Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

सुशांत सिंह राजपूत

म
मदनबाण
Mon, 08/31/2020 - 12:42
🗣 340 प्रतिसाद
ताज्या घडामोडी - ऑगस्ट - सप्टेंबर २०२० या धाग्यात सुचवल्या प्रमाणे केवळ सुशांतसाठीच वेगळा धागा काढला आहे. मी या एकमेव विषयावर जमेल तसे अपडेट्स देत राहीन, ज्यांना या विषयात रस असेल त्यांनी सुद्धा माहितीत भर टाकवी. वरती ज्या धाग्याचा संदर्भ दिला आहे त्याच्या शेवटच्या प्रतिसादात Imtiaz Khatri संबंधी व्हिडियो दिला आहे, आता अशी माहिती जालावर येत आहे की तो सीबीआय कस्टडीत गेला आहे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 177277 views

🗣 चर्चा (340)
म
माईसाहेब कुरसूंदीकर Wed, 09/02/2020 - 08:10 नवीन
आता प्रश्न असा पडतो की महेश भट भारतविरोधी आहे तर मग त्याच्याच अनेक चित्रपटांमध्ये काम करणर्या राष्ट्रवादी परेश रावल्/अनुपम खेर ह्या मंडळींचे ह्यावर काय मत आहे? हे दोघेही देशप्रेमी भट्ट ह्यांच्याबरोबर ८०च्या दशकापासुन काम करत आले आहेत) भाजपा खासदार सरदारी बेगम(किरण खेर) ह्यांचे ह्यावर मत काय ? की सोयिस्कर मौन? सरदारी बेगम चित्रपट महेश भट्ट ह्यांचाच.
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Wed, 09/02/2020 - 08:22 नवीन
SSR म्हणजे परिकथेतील भोळा राजकुमार आणि त्याला फसवणाऱ्या सगळ्या रिया, सारा आणि संजना म्हणजे सगळ्या रक्तपिपासू दुष्ट चेटकिणी हे जे एक चित्र रंगवले जातेय, हि मीडिया ने सर्व लाज शरम गुंडाळून केलेली कॅरीमिनाती टाईप पत्रकारिता वाटते. हल्ली एखादी गोष्ट पकडून आऊट रेज होणं ट्रेण्ड झालं आहे. आंतरजालावरील आऊट रेज टिव्ही वर आणला तर आपला शो खपतो हे सूत्र आता चांगलच जोर धरत आहे. असतील रिया चे महेश भट्ट बरोबर संबंध. केला असेल सारा आली खानने त्याचा सेक्स साठी वापर. ह्या गोष्टींचा जाहीर दिंडोरा पिटणे आणि मिटक्या मारत चर्चा करणे ह्या मला बातम्या वाटत नाहीत. थर्ड पेज गप्पांची हौस बातम्या ह्या व्हाईट कॉलर नावाखाली भागवण्याचा प्रकार आहे निव्वळ. मुळात महेश भट्ट, रिया चक्रवर्ती , सारा आली खान आणि सुशांत सिंघ हे सर्व consenting adult आहेत. त्यांच्या संबंधांच्या चर्चा प्राईमटाईम न्यूज शो मध्ये ही अगदी तिरस्करणीय गोष्ट वाटते (मला). SSR देखणा होता आणि तो मृत आहे ह्या शिवाय, आणि त्याच्या मृत्यूपश्चात लिहिलेल्या स्तुतीपर लेखांशिवाय काय माहिती आहे त्याबाबत ? मान्य, तो असू शकतो मनमोकळा, खगोलप्रेमी देवमाणूस. पण हे त्याच्यावरचे प्रेम त्याचे फॅन केवळ प्रेम व्यक्त करण्याबाबत लिमिट करतील तर फार्फार बर होईल. AU म्हणजे आदित्य उद्धव अश्या उड्या मारणे कृपया थांबवावे. पाच महिन्यांपूर्वी याच SSR च्या ड्राईव्ह सिनेमावर आंजा वर कचरा, डोळ्यांवर रेप आणि एकंदरीत भंपक अभिनेता अशी टीका वाचली आहे. सो प्लीजच. रिया चक्रवर्ती सुट्टा काय ओढते आणि पाबलो एस्कोबारच बनते बॉलिवूडची. ड्रग्जची सवय पण भोळ्याभाबड्या सुशांतला रियाच लावते. डिस्क्लेमर — मी टिव्ही बघत नाही. तूनल्ली वर जे काही चुकून पाहण्यात आले त्यावर ही मतं आहेत. धागा लेखकाला उद्देशून नाहीत आणि या विषयावर चर्चा होऊ नये किंवा करू नये असा अजिबात अर्थ नाही.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Wed, 09/02/2020 - 08:38 नवीन
हे खरेच आहे. SSR हा तसा काही माझा आवडता अभिनेता नाही, इरफान खान गेल्याचं दुःख आणि धक्का पण तुलनेने जास्त बसला होता, तो आजारी असल्याची कल्पना असून. पण तरीदेखील ही आत्महत्या नसून खून आहे असे माझे पहिल्या दिवसापासून मत आहे, त्यामुळे मी देखील हे प्रकरण follow करत आहे. बाकी त्याचे MSD सोडल्यास अन्य चित्रपट देखील मी फारसे पाहिलेले नाहीत, किंबहुना MSD पण मी MSD साठी पहिला, सुशांत साठी नाही. पण या निमित्ताने जर थोडी साफसफाई होणार असेल तर हे पुढे रेटायला हरकत। नाही असे माझे मत आहे
  • Log in or register to post comments
श
शा वि कु गुरुवार, 09/03/2020 - 15:32 नवीन
सुशांतचे काय पो छे, सोनचिरैय्या खुप आवडलेले. सोनचिरैय्या तर अगदी उत्तम सिनेमा आहे. सुशांतने भूमिका छान वठवली आहे. आवर्जून बघावा. काय पो छे पण छान. चेतन भगतच्या पुस्तकावर असूनपण चांगला आहे. छिछोरेचे फार नाव झाले, पण इतका काही खास नव्हता. शुद्ध देसी रोमान्स पण फील गुड फ्लिक. पिके सिनेमा सुमार होता पण सुशांतने काम छान केलेले.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 09/02/2020 - 08:53 नवीन
AU म्हणजे आदित्य उद्धव अश्या उड्या मारणे कृपया थांबवावे. @AUThackeray हे ट्विटर अकांउट आहे, ज्यावरुन AU म्हणजे आदित्य अशी चर्चा आहे, हे AU म्हणजेच आदित्य का ? हे मलाही ठावूक नाही. त्यामुळे त्यावर मी माझे मत नोंदवलेले नाही. मी सुशांतचा एकही चित्रपट पाहिला नव्हता, तो गेल्यावर त्याचा केदारनाथ हा चित्रपट पाहिला. माझी एक नातेवाईक वकिल आहे, जी सायबर लॉ- वकिल देखील आहे. तिच्याकडुन प्रथम मला @vibhor_anand बद्धल कळले आणि मी सुशांत सिंह राजपूत प्रकरणात जालावर शोध सुरु केला. माझा कोणत्याही राजकिय पक्षाशी संबंध नाही ना कोणत्याही राजकिय नेत्याशी वैर आहे. मी फक्त यावर मला जी माहिती जालावरुन शोधुन इथे देत आहे, कारण ज्या प्रमाणे कोट्यावधी लोकांना सुशांतला न्याय मिळाला हवे असे वाटते, तेच मला देखील वाटते.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Where Only Eagles Dare: Indian Army's control of heights plays with Chinese nerves
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Wed, 09/02/2020 - 09:26 नवीन
थर्ड पेज गप्पांची हौस " बातम्या " ह्या व्हाईट कॉलर नावाखाली भागवण्याचा प्रकार आहे निव्वळ. +१
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Wed, 09/02/2020 - 08:45 नवीन
https://youtu.be/ka0Z-r_32s4
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 09/02/2020 - 08:47 नवीन
कोर्टात पुरावे लागतात. फक्त भासमय जगातील भासमय लोक समजतात म्हणून खून किंवा आत्महत्या ठरली जात नाही. त्या साठी भक्कम पुरावे लागतात तेव्हा गुन्हेगार ठरला जातो. आता जे काही समाज मध्यम आणि टीव्ही वर चालू आहे तो फक्त एक भावनिक खेळ आहे. आणि आपण त्याच न्यूज बघून आपली मत बनवत आहोत. मुळात ज्या माहिती चा आधार घेवून आपण विविध लोकांना गुन्हेगार ठरवत आहोत ती माहितीच संशयास्पद आहे. कोर्टात जेव्हा केस उभी राहील तेव्हा खरे पुरावे,तपास यंत्रणेला काय सापडले ते खरे जगा समोर येईल . तो पर्यंत तरी वाट बघा.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Wed, 09/02/2020 - 09:35 नवीन
काही प्रमाणात खरे आहे रे राजेशा पण चर्चा होते ह्याचे कारण आपल्या सरकारी संस्था चोखपणे काम बजावत नाहीत. ह्या केसमध्ये पोलिसानि दोन दिवसात जाहीर करून टाकले की ही आत्महत्या आहे. त्याआधी दिशा सालियन केसमध्येही हेच्च झाले. तिकडे फ्लॅट्वर पोलिसाना ड्रग्ज्स मिळाले होते. पार्टित नाच-गाणे करणार्या दिशाने १४व्या मजल्यावरुन उडी का मारावी? हा प्रश्न पोलिसाना पडू नये..? हे ड्र्ग्ज कुठुन मिळाले? ज्यानी घेतले त्याना ते कुठुन मिळाले? ह्याबद्दल काहिच माहिती मिळत नसल्याने लोकांच्या मनात संशय निर्माण झाला. भाजपावाले ह्याचे राजकारण करू पाहणार हे तर सगळ्यानाच माहित होते मग "ही केस आम्हि बिहार पोलिसाना अजिबात देणार नाही" हे म्हणायची महाराष्ट्र सरकारला काय गरज होती? त्यात ते संजय राउत- जगात आमचे पोलिस नंबर दोनवर आहेत असे सांगून करमणूक करू पाहत होते.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 09/02/2020 - 10:20 नवीन
ड्रग चे वापर करते,त्याचा पुरवठा करणारी साखळी आता बनलेली नाही. खूप वर्षा पासून ती अस्तित्वात आहे. आणि ड्रग व्यापार विषयी मुंबई पोलिस व्यतिरिक्त कोणत्याच एजन्सी ला खोलवर माहिती नक्कीच नसेल. हत्या ,आत्महत्या शी ह्या ड्रग साखळी चा काहीच संबंध नसेल तर मुंबई पोलिस त्या angle ni तपास का करेल . न्यूज मध्यम,आणि समाज मध्यम अशी react करत आहे जसे मुंबई मध्ये ड्रग हा नवीनच शोध लागला आहे.
  • Log in or register to post comments
G
Gk Wed, 09/02/2020 - 13:12 नवीन
दोस्ती म्हणून एक सिनेमा होता त्यात 2 तरुण हिरो होते , सुधीर कुमार व सुशील कुमार दोघेही अचानक मेले , तो अपघात दिलीपकुमारने केला , अशी अफवा होती
  • Log in or register to post comments
G
Gk Wed, 09/02/2020 - 13:24 नवीन
पण ती अफवा अफवाच होती असा अपघात झाला नव्हता कुणीतरी एकजण जीवंतही आहे बहुतेक पण त्यांचे सिनेमे मात्र नंतर आले नाहीत
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 09/02/2020 - 15:27 नवीन
सुशांत सिंह राजपूतच्या चॅट मध्ये ज्या इकॉमर्स कंपनीचा सातत्याने उल्लेख केला गेलाय ती फ्लिपकार्ट असल्याचे म्हंटले जात आहे. याच बरोबर सुशांतच्या टीम मधली आनंदी धवन बर्‍याच काळा पासुन गायब असल्याची जालावर चर्चा आहे. Dekho beti uncle ko kya mila ..!! Guchaaaaa ho ab bhi kya ?? Bolo na flippyyyy flipppyyy संदर्भ :- https://twitter.com/Remember2ndOct/status/1301090145374855170 या ट्विट मध्ये ज्या डॉक्युमेंटचे फोटो दिले आहेत त्याची पीडीएफ फाईल खालील लिंकवर मिळेल :- https://storiesflistgv2.blob.core.windows.net/stories/2020/06/Press-Release-Flipkart-introduces-Voice-Assistant-to-offer-a-natural-shopping-experience.pdf अजुन एक ट्विट पाहण्यात आले आहे, जे इकॉमर्स कंपनीशी संबंधीत नाही. Please see this was posted on FB संदर्भ :- https://twitter.com/SpeaksReema/status/1300671462089658371 https://www.facebook.com/groups/utcomm/permalink/683651742240347/

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Where Only Eagles Dare: Indian Army's control of heights plays with Chinese nerves
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 09/02/2020 - 15:38 नवीन
या माहितिची सत्यता आपण पडताळून पाहिली आहे का ? कि फक्त जाला वरची माहिति इथे ओतत आहात ? म्हंटले जात आहे ,जालावर चर्चा आहे वगैरे मध्ये ठोस काही नाही
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 09/02/2020 - 17:46 नवीन
मुनी कधी तरी स्वतः देखील माहिती शोधण्याचे कष्ट घ्यावेत ! असो... Dear CBI Team, Please Investigate in this matter..do needful!!! Its really suspicious!!! संदर्भ :- https://twitter.com/Ankita_Arya/status/1301056332234018818

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Where Only Eagles Dare: Indian Army's control of heights plays with Chinese nerves
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 09/02/2020 - 18:08 नवीन
जालावर अतिशय हुशार लोक असे व्यक्त होत असतील तर ते त्रिवार सत्यच असणार जास्त विचार करायची गरज नाही. फ्लिपकार्ट चे मालक, डायरेक्टर्स,कर्मचारी सर्व दोषी आहेत. बिचाऱ्या सुशांत ला न्याय मिळवण्यासाठी सर्व फ्लिपकार्ट वाले तुरुंगात जायला हवेत. जालावर अती हुशार लोकांनी दोषी ठरवले म्हणजे ते सत्य च असणार.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 09/02/2020 - 18:32 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Where Only Eagles Dare: Indian Army's control of heights plays with Chinese nerves
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 09/02/2020 - 18:57 नवीन
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 09/02/2020 - 19:39 नवीन
Pentagon officially release footage of "unidentified flying objects" taken by US Navy pilots मुनी दिलेल्या व्हिडियोवर भाष्य करायचे मुद्दामुन टाळता का ? का त्याची सत्यता तुम्हाला दिसत नाही ? पण तुम्हाला प्रश्न विचारुन उपयोग नाही,कारण प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारत बसण्याचा ठेका आपणच घेतलेला आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Where Only Eagles Dare: Indian Army's control of heights plays with Chinese nerves
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 09/02/2020 - 22:19 नवीन
पेंटगोन ची ऑफिशियल लिंक द्या मग बोलू
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 09/03/2020 - 06:29 नवीन
पेंटगोन ची ऑफिशियल लिंक द्या मग बोलू खरं तर मी तुमच्या प्रतिक्रियेला प्रतिसाद देणार नव्हतो, कारण तुमची सत्यता तपासाची फुटपट्टी / एकक कोणते ते कळण्यास मार्ग नाही ! फ्लिपकार्टचे ट्विट्स,न्यूज व्हिडियो दिला ते सुद्धा तुमच्या मनाचे समाधान करु शकत नाहीत ! त्यामुळे केवळ तुम्ही जालावर वाचन कराता तेच सोर्स खरे आणि बाकीचे करतात ते मात्र विश्वासास पात्र ठरत नाहीत. असो... वरती दिलेला व्हिडियो युएस नेव्ही पायल्ट्स कडुन शूट झालेला असुन पेंटॅगॉनकडुन व्हिडियो रिलीज करण्याची मान्यता देण्यात आली आणि डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स कडुन स्टेटमेंट रिलीज करण्यात आले आहे. व्हिडियो नेव्हीच्या पोर्टलवर आहे. नेव्ही पोर्टल लिंक :- https://www.navair.navy.mil/foia/documents डीओडी पोर्टल लिंक :- https://www.defense.gov/Newsroom/Releases/Release/Article/2165713/statement-by-the-department-of-defense-on-the-release-of-historical-navy-videos/ अवांतर : अचानक अमेरिकेला या विषयावर काही गोष्टी का उघड कराव्या वाटल्या ? येत्या काळात याचे काही उत्तर समोर येइल असे का कोणास ठावूक पण मला तसे वाटते मात्र नक्की.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- IAF is key to India’s ‘deterrence by punishment’ plan against China. Now to wait for winter
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 09/02/2020 - 18:57 नवीन
सर्व सत्य आहे . फ्लिपकार्ट बंद करून सर्वांना तुरुंगवास घडवावा ही जलावरिल अती प्रचंड लोकांची मागणी आहे. राज्य घटनेत बदल करून देश चालवण्याचे सर्वाधिकार न्यूज चॅनेल, जाला वरील अती प्रचंड हुशार लोकांनाच द्यावा अशी मागणी करून थांबतो.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 09/17/2020 - 16:57 नवीन
सुशांतच्या टीम मधली आनंदी धवन बर्‍याच काळा पासुन गायब असल्याची जालावर चर्चा आहे. बर्‍याच काळाने आनंदी बद्धल कोणीतरी बोलले !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- बुढ्ढी गुड्डी सठिया गई है !
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Wed, 09/02/2020 - 17:09 नवीन
ह्या सुशांतच्या टीममध्ये एकूण होते तरी किती लोक? आज्तोवर १५/२० जण तरी चॅनेलवर येउन मत मांडून गेले आहेत. व रोज कुणीतरी नविन येत आहे. रॉ चे एक माजी अधिकारी एन के सूद आन्तर्जालावर सक्रिय असतात पण तेही सुब्रमण्यम स्वामींसारखे! खळबळ माजेल असे बोलायचे. सुशांतची हत्या दाउदने केली असे त्यांचे मत. पण निदान १% तरी पुरावा? नाही.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 09/02/2020 - 19:08 नवीन
सुशांत नी गूगल वर पण काही गोष्टी चा शोध घेतला होता त्याच्या आत्महत्या ला गूगल पण दोषी आहे. गूगल चे मालक,चालक तुरुंगात गेले पाहिजेत. तशी विनंती जालावरून जाल विद्वान नी लावून धरली पाहिजे.
  • Log in or register to post comments
P
Prajakta२१ Wed, 09/02/2020 - 19:17 नवीन
कोरोनाच्या बातम्यांनी भयग्रस्त झालेल्या आणि कंटाळलेल्या जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी बॉलिवूड मधल्या मर्डर मिस्टरी पेक्षा चांगले आणि निरुपद्रवी काय असणार?म्हणून काही चॅनेल्स वर हेच दाखवत आहेत कोरोना साथ नियंत्रणात येत नाहीये आणि अर्थव्यवस्था पण ढासळतीये एकाला धरावे तर दुसरं निसटतेय असे होतेय जनता आणि सरकार सगळेच हताश होत चाललेत कोरोना पुढे ह्यातून जरा विरंगुळा म्हणून जनता पण बघतीये crime पेट्रोल च्या एपिसोड सारखे
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 09/02/2020 - 19:45 नवीन
या धाग्यावर कोण कसे प्रतिसाद देउन उघडे पडत आहेत हे इथले सुज्ञ वाचक पाहतच आहेत, मला मात्र धागा सतत वर राहण्याचा फायदाच झाला असे म्हणीन, कारण इतर वेळी धागा खाली नेण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात ! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Where Only Eagles Dare: Indian Army's control of heights plays with Chinese nerves
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 09/03/2020 - 06:05 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- IAF is key to India’s ‘deterrence by punishment’ plan against China. Now to wait for winter
  • Log in or register to post comments
G
Gk गुरुवार, 09/03/2020 - 12:48 नवीन
https://ahmedabadmirror.indiatimes.com/ahmedabad/cover-story/is-gujarat-becoming-the-drug-capital-of-country/articleshow/77137225.cms Dry Gujarat is becoming the most preferred destination for drug cartels with the 1,600-kilometre coastline being one of the key conduits to smuggle drugs due to its vast expanse and large number of unmanned jetties.More and more drugs, both natural and synthetic, have been seized in the state. Charas found on the high seas on the Gujarat coastline or seizure of homegrown cannabis or ganja in Amreli, or pharmaceutical manufacturers producing drugs to sell in African countries, the state has increasingly become a hub for illegal drugs in the past one-and-half years. ड्रग चा धंदा गुजरातेत वाढत आहे आणि भौ तोरसेकर बोलतात, मोदीजी आता ड्रगवाल्यांचा नायनाट करत आहेत
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 09/03/2020 - 14:46 नवीन
अरे पण तिकडे लोक पकडले तरी जात आहेत रे जीक्या. महाराष्ट्र/मुंबई तर अजूनही तस्करी करण्यासाठी सर्वात 'सुरक्षित' समजली जाते. अलिबाग पासुन ते देवगडपर्यंत सोन्याचे स्मगलिंग तर ६०च्या दशकापासुन होत आलेले आहे. हाजी मस्तान्/युसुफ पटेल्/करीम लाला/छोटा राजन ह्यांचे गुणगान तर आमच्या मराठी मिडियानेही गायले. अगदी "दाउद तुमचा गवळी आमचा" हेही झाले. मात्र हे अंडरवर्ल्ड मुंबईतच का फोफावले? त्याचा नायनाट ना पोलिसानी केला ना राजकीय पुढार्यानी कधी प्रयत्न केले कारण ह्यांची पोटे त्यावर भरत होती.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 09/03/2020 - 16:00 नवीन
जगभरात ड्रग्स वर नियंत्रण मिळवणे कोणत्या देशाला जमलेले आहे? अगदी मृत्युदंडाची शिक्षा असलेल्या देशात दक्षिण अमेरिका आखाती देश येथे सुद्धा प्रचंड प्रमाणात नशा आणणाऱ्या पदार्थांची तस्कर चालतेच. याची कारणे असंख्य आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अफाट पैसा आणि त्यामुळे सहज खरेदी करता येतील असे राज्यकर्ते. अगदी अफगाणिस्तानात एवढे वर्षे युद्ध झाले परंतु कोणत्याही देशाने तेथील अफूच्या शेतीला हात लावलेला नाही. यात नशेबद्दल साफ द्वेष असणारे (?) इस्लामी दहशतवादी पासून कम्युनीस्ट रशिया आणि भांडवलशाही अमेरिका पासून पाकिस्तानी लष्कर सर्वच्या सर्वांचा हात आहे. तेंव्हा श्री मोदी शाह यांनी प्रयत्न केले तर या अमली पदार्थाचा व्यापार थोडा कमी होईल एवढेच. संपूर्ण नायनाट करणे श्री मोदींना (कोणत्याही देशाच्या अध्यक्ष/ प्रमुखाला) अशक्य आहे. कितीही कडक कायदे असले तरी जगभर गुन्हे होतच राहिले आहेत. हा गुन्हे आणि गुन्हेविरोधी यंत्रणा यांचा उंदीर मांजराचा खेळ अनंत काळ पर्यटन चालू राहणार आहे.
  • Log in or register to post comments
G
Gk गुरुवार, 09/03/2020 - 16:13 नवीन
हे सगळे काँग्रेस आणि मनमोहनने बोलले असते तर चालले असते का ?
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 09/19/2020 - 11:44 नवीन
सर्वात महत्त्वाचे म्हणजे अफाट पैसा आणि त्यामुळे सहज खरेदी करता येतील असे राज्यकर्ते. खरयं... आत्ताच या बातमीकडे नजर गेलीय :- Maharashtra Poll's discrepancies EXPOSED; Did Thackerays lie in affidavit? | The Newshour Debate

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tera Ghata | Gajendra Verma Ft. Karishma Sharma | Vikram Singh | Official Video
  • Log in or register to post comments
G
Gk गुरुवार, 09/03/2020 - 16:58 नवीन
भक्ताडे नाचत आहेत मोदीजी आता ड्रग माफियांना पकडणार व ड्रगचा नायनाट करणार म्हणून , हे जर खरोखरच करायचे होते , तर त्यासाठी सुशांत मरायची गरज नव्हती.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 09/03/2020 - 16:18 नवीन
24 तास सुशांत चीच. न्यूज चालवा असा करार सरकार आणि न्यूज चॅनल चे मालक आहेत त्यांच्यात झाला असावा असा संशय यायला लागला आहे. लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. पैसे च नाहीत म्हणून लोकांनी भविष्य निर्वाह निधी काढला आहे. बेरोजगारी भयंकर वाढली आहे. देशाची अर्थ व्यवस्था अतिशय गंभीर अवस्थेत आहे. आणि हे सर्व प्रश्न दाबून ठेवण्यासाठीच सुशांत मध्ये सर्व न्यूज चॅनल व्यस्त आहेत. लोक नेहमीसारखी च धुंदीत आहेत.
  • Log in or register to post comments
श
शा वि कु गुरुवार, 09/03/2020 - 16:39 नवीन
अगदी खरंय.
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे गुरुवार, 09/03/2020 - 18:22 नवीन
यावर उपाय म्हणजे असले news चॅनेल बघणे बंद करणे. जसा जोहर, भट मंडळींना आपल्या सिनेमात कोणाला घायचे हा अधिकार आहे तसा ह्या मंडळींना पण कोणत्या बातम्या द्यायच्या हा अधिकार आहे. आपण जर बातम्या च बघणं बंद केलं तर आर्थिक नुकसान होतंय म्हणून सुधारण्याची शक्यता आहे. किंवा जे न्युज चॅनल आपल्या आवडीच्या बातम्या देत आहेत ती बघणे. कारण जशी मोदी समर्थक चॅनल्स आहेत तशीच मोदी विरोधक चॅनेल्स पण आहेत. सध्यातरी भारतात तटस्थ चॅनल्स ची कमतरता आहे.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 09/03/2020 - 19:48 नवीन
न्यूज चॅनल नफा होण्यासाठी कोणी काढलेले नाहीत. त्या चॅनल च्या आडून बाकी धंदे आरामात चालू rahvet असा च उद्देश असतो. सर्व चॅनल चे मालक कोण आहेत हे तपासले की लक्षात येईल. गैर धंदे आरामात चालू राहवे हाच हेतू news chanel च आहे मुल उद्योग वेगळेच आहेत. सरकार आणि हे चॅनल मिळून लोकांना मूर्ख बनवण्याचा उद्योग सध्या जोमात आहे.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 09/03/2020 - 20:06 नवीन
संयम बाळगा
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 09/05/2020 - 06:40 नवीन
संयम बाळगा मुनी हा लेख लोकसत्ता मधला आहे, हे तेच वर्तमानपत्र आहे ज्यात १७ मार्च २०१६ रोजी असंतांचे संत हा संपादकीय लेख लिहला गेला होता, जो मदर तेरेसा यांच्यावर होता. मग नंतर संपादक महोदयांनी वाचकांच्या भावना दुखवल्या बद्धल मनःपूर्वक दिलगिरी व्यक्त केली गेली होती, यात संपादकीय मागे घेण्यात येत आहे असे लिहण्यात आले होते याचे शिर्षक होते "क्षमस्व" हिंदूंच्या भावना दुखावल्या बद्धल असे कृती कधी कोणी केली असल्यास मला दाखवा ! जाता जाता: याच वर्तमानपत्राची पातळी आपण कशी मोजली ते जाणुन घेण्यास उत्सुक आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India-China stand-off: Donald Trump offers to mediate, calls border tension 'nasty'
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Sat, 09/05/2020 - 07:09 नवीन
माझ्या अल्प तार्किक क्षमतेनुसार वरील हाय कोर्टाची बातमी ही लोकसत्ता या वृत्तपत्राच्या कडून कोणत्याही कमेंट अथवा मत अथवा पॉलिटिकल बायस सोडून आहे.यामध्ये हाय कोर्टाच्या कमेंट शी असंबंधित कोणतीही टिप्पणी नाही. त्यामुळे लोकसत्ता पेपर मधली बातमी देणे ही संबंधित व्यक्तीची स्त्रटेजिक चूक झाली. ती चूक मी दुरुस्त करतो: Bombay High Court asks media to show restraint in reporting of Sushant case ही द हिंदू मधली. तर लोकसत्ता bashing झाले असल्यास बातमीवर आपली मते कळवावी ही नम्र विनंती.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 09/05/2020 - 08:13 नवीन
माझ्या अल्प तार्किक क्षमतेनुसार वरील हाय कोर्टाची बातमी ही लोकसत्ता या वृत्तपत्राच्या कडून कोणत्याही कमेंट अथवा मत अथवा पॉलिटिकल बायस सोडून आहे.यामध्ये हाय कोर्टाच्या कमेंट शी असंबंधित कोणतीही टिप्पणी नाही. प्रश्न मुनींना असुन तो न्यूज सोर्स बद्धल आहे आणि त्या न्यूज सोर्सच्या पातळी मोजण्यावर आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India-China stand-off: Donald Trump offers to mediate, calls border tension 'nasty'
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 09/03/2020 - 22:18 नवीन
लोकहो, सुशांतसिंह राजपूतच्या जवळपास वावरणाऱ्या तिघांचा मृत्यू झाला आहे. एक दिशा सालियन, त्यासोबत मनमीत सिंग ( मनमीतसिंग गरेवाल नव्हे, नुसता मनमीत सिंग) व परीक्षा गुप्ता (प्रेक्षा मेहता नव्हे) अशी ती तिघं आहेत. एक दिशा सोडल्यास बाकी दोघांचं नावही माध्यमांतनं ऐकू येत नाही. तथाकथित पत्रकार झोपा काढताहेत का? सुशांतप्रमाणे हे तिचंही कूपर रुग्णालयात मरणोत्तर दाखल झाले व सुशांतसकट या सर्वांना आत्महत्या म्हणून प्रमाणपत्र मिळालं. कूपर रुग्णालयाची विश्वासार्हता काय राहिली? असो. सुशांतला ठार मारला एके ठिकाणी आणि मृतदेह आणला दुसऱ्या खोलीत हे स्पष्ट आहे. हत्या एके ठिकाणी करून मृतदेह इतरत्र हलवून आत्महत्येचा देखावा उभा करणं हा अव्यापारेषु व्यापार आहे. सुशांतला ठार मारायचे इतर अनेक मार्ग उपलब्ध असावेत. वर माईसाहेबांनी म्हंटलंय तसं, हत्येचा नेमका उद्देश काय आहे? आणि हत्येची नेमकी कार्यवाही काय होती? हे दोन प्रश्न सतावत होते. म्हणून यासारखा घडामोडी असलेला मृत्यू इतर कुणाचा झालाय का म्हणून विचार करीत होतो. तेव्हा रॉबर्टो काल्व्हीचा लंडनमधला खून आठवला. त्याचाही लंडनमध्येच कुठेतरी खून करून नंतर मुडदा ब्लॅकफ्रायरच्या पुलाखाली टांगला व शवचिकीत्सकास ( = करोनर ला) लाच देऊन आत्महत्येचं प्रमाणपत्र मिळवलं. हा इटलीतल्या बँको आंब्रोसियानो नामे बँकेचा अध्यक्ष (चेअरमन) होता. ही बँक बुडण्याच्या जरा आधी तो रोमहून लंडनला पळाला (१० जून १९८२). लंडनमध्ये त्याच्या बोलवित्या धन्यांनी त्याचा खून केला व मुडदा ब्लॅकफ्रायरच्या पुलाखाली टांगवला (१८ जून १९८२). त्याच्या व सुशांतच्या मृत्यूमधील साम्ये : १. बँक बुडण्याआधी काल्व्हीची खाजगी सचिव ग्राझीयेला करोचर हिने बँकेच्या मुख्यालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून 'आत्महत्या' केली. दिशा सालियनने सुशांतच्या आधी सहा दिवस अशीच 'आत्महत्या' केली होती. मात्र करोचरने आत्महत्यापूर्व नोंद लिहिली होती, जी दिशाच्या बाबतीत आढळली नाही. २. काल्व्हीची पहिली शवचिकित्सा केली तिच्यात आत्महत्या म्हंटलं गेलं. अगदी सुशांतसारखंच. नंतर काल्व्हीच्या नातलगांनी खाजगी तपासनीस लावून जास्तीचे पुरावे गोळा केले व प्रकरण पुनर्विचारार्थ कार्यान्वित केले. त्यात (जुलै १९८३) चिकित्सकाने खुले मत ( = open verdict ) दिलं. खाजगी तपास पुढे चालूच राहिला. नंतर १९९२ साली गोळा झालेले बरेचसे न्यायवैद्यक पुरावे ब्रिटनच्या गृहखात्याकडे व लंडनच्या पोलिसांकडे दिले गेले. दोघांनीही ते फेटाळून लावले. मग मुंबई पोलिसांना दोष द्यायचा का? लंडन पोलीस म्हणजे स्कॉटलंड यार्ड तरी काय सचोटीने वागलेत? ३. डिसेंबर १९९८ मध्ये काल्व्हीचं शरीर उकरून काढण्यात आलं. त्यात सापडलं की त्याच्या गळ्याभोवती असलेल्या जखमेच्या खुणा फाशीशी सुसंगत नाहीत. तसेच त्याच्या खिशांत सापडलेल्या दगडविटांना त्याने हातही लावला नव्हता. सुशांतच्या बाबतीत त्याचा रेखीव चेहरा सांगतो की ही फाशी नाही. फाशी गेल्यावर माणूस हालचाल करीत नाही. त्यामुळे फास अनेक तास तसाच आवळलेला राहतो. त्यामुळे चेहऱ्याची वाट लागते. याउलट जर गळा दाबून हत्या केली तर हत्याकर्ते जीव गेल्यावर लगेच म्हणजे पाचदहा मिनिटांत गळा सोडतात. अशा वेळेस चेहरा बऱ्यापैकी शाबूत राहतो. ४. लंडनमध्ये ज्या फ्लॅट वर राहायला उतरला होता त्यात सर्जियो वकारी हा एक भुरटा नशेडी ( = अंमली पदार्थांचा किरकोळ वितरक ) ही होता. काल्व्हीसारखाच हा ही दगडविटा खिशात भरलेल्या अवस्थेत मृत झालेला आढळला. काल्व्हीसारखाच हाही प्रपोगंडा ड्यू नामे मेसॉनिक लॉजशी संबंधित होता. सुशांतदेखील अशाच काही गटाचा सदस्य होता काय? रिया चक्रवर्तीने सुशांतची युरोपच्या दौऱ्यावर (ऑक्टोबर २०१९) असतांना अशी काही ओळख करवून दिली होती काय? त्यानंतर सुशांतची तब्ब्येत ठीक नसायची म्हणे. त्या दौऱ्यावर सोबत रियाचा भाऊ शौविकही होता. ते तिघे ऑस्ट्रिया येथील आमविमोचन (डीटॉक्स) केंद्राला भेट देणार होते. नक्की कोणास आमविमुक्त व्हायचं होतं? की सगळ्यांनाच व्हायचं होतं? की नशाविमुक्त व्हायचं होतं? ५. काल्व्हीच्या विम्याचे पैसे मिळण्यावरून खटलेबाजी झाली. सुशांतचे नातलग आता पैशाच्या मागे लागलेत असं कंगणा राणावतने म्हटलंय. ६. काल्व्हीप्रमाणे सुशांतचा मृत्यू आर्थिक अफरातफर वा तत्सम कारणांतनं झाला असेल काय? काल्व्हीसारखाच सुशांतही नरबळी ( = ritual murder ) असेल काय? ७. काल्व्हीचा खूनखटला उभा राहायला २५ वर्षं ( अडीच नव्हे पंचवीस ) लोटावी लागली. शेवटी २००७ साली सुरू झाला. सुशांतचा कधी सुरू होणार? असो. सुशांतची हत्या काल्व्हीसारखी काटेकोरपणे नियोजित दिसंत नाही. यावरनं आजूनेक प्रश्न उत्पन्न होतो. तो म्हणजे खुन्यांना सुशांतची नक्की हत्या करायची होती का? की त्याच्याकडून केवळ काही रहस्ये वदवून घ्यायची होती? इथे मी माझ्या कल्पनाशक्तीस मोकाट सोडतो. रहस्ये वदवून घेण्यासाठी सुशांतच्या पेयात गुंगीचं औषध मिसळलं व त्याच्या इच्छाशक्तीस कमजोर केलं. नंतर त्याला इंजेक्शन देऊन अधिक प्रभावी सत्यवाचक औषध ( सोडियम थायोपेंटल ) गळ्याजवळच्या शिरेतनं घुसवलं. तरीही त्याने दाद दिली नाही म्हणून त्याच्यावर अत्याचार करण्यात आले. पण तो औषधाच्या अंमलाखाली असल्याने अत्याचारांच्या वेदना तितक्याशा झाल्या नसाव्यात. म्हणून औषधाचा अधिक ढोस दिला आणि त्याचा अतिरेक होऊन सुशांतचा जीव गेला. औषधाच्या अतिरिक्त मात्रेमुळे कावीळ झाली व त्याचं शरीर पिवळं पडलं. बार्बेच्युरेट्स च्या अतिरिक्त सेवनाने अशी कावीळ होऊ शकते ( संदर्भ : https://www.sciencedirect.com/science/article/abs/pii/S0016508569800995 ). याबाबत जाणकारांनी कृपया प्रकाश टाकावा ही विनंती. असो. मुंबई पोलिसांना हे प्रकरण अंतर्बाह्य माहीत आहे. पोलीसांना राजकारण्यांच्या दबावाखाली काम करावं लागंत असलं तरी कोणीही पोलीस आपली मुंडी बरोबर वाचवून असतो. प्रस्तुत परिस्थितीत पोलिसांनी यथोचित माहिती गोळा करून ठेवली असेल, नव्हे आहेच. ही माहिती त्यांनी प्रगती अहवाल म्हणून सीलबंद लिफाफ्यातनं सर्वोच्च न्यायालयास सादर केली आहे. त्यावर न्यायाधीशांनी तपास योग्य रीतीने चाललाय असं म्हंटलं आहे. हे सगळं वाचल्यावर अर्णव गोस्वामी आणि राजदीप सरदेसाई तमाशातल्या नाच्या पोरांप्रमाणे वाटू लागतील. त्याला काही इलाज नाही. अर्णव गोस्वामी मोठमोठ्या आरोळ्या ठोकतोय. ठोकू द्या त्याला. राजदीप सरदेसाई मोठ्या साळसूदपणे रिया चक्रवर्तीची मुलाखत घेतोय. घेऊदे त्याला. यांना स्वत:चं मत नाही. मालक सांगेल तो अभिनय मुकाट्याने करून दाखवायचा. झेंडा आणि अजेंडा नाचवणे, बाकी काय! आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ड
डॅनी ओशन Fri, 09/04/2020 - 04:38 नवीन
रिया चक्रवर्तीने सुशांतची युरोपच्या दौऱ्यावर (ऑक्टोबर २०१९) असतांना अशी काही ओळख करवून दिली होती काय?
रिया चक्रवर्ती कुठूनतरी यायला पायजे काय श्टोरीत ?
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 09/04/2020 - 09:13 नवीन
संशयाचे मळभ दूर होईपर्यंत ती असणारच आहे स्टोरीत, डॅन्या. समजा तुझ्या घरातील कोणी सीम कार्ड दहावेळा बदलले आणी तू म्हणालास "मला माहित नाही का बदलले" तर कोण विश्वास ठेवेल? घरातील कोणी मृत्यु पावला तर "माहित नाही ब्वॉ का आत्महत्या केली ते" असे घरातल्यानी सांगितले तर कसा विश्वास ठेवायचा?
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Fri, 09/04/2020 - 09:50 नवीन
हे भारिये. आपणच संशयाचं मळभ तयार करायचं आणि आपणच म्हणायचं की दूर झाल्याशिवाय कस होणार. "तुमच्या घरातल्या माणसाला" कार्ड सगळ्या बाजूंनी खेळता येत. माई तुझ्या घरातल्या मुलीवर काय पण आरोप झाले तर ? आत्महत्या का केली ते मला नाही माहित. शिबियाय काय ते बघून घेईल. खून का केलाय/आत्महत्या का केलीय हे पूरव्यासहीत आरोप करणाऱ्यांना तरी सांगता येते काय ? मग हे एखाद्या व्यक्तीवर खूप अन्यायकारक असलेले स्पेक्युलेशन का चालले आहे ? घरबसल्या करून रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबातल्या व्यक्तीने आत्महत्या करण्याची वाट पाहत आहेत, शेरलॉक होम्स गिरी दाखवायला. कुठंय मनी लाँड्रिंग? कुठंय १२ करोड का १५ करोड रुपये ? कुठंय आदित्य ठाकरे ? एवढे खोटे उघड झाल्यावर सुद्धा यात काही खरे आहे असे एखाद्या अशाच व्यक्तीलाच वाटेल ज्याला ह्याची कल्पना नाही की रिया चक्रवर्ती ही काही फकत टीव्ही वरचे चित्र नाही, एक जिवंत व्यक्ती आहे. त्या व्यक्तीने रिया चक्रवर्ती ला आधीच दोषी प्रमाणपत्र देऊन टाकले आहे. हे मत बदलण्याची सुद्धा आजिबात इच्छा नाही. सिम कार्ड तर काय आमच्या गल्लीतल्या उगवत्या नेत्याकडे १५ च्याच वर आहेत. आणि माई शंका घ्यायला जगा आहे म्हणणे म्हणजे एका मुलीला धरून टिव्हीवर कोर्ट भरवणे आहे काय ? तिचे करीयर संपवून टाकले आहे. तिला धमक्या येत असणार आहेत खून आणि त्याहून वाईट गोष्टींचा.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 09/04/2020 - 09:11 नवीन
भारी +१ या वरून एका मोठ्या कॉर्पोरेट हाउसमधिल दोन आत्महत्या आठवल्या ! १. दिलीप पेंडसे २. कार्ल स्लिम कॉर्पोरेटस मधील अश्या आत्म/हत्या बद्दल फारशी चर्चा होत नाही ! यांच्या बाबतीत काय घडलं असेल देवच जाणे !
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 09/05/2020 - 08:04 नवीन
१. दिलीप पेंडसे २. कार्ल स्लिम यात श्री देवी आणि सुनंदा पुष्कर/ थरूर पण ऍडवा बाकी या सर्व प्रकरणातून काही निष्पन्न होईल असे वाटत नाही. काळविटाने आत्महत्या केली आणि रस्त्यावर झोपेत असणारी माणसे अचानक झोपेत चालून गाडीखाली येतात असे न्यायालयात सिद्ध होऊ शकते. मग १४ व्या मजल्यावरून चुकून पडून मृत्यू होणे किंवा पडद्यात गळा अडकून श्वास कोंडून मृत्यू होणेअसे न्यायालयात सिद्ध करणे सहज शक्य आहे. पैसा निर्माण होत नाही किंवा नष्ट होत नाही. तो फक्त खिसे बदलतो हा अर्थशास्त्राचा पहिला नियम लक्षात ठेवायचा.
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Fri, 09/04/2020 - 07:19 नवीन
CBI releases a statement on Sushant Singh Rajput case: Media reports attributed to CBI probe are speculative and not based on facts
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 09/06/2020 - 14:26 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Experts warn China-India standoff risks unintentional war
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 21 hours ago
  • सुंदर !!
    1 day 21 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 21 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा