Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

करोना / तीन देश तीन तर्हा

च
चौकस२१२
Fri, 07/10/2020 - 14:55
🗣 71 प्रतिसाद
करोना / तीन देश तीन तऱ्हा ( तिन्ही देश सधन पाश्चिमात्य राहणी आणि विचारसरणी पण प्रत्येकाची करोना संबंधी धोरणी वेगळॆ अंदाजे जुलै २०२० परिस्थिती १ ) स्वीडन लोकसंख्या १ कोटी , रुग्ण ७४,५३३ , मृत्यू =५५५० धोरण= उदार , हर्ड इम्युनिटी बघू काय होते ते ...टक्केवारी मृत्यू = १ लाखा मागे ५५ २) न्युझीलंड लोकसंख्या ५० लाख, रुग्ण 1542 , मृत्यू =२२ धोरण = कठीण खूप बंदी , अर्थव्यवस्था छोटी असूनही ) ...टक्केवारी मृत्यू = १ लाखा मागे 0.44 ३) ऑस्ट्रेलिया लोकसंख्या २.५ कोटी , रुग्ण 9359 , मृत्यू =106 धोरण = अधले मधले , दुसरी लाट एक राज्यात सुरु परत तिथे कठीण लॉक डाऊन, ) ...टक्केवारी मृत्यू = १ लाखा मागे ०.४२ यातील स्वीडन चे माहित नाही पण इतर दोन देशांची अर्थव्यवस्था आयात आणि निर्याती वर अवलंबून ( चीन किंवा भारतासारखी अंतर्गत अर्थव्यवस्था फार मोठी नाही ) आणि स्वीडन सारखी यूरोप बाजारपेठ जवळ नाही जगाच्या एका कोपऱ्यात त्याचे फायदे आणि तोटे दोन्ही

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 35362 views

🗣 चर्चा (71)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 07/22/2020 - 17:09 नवीन
आपत्कालीन निर्णयाचा कोणताही आगापिछा नसल्यामुळे देशाचं आणि नागरिकांचं फार नुकसान झालं. देशाच्या नेतृत्वाने कुचकामी निर्णय घेतले. जनतेला भोगावं लागलं, सोसावं लागलं, यात आपल्याला सर्व बरोबर दिसत असेल तर आपल्या मताचा आदर आहेच. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice Wed, 07/22/2020 - 20:00 नवीन
अभ्या यांच्या प्रतिसादला अनुमोदन देताना म्हणतो, की "देशाच्या नेतृत्वाने कुचकामी निर्णय घेतले" हे लक्षात आल्यावर , स्वीडनने मान्य करण्याचा प्रामाणिक दाखवला. एका क्ष देशात असा प्रामाणिकपणा जाऊ द्या, सुप्रीम लीडर चे मानसपुत्रे गोलपोस्ट शिफ्ट करतील. अर्थव्यवस्था खालावली की संख्याशास्त्रीय डेटा जाहीर न होऊ देने, असे चिंधीगिरी प्रकार जिथे होतात, तो क्ष देशाचे सुप्रीम लीडर, विश्वागुरु होण्याच्या बाता मारतात. अवांतर : डोलांडसुद्धा मास्क वापरू लागला.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 07/23/2020 - 01:14 नवीन
जगातील प्रत्येक सरकार धडपताय, काही यशस्वी होत आहेत हे दिसता दिसता अपयशी होतात... याचे मेलबर्न चे उदाहरण दिलेच आपण मात्र पदोपदी असं भासवताय कि जणूकाही फक्त भारत सरकारच इतके निकामी निघाले...! सरकार जर काँग्रेस किंवा डाव्या आघाडीचे असते तर असं काय मोठा फरक पडला असता?.. भारत काही चीन नाही कि दंडुकेशाही वापरून काबूत आणता येईल.. आमचं येथ ७ राज्यात दोन्ही डावे आणि उजवी सरकारे आहेत , यौग्य आणि अयोग्य निर्णय झाले आणि त्यात फक्त सरकार चुकीचे असेही नाही जनतेनी शिस्त नाही पाळली तर कसे आवरणार हे सगळे.. हे झाले सामाजिक स्वास्थ्याचे, आर्थिक स्वास्थ्य यावर केवढा मोठा बोजा पडणार आहे याची कल्पना तरी आहे का तुम्हाला? आता पुढे काय आर्थिक संकट आहे ते आज इकडे बजेट मध्ये कळणार आहे १९-२० साल ५ बिलियन फायद्यात असेल असे वाटत असताना ९० बिलियन तोट्यात झाले आहे .. हे जर सधन देशाचे तर भारतासारख्या ( सधन परंतु प्रचंड लोकसंख्येचा बोजा ) देशाचे काय याचा विचहर तरी करवतो का? आपण सगळ्यांनी यात " फक्त सरकार कसे चुकले" यावर बहुमूल्य वेळ घालवण्यापेक्षा यातून बाहेर कसे पडत येईल यावर विचहर केला तर आपापल्या देशाचा / समाजाचाच फायदा होईल ..जर इच्छा असेल तर ... "हाणा टपली सरकारला जातायेता " हाच जर एक खांबी तंबू असेल तर मग काय बोलणार
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice गुरुवार, 07/23/2020 - 03:51 नवीन
"हाणा टपली सरकारला जातायेता "
गेल्या 70 वर्षात, देव देश धर्म अर्थव्यवस्था याला जी तथाकथित ग्लानी आलेली , त्याच्या उच्चाटना साठी डामोडर-सुताने या पृथ्वीवर जणु जन्म घेतलाय, असा प्रचार भाडोत्री लोकांकडून कुजबुजयंत्रणा व सोशल मीडियावर केला, त्यावर साक्षर (सुशिक्षित नाही) मूर्ख लोकांनी विश्वास ठेवून मतदान केलं, त्याचे परिणाम. पक्षाचा एक खांबी तंबू केला, इथं आजूबाजूला सगळे चाटुकार गोळा केले.... अटलबिहारी , मनमोहनसिंग, नरसिंहराव यांच्या सारखे पंतप्रधान असते, तर संकट जरी कोरोनाचे असते तरी, परिस्थिती कैक पटीने वेगळी हाताळली गेली असती. नस्ती पनौती लागलीये भारताला या डामोडरसुताच्या रूपाने.....
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Fri, 07/24/2020 - 01:15 नवीन
हाणली अजून एक टपली.. मुदा नसला कि नुसती आगपाखड... हि अशी.. मग दुसऱ्यांना "चाटुकार" म्हणायचं... चालुद्या पातळी दिसली तुमची
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice Fri, 07/24/2020 - 04:01 नवीन
काय मुद्दा पाहिजे काका ? तुम्ही डेटासकट तुमचा मुद्दा सांगा, त्याला डेटाने उत्तर दिले जाईल. तुम्हाला गिरीश कुबेर यांना टपली हानायची होती... त्याद्वारे एक्सट्रापोलेट करून अजून काही जणांना टपली हानायची होती, तर असे मुद्दे विरहित धागे काढले, तर त्यावर धाग्याच्या लायकीनुसार प्रतिक्रिया येणार. तुम्हीही तुमची पातळी फार उच्च दर्जाची असल्याचे दर्शवून दिले नाहीये... ऑस्ट्रेलियात राहून देखील..…
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Fri, 07/24/2020 - 11:37 नवीन
- या धाग्याच्या सुरवातीला स्वीडन , ऑस्ट्रेलिया आणि न झीलंड ची आकडेवारी , शीर्षक काय धाग्याचे वाच - "कठोर घरबंदी" हि स्वीडन च्या "हर्ड इम्युनिटी च्या प्रयोगापेक्षा" जास्त प्रभावी दिसत आहे , हा हा मुद्दा होता त्यात भारताचा संबंध फक्त कुबेराचा संधीसाधू पण दाखवणे हा होता कारण कुबेर हे एकांगी अजेंडा चालवतात कि जेणेकरून सद्य सरकार ला जमेल तसे ठोकायचे .. हा आता त्यावर तुला आकडेवारीने हे दाखवता आले असते कि नाही स्वीडनचे कसा बरोबर वैगरे पण गाडी कुठे घसरली ..
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice Fri, 07/24/2020 - 06:08 नवीन
विथ डेटा मुद्दा कसा मांडतात, याची आपल्याकडे कल्पना नसावी, ... मुद्दा कसा मांडणे अपेक्षित आहे याच्या उदा एक मुद्दा... गुजरात मॉडेल, ज्यात आरोग्य यंत्रणाही आली, "चाटुकार" लोकांनी सोशल मीडियावर, लय चाटुगिरी करून, जे नाहीये ते गुण मॉडेलला दिले... आज कोविड मध्ये राष्ट्रीय मृत्यूदर 2.48% असताना, गुजरातचा दर 4.89% च्या अवतीभवती आहे. "चाटुकार" लोक सोईस्करपणे इकडे दुर्लक्ष करून, भलतेच मुद्दे मांडून ठेवतात. राष्ट्रीय महामारी कायद्या किंवा तत्सम कायद्याच्याकक्षेत देश आल्यावर, स्वतंत्र भारतात कदाचितच असे सर्वंकष अधिकार पंप्र ला आज मिळाले असताना, त्यांनी आज केलेल्या फकअप बद्दल, हेच "चाटुकार" , नेहरूंना जाब विचारतात, तर त्यांना मी "चाटुकार"च बोलणार.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Fri, 07/24/2020 - 11:38 नवीन
"चाटुकार" तुझी हि गटार गन्गा वाहत राहूदे ,, माफ करा संपादक .. एक प्रामाणिक आकडेवारी दाखवत होतो पण या महाशयांना नुसती उचकेगिरी करायची दिसतीय ...
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice Fri, 07/24/2020 - 12:43 नवीन
अजोबा, अरेरे.. काये हे ... १०० वर्ष्यांचे वयोमान आणि काय "गटारगंगा" वैगरे शब्द.. गेट वेल सून ..
  • Log in or register to post comments
स
सुखी Wed, 07/22/2020 - 08:24 नवीन
Swedan न मान्य केलं की आमचं मॉडेल फसल https://www.usatoday.com/story/opinion/2020/07/21/coronavirus-swedish-herd-immunity-drove-up-death-toll-column/5472100002/
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Wed, 07/22/2020 - 11:12 नवीन
Swedan न मान्य केलं की आमचं मॉडेल फसल
प्रामाणिक आहेत.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 07/23/2020 - 08:40 नवीन
सुखी, उपरोक्त लेखात हा दावा पंचवीसेक स्वीड डॉक्टरांनी केलेला आहे. स्वीडनच्या अधिकृत आरोग्यसंस्थेने हे मान्य केलेलं नाहीये. उलट तिने लक्षणविरहित लोकांना रुग्ण मानायला नकार दिला आहे, जो माझ्या मते योग्य आहे :
.... the agency refused to acknowledge the importance of asymptomatic spread of the virus ....
लक्षणविरहित मनुष्याच्या अंगात करोना असेल तर तो रोगी नव्हे. तसा मानायचा झाला तर माणसाच्या अंगात शेकडो विषाणू असतात मग मानवी शरीर हे रोगांचं माहेरघर मानावं लागेल. हा संदेश वाचणाऱ्या कितीतरी वाचकांच्या आतड्यात या क्षणी पोलियो व्हायरस सापडेल. हे सगळे वाचक रोगी समजावेत का? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Fri, 07/24/2020 - 01:12 नवीन
'स्वीडनच्या अधिकृत आरोग्यसंस्थेने हे मान्य केलेलं नाहीये' बरं मग? म्हणणं काय तुमचं? स्वीडन चा "प्रयोग" जास्त यशस्वी आहे? नु झीलंड आणि स्वीडन छाया आकडेवारी कडे बघितला तर कठोर बंदी हा नु झीलंड चा उपायच जास्त प्रभावी दिसतोय ! सध्यातरी का कुबेरनसारखा "मिया गिरा तो भी टांग उपर !
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 07/24/2020 - 12:57 नवीन
चौकस२१२, न्यूझीलंडची लोकसंख्या ५० लाख असून घनता १८ प्रति चौ.किमी. आहे. स्वीडनची लोकसंख्या १ कोटी ३ लाख असून घनता २३ प्रचौकिमी आहे. भारताची लोकसंख्या १३२ कोटी असून घनता ४००+ प्रचौकिमी आहे. न्यूझीलंडकडे पाहून करा पाहू भारतात टाळेबंदी. बघा काय होतं ते. आता माझं म्हणणं थोडक्यात सांगतो. करोना हे थोतांड आहे. टाळेबंदी हे महाथोतांड आहे. अंतरसोवळे हा रोगापेक्षा भयंकर उपाय आहे. निरोगी माणसांवर कशाला टाळेबंदी लादायची? हवं तर नाजूक प्रकृतीवाल्यांनी घरात गुपचूप बसावं. रोगप्रवणांनी तर जरूर घरी बसावं. त्रास होत असेल तर आणि तरंच रुग्णालयात जायचं. जरा लक्षणं दिसली की की रुग्णालयात गर्दी करायची नाही. माझ्यासारखे रोगप्रवण लोकं मरायला टेकले तर त्यांना यथोचित उपचार मिळण्यासाठी रुग्णालयं व डॉक्टर मोकळे हवेत. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Sun, 07/26/2020 - 02:42 नवीन
मी मुळात भारताशी तुलना केलीच नवहती.. न्यूझीलंड आणि स्वीडन चा चाललं होता.. नीट वाचा माझा मूळ धागा "निरोगी माणसांवर कशाला टाळेबंदी लादायची?" अहो पण लोकसंख्येतील निरोगी चे प्रमाण राहावे म्हणून तर जमावबंदी जगभर चालू आहे ... जगातील सर्वात घनदाट लोकसंख्या असलेले देश म्हणजे सिंगापोर.. तेथही तिथेहि त्रास झाला असणारच ..कारण ७०% जनता ८-१० मजली इमारतीत राहते , मास रॅपिड ट्रान्सीट आणि बस हीच मुख्य दळणवळणाची साधने जमावबंदी ची अंमलबजावणी भारतासारख्या देशात करणे अवघड आहे हे मान्य पण मुळात हा उपायच चुकीचा आहे हे म्हणणं मात्र विचित्र आहे असो आपल मत "हे सर्व थोतांड आहे" असे असल्यामुळे पुढे बोलणेच खुंटले...
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice Sun, 07/26/2020 - 03:20 नवीन
माझा मुद्दा या धाग्यावर , लॉकडाऊन करणे न करणे , या पेक्षा... ती कशी अमलात येते त्याकडे जास्त होता. अटल बिहारी किंवा मनमोहन सिंग जर पंतप्रधान असते, तर सर्वाना बरोबर घेऊन त्यांनी , जे करायचे ते केले असते. ( जसं सध्या न्यूझीलंड च्या पंप्र करत आहेत). कोविडवर उत्तर, हे (लॉकडाऊन करणे न करणे) असे बायनरी नसून, त्याला अनेक पैलू आहेत. त्या अनेक पैलूंवर अमलबजावणी होण्या साठी केंद्रीय क्ष पदावरील व्यक्तीत, राजकीय परिपक्वतेची आवश्यक्यता असते (उदा अटलजी मनमोहन, नरसिंहराव), जीची सध्या तीव्र कमतरता भासतेय. परिपक्व दिसणे वेगळे, आणि खरंच असणे वेगळे. आजकाल दिसण्यालाच महत्व दिलं जातंय, चकचकीत शो आणि इव्हेंट्स फक्त.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sun, 07/26/2020 - 08:51 नवीन
चौकस२१२, माझं मत "करोना थोतांड आहे" असं आहे. "हे सर्व थोतांड आहे" असं आजिबात नाही. सर्व हे विशेषण माझं नाही. करोनामुळे माणसं मरायला टेकतात. सबब करोना हा रोगप्रवण लोकांसाठी घातक आहे. पण प्रसारमाध्यमांनी आणि सरकारांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर भंपक अपप्रचार केला आहे की तो निरोगी लोकांसाठीही घातक असल्याची समजूत दृढ होते आहे. त्यामुळे ज्यांना खरंच उपचारांची गरज आहे असे रोगी निष्कारण मरताहेत. ज्यांना उपचार हवे आहेत नेमके त्यांनाच नाकारले जात असतील तर कुठेतरी थोतांड आहे ना? काढा शोधून. माझा प्रश्न स्पष्ट आहे. करोना जर निरोगी माणसांना प्राणघातक नाही, तर सरसकट टाळेबंदी कशासाठी? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
त
तेजस आठवले गुरुवार, 07/23/2020 - 08:11 नवीन
आज देशाचं नेतृत्व जर पप्याकडे असतं तर हा विषाणू नक्कीच फोफावला नसता. मुळात त्याने तो भारतात येऊच दिला नसता. उगीचच नाही MoU केलंन चिन्यांबरोबर. तुम्ही बसा ओरडत पण ब्रह्माण्डातले सर्वोत्तम मुख्यमंत्री आणि त्रिखंडातले एकमेव लायक पप्याशेट बॅंगकॉककर एकत्र येऊन मायभवानीच्या आशीर्वादाने ह्या विषाणूला पळवून लावतील बघा. अहो तीन दिवसात अँजिओप्लास्टी निपटवणारे सेनापती आणि तिरडीवर पडले तरी आगीत सरपण घालणारे खरे सेनापती असल्यावर चिंता कशाची ?
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 07/23/2020 - 08:59 नवीन
अरे अरे किती तो त्रागा, किती तो संताप काम न करू दिल्याचा. उपमा तरी योग्य आणि सर्वसामान्यांना समजतील आणि रूढ असतील त्या द्या. कसला राग म्हणायचा ह्याला?
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 07/24/2020 - 03:39 नवीन
सहमत आहे. दोन्ही बाजू गलिच्छ भाषांमध्ये विरोधी नेत्यांना दोष देताहेत.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 21 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 22 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 22 hours ago
  • सुंदर !!
    1 day 22 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 22 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा