Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

विद्या बाळ यांचे अखेरचे आवाहन

प
प्रकाश घाटपांडे
Wed, 10/14/2020 - 12:56
🗣 156 प्रतिसाद
विद्या बाळ गेल्यानंतर त्यांच्या आदरांजली सभेत उल्लेख केलेले त्यांचे शेवटचे रेकॉर्डिंग. मार्च 2020 च्या मिळून सार्‍याजणी मधे आले आहे. स्वेच्छामरण या विषयी त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्यांची मते काय होती हे जाणुन घेण्याची उत्सुकता होती. ------------------------------------------------------------------------- अखेरच आवाहन... मी विद्या बाळ, १०१, नचिकेत सोसायटी, प्रभात रोड, पुणे - ४, वय ८३ पूर्ण. आज मनाच्या एका अत्यंत गंभीर अशा; पण निर्णायक अवस्थेत बोलते आहे. हा विचार मी आजवर शेकडो लोकांशी बोललीये, पण कुणाला तो इतका गंभीर वाटला, कुणाला नाही, मीही कदाचित थोडी द्विधा मनस्थितीत असेन. पण आज मी अतिशय निर्णायक मनस्थितीत बोलतीये. माझे दात काढल्यामुळे थोडी अस्पष्टता येतीये ती समजून घ्या. मला असं म्हणायचंय की, मला केव्हापासूनच वाटतंय की माझ्या आयुष्याला आता अर्थ राहिलेला नाही. सगळे माझे प्रियजन सांगताहेत मला की, तुला खूप करण्यासारखं आहे, खूप आयुष्य पुढे आहे, पण मला स्वतःला प्रामाणिकपणे असं वाटतं की, त्याला अर्थ नाहीये, या पुढे बरं होणं, काम करणं, पहिल्या उमेदीनी बरं होऊन काही करणं ही माझी इच्छाही नाहीये आणि मला करायचंही नाहीये. जोशी हॉस्पिटलमध्ये मी ई.ओ.एल. फॉर्म भरलाय - ‘एण्ड ऑफ लाईफ' म्हणून. काही त्याला अर्थ नाहीये. कारण जोपर्यंत मी प्रत्यक्षात मरण्याच्या स्थितीत येत नाही. तोपर्यंत त्याचा काही उपयोग नाहीये हे माझ्या प्रत्यक्ष अनुभवातून लक्षात आलंय. तेव्हा हा जो विचार करून, विशेषतः आज विचार करून, मी असं ठरवते आहे की, मला यातून सुटकेचा मार्ग हवा आहे. तो लीगल नाही, हे मला २००% माहितीये; पण तरी तो मला हवा आहे. मला यावर एक मार्ग सुचतो तो असा : तो ४-८ दिवसात होणारा नाही, त्यामुळे सगळ्यांना सांगण्यास, जाहीर करण्यात आता अर्थ नाही, पण मी बोलतीये. माझ्या असं लक्षात आलं की, याच्यात माणसाच्या जवळ, सज्जन माणसाजवळ, जे नाही (त्याची गरज आहे). पण मला आज एक नवा विचार सुचलाय तो असा की, जी माणसं खरोखरच सुपारी देऊन काम करतात, त्या माणसांच्याकडे कदाचित म्हणजे उदाहरणार्थ क्रूर असे किंवा उद्देश नसलेले (लोक), सर्पमित्र (ज्यांच्याविषयी मला आदर आहे) किंवा त्या प्रकारचे लोक शोधणं आणि त्यांच्या मदतीनी यावर काहीतरी उपाय काढणं शक्य आहे. त्याला वेळ लागेल, पण ते कदाचित शक्य आहे. त्याला काही काळ लागेल तो घ्यावा. आणि माझी इच्छा आहे की त्यांनी तो (मार्ग) पूर्ण करावा ज्यामुळे तशी कुणावरच आरोपाची वेळ येणार नाही. कसं, काय, याचे डिटेल्स सिरिअसली ठरवावे लागतील. आज मी मनाच्या अत्यंत निर्णायक, भावनाविवश नसलेल्या अवस्थेत बोलतीये. इथे आज या बैठकीला सविता ही माझी सध्याची सेवक, विनीता माझी मुलगी, उर्मिला माझी सून, डॉ. मंगला नाही माया (हजर आहेत). इथे हॉस्पिटलमध्ये मी आत्ता ॲडमिट आहे, तिच्याशीही (मायाशीही) मी बोलले आहे. या सगळ्यांनी कृपया याचा नीट नीट नीट विचार करावा आणि जे जे लोक मृत्युशय्येवर आहेत, किंवा लवाटे यांच्यासारखे प्रामाणिकपणे अशाच अवस्थेत मृत्यूची वाट पाहताहेत त्यांना मार्ग मोकळा करून द्यावा. कृपया तुम्ही सगळ्यांनी इथे विचार करावा. आत्ता ही गोष्ट मोठ्यांनी बोलण्याची नाहीये; पण काही महिन्यात, वर्षात, याचा विचार करावा. आत्ता ते शक्य नाही मला माहितीये. मी तोवर थांबायला तयार आहे; पण कधीच न निघणाऱ्या मार्गापेक्षा हा मार्ग खूप चांगला आहे, अनेकांसाठी चांगला आहे, तुम्ही सर्वांनी यावर विचार करावा. हे सगळे विचार ऐकून घेतलेत आणि त्यातनं सगळे जण शांत, शहाण्यासारखा विचार करतील अशी मला आशा आहे. माझ्यावर लोकांनी इतकं अपार प्रेम केलंय की, मी असा निर्णय घेणं हे एका परीने खूप क्रूर आणि कृतघ्नतेचं लक्षण आहे. मला असं वाटतं की, अनेक लोकांच्या पुढील हितासाठी हा खूपच आणि विशेषतः माझ्यासाठी उपयुक्त (मार्ग) आहे. कृपया विचार करावा. माझ्या निर्णयाचं काही भलं करावं आणि व्यापक जनतेच्यासाठी काहीतरी करावं. विद्या बाळ २९ जानेवारी २०२० संध्या. ७.३०

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 64138 views

🗣 चर्चा (156)
क
कंजूस Fri, 10/16/2020 - 16:30 नवीन
बरेच आहेत. पण जेव्हा व्यक्ती एका ठिकाणी शय्येवर पडलेली असते तेव्हा ती काही करू शकत नाही. गळफास, विष, रेल्वेतून उडी, झोपेच्या गोळ्या वगैरे. दुसऱ्या कुणाची मदत घेतली तर त्याच्यावर खून करणे, आत्महत्या करायला भाग पाडणे, मृत्यू आणण्यास दबाव आणणे वगैरे नियम लागू शकतात.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 10/16/2020 - 21:42 नवीन
अवांतर : लोकहो, आत्महत्या व प्रायोपवेशन ( म्हणजे उपास करून मरण) याविषयी पारंपरिक हिंदू मत नोंदवत आहे. एकदा का घास तोंडातनं आंत सारला की माणसाचा त्या घासावरील ऐच्छिक ताबा संपतो. दुसरी यंत्रणा त्याचा ताबा घेऊन पचन आणि पोषण घडवून आणते. त्यामुळे मानवी शरीर हे ईश्वराधीन मानले गेले आहे. अगदी आपले स्वत:चे शरीर असले तरी त्याचा स्वेच्छेने नाश करणे अनुचित आहे. त्यामुळे आत्महत्या हे पाप धरले जाते. मात्रं असं असलं तरी हे शरीर जिवंत ठेवण्यासाठी खाणं खावं लागतंच. अन्ननिर्मिती करतांना इतर जीवाला त्रास होतोच. पीडाविरहित अन्ननिर्मिती जवळजवळ अशक्य आहे. त्यामुळे अन्नाचा घास हा पापजनक आहे. म्हणून स्वत:चे खाणेपिणे थांबवून केलेल्या शरीरनाशास आत्महत्या समजण्यात येत नाही. इच्छामरणाची पार्श्वभूमी स्पष्ट असावी म्हणून उपरोक्त माहिती दिली आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
G
Gk Sat, 10/17/2020 - 06:32 नवीन
प्रायोपवेशन , संथारा वगैरे करून करायचेच असेल तर करता येते.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sat, 10/17/2020 - 08:00 नवीन
विद्या बाळांचे आवाहन हा प्रसिद्धीचा सोस वाटतो की प्रायोपवेशन संथारा हा प्रकार प्रसिद्धीचा सोस वाटतो?
  • Log in or register to post comments
G
Gk Sat, 10/17/2020 - 09:18 नवीन
विद्या बाळ ह्यांचा लेख प्रसिद्धी सोस वाटतो ज्याला मरायचेच आहे , तो प्रायोपवेशन करून , संथारा घेऊन मरेल ज्याला खरोखरच मरायचे आहे तो गळफास , विष घेऊनही मरेल पण ह्यांच्या अपेक्षा भलत्याच आहेत , घरात मरण यावे , लगेच मरण यावे , गादी वर झोपून मरण यावे , कुणीतरी साप आणावा , कुणीतरी इंजेक्शन द्यावे , त्याचे बिल कोण भरणार , की तेही सरकारनेच भरायचे ? रेशन कार्डावर दोरी उपलब्ध करून द्या , डेथ सर्टिफिकेट अगदी सहजतेने पोराला मिळावे , त्यावर कारण काय लिहायचे ? आजकाल ईसीजी फ्लॅट लाईन चा कागद जपून ठेवूनच डॉकटर डेथ डिक्लेर करतात , नुसते पल्स बीपी डोळ्यात बेटरी पाडा वगैरेही करतातच , पण हॉस्पिटलात ईसीजी काढणे करतातच , हिला घरी मरायचे , मग हिचा ईसीजी कोण काढणार ? आवा चालली पंढरपूरला , वेशिपासून आली घरा तसे आहे हे मरायचे तर नाही , उगाच सरकार , साप हे आणि ते
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sat, 10/17/2020 - 11:35 नवीन
सन्मानाने मरण्याचा हक्कासाठी चळवळ आहे. ज्याला मरायचेच आहे , तो प्रायोपवेशन करून , संथारा घेऊन मरेल ज्याला खरोखरच मरायचे आहे तो गळफास , विष घेऊनही मरेल हे आक्षेपाचे नेहमीचे मुद्दे आहेत. आत्महत्या व इच्छामरण यात मूल्यात्मक फरक आहे. जीके तथा कृष्णमार्जार आपण त्यांचे इच्छामरणावरील कार्य जाणुन घेउन लिहित आहात असे गृहीत धरतो. मतभिन्नता असणे स्वाभाविक आहे पण ती प्रत्येक वेळी उपहास व तुच्छता या प्रकारेच व्यक्त करावी असे नाही ना! मृत्युशय्येवर असतानाची विचार स्पंदने ही प्रसिद्धीच्या सोसासाठी असतील असे आपल्याला खरोखर वाटते का?
  • Log in or register to post comments
G
Gk Sat, 10/17/2020 - 12:06 नवीन
फार फरक नाही.
  • Log in or register to post comments
G
Gk Sat, 10/17/2020 - 12:25 नवीन
माझे किंवा त्यांचे या विषयातील कार्य तुला माहीत आहे का ? असे सुनावण्याची इच्छा बाळगणे , ह्यालाच तर सोस म्हणतात ना ? मरायचे आहे तर गप मरावे , हॉस्पिटलात आजारी असेल तर डी एन आर भरावे नाहीतर बाहेर असेल तर ज्याला रूढार्थाने आत्महत्या म्हणतात , ते मुकाट्याने करून मोकळे व्हावे. दोन्ही मार्ग समाजाने उपलब्ध करून दिले आहेत.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sat, 10/17/2020 - 15:50 नवीन
ईच्छा मरण आणि आत्महत्या हे दोन्ही करू नयेत या साठी सुखकर परिस्थिती निर्माण करण्यातले समाजाचे अपयश आले तरी जिवन सुखकर करण्याच्या दृष्टीने प्रगती करणे समाजाचे उद्दीष्ट असू शकते, मृत्यू नैसर्गिकपणे झालाच तर त्यातल्या त्यात सूखकर व्हावा पण जिवन क्षमता वाढवण्यानेच समाजाची धारणा होते ती धारणा विस्कळीत करणे कोणत्याही समाजाचे उद्दीष्ट असू नये. यामुळेच समाजाने ईच्छा मरण आणि आत्महत्या पैकी कोणतेही स्विकारावेअसे वाटत नाही. एका अपत्याचा जन्म होताना एका पित्याची बहुधा सकारात्मक भावनिक गुंतवणूक असते, आईची त्यापेक्षाही अधिक असते, त्यांना असा निर्णय घेण्यास साहाय्य करणार्‍या समाजाचीही सकारात्मक भावनिक गुंतवणूक असते, समाजाच्या धारणेच्या प्रत्यक्ष अनुभवातील मर्यादा लक्षात घेऊनही अशी भावनिक गुंतवणूक कमी लेखता येत नाही. व्यक्ती जन्मास येताना सृजक पालक गुरूजन आप्त मित्र समाज देश यांचे अपरिमीत भावनिक ऋण घेऊनच जगात आलेली असते आणि मृत्यूपर्यंत प्रसंगी स्वभावना बाजूस ठेऊन इतरांच्या भावनांसाठी माणसाने अखेरच्या नैसर्गिक श्वासा पर्यंत प्रयत्न करावयास हवेत.
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Sat, 10/17/2020 - 16:32 नवीन
असहमत. {आयन रँड वैगेरे :)) } इतरांनी पण रोगी व्यक्तीच्या भावना बघून त्याचा त्रास कमी केला पाहिजे, त्याच्या "भावनां"ची काळजी घेतली पाहिजे, आणि आपल्या भावना बाजूला ठेऊन रोग्याला सोप्प्यात सोप्प्या आणि समाजमान्य पद्धतीने मोकळे करावे. त्यामुळे सर्क्युलर रेफरन्स होतो आहे असे वाटते.
  • Log in or register to post comments
स
सॅगी Sat, 10/17/2020 - 16:37 नवीन
सहमत आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 10/19/2020 - 06:57 नवीन
हॉस्पिटलात आजारी असेल तर डी एन आर भरावे डी एन आर (DO NOT RESUSCITATE) या फॉर्म ला भारतात कोणताही कायदेशीर आधार नाही. ते फॉर्म भरणारे किंवा भरून घेणारे हे केंव्हाही कायद्याच्या कचाट्यात अडकू शकतात. BC सार्वजनिक न्यासावर कोणत्याही बाबतीत मनाला येईल ते लिहिण्याच्या अगोदर जरा गंभीर पणे विचार करून लिहीत जा. The Do Not Resuscitate (DNR) order is still not documented legal practice in India. It is a verbal communication between the clinician and the patient’s relative or caregiver. The autonomy of the patient also remains a weak concept. Even the right to live a dignified life or die a dignified death has not been extensively discussed. The law is silent or ambiguous on most issues related to end-of-life care. the Indian Journal of Medical Ethics https://ijme.in/articles/do-not-resuscitate-orders/?galley=html#:~:text=The%20Do%20Not%20Resuscitate%20(DNR,also%20remains%20a%20weak%20concept.
  • Log in or register to post comments
G
Gk Wed, 10/21/2020 - 08:46 नवीन
हो , ते अनावधानाने लिहिले.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 10/19/2020 - 06:46 नवीन
प्रसिद्धीचा सोस वाटतो जिथे तिथे पचपच करणं हा पण प्रसिद्धीचा सोस वाटतो मग ती प्रसिद्धी - कु प्रसिद्धी का असेना? any publicity is publicity- good or bad
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 10/19/2020 - 09:25 नवीन
+१ अनुमोदन
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sat, 10/17/2020 - 16:27 नवीन
विद्या बाळ यांच्या मते इच्छामरण म्हणजे जगणे ’नकोसे’ झाले म्हणून नव्हे पण जगणे”पुरेसे ’झाले या भावनेतून असलेला मृत्युचा जाणीवपुर्वक स्वीकार. पुरेसे हे ठरवण्याचा अधिकार अर्थातच त्या व्यक्तीचा.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sat, 10/17/2020 - 19:06 नवीन
मुळ लेख वाचला.. मला तरी हे विचार पटतात.. अगदी माझे हेच म्हणणे आहे.. प्रतिसाद हि बरेचसे वाचले.. काही पटले.. आपला कार्यभाग आटोपला आणि आता आपली गरज नाही असे वाटले तर इच्छा मरण हा मार्ग असावा असे वाटते.. मागे माझ्या शशक कथेत हाच विषय घेतला होता.. शब्द मर्यादा मुळे मात्र जास्त बोलता आले नाही.. उलट तेथे निगेटिव्ह रिप्लाय पहायला मिळाले.. तरी हा विषय महत्वाचा आहे असे मला वाटते.. शशक धागा - विषय सेम असल्याने लिंक देतोय. इच्छा मरण
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sun, 10/18/2020 - 06:29 नवीन
आपला कार्यभाग आटोपला आणि आता आपली गरज नाही असे वाटले तर इच्छा मरण हा मार्ग असावा असे वाटते..
आता आपली गरज नाही हे कुणी ठरवायचे? त्या व्यक्तीने की समाजातल्या अन्य व्यक्तींनी? असा तो तिढा आहे. चौकट राजा यांच्या प्रतिसादात त्याचा काही भाग आहे. विद्या बाळांनी व्यक्त केलेली अखेरची स्पंदने व एकूण आतापर्यंत मांडलेले इच्छामरणाविषयीचे विचार या दोन्हीचा भाग प्रतिक्रियेत येणे इष्ट आहे. काहींना इच्छामरण व त्याच्या समर्थनार्थ मांडलेले विद्या बाळांचे विचार हे अत्तार्किक,नक्षलवादी, गुन्हेगारी विचारांचा प्रसार वाटला. पुढे काहींनी त्यात अविचारी व देशद्रोही ही विशेषणे पण अ‍ॅड केली. जे विचार आपल्याला पटत नाहीत त्या विचारांना अशी विशेषणे देणे हे कुठल्याही वैचारिक चर्चांमधे खर तर अभिप्रेत नसते. तिथे विचारांचे खंडन मंडन अभिप्रेत असत. पण विचार पुर्वक प्रतिक्रिया द्यायच्या ऐवजी इन्स्टंट प्रतिक्रिया देउन मोकळे होतात.मग वितंडवाद चालू होतात. अशावेळी पुर्णविराम देणे चांगले. सुदैवाने काही लोक नंतर तरी विचार करतात. जालीय अस्तित्व अर्थात आयडी व समूह प्रबोधन या लेखात मी त्याचा काही उहापोह केला आहे. वर दिलेल्या मंगला आठलेकर यांच्या जगण्याचीही सक्ती आहे... या पुस्तकात अशा समाजातल्या वेगवेगळ्या प्रतिक्रियांचा आढावा घेतला आहे.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 10/18/2020 - 05:42 नवीन
भारतात कायदेशीर करणे अत्यंत धोकादायक आहे. त्याचा गैर फायदा संपत्ती साठी किंवा बाकी स्वार्थ साठी घेतला जावू शकतो.. इच्छ्य मरण हे फक्त शरीर पूर्णतः निकामी झाले असेल,माणूस खूप वर्ष कोमात असेल,गंभीर आजाराने सर्व अवयव बाद झाले असतील. अशा विशिष्ट परिस्थिती च तो अधिकार दिला गेला पाहिजे.. आणि इच्छा मरण चा अधिकार कोणाला असावा स्वतः त्या व्यक्ती ला की अजुन कोणाला हा पण गंभीर प्रश्न च आहे. आता हत्या हा गुन्हा आहे हा कायदाच ह्या साठी असावा की कोणत्या ही अनैसर्गिक मृत्यू ची पोलिस मार्फत सखोल चोकशी व्हावी. आत्महत्या हा गुन्हा नाही कायद्यानं ठरवलं असते तर आत्म हत्या च्या आडून खून झाले असते आणि त्याची कसलीच चोकशी झाली नसती. त्या मुळे इच्छा मरण विषयी काही निर्णय घेण्ापूर्वी सर्व धोक्याचा विचार होणे गरजेच आहे. माणसाला मारायला ते पण त्या व्यक्ती ला कसलाच त्रास न होता खूप मार्ग आहेत.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sun, 10/18/2020 - 07:59 नवीन
अगदी बरोबर आहे, आत्महत्या / इच्छामरण कायदेशीर नसतानाही खूनाच्या घटनांना आत्महत्या / इच्छामरण दाखवण्याचा प्रयत्न आरोपीपक्षा कडून केला जाताना दिसतो; भारतात काय जगात कुठेही एकदा आत्महत्या काय किंवा ईच्छामरण काय कायदेशीर आणि सार्वत्रिक म्हटले की त्यांना आत्महत्या म्हणून दाखवणे मानवी मन अधिक सहज स्विकारू लागते आणि परिणाम खूनांच्या चौकश्या मागे पडण्यावर होऊ शकतो. त्या शिवाय दोन मोठ्या अनुषंगिक समस्या असतात. १) आत्महत्या किंवा ईच्छामरण अगदी कागदोपत्री साक्ष पुरावे ठेऊन जरी जाहीर केले तरी, आत्महत्या किंवा ईच्छामरण केलेल्या व्यक्तीस ते जगले तर जिवनाची उमेद पुन्हा येऊ शकली असती हि शक्यता शिल्लक राहतेच. २) आत्महत्या किंवा ईच्छामरण अगदी कागदोपत्री साक्ष पुरावे ठेऊन जरी जाहीर केले तरी अगदी अंतीम क्षणी संबंधीत व्यक्तीस मृत्यू एवजी अजून जगण्याची इच्छा झाली आणि व्यक्तीच्या मृत्यूत वेस्टेड इंटरेस्ट असलेल्याने अशी इच्छा जिवनेच्छा दाबली आणि मृत्यू होऊ दिला अथवा चक्क खून केला तर ती आत्महत्या नव्हती खून होता हे कळण्याचे मार्ग संकुचित होऊन जातात. ३) दबाव टाकून किंवा मानसिक अस्थिरतेचा फायदा घेऊन आत्महत्या किंवा ईच्छामरण अगदी कागदोपत्री साक्ष पुरावे तयार करून घेऊन मग इच्छामरण दाखवणे पण प्रत्यक्षात तो क्रम खूनी मनोवृत्तीचा परीणाम असणे संभवते; आत्महत्येस दबाव टाकला होता हे सिद्ध करणे तसेही कठीण प्रक्रीया असते आणि एकदा आत्महत्या/इच्छामरण प्रक्रीया कायदेशीर केली की कुणि दबाव टाकला होता अथवा मानसिक अस्थिरतेचा फायदा घेतला होता हे सिद्धाकरणे आणखीच अवघड होऊन जाते. ४) अगदी मागच्या शतकापर्यंतच्या सती प्रथेचे उदाहरणच घ्या, मानवी समुह कशाचे उदात्तीकरण करतील हे सांगणे कठीण असते शतकोंन शतके भारतीय उपमहाद्वीपातील हिंदू स्त्रीया पतीच्या चितांवर हकनाक जळत राहील्या आणि ज्या मानवी समुहात असे उदात्तीकरण आणि दबाव नव्हते तिथे स्त्रीया जिवंत राहण्याची संधी आणि शक्यता वाढली. एकदा ईच्छामरण कायदेशीर केलेकी कुणालाही कोणासोबतही सती जाण्याची मुभा दिल्यासारखे होणार नाही का? महत्वाने अखेरचा नव्हे पण क्रमाने शेवटचा आक्षेप; एकीकडे सटर फटर व्यक्ती कुठेतरी एखाद्या मागणी साठी स्वतःला जाळून घेण्यापर्यंतचे मार्ग ब्लॅकमेलिंग साठी वापरतात माणूस मेला की मागणीला चेव येऊन दंगली होतात आणि सर्वच व्यक्तिगत मागण्या उचित असतात असे नव्हे सरकारला अनुचित मागण्या मान्य करण्याचे दबाव वाढले तर कोणतेही सरकार सरकार म्हणून चालवणे कठीण होऊन जाऊ शकते. शिवाय नैसर्गिकपणे मानवी स्वभाव हे व्यक्तीपुजक असतात, कोणत्या व्यक्तीची किती व्यक्तीपुजा करतील ते सांगता येत नाही आणि असे व्यक्तीपुजा करुन घेणारे नेतृत्वाने एखादी गैरमागणी मनवून घेण्यासाठी गांधीगिरी म्हणून आमरण ऊपोषणाच्या धाकाने मागण्या पदरात पाडून घेतल्या किंवा अशी आमरण उपोषण करणारी व्यक्ती दगावल्याने सामाजिक अस्थिरता निर्माण होऊन काही दंगली सारख्या विपरीत परिणाम झाले तर त्याची जबाबदारी कोण घेणार ?
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sun, 10/18/2020 - 09:37 नवीन
कुठलाही कायदा केला तरी दुरुपयोग होण्याची भीती ही असतेच. प्रभाकर नानावटी यांचे दोन लेखाची लिंक खाली देत आहे पुन्हा एकदा सुखांत! सन्मानाने मरण्याचा हक्क यात काही चांगले मुद्दे मांडले आहेत.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 10/22/2020 - 14:12 नवीन
दोन्ही लेख छान आहेत. पैकी" सन्मानाने मरण्याचा हक्क" हा लेख खूपच माहितीपूर्ण आहे. धन्यवाद, सर.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 10/22/2020 - 15:33 नवीन
दोन्ही लेख कायद्याच्या दृष्टीने कालबाह्य झालेले असले तरी त्यात उपस्थित केलेले मुद्दे विचार करण्यासारखे आहेत. पहिल्या लेखात म्हटले आहे तसे आता औषधाचा डोस नियंत्रित करून माणूस न मरता त्याची वेदनेतून सुटका करता येते. उदा कमरेच्या मणक्यात गेलेल्या कर्करोगामुळे असह्य वेदना होत असतील तर एक अत्यंत पातळ अशी नळी ( बॉलपेनच्या रिफील च्या अर्ध्या व्यासाची) मणक्यापर्यंत नेऊन त्यातून लांब कालपर्यंत प्रभाव असणारी वेदना नाशके देता येतात ज्यामुळे रुग्ण मृत्यू येईपर्यंत वेदनेपासून मुक्तता मिळवू शकतो. भारतात अशी वेदना मुक्तीचे दवाखाने सरकारी रुग्णालयात सुद्धा सुरु झालेले आहेत.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 10/22/2020 - 15:58 नवीन
दुसऱ्या लेखात श्रीमती अरुण शानभाग बद्दल लिहिलंय त्यात सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने त्यांना मृत्यू देण्यास नकार दिला होता कारण त्यांच्या अनेक सहकारी के इ एम रुग्णालयात त्यांची अतीव काळजीने ३५ वर्षे काळजी घेत होत्या. त्यांच्या इतक्या कार्याला तिलांजली दिली गेली असती आणि याचिकाकर्त्या या त्यांच्या अत्यंत जवळच्या नात्यातील किंवा मैत्रीतील नव्हत्या आणि हे इच्छामृत्यू प्रकरण पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपवण्याची शिफारस केली. २०१५ मध्ये श्रीमती अरुण शानभाग यांचा न्यूमोनिया मुळे मृत्यू झाला. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्णपीठाने २०१८ मध्ये या प्रकरणात निर्णय देताना काही मार्गदर्शक तत्वे घालून दिली आहेत ज्यात सक्रिय मरणास Active euthanasia (इंजेक्शन देऊन किंवा वैद्यकीय उपचाराने) परवानगी नाकारली आहे परंतु निष्क्रिय (इच्छा) मरणास passive euthanasia सशर्त परवानगी दिली आहे. यात त्या व्यक्तीच्या अन्न किंवा वैद्यकीय उपचार ज्यामुळे आयुष्य लांबवले जाऊ शकते अशा गोष्टी थांबवून मृत्यू येण्यास संमती दिली आहे. Passive euthanasia, as it is called, will apply only to a terminally ill person with no hope of recovery, a panel of five judges said. Active euthanasia, by administering a lethal injection, continues to be illegal in India. Said five judges headed by Chief Justice Dipak Misra, “Should we not allow them to cross the door and meet death with dignity? For some, even their death could be a moment of celebration.” The court also permitted individuals to decide against artificial life support, should the need arise, by creating a “living will”. The decision makes it legal for the terminally ill to decide against using life support systems to continue living, and frees the doctors and families of those who slip into incurable comas to halt such measures, in the patients’ best interest.
  • Log in or register to post comments
अ
अनामिक सदस्य Sun, 03/08/2026 - 14:03 नवीन
DNR आणि Living will मधे काय फरक आहे?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 10/19/2020 - 07:08 नवीन
इच्छ्य मरण हे फक्त शरीर पूर्णतः निकामी झाले असेल,माणूस खूप वर्ष कोमात असेल,गंभीर आजाराने सर्व अवयव बाद झाले असतील. अशा विशिष्ट परिस्थिती च तो अधिकार दिला गेला पाहिजे.. माझ्या भावाचा वर्गमित्र जी VJTI मधुन मेकॅनिकल इंजिनियर झाला होता. एकदा ब्रोन्कोस्कोपी करताना त्याचे स्वरयंत्र आकुंचन पावल्याने मेंदू अर्धमृत झाला. गेली ३० वर्षे तो चिरनिद्रेत आहे. बायको त्याची काळजी घेत आहे. शरीर व्यवस्थित आहे. दाढी वाढते. पण चेतना नाही. मुलगा तेंव्हा १ वर्षाचा होता. तो आता मोठा होऊन लग्नही झालेले आहे. अशा माणसाला अधिकार (?) दिला तरी तो अधिकार कसा कार्यवाहीत आणायचा हे कायद्याला सांगता येत नाही.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 10/18/2020 - 09:37 नवीन
उतार वयात शेवटची काहीच वर्ष लोकांची असहाय अवस्थेत जातात. शारीरिक क्रिया करण्यासाठी पण दुसऱ्या वर अवलंबून राहवे लागते. तो जो काळ आहे तो जास्ती जास्त 3 ते 4 वर्षाचा असतो. फक्त ही 3 ते 4 वर्ष अंथरुणावर पडून असल्या मुळे आणि कोणी काळजी घेण्याची जबाबदारी घेत नसल्या मुळे त्या व्यक्ती ला जगवसे वाटत नाही ती त्याची मजबूरी असते . त्या काळात त्याची काळजी घेणारी यंत्रणा असेल तर कोणालाच मरण नको आहे. आत्ताच्या काळात जीवन फास्ट असल्या मुळे,एकत्रित कुटुंब पद्धती नसल्या मुळे अजुन च केविलवाणी स्थिती व्यक्ती ची होते. सरकारी पातळीवर असहाय वृध्द व्यक्ती ची मोफत आणि दर्जेदार व्यवस्था यंत्रणा उभी राहिली तर इच्छा मरण ही कल्पना मागे पडेल. आणि हाच मार्ग योग्य आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 10/19/2020 - 07:01 नवीन
सरकारी पातळीवर असहाय वृध्द व्यक्ती ची मोफत आणि दर्जेदार व्यवस्था यंत्रणा उभी राहिली सरकार जिवंत व्यक्तींची वाजवी पैसे देऊनही व्यवस्था करणे अशक्य आहे तर असहाय वृध्द व्यक्ती ची मोफत आणि दर्जेदार व्यवस्था झाली पाहिजे हि अत्यंत आदर्शवादी अपेक्षा झाली. आणि हि आपल्या आयुष्यभरात पूर्ण होणार नाही.
  • Log in or register to post comments
स
सनईचौघडा Mon, 10/19/2020 - 11:46 नवीन
एवढी चर्चा झाली पण विद्या बाळ यांचा नैसर्गिक मृत्यू झाला की त्यांना je हवं होतं ते साध्य केलंच शेवटी आणि त्यामुळे निधन झालं त्यांच ? हे चर्चेनंतरही कळलं नाही.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Mon, 10/19/2020 - 17:06 नवीन
ट्रीटमेंट नाकारण्याने येणार मृत्यु हा नैसर्गिक समजावा का असा खरा तुमचा प्रश्न आहे का? नक्की काय झाल असेल ते माहीत नाही.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 10/19/2020 - 17:46 नवीन
विद्या बाळ ह्या आजाराने त्रस्त होत्या आणि उपचार सुरू असताना च त्यांचा वयाच्या 84 वर्षी मृत्यू झाला. ठराविक वया नंतर शरीरातील सर्व अवयव जवळ जवळ निकामी झालेले असतात. आणि अशा अवस्थेत त्यांच्या वर उपचार करून ते दुरुस्त होत नाहीत किंवा त्यांची कार्य क्षमता पण वाढत नाही. उपचार करा किंवा करू नका काहीच महिन्यात तो व्यक्ती मरणार असतो उपचार नी तो वाचू शकत नाही. त्या मुळे उपचार थांबवणे म्हणजे इच्छा मरण असे फक्त technically म्हणता येईल पण काही सत्य नाही.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 10/19/2020 - 18:29 नवीन
उपचार थांबवणे म्हणजे इच्छा मरण असे फक्त technically म्हणता येईल पण काही सत्य नाही. असहमत.
उपचार करा किंवा करू नका काहीच महिन्यात तो व्यक्ती मरणार असतो उपचार नी तो वाचू शकत नाही.
दिवस, आठवडे, महिने, वर्ष ... नक्की कसं सांगणार ? इच्छा मरण म्हणजे ठरवलेल्या वेळी खात्रीनं मृत्यू देता आला पाहिजे.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 10/20/2020 - 11:29 नवीन
  • Log in or register to post comments
G
Gk Tue, 10/20/2020 - 17:32 नवीन
1. इच्छा मरणाचे एकूण 4 प्रकार आहेत , पैकी महत्वाचे 2 आहेत , एकाला एक्टिव्ह एथुनिसिया म्हणतात , एकाला पेसिव्ह एथुनिसिया म्हणतात. एक्टिव्ह म्हणजे धडधाकट किंवा आजारी माणसाला कसले तरी इंजेक्शन देऊन मारणे, याला भारतात आज मान्यता नाही व भविष्यातही मिळण्याची शक्यता आलमोस्ट शून्य आहे, त्यामुळे मला आता जगण्यात रस नाही , म्हणून मी अवतार समाप्त करत आहे , वगैरेला कायद्याने काहीतरी साप , इंजेक्शन शोधून काढावे , असे ज्यांना जे वाटते , ते तसे सध्या तरी होणार नाही. त्यांच्यासाठी रूढार्थाने आत्महत्या हाच मार्ग उपलब्ध आहे. 2. पेसिव्ह म्हणजे काय ? तर आजारी मनुष्य ऑलरेडी लाईफ सपोर्टवर असेल तर त्याचे ते सपोर्ट बंद करणे , उदा व्हेंटिलेतर बंद करणे , ऑक्सिजन बंद करणे इ इ 3. मला गंभीर रोगात फार मोठे उपचार करून जगवू नका वगैरे इच्छा पत्र लिहिणे हा पेसिव्ह चाच एक प्रकार / भाग होईल. त्याला भारतात अंशतः परवानगी आहे , बहुतांश वेळेला आर्थिक कारणाने रुग्ण , नातेवाईक असे निर्णय घेत असतात . अर्थात , यावर एक उपाय आहे , सरकारी हॉस्पिटलात मोफत उपचार घेण्याचा, तोही त्याच पत्रात उल्लेख करून रुग्ण , नातेवाईक तेही नाकारून घरी जातात , ह्याला DAMA म्हणतात म्हणजे डिस्चार्ज अंगेंस्ट मेडिकल एडव्हाईज म्हणतात , मग त्याचे जे घरी किंवा रस्त्यात होईल ते होईल. महागडे उपचार टाळून किरकोळ उपचार करत हॉस्पिटल मध्येच शेवट होऊ द्यावे , असेही करतात , तेदेखील या पेसिव्ह प्रकारातच येईल. 4. आता महत्वाचा प्रश्न आहे , सही कोण कोण व कुठे करणार ? असे इच्छा पत्र लिहून तीन साक्षीदार वगैरे सही घेऊन लिहून ठेवा , वगैरे कुणी म्हणत असेल तर असे पत्र कायद्यानुसार शून्य आहे. असे पत्र म्हणजे काही आधार कार्ड नव्हे की एकदा काढून लेमीनेट करून ठेवले की झाले. हे पत्र त्या हॉस्पिटलायझेशन मध्येच सही करून द्यावे लागते म्हणजे एडमिशन झाल्यानंतर त्या हॉस्पिटल मध्येच , ते त्या हॉस्पिटलच्या नमुन्यात किंवा हॉस्पिटल देईल त्या केस पेपरवर तारीख वार वेळ घालून लिहायचे असते , आधीच लिहून खिशात ठेवायचे नसते. कायद्यानुसार दोन साक्षीदार व एक मॅजिस्ट्रेट हजर असावा लागतो , शिवाय हॉस्पिटल इंचार्ज , ट्रीटिंग डॉकटर आणि तिथले डॉकटर पेनेल ह्यांच्या सह्या असतात. साक्षीदार दोन असतात , पैकी एक रुगणाचा नातेवाईक असतो व एक हॉस्पिटलचा स्टाफ असतो. हॉस्पिटल बाहेरच्या कुणा तरी 3 लोकांच्या सह्या घेऊन आधीच केलेले लेटर व्हॅलीड होत नाही. 5. रुगणाचीही सही लागते , रुग्णा ऐवजी नातेवाईक सही करू शकतो , पण फक्त 4 च कारणांनी रुग्ण मायनर असेल , बिलो 18 रुग्ण कोम्यात असेल रुग्ण मानसिक दृष्ट्या विकलांग असेल रुगणाच्या त्या हातालाच काहीतरी झाल्याने रुग्ण सही करू शकत नसेल ह्यातले कारणही त्या पत्रात लिहावे लागते. 6. एकदा दिलेले पत्र फक्त फक्त त्या हॉस्पिटलायजेशन मध्येच चालते , थोडा बरा झाला म्हणून रुग्ण घरी घेऊन गेले व पुन्हा एडमिट केले , तर पुन्हा नवीन लेटर लिहावे लागते. म्हणून असे कुणास वाटत असेल की इच्छा पत्र ह्या नावाने असे पत्र लिहून ठेवा , तर अशा हॉस्पिटल बाहेरील पत्राचा काडीमात्र उपयोग होत नाही. मुळात इच्छापत्र वगैरे संकल्पना येथील लोकांत 2015 च्या सुमारास आल्या, 2020 येईतो काही कायदे बदलले गेले आहेत.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Wed, 10/21/2020 - 01:29 नवीन
स्वेच्छामरण कायदेशीर करण्याचा प्रयत्न अनेक देशात चालू आहे \पाश्चिमात्य देशात जिथे खूप उदारमतवादी समाज आणि खूप "प्रथेनुसार/ धार्मिक तत्वावर चालणार समाज " अशी दोन टोके आहेत तिथे यान्चायत यात तुंबळ वैचारिक युद्ध चालू आहे "असिसिस्टेड युथेनेशिया" यावर डॉकटर फिलिप निष्की यांनी बरेच काम केले आहे हे कायदेशीर केले तर त्याचा दुरुपयोग कोणी करणार नाही ना आणि ते कसे टाळता येईल हा एक अगदी व्यवहारी प्रश्न भेडसावतो परंतु खास करून रोमन कॅथॉलिक लोकांचा याला विरोध आहे तो केवळ धार्मिक कारणामुळे (गर्भपाताला जसा विरोध तसाच काहीसा ) व्यवहारी कारणांमुळे नाही ..इतर धर्मांसाचे यावर काय भाष्य आहे कोण जाणे
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Wed, 10/21/2020 - 08:38 नवीन
+१ आपल्या येथील ही काही तुरळक अपवाद वगळता विचारवंत, धर्ममार्तंड या वर काही बोलत असल्याचे दिसत नाही.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 10/22/2020 - 16:34 नवीन
मृत्यू विषयी माणसाची मत ठाम नसतात. खरे सांगायचे तर कोणत्याच व्यक्ती ल मरावे असे वाटत नाही. जगायची खूप इच्छा प्रत्येकाची असते . म्हणून जगण्यासाठी स्वतः चा स्वाभिमान माणूस हरावून बसतो. मरणाच्या भीती नी सर्व त्याग करू शकतो जो त्याला जीवदान देईल त्याच्या साठी. मला आता जगायचे नाही ,माझे सर्व कार्य पूर्ण झाले आहे तर आता मला मरण ध्या असा सरळ विचार जगातील 1 पण माणूस करत नसेल. तर नैराश्य आल्यावर. रोगांनी त्रस्त झाल्यावर. च थोड्या वेळा साठी मरावसे वाटत पण काही वेळातच तो विचार निघून जातो आणि परत जगावं असे वाटते. असे जर मत बदलत असेल तर कायदा काय करणार.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 10/23/2020 - 19:10 नवीन
चौथा कोनाडा,
आपल्या येथील ही काही तुरळक अपवाद वगळता विचारवंत, धर्ममार्तंड या वर काही बोलत असल्याचे दिसत नाही.
मी स्वयंघोषित धर्ममार्तंड आहे. मी माझं मत सांगतो. त्याचं काये की कुठल्याशा वैदिक ग्रंथात (की संहितेत) म्हटलंय की आयुष्याच्या अखेरपर्यंत माझी इंद्रियं व्यवस्थित चालू राहोत. ती तशी चालण्यासाठी योग व प्राणायाम करायला हवा. मग मरायची वेळ आली की बरोबर ऊर्ध्व लावता येतो. हे असं महिनोनमहिने शरीरात अडकून पडावं लागंत नाही. 'जीवेत शरद: शतं' वगैरे याच विचारधारेचे भाग आहेत. आता सद्यस्थितीकडे वळूया. मानवी जीवन जरी अमूल्य असलं तरी आत्म्याची इच्छादेखील विचारांत घ्यायला हवी. त्यामुळे जीव जर संक्रमण शिबिरात अडकून पडला असेल तर त्याला पुढे जायला किंवा मागे यायला मदत करावी असं माझं मत आहे. जीव गेलाय हे कसं ठरवायचं याविषयी एक युगमान्य निकष आहे. कृतयुगात हाडं नाहीशी झाली की जीव गेल्याचं समजंत. त्रेतायुगात देहावरचं मांस झडलं की मृत समजण्यात येई. द्वापारयुगात चर्मविघटन म्हणजे कातडीस भोकं पडली की जीव गेल्याचं धरंत. तर कलियुगात श्वास थांबला की माणूस मृत समजावा, असं वचन आहे. यानुसार श्वासोत्तेजक ( = व्हेंटिलेटर ) वापरून जीव जगवणे अनुचित आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Fri, 10/23/2020 - 19:25 नवीन
मग मरायची वेळ आली की बरोबर ऊर्ध्व लावता येतो
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 10/23/2020 - 19:45 नवीन
संजय क्षीरसागर, अनेक योगी लोकांनी असा ऊर्ध्व श्वास लावून जीव सोडला आहे. पण मला नक्की प्रक्रिया माहीत नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Sat, 10/24/2020 - 03:55 नवीन
आयुर्वेदात श्वासाचे महाश्वास, उर्ध्वश्वास, छिन्नश्वास, तमकश्वास, क्षुद्रश्वास असे पाच प्रकार सांगितले आहेत. श्वासांच्या वेगाची भिन्नता व लक्षणांची तीव्रता यांच्यावरून हे प्रकार पाडले आहेत. वायूची (प्राणाची) उर्ध्वगति वेगानें होणें, हे श्वासाचे सामान्यरुप पांचहि प्रकारांना साधारण असें असतें. पैकी महाश्वास, उर्ध्वश्वास आणि छिन्नश्वास हे मृत्युशी निगडीत आहेत. महाश्वास - मृत्युच्या वेळचे नैसर्गिक शेवटचे श्वास. ह्यावर कोणाचेही अधिपत्य नाही. उर्ध्वश्वास श्वासोच्छ्वासाची गती आणि लय उर्ध्व दिशेला लागून प्राणाचा (वायूचा) सहस्त्रार चक्राकडे वेगाने प्रवास हा उर्ध्वश्वास. ह्यावर साधनेच्या बळाने कंट्रोल करता येऊन प्राण सहस्त्रारचक्रातून विलग करता येऊ शकतो. जे मुक्तावस्थेतल्या योग्यांना शक्य होते. त्यासाठी कर्मसंस्कारांचे निर्मूलन (मोक्ष) झालेले असणे अत्यंत महत्वाचे आहे! - (साधक) सोकाजी
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sat, 10/24/2020 - 09:46 नवीन
माहितीबद्दल धन्यवाद, सोकाजी! :-) आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव गुरुवार, 10/29/2020 - 18:39 नवीन
परमहंस योगानंदांच्या आत्मचरित्रात त्यांनी अशा एका योग्याचा उल्लेख केला आहे. शेवटचे प्रवचन, महाप्रसाद वगैरे आटपुन त्यांनी "आता हे शेवटचं क्रियायोगाचं आवर्तन आटपुन मी देह ठेवतोय" असं डिक्लेअर करुन श्वासासंबंधी असंच काहि तरी करुन देहत्याग केला.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sat, 10/24/2020 - 09:49 नवीन
व्वा, माहितीपुर्ण +१ !
तर कलियुगात श्वास थांबला की माणूस मृत समजावा, असं वचन आहे. यानुसार श्वासोत्तेजक ( = व्हेंटिलेटर ) वापरून जीव जगवणे अनुचित आहे.
अश्या प्रकारचा युक्तिवाद इच्छामरणाच्या कायदेशीर प्रकरणात केला असावा का या बद्दल उत्सुकता !
मग मरायची वेळ आली की बरोबर ऊर्ध्व लावता येतो.
ज्यांना ऊर्ध्व लावणे ही विद्या / कला अवगत नसेल तर त्यांना मदत करावी लागणार. बाह्य यंत्रणा प्र"दान" करावी लागणार !
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sat, 10/24/2020 - 17:19 नवीन
स्वेच्छामरणाच्या चळवळीचा भाग म्हणून काही कार्यक्रम होत असतात. एका कार्यक्रमात नंतरच्या अनौपचारिक चर्चात एकाने मुद्दा मांडला की शरीर ही माझी संपत्ती आहे . कायद्याने प्रत्येकाला आपल्या संपत्तीचा विनियोग करण्याचा अधिकार आहे. मग माझ्या शरीराचा विनियोग मी कसा करायचा हे मीच ठरवणार. माझा तो अधिकार आहे. त्यांना मी म्हटल सध्या दयामरणावर भागवून घेउ. आपला समाज इतका पुढे जायला बराच कालावधी लागेल. तत्वत: तुमचे म्हणणे मान्य आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 10/31/2020 - 08:05 नवीन
शरीर ही माझी संपत्ती आहे . कायद्याने प्रत्येकाला आपल्या संपत्तीचा विनियोग करण्याचा अधिकार आहे. संपत्ती दुसऱ्याला दिली आणि नंतर असे समजले कि या माणसाने अफरातफर करून हि संपत्ती मिळवली आहे तर ती संपत्ती मूळ मालकाला परत केली जाऊ शकते. परंतु एकदा प्राणज्योत मालवली तर त्या शरीरात परत प्राण फुंकणे हे सध्या तरी शक्य नाही यामुळेच फाशीची शिक्षा देण्याच्या अगोदर कायद्यातील सर्व रस्ते आणि पळवाटा बंद झाल्यावरच फाशी दिली जाते. यासाठीच अफझल गुरूला फाशी देण्याच्या अगोदर अपरात्री सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने आपले दरवाजे उघडले होते. एखाद्या वस्तूचा विमा त्या वस्तूच्या वाजवी किमतीपेक्षा जास्त असू शकत नाही.किंवा एकाच वस्तूचे दोन विमे असू शकत नाहीत परंतु मानवी आयुष्याचा विमा काही अपवाद सोडले तर कितीही किमतीचा असू शकतो आणि एकाच व्यक्तीचे अनेक कंपन्यांतर्फे अनेक विमे असू शकतात. हे विमा कायद्यातील अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शक तत्व आहे. तेंव्हा हा मुद्दा गैरलागू आहे.
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Sun, 10/25/2020 - 06:08 नवीन
गर्भपातासंदर्भात पण "स्त्रियांचा आपल्या शरीरावरचा हक्क" वि. "अर्भकाचा जगायचा हक्क" वाद आठवला. इथे "शरीरावरचा हक्क" आणि "जगण्याचा हक्क" यात कॉन्फलिक्ट आहे. याबाबतीत अमेरिकेत कित्येक वर्षे हा वाद फक्त आणि फक्त अर्भक हा "मनुष्य" असतो का नाही आणि त्यामुळेच, अर्भकाला मारणे नैतिक कि अनैतिक इतपतच होता. त्यामुळे गर्भपाताकडून बोलण्यासाठी "माणूस म्हणजे काय, माणूस कोणत्या पायरीवर निर्माण होतो" इतकाच वाद चालू असे, आणि अर्भकाचे माणूस नसणे यावरच पूर्ण मुद्दा अवलंबून होता.जो कि तर्कांच्या चाचणीत खरा नव्हे, अर्भकाला माणूस न म्हणण्याचे काहीच कारण नाही, कारण ते पोटाबाहेर आल्यावर निःशंक माणूस असणार आहे. पण मुळात स्त्रीचा bodily convinience हा अर्भकाच्या जगण्याच्या हक्काला मागे टाकतो का ? जर हो, तर अर्भक मनुष्य आहे मान्य केले तरी काही फरक पडू नये. स्त्रीचे शरीरावरचे स्वातंत्र्य, अनुषंगाने गर्भपात करण्याचे, हे अर्भकाच्या जिवाच्या हक्कापेक्षा जास्त आहे हे दाखवण्यासाठी एक विचित्र परिस्थिती कल्पली जाऊ शकते. एका व्यक्तीला जर दुसऱ्या व्यक्तीशी डायलिसिस सदृश्य प्रक्रियेसाठी जोडलं, कि व्यक्ती अ च्या मूत्रपिंडाचा वापर करून व्यक्ती ब जगत आहे, व्यक्ती अ ने हे कनेक्शन तोडले तर व्यक्ती ब मरून जाईल. हि अरेंजमेंट व्यक्ती अ च्या परवानगीने किंवा परवानगी शिवाय झाली असू शकते. व्यक्ती अ प्रत्येक क्षणी व्यक्ती ब च्या खोलीतच असायला हवा, तो इतरत्र जाऊ शकत नाही. व्यक्ती ब नैसर्गिकरीत्या किंवा इतर कारणांनी मरेपर्यंत हे असेच चालेल. तर, व्यक्ती अ ला हे अर्थातच जाचक आहे. त्याला स्वतःचे शारीरिक स्वातंत्र्य गमवावे लागले आहे. तर, व्यक्ती अ ला हे कनेक्शन तोडून निघून जाण्याचा हक्क असावा का ? म्हणजेच, व्यक्ती अ चे शारीरिक स्वातंत्र्य व्यक्ती ब च्या जगण्यापेक्षा कमी, कि जास्त महत्वाचे ? यातून अर्थातच व्यक्ती अ च्या कनेक्शन तोडण्याचा हक्क मान्य आहे असे उत्तर मिळते. म्हणजेच, इतरत्र कोठेही शारीरिक स्वातंत्र्य डावलून इतरांचा जगण्याचा हक्क बजावला जात नाही. म्हणजेच गर्भपातावर बंदी आणल्यावर केवळ गर्भार स्त्रीवरच स्वतःचा bodily convinience डावलून जीवाचे रक्षण करण्याची जबाबदारी टाकली जाते, जी इतरत्र कोठेही दिसत नाही. ह्या व्हिडिओमध्ये हा मुद्दा मांडला गेला आहे-https://youtu.be/c2PAajlHbnU तसे जर गर्भपाताबद्दल मांडले जाऊ शकते, तर निःशंकपणे स्वतःला मारून टाकण्याबद्दल पण मांडले जाऊ शकते. जर bodily convinience हा सर्वोच्च हक्क असेल, तर कायद्याने स्वतःला मारण्याचा हक्क निःसंशय असावा.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 10/31/2020 - 07:58 नवीन
अर्भकाचा जगायचं हक्क सर्वोच्च मानला तर बलात्कारातून झालेली संतती सुद्धा स्त्रीला वाढवावीच लागेल. यात पूर्ण नऊ महिने तिच्यावर मानसिक बलात्कार चालूच राहील. शिवाय आपल्या रक्त मांसा वर वाढलेले मूळ हे आपल्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाचे आहे हे रोज पाहत राहणे हा पुढची अनेक वर्षे ( कदाचित आयुष्यभर) होत राहणार मानसिक बलात्कार आहे. दुर्दैवाने अमेरिकेत काही राज्यात असा कायदा आहे कि स्त्रीने त्या राज्यातच नव्हे तर दुसऱ्या राज्यात जाऊन केलेला गर्भपात सुद्धा बेकायदेशीरआहे. https://www.amnesty.org/en/latest/news/2019/06/abortion-laws-in-the-us-10-things-you-need-to-know/ यामुळे भारतीय कायद्यात अर्भक जोवर स्वयंपूर्ण होत नाही (प्रसूती केल्यास स्वतः श्वास घेऊन जगू शकत नाही) तो वर म्हणजे साधारण २८ आठवड्यापर्यंत गर्भपातास परवानगी दिलेली आहे. यात स्त्रियांची पाळी अनियमित असली तर सुरक्षित असे अंतर ठेवून गर्भपात २० आठवडे पर्यंतच कायदेशीर आहे.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव गुरुवार, 10/29/2020 - 18:45 नवीन
इच्छा मरणाच्या कायदेशीर परवानगीचे काय होईल माहित नाहि... पण हि चर्चा वाचुनच एखाद्याला मरायची इच्छा व्हायची.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Fri, 10/30/2020 - 05:21 नवीन
तशी इच्छा झाली तर ती इच्छा सुप्तावस्थेत होती अस म्हणता येईल. तशीही डेथ इन्स्टिंक्ट असते काहींबाबत.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 19 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 19 hours ago
  • सुंदर !!
    1 day 20 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 20 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा