Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

कामामुळे ताण तणाव

व
विजुभाऊ
Wed, 08/26/2020 - 18:29
🗣 75 प्रतिसाद
मित्रानो वेलनेस लाईफ कोच म्हणून एक नवीन मिशन हातात घेतोय. " स्ट्रेस मॅनेजमेंट " स्ट्रेस ताण तणाव यामुळे बरेच काही घडते आणि बिघडते देखील. "स्ट्रेस" खास करून इंफॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रात काम करणारांसाठी तो कायमचाच गळ्यात पडलेला असतो काही जणांसठी कामाचा ताण प्रेरक असते. तर काहींसाठी तो मनस्वास्थ्य बिघडवणारा उत्पात घडवतो. मनस्वास्थ्य बिघडते तब्येतीची वाट लागते. हाय ब्लड प्रेशर, पाठ दुखी, संताप , फ्रस्ट्रेशन डिप्रेशन , डायबिटीस , हार्मोनचे संतुलन बिघडणे , दारू सिगरेट सारखी व्यसने असे बरेच काही होते. या साठी एक मिशन हातात घेतोय. स्ट्रेस कमी करण्याचे . खास करून माहिती तंत्र क्षेत्रातील मित्रांचे .आयुष्य सुखकर करण्याचे. तुम्हाला. तुमच्या मित्रांना वर्क स्ट्रेस संदर्भात काही शंका / प्रश्न असतील तर विचारा. त्यांचे सोल्यूशन द्यायचा प्रयत्न करेन रोज. इथेच. शक्य असेल तसे फेसबुक लाईव्ह वरुन किंवा टेक्स्ट पोस्ट करूनही देईन. विजयकुमार शाह फ्रीडम लाईफ कोच फॉर वेलनेस.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 25781 views

🗣 चर्चा (75)
र
रातराणी Wed, 08/26/2020 - 19:48 नवीन
अरे वा! मस्त! उपयुक्त माहिती मिळेल.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 08/26/2020 - 21:37 नवीन
आपले प्रश्न विचारावेत ते स्ट्रेस ची लक्षणे . आजार. अपाय उपाय आहार उपचार आपले व्यवहार, बदलणाचे मूड्स , रागीट पणा . चिंता ( अँक्झायटी) टेन्शन , डिप्रेशन, वजन वाड/ कमी या आणि तत्सम प्रकारातले काहिही असू शकते. ( व्यनी देखील करू शकता )
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Wed, 08/26/2020 - 21:47 नवीन
कामाची मजा न येणं हे आहे. लोक्स काम आनंदाचं करण्याऐवजी स्ट्रेस कसा मॅनेज करता येईल ते बघतात, पण त्या मार्गानं विषेश काही साधत नाही. तो वेस्टर्नसनी डिवेलप केलेला बिहेविअरल थेरपी अप्रोच आहे. काम म्ह्टलं की ताण येणारच या चुकीच्या गृहितावर तो आधारित आहे. त्या अनुषंगानं मग डायबेटीस, बिपी, कार्डिअ‍ॅक इश्यूज, हार्मोनल इंबॅलन्स....हे सगळं लाईफ स्टाईलचा अनिवार्य भाग असं सांगितलं जातं. लोकही नित्यनेमानं औषध सुरु करतात आणि न चुकता घेतात ! याप्रमाणे मूळ प्रश्ण कायम राहतो.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव गुरुवार, 08/27/2020 - 00:07 नवीन
.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 08/27/2020 - 07:35 नवीन
संक्षि. तुमची समस्या सांगा. खूपदा आपल्या मनाविरुद्ध कामे करावी लागतात. अगदी न आवडणार्‍या कामातही मजा येवू शकते. तेच तर शिकायचे असते. मूळ प्रश्नाला थेट भिडायचं आहे .
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 08/27/2020 - 08:57 नवीन
अहो, मी उत्तर दिलंय ! तुम्ही स्ट्रेस कसा मॅनेज करायचा याचा अभ्यास केलायं, मी जीवनात काम रंगवलंय ! काम हा माझा छंद आहे. तो माझा बेस्ट टाईमपास आहे. मला कामातून उर्जा मिळते, आयुष्य दिवसेंदिवस वृक्षासारखं बहरत जातं. वर्क इज अ‍ॅन अपॉर्च्युनिटी टू ग्रो, एंजॉय द लाईफ मोर. जितका चायलेंज तितकी बुद्धी शार्प होत जाते. मी वाट्टेल त्या गोष्टी सिंप्लीफाय करु शकतो. इथेच बघा, संपूर्ण विषय एकदम सोपा केला आहे ! आपल्या विचारसरणीत एकदम काँट्रास्ट आहे.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 08/27/2020 - 17:57 नवीन
सर्वज्ञानी संक्षीना समस्या असेल विजुभाऊंना वाटलेच कसे ?
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा गुरुवार, 08/27/2020 - 07:37 नवीन
बराच विचार करतोय.. थोडे discrete thoughts आहेत सामान्यपणे आपण काम करतो पैशासाठी.. पैसे कशाला तर आपली पुढची पिढी आपल्यापेक्षा कमी कष्टात राहावी म्हणून.. उदा.. माझ्या लहानपणी अपयश हे यशाची पहिली पायरी वगैरे केवळ पुस्तकात होते.. वास्तवात अपयश म्हणजे आयुष्यातून उठणेच होते. वयाच्या 22-23 व्या वर्षी तुम्ही व्यवस्थित कमावते असणे हे अत्यावश्यक होते. पुढच्या पिढ्याना कदाचित इतका स्ट्रेस घ्यावा लागणार नाही. त्यांना जास्त लेव्हरेज आहे. पण मागची पिढी आपल्यासाठी कष्ट घेत होती याची कल्पना त्यांना असेल की माहीत नाही. पण आता असा प्रश्न पडतो, की केवळ मला जे स्ट्रगल करावे लागले ते पुढच्या पिढीला करावे लागू नये हा विचार योग्य आहे का? मी अनेकांशी मराठी माध्यमातून शिकण्यावरून वाद घातला, त्यात महत्वाचा मुद्दा हाच होता मी माझ्या पुढच्या पिढीला हे भाषेचे स्ट्रगल करावे लागू नये.. पण मग मी त्यांना विचारतो की स्ट्रगल नाही तर तुम्ही त्यांना वारशामध्ये देणार काय? मला खरे तर वाटते की *अपयशाला घाबरू नकोस* आणि *कष्टाला कचरू नकोस* या दोनच गोष्टी खरे तर खरा वारसा आहेत, जो आम्हाला मागच्या पिढीकडून मिळाला आहे.. आम्ही तो कितपत पुढे देतोय हे कळत नाहीये.. याच वारशात मिळाली दुसरी गोष्ट म्हणजे पैशाचे आणि चाकोरीचे महत्व, जे आज सगळ्या तणावाचे करण बनले आहे.. पैसे ठीक आहे, पण चाकोरीबद्ध मार्गावर चालणे आणि peer pressure कसे manage करावे याचे धडे आज आमच्या पिढीला घेणे आवश्यक आहे.. नोकरीत 10 वर्षे झाली की तुम्ही मॅनेजर बनलेच पाहिजे, नाही बंनालात तर तुमच्यात काहीतरी कमी आहे.. हे pressure भारतात जास्त आहे, परदेशात तुलनेने कमी.. नोकरीच्या पहिली 10 वर्षात तुमचे घर असलेच पाहिजे.. लग्न करायचे असेल तर मालकीचे घर पाहिजेच, ही प्रेससुरे कशी सांभाळायची? मला वाटतं हे सगळं स्थिर व्हायला 1/2 पिढ्या लागतील.. ??????
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 08/27/2020 - 12:04 नवीन
तो वेस्टर्नसनी डिवेलप केलेला बिहेविअरल थेरपी अप्रोच आहे पाश्चिमात्य जीवन पद्धतीत , "काम आनंदाचं करण्याऐवजी स्ट्रेस कसा मॅनेज करता येईल ते बघतात," हे कसे? जरा सविस्तर उदाहरणाने सांगाल का? 'स्ट्रेस कसा मॅनेज करता येईल' म्हणजे जे कामाची पद्धत कशी भरवशाची होईल यावर आधी वेळ घालवला जातो मग उलट "दडपण" कमीच होते , डोळे झाकून पद्धत अवलंबली तर "दडपण" वाढणार कि कमी होणार? आपला तर्क काही कळला नाही या बाबतीतला एकूणच कामाचा दर्जा चांगलं असतो त्यामुळे दडपण वाढत असं तर तुम्हाला म्हण्याचा नाही ना? दुसरं असं कि येथे काम आणि खाजगी जीवन याचा ताल मेल घालण्याचाच प्रयत्न करतात ( ते जमवायला येथील परिस्थिती अनुकूल आहे हे जरा बाजूला ठेउया )
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 08/27/2020 - 17:24 नवीन
प्रणय आणि रेप या दोन्हीत क्रिया एकच आहे, पण एकात बेसुमार ताणे आणि दुसर्‍यात कमालीची मजा ! याचं एकमेव कारण काये ? रेझिसटन्स ! हीच कथा कोणत्याही कामाची आहे. वेस्टर्नर्सना (काय इतरांनाही) हा मुद्दाच लक्षात आलेला नाही. पाश्चात्यांनी काम स्टँडर्डाइज करण्यावर भर दिलाय आणि आपण काम टाळण्यावर. आपल्याकडे अध्यात्मिक अँगलनी तर कामाची पुरती वाट लावून टाकली आहे त्यामुळे निवृत्तीशिवाय या चक्रातून सुटका नाही या भावनेतून सगळे काम रेटतांना दिसतात ( रेझिसटन्स!) . काम आनंदाचं झालं की जीवन बहारदार झालंच म्हणून समजा कारण आयुष्याचा सगळा प्राईम टाईम म्हणजे कामात घालवलेला वेळंच आहे.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Fri, 08/28/2020 - 00:54 नवीन
पाश्चात्यांनी काम स्टँडर्डाइज करण्यावर भर दिलाय हो बरोबर ( मास प्रोडूकशन , उद्धरण माल बनवूंन वाहतूक करताना खोक्यांचाच आकार> पॅलेट्स? कंटेनर > तिथून त्या साजेशी जहाजे " किंवा आयकिया चे फ्लॅट पाक डिझाईन ) पण मग या मुले स्ट्रेस कमीच नाही का होत?
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू गुरुवार, 08/27/2020 - 05:10 नवीन
1) माझं स्ट्रेस येण्याचं एक कारण आहे concentration न होने. बरीचशी कामे पाईप लाईन मध्ये असतात मात्र एक काम करत असताना पुढच्या कामाचा विचार डोक्यात घोळत असतो. त्यामुळे हातात असेलेले काम व्यवस्थित आणि वेळेवर पूर्ण होत नाही. 2) आजच काम उद्यावर ढकलण्याची सवय. बरीचशी कामे आज नको उद्या बघू.. नंतर बघू असं करण्याची सवय लागलीये त्यामुळे मग ते काम अगदी शेवटच्या क्षणी झाल्यामुळे बऱ्याचदा चुका होतात आणि मग चिडचिड होते. उदा. द्यायचे झाले तर समजा आत्ता मी एक काम करत आहे.. तर माझ्या डोक्यात खालील भुंगे फिरत असतात. "अरे हे काम पटकन करायला हवं.. अजुन खूप बरीच कामे शिल्लक आहेत.. त्या xxx कामाचं काय करायचं.. ती xyz टास्क अजुन बाकी आहे. अर्रर्रर्र.. मी इतका वेळ ईमेल चेक केलेच नाहीत. एकदा ते बघितले पाहिजेत. हे काम नंतर करायचं का..?? तसेही हे एवढे इम्पॉर्टन्ट नाहीये. यांच्याऐवजी ते xyz वाले बघू.. जाऊदे यार.. बकवास आहे. कंटाळा आलाय.. आता उद्याच बघू.. "
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Fri, 08/28/2020 - 04:46 नवीन
याचं एकमेव कारण म्हणजे आपल्याकडे कामाचं कौशल्य नसणं ! एक काम करतांना अडचण आल्यावर ती डील करता येत नाही म्हणून दुसर्‍या कामाचा विचार येतो, अन्यथा तसा विचार येणंच शक्य नाही. आणि यामुळे कोणतंही काम धड जमत नाही म्हणून कामं पुढे ढकलण्याचा विचार येतो, असं ते चक्र आहे. तुमच्या मुख्य कामत वाकबगार व्हा, एका झटक्यात सगळे प्रष्ण सुटतील. आज शुक्रवारे, फक्त तीन दिवस प्रॅक्टीस करा. सोमवारी मला इथे सांगा !
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Fri, 08/28/2020 - 05:02 नवीन
@ संक्षी. असं नाहीये कि कामाचं कौशल्य नाहीये. हीच कामे मी गेली 8-9 वर्ष झाले करतोय. एके काळी याचं कामाची नशा होईपर्यंत काम करायचो. अगदी 20-20 तास सुद्धा कामे केलीयेत.
एक काम करतांना अडचण आल्यावर ती डील करता येत नाही म्हणून दुसर्‍या कामाचा विचार येतो
हो. पहिल्यांदा काम करताना अडचणी आल्या तरी मस्त मजेने त्या सोडवायचो. पण आता एक जरी अडचण आली तरी ते संपूर्ण काम च अर्धवट सोडून द्यावे वाटते. जास्त डोकं चालवायची इच्छा होत नाही. त्यापेक्षा आधी दुसरे एखादे काम करावे असं वाटत. मग ते पाहिले काम अर्धवट राहते. सॅच्युरेशन कि काय म्हणतात ते आलेय का माझ्यामध्ये. नवीन गोष्टी किंवा अडचणी यांचा सामना करण्याची ताकद कमी झालेय. असं काहीस..
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Fri, 08/28/2020 - 07:11 नवीन
सॅच्युरेशन कदापिही नाही १.
आता एक जरी अडचण आली तरी ते संपूर्ण काम च अर्धवट सोडून द्यावे वाटते. जास्त डोकं चालवायची इच्छा होत नाही. त्यापेक्षा आधी दुसरे एखादे काम करावे असं वाटत. मग ते पाहिले काम अर्धवट राहते.
हेच तर मी सांगितलंय ! २.
सॅच्युरेशन कि काय म्हणतात ते आलेय का माझ्यामध्ये. नवीन गोष्टी किंवा अडचणी यांचा सामना करण्याची ताकद कमी झालेय. असं काहीस.
कामात वाकबगार असणार्‍याची ग्रोथ होते, सॅच्युरेशन नाही. याचा अर्थ तुम्ही मुख्य कामाचं सहजतेनं करु शकत नव्हता, त्यात पुरेसं कौशल्य नव्हतं. हेच तुम्ही लेखकाला खाली दिलेल्या प्रतिसादात म्हटलंय, वाचा : मला माझ्या कामाला इंटरेस्टिंग बनवावे लागेल. ४.
काम नेहमीच कठीण असते असं नाही. पण मानत भीती असते कि जमेल कि नाही.. मग तेव्हा 1-2 फुटकळ प्रयत्न करून ते काम अर्धवट सोडून देण्याची प्रवृत्ती वाढलीय. ( हा माझा स्वभाव रेसेन्टली डेव्हलोप झालाय. याआधी मी असा नव्हतो. )
आधीही तुम्ही निष्णात नव्हतात. भयंकर कष्ट करुन ते काम रेटत होता (बघा : हीच कामे मी गेली 8-9 वर्ष झाले करतोय. एके काळी याचं कामाची नशा होईपर्यंत काम करायचो. अगदी 20-20 तास सुद्धा कामे केलीयेत ). सुरुवातीपासून माझा व्यावसाय एकच आहे तरी नशा रोज नवी आहे. काम मला कायम उर्जा आणि आनंद देतं. सगळे मित्र थकलेत पण दिवसेंदिवस माझं कौशल्य आणखी वृद्धींगत होतंय.
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Fri, 08/28/2020 - 08:44 नवीन
Hmm. तुमच्या प्रतिसादावरून स्वतः ला परत एकदा तपासून पाहावे लागेल असं वाटतंय. तुम्ही म्हणल्याप्रमाणे काही पुढचे काही दिवस प्रयत्न करून पाहतो आणि सांगतो.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Wed, 09/02/2020 - 20:45 नवीन
काय प्रगती आहे ?
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 08/28/2020 - 08:54 नवीन
हे इतकेही सरळ सरधोपट नाहिय्ये. बरेचदा आपण ज्या कामात वाकबगार आहोत त्या कामातही मन लागत नाही असे होते. खास करून खेळाडूंच्या आणि कलाकारांच्या बाबतीत ही समस्या येते. लेखक या गोष्टीला रायटर्स ब्लॉक असे म्हणतात. खेळाडू त्या प्रकाराला फॉर्म जाणे असे म्हणतात तर कलाकार त्याला काही वेळा मूड नसणे असे म्हणतात. जर काम करणार्‍याला दामटून काम करायला लावले तर त्यातून शारीरीक व्याधी उद्भवतात. या बहुतेक करून सायकोसॉमॅटीक प्रकारच्या व्याधी असतात. स्त्रीयांच्या बाबतीत हे प्रकरण काही वेळा कंडीशनल हिस्टेरीया पर्यंत ही जाऊ शकते
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Fri, 08/28/2020 - 09:44 नवीन
संक्षी, विजुभाऊ, प्रतिसादाबद्दल धन्यवाद. माफ करा पण मी संक्षी च्या म्हणण्याशी सहमत नाहीये. मी जेवण खूप चांगले बनवतो म्हणून मला जेवण बनवण्याच्या कामाची आवड आहे असं म्हणू शकत नाही. प्रत्येक क्रिकेट रसिक खूप आवडीने क्रिकेट खेळतो, पाहतो पण प्रत्येक जण सचिनच बनतो असं नाही.. म्हणजेच एखादे काम तुम्हाला आवडते म्हणून तुम्ही त्यात वाकबगार आहात असे नाही आणि vice versa एखाद्या कामात तुम्ही वाकबगार आहात म्हणून तुम्हाला ते काम आवडतेच असं नाही. मी थोडा वेळ आत्मचिंतन केले. समजत नाहीये नेमके चुकतेय कुठे? कारण जर मी माझ्या कामात कौशल्यपूर्ण आणि वाकबगार नसतो तर आजवर इतके अवॉर्ड्स, भरोघोस बोनस आणि क्लायंट कडून ढीगभर ऍप्रिसिएशन्स आले नसते. माझी तुलना इतरांशी केल्यास मी नक्कीच सगळी काम चांगल्या पद्धतीने आणि सर्वांच्या आधी करायचो. हे सगळं करिअर च्या सुरवातीच्या 6-7 वर्ष्यात चलले. पण नंतर परिस्थिती बदलत गेलीये. मला अजूनही माझ्या 2 वर्ष्यापुर्वीच्या मॅनेजर चे कंपनीतल्या माझ्या शेवटच्या दिवशी बोललेले वाक्य आठवतंय जिथे मी 4-5 महिन्यातच काम सोडून दिले कारण होते - रोज होणारे फ्रस्ट्रेशन . शेवटच्या दिवशी माझा मॅनेजर बोलला - *** तुम अच्छा काम कर रहे थे. लेकिन मुझे ऐसा लागता है कि तुम्हारे खुद से बोहोत ज्यादा एक्सपेक्टशन्स है और वो तुम्हे आगे प्रॉब्लेम मे लेके जायेंगे. अच्छा होगा तुम थोडा खुद का दुसरो से कंपॅरिजन करना कम करो. और रिऍलिस्टिक सोचो. आणि हे वाक्य मला खरे होताना वाटतेय. हे सगळं सांगायचे कारण एवढेच कि आपण काम करताना स्वतः कडून काय एक्सपेक्टशन्स ठेवाव्यात? Goals सेट करताना किती दूरचे गोल्स सेट करावेत. नेमका किती वेळ द्यावा त्यांच्यावर काम करायला.? काम करताना डिसीप्लिन कसा पाळावा. ? आणि सगळ्यात महत्वाचे - एखाद्या ठिकाणी नवीन रूजू झाल्यावर पाहिले काही महिने आपण पाहतो कि आपल्यला काहीच येत नाही आणि इतर लोकं खूप पटपट काम करतायेत. हा न्यूनगंड आणि त्यातून स्वतः चे रोज डेमोटिवेट होणारे मन यांना कसे सांभाळायचे. ? नवीन ठिकाणी नेमक्या काय गोष्टी करायच्या ज्यामुळे आपला turnover time कमी असेल. ? करिअर च्या सुरवातीला मी एवढा सगळा विचार करायचो नाही.. फ्लो सोबत जायचो आणि मग आपसूकच तिथे कामात पारंगत व्हायचो. पण गेल्या 3 वर्ष्यात चित्र बदललेय. काम आणि जबाबदाऱ्या वाढत जातायेत ( सोबत पैसा ही वाढतोय ) कदाचित हेच दडपण आहे का? मी वर सांगितल्याप्रमाणे जिथे मी 4-5 महिन्यात कंपनी सोडली तिथे शेवटी शेवटी काम करण्यापेक्षा जास्त लक्ष माझे याकडे असायचे कि माझं काही चुकत तर नाही ना.. !! आणि हा xyz माणूस इतकं फटाफट करतोय तेच काम मला का जमत नाहीये..! मग आपसूकच चुका व्हायच्या. काही लोकं मुद्दामहून मजा करायचे. मला वाटत सारे फासाद कि जड यही है. !! करिअर मध्ये एखाद्या वळणावर कोणा मिपाकरांना अश्या समस्या आल्यात का?? उत्तरांच्या प्रतीक्षेत. -
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Fri, 08/28/2020 - 15:02 नवीन
१. पहिली आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट : या जगातलं प्रत्येक काम निर्वैयक्तिक आहे. आपण रंग आहोत जो कामात उतरतो. मग तो आगासी असो, कुणी लेखक असो की गृहिणी की कामवाली बाई, कशानंही काहीएक फरक पडत नाही. तुम्हाला पटायला हे जडे पण ती वस्तुस्थिती आहे. आगासी निवृत्त होतो, लेखकाला ब्लॉक येतो, गृहिणी कंटाळते हा दोष कामाचा नाही, कर्त्याचा आहे. म्हणजे कामाचा कंटाळा येणं स्वाभाविक आहे पण याचा अर्थ ते काम निरर्थक झालं असा होत नाही. तुम्ही काही काळ दुसरं काही तरी करा आणि वाट पहा; तुम्हाला पुन्हा मूड येईल. जर मूड येतच नसेल तर याचा अर्थ तुम्ही त्या कामात नव्या पॉसिबिलीटीज एक्स्प्लोअर केलेल्या नाहीत. माझ्या दृष्टीनं कार्यकौशल्य म्हणजे कामाचा वेग नाही (तो यथावकाश प्राप्त होतोच); तर ते करण्याच्या नव्या शक्यतेचा शोध घेत राहण्याची मानसिकता. मी कित्येक वर्ष एकच काम करतोयं, पण मला कधीही तेच काम रोज करतोयं असं वाटत नाही. त्यामुळे आगासीला पुन्हा मूड नक्कीच आला असता आणि तुम्हाला ही येईल, घाई करु नका, थोडं थांबा. २.
जिथे मी 4-5 महिन्यात कंपनी सोडली तिथे शेवटी शेवटी काम करण्यापेक्षा जास्त लक्ष माझे याकडे असायचे कि माझं काही चुकत तर नाही ना.. !!आणि हा xyz माणूस इतकं फटाफट करतोय तेच काम मला का जमत नाहीये..!मग आपसूकच चुका व्हायच्या. काही लोकं मुद्दामहून मजा करायचे.
तुम्ही कामात पारंगत असाल तर दुसर्‍याकडून नवं शिकायला कायम उत्सुक असता आणि आपलं कौशल्य दुसर्‍याशी बिनदिक्कत शेअर करता. तुम्ही पुन्हा तुमची कार्यप्रणाली (द वे यू वर्क) तपासा मग मी काय म्हणतोयं ते लक्षात येईल.
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Fri, 08/28/2020 - 08:52 नवीन
बाप्पू, ही समस्या थोडी अधिक आपणा सर्वांचीच असावी. मला वाटत असलेले एक कारण म्हणजे आपला कामामधला इंटरेस्ट संपला आहे पण इतर जबाबदार्या असल्याने ते सोडु शकत नसल्याने नाईलाजाने करावे लागते आहे. खेळात असलेल्यांना तर निवृत्ती घेता येते पण तिथेही वय उलटुन गेले अथवा कर्तुत्वाचा काळ उतरणीला लागला तरीही पूर्वपुण्याई मुळे पाट्या टाकणारी काही उदाहरणे दिसतात. आंद्रे आगासी किंवा अश्याच एका टेनिसपटुने निवृत्ती घेताना त्यामागचे कारण असे सांगितले होते कि आज जेव्हा रॅकेट हातात घेतली तेव्हा पूर्वीसारखा उत्साह जाणवला नाही आणि कोर्टवर उतरण्याबद्दल काहीच थ्रिल वाटले नाही म्हणुन निवृत्त होण्याचा विचार केला. आपल्याबाबतीत वेगवेगळ्या जबाबदार्यांमुळे आपल्याला एक दिवस अशी अचानक निवृत्ती घेता येत नाही त्यामुळे आपण नाईलाजाने पाट्या टाकत बसतो. @विजुभौ व इतर, ह्यावर काही उपाय सुचवला तर बर्याच जणांना फायदा होईल.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 08/28/2020 - 08:55 नवीन
क्या बात है योगेश. मी ही हेच लिहीत होतो
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 08/27/2020 - 07:39 नवीन
बप्पौ मला समजल्या त्यानुसार तुमच्या समस्या खालील प्रमाणे आहेत. १) कामात कोंसेन्ट्रेशन न होणे २) काम पुढे ढकलावेसे वाटणे. ही दोन्ही लक्षणे आहेत स्ट्रेस असल्याची. अर्थात यावर नक्कीच मार्ग आहेत.
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू गुरुवार, 08/27/2020 - 07:48 नवीन
काय मार्ग आहेत??
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 08/27/2020 - 09:01 नवीन
अर्थात, स्ट्राईकींग एंडला विजूभाऊ आहेत, ते पहिल्यांदा बॅट फिरवतील.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर गुरुवार, 08/27/2020 - 08:14 नवीन
विजुभाऊ नवीन उपक्रमास हार्दीक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 08/27/2020 - 09:06 नवीन
विजुभौ, नव्या उपक्रमास शुभेच्छा......! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 08/27/2020 - 11:36 नवीन
विजुभौ मला आजकाल " छोट्या लोकशाही" चे दडपण येत... आता हे काय काढलं म्हणाल तर ते असं - मी गेली काही वर्षे २-३ गृहसंकुलाच्या कमिटी वर काम केले... त्यात लोकांबरोबर काम करण्याचा दडपण यायला लागलं... नको वाटू लागल ... पण करणार काय पैसे आपले गुंतवलेले असल्यामुळे दुर्लक्ष हि करता येत नाही... कारण / परिस्थिती अशी ( हे भारताबाहेरच्या आहे त्यामुळे काही गोष्टी वेगळ्या असतील पण मनुष्य स्वभाव हा साधारण सगळी कडे सारखा असावा बहुतेक ) - मला प्रोजेक्ट मॅनेज करणे , खास करून इंजिनीरिंग पद्धतीचं असेल तर आवडत आणि त्यातील अनुभव हि आहे तिन्ही ठिकाणी काही ना काही तरी सिविल आणि मेकॅनिकल पद्धतीचे काम कमिटी ला अखत्यारीत करून घेणे जरुरीचे होते . आणि म्हणून मला जास्त रस होता ..आणि ते करिताना कमिटी आणि इतर मालक यांना लोकशाही पद्धतीने वागवावे लागते आणि ते मी अगदी प्रामाणिक पणे करतो...कोणताही वयक्तिक स्वार्थ ना ठेवता , येथील नियम हि कडक आहेत आणि स्पष्ट आहेत पण कधी कधी गुंतागुंतीचे पण असतात थोडे - कमिटी हि म्हणजे काही नोकरी नसते त्यामुळे प्रत्येक जण राजा असल्यासारखं वागतो.. - कित्येकांना कार्यपद्धती माहिती नसते / अर्थकारण माहिती नसते - तांत्रिक बाबी माहित नसताना वाटेल ते सुचवतात ( अलुमिनिम कि स्टेनलेस स्टील याचे जिन्याला आवरण लावावे यात फायदे तोटे समजावून ना घेता काय वाटेल ती तुलना करतात ) - सभेमध्ये मुद्दे सोडून भलतेच बोलण्यात वेळ जातो - किंवा याउलट म्हणजे एखाद्या मुद्य्यांच्या मागे सविस्तर माहिती असेल तर ती खोलात जाऊन चर्चा ना करताच मत नोंदवली जातात - दूरवरचा विचार करीत नाहीत ( दरवेळी सर्वात स्वस्त तो पर्याय निवडणे हे नेहमीच उचित असते असे नाही ) - माझी अरे ला कारे विचारण्याची पद्धत ( यामुळे जरी काही लोकांना मी आवडत असलो , माझी कार्यपद्धती आवडत असली तरी कहि लोकांनी कायमचा पूर्वग्रह करून घेतला आणि मग फक्त विरोधाला विरोध ) - काही कमिट्या फक्त एका माणसामुळे चालत असतात कारण अनके वर्षे त्यात बाकी मालकांनी लक्ष घातलेले नसते अचानक माझ्यासारखा प्रश्न विचारणारा गेला कि इतर "भक्त लोकांना ते नकोसे वाटते ! हे सगळं बघून या "छोटी लोकशाही कमिटी" चा कंटाळा आला आणि दडपण हि . छोटी म्हण्यायचा अर्थ असं कि मी विचार केला कि जर आपलं पैसे गुंतलं असेल तर आपल्याला विचार करावं लागतो ..मग हे थांबणार कुठे? मग नगरपालिकेच्या ( स्थानिक कौंसिल) कमिटी ( मोठी लोकशाही ) वर पण जावे काय? .वैगरे शेवटी ३ हि कमिटीवर एकाच वर्षात असल्यामुळे फार दडपण येऊन लागलं आणि कुठेतरी थांबावे म्हणून - हळू हळू राजीनामे दिले - एक नियम ठेवला, जिथे राहत आहोत तेथील कमिटी वर जायचे इतर ठिकाणी दुर्लक्ष करायचे फक्त एक गुंतवणुकीचा हिशेब म्हणून बघायचे - असं विचार केला कि आपणच का एवढी तळमळ कार्याची.. इतर मालक लोकांचा सुधाच पैसा गुंतलेले आहे ना मग आपण जरी नाही गेलो कमिटी वर तरी काय बिघडणार आहे बाकीचे बघून घेतील यानंतर दडपण कमी झाले पण अधून मधून अस्वस्थ होतोच -
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 08/27/2020 - 12:15 नवीन
एक शंका विजुभौ '"स्ट्रेस" खास करून इंफॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रात काम करणारांसाठी तो कायमचाच गळ्यात पडलेला असतो" याला कारण कदाचित हे असेल का ? कि भारतातील बहुतेक इंफॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रात चालणारे काम हे सर्व्हिस म्हणून क्लायंट साठी केले जाते , मूळ क्लायंट कडे जे नोकर असेल ,इंफॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रात काम करतात त्यांना एवढा स्ट्रेस असतो का? उत्पादन क्षेत्रातील उधाहरण द्यायचे तर एखादा माणूस डिझाईन कन्सल्टन्ट कडे काम करीत असेल आणि त्याचा ग्राहक समजा फोर्ड किंवा टाटा मोटार असेल आणि दुसरा माणूस जर फोर्ड किंवा टाटा मोटार चा नोकर असेल तर दोघांच्या '"स्ट्रेस" मध्ये फरक असेल , दोन्हीही लोक डिझायनम्हणूनच काम करीत आहेत . पण
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 08/27/2020 - 13:07 नवीन
करारावर काम करणार्‍यांवर नेहमीच कामाचा ताण असतो. त्यामानाने मू़ळ कर्मचारी आरामात जगत असतो व तेही जास्त पगार व जास्त सोयीसुविधांसहित. हे सगळीकडे लागू आहे असे मला वाटते. फक्त आयटीमधे असते असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 08/27/2020 - 13:09 नवीन
"आणि जास्त सुरक्षीतता" हे लिहावयाचे राहिले
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 08/27/2020 - 18:47 नवीन
आय टी मधे काम करणारांचे स्ट्रेस हे एक वेगळेच जग आहे. कमी कालावधीत नवीन तंत्र शिकून डेडलाईन्स वर प्रोजेक्ट पूर्ण करणे हे कायमच बोकांडी बसलेले असते. त्यामुळे त्यांचे वैयक्तीक आयुष्य अक्षरशः हळू हळू मर्यादीत होत जाते. इतर आयुष्याची कसलीच मजा घेता येत नाही. या बद्दल सविस्तर लिहायचेय
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 08/28/2020 - 08:58 नवीन
'"स्ट्रेस" खास करून इंफॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रात काम करणारांसाठी तो कायमचाच गळ्यात पडलेला असतो" यावर सविस्तर उत्तर देतो. पण त्यापूर्वी टाटा मोटर्स मधे काम करणारा कामगार आणि आयटी मधे काम करणारा यांच्या त एक महत्वाचा फरक असतो तो म्हणजे. शिफ्ट सम्पली की टाटा मोटर्स मधील कामगार मशीन बंद करतो. आणि घरी जातो. तो घरी मशीन सोबत नेत नाही. आयटी क्षेत्रातल्या माणसाला हे करणे अवघड जाते
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा गुरुवार, 08/27/2020 - 14:23 नवीन
१) शक्यतो दुसऱ्यावर अवलंबून न राहणे . उदा क्रिकेट मध्ये रन्स ना काढता चौकारच मारणे ज्यात फिल्डर पोचण्याआगोदर चेंडू सीमापार झालेला असेल. २) हे माझे स्वतः: चे वाक्य आहे . अमुक तत्ववेत्ता असे म्हणतो स्टाईलचे नाही - ते असे " देअर इज सोल्युशन फॉर एव्हरी प्रॉब्लेम इफ यू हव गटस तू किक ॲस ऑफ प्रॉब्लेम मेकर !" अशावेळी एकतर त्याला हाकला आयुष्यातून वा तुम्ही दूर व्हा -- मी असे बजाज आटोला माझ्या आयुष्यातून हाकलले मी फक्त ५० वर्षाचा असताना. व सुखी झालो . ३)आपल्याला आयुष्याकडून नक्की काय हवे याची निश्चित कल्पना तारुण्यातच तयार करून ठेवणे. ४) प्रत्येक माणसाचे मन ,क्षमता या वेगळ्या असतात सबब दुसर्यांची दु:खे हलकी करा पण अन्गावर घेऊन नका, व्यर्थ आहे असे करणे . उदा तुमचा मुलगा अभ्यास करीत नाही त्याचा ताण घेउ नका ,लेट हिम फेस द म्युझिक इन फ्युचर ! ५) आपले मित्र नातेवाईक यान्च्या जास्त जवळ जाउ नका मग अपेक्षा निर्माण होतात स्वतः चे छन्द ही त्यासाठी मस्त सोय आहे. गुण आपलेच दोष ही आपलेच ! ६) नवनवीन काहीतरी शिकायची खटपट ही पैसे मिळवून देणार नाही कदाचित पण अधिक कौशल्ये विकसित केली ,ज्ञान मिळविले तर अनेक वेळा आपले पैसे वाचू शकतात .त्यातून ताण नक्की कमी होतो.
  • Log in or register to post comments
क
कोहंसोहं१० गुरुवार, 08/27/2020 - 15:59 नवीन
"त्यांचे सोल्यूशन द्यायचा प्रयत्न करेन रोज. इथेच.">>>>>>>> चांगला उपक्रम. काही आयडींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे वाचायला आवडेल. ताणाबाबत संक्षींच्या मतांशी सहमत पण बहुतांश लोक करिअर निवडत नाहीत तर करिअर त्यांना निवडते असे वाटते. त्याचे मूळ कारण म्हणजे सोसायटी प्रेशर. लोक काय म्हणतील आणि आवडीच्या कामातून पैसा कमी मिळाला तर काय या मूळ ताणावरच इतर ताणांची दुनिया उभी राहिली आहे. जेंव्हा या दोन गोष्टींचा विचार करणे बंद होईल तेंव्हा अर्धा अधिक ताण असाच निघून जाईल.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 08/27/2020 - 18:27 नवीन
बाप्पू मला समजल्या त्यानुसार तुमच्या समस्या खालील प्रमाणे आहेत. १) कामात कोंसेन्ट्रेशन न होणे २) काम पुढे ढकलावेसे वाटणे. ही दोन्ही लक्षणे आहेत स्ट्रेस असल्याची. अर्थात यावर नक्कीच मार्ग आहेत. १) कामात काँसेंट्रेशन न होणे. कोणतेही काम जर आपल्याला त्या कामाचे महत्व वाटत आणि ते रंजक असेल तर ते प्रमुख च ठरते. एखाद्या कामाची प्राथमिकता ठरवणे हे मेंदू ते काम आपल्याला किती रंजक आहे किंवा आपल्यातील इतर भावना ( उदा जबाबदारी / दु:ख / राग / आनंद / भिती यांचे प्रमाण कसे आहे त्यावर ठरवते. उदा : परीक्षेच्या आदल्या दिवशी संध्याकाळी मैत्रीणीला भेटायला जाणारा जाणार्या एखाद्याने अभ्यास जर नीट केला असेल तर अशा वेळेस मनात भिती कमी असते आणि रंजकता ( एक्साईटमेम्ट ) अधीक वाटत असेल तर तो माणूस मैत्रीणीला भेटल्यावर त्याच्या मनात थरावीक काळासाठी परिक्षेचे विचार कमी असतील. त्याला इतर काही कामे आहेत हे ही आठवणार नाही. पण एकाच वेळॅस जर मेंदूत एक्साईटमेंट आणि भिती हे दोन्ही विचार सारख्याच प्रमाणात आले तर तो माणूस मैत्रीणीला भेटायला जाईल त्यावेळेस परिक्षेचा विचार करत राहील. आणि परिक्षेचा अभ्यास करताना मैत्रीणीला भेटायचा विचार करत राहील. त्याचे कुठेच काँसनट्रेशन होणार नाही. आणि मनावरचा ताण वाढत राहील. २) काम पुढे ढकलावेसे वाटणे . एखादे काम पुढे ढकलावेसे वाटणे याला बरीच कारणे असू शकतात. अ) त्या कामाचे श्रेय मिळणार नसते ब) ते काम इतर कोणीतरी आपल्ल्यावर लादलेले आहे क) ते काम आत्ता लगेच केले पाहिजे अशी गरज नसेल द) त्या कामासाठी आपल्याकडे आवश्यक रीसोर्सेस ( पैसे / मनुष्य बळ/ ज्ञान ) नसेल तर ई) त्या कामासाठी आपल्याला हवे तशी परफेक्ट ( सुयोग्य) परिस्थितीअजून आली नाही ( वेळ / पैसे / घटना वगैरे) असे वाटते फ) त्या कामासाठी आपणा ते काम करू शकू हा विश्वासच मनात नसणे.( काम खूप कठीन असणे) ग) ते काम खूपच सोप्पे आहे. कधीही करता येईल असे वाटावे इतके सोप्पे ह) त्या कामाची काहीच उपयुक्तता नसणे काम पुढे ढकलल्याने ते टळत नाही. मात्र रेंगाळलेले काम आपल्या इतर कामात अडचणीचेच ठरते. आणि इतर कामांच्या गडबडीत रेंगाळलेल्या कामामुळे अडचण आली की आपली चिडचिड होते. आपण स्वतःचाच रागराग करू लागतो. काम आपण नक्की कशामुळे टाळतो आहोत हे समजले तर त्याचे काय करायचे हे ठरवता येते.
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Fri, 08/28/2020 - 05:09 नवीन
धन्यवाद विजुभाऊ. पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात दिलेले उदाहरणं रेलट झाले. मला माझ्या कामाला इंटरेस्टिंग बनवावे लागेल. दुसऱ्या उत्तरात माझ्या अभ्यासानुसार खालील कारणे आहेत. - फ) त्या कामासाठी आपणा ते काम करू शकू हा विश्वासच मनात नसणे.( काम खूप कठीन असणे) - काम नेहमीच कठीण असते असं नाही. पण मानत भीती असते कि जमेल कि नाही.. मग तेव्हा 1-2 फुटकळ प्रयत्न करून ते काम अर्धवट सोडून देण्याची प्रवृत्ती वाढलीय. ( हा माझा स्वभाव रेसेन्टली डेव्हलोप झालाय. याआधी मी असा नव्हतो. ) ग) ते काम खूपच सोप्पे आहे. कधीही करता येईल असे वाटावे इतके सोप्पे हो असेही होते खूप वेळेला. पण अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ताणल्याने, काम लवकर संपवण्याचा प्रेशर येतो. आणि ऐन वेळेला अचानक एखादी unknown अडचण आली कि मग चीड चीड होते..
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु गुरुवार, 08/27/2020 - 21:37 नवीन
"स्ट्रेस" खास करून इंफॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रात काम करणारांसाठी तो कायमचाच गळ्यात पडलेला असतो"
एक कारण म्हणजे आय.टी मधली कामे डेडलाईन नुसार केली जातात आणि टाईम मार्जिन बरेच छोटे असते. दुसरे कारण हे असावे कि इथे मेंदु ह्या अवयवाचे काम प्रामुख्याने जास्त आहे त्यामुळे येणारा ताण हा अंतर्गत अवयवांवर ही येत असावा (जसे कि ह्रदय्,जठर इ.).
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 08/28/2020 - 05:51 नवीन
एकूण मिपाकरांनी स्ट्रेसवर मात केली आहे.
  • Log in or register to post comments
स
सनईचौघडा Fri, 08/28/2020 - 08:59 नवीन
या प्रकरणात महोदय संक्षी साहेबांनी जे काही म्ह्टलेले सर्व पटले आहे. ज्या दिवशी कामातली रंजकता निघुन जाईल आणि कामे रेटण्याचे प्रकार चालु होईल त्या दिवशी आपण स्वतः च्या निवृतीचा विचार चालु करावा माणसाने. बरोबर ना संक्षी साहेब ?.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Fri, 08/28/2020 - 15:15 नवीन
एक ज्योक म्हणून सांगतो. बायको आणि काम एकसारखंचे. लोकांना बायकोत इंटरेस्ट का वाटत नाही (किंवा द अदर वे), कारण तिला एक्सप्लोअर करण्याच्या सर्व शक्यता संपल्या असं त्यांना वाटतं. मग बायको रोज तीच ती वाटायला लागते. नोकरी किंवा कामाचं सेमे. काम करण्याच्या, नवं शिकण्याच्या इतक्या शक्यता आहेत की बोलता सोय नाही पण लोक्स काम उरकायच्या मागे असतात. ओशो म्हणतात : पिपल जस्ट टर्न टाईम इनटू मनी; यापलिकडे लोकांना कामात रस नसतो. फरक इतकाच की नोकरी बदलणं सोपंय तितकं बायको बदलणं नाही म्हणून लोक्स (सहसा) त्या फंदात पडत नाहीत. जर तुम्ही काम (किंवा पत्नी) एक्स्प्लोअर करायला शिकलात तर तीच पत्नी रोज नवी वाटते आणि तेच काम तुमच्या व्यक्तिमत्व विकासाच्या नव्या दिशा निर्माण करतं.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 08/28/2020 - 19:20 नवीन
आदरणीक संक्षी काका तुमच्या चौफेर आणि सर्वज्ञात असण्याबद्दल आदर च आहे. आणि एका व्यक्तीला सर्वच क्षेत्रातली इतकी इत्यंभूत माहिती कशी काय असते याबद्दल अचंबीत देखील झालोय. एन एल पी बद्दल तुम्हाला किती ज्ञान आहे हे माहीत नाही त्यामुळे .एक नम्र पण स्पष्ट विनंती कराविशी वाटते. १) धागा कशा साठी काढलाय हे पहा आणि त्यानुसार तुमच्या काही व्यथा असतील किंवा शंका असतील तर त्या मांडाव्यात. लोकांना त्याम्च्या शंका व्यथा मांडू द्या अगोदर . विचारल्याशिवाय तुमचे मत व्यक्त करू नका. कामातील ताणतणाव हा एक प्रत्येकाला ग्रासणरा व संवेदनशील विषय आहे. मानसशास्त्रा च्या दृष्टीने तो सोडवूया. याचे अधिकृत शिक्षण घेतेलेल्या व्यक्तीकडून ते करून घेऊया. उगाच धसमुसळे प्रतिसाद देऊ नका. संक्षीकाका ;एक मिपाकर आणि धागा कर्ता म्हणून तुम्हाला _/\_ जोडून विनंती. करतो की या धाग्यावर जसे अपेक्षीत आहे तसेच म्हणजे केवळ व्यथा किंवा शंका लिहून व्यक्त होउया. तुम्हाला एखादे सोल्यूशन माहीत असेल तर ते मला व्यनी ने कळवा. तज्ञाकरवी पाहून योग्य असेल तर तुमच्या नावानिशी इथे प्रकाशित करेन. २) एन एल पी बद्दल जर गहन ज्ञान असेल तर एखादा नव्या विषयावर नवीन धागा काढा. लोकांना भरभरून व्यक्त होऊ द्या. मिपाकारांचा फायदाच आहे त्यात. माझ्या या प्रतिसादावर आक्रस्ताळी उत्तरे तुम्ही देऊन धागा हॅक करायचे स्वातंत्र्य तुमच्याकडे आहे.. पण त्यामुळे मिपाकरांचेच नुकसान होईल. या प्रतिसादाव्यक्तिरीक मी आपल्या कोणत्याच प्रतिसादास उत्तर देणार नाहिय्ये.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Fri, 08/28/2020 - 19:51 नवीन
उंटावरून शेळ्या हाकणारे कधीच जबाबदारी घेत नाहीत.. त्यांना कसला आलाय ताण आणि तणाव?
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Fri, 08/28/2020 - 20:26 नवीन
तुमच्या चौफेर आणि सर्वज्ञात असण्याबद्दल आदर च आहे.
विजुभाऊ, आपल्या या वाक्यातला उपरोध पुरेसा स्पष्ट होत नाहीय. नवीन मिपाकरांचा उगीचच गैरसमज होऊ नये म्हणून हा प्रतिसाद-प्रपंच.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sat, 08/29/2020 - 10:01 नवीन
१. धागा तुमचा आहे आणि त्यामुळे प्रत्येक शंकेला उत्तर देण्याचा पहिला हक्क तुमचा आहे. इथे पहिल्या प्रतिसादापासून मी ती सभ्यता पाळली आहे. धागा हॅक करण्याचा कदापिही उद्देश नाही आणि मला तशी गरजही नाही. मी स्वतः काम हा विषय जीवनात कमालीचा रंगवलायं त्यामुळे त्याचे एकूण एक पैलू माहिती आहे. इन फॅक्ट काम हा मन या विषयाचाच एक महत्तम पैलू आहे आणि मन हा विषय मी आरपार केला आहे. २. एनएलपी आणि माझ्या अप्रोचमधे जमीन आस्मानाचा फरक आहे. एनएलपी हा analyzing strategies used by successful individuals and applying them to reach a personal goal. It relates thoughts, language, and patterns of behavior learned through experience to specific outcomes; असा बिहेविअरल अप्रोच आहे. माझ्या दृष्टीनं कामापेक्षा कर्ता मह्त्वाचायं आणि त्याची सोडवणूक करायची आहे. मी कामाची मजा हेच ध्येय समजतो, तुमच्या अप्रोचमधे ध्येय कामातून साध्य करायचंय आणि ते भविष्यात आहे. तुम्ही कामातला ताण काढायची गोष्ट करतायं मी काम मजेचं करण्याची कहाणी सांगतोयं. ३. थोडक्यात, जिथे एनएलपी पोहोचू शकत नाही तिथे माझी सुरुवात आहे. तुमचा अप्रोच सदस्यांचा ताण दूर व्हावा हा आहे आणि माझा अप्रोच त्याच्यासाठी कामाची खुमारी वाढवण्याचा आहे. हेतूतः दोघांचा मकसद एकच आहे. तरीही तुमचा प्रतिसाद आल्याशिवाय मी प्रतिसाद देणार नाही किंवा स्पेसिफिकली तुम्हाला विचारलेल्या प्रश्णाचं उत्तर तुम्हीच द्या. जिथे तुमचं किंवा एनएलपीच्या कोणत्याही तज्ञाचं उत्तर माझ्या दृष्टीनं अयोग्य असेल तिथे मी उत्तर देईन. हा ओपन फोरम आहे आणि चर्चा चालू आहे त्यामुळे इथे धागा काढल्यावर तुम्हाला ते मान्य असायला हवं. तुमच्याकडून किंवा एनएलपीच्या कोणत्याही तज्ञाकडून मला एकाही उत्तराची अपेक्षा नाही किंवा माझे प्रतिसाद कुणी तपासावे याचीही गरज नाही. अर्थात, माझ्या प्रतिसादांचा तुम्हाला किंवा कुणालाही उपयोग झाला तर तो माझ्या नांवानिशी क्वोट करावा वगैरे काहीही अट नाही.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 08/28/2020 - 13:20 नवीन
बाप्पु बरोबर स्वतःची कामात इतरांच्या बरोबर तुलना केली. पण बरेचदा परफेक्षनिस्ट होण्याच्या नादात आपला गोल हरवून बसतो. आपल्याला परफेक्षन जमत नाही याचाही ताण येतो. याचे मूळ फीअर ऑफ सोशल रिजेक्षन मधे आहे. कळपाचा भाग होणे या इतकी सुरक्षितता नाही हे खरे पण तो होत असताना आपण त्या कळपाचा भाग नसू तर हे अवघड बनते. कौवा चला हंस की चाल हंस तो नही बन पाया कौवा भी , कौवा नही रहा अशी अवस्था होते. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट यायलाच हवी अस नाही. नाहीतर तेंडूलकर ऑलिंपीक मधे १०० मीटर स्पर्धा धावला असता.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Fri, 08/28/2020 - 20:27 नवीन
मित्रानो वेलनेस लाईफ कोच म्हणून एक नवीन मिशन हातात घेतोय... ... स्ट्रेस कमी करण्याचे . खास करून माहिती तंत्र क्षेत्रातील मित्रांचे .आयुष्य सुखकर करण्याचे.
मोहिमेबद्धल अभिनंदन - विजुभाऊंचे आणि संबंधित मिपाकरांचेही !
तुम्हाला. तुमच्या मित्रांना वर्क स्ट्रेस संदर्भात काही शंका / प्रश्न असतील तर विचारा.
नक्कीच !
त्यांचे सोल्यूशन द्यायचा प्रयत्न करेन रोज. इथेच.
आगाऊ धन्यवाद! BTW, आळशीपणावर उपाय सांगा राव. अर्थात हे खूपच त्रोटक problem statement आहे हे मान्य.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 08/28/2020 - 22:35 नवीन
उपक्रम छान आहे पण कामाच्या ठिकाणी असणार तणाव (स्ट्रेस) हा फक्त स्वतःच्या कामाशी च संबंधित असतो असे नाही. आणि इथे एकध्या व्यक्ती नी त्याला कशाचा स्ट्रेस वाटतो हे सांगितले तर त्याचे उत्तर एका वाक्यात नसेल किंवा एका paragraph मध्ये नसेल. मुळात ह्याचा संबंध च मनाशी आहे . अनेक संपुदेशन ची आवर्तन झाल्या शिवाय मनावरील तान कमी होवू शकत नाही. जास्त वेळ माणूस तणावात राहिला तर तो नैराश्य मध्ये तरी जातो किंवा हिंस्त्र तरी होतो,किंवा व्यसनी सुद्धा होतो. आपल्या पेक्षा कमी दर्जा च्या व्यक्तीची आपला बॉस म्हणून नेमणूक होणे आणि लायकी काय तर फक्त हुजरेगरी, लावलाव्या. नोकरी ची शास्वती नसणे. आपल्या लायकी पेक्षा कमी मोबदला मिळणे. आपल्या दिलेले टार्गेट वेळेत पूर्ण न होणे. कामात च आयुष्य जात आहे स्वतः कडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही असे वाटणे किती कारण आहेत त्या मुळे मनात तणाव निर्माण होतो.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 08/28/2020 - 22:35 नवीन
उपक्रम छान आहे पण कामाच्या ठिकाणी असणार तणाव (स्ट्रेस) हा फक्त स्वतःच्या कामाशी च संबंधित असतो असे नाही. आणि इथे एकध्या व्यक्ती नी त्याला कशाचा स्ट्रेस वाटतो हे सांगितले तर त्याचे उत्तर एका वाक्यात नसेल किंवा एका paragraph मध्ये नसेल. मुळात ह्याचा संबंध च मनाशी आहे . अनेक संपुदेशन ची आवर्तन झाल्या शिवाय मनावरील तान कमी होवू शकत नाही. जास्त वेळ माणूस तणावात राहिला तर तो नैराश्य मध्ये तरी जातो किंवा हिंस्त्र तरी होतो,किंवा व्यसनी सुद्धा होतो. आपल्या पेक्षा कमी दर्जा च्या व्यक्तीची आपला बॉस म्हणून नेमणूक होणे आणि लायकी काय तर फक्त हुजरेगरी, लावलाव्या. नोकरी ची शास्वती नसणे. आपल्या लायकी पेक्षा कमी मोबदला मिळणे. आपल्या दिलेले टार्गेट वेळेत पूर्ण न होणे. कामात च आयुष्य जात आहे स्वतः कडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही असे वाटणे किती कारण आहेत त्या मुळे मनात तणाव निर्माण होतो.
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Sat, 08/29/2020 - 09:17 नवीन
आज सकाळीच एक घटना घडली त्यामुळे तणावात आहे. कामकाजासंबंधित घटना नाहीये पण असा प्रकार सर्वांच्या बाबतीत घडु शकतो म्हणुन इथे लिहितोय. रिअल टाईम प्रॉब्लेम म्हणुन ह्याकडे बघु शकतो. सकाळी एक फोन आला. फोनवरील व्यक्तीने सांगितले कि तो जिथे मी सदनिका घेतली होती तिचा मेंटेनन्स मॅनेजर आहे. त्याने सांगितले कि तुमच्या फ्लॅटच्या खाली असलेल्या फ्लॅट मध्ये बाथरूम च्या सिलिंग वॉलवर सिपेज आहे. कदाचित तुमच्या बाथरूममधुन पाण्याची गळती होतेय. मी सध्या बेंगलोरस्थित नसल्याने त्याला तसे सांगितले व मी गेले वर्षभरतरी तो फ्लॅट उघडला नाही. बंदकरताना सर्व टॅप/ स्विचेस खात्रीने बंद केले आहेत त्यामुळे माझ्या बाथरूममध्ये पाण्याचा नळ उघडा असल्याची शक्यता नाही. त्याला पटल्यासारखे वाटले व चर्चा संपली. पुढे मी त्या फ्लॅटधारकाला फोन करुन कल्पना दिली व मग समजले कि सिपेज बाथरुममध्ये नाही तर युटीलिटी भागात आहे कि जो ओपन आहे त्यामुळे माझ्या युटीलिटी भागात पावसाचे पाणी साचले असावे व म्हणुन सिपेज होत असावे ही एक शक्यता बोलुन दाखवली. चर्चा संपली. पण ताण येण्याची कारणे अशी आहेत कि खरेच एखादा नळ उघडा तर राहिला नसेल? दुसरे म्हणजे माझ्या फ्लॅटमध्ये घरफोडी झाली होती. (९ व्या माळाव्यावरचा फ्लॅट आहे.) व मी प्रॉपर्टी मॅनेजरकडे तक्रार ही केली होती. पण त्यानंतर ही धाकधुक कायम राहिली. आताही फ्लॅटमध्ये पुन्हा घरफोडी तर झाली नसेल? आणि आता सगळ्यात महत्वाचे म्हणजे सध्याची महामारीची परिस्थिती पाहता मी इतक्यात तरी बेंगलोरमध्ये जाऊ शकत नाहीये? आणि अश्या वेळी मनात फक्त नकारात्मक विचार येतात. तर आता ह्या घटनेमुळे येणार्या ताणापासुन सुटका कशी मिळवावी?
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 22 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 23 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 23 hours ago
  • सुंदर !!
    1 day 23 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 23 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा