मोदीजी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!!
आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र दामोदरदास मोदींचा आज सत्तरावा वाढदिवस. त्या निमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा!
मोदींचं व्यक्तिमत्व मुख्यतः खूप वादग्रस्त आहे. त्यांची कारकीर्द खूप कष्टाची राहिली आहे. सतत आव्हानांचा सामना करत त्यांनी खूप काही साध्य केले आहे. जे काहीच शक्य वाटत नव्हते, ते मुद्दे सोडवले गेले आहेत. काही नवे मुद्दे वाढले आहेत. अजून खूप काही करायचे बाकी आहे. काहीही केले किंवा न केले तरी विरोध होतोच.
नव्या माध्यमांमुळे सजगता वाढली आहे.
बाकी इतिहास आपल्या सर्वांसमोर आहेच. त्यामुळे पुनराव्रुत्ती टळत आहे.
यानिमित्ताने मनात काही प्रश्न येतात..
१. त्यांनीच सुरू केलेल्या प्रथेनुसार पुढील निवडणुकीनंतर ते पद न घेता ते सल्लागाराच्या भूमिकेत राहतील काय? त्यांना नातलगांची सोय लावायची नसल्याने चिकटून राहणार नाहीत असे वाटते.
२. त्यांच्यानंतर त्यांच्या पक्षात सक्षमपणे देशाचा कारभार कोणता नेता सांभाळू शकेल?
३. पुन्हा भाजपला सत्ता न मिळाल्यास दुसरा कोण पंतप्रधानपद योग्य प्रकारे भूषवू शकेल?
४. वरील मुद्दा तीन नुसार स्थिती मुळात येऊ शकते का? आणि त्यामुळे त्यांनी केलेले चांगले काम बंद तर होणार नाही ना?
५. त्यांच्या काय चुका झाल्या असे वाटते आणि उर्वरित साडेतीन वर्षांत कुठले मुद्दे त्यांनी प्राधान्याने हातात घ्यायला हवेत?
मिपाकरांना काय वाटते जाणून घ्यायला आवडेल.
(अवांतर टाळण्यासाठी आधीच धन्यवाद..कारण सर्वच मिपाकर जबरदस्त सूज्ञ आहेत! )
🗣 चर्चा
(89)
G
Gk
Sat, 09/19/2020 - 16:53
नवीन
नेशनल रुरल ड्रिंकिंग वोटर सप्लाय स्कीम केंद्र सरकारही चालवते
( MBBS च्या पी एस एम च्या पुस्तकात यादी असते अशा स्कीमची)
आता म्हणशील , संडासाच्या पाण्याचा विषय आहे म्हणून.
भारतात सगळ्या प्रकारच्या पाण्याला एकच कनेक्शन असते
प्यायला वेगळे , कमोडला वेगळे हे मालदीवमध्ये मी पाहिले आहे , इथे एकच कनेक्शन असते
- Log in or register to post comments
स
सॅगी
Sat, 09/19/2020 - 17:04
नवीन
आणि ते कनेक्शन देण्याची जबाबदारीही फक्त केंद्राचीच का?
मग महापालिका वगैरे काय काम करतात?? फक्त जेसीबी घेउन तोडकाम??
स्थानीक स्वराज्य संस्था नावाचा काही विषय शिकला की नाहीत तुमच्या डिग्र्या मिळवताना??
- Log in or register to post comments
ड
डीप डाईव्हर
Sat, 09/19/2020 - 17:05
नवीन
ऑ....पण मी तर भारतातच, महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यात राहतो. आमच्या बिल्डीन्गीत तरी प्यायला वेगळे आणि कमोडला वेगळे पाणी येते बुवा. महाविकास आघाडी सरकारने आमचा भाग मालदीव मधे नेऊन ठेवला कि काय आता? जाणता राजा काहीही करू शकेल बुवा! लई पावरबाज माणूस हाये त्यो!
- Log in or register to post comments
G
Gk
Sat, 09/19/2020 - 19:19
नवीन
सोसायटीला नगरपालिका एकच कनेक्शन देते , त्यातून शुद्धच पाणी देते
आता सोसायटी इतर वापरायला तेच पाणी टाकीत साठवून ठेवते
आणि पुरवते आणि प्यायचे पाणी मात्र पालिकेच्या वेळेतच बेसिनच्या नळातून तुम्ही घेत असणार , सोसायटीही तेंव्हाच आपली टाकीही भरून घेत असणार
किंवा अजून कायतरी यंत्रणा असेल , पण 2 प्रकारचे पाणी नगरपालिका पुरवत नाही
- Log in or register to post comments
G
Gk
Sat, 09/26/2020 - 08:31
नवीन
Public sector units claimed to have constructed 1.4 lakh toilets in government schools as part of a Right to Education project, but almost 40% of those surveyed by the Comptroller and Auditor General of India (CAG) were found to be non-existent, partially constructed, or unused. In an audit report presented in Parliament on Wednesday, the CAG said over 70% did not have running water facilities in the toilets, while 75% were not being maintained hygienically
https://www.thehindu.com/news/national/40-of-toilets-surveyed-by-cag-in-govt-schools-non-existent-unused/article32680816.ece
**
- Log in or register to post comments
श
शा वि कु
गुरुवार, 09/17/2020 - 13:58
नवीन
मराठवाडा मुक्ती दिनाच्या सुद्धा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Fri, 09/18/2020 - 11:33
नवीन
१. Modi took birth twice – first on 29th August 1949 (on his degree) and second on 17th September 1950 (available in public domain).
२. He sold tea at the age of 6 years in Vadnagar railway station, But Vadnagar only had tracks passing through it. The actual railway station was built in 1973, when Modi was 23 years old.
३. He was underground during emergency but did his graduation from Delhi University in 1978. Before his degree in 1978 and even 10 years thereafter, degrees were hand written by the University staff. The font that was patented by Microsoft in 1992, was used to print his degree in 1978. His degree was printed on a Sunday, when offices were closed.
४. He did Masters of Entire Political Science from Gujarat University in 1983 without the graduation certificate from Delhi University.
५. He took admission in the Masters’ of Entire Political Science degree alone, gave the exam alone, and took the degree alone. So far, no student or professor has claimed to have studied with Modi.
आणि मोदीजींच्या एमए असल्याचा हा उघड पुरावा > लिहून दिलेल्या कागदावरचं स्पेलींग वाचतायंत Modi Spells Strength as 'STREANH.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Fri, 09/18/2020 - 16:37
नवीन
झोपलेला समाज, झोपल्याचं सोंग घेतलेल्या अधिकारी वर्ग, स्वतः मुद्दाम जागरण करुन दुसर्याच्या आरामाचं मातेरं करणारे उपटसुंभ, आणि सीमेच्या आतुन-बाहेरुन देशाला पोखरणारे वाळवी सदृश जीव.. या सर्वांना आवष्यक ति मात्रा आवष्यक त्या प्रमाणात देण्याचं शहाणपण दाखवणारा नेता भारताला योग्य वेळी लाभला.
थँक्स मोदिजी.
जीवेत शरदः शतम्
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sat, 09/19/2020 - 11:09
नवीन
आपल्या अतिशय लायक उमेदवाराला केवळ 750 मते मिळाली हे पाहून काही लोकांची फार म्हणजे फारच जळजळ होते आहे.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sat, 09/19/2020 - 11:09
नवीन
आपल्या अतिशय लायक उमेदवाराला केवळ 750 मते मिळाली हे पाहून काही लोकांची फार म्हणजे फारच जळजळ होते आहे.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sat, 09/19/2020 - 11:10
नवीन
आपल्या अतिशय लायक उमेदवाराला केवळ 750 मते मिळाली हे पाहून काही लोकांची फार म्हणजे फारच जळजळ होते आहे.
- Log in or register to post comments
G
Gk
Sat, 09/19/2020 - 15:31
नवीन
#ऑगस्टावेस्टलैंडहेलीकॉप्टर
नरेंद्र मोदी ने 2018 में अगस्ता वेस्टलैंड मामले में क्रिश्चियन मिशेल के भारत प्रत्यर्पण के वक्त कहा था कि 'राज़दार आ गया है अब सारे राज़ खुलेंगे'......
उस वक्त मिशेल के प्रत्यर्पण को ऐसे प्रस्तुत किया गया था जैसे कि उसके बोलते ही सोनिया गाँधी ओर राहुल गाँधी जेल में होंगे.....….
सीबीआई ने आज अगस्ता वेस्टलैंड वीवीआईपी हेलीकॉप्टर घोटाले में सप्लीमेंटरी चार्जशीट दाखिल कर दी है इस चार्जशीट में एक भी नेता का नाम शामिल नहीं है।
( Girish Malviya )
#vss
https://www.jansatta.com/national/cbi-files-supplementary-chargesheet-in-agustawestland-vvip-chopper-scam-name-christian-michel-james-rajeev-saxena/1523237/
भक्तो ताली बजाव
- Log in or register to post comments
क
कोहंसोहं१०
Sat, 09/19/2020 - 16:01
नवीन
आपल्याकडे एक म्हण आहे - हाथी चले बाज़ार कुत्ते भोके हज़ार
हजारो भुंकणाऱ्यांकडे लक्ष न देता ज्या अविरतपणे मोदी देशसेवा करत आहेत त्याबद्दल त्यांचे आभार आणि त्यांना दीर्घायु लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Sat, 09/19/2020 - 17:13
नवीन
देशाचे राजकारण ज्या प्रश्नावर अखंड चालू शकते ते प्रश्न भिजत ठेवण्याची काँग्रेस ची रित मोदी सरकार नी बंद केली
१,) काश्मीर प्रश्न
हा असा प्रश्न जो पाकिस्तानी आणि भारतीय राजकारण्यांना खूप उपयोगी पडतो ..
हा प्रश्न देशातील सर्व प्रश्न विसरायला लावतो.
370 रद्द करून आणि काश्मीर चे विभाजन करून हा प्रश्न पुढे भविष्यात सौम्य होवून संपुष्टात येईल..
हिंदू चे काश्मीर मध्ये स्थलांतर होत जावून धार्मिक समतोल निर्माण झाला की स्थानिक पातळीवर पाकिस्तानी सैन्य ला मदत मिळणार नाही.
2) राम मंदिर हा प्रश्न नव्हताच पण त्याला गंभीर स्वरूपाच्या प्रश्नात रूपांतर केले गेले तो भिजत ठेवला असता तर राजकारणी लोकांना जन्म भर निवडणूक जिंकायला दुसऱ्या मुद्धा ची गरज लागली नसती.
पण तो प्रश्न मोदी सरकार नी निर्णायक पने सोडवला.
3) तीन तलाक विषयी कायदा करून मुस्लिम स्त्रिया वरील अन्याय दूर केला..
ही तीन महत्वाची काम मोदी सरकार नी केली.
पण आर्थिक बाबतीत मोदी सरकार साफ
अपयशी ठरले.
बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली.
देशाची अर्थ व्यवस्था कधी नाही एवढी घसरली.
आर्थिक स्तरावर हे सरकार पूर्णतः अपयशी ठरले.
उत्तम अर्थ मंत्री न मिळणे हे कारण असावे किंवा.
उद्योग पती नी जी bjp ची पाठराखण केली होती त्याची परतफेड करण्यासाठी मोदी नी ठाम निर्णय घेतले नसावेत.
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Sat, 09/19/2020 - 18:17
नवीन
आपण गेली ५० वर्षे भारतातील शेवटच्या गरीबापर्यंत बँकसुविधा देण्यासाठी मनापासून प्रयत्न करत होतो. पण वाढत्या लोकसंख्येमुळे कायम ३० कोटी लोक बँकसुविधेपासून लांब रहावयाचे.
हे काम मोदींनी २ वर्षात पूर्ण केले. याचे महत्व अजून लोकांच्या लक्षात आलेले नाही. पण २०-२५ वर्षांनी हा एक मैलाचा दगड समजला जाईल.
“₹१ मधले फक्त १४ पैसे लाभार्थींपर्यंत पोहोचतात.” या राजीव गांधींच्या सुप्रसिध्द वाक्यावर हा खऱ्या अर्थाने रामबाण उपाय आहे. मोदींच्या काळात लाभार्थींना मिळणऱ्या १४ पैशांत वाढ होण्याची शक्यता मला जास्त वाटते. सोनिया गांधी, राहूल गांधी, ममता बॅनर्जी वगैरेंच्या कारकिर्दीत हे होऊ शकणार नाही असेही वाटते.
हीच अपेक्षा माझी देवेंद् फडणवीस यांचेबाबत आहे. इतरांकडून ती पुरी होणे अशक्य वाटते. अपवाद फक्त पृथ्विराज चव्हाण यांचा. पण त्यांना बहुमत मिळणे अवघड व पक्षश्रेष्ठींकडून पूर्ण स्वातंत्र्य मिळणे अवघड.
मोदींनी २०२४ ची निवडणुक लढवावी. पहिल्या ३ वर्षात उत्तराधिकारी निवडून त्याला उपपंतप्रधान बनवून तयार करावे. त्यानंतर होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकीतून राष्ट्रपती बनावे.
- Log in or register to post comments
G
Gk
Sat, 09/19/2020 - 18:48
नवीन
फडणवीस म्हणजे डाळ प्रकरणात शोभा झालेल्यांचे कोण म्हणे ?
जनधन योजना काढून अकाउंट काढले तरी अशा कोणत्या योजना आहेत ज्यात डायरेक्त पैसे मिळतात ?
आणि मग काँग्रेस असे पैसे वाटत होती तर म्हणे करदात्यांचे पैसे बरबाद होत होते म्हणे
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Sat, 09/19/2020 - 21:14
नवीन
पुतणे.
या फडणवीसबाई महाराष्ट्रात शिवसेना + भाजप सरकारात पुरवठा मंत्री होत्या. त्यांना रेशनिंगमधे कसा भ्रष्टाचार होतो हे साधारण माहीत होते. मंत्री झाल्यावर त्यांनी अभ्यास करून अशी एक पध्दत तयार केली की, त्यामुळे कोणाला भ्रष्टाचार करताच येऊ नये. त्यामुळे हितसंबंधीयांचे धाबे दणाणले. या नवीन पध्दतीने डाळ घोटाळा झाल्याचा बिनबुडाचा आरोप त्यांचेवर केला गेला. एका वर्तमानपत्राने केलेला आरोप बाकी वर्तमानपत्रांनी उचलून धरला. त्यावेळी सोशल मिडिया वगैरे काही नव्हते.
मग एक मखलाशी करण्यात आली. मुख्यमंत्र्यांकडून बाईंना असे सांगण्यात आले की, आपण न्यायालायीन चौकशी करू. त्यात तुम्ही निरपराध ठरणार हे नक्कीच आहे. पण सरकारची प्रतिमा मलीन होत आहे. तेव्हा तुम्ही तो कोर्टाचा निर्णय होईपर्यंत राजीनामा द्या. बाईंनी राजीनामा दिला. भ्रष्टाचार चालूच राहीला.
२० वर्षांनी खटल्याचा निकाल लागला. कोर्टाने बाईंना नुसते निर्दोष सोडले नाही तर कोर्टाने बाईंची तारीफ केली. निकालपत्रात स्पष्टपणे म्हटले की, बाईंनी सुचवलेली योजना परिपूर्ण आहे. ही जर अंमलात आणली तर भ्रष्टाचार होऊच शकत नाही. ही योजना फक्त महाराष्ट्रात नव्हे तर देशभर लागू केली जावी.
बाईंना मंत्रीपदाचा राजीनामा जरूर द्यावा लागला. पण बदल्यात पुतणा मुख्यमंत्री बनला आणि त्याने पाच वर्षे पूर्ण की हो केली.
ही जुनी गोष्ट तुमच्यामुळे मला मांडता आली तसेच डाळ प्रकरणात कोर्टाने बाईंच्या चांगल्या कामाची प्रशंसा करून त्यांच्यावरचा कलंक पुसला हेही मांडता आले याबद्दल तुम्हाला धन्यवाद.
🙏
- Log in or register to post comments
ब
बाप्पू
Sun, 09/20/2020 - 01:04
नवीन
धन्यवाद शाम भागवत..
आपण सांगितलेली गोष्ट बऱ्याच राजकारणी लोकान्कडून ऐकली आहे.
बाकी आता मोगाभाऊ काही प्रतिसाद देणार नाहीत कारण त्यांना फक्त काडी टाकून मजा बघण्यातच जास्त रस असतो..
- Log in or register to post comments
G
Gk
Sun, 09/20/2020 - 03:17
नवीन
कायच्या काय.
घोटाळा 1997 सालचा ना ?
वीस वर्षांनी म्हणजे 2017 ला कोर्टाचा निकाल लागला का ? कोणत्या कोर्टाने निकाल दिला ?
- Log in or register to post comments
व
वामन देशमुख
Sat, 09/19/2020 - 18:14
नवीन
देशासाठी आजवरचे सर्वाधिक उपयुक्त ठरलेले लोकनेते, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना, त्यांच्या वाढदिवसानिमित्त दीर्घायुरारोग्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
जय जवान जय किसान
जय जवान जय किसान जय विज्ञान
||जय जवान जय किसान जय विज्ञान जय श्रीराम ||
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Sun, 09/20/2020 - 06:40
नवीन
आपण कोणी तारणहार आहोत अशी मोदी यांनी स्वतः:ची प्रतिमा अनावश्यकपणे निर्माण केली ही त्यांची खूप मोठी चूक झाली आहे. भारत देशात खास करून पी एम हे पद भारताचे सर्वेसर्वा पद आहे वा भारताची राज्यघटना डॉ आंबेडकर यांनी एकहाती लिहिली आहे हे दोन मोठे गैरसमज आहेत . त्यामुळे काही चांगले झाले की पी एम पदाचा उदोउदो करायचा , आंबेडकरांना देवाच्या पातळीला नेऊन सोडायचे वा काही विपरीत घडले की या दोन्ही गोष्टीबद्दल नापसंती व्यक्त करायची असा खाक्या भारतीय जनतेचा दुर्दैवाने आहे.
भारत देशाची प्रमुख समस्याच लोकशाही व लोकसंख्या ही आहे . काही विद्वान लोक ह्या दोन गोष्टी भारताची बलस्थाने आहेत असे मानतात. स्वातंत्र्य आधी की समाजसुधारणा आधी असे वाद पूर्वी झाले आहेतच . त्यासाठी काही वर्षे तरी लोकशाहीचे विसर्जन हा मार्ग आहे जरी ती जगातील एक उत्तम राज्यपद्धती असली तरी . भारताचे आर्थिक प्रष्ण २००० वर्षाचे जुने आहेत. ते असे एकाएकी संपणारे नाहीत. भारत व चीन यांची लोकसंख्या फार पुर्वीपासूनच अतिरिक्त आहे हे सत्य नाकारता येत नाही.
आता काळानुसार हिंदू मुसलीम संघर्ष वगरे कमी झाले असले तरी वर्ग संघर्ष वाढले आहेत. आर्थिक निकषावर आरक्षण झाले नाही ही सर्वात मोठी घोडचूक भारत देशाने केली आहे ! तिचा गुंता आता सोडवणे ब्रह्मदेवालाही शक्य नाही ! आर्थिक वाटचालीत सरकार हा एक फक्त अनेक खेळाडूपैकी एक खेळाडू असतो हे अर्थशास्त्राचे मूळ तत्वच भारतातील कित्येकाना मान्य नाही ना राजकारण्यांना , ना नोकरशाहीला , ना उद्योगपतींना , ना कामगारांना , ना सामान्य लोकांना ! त्यामुळे मी आता काहीतरी जादू करून भारताला कसे सामर्थ्यवान करतो पहा अशी दर्पोक्ती पी एम पदावरून केली गेली आहे. इथे इतके अंतरविरोधी गट आहेत की लोकशाहीत एकाचा उद्धार करावा तर दुसरा गट तुमचा उद्धार करायला मोकळा.कामगार लोकांबरोबर उत्तम पगाराचे करार करून आर्थिक विषमता दूर करणारे उद्योजक , कार्यक्षम कर्मचारीव कामगार ,कायद्याचे पालन करणारे राजकारण्याच्या दबावाखाली ना येणारे नोकरशहा , पैसे ना बुडविणार्या बँका ,राजकारण हे करियर आहे पण धंदा नव्हे हा फरक समजणारे लोकप्रतिनिधी देव व धर्म या कल्पना आहेत पण जोपर्यंत जगात सर्व देश एकत्र येत नाहीत तोवर तरी राष्ट्र हे एक वास्तव आहे हे स्वीकारणारे सामान्या जन या साऱ्या मानासिक समस्या आहेत .त्या एखादा पी एम काय सोडवणार कप्पाळ ?
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Sun, 09/20/2020 - 07:14
नवीन
कुठलीच जुनी समस्या सुटत नाहीये का?
समस्या फक्त वाढतच चालल्या आहेत का?
माझ्या हयातीतच सगळ्या समस्या सुटल्या पाहिजेत असं काही बंधन स्वत:वर घालून घेतले आहे का?
मी फक्त कुतूहल म्हणून विचारतो आहे. तुमच्या प्रामाणिकपणावर तसेच भारतावरच्या प्रेमावर शंका अजिबात घेत नाहीये.
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Sun, 09/20/2020 - 07:48
नवीन
प्रत्येकाला दोन पातळीवर समस्या असतात . एक व्यक्तिगत व एक सामाजिक .व्यक्तिगत पातळीवरच्या समस्या आपण एक तर स्वतः:ची प्रगती करून सोडवू शकतो किंवा आहे ही प्रगती हीच समाधानकारक आहे असे आपण अध्यात्म मांडू शकतो . आपली परिसराविषयी किती संवेदना जागृत आहे याचा एक जन्मजात संस्कार आपल्यावर असतो . काही वेळेस ही संवेदना चांगल्या माणसांच्या सहवासाने देखील येते. उदा घ्यायचे झाले तर बिल गेटस यांचे घ्या. त्यांच्या वयक्तिक काही समस्यां नाहीत पण सम्वेदनाशील मनामुळे त्यांच्यापुढे सामाजिक समस्या मात्र नक्कीच आहेत. अगदी हीच स्थिती काही लहानशा पातळीवर माझी आहे. याचे संवेदनेतून अभय बंग ,प्रकाश आमटे या सारखे वेडे घडतात . भारत देशात समस्या सोडविल्या जात नाहीत असे नाही. नेहरू म्हणत माझ्या समोर ४० कोटी समस्या आहेत . समस्या या सर्वच जगात सर्व च सरकारे सोडवीत असतात . वीज, पाणी . आरोग्य ,दळणवळण या समस्या भारतात सोडविण्याचे प्रयत्न खचितच चालू आहेत. मानसिकतेचे काय ? बाकी मी आणि माझे कुटूंब हाच जगाचा आरंभ व शेवट असे मानणारे जगात काय कमी आहेत ...... ?
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Sun, 09/20/2020 - 08:15
नवीन
भारताचे आर्थिक प्रष्ण २००० वर्षाचे जुने आहेत. ते असे एकाएकी संपणारे नाहीत. हे वाक्य वर आलेच आहे !
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Sun, 09/20/2020 - 07:25
नवीन
चीन चे आकारमान भारताच्या तिप्पट आहे.
आकारमानाचा विचार केला तर भारताची लोकसंख्या जगात सर्वात जास्त आहे.
अमेरिका सारखा देश भारताच्या 7 पट मोठा आहे आणि लोकसंख्या यूपी आणि बिहार ची मिळून आहे तेव्हढीच असेल.
पाकिस्तान उत्तर प्रदेश पेक्षा आकारानं तीपटी पेक्षा जास्त मोठा आहे लोकसंख्या आहे 20 कोटी आणि उत्तर प्रदेश ची 22 कोटी.
लोकसंख्या हाच भारता समोरील सर्वात मोठा प्रश्न आहे.
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Sun, 09/20/2020 - 07:59
नवीन
एकदा जरी आठ दिवस आपण परदेशी जावून आलो की आपल्याला डोंबिवली वा कल्याणासारख्या पुण्यासारख्या शहरातील भेसूर दाटीची भीती वाटायला लागते. योगायोगाने ( योगायोग कसला डोस्क्याचा म्हणा ) हीच शहरे करोनाची माहेरघर झाली आहेत. चीनचे आकारमान भारतापेक्षा मोठे तर आहेच पण कुणालाही कितीही पोरे निर्माण करायची मुभा नाही हे तेथील वास्तव आहे ! भारतात रस्त्यावर जे लोक झोपून भटके जीवन कंठतात त्यांना बहुतेकाना तीन ते चार पोरे असतात . याचा शरीर संबंध ते कुठे करीत असतील याचा ही प्रश्न पडावा ..!! आज माझा कयास इथेच लिहून ठेवतो .. अकटोबर अखेर भारत जगातील सर्वात जास्त करोना ग्रस्त देश असेल हे नक्की .करोना झाला तरी जगायची शक्यता आहे पण उपासमार झाली तर कोण जगवील या प्रष्णाचे मूळ लोकसंख्येतच आहे !
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Sun, 09/20/2020 - 09:16
नवीन
विकास ची गंगा उलटी वाहत आहे काही दशकं पासून असे वाटत नाही का?
जगात इंडस्ट्रियल क्रांती झाली आणि विकासाची फळ सर्वच देशात पडली.
त्या मुळे तेव्हा वीज नव्हती आज वीज आहे.
असला प्रतिवाद नको.
जगातील प्रत्येक देशाची च फरकाने प्रगती झाली त्याला भारत अपवाद नाही.
विकासाची गंगा उलटी वाहत आहे ह्याची काही उदाहरणे.
1) 80 ते 90 च्या दशकात महाराष्ट्र मध्ये सहकारी दूध डेअरी,साखर कारखाने, गुळ उत्पादन हे उद्योग जोरात होते.
आज काय अवस्था आहे .
दूध डेअरी,साखर कारखाने, गूळ उत्पादन हे सर्व उद्योग गैर कारभाराचे शिकार बनून अत्यंत कमजोर झाले आहेत.
2) एक काळ असा होता की st महा मंडळ,मुंबई ची बेस्ट सेवा सर्वोत्तम अवस्थेत होत्या आज त्यांची अशी अवस्था आहे की कधी ही बंद होतील.
3) काही दशकं पूर्वी नद्या स्वच्छ होत्या,जमिनी मधील पाणी प्रदूषण विरहित होते आणि मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होते.
आज काय अवस्था आहे.
नद्या , नाले प्रदूषित झाले आहेत.कारखान्यातून निघणारे विषारी रसायने पाण्यात सोडली जात आहेत,शहरांचे सांड पणी काहीच प्रक्रिया न करता नदीत सोडले जात आहे.
देशातील जवळ जवळ सर्व नद्या प्रदूषित झाल्या आहेत.
काही वर्षातच शुद्ध पाणी मिळणे ही समस्या निर्माण होवू शकते.
4) धरण आणि कालवे निर्माण करून जमीन पाण्या खाली आणली गेली .शेतीला 24 वीज काही दशकं पूर्वी उपलब्ध होती आज काय अवस्था आहे.
कालवे धरण ह्यांची दुरुस्ती नाही.पणी वाया जात आहे,वीज फक्त 12 तास तीन पण रात्रीच उपलब्ध आहे.
ह्या क्षेत्रात नवीन असे काहीच काम झाले नाही.
उद्याही system कधी ही अडचणीत येवून शेतीला पाणी पुरवठयासाठी कठीण होवून जाईल.
5) काही दशकं पूर्वी नोकऱ्या उपलब्ध होत्या,नोकरी लागल्या नंतर ती टिकण्याची शास्वती होती,कंत्राट पद्धत नव्हती .
कामगार हे कंपन्या नियुक्त करायच्या आणि त्यांना सर्व सुविधा दिल्या जायच्या
आज काय अवस्था आहे.
1 जागे साठी 1000 लोक उपलब्ध आहेत.
कामगार ना कंपन्या नियुक्त करत नाहीत कंत्राट दिले जाते.
तिथे नोकरी ची शास्वती नाही ,किमान वेतनाची शास्वती नाही.
६) काही दशकं पूर्वी शिक्षण हे स्वस्त होते ,सरकारी शाळा कॉलेज ह्यांचा दर्जा उच्च होता.
अगदी अती उच्च शिक्षण सुद्धा बौद्धिक क्षमतेवर कमीत कमी पैशात मिळत होते.
टक्के वारी चा फुगा फुगवलेले नव्हता.
आज काय अवस्था आहे सरकारी शाळा ,कॉलेज शेवटची घटका मोजत आहेत.
अगदी kg साठी पण हजारो रुपये लागत आहेत.
उच्च शिक्षण हे फक्त पैसे असतील तरच होवू शकतात.
खर्च वाढला पण शिक्षणाचा दर्जा काय आहे.
तो घसरत चालला आहे.
उत्तम दर्जा चे विद्यार्थी निर्माण च होत नाहीत.
7) एक्स्प्रेस वे झाला काही दशकं पूर्वी आणि मुंबई आणि पुणे,सातारा हा प्रवास जलद झाला.
आज काय अवस्था आहे विविध ठिकाणी अर्धवट काम सोडून दिली आहेत,रडते भयंकर खराब आहेत.
8) लोकसंख्या चा विस्फोट झाला आहे,खेड्या तून शहरात स्थलांतर खूप वाढले आहे.
काही दशकं पूर्वी मुंबई सारखे शहर नितांत सुंदर होते त्याची आज अवस्था काय आहे.
पुण्याची अवस्था काही दशकं पूर्वी आणि आज काय आहे.
बकाल झाली आहेत शहर.
काही ml पावूस शहरांना पाण्यात बुडव त आहे.
खूप आहे संगण्या सारखे.
ही सर्व उदाहरणे बघून विकासाची गंगा परत उलटी वाहत आहे असे का म्हणू नये.?
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Sun, 09/20/2020 - 09:49
नवीन
विकास ची गंगा उलटी वाहत आहे काही दशकं पासून असे वाटत नाही का?
जगात इंडस्ट्रियल क्रांती झाली आणि विकासाची फळ सर्वच देशात पडली.
त्या मुळे तेव्हा वीज नव्हती आज वीज आहे.
असला प्रतिवाद नको. मी अगदी हेच म्हणणार होतो ! सांप्रत मी अनेक देशांचे प्रवासाचे व्हिडीओ एकामागून एक पाहात आहे. त्यात असे जाणवते की परदेशात गुन्हेगारी नाही असे नाही पण सामान्य लोकात भारतासारखी बेशिस्त नाही. एकदा ओव्हर ब्रीज बांधा व दहा वर्षात मेट्रो साठी पाडा असा प्रकार नाही ! विकासात गैरव्यवस्थापन हे भारत देशाचे पेटंट ठरावे ! फुटपाथ असेच बांधायचे की लोकांना त्यातील टाईल्स चोरी करून नेता याव्यात. पूल असेच बांधावेत की ते पडावेत . कारखाने असेच बांधावेत जे केमिकल्स नदीत सोडतील . अशीच वीज व्यवस्था असावी जीमध्ये भूमिगत वायर असूनही चार चार तास वीज जावी. रस्ते असेच बांधावेत जे एकाच मोसमात उखडतील ,त्यावर स्पीड ब्रेकर असेच बांधावेत ज्यायोगे वेग कमी होईल पण पाठदुखी वाढीस लागेल. बागा अशा बांधाव्यात जिथे कारंजी बंद पडून पालापाचोळा साठलेला असेल. पूल असे बांधावेत ज्याखाली पार्किंग ना करता कोणीही दुकाने थाटायला मुभा मिळावी . यादी मोठी आहे ...... असे बारीक सारिक गोष्टी सामान्य माणसाला जाणवतात या मन की बात मध्ये का येत नाहीत याचे दु:ख आहे !
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Sun, 09/20/2020 - 09:52
नवीन
जीवनास अत्यंत आवश्यकता असलेले घटक.
हवा, पाणी,आणि जमीन.
हवा.
देशातील हवेच्या प्रदूषणाची पातळी सतत वाढत आहे सरकार ठोस पावले उचलत नाही.
पाणी.
जलस्रोत कमी होत आहेत जी काही उपलब्ध आहेत त्यांचे प्रदूषण करणे चरम सीमेवर आहे.
काही दिवसांनी जलस्रोत उपलब्ध च राहणार नाहीत.
जमीन.
नापीक बनत चालली आहे, माती मध्ये अत्यंत घातक रसायने मिसळत आहेत.
काही वर्षांनी त्या जमिनी ची उपजावू ताकत
पूर्ण नष्ट होवू शकते..
ह्या तिनी क्षेत्रात तरी सरकार नी खंबीर आणि ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे.
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Sun, 09/20/2020 - 11:01
नवीन
मस्त.
मोदींकडून लोक अपेक्षा करताहेत हे पाहून बरं वाटल.
🙂
२०१४ पर्यंत वाट पाहूया.
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Sun, 09/20/2020 - 11:40
नवीन
२०१४ पर्यंत वाट पाहूया..........? विकासाची गंगा उलटी करायची का शामराव ,,, ? )))))
- Log in or register to post comments
ज
जानु
Sun, 09/20/2020 - 15:44
नवीन
सर्व साधारण भारतीय समाजाच्या सवयी.
1. वैयक्तिक स्वार्थाच्या जागी जगातील सर्वात कुटील बुद्धी वापरणारा.
2. देश आणि समाज या बाबतीत सर्वाधिक कमी विचार आणि आठवण करणारा.
3. आपल्या खऱ्या शुभचिंतनकारावर सगळ्यात जास्त तक्रार आणि नाराजी व्यक्त करणारा.
4. आपल्या त्रास देणाऱ्या आणि गुन्हा करणाऱ्यास लवकर विसारणारा.
एका ठिकाणी वाचलेले आठवण ठेवले होते. फार आवडले.
- Log in or register to post comments
G
Gk
Sun, 09/20/2020 - 18:27
नवीन
AHMEDABAD: As many as 450 school municipal school teachers paraded as fake CEOs to impress international delegates at the Vibrant Gujarat Global Summit 2017.
According to a report published in Gujarat Samachar on Wednesday claimed that several aided school teachers were assigned ‘special duty’ and were told to pretend as corporate tycoon and CEOs.
व्हायब्रन्ट गुजरात च्या जाहिरातीत 450 स्कुल टिचरना सी इ ओ चा ड्रेस घालून बसवले
https://archive.siasat.com/news/fake-cant-make-450-fake-ceos-brought-sit-vibrant-gujarat-summit-2017-1109789/
- Log in or register to post comments
ख
खेडूत
Mon, 09/21/2020 - 13:58
नवीन
बर्याच सकारात्मक चर्चेसाठी आभार.
काही लोकांना तेच ते जुने मुद्दे आणण्यातच रस आहे असे दिसते. पण ते एक असो.
बरेच काही चांगले काम होईल आणि देश प्रगती करेल अशी आशा करुया!
- Log in or register to post comments
G
Gk
Tue, 09/29/2020 - 11:02
नवीन
अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिराच्या निर्णयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काहीही योगदान नाही. सरकारमध्ये असताना त्यांनी यासंदर्भात असं कोणतही काम केलेलं नाही," असं सांगत भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी राम मंदिराच्या प्रश्नावरून मोदींवर निशाणा साधला. विशेष म्हणजे स्वामी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधींना यांचं श्रेय दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या कामाची पायाभरणी करण्यात आली. आता काम सुरू झालेलं असतानाच भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 09/30/2020 - 06:32
नवीन
बरं मग ?
मुळात मोदींनी कधी असं म्हटलाय की राम मंदिराच्या न्यायालयाच्या निर्णयात त्यांचा सहभाग आहे?
- Log in or register to post comments
G
Gk
Wed, 09/30/2020 - 10:50
नवीन
१९९२ मध्ये बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. लखनऊच्या विशेष सीबीआय न्यायालयाने आज निकाल दिला. बाबरी मशीदप्रकरणी निकाल येणार असल्याने संपूर्ण देशाचं निकालाकडे लक्ष लागलं होतं. निकाल सुनावला जात असताना २६ आरोपी कोर्टात हजर होते. लालकृष्ण अडवाणी यांनीही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजेरी लावली होती. बाबरी मशीद पाडण्याचा पूर्वनियोजित कट नव्हता, बाबरी पाडण्याची घटना अचानक घडली असं निरीक्षण यावेळी न्ययाधीशांनी नोंदवलं.
- Log in or register to post comments
न
नीलस्वप्निल
Wed, 09/30/2020 - 12:11
नवीन
बाबरी मशीद विध्वंस : त्या दिवशी काय काळी जादू झाली होती का, मग मशीद कुणी पाडली? हा माणुस नेहमी प्रमाणे आरडाओरडा करायला सुरवात करेल आता
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 10/01/2020 - 08:46
नवीन
२४०० पानांचा निकाल कुणीही वाचलेला नाही.
न्यायाधीशांनी एवढंच म्हटलेलं आहे कि या ३२ जणांनी मशीद पाडण्यासाठी पूर्वनियोजित कट केला असा कोणताही सबळ पुरावा सी बी आय ला देता आलेला नाही.
एखाद्या खुनाच्या आरोपातून आरोपी सबळ पुराव्याच्या अभावी मुक्त झळा तर खून झालाच नाही असे कोणीही म्हणत नाही.
पण येथे सगळे काँग्रेसी, लिब्रान्डु, डावे धाय मोकलून रडताना दिसताहेत कि मशीद पडलीच नाही.
मशीद पडलीच नाही तर बाप मेल्यासारखे रडताय कशाला?
तरी बरं हा सर्व तपास सी बी आय ने काँग्रेस सत्तेत असण्याच्या काळात केला होता. अन्यथा सी बी आय श्री मोदींची बटिक म्हणून असे झाले म्हणूनही यांनी रडारड करायला सुरुवात केली असती.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2