Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

अनलॉक १.० ते ५.०

P
Prajakta२१
Tue, 06/02/2020 - 19:42
🗣 104 प्रतिसाद
प्रा डॉ बिरुटे सरांच्या सूचनेनुसार नवीन धागा काढत आहे धन्यवाद https://www.esakal.com/mumbai/mission-begin-again-start-maharashtra-chie... अनलॉक १.- हळूहळू सर्व सुरु करणार आहेत लोकांनी स्वयंशिस्तीने वागण्याची फार गरज आहे अनलॉक १.- हळूहळू सर्व सुरु करणार आहेत लोकांनी स्वयंशिस्तीने वागण्याची फार गरज आहे स्वयंशिस्त १. मास्क वापरणे २. मास्क काढावा लागला तरी नंतर लगेच हात sanitize करणे ३. सार्वजनिक ठिकाणी without कव्हर न शिंकणे,न खोकणे ,न थुंकणे ४. गर्दी न करणे (whatsapp सारख्या माध्यमांचा उपयोग करून वार ठरवून घेणे सामान खरेदीसाठ,शक्यतो दुकानदारांना फोन करून जाणे) ५. ऑनलाईन ,घरपोच डिलिव्हरीला प्रोत्साहन देणे ,प्राधान्य देणे अवांतर - रुग्णसंख्या वाढत असताना देखील लोकडाऊन शिथिल करण्याच्या भारताच्या निर्णयावर जगात आश्चर्य व्यक्त होत आहे असे आज एका वृत्तवाहिनीवर (tv ९) सांगत होते आत्ता चक्रीवादळाची बातमी सारखी दाखवत आहेत चक्रीवादळामुळे परत त्या त्या ठिकाणी संचारबंदी आहे निसर्गच लोकडाऊन वाढवण्याचा इशारा तर देत नाहीये ना असे वाटले

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 50946 views

🗣 चर्चा (104)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 06/03/2020 - 07:58 नवीन
माझ्या तालुक्याच्या गावची लोकसंख्या कागदोपत्री वीस हजार तर अशी तशी मिळून पस्तीस एक हजार भरेल. पहिला रुग्ण सापडला तेव्हापासून तर आत्तापर्यंत म्हणजे लॉकडाऊन 5.0 अर्थात अनलॉक 1.0 पर्यंत लोकांच्या जीवनव्यवहारात थोडा फार फरक पडलेला दिसतो. अगदी स्ट्रीकली लॉकडाऊन होतं तेव्हा लोक एकटे दुकटे दिलेल्या वेळात सामान घ्यायला दिसायचे, रहदारी कमी होती. तालुल्यातल्या एका खेडेगावी एक बाधित रुग्ण होता तोही कुठेतरी कोणाच्या संपर्कात आलेला त्यामुळे त्याचं कुटूंब आणि काहींना संसर्ग झाला आणि ते बरेही झाले. काहींवर उपचार तालुक्याच्या गावी सुरु होता त्यामुळे एक भिती काही दिवस होती. नंतर मात्र, लोक उपरणे, मास्क, टॉवेल असे काही-बाही गुंडाळून रस्त्यावर दिसतच होते. एक भितीयुक्त पण जीवनव्यवहार नेटाने मागच्या पानावरुन पुढे सुरुच होते. आता अनलॉक वन मधे शहराचा अंदाज घ्यावा म्हणून काल गाडीतून फेरफटका मारुन आलो तेव्हा जाणवले की शहर मुक्त वाहात होते. नेहमीची गच्च ट्राफीक रस्त्यावर दुतर्फा होती, भाजीपाल्यावाले जमेल तिथे दुकाना लावून होते. काहींना मास्क होते तर काहींना नव्हते. गर्दीतल्या एका परिचिताला मास्क नव्हता म्हणून त्याला मास्क लावून फिर ना भो, असं म्हणालो तर म्हणाला की ''जब मरनेका टाईम आयेगा तो मरेंगे उसको कोई नै रोकेगा'' असे बेफिकिरपणा आढळला. बाकी, सॅनिटायजर, साबण पाण्याचा वापर करणे या गोष्टी आपल्याला सुरक्षित राहण्यासाठी नित्यनियमाने करावे लागेल. आपल्याला आपलीच सावधानता बाळगावी लागेल. आपणच आपल्याला जपायचं हे लक्षात घेऊन यापुढील वावर करणे गरजेचे आहे. आपल्याला हातात तितकेच आहे, आपल्याला संकटाला सामोरे जाण्याचे भान आले आहे, असे समजून आपल्याला नेटाने पुढे जाणे आहे. बाकी, लॉकडाऊन आणि त्याचा जनजीवनावर झालेले परिणाम आपण विविध माध्यमातून समजून घेत आहोत, पाहातही आहोत. गरीब-मजूर यांच्या वाटेला आलेल्या दु:खाबद्दल कोणताच युक्तीवाद करता येत नाही ते दु:खदायकच होतं. बाकी, ”रोम जळत होते तेव्हा निरो फ़िडेल वाजवत होता” ही गोष्ट नव्याने समजून घेत आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Wed, 06/03/2020 - 09:07 नवीन
”रोम जळत होते तेव्हा निरो फ़िडेल वाजवत होता” ही गोष्ट नव्याने समजून घेत आहे. शेवटी एकदा पंतप्रधांनाबद्दल पिंक टाकल्या शिवाय आपला दिवस जात नाही का? आज जर मनमोहन सिंग पंतप्रधान असते तर अशीच पिंक आली असती का? अनलॉक 1.0 बद्दल बोललं तर बरं नाही का?
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 06/03/2020 - 09:13 नवीन
त्यांना पंप्र ऐवजी मा मु अभिप्रेत असतील तर? किंवा ह्यापैकी कोणीच अभिप्रेत नसतील तर? त्यांनी तर कोणाचेच नाव घेतले नाही, तुम्ही मात्र उगाच मोदी मनमोहन आणताय असे दिसते.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 06/04/2020 - 08:49 नवीन
”रोम जळत होते तेव्हा निरो फ़िडेल वाजवत होता” हे कोणाला उद्देशून हे समजायला (भारताच्या संधर्भात ) याला किती अक्कल लागते? ए सकाळ मधील ब्रिटिश नंदी किंवा श्रीराम पवार यांच्या लेखासारखे आहे .. कितीही चांगले देशात घडले असले तरी शेवटी सद्य सरकार वर घसार्याचे.. फुस्कुलाय टाकत
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 06/04/2020 - 08:56 नवीन
तुम्हाला जसं वाटतंय देशात चांगलं घडतंय आणि तुम्ही तुमचं मत देखील मांडत आहातच, त्याचप्रमाणेच एखाद्याला वाटत असेल देशात चांगलं घडत नाहीये आणि ती व्यक्तिदेखील तसंच त्यांचं मत मांडत आहेच. व्यक्तिगत न होता हे मांडायला तुमची काही हरकत आहे काय? शिवाय एखाद्याने न उच्चारलेले शब्द उगा त्यांच्या तोंडी तुम्ही घालताहेत असे वाटते.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 06/04/2020 - 08:58 नवीन
शिवाय पिंक टाकणे वगैरे अशा शब्दांची काहीही गरज नव्हती.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 06/04/2020 - 09:35 नवीन
माफ करा प्रचेतस पण श्री बिरुटे यांनी लिह्लेलाय १.० वरील लेखनात उगाचच शेवटी अप्रत्यक्षरीत्या पंतप्रधानांचाच उल्लेख केला तो सुद्धा उपहासाने म्हणून मी पिकं टाकणे हा शब्द वापरला जसे कोणाला मी मोदींचा आंधळा "जुंपलेला " भक्त आहे असे वाटते तसेच मलाही बिरुटे हे एकतर्फी लिहितात असे वाटते .. खास करून साध्यासाह्य जगभर अवघड असलेल्या परिस्थितीत नाही नाही माझेच चुकले ”रोम जळत होते तेव्हा निरो फ़िडेल वाजवत होता” हा "निरो" बहुतेक गांधी किंवा पवार असावेत .. कारण ३०३ मिळून त्यांचेच राजय आहे ना सध्या ( हे उपरोधाने लिहिले आहे )
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 06/04/2020 - 09:49 नवीन
माझं इतकंच म्हणणं आहे की, जसं तुम्हाला त्यांचं लिहिणं एकतर्फी वाटू शकतं तसंच त्यांनाही तुमचं लिहिणं एकतर्फी वाटू शकतंच. अर्थात जोपर्यंत कुणीही वैयक्तिक होत नाही तोपर्यंत त्या एकतर्फी वाटण्यालाही काही हरकत नसावी.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 06/04/2020 - 09:46 नवीन
खुलासा देतो प्रचेतस .. मी कुठे म्हणतोय कि सध्या सगळं देशात चांगला घडतंय श्रीराम पवार आणि ब्रिटिश नंदी यांचा संधर्भ फक्त सध्याच्या परिस्थितील त्यांचे लेख नसून एकूण २०१४ पासूनचे जे लिखाण आहे त्याबद्दल आहे .. आपण जणू अर्थ काढलात कि मी आत्ताचेच फक्त म्हणतोय "शिवाय एखाद्याने न उच्चारलेले शब्द उगा त्यांच्या तोंडी तुम्ही घालताहेत असे वाटते." म्हणजे ते निरो वैगरे... काय बोलणार! मग कोणाला उद्देशून हो ते ? तुम्ही समजावून सांगा किंवा सरळ ज्यांनी लिहिले ते सांगतील मेक इन इंडिया चे आव्हान याबद्दल ची चर्चा आठवा मिपावरची... नेहरू काळा पासून चालू आहे ती कल्पना .. ती आत्ताच्या सरकारने आणली परत तर लगेच चुकते! .. असे दर्शवणारे लिहितात जेवहा लोक तेव्हा हे किती "केवळ विरोध साठी विरोध " आहे आणि फोल आहे ते ज्याने उत्पादन क्षेत्रात काम ़केलाय त्याला वाटते म्हणून प्रतिक्रिया देतो
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 06/04/2020 - 09:57 नवीन
मला खुलासा देऊ नका हो, मी तो मागितलाही नाहीये. बाकी श्रीराम पवार किंवा ब्रिटिश नंदीचं तुम्ही उदाहरण देतात त्याचप्रमाणे भाऊ तोरसेकर किंवा अर्णब विषयी का बोलत नाहीत, त्यांचे लेखनही कुण्या एकाच पक्षाला धार्जिणे असतेच की. बाकी ते निरो फिडल रोम कशावर अभिप्रेत आहे हे त्या प्रतिसादकर्त्यालाच ठाऊक. तुम्ही मात्र ते नाहक मोदींवर ओढवून घेताय असे दिसते. मी राजकीय चर्चांत कधीच नसतो मात्र हल्ली समर्थकांचे खूपच एकांगी प्रतिसाद दिसतात. विरोध असावाच मात्र तो वैयक्तिक पातळीवर जाऊ नये इतकेच.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 06/04/2020 - 10:32 नवीन
परत लिहितो पण तुम्हीच म्हणाल खुलासा मागितलं नवहता अर्णब बद्द्दल मत : अतिशय घाणेररड्या पद्धतीने हा माणूस लोंकाच्या मुलाखती घेतो... नुसता ओरडतो . समोरच्याला बोलू देत नाही, हा कसलं पत्रकार भाऊ तोरसेकर: जास्त संतुलित असतात ... "रोम " ़अभिप्रेत आहे हे त्या प्रतिसादकर्त्यालाच ठाऊक. तुम्ही मात्र ते नाहक मोदींवर ओढवून घेताय असे दिसते. वाह हा खास न्याय .. मी ओढवून घेतोय... निरो कोण होता? सध्याचा संधर्भ काय ..कोणीही सांगू शकेल कशाला बाजू घेता राव .. "हल्ली समर्थकांचे खूपच एकांगी प्रतिसाद दिसतात." हो ना मला हि असे वाटत "हल्ली सरकार विरोधकांचे सुद्धा खूपच एकांगी प्रतिसाद दिसतात"..खास करून सध्याच्।ञाआ संकटात कुचकामी असे . विरोध असावाच मात्र तो वैयक्तिक पातळीवर जाऊ नये इतकेच.... काय बोललोय मी असे? , उलटे श्री प्रोफेसर यांचेबरोबर जेव्हा "आत्मनिर्भर आणि मेक इन इंडिया" वर चर्चा चालली होती तेव्हा चांगल्या हेतूने आव्हान केले कि आपल्या (शिक्षण ) क्षेत्रातील काही सुचवा ज्याने भारताला फायदा होईल . उत्तर तर नाहीच दुसरेच काही .".सरकारे ने काय दिले पाहिजे हे तुणतुणे " ( याही क्षेत्रात अनुभ होता म्हणून बोललो नाही तर कशाला उदाहरण देईन? माझे वडील एक इंजिनीरिंग कॉलेज ( साखर कारखानदारीच्या मालकीचे ) चे मुख्य होते त्यांनी केलं मेक इन इंडिया चा प्रयत्न जेणेकरून भारताला पैसे मिळेल ,, आखाती देशातून विद्यार्थी आणण्याचाच प्रयतन वैगरे ़केले मोदिन्च्यआ आधि ) आणि वैयक्तिक पातळीवर डॉक्टर खरे आणि इतर जे थोडी सरकरची बाजू घेतात किंवा असे म्हणतात कि "अरे जरा सगळ्या बाजू बघा " त्यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीका होत नाही. लगेच भक्त ! लेबल लावतात ! अरे कसलं भक्त हे घ्या फॉर द रेकॉर्ड - मोदीची व्यक्तिपूजा हि लोकशाहीत कोण्ही करू नये ते चुकीचे आहे - मोदींचा "चमको" पण जरा जास्त होतंय ( सगळ्या राष्ट्राध्यक्षांना मिठी मारणे, गुहेत ध्यानाला गेल्याचा इव्हेंट होणे - करणे किंवा करू देणे अजूनही नकारात्मक आहे पण ते त्यांच्यापेक्षा त्यांना उगाच डोक्यावर घेणारी लोकांबद्दल जास्त आहे, असो
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 06/04/2020 - 12:55 नवीन
असो. मला लिहायचंय ते पुरेसं स्पष्ट केलंच आहे.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sun, 08/30/2020 - 14:43 नवीन
- मोदींचा "चमको" ..... मोर राहिला ना ! त्यांनी मोराला सुद्धा वेठीस धरायला कमी केले नाही !
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 06/04/2020 - 09:11 नवीन
पंप्र असो की मा.मु. बासर्‍या कोण वाजवताना आणि केव्हा आढळले ? त्यांनी त्यांनी जागतिक आरोग्य संघटना आणि भारतीय आरोग्य सेवेतील तज्ञांचे सल्ले कसोशीने पाळले. शेवटी भारतात किंवा महाराष्ट्रात लॉक डाऊन कुणासाठी होते ? ज्यांच्या पर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचणे कठीण आहे तिथे आजार पोहोचू नये यासाठी प्रयत्न होता. पं.प्र आणि मा.मु. यांनी प्लानिंग मध्ये वेळ घालवून विलंब केला असता तरी त्यावर टिका झालीच असती किंबहुना तशी ती केलीही पाहिजे कारण मुंबईतील लोकलसेवा सार्वजनिक ट्रान्सपोर्ट इत्यादी गोष्टी बंद करण्यास अक्षम्य विलंब झाला. आठवडी बाजार आणि जिवनावश्यक वस्तुंचे मार्केट नेमके कसे काम करते आणि तिथूनही शक्य वीषाणू प्रसारा बद्दल शेवट पर्यंत नीटशी चर्चा झालेली दिसलीच नाही. जिवनावश्यक वस्तुंच्या बाबतीत लॉकडाऊन एवजी उपलब्धता कालावधी अधिक असतातर लोकांनी गर्दी कमी केली असती का ट्रान्स्पोर्टचे रेट वाढवून प्रश्न हलका करता आला असता असे पश्च्चात प्रश्न बरेच रहातात पण कोणतीही शासन व्यवस्था सहसा स्थुल व्यवस्थापन करते सुक्ष्म व्यवस्थापन हा त्यांच्या सहज कौशल्याचा भाग असत नाही. फार तर एरर ऑफ जजमेंट अशी टिका पंप्र मामुंवर करता येईल. स्थलांतरीतांसाठी भारतात कुठेही रेशन घेण्याची व्यवस्था का नाही याचे उत्तर भूतकाळातील राजकारण्यांना विचारावी लागेल ती क्षणार्धात उभी करणे कोणत्याही व्यवस्थेस शक्य नव्हते. पण तरीही जिथे माहिती मिळेल तिथे राज्य आणि केंद्र शासनाने व्यवस्था केली. योगी अदित्यनाथांनी डझनभर आय ए एस अधिकारी परराज्यात स्थलांतरीत होऊन गेलेल्यांच्या समस्या ऐकुन संबंधीत राज्यसरकार यंत्रणांशी संपर्क साधून सुविधा पुरवण्यासाठी लावले. सगळेच अन्नानदशे मुळे वापस गेले का ? केरळातून आलेल्या नर्सेस लॉकडाऊन उठला की का वापस गेल्या ? बेसिकली वीषाणू कसा पसरतो या बद्दल अनभिज्ञ लोकांनी वाढवलेले भावनिक दबावामुळे घाबरुन बरेचसे स्थलांतर झाले. माध्यमांकडून महामारीच्या बातम्या दिल्या जात होत्या त्यापेक्षा अधिक विवीध भाषी डॉक्टरांशी संवाद झाला असता तर लोकांना वीषाणू प्रसार म्हणजे काय आणि आपल्या गावी वापस जाण्याच्या ह्ट्टाने तो तिकडे पसरण्याच्या शक्यतेचे गांभीर्य समजले असते ते गांभीर्य समजून देण्यात कोणतीच जबाबदारी निभावायची नाही मांडीवर मांडी ठोकुन सरकारात असलेल्याच्या नावे नुसतीच खडेफोड करण्याबद्दल साशंकता वाटते.
  • Log in or register to post comments
झ
झम्प्या दामले गुरुवार, 06/04/2020 - 08:39 नवीन
हे चौकस आणि खरे ला मोदी Hysteria झाला आहे. ओढून ताणून कोणत्याही प्रतिसादाचा संबंध मोदी विरोधाशी जोडुन बाकी आयडिंना नाक्यावरचा, librandu अशी लेबलं लावाण्याच्या कामाला जुंपले आहे.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 06/04/2020 - 08:54 नवीन
श्रीयुत झम्प्या मोदी किंवा कोणाचा हिस्टेरिया होण्या एवढे ना मी, ना डॉ खरे एवढे झूल लावून चालणारे बैल आहोत " ... बघा मोदींनी काय चांगले केले अश्या प्रकारची सुरवात मी तरी केलेली आठवत नाही आणि तास हेतू हि नाही इथे तिथे सतत कसाही करून सरकार आणि मोदी आणणारे नकारात्मक लिहिणे होते त्याला आलेली प्रतिपक्रिया
  • Log in or register to post comments
आ
आंबट चिंच Wed, 06/03/2020 - 08:14 नवीन
१) काल गाडीतून फेरफटका मारुन आलो अणि २) जाणवले की शहर मुक्त वाहात होते. यातच सर्व काही आले की सगळे तुमच्या सार्खेच फेरी मारायला बाहेर पडले असणार… त्यांना दोष का देताय मग…
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 06/03/2020 - 08:19 नवीन
आपलं म्हणनं बरोबर आहे, किराणा होता गाडीत म्हणून थोडंसं पुढे चक्कर मारुन आलो. विनाकारण बाहेर पडणार नाही, शब्द देतो सर आपल्याला. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 06/03/2020 - 08:29 नवीन
आता ऑफीस उपस्थिती काही टक्क्यांवर सुरु होत आहे, कर्फ्युची वेळही बदललेली आहे. काही दिवसांनी शाला कॉलेजेस सुरु होतील. हळुहळु आता जीवनमान सुरुच होत आहे ना ? सकाळी फिरायला परवानगी दिली, समविषम अटीवर दुकाना सुरु होत आहे, लोक बाहेर पडतीलच अनलॉक वनमधे काळजी घेऊन वावरणे हेच आहे असे वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 06/03/2020 - 08:38 नवीन
आम्हालाही आता दिवसाआड ऑफिसला जावं लागतंय, सर्व प्रकारची काळजी घेतोच आहे. बाईकवरच जात असल्याने फिजिकल डिस्टनसिंग आपसूकच पाळल्या जातंय. १५% इतकीच ऑफिसात एकूण उपस्थिती असल्याने तिथंही प्रश्न नाही.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 06/03/2020 - 08:52 नवीन
आमच्याकडे कॉलेज सुरु होतील तेव्हा परिक्षेचा घोळ सुरु होईल असे दिसते. अंतिम वर्षाच्या परिक्षेच्या विद्यार्थ्यांना बाकीच्या सत्रपरिक्षांच्या गुणांवरुन पुढे पास करायचं हे धोरण ठरत होतं की आज बातम्यात वाचले की राज्यपाल म्हणतात, युजीसी म्हणाले परिक्षा घ्या तर परिक्षा झाल्याच पाहिजे. युजीसी शैक्षणीक क्षेत्रातली सर्वोच्च संस्था आहे, त्यांनी विद्यापीठांना परिक्षा घ्या असे सांगितले होते. विद्यापीठांनी परिक्षा घ्यायला पाहिजे होत्या. मंत्रीमंडळ-मंत्री आणि मुख्यमंत्री म्हणतात की सध्याच्या काळात परिक्षा घेऊ शकत नाही. आता विद्यार्थी परिक्षांसाठी येतील तेव्हा त्यांची व्यवस्था, काळजी आणि इतर प्रश्न निर्माण होतील. असा सर्व घोळ आहे सध्या. परिक्षा विषयावरही राजकारण सुरु आहे. शाळा सुरुवातीला ऑनलाईन सुरु करा असे म्हणत आहेत. एकूण्च सर्व हळुहळु सुरु व्हायला पाहिजेत. विद्यार्थी आणि पालकांसाठी पुढील दिवस अधिक काळजीचे आहेत. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 06/03/2020 - 09:01 नवीन
सध्याच्या काळात परीक्षा घेणे हे खरोखरंच शक्य नाही, राज्यपाल महोदय उगीच परीक्षा रेटून न्यायला बघतात असे वाटते. ग्रेडिंग पद्धत सर्वत्र अमलात आली असती तर हे घोळ टळले असते असे वाटते. क्युम्युलेटिव्ह ग्रेडिंगमुळे अंतिम परीक्षेला फारसा अर्थ राहत नाही. शिवाय बहुसंख्य ठिकाणी cgpa च ग्राह्य धरतात.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 06/04/2020 - 10:41 नवीन
परीक्षा न घेणे हा अभ्यासु , कष्टकरु आणि ओपन कॅटेगरीतील मुलांवर अन्य्याय आहे ! मला स्वतःला बी एस स्सी ला फर्स्ट यियर ला ७९ , सेकन्ड ला ८४ आणि थर्ड ला ९२ टक्के होते . थर्ड यियर चा पर्फॉर्मन्स मुळे मि विद्यापिठात १० वा येऊ शकलो नाहीतर पहिल्या २०-३० मध्ये येण्याचाही योग नव्हता ! ओपन कॅटेगरीतील मुलांसाठी स्पर्धा अक्षरशः कट थ्रोट असते , एकेक गुण महत्वाचा असतो . आयायटीच्या ज्या कोर्स मध्ये मला अ‍ॅडमिशन घ्यायची होती त्यात केवळ ८४ जागा होत्या अन सर्व रिझर्वेशन पकडुन तब्बल ४२ जागा लॉक्ड होत्या त्यामुळे अख्ख्या देशात पहिल्या ४६ मध्ये येणे भाग होते , मी ६६ वा होतो, मि किती रडलोय तेव्हा माझं मला माहीत आहे ! असो. ओपन कॅटेगरीतील मुलांसाठी किमान ऐछिक का होईना पण परीक्षा असाव्यातच भले आयुश्यातील ६ महिने किंवा १ वर्ष वाया गेले तरी बेहत्तर असे माझे वैयक्तीक मत आहे! बाकीच्या विद्यार्थ्यांना सरासरी मार्क्स देऊन डीग्री द्यायला माझी काहीही हरकत नाही ! कोणतेही राजकारण नाही , कोणावरही टीका टीप्पणी करायची इच्छा नाही !
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 06/04/2020 - 12:52 नवीन
आपल्यावेळी टक्केवारी पद्धत होती आणि शेवटच्या वर्षातील टक्क्यांना खूप महत्व असे, मात्र आता परीक्षा पद्धत वेगाने बदलत आहे. बऱ्याच विद्यापीठानी आता CGPA पद्धत आत्मसात केली आहे, ह्या पद्धतीत शेवटच्या वर्षातील टक्केवारीला फारसा वाव नाही किंबहुना परिक्षेलाच फारसा वाव नाही. परीक्षा, सतत वेळोवेळी होणाऱ्या असेसमेंट्स, प्रोजेक्ट्स, हजेरी, बिहेवीयर वगैरे सर्वच फॅक्टर ह्या गुणपद्धतीत धरले जातात. त्यामुळे फायनल ग्रेडिंग हे तुमच्या ३/ ४ वर्षातील एकंदरीत सर्व गुणांकावर ते आधारित असते. काही विद्यापीठे अजूनही जुनीच टक्केवारी पद्धत वापरत आहेत त्याच विद्यार्थ्यांना हा परीक्षा न घेतल्याचाफटका बसू शकतो.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 06/04/2020 - 13:04 नवीन
किंबहुना परिक्षेलाच फारसा वाव नाही. परीक्षा, सतत वेळोवेळी होणाऱ्या असेसमेंट्स, प्रोजेक्ट्स, हजेरी, बिहेवीयर वगैरे सर्वच फॅक्टर ह्या गुणपद्धतीत धरले जातात.
बापरे हे असं असेल तर खरेच अवघड आहे. परीक्षेला अर्थच नाही काही ! असे असल्यास कशाला हव्यात परीक्षा ? मी तुमच्या मताशी सहमत आहे मग परीक्षा नकोतच ! पण हे म्हणजे आपल्या ऑफीसात बोनस अन सॅलरी रेज देणे जसे बॉस च्या हातात असते तसे काहीसे झाले . शिक्षकांची , डिपार्टमेन्टची मर्जी राखली की झाले ! ह्या लॉजिक ने मी विद्यापिठात करेक्ट ४था येऊ शकलो असतो ;) अवांतर : पण असल्या शिक्षणाला काय अर्थ ? ही अशी पास झालेली पोरं स्पर्धात्मक जगात कितपत टिकु शकतील ? अवघड आहे एकुणच .
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 06/04/2020 - 13:35 नवीन
नेहमीच्या टक्केवारी पद्धतीपेक्षा ही श्रेयांक पद्धती खूपच चांगली आहे, आणि सध्या हीच जागतिक स्तरावर वापरली जाते.
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 06/03/2020 - 09:12 नवीन
बाईकवरच जात असल्याने फिजिकल डिस्टनसिंग आपसूकच पाळल्या जातंय.
म्हणजे एनफिल्डवर धक धक आवाज करत मुसळधार पावसात प्रचेतस सुसाट राईड करणार. आणि तेही एकटे? मागे कोणीही नाही? आणि कोणी आपलं माणूस मागे चिकटून बसले असल्यास सोशल डिस्टनसींग कसे बुवा मेंटेन होईल (फार काळ)? विश्वास नाही बसत.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 06/03/2020 - 09:15 नवीन
ऑफिसात जाताना कोण कशाला मागे बसेल भो?:) इतर ठिकाणी जाताना गोष्ट वायली.
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 06/03/2020 - 09:18 नवीन
मग रिकामी सीट वाया कशाला घालवता. कोणाला तरी नेत जा आफिसमधलीला. तेवढीच जरा पर्यावरण सोय.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 06/03/2020 - 09:19 नवीन
सध्या तरी फिजिकल डिस्टनसिंग भो :)
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 06/03/2020 - 09:20 नवीन
मनावर ब्रेक - उत्तम ब्रेक.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 06/03/2020 - 11:08 नवीन
साईडकारपण लावून घ्या..."स्टेपनी"साठी बरी ;)
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 06/04/2020 - 07:51 नवीन
Image removed. साइड कार म्हटले तर फक्त एकच बसेल यात अनेक दर्पणसुंदर्‍या बसु शकतील चित्र अर्थात अंजवरुन साभार.. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 06/04/2020 - 07:58 नवीन
=))
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 06/04/2020 - 19:27 नवीन
_/\_ कोणाचा जनानखाना असेल तर उपयोगी होईल =))
  • Log in or register to post comments
उ
उज्वल कुमार गुरुवार, 06/04/2020 - 09:19 नवीन
स्वतः पॉझिटिव्ह विचार ठेवून कोरोना पॉझिटिव्ह ना होणे हा फार मोठा चॅलेंज आहे... परत कडक लोकडोवन ६.०० आणण्याची वेळ येऊ नये हीच प्रार्थना
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 06/04/2020 - 10:25 नवीन
सर्व व्यवहार मूळपदावर यायला हवेत... पण हे जितक वाटतं तितक सहज आणि सोप्पे असेल का ? माझ्या मनातील काही मुद्दे :- १] हल्लीच्या कंपनी कार्यालयात क्युबिकल सिटिंग अरेंजमेंट असते, मग तिथे सोशल डिस्टंसिंग कसे पाळता येणार ? २] बहुतेक इमारतींच्या कार्यालयात खिडक्या उघडण्याची सोय नसतेच व सेंट्रलाइझ एसी द्वारे वायुविजन होत असते... या एसीच्या वार्‍याचा झोत वेगवान देखील असतो, मग यामुळे व्हायरस संपूर्ण फ्लोअरवर पसरु शकतो का ? ३] कंपन्या त्यांच्या कर्मचार्‍यांना मास्क, सॅनिटायझर इं पुरवतील का ? [ स्मॉल स्केल उध्योगांना ते सध्य स्थितीत आर्थिक दृष्ट्या परवडु शकेल का ? ] ४] कंपन्या त्यांच्या कर्मचार्‍यांना कंपनीतच इन्फेक्शन झाल्यास कुठल्या प्रकारची जवाबदारी घेतील किंवा मदत करतील का ? ५] आता पावसाळा सुरु झाला आहे, हा काळ व्हायरस पसरण्यास अधिक पोषक ठरु शकतो का ? ६] साउथ कोरिया, इरान आणि इराक इथे लॉक डाउन मध्ये ढिलाई दिल्यावर सेकंड व्हेव्ह स्प्रेड झाल्याचे आढळुन आले आहे, मग आपण त्यातुन काय शिकु शकतो किंवा किती कठोर उपाय योजना गरजेचे आहे ? हे आपल्याला कसे कळेल किंवा शिकता येइल ? ७] आत्ता पर्यंत जवळपास मुंबईत जवळपास ७ डॉक्टरांचा जीव कोरोना संक्रमणामुळे गेला आहे, याचा अर्थ परिस्थिती गंभीर असुन आपण जीव वाचवणार्‍या देवदुतांचेच मृत्यू होताना पाहत आहोत, याचा अर्थ परिस्थिती अजुनही गंभीर आहे ! व्हायरसचे उगम स्थान असलेल्या चीन ने काय काय गाइड लाइन्स त्यांच्या इथे राबविल्या आहेत ते खालील व्हिडियोतुन समजेल. :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Scientific Study on Chanting Gayatri Mantra - Benefits of Gayatri Mantra
  • Log in or register to post comments
P
Prajakta२१ गुरुवार, 06/04/2020 - 18:12 नवीन
१] हल्लीच्या कंपनी कार्यालयात क्युबिकल सिटिंग अरेंजमेंट असते, मग तिथे सोशल डिस्टंसिंग कसे पाळता येणार ?>>>>>>> १०% उपस्थिती किंवा १० जण त्यामुळे एका cubicle मध्ये एक पुढचे रिकामे मग परत एक असे --पण हे त्रासदायक होऊ शकते त्यापेक्षा WFH continue करावे जिथे परवडत असेल तिथे खाजगी/IT कंपन्यांना WFH लांबवायला सांगायचे होते (ऑफिस चे भाडे वगैरे मुद्दे असतील तर कंपन्या चालू करण्याच्या मार्गावर असतील ) २] बहुतेक इमारतींच्या कार्यालयात खिडक्या उघडण्याची सोय नसतेच व सेंट्रलाइझ एसी द्वारे वायुविजन होत असते... या एसीच्या वार्‍याचा झोत वेगवान देखील असतो, मग यामुळे व्हायरस संपूर्ण फ्लोअरवर पसरु शकतो का ?>>>>>>>> याचीच भीती आहे AC बंद ठेवावे लागतील ३] कंपन्या त्यांच्या कर्मचार्‍यांना मास्क, सॅनिटायझर इं पुरवतील का ? [ स्मॉल स्केल उध्योगांना ते सध्य स्थितीत आर्थिक दृष्ट्या परवडु शकेल का ? ] एक कॉमन सनिट्झर पुरवू शकतील मास्क चे नाही सांगता येणार ४] कंपन्या त्यांच्या कर्मचार्‍यांना कंपनीतच इन्फेक्शन झाल्यास कुठल्या प्रकारची जवाबदारी घेतील किंवा मदत करतील का ? कंपनीवर अवलंबून आहे आणि कर्मचाऱ्याच्या श्रेणीवर (दुर्दैवाने ) ५] आता पावसाळा सुरु झाला आहे, हा काळ व्हायरस पसरण्यास अधिक पोषक ठरु शकतो का ? पावसाळ्यात रस्त्यावर थुंकण्याचे प्रमाण वाढते मी स्वतः दुचाकीवरून येता जाता हे बघितले आहे उन्हाळ्या-हिवाळ्यापेक्षा पावसाळ्यात रस्त्यावर थुंकण्याचे प्रमाण जास्त असते (ते पाण्यात वाहून जाते म्हणून लोक कसेही वागतात) त्यामुळे पावसाळ्यात जास्त सतर्कतेची गरज आहे IT क्षेत्र व जिथे WFH ला काही अडचणी नाहीयेत तिथे WFH अजून वाढवावे असे वाटते त्याने गर्दी पर्यायाने रोगप्रसार कमी होईल एकंदरीतच अनलॉक १. ० साठी घाई करत आहेत असे वाटते
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 06/06/2020 - 08:53 नवीन
Image removed.

एकंदरीतच अनलॉक १. ० साठी घाई करत आहेत असे वाटते.

देशातील लॉकडाऊन अभ्यास करणार्‍या सामाजिक संस्थेसाठी संशोधनाचा विषय आहे. अनलॉक केव्हा करायला पाहिजे हेही आपल्या हातात नाही, तो ही अभ्यासाचाच विषय आहे. आत्ताची परिस्थिती योग्य आहे, असे म्हणायला आपल्याकडे फार आशादायक आकडेवारी नाही. आपण आता सुरक्षित आहोत असे केवळ समजून चालायचे आणि आपला वावर करायचा. आपल्या आजूबाजूचा हा बाधीतच आहे असा संशय घेऊनच यापुढे आपल्याला वाटचाल करायची आहे, अशी वाटचाल पूर्वीपासून आपली सुरुच आहे. आज सहा जूनचा आलेख पाहता तो अजून वरवरच चालला आहे असे दिसते. महाराष्ट्र सरकारचा रिपोर्ट पाहता रुग्ण संख्या वाढतच आहे, असे असले तरी असे म्हणू की मरणाच्या थप्प्या लागणार होत्या, दवाखान्यात भारतात रुग्णांना जागा मिळणार नाही, असे जे चित्र मिडियात होते ते तरी आज तरी दिसत नाही. भविष्यातलं माहिती नाही. मिडियाने प्रचंड भीती निर्माण केली होती त्या तुलनेत परिस्थिती बरी आहे असे समजून आपण आपले दिवस काढायचे. बाकी, आपण सर्वच देवाला प्रार्थना करुया की हा कोरोना नुसता भारतातूनच नव्हे तर जगातून जाऊ दे, आज शनिवार तेव्हा आलोच देव्हा-यातल्या देवाला दिवा-बत्ती करुन.

-दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
P
Prajakta२१ Fri, 06/05/2020 - 21:34 नवीन
तुळशीबाग,मंडई ,हॉंगकॉंग लेन चालू मंडईत गर्दी झाल्याचे बातम्यात सांगत होते नेहमीप्रमाणेच सोशल डिस्टंसिन्ग चा फज्जा अशी line सांगत होती निवेदिका पण चित्रात एवढे नाही दिसले हॉंगकॉंग लेनमध्ये p १/p २ असले तरी दुकाने एवढी खेटून आहेत त्यापेक्षा एक आड एक दुकाने उघडावीत (समोरासमोर पेक्षा )
  • Log in or register to post comments
P
Prajakta२१ Mon, 06/08/2020 - 19:08 नवीन
आपल्या आजूबाजूचा हा बाधीतच आहे असा संशय घेऊनच यापुढे आपल्याला वाटचाल करायची आहे,>>>>>>>>>> असेच काहीसे वाटत आहे प्रतिसादाबद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 06/09/2020 - 17:55 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Sooni Sooni... :- Cheeni Kum
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 06/09/2020 - 18:32 नवीन
मुंबई आणि इतर ठिकाणी रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत, मुंबईचीच जर ही भयावह स्थिती असेल तर इतर ठिकाणी काय अवस्था असेल याची कल्पना न केलेलीच बरी ! मुंबई महानगर पालिकेची कोट्यावधीची फिक्स डिपॉझिटस [ जवळपास 66,958 कोटी ]आहेत पण रुग्णांवर उपचार करण्यासाठी मात्र धड हॉप्सिटल्स नाहीत ! हे फिक्स डिपॉझिट मधले पैसे आता जनतेच्या सेवेसाठी वापरण्यास काय अडथळा आहे कोणास ठावुक ! राजकारणी सतत सांगतात हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, हाच का तो ? खाजगी हॉप्सिटल्स तर लुट करत असुन त्यांच्यावर कोणाचेच नियंत्रण उरले नसुन त्यांना कोणताच धाक नाही ! मध्यंतरी व्हॉट्सअपवर मुंबईतील एका नामांकित हॉस्पिटलचे बिल व्हायरल झाले होते, एका दिवसाच्या उपचाराचे बिल होते जवळपास साडे चार लाख रुपये ! ही हॉप्सिटल्स राहिली नसुन सामान्य नागरिकाच्या कष्टाच्या पैशावर दरोडा टाकायची केंद्रे झाली आहेत, इथे जगणे कठीण आणि मरणे महाग झाले आहे ! अशीच एक ९ लाखाच्या बिलाची बातमी :- अशीच अजुन एक बातमी... या सर्वाच्या पलिकडील खालील बातम्या :- कोरोना पॉझिटिव्ह सहा मृतदेह गायब, किरीट सोमय्यांकडून यादी जाहीर शताब्दी रुग्णालयातून 80 वर्षीय कोरोना रुग्ण बेपत्ता, मृतदेह बोरिवली स्टेशनजवळ सापडला

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Sooni Sooni... :- Cheeni Kum
  • Log in or register to post comments
P
Prajakta२१ Tue, 06/09/2020 - 21:00 नवीन
बापरे लवकर जग करोनामुक्त व्हावे हीच प्रार्थना न्यूझीलंड झाले आहे पण तो वेगळा विषय आहे भारतात हे असेच चालू राह्यची शक्यता जास्त आहे हे कटू सत्य आहे दिवसागणिक अशा बातम्या वाढत आहेत इतर ठिकाणी आवेशपूर्ण भाषणांपेक्षा व्यावहारिक उपायांवर भर दिला आहे शेवटी देवाक काळजी
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 06/10/2020 - 07:50 नवीन
शेवटी देवाक काळजी
''कोरोना को हराना है'' पासून सुरु झालेला आपल्या सर्वांच्याच आयुष्याचा रोचक प्रवास हळुहळु ''कोरोना के साथ जीना है'' आणि आता त्याच्या पुढील व्हर्जन म्हणजे ''शेवटी देवाक काळजी'' रे बाबा इथपर्यंत येऊन ठेपला आहे. माझा देव वगैरे अशा काही चमत्कारिक गोष्टींवर विश्वास नै ये पण ही कोरोनाची बला जून एंडला गेली गेली तर आमच्या गावातल्या मारुतीला मनोभावे नमस्कार करुन येईन. हाय काय आणि नाय काय. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 06/10/2020 - 07:56 नवीन
कोरोना वाटतो तितका भयंकर नाही असं पटवून घेत असताना उलट सुलट बातम्या येतात. आजूबाजूला काही दिसतं, ऐकू येतं आणि पुन्हा तो गंभीर वाटू लागतो. सध्या पूर्वीप्रमाणे रोजचं काम पुन्हा सुरू करणं आणि जे होईल ते सहन करणं हाच मार्ग उपलब्ध आहे.
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 06/10/2020 - 08:00 नवीन
देवाक काळजी याबद्दल, मुन्नाभाई mbbs मधून वाक्य उधार घेऊन: डॉ. सुमन: खुदा ने चाहा तो सब ठीक हो जायेगा। जहीर: खुदा क्या चाहता है ये तो जाहिर है।
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 06/10/2020 - 07:16 नवीन
अनलॉकचा हेतू होता हळुहळु आणि सावधगिरी बाळगून जनजीवन पूर्ववत करणे.सध्या मात्र दररोज रुग्णांची संख्या वाढतच आहे. मृत्युचंही प्रमाण वाढतच आहे. काळजी घेऊन वावरणे हेच आपल्या हातात आहे. रुग्णालये, रुग्णालयातील लूट हेही नवीन प्रश्न समोर आले आहेत. आमच्या औरंगाबाद जिल्ह्यात पहिला रुग्ण पंधरा मार्चला सापडला होता आज दहा जून आहे, आमच्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या रुग्ण संख्या बावीसशेच्या आजपास आहे. तर अ‍ॅक्टीव्ह केसेस नऊशेच्या जवळपास आहेत. लॉकडाऊनमधेही केसेस वाढतच होत्या अनलॉक मधेही केसेस वाढत आहेत हे सत्य आहे, ही परिस्थिती सर्वत्रच आहे. आपण सर्वांनी काळजी घेऊन वावरणे यातच आपलं भलं आहे. केंद्रसरकार आणि राज्यसरकारही आता मरगळलेल्या अवस्थेला आले आहेत, उपाययोजना कराव्यात तर कोणत्य कराव्यात असे प्रश्न त्यांच्यासमोरही उभे असावेत. सध्या तरीआपली जवाबदारी इतकीच की काळजी घेणे. अजिबात बेफिकीर न राहणे. रुग्णालयात होणार्‍या हेळसांड आणि असंख्य गोष्टी आपल्यासमोर येत आहेत.सर्वांनी स्वतःला जपावे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Wed, 06/10/2020 - 08:54 नवीन
समयोचित धागा आणि उपयोगी चर्चा. गेले दोन महिने आम्ही उभयता (वय ६८ आणि ६४) घराची साफसफाई - भांडी वगैरे स्वतः करत आलो. मात्र काही दिवसांपासून झाडू पोछा आणि भांडी घासणे यासाठी येणार्‍या मुलीला परत येऊ देत आहोत. मुलगी मुस्लिम असून त्या सहा - सात बहिणी , त्यांचे आईवडील हे एका लहानश्या घरात रहातात. सगळ्या मुली ( वय ६-७ ते २०) विविध घरात काम करतात. मात्र आपण हे योग्य करत आहोत किंवा कसे याबद्दल संभ्रम आहे. खरेतर आम्ही अजुनही ही कामे करू शकत आहोत, पण उन्हाळ्यात जरा थकायला होते म्हणून सुरू केले. यावर मिपाकरांचे मत काय आहे ?
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 06/10/2020 - 13:10 नवीन
सकाळपासून तीनदा प्रतिसाद लिहायला घेतला आणि तीनही वेळा ठेवून दिला. कन्फ्युज म्हणून. बाकी, अधिकृत सांगायला मी काही जाणकार नाही. पण, काळजी म्हणून माझं मत असं की, काही दिवस तुम्ही तुमचं करुन घ्यावे असे वाटते. सदरील कामवाली मुलगी कोणाच्या बाधीत रुग्णांच्या संपर्कात नाहीत, त्यामुळे तसा काही धोका नाही. पण ते वेगवेगळ्या ठिकाणी ते काम करुन येतात म्हणून आपल्या मनात तसे विचार येतात. पण सध्या आपलं मन निसंशयी, उत्साही आणि फीट राहण्यासाठी काही दिवस आपापल्या लेवलवर घरातल्या घरात सांभाळून काम करावे असे सुचवावे वाटते. आपण योग्य निर्णय घ्यावा. बाकी, बरेच दिवस झाले चित्रवजा लेख टाकला नाही, चित्र टाकत राहा आणि येत राहा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 21 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 22 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 22 hours ago
  • सुंदर !!
    1 day 22 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 22 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा