करोना / तीन देश तीन तर्हा
करोना / तीन देश तीन तऱ्हा ( तिन्ही देश सधन पाश्चिमात्य राहणी आणि विचारसरणी पण प्रत्येकाची करोना संबंधी धोरणी वेगळॆ
अंदाजे जुलै २०२० परिस्थिती
१ ) स्वीडन लोकसंख्या १ कोटी , रुग्ण ७४,५३३ , मृत्यू =५५५० धोरण= उदार , हर्ड इम्युनिटी बघू काय होते ते ...टक्केवारी मृत्यू = १ लाखा मागे ५५
२) न्युझीलंड लोकसंख्या ५० लाख, रुग्ण 1542 , मृत्यू =२२ धोरण = कठीण खूप बंदी , अर्थव्यवस्था छोटी असूनही ) ...टक्केवारी मृत्यू = १ लाखा मागे 0.44
३) ऑस्ट्रेलिया लोकसंख्या २.५ कोटी , रुग्ण 9359 , मृत्यू =106 धोरण = अधले मधले , दुसरी लाट एक राज्यात सुरु परत तिथे कठीण लॉक डाऊन, ) ...टक्केवारी मृत्यू = १ लाखा मागे ०.४२
यातील स्वीडन चे माहित नाही पण इतर दोन देशांची अर्थव्यवस्था आयात आणि निर्याती वर अवलंबून ( चीन किंवा भारतासारखी अंतर्गत अर्थव्यवस्था फार मोठी नाही )
आणि स्वीडन सारखी यूरोप बाजारपेठ जवळ नाही जगाच्या एका कोपऱ्यात त्याचे फायदे आणि तोटे दोन्ही
लॉकडाऊन आणि अनलॉकचा काडीचा फायदा झालेला दिसत नाही. आपल्याकडे म्हणजे भारतात जेव्हा पहिला रुग्ण सापडला तेव्हापासून ते कालपर्यंचा शिक्षण व औषधी द्रवे विभाग महाराष्ट्र यांचा अहवाल पाहिला तर लक्षात येते की रुग्णसंख्या अजिबात कमी झालेली नाही. राहीला प्रश्न लॉकडाऊनचा ? किती दिवस लॉकडाऊन ठेवणार ? जगरहाटी सुरु करावीच लागणार आहे. आवश्यक आहे तर त्याचा फायदा दिसलाच पाहिजे होता असे वाटते. सध्याच्या आलेखात नखभरही आलेख खाली आलेला दिसत नाही. मिपावर अनेकांनी लॉकडाऊनचा काहीही फायदा होणार नाही, असे सांगितले होते त्याची प्रचिती केव्हाच यायला लागली आहे, अर्थात हे सर्वांनाच मान्य होत असते असे नाही. लॉकडाऊनमुळे लोकांचे रोजगार गेले, काही लोक रस्त्यावर आले. काही बिचारे मरण पावले. काहींची उपासमार सुरु आहे, काहींचा जीवन जगण्याचा संघर्ष सुरु आहे. काहींचे वेतन कपात होत आहे. काहींचा जीवन-मरणाचा संघर्ष सुरु आहे. काही लोकांच्या टेष्ट होतात, लोक कोरंटाईन होतात. काहींमधे संसर्ग आढळतो. काही गंभीर असतात, काही उपचार घेऊन बाहेर पडतात. , काही दुर्दैवाने मागे राहतात, हे सध्या भारतातील चित्र आहे. बाकी चालू द्या. -दिलीप बिरुटे