Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चिन्यांचा उपद्व्याप भाग ३

म
माहितगार
Wed, 07/01/2020 - 15:18
🗣 79 प्रतिसाद
न्यूज १८ च्या संकेतस्थळावर Lt Gen Hooda यांचा, प्रत्येकाने आवर्जून वाचावा असा, एक नेमका आणि प्रत्येकालाच नेमक्या जबाबदारीचे नेमके भान देणारा लेख आला आहे. कॉपीराईटमुळे संपूर्ण लेख देऊ शकत नाही तो न्यूज १८ च्या संस्थळावर जाऊन वाचणे अधिक उत्तम त्यांच्या मुख्य मुद्यांचा खाली गोषवारा. १) Lt Gen Hooda (निवृत्त असावेत) म्हणतात की सार्वजनिक माहिती पेक्षा अधिकची माहिती त्यांच्याकडे नाही पण लदाख परिसर व Line of Actual Control (LAC) चे भारतीय लष्कराकडून होणारे व्यवस्थापन पद्धतीची त्यांना व्यवस्थीत कल्पना आहे. २) ज्या काही क्षेत्रात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेबाबत भारत आणि चिनचे आपापले म्हणणे आहे त्यात Pangong Tso and Depsang या दोन जागांचा समावेश होतो . आत्ता पर्यंतची स्थिती आपापल्या म्हणण्यानुसार असलेल्या नियंत्रण रेषे पर्यंत दोन्हीही फौजांनी आपापली गस्त चालू ठेवावी पण कायमस्वरूपी प्रेझेन्स ठेवू नये. म्हणजे दोन्ही बाजूंचा क्लेम चालू राही. ३) Pangong Tso आणि Depsang, मध्ये जिथे गस्त करण्यासाठी चिनी आणि भारतीय सैन्य दोन्हींनाही परवानगी होती तिथे चिनने स्वतःच्या सैन्यतळाचा जम बसवून भारतीय सैन्याला गस्त घालण्यापासून रोखून ठेवले आहे. -म्हणजे चिनचे सैन्य गस्त घालून गेले असते आणि भारतीय सैन्यालाही त्यांची गस्त घालता आली असती तर समस्या नव्हती. ४) कायमस्वरूपी तळ दोन्ही सेनांनी करू नयेत असा ताळमेळ असताना तो चिनी सैन्याने मोडू नये अशी अपेक्षा आहे एखाद्या बाजूने मोडला तर चर्चेच्या नेमक्या पायर्‍या करारात आहेत आणि त्या पायर्‍यांमध्ये भारतीय सैन्याने सांगितल्या प्रमाणे त्यांची गस्त संपवून चिनी सैन्य मागे फिरलेले नाही उलट पक्षी सैन्य तळ अधिक मजबूत केला आहे. त्यामुळे चर्चेद्वारे चिनी सैन्याने मागे फिरावे म्हणून भारतीय बाजूकडून सांगून पाहिले जात आहे. ५) हुडांच्या म्हणण्यानुसार युद्धाची भूमिका घेण्यापुर्वी चर्चेच्या संधी वापरून घेणे अधिक उचित पण आपल्या बाजूने होणारी चर्चा अधिक नि:संदिग्ध अशा स्वरूपाची असावयास हवी. ६) 'विवाद चालू असलेले सीमा क्षेत्र' आणि 'विवाद्य सीमा क्षेत्र' या दोन वाक्य प्रयोगात अल्पसा पण महत्वाचा फरक आहे. 'विवाद चालू असलेले सीमा क्षेत्र' ला 'विवाद्य सीमा क्षेत्र' म्हटले की मानसिक दृष्ट्या दुसर्‍याची बाजू तुम्ही आधीच स्विकारून दुसर्‍या बाजूस अधिकची संधी देता तर हुडांच्या म्हणण्यानुसार भारतीय सीमेच्या बाबत भारतीय सैन्याच्या अधिकार विषयक तडजोड करण्याचे भारतीयांना कसलेही कारण नाही. ज्या भूभागावर भारत अधिकार सांगतो त्यास 'विवाद्य सीमा क्षेत्र' ‘disputed area’ and ‘grey zone’ हे शब्द प्रयोग भारतीयांनी टाळले पाहीजे. ७) सध्या 'विवाद चालू असलेल्या सीमा क्षेत्रात' समस्या असली तरीही भारतीय सैन्य संपूर्ण नियंत्रणातील भूमीवरील कब्जा गामावत चालले आहे अशी दिशाभूल होते आहे ती दिशाभूल बरोबर नाही, सरकारे कोणतीही असोत डोळ्यात तेल घालून संपूर्ण नियंत्रणातील कोणताही भूभाग भारतीय सुरक्षा दलांनी अद्याप गमावलेला नाही. तसा अभास निर्माण करणे भारतीय सुरक्षा दलांच्या आता पर्यंतच्या योगदानास कमी लेखणारे ठरते. त्यामुळे भारतीयांचे मनोबल खच्ची करण्याची शत्रुस हकनाक संधी मिळते अशी संधी देणे सर्वांनीच टाळले पाहिजे. ८) आंतरराष्ट्रीय राजकारणात क्षमता व इच्छाशक्ती आणि त्या तुम्ही नि:सदिंग्धपणे कसा जाणवून देता हे महत्वाचे असते.
In international politics, deterring an adversary depends a lot on how we convey our intentions. Thomas C. Schelling writes in his classic work Arms and Influence, “It is a tradition in military planning to attend to an enemy’s capabilities, not his intentions. Bur deterrence is about intentions - not just estimating enemy intentions but influencing them. The hardest part is communicating our own intentions.”
९) नियंत्रण रेषेच्या बाबत आतापर्यंत आखून दिलेल्या परंपरा आणि करारांचे उल्लंघन चिनी सैन्याकडून होते आहे. त्यांनी मागे फिरावयास हवे आहे. आणि तसे मागे न फिरण्याची किंमत मोठी असू शकते त्यासाठी आवश्यक्ष क्षमता आणि इच्छाशक्ती भारताकडे आहे याची सुसप्ष्ट शब्दात कल्पना चिनींना नि:संदिग्धपणे सर्व स्तरावरून करून द्यावयास हवी. १०) चिनी सैन्याने मागे फिरून आधीची स्थिती बहाल केली जाईल यासाठी भारताने ठाम असावे, चिनींच्या नव्या उपद्व्यापांचे गांभीर्य कमी न लेखता डिटरन्स आणि कंपेलन्स या दोन्ही मार्गांचा अवलंब करावा. दोन्ही गोष्टींचा अवलंब तुम्ही किती करता यावरून तुमचा शत्रु तुम्हाला जोखत असतो. ११) काही वेळा शत्रुपक्षाला संबंधांवर गंभीर परिणाम होतो आणि त्याची किंमत मोठी आहे हे कृतीतून दाखवून देणे खासकरून तुमचा शत्रु तुमच्या पेक्षा बलाढ्य असल्यास महत्वाचे असते त्या दृष्टीने कृती आणि संवादात नि:संदिग्धता हवी. १२) शत्रु डोक्यावर बसलेला असतानाची वेळ सर्व राजकीय इच्छाशक्तीच्या एकोप्याची असते की ज्यामुळे शत्रु राष्ट्रास सुस्पष्ट संदेश जाऊ शकेल, हि वेळ राजकीय उखाळ्या पाखाळ्यांची अथवा टिव्हीपुरती चर्चा मर्यादीत ठेवण्याची नव्हे. * हुडांच्या लेखाचा दुवा पुन्हा एकदा * अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे आणि शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी आणि चर्चा सहभागासाठी अनेक आभार.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 48100 views

🗣 चर्चा (79)
श
शाम भागवत Wed, 07/01/2020 - 17:12 नवीन
नियंत्रण रेषेच्या बाबत आतापर्यंत आखून दिलेल्या परंपरा आणि करारांचे उल्लंघन चिनी सैन्याकडून होते आहे.
चीनने पायंडा मोडलाय. सहमत.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 07/02/2020 - 06:26 नवीन
जेष्ठ अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक<\a>
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 07/03/2020 - 07:25 नवीन
Image removed. “ There will be no withdrawal without written orders and these orders shall never be issued.” : - Field Marshal Sam Manekshaw as Core Commander in 1962. चीन आणि इतर :- Russia's Vladivostok celebration irks Chinese diplomat, says 'in the past it was our Haishenwai' Russia accuses scientist of treason for passing secrets to China: lawyer Myanmar accuses China of arming terror groups, seeks international help to suppress them

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Akele Akele Kahan Ja Rahe Ho... :- An Evening In Paris
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Fri, 07/03/2020 - 08:30 नवीन
माझा मॅनेजर ऑस्ट्रेलियात शिफ्ट झालाय.रोज सकाळी मीटींग असते. त्याने सांगितले कि ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रातील वृत्ते पूर्णपणे चीनच्या बाजुची आहेत. म्हणजे भारताने आगळीक केली व चीनने योग्य प्रत्युत्तर दिले अश्या प्रकारची. कुणी परदेशस्थ मिपाकर ह्यावर अधिक प्रकाश टाकु शकेल.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 07/03/2020 - 08:40 नवीन
माहितगार साह्याबाना चीनशी चर्चा करणेसाठी भारतातर्फे पाठवले पाहिजे. जिनपिंग काका बीजिंग सुध्दा आपल्याला देऊन मंगोलियात राहायला जातील. ;)
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Fri, 07/03/2020 - 09:16 नवीन
किती ते चिडवायचं? :)))
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Fri, 07/03/2020 - 18:12 नवीन
निसटत्या बाजू आणि उत्तरदायित्वास नकार !
कंडोम फाटून पोरगा झाल्यावर या बाबी उपयोगी असतील धोकादाय़क क्षेत्रात "मुसंडी" मारणार्‍यांनी ध्यानात ठेवाव्यात
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 07/03/2020 - 19:39 नवीन
Image removed. बर्नॉल चा खप आता नक्कीच वाढणार असं दिसतय !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Akele Akele Kahan Ja Rahe Ho... :- An Evening In Paris
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Sat, 07/04/2020 - 13:40 नवीन
आता चीनने रशियासोबतदेखील जमीन जिहाद उकरून काढला आहे! आंतरजालावरील माहितीनुसार व्लादिवोस्तोक हे प्रशांत महासागरातील चीन, उत्तर कोरिया आणि रशियाच्या सीमांजवळील बेटावरचे एक शहर आहे. दुसऱ्या महायुद्धात रशिया-जर्मनीत इथे तुंबळ लढाई झाली होती. रशियाच्या नौदलाचा इथे एक मोठा तळ आहे. मला सापडलेली बातमी गूगल नकाशात व्लादिवोस्तोक Vladivostok
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Mon, 07/06/2020 - 10:46 नवीन
चीनने आता भारत, रशिया, नेपाळ... पाठोपाठ भूतानबरोबरही जमीन जिहाद सुरु केला आहे. संबंधित बातमी काही महिन्यांपूर्वीची बातमी मला एक प्रश्न पडलाय, - शक्यतो कुठल्याही देशाने, एकावेळी इतर एकाच देशाशी शत्रुत्व / युद्ध/ लढाई करावी असं कॉमन सेन्स सांगतो. मग चीन एकाच वेळी इतक्या देशांशी वाद का उकरून काढत असावा? ज्योत विझण्यापूर्वीची फडफड म्हणावी का? सकतेंग वन्यजीव अभयारण्य गूगल नकाशात -
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Mon, 07/06/2020 - 11:48 नवीन
मला एक शंका वारंवार येतीय. जिनपिंग हे एक सत्ताकेंद्र आहे. कम्युनिस्ट पार्टी हे दुसरं सत्ता केंद्र असून सैन्याच्या निष्ठा पार्टीशी असतात. कम्युनिस्ट पार्टी सैन्याच्या हालचाली मार्फत जिनपिंगना शह देण्याची चाल खेळत असेल का?
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Mon, 07/06/2020 - 11:52 नवीन
जिनपिंगच्या काळात काही मिलियन लोकांना तुरूंगात टाकले आहे अशी एक बातमी मध्यंतरी वाचली होती तेव्हांपासून ही शंका यायला लागली आहे. जिनपिंगच्या आत्तापर्यंतची संपूर्ण कारकीर्द पाहाता, आत्ताची वेळ जिनपिंगना सर्वात अडचणीची असण्याची शक्यता आहे. अंतर्गत तसेच बहिर्गत शत्रू नेहमीच अशा संधीची वाट पहात असतात.
  • Log in or register to post comments
र
राघव Mon, 07/06/2020 - 12:07 नवीन
मला एक प्रश्न पडलाय, - शक्यतो कुठल्याही देशाने, एकावेळी इतर एकाच देशाशी शत्रुत्व / युद्ध/ लढाई करावी असं कॉमन सेन्स सांगतो. मग चीन एकाच वेळी इतक्या देशांशी वाद का उकरून काढत असावा?
- चीनलगत सगळ्या देशांची सध्याची आर्थिक स्थिती बघता, एक महिना जरी युद्धसदृश होस्टाईल वातावरण त्या देशांवर लादलं गेलं तर आर्थिक कंबरडं पूर्णपणे मोडेल. - त्यांना मदत करण्यासाठी जे जे देश पैसा ओततील त्यांची स्वतःची स्थितीदेखील, युद्धपरिस्थिती जास्त काळ चालू देणार नाही. - अशा परिस्थितीत काही आर्थिक सामंजस्य करार करून या देशांना आपल्या पंखाखाली आणायची योजना देखील असू शकते. - किंवा युद्धखोरगिरी करून आणखी जमीन बळकवायची संधी असू शकते.
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 07/07/2020 - 10:45 नवीन
म्हणजे, हे सगळं दबावतंत्र आहे असं म्हणण्यास वाव आहे. एकाचवेळी अनेक आघाड्यांवर खेळणं हे युद्धनीतीत डिकॉय म्हणूनच वापरलं जाणारं तंत्र आहे. अर्थात् ही सगळी भाकीतं. चीन अजून किती ठिकाणी आणि काय काय उपद्व्याप करतोय ती माहिती काढली पाहिजे. विशेषतः मागच्या वर्ष-दीड वर्षातील. त्यातून साधारण त्याच्या खेळीचा अंदाज घ्यायला मदत होईल. आत्ताही, जोवर डोवाल-वँग चर्चा झाल्याची बातमी आली नाही, तोवर डोवाल काय करताहेत/कुठे आहेत याचा काहीही पत्ता लागत नव्हता. पाकनं २०,००० सैन्य पीओके मधे तैनात केल्याच्या बातम्या होत्या. भारतानं अजूनही आपला सैन्याचा आघाडीवरचा बिल्ट-अप काढण्यास सुरुवात केलेली नाही. चीन सैन्य सुद्धा १-२ किमीहून जास्त मागे गेलेलं अजून समजलेलं नाही. येत्या २-३ महिन्यात कुणी [चीन/पाकीस्तान] कागाळी केली तर भारत सरळ पीओके घेण्याची चाल करेल काय? सद्यस्थितीत, भारताच्या बाजूनं शक्तीशाली देश असतांना आणि पाकिस्तान इतका कमजोर असतांना, एवढी चांगली वेळ परत कधी येईल सांगता येत नाही! :-)
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Tue, 07/07/2020 - 11:25 नवीन
अहो, घटना घडतच असतात. आपण आपला स्वार्थ साधायचा असतो. ह्यालाच आंतरराष्टीय राजकारण म्हणतात. सगळं ठीकठाक होईल. १.पण कोण कोणाच्या बाजूस आहे हे तर कळलं. २. ५९ ॲप बॅन झाले. कदाचित भारतियांना संधी मिळू शकेल. ३. रस्त्यांच्या कामातून हटवल. नक्कीच भारतीय कंपन्यांचा फायदा होईल. ४. सुरक्षितता या मुद्यावर ५जी मधून चीनला भारतातून बाजूला करता येईल. ५. खेळणी व छोट्या इलेक्ट्राॅनिक वस्तूंची खूप मोठा ग्राहकवर्ग म्हणजे बाजारपेठ चीनने भारतात निर्माण करून दिली आहे. या वस्तूंवर बंदी आणून भारतीय उद्योग त्यात शिरकाव करू शकतील. माल खपवण्यासाठी एक पैशाची सुध्दा जाहिरात करायची जरूरी नाहीये. असो. इथेच थांबतो. कारण अर्धा पेला भरलेला आहे का अर्धा रिकामा आहे यावर नेहमीच वाद होत असतात. :)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 07/06/2020 - 10:19 नवीन
Image removed. चायनीज हॅलिकॉप्टर सपोर्ट बेस [ संदर्भ :- China buying time with border talks, satellite images show PLA helicopter support base near stand-off areas ] बॉर्डर वरुन जरी काही अंतराची माघार घेण्यास चीन ने सुरवात केली असेल तरी हुरळुन जायची गरज नाही, चीनने केलेली आणि चालवलेली तयारी काही वेगळा संदेश देते का ? बादवे :- अतिरेक्यांच्या जनाज्याला गर्दी करुन गळे काढणार्‍या देशद्रोही काश्मिरी लोकांनी आपल्या २० वीरगतीस प्राप्त झालेल्या जवानांच्या बद्धल एक शब्दही काढलेला नाही हे अनेकांच्या लक्षात आलेच असेल. जाता जाता :- चीनकडे आपल्या पेक्षा कैक पटीने जास्त सॅटेलाईट्स आहेत, शस्त्रास्त्र खरेदी बरोबरच आपण यात मागे राहणार नाही याची काळजी घेण्यात येइल असे आता वाटते.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Chale The Saath Milke... :- Hasina maan jayegi
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Mon, 07/06/2020 - 10:48 नवीन
चीनने केलेली आणि चालवलेली तयारी काही वेगळा संदेश देते का ?
कुडन्ट अ‍ॅग्री मोअर... !
  • Log in or register to post comments
र
राघव Mon, 07/06/2020 - 11:51 नवीन
दीपक व्होरांचा एक विडिओ आहे, ज्यात त्यांनी काही अंदाज वर्तवले आहेत. अर्थात् हे सगळे मोघम अंदाजच आहेत, पण इंटरेस्टिंग आहेत.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 07/06/2020 - 13:32 नवीन
@ राघव, दिलेला व्हिडियो पाहिला आणि फार आवडला देखील. दिलेला व्हिडियो पाहिला गेल्यामुळे 100+ Chinese Killed in Galwan’ | PLA Veteran’s Big Expose | NewsX हा व्हिडियो देखील पाहण्यात आला ! परंतु ही बातमी कितपत सत्य आहे हे ठावूक नाही. [ इन्फो वॉर / सायकोलॉजिकल वॉरअसेल तर उत्तमच ! ]

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Chale The Saath Milke... :- Hasina maan jayegi
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 07/07/2020 - 10:55 नवीन
धन्यवाद बाणा. होय हा विडीओ तेवढा ऑथेंटीक वाटत नाही. पण ह्यात सुद्धा सीसीपी बद्दल जे भाकीत केलेलं दिसतं ते व्होरांच्या मताशी जुळणारं आहे. :-)
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Mon, 07/06/2020 - 18:15 नवीन
व्हिडिओ आवडला, बरीचशी मतं पटली.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 07/07/2020 - 08:34 नवीन
काही महत्वाच्या बातम्या :- A 1962 News Report & Cautionary Tale: Why Indian Army is Wary of China’s Current 'Disengagement' Disengagement process: Why Army is cautious, will verify each step on the ground before taking next Larger Plan? Why China’s New Claim to Bhutan’s Territory Bordering Arunachal is Making Delhi Uneasy Watch: IAF fighter jets conduct night operations near Indo-China border

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Yeh Wadiyan Yeh Fizaayein... :- Aaj Aur Kal
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Tue, 07/07/2020 - 15:46 नवीन
Why China’s New Claim to Bhutan’s Territory Bordering Arunachal is Making Delhi Uneasy
कदाचित, भारतावर भूतानच्या संरक्षणाची जबाबदारी आहे, म्हणून.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Tue, 07/07/2020 - 17:05 नवीन
१९६२ च्या युद्धात भारतीय सैन्य पळत सुटले. चीनी सैनीक पाठलाग करत मागे लागले. असे करत ते आसाम मधे म्हणजे आत्ताचा (अरूणाचल प्रदेश ) घुसले. याच मार्गाने आपण तिबेटशी संबंध ठेवत आलो होतो. दलाई लामाही याच मार्गाने पळून भारतात आश्रयासाठी आले होते. मात्र त्यानंतर चिनी सैनिक माघारी परत गेले. त्यांना बहुधा हा सगळा थोरातांचा सापळा वाटत होता. प्रतापगडाखाली जसा अफजुलखान स्वखुशीने चालत आला होता, तसंच चीन अरूणाचल प्रदेशात चालून आला होता. त्याचे रसदीचे सर्व माग ताणले गेले होते. आजूबाजूच्या डोंगरात भारतीय सैन्य तोफेच्या बाराच्या इशाऱ्याची वाट बघतंय अशी कदाचित चीनी सैन्याला भिती वाटली असेल. हे सर्व आजूबाजूचे भाग भारतीयांना परिचित व चिनी सैन्याला अगम्य होते. थोरातांनी हेच सांगितले होते की, अशा स्थितीत आपण प्रत्येक चीनी सैनीक कापून काढू शकू. पराजयाच रूपांतर विजयात करू शकू. प्रतापगडाच्या लढाईचा थोरातसाहेबांनी अभ्यास केला नसेल हे कसे शक्य आहे? पण थोरातांना सगळं युध्द संपल्यावर, आता काहीही करता येणार नाही अशी परिस्थिती आल्यावर दिल्लीवरून बोलावणं आलं. नेहरू, कृष्णमेनन व कौल यांना शिवाजी महाराज, त्यांचा गनिमी कावा, डोंगर दऱ्यांचा उपयोग करून करायचं त्यांच युध्दतंत्र वगैरे कळणं शक्य नव्हते. त्यामुळे त्यांना थोरातही कळले नाहीत. पण चिन्यांना मात्र या सगळ्यातला धोका कळला होता. ते ताबडतोब तिथून मागे फिरले. पण ते जिथून मागे फिरले तिथपर्यंतचा भाग आपण जिंकलेला असून तो भाग आपला आहे अशी गैरसमजूत त्यांनी करून घेतली आहे. हेच गलवान खोऱ्याबाबतही झाले आहे. आपण मात्र आपला जिथपर्यंत ताबा आहे, तो आपला भाग म्हणत आहोत. सर्व जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांनी तिबेट मुद्दामहून बफर स्टेट म्हणून ठेवला होता, त्यामागे त्यांचा नक्कीच काहीतरी हेतू होता, तेच धोरण पुढे चालू ठेवले असते तरी पुष्कळ झाले असते. पण आपण तसेतर केले नाहीच, उलट आपली तिबेटमधली आपली सैन्याची तुकडी परत बोलावली. भाग २ वर दिलेली प्रतिक्रिया इथेपन चिकटवतोय. हेच थोडसं भूतानच्या बाबतीत झालं होतं.
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 07/07/2020 - 18:05 नवीन
स्ट्रॅटेजिक अ‍ॅडव्हांटेज - दौलतबेग ओल्डी एअरस्ट्रीप https://economictimes.indiatimes.com/news/defence/i-decided-to-reactivate-daulat-beg-oldi-airstrip-without-any-written-permission-air-marshal-retd-pranab-kumar-barbora/articleshow/76236594.cms https://www.youtube.com/watch?v=5kDt1zQx__0
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 07/07/2020 - 19:46 नवीन
@ राघव आजच पूर्व एयर चीफ मार्शल प्रणब कुमार बारबोरा यांचा वरील व्हिडियो पाहिला होता, खरंतर काही काळा पूर्वी त्यांनी दिलेली मुलाखत वाचनात आली होती पण वाचनात घाई केल्याने त्यांचे नाव मात्र नजरेतुन सुटले होते [ जी दौलत बेग ओल्डी संबंधीची त्यांनी केलेल्या खुलाश्या बद्धल होती. ] मग मला वाटतं हल्लीच एका डिबेटच्या मध्ये त्यांना प्रथम पाहिले आणि ऐकले, पण तरीही याही वेळेस माझे लक्ष त्यांच्या नावाकडे गेले नाही ! मुलाखत पाहतांना त्या व्हिडियोतील त्यांची बोलण्याची शैली / लकब मला प्रचंड आवडली [ हा व्हिडियो मला आज बराच शोध घेउन देखील मिळाला नाही. :( ] हवा असलेला व्हिडियो मिळाला नसला तरी त्यांचाच दुसरा महत्वपूर्ण व्हिडियो मिळाला आणि पाहिला तो सुद्धा खाली देत आहे. मग त्यांच्या बद्धल अधिक माहिती मला खालील व्हिडियोतुन मिळाली आणि तो व्हिडियो पाहुन झाल्यावर मी वरती दिलेला व्हिडियो पाहिला.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Yeh Wadiyan Yeh Fizaayein... :- Aaj Aur Kal
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 07/10/2020 - 08:25 नवीन
India-China Standoff: 144 Armed Forces Veterans Appeal for Accountability, Reforms Explained: In archives, reminder of Galwan in 1962 before the echo in 2020 In clear message to China, India to invite Australian Navy for Malabar drill

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Oh China | Oh Corona | :- The Truthist
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sat, 07/11/2020 - 07:49 नवीन
वुहान परत एकदा गाजायला लागेल असं दिसतंय. सीपीईसीमुळे वाढणाऱ्या मागणीमुळे प्रचंड उत्पादन करायला लागणार आहे असे वाटल्याने अनेक शहरे निर्माण केली गेली. त्यात प्रचंड गुंतवणूक झालीय. बांधकाम तर झाली आहेत. पण उद्योगांची वाढ राहोच, मागणीअभावी उद्योगक्षेत्रच आक्रसत चाललंय. त्यामुळे या शहरात माणसे राहावयास कधी आलीच नाहीत. तिथे भुते राहातात असं म्हटलं जायचं. आतातर तिथे भुते सुध्दा राहणार नाहीत अशी परिस्थिती येतीय की काय असं वाटायला लागलंय. वुहानमधली सोन्याच्या व्यवसायातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या, किंग्ज गोल्ड ज्युवेलरी नावाच्या कंपनीने ८३ टन सोने तारण ठेऊन २.८ डाॅलरच कर्ज उचललं. ह्या कंपनीचं या भुतांच्या शहरातील व्यवहारात काही अब्ज डाॅलर्सच नुकसान झाल्याने त्यांना हे कर्ज फेडता आलं नाही. तेव्हा त्यांनी तारण म्हणून ठेवलेल्या सोन्याची तपासणी केली तर सोन्याच्या ऐवजी सोन्याचा मुलामा दिलेले पितळी बार सापडले. ही २२ मेफेब्रुवारी २०२० मधली गोष्ट आहे. असं म्हटलं जातंय की, हाच प्रकार अनेक कंपन्यांनी केलाय व हळू हळू सगळेच देणीदार पैशासाठी तगादे लावायला गर्दी करायला लागले आहेत. अनेक अब्ज डाॅलर्सच्या पितळी सोन्याचे हे व्यवहार आहेत. यात विमा कंपन्यांनी हमी घेतलेली असल्याने त्याही झोपणार आहेत. अर्थव्यवस्थेवर ताण आलेला असतानाच नेमके हे सगळे उघडकीस येतंय.<\a>
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sat, 07/11/2020 - 08:07 नवीन
किंग्ज गोल्ड ज्युवेलरी नावाच्या कंपनीने ८३ टन सोने तारण ठेऊन २.८ डाॅलरच कर्ज उचललं.
इथे हजार/लाख/कोटी/ अब्ज वगैरे टंकायचं राहून गेलंय का?
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sat, 07/11/2020 - 09:01 नवीन
:) ८३ टन सोन्याचा मुलामा दिलेल्या पितळी बारच्या तारणावर २.८ अब्ज अमेरिकन डाॅलरच कर्ज उचलले. फेब्रुवारी मधे हप्ता चुकला म्हणून तारण ठेवलेले सोन्याच्या संदर्भात कोर्ट ॲार्डर २२ मेला मिळाली.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sat, 07/11/2020 - 11:33 नवीन
चीनच्या एकूण सोन्याच्या साठ्याचा ४.२% = ८३ टन सोने
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 07/11/2020 - 20:55 नवीन
जालावर रडार आणि अँटी रडार मिसाइल्स ची माहिती काही काळा पासुन येत आहे, विशेषतः चीन ने लडाख बॉर्डर जवळ त्यांची एस-४०० सिस्टिम डिप्लॉय केल्या नंतर. माझ्या माहिती नुसार चीन ने ही सिस्टिम अक्साई चीन मधील TSO Tang Lake जवळ उभी केलेली आहे ! या एस-४०० सिस्टिमला आपले ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूज मिसाइल न्यूट्रिलाइझ करु शकते असे म्हंटले जात आहे. [ ब्राम्होस ची सीइपी १ मिटर आहे. सीइपी :- Circular Error Probability ] हे मिसाइल रडार मधुन निघणार्‍या लहरी पकडु शकते की नाही ते ठावूक नाही, पण सॅटॅलाइट ने किंवा इतर पद्धतीने एस-४०० चे लोकेशन कोऑर्डिनेट्स मिळाले तर ती सिस्टिम हिट करता येइल, अर्थात एस-४०० ही इझी मुव्ह सिस्टिम असल्याने कमी वेळेत या सिस्टिम चे अचूक लोकेशन मिळवणे हे महत्वाचे ठरावे. आपल्याकडुन देखील एस-४०० सिस्टिमी खरेदी विषयी घाई करण्याच्या बातम्या आणि त्या सिस्टिमला विरोध करणार्‍या बातम्या येत आहेत. आपल्या लष्कराने मागच्या वर्षी ChangThang Prahar या कोडनेम ने मोठ्या स्केल चे वॉर ड्रिल पूर्व लडाख मधील चीनला लागुन असलेल्या सीमा भागात केले होते. आपल्या बाजुने Barak-8 एअर डिफेन्स सिस्टिम डिप्लॉय केली आहे अश्या बातम्या सध्या जालावर दिसत आहेत, तसेच अमेरिकेकडुन NASAMS II मिसाइल शिल्ड विकत घेण्या विषयी देखील चर्चा चालु असल्याचे समजते आणि याच बरोबर रशियाकडुन ३० Tula ZRPK “Shell-S” विकत घेण्याचा विचार असल्याचे समजते आहे. संदर्भ :- Indian army conducts massive exercise near China border in Eastern Ladakh [ २०१९ ची बातमी ] Indian Army Conducts Massive Exercise ‘Chang Thang in Eastern Ladakh [ २०१९ ची बातमी ] China ‘deploys’ S-400s, IAF has war gamed the scenario multiple times for air ops New Delhi to get Washington-type missile shield NASAMS II Why Subramanian Swamy doesn’t want India to use S-400 missiles against China 'After Banning Chinese Apps, Check Chinese Software In Russian S-400': Subramanian Swamy India wants to rush delivery of S-400 anti-missile system — here’s why it doesn’t want any delays India to deploy Barak-8 Air Defence System in Ladakh against China India intend to buy more than 30 Tula ZRPK “Shell-S” from Russia

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Chand Si Mehbooba... :- Himalay Ki God Mein
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 07/12/2020 - 09:05 नवीन
माझ्या माहिती नुसार चीन ने ही सिस्टिम अक्साई चीन मधील TSO Tang Lake जवळ उभी केलेली आहे ! या बातमी बद्धल जालावर अधिक गहन शोध घेतल्यावर मिळालेली माहिती खालील दोन इमेजेस मधुन समजु शकते, तसेच एस ४०० च्या जागी एस ३०० असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. https://pbs.twimg.com/media/EcVU9jJWsAEVet0?format=jpg&name=medium उजवीकडे एस ३०० चे लोकेशन पिवळ्या रंगाच्या पीन ने दर्शवले आहे. https://pbs.twimg.com/media/EcJ899UUcAENoe-?format=jpg&name=4096x4096 रडार मधुन बाहेर पडणार्‍या लहरी त्याचे उगम स्थान म्हणजे रडार चे स्थान दर्शवतात. तसेच Rutog County, Ngari Prefecture, Tibet, China [ Latitude :- 33.381 / Longitude :- 79.730 ] मध्ये देखील चीन ने अँन्टी एअर क्राफ्ट रडार बसवले असल्याचे म्हंटले जात आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Chand Si Mehbooba... :- Himalay Ki God Mein
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 07/14/2020 - 13:56 नवीन
इस्लामी राष्ट्र म्हणुन ज्याची निर्मीती हिंदुंच्या विरोधात झाली त्यांची त्यांच्याच देशात नमाज पठण करण्याचे वांदे झाले आहेत हे मागच्या धाग्यात सांगितले होते, पण आज चक्क वेगळी बातमी वाचली ती खाली देतो... Watch: Pakistanis sing 'Vande Mataram' with Indians in London protest against China गंमत पहा, ज्यांनी हिंदूंच्या कत्तली करुन त्यांच्या स्त्रियांची विटंबना केली तेच आता वंदे मातरम म्हणत आहेत आणि हिंदुस्थानात काही बोकड अजुनही वंदे मातरम म्हणणार नाहीत असे म्हणतात... त्यांनी आता तरी बोध घेण्यास हरकत नसावी !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Aate Jate Khoobsurat Awara Sadko Pe... :- Anurodh
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 07/16/2020 - 09:34 नवीन
चीनी उपद्व्याप... China refuses to back off from Finger 4 area in Ladakh, India increases deployment of tanks near LAC How a wrong analysis of satellite images swamped China's social media चीनकडुन आर्टिलरीचा अभ्यास :- आपली बाजु :- अपाचे हॅलिकॉप्टर :- टँक मुव्हमेंट :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Aaja Re Pardesi Main... :- Madhumati
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 07/27/2020 - 13:50 नवीन
आपल्या इस्रोचा स्पाय सॅटेलाइट [ प्रोजेक्ट कौटिल्य ]जो इलेक्ट्रॉनिक इंटलिजन्स गोळा करतो तो हल्लीच तिबेट वरुन गेल्याने चीन मध्ये खळबळ उडाल्याचे वृत्त आहे. हा सॅटेलाइट शत्रुपक्षाच्या प्रदेशातील रेडियो सिग्नल मॉनिटर करतो. असेच पाकिस्तानच्या जिन्हा नेव्हल बेस च्या बाबतीत देखील केले गेले आहे. चीन ने तिबेट मधील त्यांचे एअर बेस / तसेच इतर ठिकाणच्या हालचाली वाढवल्याच्या बातम्या काही काळा पासुन येत आहेत. गुगल अर्थ मधुन अश्या आणि इतर बेसचा मी शोध घेतला :- होतान [ Hotan ] एअर बेस :- [ यात चीन ची फायटर जेट्स दृष्टीस पडतात. ] https://earth.google.com/web/search/hotan+airbase/@37.03579634,79.87849616,1423.40305644a,771.35787717d,35y,0h,0t,0r/data=CigiJgokCeUl0t3ih0JAEbzmRpGrf0JAGaZvGmBt8FNAIZJ_3Q3O6VNA होतान एअर बेस :- [ यात देखील चीन ची फायटर जेट्स दृष्टीस पडतात. ] https://earth.google.com/web/search/hotan+airbase/@37.04102081,79.86165193,1414.27091479a,694.39276466d,35y,0h,0t,0r/data=CigiJgokCeUl0t3ih0JAEbzmRpGrf0JAGaZvGmBt8FNAIZJ_3Q3O6VNA होतान :- [ बहुतेक चायनीज एचक्यू ९ बेस ] https://earth.google.com/web/search/hotan+airbase/@36.99929174,79.92636379,1471.94695782a,680.15184499d,35y,0h,0t,0r/data=CigiJgokCeUl0t3ih0JAEbzmRpGrf0JAGaZvGmBt8FNAIZJ_3Q3O6VNA नागरी गुनसा धाबपट्टी [ Ngari Gunsa ] :- ही तिबेट मधील धावपट्टी असुन पैंगोंग लेक पासुन फक्त २०० किलोमीटर अंतरावर हा बेस आहे. https://earth.google.com/web/search/Ngari+Kunsha+Airport,+%e7%8b%ae%e6%b3%89%e6%b2%b3%e9%95%87+Gar+County,+Ngari+Prefecture,+Tibet,+China/@32.10024121,80.05772868,4267.59716819a,10569.9799052d,35y,0h,3.82180814t,0r/data=CigiJgokCW2_1stZhkBAEf_g7m5ODz5AGfUfeocyJlVAIZDaprm5XVNA स्कार्दू एअरबेस [ Skardu ]:- [ पाकव्याप्त काश्मीर ] [ इथे पाकड्यांनी JF-17 फायटर जेट उतरवले असुन त्यांचा युद्ध सराव सुरु असल्याच्या बातम्या आहेत.] https://earth.google.com/web/search/Skardu+/@35.33878529,75.54982189,2197.2641166a,6380.98297464d,35y,0h,0t,0r/data=CnEaRxJBCiQweDM4ZTQ2MzkyYmFjMTAyODM6MHhjMmY3YTc4NmY5ODMzZDcZvNaUGpCpQUAhchmS7kLjUkAqB1NrYXJkdSAYAiABIiYKJAkOc7_WrBJAQBGpdJID3QdAQBn_EWqs3AlUQCHf6Nr6hv1TQA [सुचना :- सगळ्या लिंक संपूर्ण कॉपी पेस्ट करुनच ब्राउजर मध्ये उघडाव्यात. तसेच दिसणार्‍या इमेजेस लेटेस्ट नाहीत. ]

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Namo Namo... :- Kedarnath
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 07/27/2020 - 17:33 नवीन
*
...त्यांचा युद्ध सुरु असल्याच्या बातम्या आहेत....
'युद्ध सराव सुरू' म्हणावयाचे आहे का ? (मी आज दिवसभरात बातम्या बघीतल्या नाहीत)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 07/27/2020 - 18:16 नवीन
'युद्ध सराव सुरू' म्हणावयाचे आहे का ? हो, लिखाणात चूक झाली आहे. क्षमस्व. [ चूक लक्षात आणुन दिल्या बद्धल आभारी आहे. ] मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Namo Namo... :- Kedarnath
  • Log in or register to post comments
ध
धनावडे Tue, 07/28/2020 - 12:45 नवीन
काही दिवसापासून मराठी वृत्तपत्रांच्या वेबसाईट वर चिनी भाषेतील जाहिराती दिसतायत, हा हॅकिंग च काही प्रकार आहे का?
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 07/28/2020 - 13:49 नवीन
नेमक्या कोण कोणती वृत्तपत्रात तुम्हाला चिनी भाषी जाहीराती दिसतात ?
  • Log in or register to post comments
ध
धनावडे Tue, 07/28/2020 - 15:21 नवीन
लोकसत्ता आणि पुढारी
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 09/01/2020 - 17:20 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- New tensions on LAC shouldn’t escalate like Galwan. Raise diplomacy stakes to push China back
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 09/01/2020 - 17:24 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- New tensions on LAC shouldn’t escalate like Galwan. Raise diplomacy stakes to push China back
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 09/13/2020 - 18:01 नवीन
आत्ताच माझ्या वाचनात पत्रकारीते मधील जवळपास ८० वर्ष जुने आणि उत्तम मॅगझीन असलेल्या न्यूजविक मधील एक लेख आला... यातील मला महत्वाच्या वाटलेल्या काही ओळी खाली देत आहे. China is thought to have suffered at least 43 deaths in the Galwan clash. Paskal says the number of Chinese killed could exceed 60. Indian troops fought back ferociously. Beijing won't admit the extent of the debacle. Then, beginning late last month, for the first time in a half-century, India carried out an offensive against China, taking back high ground the Chinese recently grabbed. China's forces were surprised when Indian troops mounted their attempt to retake strategic high points. Stunned Chinese soldiers retreated. China's subsequent efforts to counter the Indian moves proved ineffective. At least for the moment, India's troops, in the southernmost of the three areas of conflict, are in control of territory once in Chinese hands. संदर्भ :- The Chinese Army Flops in India. What Will Xi Do Next? | Opinion टिवटिव अपडेट :- Images allegedly taken by #China's Gaofen-2 satellite begin circulating chinese social media, showing #India's new camps sitting above the #SpanggurGap & #China's camps below it the image reaffirms action by the #IndianArmy Image two shows the line of sight India enjoys संदर्भ :- d-atis

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Indian vs Chinese Air Force: Is the Indian Air Force superior to the Chinese PLAF?
  • Log in or register to post comments
क
कोहंसोहं१० Sun, 09/13/2020 - 19:33 नवीन
https://www.aajtak.in/technology/mobile/story/redmi-9i-price-in-india-leaked-ahead-of-launch-ttec-1127482-2020-09-10 https://www.aajtak.in/technology/mobile/story/oppo-f17-price-in-india-starts-at-rs-17990-check-more-details-ttec-1127373-2020-09-10 देशात चिनी वस्तूवरील बॅन हा विषय एवढ्या दिवसांपासून सुरु असताना देशातील नंबर १ न्युज चॅनेल म्हणवून घेणारे चिनी कंपन्यांची जाहिरात करत आहेत. एकीकडे मोठमोठ्या बातम्या द्यायच्या, चीनविरोधी सूर आळवायचा, चर्चा घडवून आणायच्या आणि दुसरीकडे न्युजच्या नावाखाली त्यांच्या कंपन्यांच्या प्रोडक्टस ची जाहिरात साईटवर करायची. हे बरोबर वाटते का? असल्या न्युज बॅन करून चिन्यांच्या उपद्व्यापांना योग्य उत्तर देण्याची जबाबदारी यांची नाही का?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 09/13/2020 - 22:41 नवीन
चीन बरोबर जे मतभेद आहेत ते चर्चे नीच सोडवले पाहिजेत. हवं तर दुसऱ्या देशाची मदत घेवून चीन वर राज नैतिक दबाव आणावा. युद्ध हा पर्याय भारताला खूप महाग पडेल. चीन समोर भारतीय सेना टिकाव धरू शकणार नाही जेव्हा उघड युद्धाची घोषणा होईल. नेहरू सारखी अवस्था मोदी ची होईल तंत्र ज्ञान मध्ये चीन भारताच्या खूप पुढे आहे. तुलना होवू शकत नाही
  • Log in or register to post comments
B
Bhakti Mon, 09/14/2020 - 13:02 नवीन
बरोबर.. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी हे घडायला पाहिजे...वैर्याचा काळ.. धैर्याने घ्यावं लागेल..
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Mon, 09/14/2020 - 15:07 नवीन
चीन समोर भारतीय सेना टिकाव धरू शकणार नाही जेव्हा उघड युद्धाची घोषणा होईल. -- या विधानाला काही आधार की असाच हवेत गोळीबार ? मुळात चीनी सैन्याला युद्धाचा अनुभव शून्य आहे या उलट पाकिस्तानच्या कृपेने भारतीय जवान सतत एक्टिव असतात. या शिवाय सियाचीन सारख्या अतिऊंच भागांचा भारतीय सैन्याला सराव आहे याच्या उलट चीनी सैन्य समुद्र सपाटिच्या भागातून हिमालयात येते. हिमालयातील लडाक भागात जर युद्ध पेटले तर भारतीय सैन्य चीन्यांना वरचढ ठरेल यात शंका नाही. याची छोटिसी झलक भारतीय सैन्याने, १९६२च्या युद्धात गमावलेले अनेक पॉईंट परत घेऊन दाखवून दिली आहे.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Mon, 09/14/2020 - 19:10 नवीन
१. सर्वात महत्वाचे म्हणजे आपण थोरातांनी सांगितल्याप्रमाणे लढत आहोत. आपल्या सर्व हालचाली रस्ते तयार झाल्यावर रस्त्यांच्या सहाय्याने होताहेत. त्यामुळे रसदीवर ताण येण्याचे काहीच कारण नाहीये. २. १९६२ च्या युध्दानंतर उंच भागातील विरळ हवेत कार्यरत राहणारी सेना आपण उभारली व तिची व्याप्ती आपण वाढवत राहीलो आहोत. आजमितीला ही संख्या दोन लाखांपर्यंत गेली आहे. हे सैन्य जगांत अत्युकृष्ट मानलं जातंय. याबाबतीत रशिया, अमेरिका, फान्स वगैरे देशही आपल्याशी बरोबरी करू शकत नाहीत. ३. याच कारणामुळे आपले सैनिक जून महिन्यातील हातघाईच्या लढाईत वरचढ ठरले. “चिनी सैनिकांच्या मागे लागणे व त्यानंतर त्यांच्यावर हल्ला करणे” यातून हे दिसून आले. अशा हवेत दमसास टिकवून जोरात पळून जाणे सुध्दा चिनी सैनिकांना जमू शकलेले नाही असे दिसतेय. याउलट दम लागल्यामुळे हतबल झालेल्या चिनी सैनिकांना आपले सैनिक फारच वरचढ ठरलेले दिसताहेत. यानंतर कराटेचे प्रशिक्षण घेतलेले सैनिक चीनने तैनात केल्याची बातमी आली होती. पण ते सैनिक विरळ हवेत कितीवेळ हालचाली करू शकतात याला महत्व आहे. त्यांच्या कराटेच्या ज्ञानाचा तरच उपयोग आहे. ४. सियाचीन तसेच उंचावरील आपल्या ठाण्यांची संख्या अंदाजे २०० असून तिथे आपल्या सैनिकांची सतत ये जा चालू असते. रसद पुरवढ्याची कामे चालू असतात. त्यामुळे आपले सैनिक सतत तिथल्या हवेशी जमवून घेतलेले असे असतात. हे अनेक वर्षे चालू आहे. डोंगराळ प्रदेशातील आपले हे जगातील उत्कृष्ट सैन्य असून पाकिस्तानमुळे ते नेहमी सरावात असते. ५. १९६२ च्या युध्दात, युध्द सुरू झाल्यावर आपण गरम कपडे व हत्यारे परदेशातून आयात करायला सुरवात केली. जेव्हा ही युध्दसामुग्री आपल्याला मिळाली, तेव्हा चीनने एकतर्फी युध्दबंदीची घोषणा केल्याने आपण त्या युध्दसामुग्रीचा उपयोगही करू शकलो नव्हतो. यावेळी आपण ही तयारी अगोदर करतोय व नंतर चीनने दिलेले आव्हान स्विकारतोय. आपण उगीचच हातात तलवार आलीय म्हणून कोणावर धावून जात नाही आहोत. तर मिळालेले आव्हान परतावून लावतोय. सैन्याच्या ताकदीवर जैसे थे परिस्थिती आणायला चीनला भाग पाडतोय. ६. १९६२ ला चीन आपल्यावर हल्ला करणार नाही या समजूतीतच आपण होतो. आत्ताची सेना व सरकार सावध आहे असं वाटतंय. चीन आपला मुख्य शत्रू आहे, पाकीस्तान नव्हे हे वाक्य पर्रिकरांनी काही वर्षापूर्वी उच्चारले होते, त्यामुळे मला असं वाटतंय. ७. अमेरिका, जपान, फान्स व अमेरिका यांना त्यांच्या लष्करी उपग्रहावरून मिळणरी माहिती आता भारताला प्रत्यक्ष युध्दक्षेत्रावर मिळायला लागलीय की काय अशी शंका यायला लागलीय. त्यासाठीचे समन्वय संयुक्त युध्दसरावात करून घेतले असणे शक्य आहे. त्यासाठी अमेरिकेने नाटो राष्टांसारखा दर्जा भारताला दिला की काय असं वाटतंय. आजपर्यंत चीन गुपचूप हालचाली करून भारताला चकीत करायचा. आता बरोबर उलटं होतंय. चीनच्या हालचाली भारताला कळताहेत. त्याप्रमाणे भारत योजना आखतोय. तर भारताच्या हालचाली चीनला कळत नाहीयेत. भारताची खेळी झाल्यावर तो चकीत होतोय. त्याला बावचळायला होतंय. बंदूकांच्या फैरी हवेत झाडायला लागलाय. ८. यामुळे भारत तंत्रज्ञानाच्या बाबतीतही पुढावा मिळवायला लागलाय अशी माझी समजूत व्हायला लागलीय. तसं असेल तर मिझाईल, ड्रोन, तोफा यांचा पहिला मारा झाल्यावर त्याचा फिडबॅक तातडीने मिळून भारताचा मारा अधिक अचूक व भेदक होऊ शकतो. असे झाले तर चीन कितीही ताकदवान असला तरी आपण त्याचेवर हवाई प्रभूत्व मिळवू शकतो. ८. भारताच्या बदलेलेल्या या स्थितीचे परिणामही दिसताहेत. नेपाळचा भारत विरोध बदलतोय. श्रीलंकेचे नवीन सरकार चीन धार्जीणी भूमिका घेत नाहीये. उलट हबनटोटच्या बाबतीत आमची चूक झाली असं वक्तव्य करतोय. रशिया हळूहळू भारताची बाजू घ्यायला लागलाय. जर्मनीने तर उघड उघड चीनधार्जीणी भूमिका घेतली होती. पण तोही फेरविचार करायला लागलाय. अग्नेय आशियातले छोटे देशही चीन विरूध्द बोलायला लागले आहेत. इराणनेही चाबहार बंदराबदल भूमिका बदलायचे ठरवतोय. ९. जर असं असेल, तर पाकिस्तानवर आपण नक्कीच हवाई प्रभूत्व मिळवू शकू असं भारतीय सैन्याला वाटणे साहजिकच आहे. बांगलादेशच्या युध्दात हवाई प्रभूत्व मिळल्यावर आपल्या विमानदळाचा आपल्याला खूपच फायदा झाला होता. तसंच यावेळीही होऊ शकतो. तसं झालं तर दोन आघाड्यांवर लढणे सोपे होऊन जाते. राफेल सारखी विमाने चीनच्या सरहद्दीवर ठेवणे व तेजस पाकिस्तानच्या बाजूला ठेवणे. तसेच १९७१ च्या युध्दात गाजलेली मिराज नव्याने घेणे व ते पाकिस्तानच्या सिमेवर तैनात करणे, यासर्व गोष्टी आपण हवाई युध्दात वर्चस्व मिळवणारच याबाबतची आपली सैन्याची खात्री दर्शवते. अर्थात वर उल्लेख केलेल्या चार प्रबळ देशांचे तंत्रज्ञान आपल्यामागे उभे राहिल्याने हे शक्य झाले असावे. यात अजून इस्त्रायलची मदत विचारात घेतलेली नाही. काही करून पाकिस्तानी अणुबाँवर ताबा मिळवायला तो देश अगदी टपून बसलेला असणार. १०. हवाई प्रभूत्व मिळवलं तरी शेवटची लढाई सैन्यालाच करायला लागते. त्याबाबतीत भारतीय सैन्याने आपले श्रेष्ठत्व सिध्द केलच आहे. अस असेल तर भारताच्या बाजूने जास्तीत जास्त देश गोळा होणे यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. तरीही रस्त्याची कामे पूर्ण होईपर्यंत म्हणजे २०२२ पर्यंत लढाई टाळण्याचाच कल असण्याची शक्यता मला वाटते. तोपर्यंत आपली अर्थव्यवस्था सावरायलाही वेळ मिळू शकतो. पण तोपर्यंत चीनला जैसे थे स्थिती ठेवायला भाग पाडायचे, वर्चस्व मिळवू द्यायचे नाही, तसेच आमच्यावर युध्द लादल्यास त्याची जबरदस्त किंमत चीनला मोजायला लागेल अशी जाणीव चीनला करून द्यायची इतपत भारताची सध्याची भूमिका असावी असं मला वाटते.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 09/14/2020 - 19:28 नवीन
पण आता पारंपरिक आणि सीमित क्षेत्रात च युद्ध होईल असे नाही. चीन पाकिस्तान च्या भू भागावरून उत्तरेच्या सीमेवरून सुद्धा हल्ला करेल. किंवा पाणबुडी चा वापर करून देशाच्या दक्षिण आणि पश्चिम सीमेवरून हल्ला करणे जास्त अवघड नसेल एवढे तंत्र ज्ञान पुढे गेले आहे. चीन काही ही करेल नित्तीमत्ता त्याच्या जवळ नाही . त्या मुळे सरासरी युद्ध टाळणे आणि शक्य होईल तेवढे जागतिक दडपण चीन वर ठेवणे हे शहान पणाचे असेल. बाकी युद्ध झालेच तर सर्व बाबतीत तयारीत असणे कधी ही चांगलेच. आता फक्त सैन्य च लढत नाही . सायबर हल्ले,आणि अशा प्रकारचे अनेक हल्ले केले जातात.. इस्त्रायल चे उदाहरण घ्या सरळ सरळ पॅलेस्टाईन च्या मध्य भगी जावून नागरी वस्ती वर हल्ला करायला तो मागे पुढे पाहत नाही. सीमेवर सैनिकी ठिकाण वरच हल्ला करण्याचे दिवस गेले आता . अमेरिकेने पण अफगाणिस्तान मध्ये ,पाकिस्तान मध्ये ladhen साठी कसे हल्ले केले होते.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा