं सर्वश्रुत असून पण असं बोलूच कसं शकतात आपण ? नाही म्हणजे काय म्हणावं तेच कळत नाही. माफ करा थोडा व्यक्तिगत प्रश्न विचारतो... असं करून तुम्हाला खूप मजा येते का हो? चेस खेळताना समोरच्या व्यक्तीची काहीच अपेक्षा नसताना असा काही अनपेक्षित डाव टाकता आला की मला खूप मजा येते. तशीच मजा कदाचित तुम्हाला येत असावी असा अंदाज आहे. बाकी चालूद्या.
  • Log in or register to post comments
स
सॅगी गुरुवार, 02/11/2021 - 04:20 नवीन
आता WHO ने अधिकॄतपणे सिनोवॅकची जाहिरातही करावी.
  • Log in or register to post comments
क
काळे मांजर Wed, 02/10/2021 - 14:20 नवीन
नवी दिल्ली: शेतकरी आंदोलनात धुडगूस घालणारा अभिनेता दीप सिद्धूला तब्बल 14 दिवसानंतर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असून या चौकशीत पोलिसांना लाल किल्ल्यात पोहोचण्याचं प्लानिंगच सांगितलं. तसेच आपला कोणत्याही कट्टरपंथी संघटनेशी संबंध नाही. मात्र, तोडफोड करण्याचं समर्थन करणाऱ्या विचारधारेवर आपला विश्वास आहे, असं सांगतानाच केवळ भावनेच्या भरात आपण शेतकरी आंदोलनात सामील झाल्याचं दीप सिद्धूने पोलिसांना सांगितलं. (Red Fort Violence: Delhi Police Arrests Deep Sidhu, Inquiry underway) सरकारशी चर्चा करताना आणि ट्रॅक्टर रॅलीवेळी शेतकरी नेते नरमाईचं धोरण घेत होते, असा माझा संशय होता, असं दीप सिद्धूने पोलिसांना सांगितलं. लॉकडाऊनच्या काळात माझ्याकडे काहीच काम नव्हतं. त्याचवेळी ऑगस्टपासून पंजाबात शेतकरी आंदोलन सुरू झालं आणि मी त्याकडे आकर्षित झालो, असंही तो म्हणाला. https://www.tv9marathi.com/national/red-fort-violence-delhi-police-arrests-deep-sidhu-inquiry-underway-394076.html/amp
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 02/10/2021 - 15:39 नवीन
चंपाबाईंना शोधून काढलेत की नाही? सचीन उद्दाम पोटे, यांना नमस्कार सांगा बाळ हितेश कसा आहे? आता तरी वाचायला लागला का? की, अद्याप टेडी बियर बरोबरच खेळत आहे? हितेश हा पण तुमचाच मानसपुत्र असल्याने, सर्वांगीण वाचनाची आवड नसेलच .... जागो मोहन प्यारे....
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Wed, 02/10/2021 - 16:17 नवीन
असले प्रतिसाद देऊन या आयडी धारकांना (की धारकाला) काहीही फरक पडत नाही मात्र इतर सदस्यांचा काही नवा रोचक प्रतिसाद आला आहे का हे बघायला म्हणून धागा उघडून बघायला वेळ आणि उर्जा या दोन्ही गोष्टी वाया जातात. तेव्हा असल्या प्रतिसादांकडे/प्रतिसादकर्त्यांकडे पूर्ण दुर्लक्ष करता येणार नाही का?
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 02/10/2021 - 16:31 नवीन
प्रतिसादाशी सहमत आहे, नवीन प्रतिसाद म्हणून काय आहे, असे बघायला जावे तर यांचा असाच काहीतरी वेगळाच प्रतिसाद असतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 02/10/2021 - 16:40 नवीन
गेली काही वर्षे तरी, ह्याच व्यक्तीचे, तेच तेच प्रतिसाद किती वेळा वाचायचे?
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 02/10/2021 - 16:46 नवीन
बघा सांगावे वाटले, बाकी आपली मर्जी. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 02/10/2021 - 17:39 नवीन
लहान मुलगा त्रास द्यायला लागला की, मोठ्या मुलाने माफ करायचे, हे मोठ्या मुलाने किती दिवस सोसायचे? प्रत्येक गोष्टीला एक लिमीट असते .... हट्टी मुलांना आणि खोडकर आणि वाह्यात मुलांना, समजाऊन सांगता येत नाही. तिथे कडक धोरणच पाहिजे.... हिटलरला पहिल्यांदाच रोखले असते तर, दुसरे महायुद्ध झालेच नसते.. जीप घोटाळा झाला, तेंव्हाच कडक कारवाई केली असती तर, पुढचे बरेचसे घोटाळे वाचले असते... आज एक डुआयडी आला, उद्या अनेक येतील... चलता है, ही भुमिका, कधीच योग्य ठरत नाही...
  • Log in or register to post comments
स
साहना Wed, 02/10/2021 - 19:08 नवीन
- शेणात दगड मारू नये चिखल आपल्यावर उसळतो. - तुम्ही जाल डुकराबरोबर कुस्ती खेळायला आणि त्याला चितपट कराल पण तुम्ही त्यांत स्वतःवर चिखल उडवून घ्याल पण डुकराला मजा येते ह्या सर्वांत. ते आनंदाने लोळते. - गर्दीच्या ठिकाणी काही दुष्ट लोक पाद मारून घाण करतात ह्याचा अर्थ इतर सर्वानी सुद्धा राजमा खाऊन प्रचंड घाण सोडावी तर सर्वानाच जगणे अशक्य. पण तुम्हाला वाद घालून अश्या लोकांचा अपमान करायचा असेल तर किमान प्रत्येक वेळी वेगळी विशेषणे वापर आणि वेगळ्या पद्धतीनं अपमान करा म्हणजे वाचायला मजा यायला पाहिजे. तेच तेच नको.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 02/10/2021 - 16:36 नवीन
नवीन प्रतिसाद काय आला? म्हणून बघायला जायचो तर, तेच प्रतिसाद असायचे ... वीट मारली तर उत्तर म्हणून धोंडाच मिळतो ... चुकी वीट मारणार्याची आहे...
  • Log in or register to post comments
क
काळे मांजर Wed, 02/10/2021 - 15:42 नवीन
As part of Cyber Swachhta Pakhwada, CERT-In GoI advises you to keep your digital devices bot free. Get bot removal tool at https://www.csk.gov.in हे काय आहे
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 02/10/2021 - 15:55 नवीन
Pangong Tso Lake या परिसरातून चींन व भारत हे दोघेही सैन्य मागे घेणार. चीन अत्यंत कुटिल मनोवृत्तीचा व पाठीत खंजीर खुपसणारा असल्याने, भारताने सैन्य मागे घेतल्यानंतर चीनने पुन्हा आपले सैन्य पुढे आणल्यास अजिबात आश्चर्य वाटणार नाही. अर्थात आपल्या सैन्याला चीनच्या विश्वासघातकी कृत्यांची जाणीव असणारच व ते सावध असतीलच. https://www.indiatoday.in/india/story/india-china-border-row-disengagement-in-pangong-lake-1767908-2021-02-10
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 02/10/2021 - 16:00 नवीन
हे आता बहुतांश लोकांना कळून चुकले आहे ...
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 02/10/2021 - 16:12 नवीन
चीन,बांगलादेश,पाकिस्तान,श्रीलंका हे आपले शेजारी देश भारता चे हितचिंतक नाहीत . आता नेपाल पण भारताचा हितचिंतक राहिला नाही. पण नेपाल चे पाकिस्तान बांगलादेश बरोबर चांगले संबंध आहेत. श्रीलंका,पाकिस्तान,बांगलादेश ,चीन हे मित्र पण नसतील पण एकमेकाचे शत्रू पण नाहीत. आणि तसे ते पण एकमेकाचे शेजारी च आहेत . भले काहींच्या सीमा मिळत नसतील. मग भारता विषयीच ह्या सर्व देशांना आकस का?. नक्की कोणाचे चुकतंय आपले की त्यांचं. आपले परराष्ट्र धोरण तर चुकीचे नाही ना .. भारताला जवळचा मित्र कोणता देश आहे अमेरिका असूच शकत नाही ते त्यांच्या स्वार्थ साधने हीच प्राथमिकता असा विचार करतात.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 02/10/2021 - 16:37 नवीन
नेहरू
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Wed, 02/10/2021 - 16:44 नवीन
चीन व पाकिस्तान वगळता आपले शेजारच्या देशाबरोबर चे संबंध चांगले म्हणवे असेच आहेत. बांगलादेश बरोबर चा सीमा वाद मिटलेला आहे तर म्यानमार मध्ये आपण सैनिकी करवाही करून सुद्धा त्या देशाने आपल्याला फायदा होईल अशीच भूमिका घेतलेली होती. श्रीलंके बरोबर चे संबंध ही सुधारत आहेत. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना port contract संबंधी विचारणा भारतालाच झाली होती पण आपण ती स्वतःहून नाकारली. कारण काय तर तामिळ जनता नाराज होईल म्हणून. एवढंच नाही तर 2013 ला श्रीलंके मध्ये झालेल्या Commonwealth summit च्या मीटिंग वर तीही आपल्या पंतप्रधानांनी बहिष्कार टाकला होता. UN मध्ये श्रीलंके विरुद्ध जे ठराव झालेले होते त्या वेळी ही आपण लंके विरुद्ध भूमिका घेतली होती, आणि त्याच मुळे लंका आपल्या पासुन दुरावून चीन कडे झुकला होता. परंतु मोदी सत्तेत आल्यापासून लंकेकबरोबर च्या संबंधा मध्ये सुधारणा होत आहे.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 02/10/2021 - 19:29 नवीन
श्रीलंका सरकार ला पाठिंबा द्यावा (जसा राजीव जी नी सैन्य पाठवून दिला होता)तर आपलेच तामिळनाडू राज्य नाराज होते .. तामिळी लोकांना पाठिंबा द्यावा(श्री लांकेतील) तर श्री लंका सरकार नाराज होते. काँग्रेस च्याच राज्यात दोन्ही पर्याय अवलंबले. राजीव जी अगोदर तामिळी ना भारत मदत करत होता राजीव जी नी श्रीलंका सरकार la मदत केली . दोन्ही पर्याय कुचकामी ठरले. आता LTT कमजोर झाल्यामुळे तो प्रश्न च राहिला नाही त्या मुळेच मोदी संबंध सुधारू शकले . Ltt अस्तित्वात असती तर मोदी पण कन्फ्युज झाले असतें
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Wed, 02/10/2021 - 23:00 नवीन
मला वाटते ती "श्रीलंका सरकार ला मदत करणे" या पेक्षा त्यामागची कल्पना हि असावी कि "श्रीलंकेत आपण नाही घुसलो तर दुसरे कोणी किंवा युनाइटेड नेशन्स घुसेल... त्यापेक्षा आपण घुसलेले बरे" .. असा डाव असावा...मालदीव च्या बाबतीत हि तिथे उठाव झाल्यावर हा पवित्र भारताने घेतला होता ...असे त्या वेळी तरी वाटले होते असे ऐकले होते कि भारताने सैन्य पाठवले नसते तर कदाचित श्रीलंका पाकिस्तानला विचारणार करणार होती . असो एकूण भारताची दोन्ही बाजूने "गोची" झाली हे मात्र खरे बाकी "सुक्या" यांनी केलेले विश्लेषण बरोबर अमेरिका फक्त स्वतःच्या स्वार्थाचे बघते हे जरी खरे असले तरी नैसर्गिक दृष्ट्या बघितले ( लोकशाही + अर्ध भाडवलशाही ) तर भारत आणि अमेरिका यांची मैत्री असली पाहिजे अर्थात याला अति डावे बेबीचं देठापासून ओरडून विरोध करणार हे गृहीत आहे म्हणा
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Wed, 02/10/2021 - 19:23 नवीन
कुठून आणता हो इतकी नकारात्मक ऊर्जा?
  • Log in or register to post comments
स
सुक्या Wed, 02/10/2021 - 21:59 नवीन
भारता विषयीच ह्या सर्व देशांना आकस का? याला कारणीभुत आहे ती भारताची "बनाना रिपब्लिक" अशी प्रतिमा. स्वातंत्र्या पासुन भारत कधीच पक्के धोरण राबवु शकला नाही. सगळ्यांना खुश करण्याच्या नादात आनी शांतीप्रिय असा देश ही प्रतीमा बनवण्यासाठी अगदी "हल्ला झाला तरी" प्रत्युत्तर न देणे बोट्चेपे धोरण अवलंबिने या सार्‍या मुळे भारताला आंतर राष्ट्रीय पातळी वर फार कुणी सिरियस्ली घेत नसे. त्या मुळे आओ जाओ घर तुम्हारा .. आणी कुनीही यावे टपली मारुन जावे असे होते.... काहीही केले तरी भारत "कडक शब्दात निंदा करतो" या पलिकडे जात नव्हता. त्यामुळे आकस वगेरे काही नाही .... प्रत्येक देश आपले म्हणने रेटुन बोलतो. ... समोरचा कमकुवत दिसला की अजुन जोरात रेटुन बोलतो .. बाकी काही नाही . . .
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 02/11/2021 - 04:56 नवीन
सहमत आहे
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Wed, 02/10/2021 - 19:26 नवीन
तुम्ही नेपाळचे नाव घेतले. भारतात रहाणाऱ्या नेपाळी माणसाला कधी विचारून बघा. तुम्ही काय विचारणार हो? तुमच्या अशा स्वभावामुळे तुम्हाला मित्र असण्याची शक्यता फार कमीच वाटते
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 02/11/2021 - 05:04 नवीन
कुठल्याही नेपाळी माणसाला, भारता विषयी आकस नाही.... नेपाळच्या बाबतीतल्या चुका, नेहरूंनी करून ठेवल्या आणि त्याचा फायदा, चीनने करून घेतला... जमिन आणि आकाश, याशिवाय, नेपाळमध्ये दळणवळण अशक्य आहे... डोंगरच जास्त असल्याने आणि आर्थिक कुवत नसल्याने, नेपाळमध्ये रस्ते बांधणी, चीनने हातात घेतली... कॉंग्रेस सरकारने, तेंव्हा नेपाळला मदत केली नाही... नेहरूंनी अशा पाचरी मारून ठेवल्या आहेत की, काढता काढता, नाकी नऊ येतील....
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 02/11/2021 - 05:56 नवीन
सध्या देशात वाढत्या पेट्रोल डिझेलचे दर, वाढती महागाई, बेकारी, बेरोजगारी, या प्रश्नांवर जनतेला विरोधीपक्षाला सरकार विरुद्ध उठाव करता येत नव्हता, किंवा तसे कोणी समोर येत नव्हते. देशातल्या सरकारविरोधात जो कोणी बोलेल त्याला दाबण्याचेच सर्व प्रयत्न सरकारकडून गेले. मात्र, सप्टेंबरपासून झालेल्या या आंदोलनाकडे सुरुवातीला दुर्लक्ष करुन महत्व न देणारा विषय इतका सरकारसाठी डोकेदुखी ठरेल, हे सरकारच्या स्वप्नातही आलं नसेल. सामान्य नागरिक आपला रोष हळुहळु व्यक्त करीत आहेत, ही आता चांगली गोष्ट होत आहे. राज्यसभेत आवाजी मतदानाने बील मंजूर करुन घेण्याची घाई, सदस्यांनी मतदान घेण्याच्या मागणीसाठी जागेवर जाऊन बसण्याचा आग्रह धरणे, थेट वाहिन्यावरील राज्यसभेचं प्रक्षेपण म्यूट करणे, सदस्यांना बडतर्फ करणे, असे सर्व प्रकार या देशाने पाहिले. जगातली सर्वात मोठी लोकशाही असे आपण गौरव करतो पण सध्याच्या सरकारने आंदोलनीजीवी, त्यावर बोलणा-याची व्यवस्था कशी गळचेपी केली, करते ते आता काही नवीन राहीलेलं नाही. असाच विषय घडामोडीचा. ट्वीटरवरुन व्यक्त होणा-या विषयाचा. केंद्रसरकारने चार फेब्रुवारीला ट्वीटरला पत्र लिहून ११७८ खाती बंद करण्याची सूचना केली होती. कृषीविषयक कायद्यांना विरोध करणारे शेतक-यांच्या आंदोलन, हॅशटॅग मोहिमा, आणि अशा खात्यावरुन प्रक्षोभक लेखन केले जात आहे, अप्रप्रचार केला जातो असे सरकारच्या वतीने आक्षेप घेतला गेला होता. यासुचनेवरुन ट्वीटरने काही खाती देशातपूरती बंद केली होती जगभरासाठी मात्र आम्ही तसे करु शकणार नाही असे ट्वीटरने म्हटले आहे. ट्वीटरने आपल्या ब्लॉगवर त्याबाबत सविस्तर अशी माहिती दिली आहे. "१) वृत्तपत्रे, पत्रकार, चळवळीतील कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांच्या ट्वीटर अकाउंट्सवर कारवाई केली नाही. त्यांच्यावर कार्यवाही करणे म्हणजे, अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आणण्यासारखेच ठरले असते. २) ट्वीटर कायम अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा आदर राखत आले असून, यापुढेही त्याचा पुरस्कार केला जाईल. ३) आमच्या देशविशिष्ट विथेहेल्ड कंटेट धोरणानुसार काही करण्यात आली असून केवळ भारतापूरतीच ही कार्यवाही मर्यादीत आहे. ४) कोणाचे काहीही विचार असोत, ते इतरापर्यंत पोहोचवायला हवेत, निरोगी खुली सार्वजनिक चर्चा व्हायला हवी ही मूल्ये आम्ही जपली असून त्याचा पुरस्कार यापुढेही करीत राहू ''( संदर्भ बातमी) (दै.लोकमत) केंद्र सरकारच्या आदेशानुसार आम्ही काही खाती बंद केली असली तरी, ती देशाबाहेर सक्रीय असतील. परंतु अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा आम्ही आदर करीत असल्यामुळे काही ट्वीटर खाती आम्ही निलंबीत केली नाहीत अशी भूमिका ट्वीटरने घेतली आहे, या भूमिकेला केंद्र सरकारने आक्षेप घेतला आहे, आपल्या माहिती तंत्रज्ञान सचिवाशी चर्चा न करता अशी भूमिका ट्वीटरने घ्यायला नको होती असे म्हटले आहे. सारांश, केंद्रसरकार आता ट्वीटरशी कसे वाद घालते, पुढे काय भूमिका घेईल, हे पाहणे रोचक ठरणार आहे. मला वाटते, जसे चीनी अ‍ॅपवर जसी बंदी घातली तशी घालतील असे काही वाटत नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 02/11/2021 - 06:29 नवीन
केंद्र सरकार चे वागणे व्यक्ती स्वतंत्र ची गळचेपी करण्यासारखे आहे. राज्य घटनेने भारताच्या नागरिकांना व्यक्ती स्वतंत्र आणि अभिव्यक्ती स्वतंत्र हे मूलभूत हक्क म्हणून दिले आहेत. ते सरकार ला नाकारता येणार नाहीत. हा अती आक्रमक पण सरकार ला नक्कीच महागात पडेल. लोकांचे मत सरकार विषयी दूषित होईल. राहिला प्रश्न ट्विटर चा ती अमेरिकन कंपनी आहे भारत जास्त च aggressive झाला तर अमेरिकन सरकार active होईल तेव्हा मात्र सरकार च्या धाडसाची कसोटी लागेल. परकीय देशासमोर माघार घेण्याची वेळ आली तर सरकार आणि देश दोघांची इज्जत जाईल. कोणतेही निर्णय विचार करून न घेणे हीच मोदी सरकार ची विशेषतः आहे . थोडे स्वतःचे वागणे सरकार नी सुधारावे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 02/11/2021 - 06:34 नवीन
ओवेसीने खुलेआम, 100 कोटी ग़ैर-मुस्लिमांना मारण्याची धमकी दिली. आपण इथे मनसोक्त चर्चा करू शकतो, हे पण अभिव्यक्ति स्वातंत्र्य आहे म्हणूनच ना? दुसरी गोष्ट, Twitterची प्रत्येक खाती बंद केलेली नाहीत. देशाच्या हिताला बाधा आणणारी किंवा देशाच्या सार्वभौमिक भुमिकेला बाधा आणणारीच खाती बंद केली आहेत. एक नासका आंबा, सगळी पेटी खराब करतो, हे तुम्हाला पण माहिती असेलच ... मग असे आंबे पेटीत ठेवायचे? की सगळी पेटीच खराब होण्याची वाट बघायची? भाजप सरकार, योग्य तेच निर्णय घेत आहे ... दुसरी गोष्ट, इंधन दरवाढ, माझ्या कडे, एक तक्ता आला आहे .... तो वाचा आणि मग तुम्हीच ठरवा ..... खाली दिलेला दर पेट्रोलचा आहे... तुम्ही डिझेलचा दर दिलात तर उत्तम .... Basic rate. 30.50 Central govt.tax. 16.50 State govt.tax. 38.55 Distributor. 6.50 ------------ Total. 92.05
  • Log in or register to post comments
स
सुक्या गुरुवार, 02/11/2021 - 06:53 नवीन
सहमत आहे ... तक्ता दिला ते उत्तम केलेत. आता जनतेच्या सरकारने स्टेट टॅक्स १५ रुपये करवा आणी पेट्रोल २३ रुपये स्वस्त करुन दाखवावे ... "करुन दाखवलं" असा फ्लेक्स मी स्वखर्चाने लावेल मुंबै पुण्यात ...
  • Log in or register to post comments
स
सुक्या गुरुवार, 02/11/2021 - 06:58 नवीन
इकडे हिरव्या देशात आलो तेव्हा पेट्रोल $१.६० - १.७५ प्रती गॅलन होते ... आता हिवाळ्यात $३.५० मोजावे लागतात .. कसं जगावं गरीबाने . . .
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 02/11/2021 - 07:08 नवीन
कोणत्या देशात नक्की? कारण एवढा फरक म्हणजे आस्चर्य आहे आणि एकाच वर्षात? काहीतरी झोल आहे
  • Log in or register to post comments
स
सुक्या गुरुवार, 02/11/2021 - 07:20 नवीन
एका वर्षात नाही हो ... ८ एक वर्षे झाली. मध्यंतरी पार $४.५ वगेरे झाले होते ... बाकी झैरात आपली .. आम्रविकेची आहे ..
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 02/11/2021 - 07:03 नवीन
आणि जगात जिथे पेट्रोल आयात केले जाते तिथे हि असेच चित्र दिसते पण आंधळं विरोध करायचा हे ठरवल्यावर प्राध्यापक असो कि कुलगुरू तिरपेच दिसते भारतात खूप गोष्टीत जगाच्या मानाने आधीपासून महाग आहेत ( कर्मचाऱ्यांच्या पगाराचा दार कमी असून सुद्धा) आणि त्यामागे व्यापारांचाच नफेखोर पण + नासधूस इत्यादी काराणे आहेत... हे काही लोकांना कळत नाही जणूकाही महागाई फक्त भाजप सरकारच्या काळातच वाढली आजची आकडेवारी दर प्रति लिटर १ डॉलर १८ सेंट म्हणे ११८ सेंट आणि त्यातील सरकार चा कर ४३ सेंट आणि हो या देशातील वयक्तिक आयकर दार भारतअपेक्षा जास्त आहे ३० पासून ४५% पर्यंत https://www.ato.gov.au/Business/Excise-on-fuel-and-petroleum-products/Lodging,-paying-and-rates---excisable-fuel/Excise-duty-rates-for-fuel-and-petroleum-products/#Excisedutyratesfuel
  • Log in or register to post comments
क
काळे मांजर गुरुवार, 02/11/2021 - 07:07 नवीन
राज्य सरकारवर खापर फोडायला तो कर उलट सुलट करून मुद्दाम मोदी भक्तांनी व्हॅटसप वर पाठवला आहे प्रत्यक्षात केंद्र कर जास्त आहे
  • Log in or register to post comments
स
सुक्या गुरुवार, 02/11/2021 - 07:22 नवीन
असु द्या हो केंद्राचा कर जास्त. राज्याचा कर कमी करुन केंद्राच्या मुस्काटीत मारावी म्हणतो मी. काय म्हणता ?
  • Log in or register to post comments
स
सॅगी गुरुवार, 02/11/2021 - 09:08 नवीन
स्वतःची सत्ता असलेल्या राज्यात आंदोलने करण्याची नौटंकी करणे जास्त सोयीचे आहे. झालेच तर मुखपत्र आहेच केंद्राच्या नावाने फुसकुल्या सोडायला...
  • Log in or register to post comments
स
सुक्या गुरुवार, 02/11/2021 - 20:22 नवीन
हा हा हा . . . बरोबर आहे .. ह्यांना फक्त आदेश द्यायचे माहीत आहे . . कर्तुत्व शुन्य ...
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 02/11/2021 - 12:16 नवीन
भाजप सरकार, योग्य तेच निर्णय घेत आहे ... दुसरी गोष्ट, इंधन दरवाढ, माझ्या कडे, एक तक्ता आला आहे .... तो वाचा आणि मग तुम्हीच ठरवा ..... खाली दिलेला दर पेट्रोलचा आहे... तुम्ही डिझेलचा दर दिलात तर उत्तम .... Basic rate. 30.50 Central govt.tax. 16.50 State govt.tax. 38.55 Distributor. 6.50 ------------ Total. 92.05
Whats app युनिव्हर्सिटी च्या, it cell च्या post एकदा verify करा कि मुवि. कि आपल्या विचारधारे साठी काही ही सत्य मानायचे? तुम्हीच माझ्या मतांना चुकीच्या मीडिया वरून वगैरे बोलत होता(नीटसे आठवत नाहिये exact वाक्य )सो आठवण करून द्यावी म्हणालो. असो..
  • Log in or register to post comments
क
काळे मांजर गुरुवार, 02/11/2021 - 12:19 नवीन
नेहरूंनी साक्षर केले मोदींनी फास्ट इंटरनेट दिले तरी लोक गुगलत नाहीत
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 02/13/2021 - 04:39 नवीन
राज्य सरकारचे कर निम्मे करावेत ...
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sat, 02/13/2021 - 04:54 नवीन
जरूर... नक्कीच कर कमी झाले पाहिजेत... पण मागणी राज्य आणि केंद्र दोघांसाठी सेम तर करावी. दोघांचे कर आहेत.. माझे हेच म्हणणे आहे, सरकार बघुन मते का बदलतोय आपण? करून दाखवले वाल्यांनी कर कमी करावे.. आणि बस हुई महंगाई की मार वाल्यानी काय करावे? कर वाढावावेत? म्हणजे ते डेव्हलोपमेंट करतायेत ना अस आपणच आपल्याला बोलुन घ्यावं?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 02/13/2021 - 06:27 नवीन
आरेला एक नियम आणि इतर ठिकाणी, वेगळा नियम का? बार वाल्यांना एक नियम आणि इतर धंद्यांना वेगळा नियम का?
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Sat, 02/13/2021 - 05:02 नवीन
https://www.livemint.com/news/india/how-much-tax-you-pay-on-petrol-and-diesel-here-is-a-break-down-11610595149786.html
Add to it excise duty of ₹32.98 per litre and dealer commission, which averaged ₹3.67 per litre. On this, further add VAT or value added tax (including VAT on dealer commission) of ₹19.32 per litre. Then comes the final retail selling price of petrol of ₹83.71 a litre ((January 1 price) in Delhi
The central government had raised excise duty by ₹13 per litre on petrol and by ₹15 a litre on diesel in two instalments in March 2020 and May 2020 to meet the expense of coronavirus fight.
Central government to get Rs 1.6 lakh crore from record excise duty hike on petrol, diesel
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 02/13/2021 - 05:32 नवीन
पेट्रोल व डिझेलचा "वस्तू व सेवा करांतर्गत" समावेश केल्यास निदान अनियंत्रित करवाढ, वेळोवेळी लावण्यात येणारे अधिभार इ. वर मर्यादा येईल.
  • Log in or register to post comments
प
पिनाक Sat, 02/13/2021 - 07:41 नवीन
सध्या असं काही होणं किंवा पेट्रोल डिझेल चे दर कमी होणं अशक्य आहे. यातुन जो कर मिळतो तो धरला तरी सरकारचा तोटा या आणि पुढच्या वित्तीय वर्षात प्रचंड असणार आहे. कर कमी करण्याचा प्रश्नच नाही. निवांत बसूया सगळे. दर 2023 शिवाय कमी होत नाहीत.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० गुरुवार, 02/11/2021 - 16:52 नवीन
पेट्रोलची बेसिक किंमत प्रतिलीटर ३० रुपये इतकी आहे. त्यावर केंद्रसरकार ३३ रुपये आणि राज्यसरकारे २७ रुपये कर लावतात. केंद्र राज्यांपेक्षा अधिक कर लावते. युपीए सरकारच्या काळातील कच्च्या तेलाच्या किमती आज असत्या तर सध्याच्या करआकारणीनुसार दर १४० रुपये प्रतिलिटरच्याही पूढे गेले असते.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 02/13/2021 - 04:40 नवीन
करून दाखवलं वाल्यांनी, राज्य सरकारने, आखलेले कर, कमी करून दाखवावेत ....
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 18 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 18 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 18 hours ago
  • सुंदर !!
    1 day 19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा