Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

कामामुळे ताण तणाव

व
विजुभाऊ
Wed, 08/26/2020 - 18:29
🗣 75 प्रतिसाद
मित्रानो वेलनेस लाईफ कोच म्हणून एक नवीन मिशन हातात घेतोय. " स्ट्रेस मॅनेजमेंट " स्ट्रेस ताण तणाव यामुळे बरेच काही घडते आणि बिघडते देखील. "स्ट्रेस" खास करून इंफॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रात काम करणारांसाठी तो कायमचाच गळ्यात पडलेला असतो काही जणांसठी कामाचा ताण प्रेरक असते. तर काहींसाठी तो मनस्वास्थ्य बिघडवणारा उत्पात घडवतो. मनस्वास्थ्य बिघडते तब्येतीची वाट लागते. हाय ब्लड प्रेशर, पाठ दुखी, संताप , फ्रस्ट्रेशन डिप्रेशन , डायबिटीस , हार्मोनचे संतुलन बिघडणे , दारू सिगरेट सारखी व्यसने असे बरेच काही होते. या साठी एक मिशन हातात घेतोय. स्ट्रेस कमी करण्याचे . खास करून माहिती तंत्र क्षेत्रातील मित्रांचे .आयुष्य सुखकर करण्याचे. तुम्हाला. तुमच्या मित्रांना वर्क स्ट्रेस संदर्भात काही शंका / प्रश्न असतील तर विचारा. त्यांचे सोल्यूशन द्यायचा प्रयत्न करेन रोज. इथेच. शक्य असेल तसे फेसबुक लाईव्ह वरुन किंवा टेक्स्ट पोस्ट करूनही देईन. विजयकुमार शाह फ्रीडम लाईफ कोच फॉर वेलनेस.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 25781 views

🗣 चर्चा (75)
व
विजुभाऊ Sat, 08/29/2020 - 10:26 नवीन
वामन देशमुख -- आळशीपणा - प्रोक्रॅस्टीनेशन - काम टाळण्याची /कसेतरी उरकण्याची प्रव्रूत्ती राजेश १८ - फ्रस्ट्रेशन - डिप्रेशन कानडाऊ योगेश - अँक्झायटी सगळ्यांची फलनिष्पत्ती स्ट्रेस ( तणाव) यातच होते. पण या गोष्टी एका सायकल मधे फिरत रहातात. हे सगळे विषय नीट लिहायचे तर प्रत्येक विषयाला भरपूर वेळ द्यावा लागेल. लिहायचा प्रयत्न करतो
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Sat, 08/29/2020 - 11:41 नवीन
हे सगळे विषय नीट लिहायचे तर प्रत्येक विषयाला भरपूर वेळ द्यावा लागेल. लिहायचा प्रयत्न करतो
वेळ काढून नक्की लिहा विजुभाऊ. दोस्तारचा एक प्रचंड मोठा फॅन या नात्याने तुम्हाला आग्रहाने सांगतो आहे. रच्याक, दोस्तार हेच एक खूप मोठं स्ट्रेस बस्टर आहे, नाही का!
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Sat, 08/29/2020 - 11:30 नवीन
हे सगळे विषय नीट लिहायचे तर प्रत्येक विषयाला भरपूर वेळ द्यावा लागेल. लिहायचा प्रयत्न करतो
लिवा लिवा विजुभौ. धागा काढलाच आहे तर होऊनच जौ दे!
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Sat, 08/29/2020 - 13:23 नवीन
आयटी हमालांना जास्त तणाव सहन करावा लागतो याची कारणे उघड आहेत पण त्यावर उपाययोजना करण्यास आयटी हमालांच्या मुकादमास इंटरेस्ट नसणे हे आहेच पण हमाल देखील जास्त बोजा वाहून नेण्यास विरोध करत नाहीत हे आहे. यांचे ग्राहक तिकडे आम्रविकेत किंवा युरोफात बसलेले असतात. हे इकडे दिवसा पण ओझी वाहतात आणि इकडच्या रात्री ग्राहकाच्या देशात सकाळ असते म्हणून रात्री उशीरा पण जागरणे करत बसतात. त्याऐवजी सरळ तुमची दुकाने रात्रपाळीतच उघडा ना भो ! ताण येण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे "नाही" म्हणता न येणे. मुळात आपणच समोरच्याच्या अपेक्षा वाढवत बसतो आणि मग त्या अपेक्षांचे ओझे झेपत नाही म्हणून रडत बसतो. मी देखील आयटी मधे ८-१० वर्ष काम केले पण रात्री १०.३० वाजता मोबाईल बंद म्हणजे बंद. सकाळी ८ ते संध्याकाळी ६ असे १० तास काम करायला पुरेसे असतात. तेवढ्या वेळात मन लावून काम करावे. एखाद दोन तास आपल्या आवडत्या छंदात रमून जावे. ऑफीस ला घरी आणु नये आणि घर ऑफीस मधे घेऊन जाऊ नये. मी ज्या उत्पादनासाठी सेवा देत असे ती आम्रविकास्थित होती आणि जगभर त्यांची कार्यालये होती.आम्ही इकडुन मदतीसाठी संपर्क साधला की त्या त्या वेळेत जगातल्या ज्या ज्या भागात दिवस असेल आणि कामाची वेळ असेल तिथले कर्मचारी मदत करायचे आणि त्यांची घरी जाण्याची वेळ झाली की सरळ ती केस दुसर्‍या देशात / खंडातील कार्यालयाला पाठवून देत. त्यांची कार्यपद्धती खुपच उत्तम पद्धतीने विकसीत केलेली होती. आपल्या समस्येची चा पुर्ण इतिहास त्यांच्याकडे व्यवस्थित नोंदलेला असायची आणि समोरचा सेवा देणारा व्यक्ती बदलला तरी "पुनश्च हरीओम" करावा लागत नसे. याउलट भारतातील मुकादमांची आम्ही दिवस रात्र काम करावे अशी अपेक्षा असते. रात्री बेरात्री फोन उचलून / मेल करुन यांना अपडेट करावे अश्या अपेक्षा असायच्या. हा एक प्रकारचा चक्रव्युह आहे. त्यात कितीही निष्णात व्यक्तीचा "अभिमन्यू" होतोच होतो. त्यात न अडकण्याचा एकच मार्ग आहे म्हणजे मुळात त्या चक्रव्युहात न शिरणे. आपण करीयरच्या सुरुवातीपासूनच अशा "वाईट्ट" गोष्टींना नाही म्हणायला शिकणे आवश्यक आहे. ताण येण्याचे अजून एक महत्त्वाचे कारण म्हणजे नावडती गोष्ट टाळत राहणे. ह्यावर मी माझ्यापुरता उपाय शोधला. उदा.मला जेवणात ताटातील काही पदार्थ आवडत नसत ते शिल्लक राहत आणी आवडत पदार्थ सुरुवातीला खाऊन संपवले जात. मग मी हा क्रम बदलला. नावडते पदार्थ पहिले संपवायचे आणि आवडता पदार्थ शेवटी चवीचवीने खायचा. तोच मार्ग कामात अनुसरला. टाळाव्याश्या कामाला पहिला हात घालायचा आणि आवडते काम शेवटी करायचे. प्रश्न बर्‍यापैकी संपला. खरे तर भारतीयांना अध्यात्माचा किती सुंदर वारसा लाभला आहे. तो मार्ग अंगिकारुन पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यास नक्कीच ताण तणावातून मुक्ती मिळू शकते. बाकी विजूभाई आणि इतर जाणकार मिपाकर आपल्याला इथे मार्गदर्शन करतीलच.
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Sat, 08/29/2020 - 16:32 नवीन
मुटके साहेब प्रतिसाद आवडला. सुचवलेले उपाय पटले पण त्यांची अंमलबजाणी अवघड आहे.
ताण येण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे "नाही" म्हणता न येणे.
तुम्ही नाही म्हणाला तर होय म्हणाला कोणी होतकरु हमाल पुढे येतोच येतो व मग तुम्हाला नंतर डावलले जाण्याची शक्यत असते.
ह्यावर मी माझ्यापुरता उपाय शोधला. उदा.मला जेवणात ताटातील काही पदार्थ आवडत नसत ते शिल्लक राहत आणी आवडत पदार्थ सुरुवातीला खाऊन संपवले जात. मग मी हा क्रम बदलला. नावडते पदार्थ पहिले संपवायचे आणि आवडता पदार्थ शेवटी चवीचवीने खायचा. तोच मार्ग कामात अनुसरला. टाळाव्याश्या कामाला पहिला हात घालायचा आणि आवडते काम शेवटी करायचे. प्रश्न बर्‍यापैकी संपला.
तुम्ही पंगतीत जेवायल बसला असाल तर हा प्रकार अंगलट येईल. कारण पंगतीत वाढताना जनरली जे पदार्थ संपलेत तेच पुन्हा वाढले जातात. माझ्या मित्राच्या बाबतीत असा प्रकार झाला होता. ताटात गव्हाची खीर होती त्याने ती प्रथम संपवली व मग बोलण्यात गुंतला. पुन्हा ताटात पाहिले तो वाढपी ढीगभरुन अजुन गव्हाची खीर ओतुन गेला होता.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Sun, 08/30/2020 - 05:35 नवीन
हा हा, यावरून आठवले. जावई पहिल्यांदा सासुरवाडीला गेला.. दुपारी जेवायला बसलो तर पानात वाटीभर कारल्याची भाजी.. तोंड वाकडं करायची पण सोय नाही.. मग हसत हसत जावयाने गुपचूप प्रथम टी भाजी खाऊन टाकली आणि मग बाकीच्या पदार्थांकडे वळला.. सासूबाईंचं पानात लक्ष गेलं, अरे, कारल्याची वाटी रिकामी, एव्हढी भाजी आवडते होय जावायबापुना, सासूबाईंनी आग्रह करून अजून एक वाटी वाढलेली.. आवडत नाही असे म्हणायची पण सोय नाही. तोंड दाबून बुक्क्यांचा मार. जावई शहाणा झाला.. तो आता आवडता पदार्थ अगोदर पण खात नाही आणि शेवटी पण.. तो जेवणात मध्ये मध्ये चवीला न आवडणारा पदार्थ संपवत राहतो. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Sat, 08/29/2020 - 17:14 नवीन
भारताची लोकसंख्या १३५ कोटी आहे. साहजिकच त्यामुऴे स्पर्धाही खूप आहे. अमेरिकेसारखी आटोक्यात असणारी लोकसंख्या भारतात नाही. तिकडच्यासारखे वर्क कल्चरही इथे नाही. आस्थापनांमधे कामासाठी हव्या त्या क्षमतेचा माणूस अल्पकाळात उपलब्ध होऊ शकतो. मग असे असताना जो काही ताण येतो त्याला इथल्या कंपन्या कितीसे महत्व देतील? त्यांनी महत्व न दिल्याने त्यांचे कितीसे नुकसान होईल? किंबहूना एम्प्लॉयीला पिळून घेण्याच्या कौशल्याचेच पैसे मिळत असावेत का? ताणामुळे एखादा नोकरी सोडून गेला तर अल्पकाळात दुसरा माणूस इथे उपलब्ध होतो. हा भारत आहे.इथे असेच चालायचे.वड्रा म्हणाला ना "बनाना कंट्री"!
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sat, 08/29/2020 - 17:56 नवीन
उपयोजक साहेब आपल्या इथले वर्क कल्चर हे जरा वेगळे आहे. भारतीय ( दक्षीब अशियाई ) माणसाला सुट्टीच्या दिवशी कामाला बोलावले तर तो येतो. ( थोडी कुरबुर करेल ) इथला माणूस अजूनही नोकर मालक या मनोअवस्थेत वावरतो. मात्र पिळून घेणे असे इतके नसावे . प्ण लोक जबाबदारीने घरूनही काम करतात. पण त्यामुळे ताण येण्याचे कारण वेगळे आहे. आपल्याकडे वय जसे वाढेल तसे माणसाला मॅनेजर बनवले जाते. त्याच्याकडून तशा अपेक्षा ठेवल्या जातात. एखाद्याला जरी प्रोग्रामिंग मधे काम करावेसे वाटत असते तरीही हडेलहप्पी करून त्याला मॅनेजरचा रोल दिला जातो. त्या कामात तो सिनीयर माणूस अयशस्वी होतो. आणि इथेच स्ट्रेस यायला सुरवात होते. कामाचा तिटकारा यायला लागतो. या उलट एखादा ज्युनियर रीसोर्स हा जात्याच लीडर असतो. बोलका असतो. डॉमिनेटिंग असतो. त्याला जर हाताखाली बराच वेळा रहावे लागले/ हुकूम पाळायला लागले. तेही एखाद्या हिटलर मॅनेजर कडून तर तो रीसोर्स कामापासून दूर रहाणे पसंत करतो. यामुळे त्याच्या कामावर परिणाम व्हायला लागतो. या मुळॅ स्ट्रेस वाढायला लागतो. आणि तो माणूस करीयर पासून दूर जाऊ लागतो
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Sun, 08/30/2020 - 05:37 नवीन
आपल्याकडे वय जसे वाढेल तसे माणसाला मॅनेजर बनवले जाते. त्याच्याकडून तशा अपेक्षा ठेवल्या जातात. एखाद्याला जरी प्रोग्रामिंग मधे काम करावेसे वाटत असते तरीही हडेलहप्पी करून त्याला मॅनेजरचा रोल दिला जातो.
आईटी मधील अगदी चपखल उदाहरण. तांत्रिक कामा मधे अधिक रुची असणर्‍याने जर मॅनेजरचा रोल नाकारला तर , त्याच्या डोक्यावर सुमार दर्जाचा अधिकरी आणुन ठेवतात. ते अजुन अपमानास्पद होते . मग तो कसे बसे मॅनेजर बनण्याचा प्रयत्न करतो. ह्या मुळे ह्या क्षेत्रात आपल्याकडे सुमार (mediocre) लोकांची संख्या खुप आहे.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Sat, 08/29/2020 - 18:34 नवीन
ज्युनिअरने मला मॅनेजर करा असा प्रस्ताव ठेवणे किंवा मॅनेजरने मला मॅनेजरची जबाबदारी देऊ नका असे सांगणे? ऐकतील का असे सांगितले तर?
  • Log in or register to post comments
र
राघव Sat, 08/29/2020 - 20:41 नवीन
मुटके साहेबांचा प्रतिसाद आवडला. त्यांची रॅशनल विचारसरणी आहे आणि त्यानं फक्त आयटीच नाही तर जवळपास कोणत्याही क्षेत्रात फायदाच होतो. पण आयटी हमाल या शब्दा मागील हीन भावनेला माझा आक्षेप आहे. मी स्वतः आयटीत आहे आणि त्या कामात काहीही हीन नाही. अर्थात् सगळेच रॅशनल विचारानं वागू शकत नाहीत. प्रत्येकाच्या मनाची घडण वेगळी. त्यामुळं विजूभाऊ ज्या अभ्यासाच्या मार्गानं त्यावरील उपाययोजना मांडतील/मांडणार आहेत, ते पाहण्यास मी उत्सुक आहे. काही नवीन गोष्टी शिकायला मिळतीलच. या धाग्याच्या अनुषंगानं काही प्रश्न मांडावेसे वाटलेत, जे मूळ विषयाकडे नेण्यास उपयुक्त होतील अशी आशा वाटते. हे प्रश्न अंतर्मुख करण्यासाठी आहेत. त्यातून विवेक-विचाराला चालना मिळणे अपेक्षीत आहे. याची उत्तरे इथे मांडलीच पाहिजेत असे काही नाही. पण कृपया कुणीही गैरसमज करून घेऊ नये, कुणालाही यात दुखवायचा हेतू नाही. - कोण आपल्या बॉसला नाही म्हणून ते पचवू देखील शकेल? - एखाद्या गोष्टीत मन न लागण्याची काय काय कारणं असतील? - इतर जण आपल्यापेक्षा पुढे जातील ही भिती कोणाला वाटेल? ही भिती अनावश्यक नाही काय? - जे काम आपण करतो त्यातून काय आणि किती परतावा मिळेल, याचं गणित आपण स्वतः मांडायला नको काय? आपल्या अपेक्षा रिअ‍ॅलिस्टीक आहेत किंवा नाहीत हे आपण ठरवणार नाही काय? - एकच एक उत्पन्नाचा स्त्रोत आणि त्यातून मनावर येणारा ताण, हे सहन होत नसण्यामागील मूळ कारण काय? ते नीट मांडून त्यावर आपल्या कुवतीनुसार/ताकदीनुसार उपाय अंमलात आणण्याची जबाबदारी कुणाची? नवीन उत्पन्नाचा स्त्रोत कसा तयार करायचा याचा विचार कोणी करायचा? - आर्थिक स्थिरतेचे मापदंड प्रत्येक व्यक्तीच्या गरजेनुसार बदलतील. आपले स्वतःसाठीचे मापदंड काय? कमीतकमी सगळ्यांना सांगता येईलच, पण जास्तीत जास्त काय हे किती जण ठरवू शकतील? - मी काम का करायचे? मी हेच काम का करायचे? मी हेच काम करत राहणार काय? मला पुढे जाऊन काय करायचे आहे? ह्या प्रश्नांची उत्तरे स्वतः आपण शोधू शकतो की आपल्याला दुसरा कुणी चांगली मदत करू शकतो? कुणी मदत केली तर ती मान्य करून तसं आचरायची आपली तयारी आहे काय? - जे मदत करण्याचा प्रयत्न करतील, त्या मदतीतून येणार्‍या यश-अपयशाची जबाबदारी कोणाची? मुळातच, आपली अडचण कोण सोडवू शकतो? - जर आपल्याकडे पुरेशी आर्थिक स्थिरता आली तर आपण त्याचा विनियोग कसा करणार? - जर आपली परिस्थिती भिकार्‍यासारखी किंवा त्याहूनही खराब झाली तर आपण जगणार की नाही? का? - ध्येय समोर असणं गरजेचं नाही काय? ध्येय कोणतं असलं पाहिजे?
  • Log in or register to post comments
क
कोहंसोहं१० Sun, 08/30/2020 - 02:29 नवीन
खरे तर भारतीयांना अध्यात्माचा किती सुंदर वारसा लाभला आहे. तो मार्ग अंगिकारुन पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यास नक्कीच ताण तणावातून मुक्ती मिळू शकते" -----> धर्मराजजी, हा सर्वात महत्वाचा आणि तरीही सर्वाधिक दुर्लक्षित राहिलेला/मुद्दाम केला गेलेला मुद्दा आहे. अपने पास सोना है और हम पत्थर पाने के लिये मरे जा रहे है.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Sun, 08/30/2020 - 05:19 नवीन
लोक पैसा मिळवण्यासाठी तुफान धावत सुटलेत.हे करताना आरोग्याच्या चिंध्या झाल्या तरी काळजी करत नाहीत. डॉ.नीतु मांडके यांनी हॉस्पिटल बांधण्यासाठी दररोज १५-१६ तास काम केलं.हृदयरोगाने मृत्यू. अनिल पाटील यांचा रक्तदाब बिघडल्याने मृत्यू. हे लोक डॉक्टर होते.हे ज्या विकारांनी गेले ते विकार अचानक येऊन उभे ठाकलेले नाहीत.पण I can handle it या अतिआत्मविश्वासामुळे जीव गमावून बसले. वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्‍या काही लोकांना(सर्वच नव्हे)आरोग्याचं महत्व समजत नसेल.त्याचं गांभीर्य समजत नसेल तर वैद्यकीय क्षेत्रात काम न करणार्‍या लोकांना ते समजावणं किती अवघड असेल?
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Sun, 08/30/2020 - 06:10 नवीन
सदर धाग्यात फक्त आयटीतल्या ताणाचीच चर्चा का? कोअरमधल्या लोकांचे जीवन सुखी झाले तर चालणार नाही का? किंबहूना कोअरमधे आयटीपेक्षा जास्त ताण असतो. हो.कष्ट दोन्हीकडे असले तरी पगारात तफावत मात्र कमालीची असते.फ्लॅटसच्या किंमती वाढल्या त्या कोणामुळे? ;) गल्लीतल्या एका मुलाने PLC चा कोर्स केला होता.फ्रेशर आहे,कामाचा अनुभव नाही म्हणून एका कंपनीने ३ हजार महिना पगार अॉफर केला होता.इतक्या कमी पगारात शिपाई तरी काम करेल का? समजा आयटीत राबणूक असलीच तरी ती एसी अॉफिसमधे बसून तरी आहे.त्यामानाने पॅकेजसुद्धा मिळते. कोअरमधे मशिन्सच्या कर्कश आवाजात,घामाघूम होत काम करावे लागते.बरं इतकं करुन मालकांकडून/कंपनीकडून ट्रीटमेंट तरी चांगली मिळावी तर ते सुद्धा नाही. ७-८ किंवा फारतर २० कामगारांना घेऊन इन्स्टॉलेशनचा छोटा व्यवसाय करणार्‍या किंवा काहीतरी पार्ट बनवून देणार्‍या कंपन्या(?) तर अक्षरशः कळस असतात.कामगार हा आपला कर्जदार आणि आपण १०% व्याजाने कर्ज देणारे सावकार असल्याच्या थाटात अशा कंपन्यांचे मालक कामगाराला पळवत असतात.बरं यांची कंपनी कायम तोट्यातच असते.निरनिराळी कारणे देतात.पगारवाढ तर मुंगी मुतावी तशी मिळते.उपकाराचीच भावना असते. ही अशी हालत/कस्पटासमान लेखणे आयटीत होत नसावी ना? की आयटीत गणित/बुद्धिमत्ता चाचणी यात अग्रेसर असणार्‍यांना घेतले जाते,आयटीवाले अमेरिकन कंपनीसाठी काम करतात म्हणून त्यांना जास्त महत्त्व आणि कोअरवाले धुळीत कपडे,हात काळे करत काम करतात म्हणून ते बिनमहत्त्वाचे असे काही आहे का? :( तसेच असेल तर इथल्या तज्ञांनी सर्व कोअरवाल्यांना आयटीत कसे शिरता येईल याबद्दल उद्बोधन करावे व दुवा घ्यावा.
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Sun, 08/30/2020 - 10:14 नवीन
कोअरमध्ये आय.टी पेक्षा पगार कमी मिळतो ह्या विधानातही फार तथ्य नाही.आय.टीतही सुमार दर्जाच्या होतकरुंना प्रथम कमी पगारावरच राबावे लागते.करिअरच्या सुरवातीलाच जास्त पैसा वगैरे लाड कॅम्पस मध्ये निवड झालेल्या हुशार विद्यार्थ्यांच्याच वाट्याला येते. ज्यांना कॅम्पस मधुन नोकरी मिळत नाही त्यांना नोकरी शोधायच्या प्रक्रियेतुन जावेच लागते जिथे सुरवातीला कमी पगाराची नोकरी करावी लागते. हा एक इन्क्युबेशन पिरियड आहे. तो आय.टीमध्ये कदाचित तुलनेने कमी असेल.पण तिथेही हातपाय मारावे लागतातच. मध्यंतरी आधीच्या कोअर कंपनीतला एक सहकारी लोकल मध्ये अचानक भेटला होता. अ‍ॅप्रेंटीस म्हणुन एकत्रच एका यांत्रिकी कंपनीत लागलो होतो. साधारण १० वर्षांनंतर भेटत होतो. बर्याच जणांनी आय.टीमध्ये करिअर शिफ्ट केले होते ज्यात मी ही एक होतो. त्याला काय करतोस कुठे असतोस असे विचारले असता तो म्हणाला कि अजुन यांत्रिकी क्षेत्रातच आहे वगैरे. तो आमच्या वेळेचा टॉप परफॉर्मर व हुशार इंजिनिअर होता. त्याला विचारले कि आय.टीत का घुसला नाहीस? कोअर मधेय पैसा आहे का? वगैरे तो म्हणाला आय.टी इतकाच किंबहुना जास्त पैसा कोअर मध्ये आहे कारण आज जो कोणी उठतो तो काहीएक कोर्स करुन आय.टीत घुसतो त्यामुळे कोअर मध्ये कोअर अनुभव असलेल्यांची प्रचंड कमतरता आहे आणि जे आहेत त्यांना फार मागणी आहे. त्यामुळे आय.टी मध्येच जास्त पैसा मिळतो ही एक चुकीची समजूत आहे.
  • Log in or register to post comments
र
रीडर Sun, 08/30/2020 - 15:02 नवीन
जनरली IT मधल्या ताणाला खूप ग्लॅमराईझ केलं गेलं आहे. त्यामुळे ते एकच ताणाचे क्षेत्र आहे आणि बाकी क्षेत्रात सगळे निवांत आहे असे चित्र उभे केले जाते. वैद्यकीय सेवा क्षेत्र, पोलीस, माध्यम क्षेत्र, मनोरंजन, शेती यांसारख्या अनेक क्षेत्रातील ताण हा ताण नाहीच जणू.
  • Log in or register to post comments
स
सौ मृदुला धनंज… Sun, 08/30/2020 - 10:29 नवीन
माझा मुलगा कॅनडामध्ये असतो त्याने आताच प्रेझर युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएशन आयटी मध्ये कम्पलेट केले आहे जॉब च्या शोधात आहे जॉब मिळवण्यासाठी काय करावे लागते
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sun, 08/30/2020 - 11:14 नवीन
मृदुला ताई हे तिथे असलेल्यालाच माहीत असेल. या धाग्यावर ही चर्चा टाळूया. आयटी मधे खूप पैसा मिळतो. त्यातही एस ए पी / ऑरॅकल इ आर पी मधे जास्त मिळतो असा एक प्रवाद आहे. यात तथ्य आहे आणि नाही. चांगला पगार नक्कीच मिळतो पण इन्क्यूबेशन पिरीएड खूप जास्त आहे. ई आर पी मधे तर माझ्या पहान्ञात बरेच जण असे आहेत की त्यांनी अनुभव मिळावा म्हणून स्वतः होऊन पैसे देऊन लहन कम्पनीत सहा सात महिने काम केले आहे. मी एस ए पी शिकत होतो तेंव्ह्या लोकाना जॉब मिळायला बराच वेळ लागायचा. ( अजूनही लागतो) त्या काळात एस ए पी चा लाँगफॉर्म सेल्फ अ‍ॅक्वायर्ड पॉव्हरटी असा चेष्टेने करायचे. ते खरेही होतेच. एस ए पी मधे जॉब मिळावा म्हनून बरेच जण नौकर्‍या सोडून शिक्षण घेत होता
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Sun, 08/30/2020 - 11:19 नवीन
अवांतरः अजुन एक लाँगफॉर्म , सगळे अमेरीकेला पळा :)
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 08/30/2020 - 15:31 नवीन
क्षेत्र कोणते ही असू ध्या सर्वात एक कॉमन अडचण म्हणजे अंतर्गत राजकारण. बॉस लोकांचे चुकीचे निर्णय त्याचा काहीच चुकीचं काम करत नसलेल्या व्यक्तीवर परिणाम झाला की तो व्यक्ती स्ट्रेस मध्ये येतो चमचे गिरी च्या जोरावर promotion मिळणे हा प्रकार पण प्रामाणिक लोकांना तणावात टाकतो. कसलीच चूक नसताना तुमचे प्रमोशन. पगारवाढ थांबणे. ह्या वर उपाय म्हणजे महिन्यातून एक दिवस टॉप बॉस नी सर्व स्तरावरील कर्मचाऱ्यंसाठी अडचणी सांगण्यास मोकळीक द्यावी. गुप्त पणे कोणी ही कर्मचारी त्यांच्या बॉस च्या चुकीच्या निर्णय ची complete करू शकतो.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 08/31/2020 - 02:53 नवीन
कंपनीतील अंतर्गत राजकारण / कंपुगिरी ही कुठेही गेले तरीही असणारच आहे. पण त्यामुळे तुमचे होणारे नुसकान कसे टाळता येईल हे पहाणे महत्वाचे. खरे तर कंपूगिरी मुळे अल्पकालीन फायदा होतो. तुमचे सोशल स्कील्स चांगले अस्तील तर तुम्ही हे मॅनेज करू शकता. पण याच्या जोडीला आवश्यक तांत्रीक स्कील्स असतील तर ते आणखी सोपे जाते. स्कील नसल्यामुळे धडपडणारे, लवकरच मागे पडतात. पण बोलबच्चनगिरी हा एक महत्वाचा मुद्दा आहे. हे एक स्कील आहे हे अमान्य कशाला करायचे. माझा एक कलीग या गुणावर नव्या कम्पनीत जातो. ( तेथे मोठा पगार मिळवतो) मात्र वर्ष दोन वर्ष भरात तेथली मॅनेजमेंट त्याला ओळखून चुकते. त्याचे वैयक्तीक संबन्ध बिघडत नाहीत. आणि तो नवी कम्पनी जॉईन करतो. ( नुकताच तो कलकत्त्याला एका कम्पनीत ५६ लाख या पॅकेजवर जॉईन झालाय) अर्थात हे तो असे किती वर्षे करू शकेल कोण जाणे ( आत्तापर्यंत पंधरा कंपन्या बदलल्यात) बोलबच्चनगिरी हे स्किल मानायलाच हवे
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Mon, 08/31/2020 - 21:04 नवीन
कंपनीतील राजकारण बोलबच्चनगिरी ...वगैरे
महत्वाच्या मुद्द्याला हात घातलात विजुभौ. जसे एखाद्याकडे अ‍ॅनालिटीकल माईंड असते तसे एखाद्याकडे चांगली कन्विसिंग पॉवर असु शकते. बोलबच्चनगिरी करतानाही समोरच्याचा इगो कुरवाळावा लागतो आणि हे बर्याच जणांना जमत नाही त्यामुळे चिडचिड होते. चौकट राजांनी एका धाग्यावर सर्वाय्वल ऑफ फिटेस्ट चा अर्थ सांगताना लिहिले होते कि त्याचा अर्थ म्हणजे टिकुन राहण्यासाठी जुळवुन घेणारा..त्यामूळे कंपनीत एखाद्याकडे टेक्निकल स्किल्स असतील पण मॅनेज्मेंटशी जो जुळवुन घेतो तो टिकतो.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Tue, 09/01/2020 - 08:40 नवीन
भारी धागा !! विजुभाऊ , मस्त लेखन आहे .
तुमच्या मित्रांना वर्क स्ट्रेस संदर्भात काही शंका / प्रश्न असतील तर विचारा.
मला स्ट्रेस्स असा काही खास नाही, जो आहे तो मी व्यवस्थित हाताळत आहे, कदाचित ११-१२ वर्षे कोर्पोरेट मध्ये असल्याने ते टेकनिक साधले आहे .... माझी समस्या आहे - कॉम्प्लेसन्सी . मला इन जनरल "झाले की आता सगळं करुन , आता काय राहिलंय ?" असे फीलींग आले आहे .

( ज्याला आमचे मित्र - करुन सवरुन भागला अन देव'पुजे'ला ला लागला असे म्हणतात. =)))) )

खरेच कंटाळा आहे सगळ्याच गोष्टींचा. म्हणजे असे नाही की जमत नाही म्हणुन कंटाळा. असे नाही , इन जनरल लेथार्जी आली आहे . माझ्या क्षेत्रात, आर्टिफिशियल इन्टेलिजन्स , मशीन लर्निंग , डेटा सायन्स सगळं जमतंय की व्यवस्थित , पण त्यात नवीन काही शिकायची इच्छा होत नाही. अगदी फायनान्स मध्येही करोना रिसेशन मध्ये माझा फोलियो ग्रीन आहे , तेही डार्क ग्रीन, पण तो वाढवायची इच्छा होत नाही. घरीही तेच. श्रावणात दर शुक्रवारी घरी पुरणाचा स्वयंपाक होता पण खरं सांगतो मला जेवढा आनंद दालखिचडीतुन होत होता तेवढाच पुरणपोळीतुन होत होता. आता काहीच करावंसं वाटत नाही , असं वाटतं की मस्त यवतेश्वरच्या पठारावर , गवतात पडुन राहावं अन निळ्याशार आकाशात तंरंगत जाणार्‍या ढगातील आकार शोधत बसावं बस्स्स. अर्थात ह्यात, ह्या विचारचक्रात, काही थोडाफार करोना इफेक्ट आहे, रुटीनचा आळस आलाय, ब्रेक पाहिजे , हे मलाही जाणवत आहे पण सध्यातरी त्याला पर्याय नाही, त्यामुळे मी करोना संपुर्ण संपेपर्यंत म्हणजे अजुन १- २ वर्षे लागली तरीही बेह्हत्तर, पण तोवर अगदी शांत बसायचे , कोणताही साधासा देखील निर्णय घ्यायचा नाही असे ठरवले आहे . पण तरीही ह्या कॉम्प्लेसन्सी / लेथार्जी बद्दल तुम्ही काय सुचवाल ?
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 09/01/2020 - 18:57 नवीन
तुमचा प्रॉब्लेम नोट केलाय नवीन शिकण्याची इच्छा नाहिय्ये ( उत्साह नाहिय्ये) You can't teach an old dog new tricks अगदी असे नाही तरी पण या सारखेच असते. कामातले नाविन्य सम्पले किंवा सतत नाविन्य अनुभवण्याचाही कंटाळा येतो. कामात ब्रेक न मिळणे किंवा रुटीन मधे अजिबात बदल न होणे ( रुटीन मधे बदल येण्यासाठी जे केले जाते ते देखील एक रुटीन बनून जाते) उदा : प्रत्येक वीक एंड ला आउटिंग ला जाणे हे देखेले रुटीन होते.न्यू नॉर्मल बनते. हे मोडायचा प्रयत्न करायचा. फार काही वेगळे करावे लागत नाही डिजीटल डीटॉक्स करुन पहा ( सुट्टी घेऊन गावी जा . तेथे मोबाईल / लॅपटॉप / सोशल मिडीया असे पूर्ण बंद ठेवायचे. ट्रेकिंग चा ग्रूप असेल तर उत्तम. असे काम हातात घ्यायचे की ज्यात मेंदूला पूर्ण विश्रांती मिळेल उदा: भांडी घासणे , घराची भिंत रंगवणे, सायकल चालवणे ,स्वयंपक करणे , घरातली फरशी पुसून घेणे. बागकाम करणे ,मैदानात फुटबॉल खेळणे, ( एकट्याने खेळला तरी चालेल) पण कामात पूर्ण घामटा निघायला हवा आणि मन एकाग्र व्हायला हवे. काम करताना हवे तर विवीध भारती ऐका ( पुस्तक वाचणे , टीव्ही , बातम्या , वर्तमानपत्र , म्यूझिक ऐकणे, सिनेमा पहाणे , नाटक पहाणे यात मन गुंतते. मेंदूला विश्रांती मिळत नाही) विवीध भारती ऐकताना त्यातील गाण्यांचे मूड बदलते असतात त्यामुळे अडकायला होत नाही. याच सोबत कपाल भाती देखील चालू ठेवा. ( रिझलट्स मिळायला एक दोन आठवडे लागतील), मात्र कपाल भाती करायच्या अगोदर तुम्ही शरीराला ब्रेक देता मात्र मेंदूला ब्रेक मिळत नाही. सतत एकाच पद्धतीने विचार करून मेंदु थकतो. डावा आणि उजवा मेंदू आलतून पालटून वापरला तरीही तो थकतोच. दुसरे म्हणजे हे की आपल्या मेंदूत पाच वेगळी ज्ञानेंद्रिये आहेत. आपण कोणतीही गोष्ट करताना या ज्ञानेंद्रियांना ( न्यूरोन्सना ) वापरून एखादी गोष्ट जाणून घेत असते. हे न्यूरोन्स तो अनुभव एकमेकाम्ना जोडून साठवून ठेवता. ज्या वेळेस ऑफिसचे काम करत असतो त्या वेळेस एका ठरावीक प्रकारचीच कामे केली जातात. त्यामुळे एका ठरावीक प्रकारच्या न्यूरॉन्स ना काम पडते. इतर प्रकारची न्यूरोन्स वापरलीच जात नाहीत. उदा : एखादा पदार्थ चाखताना आपण तो डोळ्यानी पहातो, हाताने त्याचा स्पर्ष घेतो. जिभेने चव घेतो. चावताना त्याचा होणारा आवाज ऐकतो, नाकाने त्याचा गंध अनुभवतो . या सगळ्याची सांगड घातली गेली की तो पदार्थ आपल्या आवडतो. काम करत असताना या कडे आपले दुर्लक्ष्य होते. आणि केवळ पोटभरी साठी खात रहातो. यातही खारट , तिखट आणि अती गोड या चवीच जास्त चाखल्या जातात. तुरट आंबट कडू या चवींकडे काणाडोळा होतो. आपल्या शरीराची जडणघडण अशी आहे की ज्या गोष्टी वापरल्या जात नाहीत त्या कमकुवत होत जातात. विस्मरणात जातात. उदा: तुम्ही जर हात दुमडणे बंद केले तर हात दुमडणारे स्न्यायू कमकुवत होतात. आणि हात दुमडणे विसरून जातात. तसेच न्यूरॉन्स च्या बाबतीतही होते. न्यूरोन्स पुन्हा कार्यरत करण्यासाठी एक उपाय आहे. अ‍ॅक्टीव्ह मेडीटेशन. त्या बद्दल स्वतंत्र लिहीन.
  • Log in or register to post comments
P
Prajakta२१ Wed, 09/02/2020 - 20:25 नवीन
चांगल्या मार्गदर्शनाबद्दल आभार अंतर्गत राजकारण ,गॉसिपिंग आणि न आवडणारे जॉब प्रोफाइल, बदलीचा अर्ज करूनही बदली न मिळणे ह्या सगळ्यामुळे वरवर चांगला सुरक्षित आणि चांगल्या पगाराचा बँकेतील जॉब सोडून दुसरीकडे खाजगी क्षेत्रात कमी पगाराचा,असुरक्षित (खाजगी क्षेत्र असल्याने ) पण जॉब प्रोफाइल आवडलेला जॉब करत आहे तर सामाजिक वर्तुळातील प्रतिक्रियांमुळे येणारा ताण (बॅंकेतली नोकरी सोडली!!!! अशा टाईपच्या ) तसेच आत्ताच्या करोना काळात बँकेत असतो तर अर्धवेळ काम करून पगार तरी पूर्ण मिळाला असता ह्या भावनेने येणार ताण (सध्याचे काम बँकेच्या तुलनेत जास्त किचकट असून पगार कमी ) आणि बँकेतल्या बदली हव्या असणाऱ्या ठिकाणच्या मैत्रिणींचे स्टेटस बघून आपण का नाही तिथे ह्या भावनेने येणारा ताण कसे हाताळावे? धन्यवाद
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 21 hours ago
  • सुंदर !!
    1 day 21 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 21 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा