मोदीजी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!!
आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र दामोदरदास मोदींचा आज सत्तरावा वाढदिवस. त्या निमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा!
मोदींचं व्यक्तिमत्व मुख्यतः खूप वादग्रस्त आहे. त्यांची कारकीर्द खूप कष्टाची राहिली आहे. सतत आव्हानांचा सामना करत त्यांनी खूप काही साध्य केले आहे. जे काहीच शक्य वाटत नव्हते, ते मुद्दे सोडवले गेले आहेत. काही नवे मुद्दे वाढले आहेत. अजून खूप काही करायचे बाकी आहे. काहीही केले किंवा न केले तरी विरोध होतोच.
नव्या माध्यमांमुळे सजगता वाढली आहे.
बाकी इतिहास आपल्या सर्वांसमोर आहेच. त्यामुळे पुनराव्रुत्ती टळत आहे.
यानिमित्ताने मनात काही प्रश्न येतात..
१. त्यांनीच सुरू केलेल्या प्रथेनुसार पुढील निवडणुकीनंतर ते पद न घेता ते सल्लागाराच्या भूमिकेत राहतील काय? त्यांना नातलगांची सोय लावायची नसल्याने चिकटून राहणार नाहीत असे वाटते.
२. त्यांच्यानंतर त्यांच्या पक्षात सक्षमपणे देशाचा कारभार कोणता नेता सांभाळू शकेल?
३. पुन्हा भाजपला सत्ता न मिळाल्यास दुसरा कोण पंतप्रधानपद योग्य प्रकारे भूषवू शकेल?
४. वरील मुद्दा तीन नुसार स्थिती मुळात येऊ शकते का? आणि त्यामुळे त्यांनी केलेले चांगले काम बंद तर होणार नाही ना?
५. त्यांच्या काय चुका झाल्या असे वाटते आणि उर्वरित साडेतीन वर्षांत कुठले मुद्दे त्यांनी प्राधान्याने हातात घ्यायला हवेत?
मिपाकरांना काय वाटते जाणून घ्यायला आवडेल.
(अवांतर टाळण्यासाठी आधीच धन्यवाद..कारण सर्वच मिपाकर जबरदस्त सूज्ञ आहेत! )
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बुढ्ढी गुड्डी सठिया गई है !विषय काय आणि लिहिता काय ?
श्री मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा धागा आहे. सज्जन पणे श्री मोदींना या धाग्यावर शुभेच्छा द्यायच्या ऐवजी त्यात तुम्ही आपल्या द्वेषाच्या विषाची गरळ ओकताय वर मलाच विचारताय कि धागा कोणता? हे केवळ "अरे ला का रे" उत्तर आहे एवढेही समजेनासे झाले, इतका द्वेष? निश्चलनीकरणाचा फटका जरा जोरात बसलेला दिसतोय?