Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चिन्यांचा उपद्व्याप भाग ३

म
माहितगार
Wed, 07/01/2020 - 15:18
🗣 79 प्रतिसाद
न्यूज १८ च्या संकेतस्थळावर Lt Gen Hooda यांचा, प्रत्येकाने आवर्जून वाचावा असा, एक नेमका आणि प्रत्येकालाच नेमक्या जबाबदारीचे नेमके भान देणारा लेख आला आहे. कॉपीराईटमुळे संपूर्ण लेख देऊ शकत नाही तो न्यूज १८ च्या संस्थळावर जाऊन वाचणे अधिक उत्तम त्यांच्या मुख्य मुद्यांचा खाली गोषवारा. १) Lt Gen Hooda (निवृत्त असावेत) म्हणतात की सार्वजनिक माहिती पेक्षा अधिकची माहिती त्यांच्याकडे नाही पण लदाख परिसर व Line of Actual Control (LAC) चे भारतीय लष्कराकडून होणारे व्यवस्थापन पद्धतीची त्यांना व्यवस्थीत कल्पना आहे. २) ज्या काही क्षेत्रात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेबाबत भारत आणि चिनचे आपापले म्हणणे आहे त्यात Pangong Tso and Depsang या दोन जागांचा समावेश होतो . आत्ता पर्यंतची स्थिती आपापल्या म्हणण्यानुसार असलेल्या नियंत्रण रेषे पर्यंत दोन्हीही फौजांनी आपापली गस्त चालू ठेवावी पण कायमस्वरूपी प्रेझेन्स ठेवू नये. म्हणजे दोन्ही बाजूंचा क्लेम चालू राही. ३) Pangong Tso आणि Depsang, मध्ये जिथे गस्त करण्यासाठी चिनी आणि भारतीय सैन्य दोन्हींनाही परवानगी होती तिथे चिनने स्वतःच्या सैन्यतळाचा जम बसवून भारतीय सैन्याला गस्त घालण्यापासून रोखून ठेवले आहे. -म्हणजे चिनचे सैन्य गस्त घालून गेले असते आणि भारतीय सैन्यालाही त्यांची गस्त घालता आली असती तर समस्या नव्हती. ४) कायमस्वरूपी तळ दोन्ही सेनांनी करू नयेत असा ताळमेळ असताना तो चिनी सैन्याने मोडू नये अशी अपेक्षा आहे एखाद्या बाजूने मोडला तर चर्चेच्या नेमक्या पायर्‍या करारात आहेत आणि त्या पायर्‍यांमध्ये भारतीय सैन्याने सांगितल्या प्रमाणे त्यांची गस्त संपवून चिनी सैन्य मागे फिरलेले नाही उलट पक्षी सैन्य तळ अधिक मजबूत केला आहे. त्यामुळे चर्चेद्वारे चिनी सैन्याने मागे फिरावे म्हणून भारतीय बाजूकडून सांगून पाहिले जात आहे. ५) हुडांच्या म्हणण्यानुसार युद्धाची भूमिका घेण्यापुर्वी चर्चेच्या संधी वापरून घेणे अधिक उचित पण आपल्या बाजूने होणारी चर्चा अधिक नि:संदिग्ध अशा स्वरूपाची असावयास हवी. ६) 'विवाद चालू असलेले सीमा क्षेत्र' आणि 'विवाद्य सीमा क्षेत्र' या दोन वाक्य प्रयोगात अल्पसा पण महत्वाचा फरक आहे. 'विवाद चालू असलेले सीमा क्षेत्र' ला 'विवाद्य सीमा क्षेत्र' म्हटले की मानसिक दृष्ट्या दुसर्‍याची बाजू तुम्ही आधीच स्विकारून दुसर्‍या बाजूस अधिकची संधी देता तर हुडांच्या म्हणण्यानुसार भारतीय सीमेच्या बाबत भारतीय सैन्याच्या अधिकार विषयक तडजोड करण्याचे भारतीयांना कसलेही कारण नाही. ज्या भूभागावर भारत अधिकार सांगतो त्यास 'विवाद्य सीमा क्षेत्र' ‘disputed area’ and ‘grey zone’ हे शब्द प्रयोग भारतीयांनी टाळले पाहीजे. ७) सध्या 'विवाद चालू असलेल्या सीमा क्षेत्रात' समस्या असली तरीही भारतीय सैन्य संपूर्ण नियंत्रणातील भूमीवरील कब्जा गामावत चालले आहे अशी दिशाभूल होते आहे ती दिशाभूल बरोबर नाही, सरकारे कोणतीही असोत डोळ्यात तेल घालून संपूर्ण नियंत्रणातील कोणताही भूभाग भारतीय सुरक्षा दलांनी अद्याप गमावलेला नाही. तसा अभास निर्माण करणे भारतीय सुरक्षा दलांच्या आता पर्यंतच्या योगदानास कमी लेखणारे ठरते. त्यामुळे भारतीयांचे मनोबल खच्ची करण्याची शत्रुस हकनाक संधी मिळते अशी संधी देणे सर्वांनीच टाळले पाहिजे. ८) आंतरराष्ट्रीय राजकारणात क्षमता व इच्छाशक्ती आणि त्या तुम्ही नि:सदिंग्धपणे कसा जाणवून देता हे महत्वाचे असते.
In international politics, deterring an adversary depends a lot on how we convey our intentions. Thomas C. Schelling writes in his classic work Arms and Influence, “It is a tradition in military planning to attend to an enemy’s capabilities, not his intentions. Bur deterrence is about intentions - not just estimating enemy intentions but influencing them. The hardest part is communicating our own intentions.”
९) नियंत्रण रेषेच्या बाबत आतापर्यंत आखून दिलेल्या परंपरा आणि करारांचे उल्लंघन चिनी सैन्याकडून होते आहे. त्यांनी मागे फिरावयास हवे आहे. आणि तसे मागे न फिरण्याची किंमत मोठी असू शकते त्यासाठी आवश्यक्ष क्षमता आणि इच्छाशक्ती भारताकडे आहे याची सुसप्ष्ट शब्दात कल्पना चिनींना नि:संदिग्धपणे सर्व स्तरावरून करून द्यावयास हवी. १०) चिनी सैन्याने मागे फिरून आधीची स्थिती बहाल केली जाईल यासाठी भारताने ठाम असावे, चिनींच्या नव्या उपद्व्यापांचे गांभीर्य कमी न लेखता डिटरन्स आणि कंपेलन्स या दोन्ही मार्गांचा अवलंब करावा. दोन्ही गोष्टींचा अवलंब तुम्ही किती करता यावरून तुमचा शत्रु तुम्हाला जोखत असतो. ११) काही वेळा शत्रुपक्षाला संबंधांवर गंभीर परिणाम होतो आणि त्याची किंमत मोठी आहे हे कृतीतून दाखवून देणे खासकरून तुमचा शत्रु तुमच्या पेक्षा बलाढ्य असल्यास महत्वाचे असते त्या दृष्टीने कृती आणि संवादात नि:संदिग्धता हवी. १२) शत्रु डोक्यावर बसलेला असतानाची वेळ सर्व राजकीय इच्छाशक्तीच्या एकोप्याची असते की ज्यामुळे शत्रु राष्ट्रास सुस्पष्ट संदेश जाऊ शकेल, हि वेळ राजकीय उखाळ्या पाखाळ्यांची अथवा टिव्हीपुरती चर्चा मर्यादीत ठेवण्याची नव्हे. * हुडांच्या लेखाचा दुवा पुन्हा एकदा * अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे आणि शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी आणि चर्चा सहभागासाठी अनेक आभार.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 48100 views

🗣 चर्चा (79)
B
Bhakti Tue, 09/15/2020 - 02:49 नवीन
हे मुद्दे वाचून चांगल वाटलं..जय हिंद!जय हिंद की सेना!!
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 10/28/2020 - 05:10 नवीन
सकाळ २८ ॲाक्टोबर २०२० भारताची क्षेपणास्त्र मारक क्षमता भेदक करण्यासाठी उपयुक्त बेका ( बेसिक एक्सचेंज अँड कोऑपरेशन एग्रीमेंट ) करारावर शिक्कामोर्तब झाले. या करारानुसार भारताला क्षेपणास्त्र हल्ल्यासाठी लागणारे अचूक भौगोलिक तपशील अमेरिकेकडून मिळतील. 👆 हवाई प्रभूत्व मिळवण्यासाठी हे फार महत्वाचे वाटतंय.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 09/14/2020 - 19:25 नवीन
अगदी सद्दाम हुसेन प्रमाणे देशाला तोंडघशी पाडून लढण्याची गरज नसावी पण अती कठीण परिस्थितीत राणा प्रताप ते शिवाजी महाराजांच्या उपरांतही भारतीय सैनिक कडवी झूंज देत आला आहे. तंत्रज्ञान रशिया आणि आमेरीका दोघांकडेही होते आणि दोन्ही महासत्तांना अफगाणीस्तानातील वास्तव्य महागात पडले. अफगाणी अतीरेक्यांच्या धर्मांधते बद्दल प्रेम नाही पण 'महासत्ता अथवा शत्रूराष्ट्राच्या वैचारीक लाचारी विहिन निष्ठा' असेल तर तंत्रज्ञान दुय्यम भूमिका निभावते. त्यामुळे प्रश्न वैचारीक लाचारीने परकीयांचे लांगूलचालन करणार्‍यांचा आहे. आमच्यातले देशप्रेमी भारतीय परकीयांची तळी चाटणार्‍यांना गरजेपेक्षा अधिक जागा देतो की काय याचा देशप्रेमींनी विचार करण्याची गरज असावी. वसुधैव कुटूंबकम म्हणजे देशाचा अभिमान विकावयास काढणे नसावे, वैचारीक लाचारांना समज देऊन समजावून देण्याची गरज असावी किंवा कसे.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 09/14/2020 - 04:55 नवीन
भारतातील 10 हजार लोकांवर चीन पाळत आहे केवळ अतिमहत्त्वाच्या राजकीय नेत्यांवरच नव्हे, तर राजकीय संस्था आणि उद्योगांवरही चीननं पाळत ठेवलीय. भारतातील सर्व क्षेत्रातील गुन्हेगारांचा तपशीलही या कंपनीकडे आहे. लष्कर प्रमुख बिपीन रावत यांच्यासह 15 माजी लष्करप्रमुख, नौदलप्रमुख आणि हवाईदल प्रमुख, सरन्यायाधीश शरद बोबडे न्या. ए. एम. खानविलकर, लोकपाल पी. सी. घोष, कॅग जी. सी. मुर्मू यांच्या हालचालींची नोंदही ही कंपनी ठेवत असल्याचं दि इंडियन एक्स्प्रेसनं वृत्त म्हटलंय.
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी Mon, 09/14/2020 - 17:42 नवीन
https://www.loksatta.com/photos/picture-gallery-others/2275222/before-foiling-chinese-moves-india-worked-on-plan-for-almost-a-month-dmp-82/ आपले जवान ज्या प्रकारे चीनला टक्कर देत आहेत त्यासाठी त्यांना कडक सलाम. हेच आपल्या देशाचे खरे आणि मजबुत चौकिदार(रक्षणकरते) आहेत.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 09/14/2020 - 18:02 नवीन
चीन च्या सीमेवरील सैनिकांच्या हालचाली पण भारतीय अती हुशार मिडिया नी प्रसिद्ध केले . कशा साठी प्रसिद्ध करायचे सैनिक ऑपरेशन चा पण राजकीय फायदा उचलायचा आहे का? त्या साठी गुप्त माहीत उघड करायची पण ह्यांची तयारी आहे. सीमित युद्ध च चीन बरोबर होईल हे गृहीत धरणे चुकीचे आहे. सीमित युद्ध ठराविक भागा पुरतेच मर्यादित असते जसे कारगिल युद्ध . पण सीमित युद्ध झाले नाही तर देशातील कोणत्या ही भागावर,हल्ला केला जाईल मग तो नागरी भाग आहे की सैनिकी हे बघितले जात नाही. देशाच्या कोणत्या ही सीमेवरून हल्ला केला जावू शकतो. जसा मुंबई वर समुद्र मार्गे हल्ला झाला.(कसाब आणि कंपनीl कोणाला म्हणजे कोणालाच सुगावा लागला नाही. त्या अत्यंत सावध राहणे हाच उपाय असतो.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 09/14/2020 - 19:32 नवीन
सहमत आहे, तसे शत्रूराष्ट्रांचे सैन्याचे फॉर्मेशन्स आजकाल प्रत्येक देशाला सॅटेलाईटच्या माध्यमातून बघता येतात, पण तरीही भारतीय मिडीयाने शत्रूराष्ट्राच्या विश्लेषकांचे काम सोपे करण्याची भूमिका निभावू नये. संरक्षण आणि परराष्ट्र संबंधाबाबत गोपनीयता राखण्यासाठी माध्यमांसहीत सर्वांवर आवश्यक निर्बंध घालण्याचे अधिकार भारत सरकार कडे असतात त्याचा वापर भारत सरकारने करावा. शत्रू राष्ट्रांना उपयूक्त माहिती कुणीही उघड करत असेल तर भारतसरकारला अवगत करणे सयुक्तीक असावे.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Mon, 09/14/2020 - 19:56 नवीन
भारतीय माध्यमात जे काही येतंय त्यात नविन असं काहीही नाहीये. ते मूळात जालावर असलेल्या माहितीची कॉपी पेस्ट आहे. कोणतेही भारतीय माध्यम संशोधन करून वृत्तलेखन करत नाहीये. त्यामुळे कसाबवरच्या कारवाईच्या छायाचित्रणाचा जसा पाकिस्तानला फायदा झाला, तस काही होण्याची शक्यता वाटत नाही. मात्र चीनबद्दलचा बागुलबुवा निर्माण होणार नाही एवढी काळजी तरी घेतलीच पाहिजे. भारतात आपल्याबद्दल बागुलबुवा निर्माण करायचा प्रयत्नात चीन नेहमीच असतो. तर अणुबॉंबची धमकी देणे ही पाकिस्तानची खेळी असत आलीय. त्या प्रकाराला मिडियातून शह द्यायलाच लागेल.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 09/15/2020 - 15:48 नवीन
त्या साठी गुप्त माहीत उघड करायची पण ह्यांची तयारी आहे. आपली माहिती/समज फारच बाळबोध आहे. भारत काय करतो आहे या बद्दल चीनला वृत्तपत्रातून जर बातम्या कळू लागल्या तर आपले सैन्य आता पर्यंत बीजिंग आणि इस्लामाबाद पर्यंत पोचले असते. मुंबई वर समुद्र मार्गे हल्ला झाला.(कसाब आणि कंपनीl कोणाला म्हणजे कोणालाच सुगावा लागला नाही. याला आपले सूर्याजी पिसाळ कारणीभूत आहेत. हिंदू दहशतवादाचा बागुलबुवा उभा करणार्यांनी इतक्या टोकाचा देशद्रोह केला हे खरं सुद्धा वाटत नाही. https://www.dailyo.in/politics/lt-col-prasad-shrikant-purohit-bail-malegaon-blasts-army-nine-years-jail-supreme-court/story/1/19137.html हा दुवा पूर्णपणे वाचून घ्या लष्करी गुप्तहेर खातं कसं काम करतं हे सामान्यांना माहिती नसतं बाकी चालू द्या
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी Tue, 09/15/2020 - 15:20 नवीन
China illegally occupying 38,000 sq km in Ladakh: Rajnath Singh in Lok Sabha https://www.moneycontrol.com/news/economy/policy/china-in-illegal-occupation-of-38000-sq-km-in-ladakh-rajnath-singh-in-lok-sabha-5843781.html खरच यार राजीनामा दिलाच पाहीजे यांनी. यार भक्त लोक क्रुपया करुन जागे व्हा.
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Tue, 09/15/2020 - 15:36 नवीन
कोणी दिला पाहिजे राजींनामा? राजनाथ सिंह १९६३ बद्दल बोलत आहेत.
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी Tue, 09/15/2020 - 15:58 नवीन
मग आता नक्की घुसघोरी झाली आहे की नाही? कारण की पं.प्र. बोलतायत घुस्खोरी झालीच नाही. नक्की खर काय आहे??
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 09/15/2020 - 15:56 नवीन
@ गोंधळी बातमी नीट न वाचताच आपला पूर्वग्रह दूषित प्रतिसाद दिला आहे. अक्साई चीन हा भाग चीनने फार पूर्वीपासून आपला आहे म्हणून दावा केलेला आहे. The Indians did not learn of the existence of the road until 1957, which was confirmed when the road was shown in Chinese maps published in 1958.[35] Aksai Chin covers an area of about 37,244 square kilometres https://en.wikipedia.org/wiki/Aksai_Chin हे जरा वाचून घ्या
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 09/15/2020 - 16:35 नवीन
थोडा थोडा करून आता पर्यंत 38000 वर्ग किलोमीटर वर चीन नी अवैध कब्जा केला असावा . अक्साई चीन हा भाग भारत पाकिस्तान च्या आक्षेप मुळे मालकी हक्क कोणाचा असा चीन च दावा असावा. तैवान चा भाग,अरुणाचल चा भाग असा सर्व मिळून 38000.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 09/15/2020 - 16:45 नवीन
तैवान चा भाग? ??
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 09/15/2020 - 18:00 नवीन
Tavang चा काही भाग चीन chya ताब्यात असावा
  • Log in or register to post comments
ऋ
ऋतुराज चित्रे Tue, 09/15/2020 - 17:06 नवीन
भारताचा हा भूभाग चीनने पूर्वीच बळकावला असेल तर संसद सदस्यांना त्याची माहीती असेलच. राजनाथसिंहांना आज ती माहीती संसदेत का द्यावीशी वाटली ?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 09/15/2020 - 18:57 नवीन
योग्य वेळी योग्य नशेत जनतेला ठेवणाऱ्या पक्षाला च यशस्वी राजकीय पक्ष म्हणतात. आता कुठे नशा उतरत होती नोकऱ्या गेल्या मुळे, तोच शेतकरी 38000 ची गोळी देवून जनतेला परत नशेत ठेवले जाईल
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 09/15/2020 - 18:59 नवीन
असे वाचावे
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 09/15/2020 - 20:29 नवीन
कारण तेथे चीनने अधिक भूमीवर दावा सांगून सैन्याची जमवाजमव केली आहे. भारताने 370 रद्द करून काश्मीरचा प्रश्न स्वतःपुरता संपवून टाकला आहे आता यानंतर पाकव्याप्त काश्मीर भारतात विलीन करून घेतील अशी भीती पाकिस्तान आणि चीनला वाटते आहे. चीनचा CPEC हा रस्ता पाकव्याप्त काश्मीर मधून जात आहे त्याला खोल नसेल या भीतीने चीनने नियंत्रण रेषेवर हालचाली सुरू केल्या आहेत आणि आपल्या भूभागावर आपला दावा सांगितला आहे. त्यांनी जर सैन्य भारतीय हद्दीत घुसवले तर आपल्याला युद्ध करावे लागेल जर दोन्ही देशांशो युद्ध करायची पाळी आली तर संसदेला त्या भागाच्या इतिहासासकट सर्व माहिती दिली गेली आहे. याकडे पण जर लोक आपल्या पूर्वग्रहदूषित नजरेने पाहणार असतील तर काय बोलायचे?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 09/15/2020 - 20:30 नवीन
खीळ बसेल असे वाचावे
  • Log in or register to post comments
ऋ
ऋतुराज चित्रे Tue, 09/15/2020 - 20:52 नवीन
मी फक्त उद्देश विचारला , संसदेत माहीती बेजबाबदारपणे देणार नाही हयाची खात्री आहे .
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 09/15/2020 - 18:30 नवीन
भारताचा अरुणाचल, आसाम किंवा मेघालय आणि बाकी राज्य असतील. भारतीय मीडिया त्यांची कधी च दखल घेत नाही . महिन्यातून काय 6 महिन्यातून 1 दा पण त्या राज्यांच्या प्रश्न विषयी भारतीय मीडिया वर चर्चा होत नाही. फक्त भू भाग भारताच्या हद्दीत असून चालत नाही. तसेच पाकिस्तान चे पण आहे गिलगिट,बलिस्तान,आणि बाकी लगतचा प्रदेश ह्या मध्ये राहणारी लोक bhale मुस्लिम असतील पण पठाणी पाकिस्तान ची संस्कृती ,विचार आणि ह्या भागातील लोकांचे विचार फरक आहे. गिलगिट आणि आजू बाजूचा प्रदेश आणि पाकिस्तान ची मुळ भूमी ह्यांचे संबंध तुटलेले च आहेत.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 09/19/2020 - 08:08 नवीन
अखंड भारत मध्ये आता असलेले तीन देश भारत,बांगलादेश ,पाकिस्तान. ह्या देशांचा इतिहास बघितला तर अत्यंत द्वेषाचा आहे. देशाच्या फाळणी मध्ये 1.5 करोड लोक मारले gele. बांगलादेश देश फाळणी मध्ये लाखो लोक मारले gele. आणि ह्या आकड्या मधील खूप मोठा मृतांचा आकडा हा जनतेनी केलेल्या हिंसाचार मध्ये मारले gelelya लोकांचा आहे. हे तिन्ही देश एकमेकांचे शत्रू आहेत. जगात अनेक देश आहेत त्यांच्या मध्ये पण सीमेवरून वाद आहेत पण जनते मध्ये एवढं द्वेष कोणत्याच देशात नसावा. पाकिस्तानी भारताचा तीव्र द्वेष करतात,भारतीय पाकिस्तानचा तीव्र द्वेष करतात. पाकिस्तानी ,बांगलादेशी लोकांचा द्वेष करतात आता भारतीय जनता चीन च्या लोकांचा द्वेष करत आहे. पण चिनी नागरिक तसा द्वेष करत नाहीत त्यांचे सैन्य लढत आहे. ही अशी विचित्र अवस्था जगात फक्त इथेच का निर्माण झाली असावी.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sat, 09/19/2020 - 08:26 नवीन
पण चिनी नागरिक तसा द्वेष करत नाहीत त्यांचे सैन्य लढत आहे.
या एका वाक्यासाठी बाकी सगळं लिहलंय काय? अशी शंका आली. तुमचं चीनबद्दलच प्रेम जरा वाढतच चाललंय असंही एकदा मनांत आलं. 🤔
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sat, 09/19/2020 - 08:28 नवीन
129300 हा इमोजीचा नंबर आहे. ह्याचाही वापर बऱ्याच वेळेस करायला लागतो.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 09/19/2020 - 08:59 नवीन
आता भारतीय जनता चीन च्या लोकांचा द्वेष करत आहे. पण चिनी नागरिक तसा द्वेष करत नाहीत त्यांचे सैन्य लढत आहे. मुळात चिनी नागरिकांना स्वतंत्रपणे विचार करण्याची सवयच लावलेली नाही. सरकार जे सांगेल तेच सत्य हे स्वीकारणायची सवय जन्मापासून आहे. आणि मताधिकार असण्यापेक्षा भरलेले पोट जास्त महत्त्वाचे असेच त्यांना शिकवले गेले आहे. १९६२ चे युद्ध इ गोष्टी त्यांना शिकवलेल्याच नाहीत आणि सरकार सांगेल तीच सीमारेषा बरोबर असेच त्यानि मान्य केलेले आहे. या उलट जपान आणि कोरिया( आता दक्षिण कोरिया) यांच्या बरोबरच्या युद्धात झालेली हार आणि त्यांनी चिनी जनतेवर केलेले अत्याचार यामुळे चिनी माणूस जपान आणि कोरियाचा द्वेष करतो परंतु त्यांना भारताबद्दल फारसे काही वाटत नाही. बुद्धाची जन्मभूमी आणि आशियातील एक देश म्हणून थोडी फार आत्मीयता वाटते एवढंच. या उलट चीनने भारताशी युद्ध केले आणि गेली कित्येक वर्षे भारतीय सीमेवर सतत कुरबुरी करत असल्यामुळे भारतीय माणसाला चीन बद्दल एक तर्हेची अढी होती.त्यातून सदा सर्वदा आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची तळी उचलत असल्यामुळे भारतीय जनतेला चीन बद्दल संताप आहे. आणि आता कोव्हीड चीन मधून जगभर पसरल्या मुळे( कि पसरवल्यामुळे) भारतीय जनतेला जो मोठा त्रास सहन करायला लागतो आहे त्यामुळे तर भारतीय माणूस चीनचा द्वेषच करतो आहे.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 06/29/2021 - 10:24 नवीन
हिंदूस्थानाच्या सैन्यदलाने ५०,००० चायना बॉर्डरवर मूव्ह केले आहे. आता या भागात एकुण 200,000 जवान तैनात आहेत. India shifts 50,000 troops to China border in historic move हल्लीच झालेली अग्नीची चाचणी :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्। तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः।।2.37।।
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Tue, 06/29/2021 - 13:31 नवीन
भारतीय नेत्रुत्व ज्या ज्या आघाडीवर काही चांगले काम करत आहे त्यामधे ही एक महत्वाची बाब आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 22 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 23 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 23 hours ago
  • सुंदर !!
    1 day 23 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 23 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा