Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

आयपीएल 2020

क
कपिलमुनी
Sat, 09/19/2020 - 12:33
🗣 61 प्रतिसाद
Ipl यंदाची आयपीएल कोरोनामुळे उशिरा सुरू झाली आहे. यंदा UAE मध्ये सामने खेळवले जाणार आहेत . वेळापत्रक Time table यंदा आयपीएल कोण जिंकणार ? सामन्यातील घडामोडी , उत्तम खेळ यांच्या चर्चेसाठी धागा!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 23253 views

🗣 चर्चा (61)
क
कपिलमुनी Sat, 09/19/2020 - 12:35 नवीन
आज चेन्नई जिंकेल असे वाटत आहे. रोहित शर्मा विरुद्ध धोनी अशा दोन कुल कॅप्टनची लढत आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 09/19/2020 - 12:37 नवीन
मुंबई जिंकेल असे वाटते, चेन्नईची टीम लैच थकलेली वाटत आहे यावेळी.
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Sat, 09/19/2020 - 13:48 नवीन
पाहणार आहे. चांगला खेळ पाहायला मिळेल ही अपेक्षा. आवडते खेळाडू कुठल्याही संघात असतील तरी पाहायला मजा येते. खास कुणाला खास असा पाठिंबा नाही.
  • Log in or register to post comments
न
नीलस्वप्निल Sat, 09/19/2020 - 15:41 नवीन
मुंबईच जिंकेल :)
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 09/19/2020 - 15:44 नवीन
जिकडे तिकडे कोव्हीड सोडून दुसरं काही नाही. अतिशय कंटाळा आला आहे. (डॉक्टर असल्याने रोजच कुणी ना कुणीतरी फोन करून काहीतरी विचारत असल्यामुळे या विषयापासून सुटका होत नाहीये) त्यात हा एक अतिशय स्वागतार्ह बदल आहे. दोन तीन तास निखळ आनंद.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 09/19/2020 - 16:27 नवीन
मागचे चार पाच हंगाम विशेष रस नव्हता. फक्त चेन्नईच्या मॅच बघायचो. धोनिसाठी. पण मागचे सहा महिने कोरोना ने सामान्य जगण्याची वाट लावल्यामुळे यंदा आवर्जून बघणार. गो Thalaiva!!
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 09/19/2020 - 18:10 नवीन
फारच कमी स्कोर. रोहित शर्माने अगदी थकल्या सारखा कॅच दिला. ते पण पियूष चावला ला! चावलाने मात्र बांधून ठेवलं पार. लुंगी अन चहर ने अपेक्षित चांगली बॉलींग केली. पोलार्ड अन पंड्या ने फलंदाजीत निराशा केली. गोलंदाजीत भरून काढतात का बघू. पुढच्या डावात फाफ, वाटसन, बुमराह वर लक्ष असेल. अवांतर : माझ्या टीमचे पॉइंट्स ३९१ आहेत पहिला डाव संपल्यावर. ४९९२८/५११३५६
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Sat, 09/19/2020 - 18:27 नवीन
मजा येते आहे..बीसीसी आय president म्हणून उपस्थित असलेल्या सौरव दादाला बघायला आनंद वाटला. प्रेक्षक नसेल तरी रेकॉर्डेड जल्लोष ऐकवत आहेत त्याची गंमत वाटली. :)
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Sat, 09/19/2020 - 19:07 नवीन
चेन्नई चे कमबॅक! रायडू - जखमी वाघ??
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sat, 09/19/2020 - 19:13 नवीन
Betway ला आज चेन्नई लावली होती.. जिंकेल.. Dream 11 ला सर्व लावलेल्या contest ला 1st आहे बघू.. जिंकलो तर 400 + win :-))
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sat, 09/19/2020 - 19:59 नवीन
जिंकलो सगळ्या. Contest :-)
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sun, 09/20/2020 - 08:07 नवीन
माझ्या टीमचे शेवटचे points ५४३ होते. १४३,३३३/५११,४५६
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sun, 09/20/2020 - 15:10 नवीन
माझी एकच team होती, 662 पॉईंट्स झाले.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 09/19/2020 - 19:32 नवीन
आज स्कोर कमी आहे, संधीही कमी आहे. GN All -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ब
बेकार तरुण Sun, 09/20/2020 - 07:28 नवीन
अभिनंदन गणेशा..... मुंबई तर काल थकले भागले वाटत होते... क्षेत्ररक्षण तर जॉन्टी या वयातही त्यांच्याहुन नक्की चांगले करुन दाखवेल असे प्रकार चालु होते.. बादवे.... थोडे मोठे मैदान असल्याने काल ६ फार पहायला मिळाल्या नाहीत.... समालोचक गंमतीने रोहित शर्मा (आउट झाला तेव्हा) म्हणत होते की हा शॉट वानखेडेवर षटकार होता :) आज दिल्ली जिंकेल असं वाटत आहे...
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sun, 09/20/2020 - 15:18 नवीन
धन्यवाद.. चुकून लागले लक.. आजही माझी वेगळी team तुमच्या पेक्षा.. Kxip. Will see.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sun, 09/20/2020 - 16:30 नवीन
पृथ्वी शॉ हे एक वाया गेलेले टॅलेंट वाटते. चाइल्ड prodigy. विनोद कांबळीची आठवण करून देतो हा पोरगा. पंत पण खेळाच्या कौशल्याच्या मानाने लई आगाऊ वाटतो. पण हा बहुतेक या पिढीचा अंगभूत गुण असावा. आम्हाला तर दादाने लॉर्ड्स वर शर्ट काढला याचंच लई कौतुक वाटलेले. हेटमयार ने निराशा केली. दिल्लीची सुरुवात अतिशय खराब झालीय. शमी अपेक्षेप्रमाणे उत्तम बॉलिंग करतोय.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sun, 09/20/2020 - 17:53 नवीन
बऱ्यापैकी स्कोर करून दिला पंजाबला. १५७. अगदी एकतर्फी वाटणारी मॅच लढण्यासारखी करून ठेवली. Stoinis ५३(२१) जबरदस्त slogging खेळी. जॉर्डन ४-०-५६-० देशी खेळाडू असता तर परत खेळण्याची शक्यता संपली असती.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Sun, 09/20/2020 - 16:37 नवीन
आज पंजाब जिंकणार
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sun, 09/20/2020 - 17:15 नवीन
आज पण मी लावलेल्या सगळ्या. Contest ला top ला आहे.. बघू 400+ मिळू शकतील आज पण
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sun, 09/20/2020 - 18:52 नवीन
अश्विन नाहिये माझ्याकडे.. तो हरवू शकतोय.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sun, 09/20/2020 - 20:16 नवीन
नाही, just टाकलेले परत आले :-)) मयंक अगरवाल ने आणली होती match हातात.. 3 बॉल 1 run झाला नाही.. Jorden च्या over ने पार घालवली match.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Mon, 09/21/2020 - 02:39 नवीन
stoinis, अगरवाल, रबाडा निकाल इकडून तिकडे फिरवत होते. मजा आली.
  • Log in or register to post comments
ब
बेकार तरुण Mon, 09/21/2020 - 10:18 नवीन
काल अगरवाल अन रबाडा भारी खेळले..... स्टॉयनिसने शेवटच्या २ षटकात कमाल फटकवले.... बॉलरची दया येते टी-२० प्रकारात :(
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Mon, 09/21/2020 - 16:49 नवीन
बंगलोर ची सुरुवात तर उत्तम झालीय. तरी अजून कोहली अन एबी यायचेत. २०० नाही झाले तर बंगलोर वाईट खेळले असं म्हणावं लागेल. आणि हैदराबाद कडे तितका जोराचा पाठलाग करणारी फलंदाजांची फळी दिसत नाहीये.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Tue, 09/22/2020 - 07:22 नवीन
पहिल्या दहा षटकात जवळपास नव्वद धावा असताना आणि मधल्या फळीत विराट अन एबी असून पुढच्या दहा षटकात सत्तर धावा निघाल्या. एकूण बळी फक्त पाच होते. तरी बंगलोर ला एकूण फक्त १६५ ची मजल मारता आली. तिन्ही सामन्यात १६० च्या मागे पुढे धावा झाल्या आहेत. कदाचित खेळपट्टी तशी असावी. १६६ चं टार्गेट असताना हैदराबाद १५ षटकात २ बाद १२० अशा सुस्थितीत होते. पुढील पाच षटकात ४६ धावा आवश्यक असताना एकतर लागोपाठ बळी जात राहिले. आणि सैनी, चहल आणि दुबे यांनी विशेष हालचाल करू दिली नाही. चहल ने बेयरस्ट्रो आणि विशेषतः विजय शंकर ला आउट केले, ते दोन्ही बॉल मस्त टाकले होते. सैनी ने रशीद खानला आउट केले ते सुद्धा बघण्यासारखे. पदिक्कल, एबी आणि बेयरस्ट्रो तिघांनी दर्जेदार फलंदाजी केली. विनाकारण धोका न पत्करता, वेडेवाकडे शॉट्स न मारता तिघांनी अर्धशतके केली. इथून पुढे देखील १६०-१७० हा norm राहील असं वाटतंय.
  • Log in or register to post comments
न
नीलस्वप्निल Tue, 09/22/2020 - 20:23 नवीन
चेन्नई हरली आज :):):) ... शेवटचे ६ चेन्डू मस्त होते दोन्हि डावात
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Wed, 09/23/2020 - 09:10 नवीन
पहिल्या सिजन ला वॉर्न अन नंतर द्रविड असताना राजस्थान आवडता संघ होता. असो.. काल संजू Samson अन जोफ्रा आर्चर ने अशक्य हाणामारी केली. राजस्थान २१६ हे त्यांच्यासुद्धा कल्पने पलीकडे असेल. लुंगी अन सर जडेजा महाग पडले. वॉटसन अन फाफ ने मस्त टोलेजंग फटकेबाजी केली, नंतर धोनी ने पण नजरेचे पारणे फेडले. कदाचित सुरुवातीची विजयची संथ फलंदाजीला महागात पडली. हा पराभव चेन्नई ला महागात पडू नये ही अपेक्षा.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Wed, 09/23/2020 - 09:16 नवीन
पहिल्या सिजन ला वॉर्न अन नंतर द्रविड असताना राजस्थान आवडता संघ होता. असो.. काल संजू Samson अन जोफ्रा आर्चर ने अशक्य हाणामारी केली. राजस्थान २१६ हे त्यांच्यासुद्धा कल्पने पलीकडे असेल. लुंगी अन सर जडेजा महाग पडले. वॉटसन अन फाफ ने मस्त टोलेजंग फटकेबाजी केली, नंतर धोनी ने पण नजरेचे पारणे फेडले. कदाचित सुरुवातीची विजयची संथ फलंदाजीला महागात पडली. हा पराभव चेन्नई ला महागात पडू नये ही अपेक्षा.
  • Log in or register to post comments
ब
बेकार तरुण Wed, 09/23/2020 - 12:21 नवीन
चेन्नई ला काहीच महागात पडत नाही, कुठल्याच आयपी एल मधे... ते नेहमीच फायनल ला पोचतात ;) कालचे ग्राउंड फारच छोटे वाटत होते... एवढे सामने पाहिले आहेत शारजाला झालेले, पण कालच्याईतके छोटे मैदान कधी वाटले नव्हते..... कदाचित पूर्ण झाडच बॅट म्हणुन घेउन येतात आजकाल त्यामुळेही तसे वाटत असेल.... आज के के आर अन मुंबई....
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Wed, 09/23/2020 - 14:58 नवीन
ह्म्म तरीच आधीचे सामने १५०-१६० च्या घरात आणि हा दोन्ही डाव २००+ झाला.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 09/23/2020 - 16:07 नवीन
पंजाब सोडले तर बाकीच्या match चे अंदाज बरोबर आले माझे, काल राजस्थान ने मस्त win केली match. आज मी kkr कडून आहे., बघू.. Dream 11 ला रोहित नाही घेतला. बघू किती महागात पडते ते
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 09/23/2020 - 16:56 नवीन
मी घेऊन कॅप्टन केला , आज गडबडीत सुर्यकमार ऐवजी तिवारी ला घेतला, आज मुंबई जिंकावी ही इच्छा
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 09/23/2020 - 17:03 नवीन
माझा last min change is Rohit, mavi, bolt To Narine, warrier, rana हरणार आज मी :-)
  • Log in or register to post comments
न
नीलस्वप्निल Wed, 09/23/2020 - 16:42 नवीन
आज मुंबईच जिंकेल :)
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Wed, 09/23/2020 - 18:09 नवीन
सुनील नारीन चा खेळ आवडतो. रोहित चांगला खेळला. पन्नास षटकात जितक्या सहजतेने २०० करतो तितकाच सहज २० षटकात शतक करू शकतो. आणि अगदी सहज. दिनेश कार्तिक ला कर्णधाराची खेळी करावी लागेल.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 09/24/2020 - 16:04 नवीन
आज पुन्हा मी पंजाब बरोबर. Dream 11 Kl and pooran.. captain and vc काल हरलोय :-)
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Fri, 09/25/2020 - 15:59 नवीन
आज लाडक्या S. P. मुळे चेन्नई ला सपोर्ट माझा
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Fri, 09/25/2020 - 16:16 नवीन
आज दिल्ली फेव्हरीट
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Fri, 09/25/2020 - 16:21 नवीन
आज माझी आधी दिल्ली होती पण चेन्नई केली नंतर.. Dream 11 ला मात्र दिल्लीचे captain vc आहेत. काल 600 जिंकले एकदाचे dream 11 ला :-)
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Fri, 09/25/2020 - 16:34 नवीन
दिल्लीची संथ पण मजबूत सुरुवात. पृथ्वी शॉ रिस्क न घेता खेळतोय. तरी बरा स्ट्राईक रेट आहे. आता अंदाज सांगणं अवघड आहे. पण दिल्ली १५०-१६० जायला हवी आणि चेन्नई ने आरामात पार करायला हवं. धोनी चा यष्टी मागचा प्रेझेन्सच किती भरोसेदायक वाटतो.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Fri, 09/25/2020 - 17:59 नवीन
दिल्लीसाठी समाधानकारक स्कोर असेल. पण दहा शतकात बिन बड ८८ वरुंन दोनशे व्हायला हवे होते. हातात पुरेशा विकेट्स असूनही कॅप्टन अय्यर अती संथ खेळला. खेळपट्टी तशी होती, चेन्नई ची balling चांगली होती की तो अती बचावात्मक खेळला... चेन्नई चा लाईन अप बघता आवाक्यातल टार्गेट आहे. फाफ, केदार, वॉटसन, जडेजा आणि स्वये श्री धोनी असताना १७६ साठी धापा टाकायची गरज भासायला नको.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 09/26/2020 - 04:01 नवीन
ढोणी कुंथत कुंथत खेळतो हल्ली.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Sat, 09/26/2020 - 05:09 नवीन
वयानुसार जमत नाही त्याला, काँट्रॅक्ट असल्याने आयपीएल खेळतोय. यंदा चेन्नई फेव्हरेट नाही
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 09/26/2020 - 09:39 नवीन
तरी त्याच्याहून अर्ध्या वयाच्या आयपीएल स्टार्सपेक्षा त्याचा स्टॅमिना चांगला वाटतो. (थकल्याचं आश्चर्य वाटलं ते रोहित शर्माचं!)
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 09/26/2020 - 15:51 नवीन
दोन्ही संघ विशेष आवडते नाहीत. आज फक्त हाणामारी बघायची.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 09/26/2020 - 16:00 नवीन
विषयी सहानुभूती वाटते. धोनीच्या किंचित आधी खेळायला सुरुवात केली त्याने. भारतीय कसोटी संघात कार्तिक चा कॅप नंबर २५०, तर धोनीचा २५१. एकदिवसीय संघात कार्तिक १५६ आणि धोनी १५८. आज धोनी कहा आ गया और तुम कहा रह गये..
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sat, 09/26/2020 - 17:05 नवीन
आज kkr आहे माझी team. Dream 11, Warner captain. Gill, vc
  • Log in or register to post comments
ब
बेकार तरुण Sun, 09/27/2020 - 08:39 नवीन
गिल मस्त खेळला काल... एकदम संयमित फलंदाजी..... गरज नव्हती तेव्हा मारझोड फटके अजिबात कुलुपबंद करुन १ - १ घेत राहिला.... फार वेळा बघायला मिळत नाही आय पी एल मधे हे :) बाकी रसेल ला १ किंवा २च ओव्हर्स मिळतात गोलंदाजीला , पण तो खूपच रोखुन धरतो १८ - २० ओव्हर्स मधे....
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Sun, 09/27/2020 - 16:03 नवीन
आपली हरी पत्ती राजस्थानवर
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 21 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 22 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 22 hours ago
  • सुंदर !!
    1 day 22 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 22 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा